सोप्पा केक

Submitted by के अंजली on 9 July, 2012 - 04:27
soppa cake
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

करायला अगदी सोप्पा असा हा केक कालच करुन पाहिलाय Happy

हा मी तव्यावर केला होता.. मस्त झाला!

साहित्य: हाईड अँड सिक बिस्किटांचे दोन मध्यम पुडे, पारले जी बिस्किटांचा चा साधा एक पुडा,आठ चमचे साखर, दीड कप दूध, खाण्याचा सोडा किंवा कोणाताही फ्लेवर नसणारा इनो फ्रुट सॉल्ट्चा एक छोटा(४ रु.) चा सॅशे.

क्रमवार पाककृती: 

कृती: हाईड & सिक ची अणि पारले जी ची बिक्सिटे एकत्र करुन मिक्सरमधून बारीक करुन घ्यावित.
आठ चमचे साखर घालून मिक्स करावीत आणि इनो सॉल्ट त्यावर टाकावे. खाण्याचा सोडा असेल तर तो चहाचा एक चमचा अथवा पोह्यांचा अर्धा चमचा या प्रमाणात टाकावा. त्या नंतर दूध घालत हळूहळू हाताने ढवळावे. बिस्किटात चॉकलेट असल्याने हे मिश्रण जरा चिकट होते. खूप वेळ ढवळू नये. इनोचे मिश्रण थोडेसे फसफसते.(खूप नाही)
केकच्या भांड्याला आतून तूप लावून हे मिश्रण तव्यावर ठेऊन अर्धा तास गॅसवर अगदी मंद आचेवर ठेवावे. अगदी छान स्पाँजी चॉकलेट केक तयार होतो. Happy

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा केक हमखास फसतो. पण हा जमला ! आज नाताळ घरी बनवलेल्या केकने साजरा झाला Happy

धन्यवाद अंजली के

IMG_0450.JPG

दीपा, आयसिंगची रेसिपी टाका.
मस्त दिसतेय.
मला काही हा सोप्पा केक जमत नव्हता.
शेवटी परवा बहिणीने करून दिला. तो फार मस्त स्पाँजी झाला होता वर चॉकलेट सिरप घालून भारीच लागला.

धन्यवाद अंजली, मस्त रेसिपी. मी ८-१० चॉकलेट चिप कुकी आणि मारीचा पुडा वापरून केला. यमी झाला होता. अजिबात बिस्कीटाची चव लागत नव्हती.

धन्यवाद सार्‍यांचे! Happy
जयु मस्त दिसतोय केक Happy

दीपा व्वा!! छान सजलाय! Happy आयसिंगची रेस्पी टाका आता..
अभिप्रा मारीची पण आयडीया मस्त!
प्रज्ञा Happy निवा आणि या धाग्यावरच्या समस्त माबोकरणी.. आभार!

सगळ्यांचेच केक झकास दिसतायत. Happy
मनीमाऊ मस्तच दिसतोय तुझा केक. आयसिंगची रेसिपी टाक की.

ओरीयोची बिस्किटे २ पुडे म्हणजे किती घ्यायची?

मी आयसिंग म्हणून फक्त २-३ दिवसाची साठवलेली साय पिठीसाखर घालून फेटली. वर जेम्स च्या गोळ्या !

काय एकेक उत्साही माबोकरणी आहेत Happy मस्त मस्त केक दिसताहेत आज!
मनी सुरेख केक Happy
रचना खूप छान रंगीत दिसतोय केक Happy
पिठीसाखर नी साय..व्वा! हे कॉम्बो मस्त दीपा!

आभार!

मी पण केला..रादर केले.. आधी एक करून पहिला..मस्त जमला..आणि सगळ्यांना खूप आवडला...दुसर्या दिवशी एका पाठोपाठ ४ Happy

ए माझा पण एकदम झकास झाला. एकदम सुपरहीट Happy

मी ह्यात थोडे अक्रोड घातले आणि दीड कप दुधाऐवजी एक कप दूध आणी अर्धा कप तेल घातलं. एकदम मस्त झाला.

इतक्या मस्त सोप्या रेसिपीबद्दल धन्यु Happy

धन्यवाद!!! के अंजली ...... खरच खुप सोप्पी रेसिपी आहे ... मी लगेच करुन बघितली आणि इतका सुंदर केक झाला... खरच मनापासुन आभार इतक्या सुंदर सोप्या रेसिपी बद्दल..... Happy
मी ओव्हन मधे केला केक... २५० वर अर्धा तास.... छान झाला... जमल तर फोटो टाकेन... पुन्हा एकदा धन्यवाद....... Happy आणि सगळ्या माबोकरींचे पण आभार त्यांच्या छोट्या छोट्या टिप्स मुळे मला खुप उपयोग झाला.....

browney mhantat hyala cake nahi...pan mastach sopi kruti sangitlya baddal dhanyawad Happy

Pages