सोप्पा केक

Submitted by के अंजली on 9 July, 2012 - 04:27
soppa cake
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

करायला अगदी सोप्पा असा हा केक कालच करुन पाहिलाय Happy

हा मी तव्यावर केला होता.. मस्त झाला!

साहित्य: हाईड अँड सिक बिस्किटांचे दोन मध्यम पुडे, पारले जी बिस्किटांचा चा साधा एक पुडा,आठ चमचे साखर, दीड कप दूध, खाण्याचा सोडा किंवा कोणाताही फ्लेवर नसणारा इनो फ्रुट सॉल्ट्चा एक छोटा(४ रु.) चा सॅशे.

क्रमवार पाककृती: 

कृती: हाईड & सिक ची अणि पारले जी ची बिक्सिटे एकत्र करुन मिक्सरमधून बारीक करुन घ्यावित.
आठ चमचे साखर घालून मिक्स करावीत आणि इनो सॉल्ट त्यावर टाकावे. खाण्याचा सोडा असेल तर तो चहाचा एक चमचा अथवा पोह्यांचा अर्धा चमचा या प्रमाणात टाकावा. त्या नंतर दूध घालत हळूहळू हाताने ढवळावे. बिस्किटात चॉकलेट असल्याने हे मिश्रण जरा चिकट होते. खूप वेळ ढवळू नये. इनोचे मिश्रण थोडेसे फसफसते.(खूप नाही)
केकच्या भांड्याला आतून तूप लावून हे मिश्रण तव्यावर ठेऊन अर्धा तास गॅसवर अगदी मंद आचेवर ठेवावे. अगदी छान स्पाँजी चॉकलेट केक तयार होतो. Happy

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कृपया पाकृ ला सोप्या असं विशेषण जोडु नये.. करुन बघायचा मोह होतो.. अन प्रयोग फसला की जगात काहिही सोपं नसतं याचा प्रत्यय येतो. Wink एकदा हा प्रयत्न फसलेला आहे..
दुध मोजायच्या कपाची साइज?? मिश्रणाची कन्सिस्टन्सी किती पाहिजे हे न कळणे.. इ. प्रकार मी केलेला प्रयोग फसायला कारणीभुत झाले होते.. तसही वर्षुच्या पुडिंगच्या सोप्प्या पाकृ नंतर कोणतीही सोप्पी पाकृ परत करायचा प्रयत्न केलेला नाहिये.. या पाकृ मुळे पुन्हा एकदा मोह होतोय हे नक्की Happy

पण असा केक छान होतो हे नक्की (मैत्रिणीच्या आईची कृपा).. Happy

दिपाली मलाही तो प्रश्न पडलेला. मग जाऊन घेऊनच आले केकच भांडं. त्यात चांगला होतो केक.
चिमुरे Happy करुन पाहाच गं! कप म्हणजे नेहेमीचा चहाचा . मोठ्ठा मग नाही!
सोप्पाच वाटेल तुला केक.

कृपया पाकृ ला सोप्या असं विशेषण जोडु नये.. करुन बघायचा मोह होतो.. अन प्रयोग फसला की जगात काहिही सोपं नसतं याचा प्रत्यय येतो. >> +१००० Proud

मी रूनी पॉटरने लिहिलेलं लेमन तिरामिसु सोप्पं वाटतंय म्हणून करून पाहिलं, पण फसलंच Sad
अशा अनेक निष्फळ प्रयोगांमुळे पाकृ कौशल्यातील माझ्या आत्मविश्वासाला प्रचंड तडा गेलेला आहे....

पण के अंजली, ही पाकृ करून पाहीन. सोप्पी वाटतेय. धन्यवाद.

अरे वा..वाचून खुपच मस्तं वाटतयं. लिहील्याप्रमाणेच सोप्पा असेल असं दिसतंय तरी Happy करुन बघायचा मोह होतोय.

केकच्या भांड्याला आतून तूप लावून हे मिश्रण तव्यावर ठेऊन अर्धा तास गॅसवर अगदी मंद आचेवर ठेवावे. अगदी छान स्पाँजी चॉकलेट केक तयार होतो...>>>> केक तळाला लागुन चिकटणार नाही का? आणि मायक्रोव्हेव मध्ये पण करता येईल ना.

स्नेहश्री..
मंद गॅसवर केल्याने शक्यतो चिकटत नाही पण अर्ध्या तासाने सुरीने झाला आहे की नाही ते पहावे आणि गॅस बंद करावा. मायक्रो मध्ये मी केला नाही पण होईल असे वाटतेय.

