सोप्पा केक

Submitted by के अंजली on 9 July, 2012 - 04:27
soppa cake
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

करायला अगदी सोप्पा असा हा केक कालच करुन पाहिलाय Happy

हा मी तव्यावर केला होता.. मस्त झाला!

साहित्य: हाईड अँड सिक बिस्किटांचे दोन मध्यम पुडे, पारले जी बिस्किटांचा चा साधा एक पुडा,आठ चमचे साखर, दीड कप दूध, खाण्याचा सोडा किंवा कोणाताही फ्लेवर नसणारा इनो फ्रुट सॉल्ट्चा एक छोटा(४ रु.) चा सॅशे.

क्रमवार पाककृती: 

कृती: हाईड & सिक ची अणि पारले जी ची बिक्सिटे एकत्र करुन मिक्सरमधून बारीक करुन घ्यावित.
आठ चमचे साखर घालून मिक्स करावीत आणि इनो सॉल्ट त्यावर टाकावे. खाण्याचा सोडा असेल तर तो चहाचा एक चमचा अथवा पोह्यांचा अर्धा चमचा या प्रमाणात टाकावा. त्या नंतर दूध घालत हळूहळू हाताने ढवळावे. बिस्किटात चॉकलेट असल्याने हे मिश्रण जरा चिकट होते. खूप वेळ ढवळू नये. इनोचे मिश्रण थोडेसे फसफसते.(खूप नाही)
केकच्या भांड्याला आतून तूप लावून हे मिश्रण तव्यावर ठेऊन अर्धा तास गॅसवर अगदी मंद आचेवर ठेवावे. अगदी छान स्पाँजी चॉकलेट केक तयार होतो. Happy

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कायपण नको टाकू Proud

चांगला होऊदे म्हंजे झालं..
नायतर रियासारखं म्हणशील अंजलीचीच चूक आहे म्हणून.. Happy

शुभेच्छा!

अहो पण प्रमाणसाठीचा चहाचा कप कुठला? पुण्याचा कि मुंबईचा ?>>>

चहाच्या कपाने नै कै मोजायचयं काही..

चहाचा चमचा लिहिलयं बर्फीताई Happy

रिया..मला कुठे दिलीयेस गं टेस्ट.. Uhoh
मी आपला फोटोतला गोड मानून घेतलाय.. Happy

इथे बोरिवलीत मला हाईड अँड सिकचा २५ रुपयांचा पुडा मिळाला त्याच्यात २२ बिस्किटे आहेत.
तर आता हाईड अँड सिक बिस्किटे, पार्ले जी बिस्किटे, दुध, साखर, इनो यांचे प्रमाण किती घेऊ?
थोड लवकर उत्तर मिळेल का कारण उद्या सुट्टीच्या दिवशी बनवायचा विचार आहे.

लोकहो, हा धागा वाचून अत्यंत स्फूर्ती येऊन मी तडक सामान आणायला गेले. 25 रु.चा हाईड अँड सिकचा पुडा (त्यातली 2 बिस्किटं वजा करून), पारले जीचा 10 रु.चा पुडा (144 ग्रॅ. - त्यातली साधारण 100 ग्रॅ. घेतली.) आणि केक केलासुद्धा. त्यात काजू आणि मनुका घातल्यात.

आणि हा माझा केक Happy
DSC_0701~1_0.jpg

वरती के अंजली यांनी सांगितलंय कि हाईड अँड सिक बिस्किटांचे दोन मध्यम पुडे घ्यायचे आहेत तर मला असा विचारायचंय कि हा हाईड अँड सिकचा २५ रुपये वाला एक पुडा, पार्ले जी चा ५ रु.चा पुडा, चार चमचे साखर, दीड कप दूध आणि इनो फ्रुट सॉल्ट्चा एक छोटा(६ रु.) चा सॅशे हे प्रमाण बरोबर होईल का?

अशिता बिस्किटांचे प्रमाण बरोबर होईल,, पण दूध दिड कप जरा जास्त वाटते. मिश्रण पातळसर नको व्हायला, तेंव्हा नीट अंदाज घेऊनच टाक दूध...इनो सुद्धा प्रमाणातच टाक,

अरे वा! ते तसलं भांड आणायला हवं राव>>> अग काही खास नाहीये त्या भांड्यात, सोलर कुकरचे अल्युमिनियमचे भांडे आहे ते.

सहेली तूला छान जमला ना? आता तूच घेऊन ये फिदीफिदी>> माझा त्याच दिवशी संपला पण. आता परत करेन तेव्हा. तुला जमला?

मी मस्तानी..

चॉकलेट फ्लेवरची साधारण बावीस ते पंचवीस बिस्किटे आणि पारलेजीची वापरलीयेत त्यासाठी कुठलीही ग्लुकोज बिस्किटस असतील ना तिथे..ती साधारण आठ ते नऊ बिस्किटे पुरे होतील. बाकीचे प्रमाण कृतीत सांगितल्याप्रमाणे... Happy

मी आजच केला. मस्त चव आली आहे, पण केक चिकट झालाय आणि कूकरच्या भांड्यात केल्याने थोडासा करपला खाली. पण मजा आली करायला आणि खायला Happy धन्यवाद या पाकृ साठी.

जर, चॉकलेट केक नको असेल, तर फक्त पारले, २०-२०, किंवा क्रिमची बिस्किटे वापरून केलेला केक कसा होईल? मी उद्या करून बघणार आहे. बिस्किटांचा वास येईल का? Uhoh

मस्तानी केक केलास की नाही? डायजेस्टीव बिस्कीटस वापरून कसा होतोय याची मला नाहीये कल्पना. तू केला असशील तर सांगच.

शोभा केक करणार असशील तर क्रीमची बिस्कीटे नकोच वापरू माझ्या मते. चॉकलेट्ची नको असतील तर बटरची..ग्लुकोज साधी मारी काजू वगैरे वगैरे आहेत ना कितीतरी फ्लेवर ते वापरून करुन पहा केक. बाकीचे प्रमाण मात्र हेच ठेव म्हणजे झालं.

रंगासेठ ..मस्त!.. केक करताना दुधाचे प्रमाण जर थोडेसे जास्त झाले असेल तरी केक चिकट होऊ शकतो.
सुजा Happy

धन्यवाद मंडळी Happy

काल हा केक केला होता मायक्रोवेव्ह मधे काचेच्या भांड्यात १००% पॉवर वर ४ मिनीटात झाला.
छानच झाला होता सगळ्यांनी ५ मिनीटात संपवला.
फक्त थोडा कोरडा झाला होता. अजून मॉइस्ट हवा होता.
इतक्या सोप्या कृतीसाठी धन्यवाद अंजली.

Pages