सोप्पा केक

Submitted by के अंजली on 9 July, 2012 - 04:27
soppa cake
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

करायला अगदी सोप्पा असा हा केक कालच करुन पाहिलाय Happy

हा मी तव्यावर केला होता.. मस्त झाला!

साहित्य: हाईड अँड सिक बिस्किटांचे दोन मध्यम पुडे, पारले जी बिस्किटांचा चा साधा एक पुडा,आठ चमचे साखर, दीड कप दूध, खाण्याचा सोडा किंवा कोणाताही फ्लेवर नसणारा इनो फ्रुट सॉल्ट्चा एक छोटा(४ रु.) चा सॅशे.

क्रमवार पाककृती: 

कृती: हाईड & सिक ची अणि पारले जी ची बिक्सिटे एकत्र करुन मिक्सरमधून बारीक करुन घ्यावित.
आठ चमचे साखर घालून मिक्स करावीत आणि इनो सॉल्ट त्यावर टाकावे. खाण्याचा सोडा असेल तर तो चहाचा एक चमचा अथवा पोह्यांचा अर्धा चमचा या प्रमाणात टाकावा. त्या नंतर दूध घालत हळूहळू हाताने ढवळावे. बिस्किटात चॉकलेट असल्याने हे मिश्रण जरा चिकट होते. खूप वेळ ढवळू नये. इनोचे मिश्रण थोडेसे फसफसते.(खूप नाही)
केकच्या भांड्याला आतून तूप लावून हे मिश्रण तव्यावर ठेऊन अर्धा तास गॅसवर अगदी मंद आचेवर ठेवावे. अगदी छान स्पाँजी चॉकलेट केक तयार होतो. Happy

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कधीतरी ९३ साली माझ्या मैत्रिणिच्या आईच्या हातचा पारले जी चा केक खाल्ला होता.... अप्रतीम चव होती.. आणि इतका आकर्षक रित्या डेकोरेट केला होता काकुंनी Happy
मला लहान पणी कुकींग/ बेकींग ची आवड नसल्याने रेस्पीच्या फंदात पडले नव्ह्ते. Wink
अंजली ची ही रेसिपी वाचून त्याच केक ची आठवण होते.

अंजली,
आग कप मंजे नक्कि कुठला? मी दीड कप म्हणून ८ + ४ =१२ आउंस दूध घातल आणि ओला ओला झालाय. कुणि या कपा च रहस्य आउंस मधे सन्गेल का?आसा पण चवीला चन्ग्लाच लगतोय पण एकदा नीट करायचा आहे.
-शिरीन

माझा बिघडला हा केक. मी मारीची बिस्किट्स घेतली होती आणि थोडी साखर टाकली.नंतर दुध टाकुन मायक्रोवेव मधे ठेवले, झाकण न ठेवता. केक फुगला नाही आणि चिकट गोळा झाला. मी थोडिशिच बिस्किट्स घेतली होती. माझ काय चुकले? Sad

मावे मधला अनुभव सांगा.... म्हणजे किती वेळ मावे करायचा?

वरचे फोटो पाहुन अत्ताच्या अत्ता घरी जाउन बनवावासा वाटतोय....

ओरीओ बिस्किटांची आयडिया लई भारी...

भारतात हा केक करून बघणार्‍यांनी बिस्किटांचे कोणते पुडे वापरले हे सांगताना किती रुपयांचे पुडे वापरले हेही कृपया सांगा, म्हणजे प्रमाणाचा अंदाज येईल.

मी एक हाईड & सीक (२०/-) अन २ पार्ले (५/- प्रत्येकी) करून पाहिला. मस्त झाला. दुध अंदाजाने घेतले. इनो ऐवजी बेपा वापरली. तरीही छान फुगला एक चमचा को. पावडर अन ५ च. साखर घात्ली.
धन्यवाद के. अंजली, पाकृ बद्दल. मी आधी पारले चा केक करून पाहिलाय. पण हा.सी. मुळे मस्त चव येते.. एकदम यम्मी..

मंजू +१

मी परवा करु शकले नाही. बिस्किटांचे पुडे आणायचे तर सोमवारमूळे दुकानं बंद होती. आज ओरियोचे ३ छोटे पुडे+ एक पार्ले जीचा छोटा पुडा आणि बेपा, सोडा असं सगळं सामान आणलंय. पण आता बिस्किटांच्या पॅकच्या साइझचा प्रश्न पडलाय.

बिस्कीटे मोजून घे अल्पना. पारले ५/- मधे १६ बिस्कीटे असतात. पारलेच्या ३२ बिस्कीटांना एक इनो पाकिट लागते. अश्या रितीने हिशोब कर. Happy ओरियोच्या छोट्या पुड्यात २ असतात ना बहुतेक बिस्कीट्स ?

नाही ४-६ असतिल ओरियोमध्ये बहूतेक.
मोजून घेते बिस्किटं. लेकाला केक खायचाय घरी बनलेला आणि मला केक बनवायचा जाम कंटाळा आलाय.

मी पण करुन बघितला.... खुप छान जमला होता.

घरी मुलगी फारच खुष झाली आईला केक करता आला म्हणुन Happy

धन्यवाद अंजली Happy

मी केला हा केक आज, लई भारी झाला होता आणि झटपट.