दीपाली
केकचं भांड नसेल तर Flat Bottom च्या कढईत करुन बघ. छान होतो.
प्रितीभुषण
मला वाटतं झाकण ठेवावं लागतं, मी तरी ठेवते थोडा वेळ सुरुवातीला.

प्रीती.. झाकण ठेवावे लागतेच. पण साधारण १५ मिनिटांनी ते उघडून दुसरे टाकावे कारण त्याला आतून खूपच बाष्प जमा होते.
रुणुने केला की नाही अजून? Happy
श्रद्धा, माधवी आणि अन्कुरी Happy धन्यवाद!

अंजू, केकचे भांडे म्हणजे काय?
ते नसल्यास, तव्यावर इतर कुठले पातेले/ भांडे चालेल?
सुरूवातीलाच झाकण ठेऊन १५ मिनी ने ते बदलावे, करेक्ट?

(करून पाहण्याचा मोह झाला, म्हणून इतके प्रश्न Proud )

बागेश्री... केकचे भांडे मागितल्यावर अ‍ॅल्युमिनियमचे भांडे मला दुकानदाराने दिले. पातळसेच आहे ते. आणि त्यातच छान झाला केक त्यामुळे मावेमध्ये करायचे अजून धाडस केले नाही Happy
ते नसले तर कुकरचे अ‍ॅल्युमिनियमचेच भांडे चालेल. पण ते बहुदा जाड असते. पण स्टीलचे नको घेऊस.
आणि हो झाकण बदलावेच नाहीतर ते पाणी केकवर पडून केक ओलसर होतो. नक्की करून सांग मला Happy

आर.एस्.टी. ईडली स्टीमर नका वापरु कारण त्याला खालून पण स्टीम लागेल, मग केक फुलून येणार नाही.. पण कुकरचे अ‍ॅल्युमिनियमचे भांडे चालेल.

मेधा, आर्या, स्मितू धन्स..

आज हा केक करून पाहायचा होता म्हणून रेसिपी उघडली.....पण भांड्याचं नवीनच कळलं...अ‍ॅल्युमिनियमचे भांडे नाहीये माझ्याकडे. मी कुकरच्या भांड्यात (स्टीलच्या) करणार होते. मावे बिघडलाय.
नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने Proud

केला केला. मावेमधे केला. ०.५ मिनिट मिक्सर ०.५ मिनिट दुध व सोड मिसळणे व ४ मिनिट मावे असे ५ मिनिटात गरम गरम केक तयार. मस्त. मउ, स्पाँजी, आहाहा.
साखर अजुन चालली असती असेल मला तरी वाटले. पण छानच झाला होता. Happy

जमला बरं का. छान स्पॉन्जी झाला आहे. माझा विश्वासच बसत नाहीये Proud
हा फोटु.

Easy cake1.JPG

वरून आयसिंग करणार असू तर एवढी साखर पुरेशी आहे. नुसता खायचा असेल तर आम्हाला अजून साखर लागेल.
खर्‍याखुर्‍या सोप्या केकबद्दल धन्यवाद अंजली.

वाsss!! मस्तच गं रुणू...
फोटोसाठी धन्स.. Happy

वेका आणि दा.. Happy

ठांकु Happy
छान टेस्टी झाला होता. बिस्कीटे घातली आहेत ह्याची काहीच चिन्हे दिसत नव्हती नंतर.

स्टीलच्या भांड्यात करण्याला प्रोत्साहन दिल्याबद्दल मंजूडीला धन्यवाद.
ऐनवेळी सजावटीसाठी लेकाने स्वतः बनवलेलं क्लेचं सूर्यफूल आणून ठेवलं Proud
(केकला क्लेचा स्पर्श होऊ नये म्हणून प्लॅस्टिकच्या कापलेल्या बाटलीवर क्ले लावला होता)
त्याखाली एक कागदी गुलाब पण दिला खोचून मग.

(केकला क्लेचा स्पर्श होऊ नये म्हणून प्लॅस्टिकच्या कापलेल्या बाटलीवर क्ले लावला होता)
त्याखाली एक कागदी गुलाब पण दिला खोचून मग.>>>> ohmy.gif
रुणूच्या केकचा फोटो बघून 'व्वाह!' असा प्रतिसाद टाईप करणार होते. आधी फोटो बघून मला वाटलं की हिने आयसिंगचंच फूल केलं आहे. रुणू थापाडी!

पण केक छान दिसतोय.

Pages