पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्यात ब्लु बेरी / क्रॅन्बेरी (ड्राईड पण चालेल) कुठे मिळेल.>> दोराबजी मधे मिळतील. कँप मधे शहा म्हणून एक केकचे सामान मिळण्याचे दुकान आहे. त्यांच्याकडे पण मिळतात.

चिऊ, दोराबजी मधे रविवारीच पाहिले. फ्रोजन टीन्ड आहेत. जो नविन छोटा ऑइल आणि घी सेक्शन आहे तिथुन बाहेर बिलींग सेक्शनकडे जाताना समोर एक २-३ रॅक्सची रांग आहे. तिथे पुर्वी बेकिंग आयटेम्स मिळायचे तेच रॅक्स.

दळून आणलेल्या ऊडीद डाळी पासून (पिठाचे) वडे कसे करतात ?
पिठ किती वेळासाठी भिजवावे लागेल ? किंचीत सोडा घालावा का ?

२५ लोकांसाठी वडे (पोटभर) करायचे आहेत म्हणून डाळ भिजवून वाटून करण्यापेक्षा पिठापसून करावे म्हणते. वडे कमी पडतायेत वाटल तर पिठ लगेच भिजवता येईल.

पिठ जास्तवेळ भिजत ठेवले (आंबवले) तर वडे तळताना तेल जास्त पितिल आणि तेलकट होतिल (मझा एक जुना वाईट्ट अनुभव - डाळ भिजवुन, वाटून,आंबवली होती आणि वर किंचीत सोडा पण घातला होता.)

जाणकारांनी प्लिज मार्गदर्शन करा !

बेलफळ न्याहारीला नाही खात हो दिनेशदा. ते थोडंसं तुरट असतं. पिकलेल्या बेलफळाचा गर चाळणीतून गाळून त्यात थोडी साखर आणि दूध घालून गार करून पितात. उन्हाळ्यात पोट थंड रहातं म्हणून

धन्यवाद अकु , सामी, दिनेशदा आणि वरदा.
मी बेलफळाचं सरबत केलं. म्हणजे बिया अजुन तशाच ठेवल्यात फ्रिजात पण कव्हरला चिकटलेला जो काही गर होता तो मिक्सर मधुन काढला, त्यात गुळ आणि लिंबु साखर घालुन सरबत केलं.फार काही ग्रेट वगैरे नाही लागत Sad पण आपल्या कर्माची [बेल]फळे म्हणत पिते आहे आता. कष्टच फार झालेत त्यात, किंवा माझं काहीतरी चुकलच असेल मग Proud

वरदा या बिया चाळणी\गाळणीतुन चाळण्यासाठी\ गाळण्यासाठी तो पाण्यात घालायचा का आधी? कारण ते प्रकरण तसं घट्ट वाटतंय जरा

अरि,

गुळाची ढेप उन्हात ठेव. किंवा अगदी २० सेकंदांकरता मावेमधे ठेव आणि नरम असतानाच फोडुन त्याचे तुकडे करुन ठेव. पुढच्यावेळेस प्रॉब्लेम येणार नाही.

मावे नसेल तर एका घट्ट झाकणाच्या डब्यात घालून डबा कुकरमध्ये ठेवावा. दोन शिट्ट्या येऊ द्याव्या. गूळ मऊ होतो.

मला घरी पार्टीसाठी शॉटस सारखे कही वेगळे ड्रिंक बनवता येईल का? किंवा शॉटसची रेसिपी मिळाली तरी चालेल.. Happy
तसेच लहान मुलांसाठी काही घरगुती पण फळांचे मजेदार रस जे झटपट बनविता येतील.. Happy

राधिका,
उडदाच्या दळलेल्या डाळीचे वडे अणि उडीद डाळ भिजवून वाटून केलेले वडे ह्यात फरक पडतो. उडदाच्या पीठाची भजी होतील फारतर, पण पाहुण्यांसाठी मेदुवडे करायचे असतील तर उडीद डाळ भिजवून वाटून केलेलेच चांगले.

उडीद डाळ सात - आठ तास चांगली भरपूर पाण्यात भिजवून ठेवा. मग कमीत कमी पाणी घालून मीठ-कढीपत्ता-खोबरं इत्यादी हवे ते घटक घालून वाटून घ्या. तासभर ती वाटलेली डाळ झाकून ठेवा. मग हातानेच ती डाळ चांगली फेटून घ्या आणि वडे करा. मस्त हलके वडे होतात आणि तेल पित नाहीत.

एक आमटीची वाटी भरून घेतलेल्या उडीद डाळीचे मध्यम आकाराचे (हॉटेलमधे मिळतात त्यापेक्षा छोटा आकार) पंधरा ते अठरा वडे होतात.

स्वाती ते आहेत पण मल शक्यतो लहान मुलांना थोडे घरगुती आणि ताज्या फळांचे.. Happy नाहितर शेवटी मिक्स संत्रे, मोसंबी, मिल्कशेक हेच ऑप्शन आहे Sad

प्रातिसादाबद्द्ल धन्यवाद मंजूडी,

मीपण उडीद डाळ भिजवून वाटूनच करते वडे.