मी बर्बन बिस्किटांचा २०/- रुपयांचा अख्खा पुडा घेतला, ज्यात १५ बिस्किटे असतात आणि पार्ले जी चा १०/- रुपयांच्या पुड्यातली अर्धी बिस्किटे (म्हणजे १५ बिस्किटे) वापरली. एक चहाचा कप दूध, चार चमचे साखर घालून सगळी बिस्किटे मिक्सरमधून फिरवून घेतली आणि इनोचा एक पॅक (६/- रुपयांचा) वापरला. मायक्रोवेव मोडवर हाय पॉवरला पाच मिनीटे शिजवून घेतला, अधिक पाच मिनीटे स्टँडिंग टाईम.

एकदम मस्त, मस्त झालेला केक Happy

धन्यवाद सार्‍यांचे! डॅफो Happy
शिरीन... कप म्हणजे चहाचाच पण खूप मोठाही नाही आणि लहानही नाही असा मध्यम आकाराचा वापरला तरी चालेल. पण खूप पातळ करायचे नाही मिश्रण. साधारण लहान असेल तर दीड नाहीतर एक कप याप्रमाणात दुध वापरावे..

पेरु.. अगोदर हेच प्रमाण आणि साहित्य घेऊन करुन पहा म्हणजे अंदाज येईल. आणि या केक मध्ये शक्यतो बेकींग पावडर घालू नये कारण बिस्किटांमध्ये ती असतेच. इनो घातल्याने छान फूलून येतो. मिश्रण मिक्सरमधून काढून त्यात इनो घालून मग त्यावर हळूहळू दूध घालत जावे आणि मग बेक करायला ठेवावा.

मावेमध्ये मी अजूनही करुन पाहिला नाही, पण इथे मंजूडीने ते सांगितले आहेच.

अनघा Happy स्मितू Happy मंजूडी Happy आणि बाकी सार्‍याजणी धन्स! Happy Happy

केक इतका फेमस झालाय तर करायलाच पाहिजे. मला बर्बन (बबन नाही) आवडतात तेव्हा मी मंजूडी ह्याच्या प्रमाणाने करेन.

इतक सोप्पा असेल तर मजा.

मी आज करणार.... मैत्रिणीच्या मुलीचा बड्डे आहे. ती आज माझ्या लेकीशी खेळायला येणार आहे... तिला सर्प्राइज करीन संध्याकाळी.....

मी काल केक केला. चव छानच होती. पण तितकाचा हलका स्पॉन्जी झाला नाही. वरची के अंजली ह्यांची पोस्ट वाचल्यावर घोळ लक्षात आला. मी बे पा वापरली होती. आता इनो वापरुन ट्राय करते.
रेसिपी सोप्पी वाटली म्हणुन करुन पाहिली. नाहितर मी कधी केक च्या भानगडीत पडले नसते. के अंजली ह्या रेसिपीसाठी खुप धन्यवाद !

मी पण केला आज्,पण ओवनम्ध्ये.प्रीहिट करुन मग २०० डीग्रीला ३० मिनिटस. अप्रतिम आहे हि रेसिपी.आणि एवढी सोपी.खूप खूप धन्यवाद अंजली.
एक प्रश्न,गॅसवर केला तर झाकण नाहि ना ठेवायचे?

आज केला एकदाचा. सगळं साहित्य मिक्स झाल्यावर पोराला लगेच खायचा होता म्हणून एका छोट्या काचेच्या वाटीत मावेमध्ये केला त्याच्यासाठी. ३ मिनीटमध्ये झालासुद्धा. उरलेला मात्र केकच्या भांड्यात कन्वेक्शन मोडमध्ये केला ३२-३३ मिनीट १९० वर.
स्पाँजी झालाय मस्त. पण मला मात्र बिस्किटांची चव अगदी ठळकपणे जाणवतेय (ते पण फक्त पार्ले जी ची).

मी पण मंजूडी च्या कृती प्रमाणे केला. मस्त झाला हा पहा फोटो. अगदी हलका आणि जाळीदार. मावे मधले केक आमच्या कडे एकदम हीट!!!!

2012-12-13 19.26.08.jpg

cake_0.jpg

हा काल केला. चव मी अजून बघितली नाहीये. पण लेकीने कालच दोन पीस खाल्ले, आज डब्यात घेऊन गेलेय म्हणजे चांगला झाला असावा Proud

व्वा! मो कि मी आणि कविन छानच दिसताहेत केक दोन्ही Happy

भान.. गॅसवर करताना झाकण ठेवावे लागते पण साधारण १० मिनीटे झाली की खाली बाष्प जमा होते, त्यामुळे ते काढून पटकन दुसरे झाकण घालावे. नंतर नाही बदलावे लागत. तेवढ्यात केक होऊनही जातो.

रचना प्रति आणि अल्पना Happy

झंपी केलात की सांगा नक्की!

हा केक काल केला होता. अगदी मस्त झाला. सुनिधीला तर फारच आवडला.

मी खाण्याचा सोडा अजिबात घातला नव्हता. हाईड अँड सिकचे दोन पुडे आणि पार्लेजीचा एक पुडा वापरला होता. साखर मात्र थोडी कमी झाल्यासारखी वाटली. पण चवीला छान झाला होता. मायक्रोवेव्हमधे पाच मिनिटे ठेवून केला. (धन्यवाद, श्रद्धादिनेश, मंजूडी!) अगदी आयत्यावेळेला पण करता येण्यासारखा केक आहे.

नवर्‍याने केलेली एक सूचना: बिस्कीटं अशी मिक्सरमधे फिरवून चुरा करून ठेव. लागेल तेव्हा बोलभर चुर्‍यामधे दूध साखर घालून केक बनवून खाता येइल. Proud

Pages