सोप्पा केक

Submitted by के अंजली on 9 July, 2012 - 04:27
soppa cake
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

करायला अगदी सोप्पा असा हा केक कालच करुन पाहिलाय Happy

हा मी तव्यावर केला होता.. मस्त झाला!

साहित्य: हाईड अँड सिक बिस्किटांचे दोन मध्यम पुडे, पारले जी बिस्किटांचा चा साधा एक पुडा,आठ चमचे साखर, दीड कप दूध, खाण्याचा सोडा किंवा कोणाताही फ्लेवर नसणारा इनो फ्रुट सॉल्ट्चा एक छोटा(४ रु.) चा सॅशे.

क्रमवार पाककृती: 

कृती: हाईड & सिक ची अणि पारले जी ची बिक्सिटे एकत्र करुन मिक्सरमधून बारीक करुन घ्यावित.
आठ चमचे साखर घालून मिक्स करावीत आणि इनो सॉल्ट त्यावर टाकावे. खाण्याचा सोडा असेल तर तो चहाचा एक चमचा अथवा पोह्यांचा अर्धा चमचा या प्रमाणात टाकावा. त्या नंतर दूध घालत हळूहळू हाताने ढवळावे. बिस्किटात चॉकलेट असल्याने हे मिश्रण जरा चिकट होते. खूप वेळ ढवळू नये. इनोचे मिश्रण थोडेसे फसफसते.(खूप नाही)
केकच्या भांड्याला आतून तूप लावून हे मिश्रण तव्यावर ठेऊन अर्धा तास गॅसवर अगदी मंद आचेवर ठेवावे. अगदी छान स्पाँजी चॉकलेट केक तयार होतो. Happy

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिस्किटं उशीच्या आकाराची>>>> कशी म्हणजे?
तुम्ही जे ६ बिस्किटांचा पुडा म्हणताय तो माहित आहे. पण ती चओकोनी बिस्किटं आहेत

काल करून पाहिला हा केक, मस्त सॉफ्ट झाला होता एकदम , मी फक्त बेताचा गोड केला.
बाकी व्यवस्थित झाला पण तळाशी थोडा चिकटून राहिला त्यामुळे तुकड्या तुकड्यात काढावा लागला, एकसलग नाही आला बाहेर.
Thanks for this easy n yummy recipe Happy

C971B235-A242-4163-9098-8E8C0BDA6A2D.jpeg

चवीला खुपच छान.

Screenshot_2020-04-14-19-06-30.pngTumhi dilelya recipe nusar mi chocolate cake ghari banawala aani majha gharatlyana cake khup awadala thank you so much..

माझ्याकडे Samsung GW73E हा मायक्रोव्हेव आहे. कन्व्हेक्षन वगैरे नाही. 8 वर्षात आत्तापर्यंत फक्त रीहीट साठी वापरलाय. प्रत्येक वेळी 750W वर लावतो. फक्त किती गरम हवाय यावर वेळ कमीजास्त करतो.

तर..

१. कोणाकडे हा मावे आहे का?
अश्या मावे मध्ये हा केक कसा करू?

२. केक बेक होताना मध्येच बाहेर काढला तर फुगलेला केक खाली बसतो. मग तो पुन्हा बेकिंग ला लावून काही उपयोग होत नाही. म्हणजे बेक होतो पण पुन्हा फुगत नाही तो नाहीच. तर मी 4 मिनिटे हा केक मावे ला लावला तर भगवान भरोसे ठेवावा लागेल का? समजा बाहेर काढल्यावर नीट झाला नाहीये असं वाटलं तर काय?

मायक्रोवेव्ह मध्ये अर्धवट राहिलेला केक खाली बसत नाही. पुन्हा थोडा वेळ ठेवता येतो. पहिल्या दोन तीन पानांवर मायक्रोवेव्हमध्ये केलेल्यांनी प्रतिसाद दिलेत ते पहा.
प्रत्येक मायक्रोवेव्हचं पॉवरचं प्रमाण वेगळंच असतं (हर गार्डाची शिट्टी न्यारी सारखं) त्यामुळे तुम्हाला च करून पाहावं लागेल. चार मिनिटे सेफ वाटतंय कारण काहींनी ५ मिनिटांत झाला असं लिहिलंय. टु बी ऑन सेफर साइड्, तुम्ही तीन मिनिटे आणि मग अर्ध अर्ध मिनीट असं वाढवा.