खर तर मागच्या महिन्यात उडदाचे पापड लाटून झाल्यावर उरलेली पिठी कालवून अर्ध्या तासाने लगेचच वडे केले होते , अगदी थोड ह. डाळीचे पिठ आणि माशीच्या पंखा एवढाच (माझ्या आजीच्या अंदाजाचे एक परिमाण) किंचित सोडा पण घातला. वडे चांगले झाले होते, पण माझा तो एक प्रयोग होता. आता जास्त प्रमाणात करायचे आहे म्हणून ऑथँटिक रेसिपी मिळते का ते बघत होते. (रिस्कही घ्यायला नको आणि २५ जणांवर मेदू वड्यांचे प्राथमिक अवस्थेतिल माझे प्रयोगही नकोत. :स्मित:)

<<<मि इनदिअन दुकानतुन गुल आनला अहे. ति थेप इकदम कथिन अहे. कय करतअ येइल ? >>>
अरि
स्क्रु ड्रावर किंवा टोच्याने सह्ज उकरता येतो. सुरवातिला एकदा फक्त टोच्या ढेपेत टोचण्या साठी टोच्याला वरुन चिमट्याने (सांडशिने) थोड मारव लागेल नंतर सह्ज उकरता येईल.

पार्टीसाठी शॉटस सारखे कही वेगळे ड्रिंक बनवता येईल का >> जिलेटिन घालून जेलो शॉट्स बनवता येईल. गूगल केल्यास बर्‍याच कृती सापडतील, आधीच करून ठेवायचे असल्याने प्रत्येक शॉटमधले अल्कोहॉलचे प्रमाणपण कंट्रोल करता येईल.

तादळाचे पीठ आहे भरपुर पण ना घावने येतायेत ना भाकरी .... भिजवले की चिकट होतेय ,,, काय करु?<<<<<<
त्यामध्ये थोडी कणीक घालुन सरसरीत भिजवा...दिरडी छान होतात.

गव्हाच्या पिठाचा टॉर्टिला कसा बनवायचा? लेकीला डब्यात हवा आहे.
मी करते त्या नेहमीच्या पोळ्या खुप छान मऊसुत होतात. (त्यामुळे तो टॉर्टिला नाहि अस लेक म्हणते Uhoh )
त्यामुळे टॉर्टीला बनवण्यासाठी नेहमीच्या कणकेत मैदा घालावाच लागतो का?

तांदळाच्या पीठात चमचाभर कणीक,थोडे ताक किंवा दही, तेल, मीठ, जीरे, बारीक चिरुन कोथिंबीर व हि. मिर्ची घालुन धिरडी करावी. सॉसबरोबर छान लागतात.

तांदळाच्या पीठाची उकड पण होतेच की.

पानं असा अर्थ घेऊन हे उत्तर आहे

नेहमी करतो तशी फो कांद्यारव बारीक कापलेली मेथीची पान घालून परतून घ्या आणि बंद करताना टोमाटो टाकून झाकण लावा..झटकन होते...चवीळा हळ्द तिखट मीठासोबत शेवटि चिमुटभर गर्र्म मस्साल्ल टाका

छोटी मेथी म्हणजे वाळुतली मेथी का?? त्याचे ताकातले उत्तपे करता येतील्...ताकात ( ताक नसेल तर आंबट दही चालेल) रवा भिजवुन ठेवावा १५-२० मिनीटे नंतर त्यात मेथी,हिरवी मिरची,आले,कांदा,टोमॅटो हे चिरुन टाकावे. चवीला मिठ, साखर घालुन उत्तप्पा टाकावे.
या वाळुतल्या मेथीची खिचडी ही छान होते.
अमेरिकेत आल्यापासुन मात्र या पदार्थांना वंचित झाली आहे.

मला वांग्याचा भारताची रेसिपी हवी आहे...आधी कोणी टाकली असेल तर लिंक प्लीज द्या..
तसाच मायक्रोवेव मध्ये वांगे कसे भाजायचे?

http://www.maayboli.com/search_results?as_q=%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%...

दिविजा, ही लिंक पहा. पानाच्या उजवीकडे 'शोधा' असा बॉक्स आहे. त्यात शब्द टंकले की असंख्य पाककृती दिसतात. योग्य पाकृ येण्यासाठी थोडी शोधाशोध करावी लागेल, पण मिळेल.

१ किलो मेयोनीज घरी आहे..मोनॅको टोपिंग्स करुन झाले,...बर्गर करुन झाले..
अजुन वेगळ काय करता येईल ???

मेदूवडे करताना उडदाची डाळ मिक्सर वर वाटायच्या आधी १० मिनिटे अर्धा वाटी पोहे पाण्यात भिजवून ठेवावे. डाळ वाटताना पोह्यातील पाणी काढून तेही डाळीबरोबर वाटावे . मेदूवडे छान होतात.
इडलीचे पीठ वाटताना सुद्धा त्यात असेच पोहे घातल्यास इडल्या मऊ होतात.
पोहे घालायचे नसल्यास मेदुवड्याच्या पिठात एक बटाटा उकडून घातल्यास वडे कुरकुरीत होतात.

Pages