मायक्रोवेव्ह मध्ये अर्धवट राहिलेला केक खाली बसत नाही. पुन्हा थोडा वेळ ठेवता येतो.

>> ओह रिअली? यु मेड माय डे भरत.

झाला केक मावे मध्ये. मी काचेचा बोल घेतला होता. त्यात घुमटाकार झाला. म्हणजे मध्यभागी फुगून वर आला. आणि तेवढे हिमनगाचे टोक काही बेक झाले नाही.

संपादन : बेसो घातल्यावर टॅप करून बबल्स काढून टाकायला विसरले Sad त्यामुळे एअर पकडली (इति घरातले बेकर) तर कृपया ही स्टेप विसरू नका.

सेफर साईड साडेतीन मिनिटे लावून मग 30-30 सेकंद वाढवले त्या न बेक झालेल्या टोकासाठी. पण शेवटी अगदी थोडेसे राहिलेच आहे तसेच. जाऊदे.

आता गार करायला ठेवला आहे. यशस्वी झाला तर मी घेतलेलं प्रमाण आणि परिणाम शेअर करते नक्की.

पुन्हा एकदा थँक्स भरत.

हुश्य.. खाऊन झाला एकदाचा केक.

तर.. माझ्याइतकं अडाणी माबोवर कोणी असेल असं वाटत नाही. तरीही चुकून माकून असेलच तर माझ्या अधिकच्या टीपा:

१. खायचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा.

२. इनो चे 6 चे पाकीट म्हणजे 6 चे पाकीट. 8 रुपये वाले पाकीट 2 च रुपयांचा फरक आहे म्हणून वापराल तर हमखास चुकाल.

३. हा केक करण्याची सगळ्यात खात्रीलायक पद्धत आधी बिस्किटंचा मिक्सरमध्ये चुरा करून घेऊन मग त्या चुऱ्यात दूध, बेसो, साखर घालून मिक्सरमध्ये सेम भांड्यातच फिरवून घेऊन मग ते सगळे मिश्रण तूप लावलेल्या भांड्यात घालून टॅप करून मावे ला लावणे ही आहे.

४. मला दीड कप दूध लागले. आणि 20 ऐवजी 30 वाला हाईड अँड सीक चा एकच पुडा वापरल्याने साखर जास्त घालावी लागली. एकदा मिश्रण बेक करण्यापूर्वी आपले आपले टेस्ट करून ठरवावे.. साखर किती वाढवायची ते.

५. मी बेसो मिक्सरमधून मिश्रण काढल्यावर घातले आणि ते हाताने हलवल्याने नीट मिक्स झाले नाही. त्यामुळे केकचे काही तुकडे / भाग अगदी थुंकून टाकावे इतके घाण लागत होते. पण लकीली उरलेला केक अतिशय सुरेख झाला होता.

६. मी मिश्रण हलवले आहे तेवढे पुरेसे समजून टॅप करायला पूर्णच विसरले. त्यामुळे एअर पकडून केक मध्यभागी फुगून वर आला. पण त्यामुळे बाकी भागाच्या स्पॉंजीनेसवर फार फरक पडला नाही. तरीही टॅप केले असते तर तो सगळीकडे समसमान फुगला असता हे नक्की.

७. मी बाहेर काढल्यावर गार करायला ठेवल्यावर त्यावर झाकण ठेवले आणि दूधही जास्त वापरले. त्यामुळे कोरडा झाला नाही केक.

८. शेवटी गार व्हायला वेळ लागत होता (बुडाकडून) आणि घरच्यांना धीर नव्हता म्हणून फ्रीजमध्ये ठेवून गार केला आणि कापला.

९. मी मावे ला 750W ला साधारणपणे 4-साडेचार मिनिटे लावला. साडेतीन मिनिटानंतर उघडून चेक करून वेळ वाढवत गेले.

Very nice

Pages