"सत्यमेव जयते" भाग ४ - (Does Healthcare Need Healing?)

Submitted by आनंदयात्री on 26 May, 2012 - 14:46

आज २७ मे च्या चौथ्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
सत्यमेव जयतेच्या वेबसाईटवरील या भागाची लिंक -
http://www.satyamevjayate.in/issue04/

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@Kiran.. | 31 May, 2012 - 21:59 नवीन
..
<<<

हे पाहून वाटतेय की तुम्ही स्वतःचा प्रतिसाद संपादित केला आहात. मला ठाऊक नाही काय लिहिले होतेत ते. पण वाटते उडवायला नको होता.

वर आधी तुम्ही जे हट्टाने मांडलेत, की बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल डॉक्टरांनी जबाबदारपणे करणे हे त्यांचे कर्तव्य आहे, हे १००% सत्य आहे. माझ्या अन माझ्या डॉक्टर मित्रांच्या वरील पोस्टींवरून तुमच्या ध्यानात येईल की आम्ही ते करतो आहोतच.

बायोमेडिकल वेस्टची नीट विल्हेवाट लावणे, हे तुमच्याच नाही, माझ्याही पोराबाळांच्या हिताचे आहे इतके समजण्याची अक्कल आहे, तेव्हाच तर मेडिकल ला अ‍ॅडमिशन मिळाली हो.. आमच्या तीर्थरूपांकडे कॅपिटेशन भरायला ना पैसे होते, ना त्या काळी कॅपिटेशनवाली कॉलेजेस.

असो.

आमची चिडचिड ही 'एस्टॅब्लिशमेंट' विरुद्ध आहे, की योग्य इम्प्लिमेंटेशन नाही, डॉक्टरकडून लाच कमावण्याचा नवा मार्ग इतकेच या प्रकरणाचे गांभिर्य शासकीय सेवकांना आहे.

ध्यानी घ्या, मी मुद्दाम शासकीय सेवक म्हटलो आहे, सरकार नाही.

शासनात बसलेले 'थिंकर्स' चांगले निर्णय घेतात. तुमची जी विचारसरणी आहे, की घातक जैविक कचर्‍याची विल्हेवाट जनतेच्या सुरक्षिततेसाठी नीट लागलीच पाहिजे, तसाच विचार अन निर्णय कुणीतरी 'वर' सचिव पातळीवर घेतलेला आहे. आय ए एस ही उच्च दर्जाची श्रेणी आहे. हुशार लोक असतात खरेच. पण तो निर्णय, ते तत्व, कोण राबवितो?

इम्प्लिमेंटेशन कोण करतो?

तोंडात विमल गुटख्याचा तोबरा भरलेला, चुकून बी काम पास होऊन सर्कारी नोकरीत चिकटलेला, अन कुणा ऑइल मिल वाल्या तुपकट शेट लोकांकडून लाच खाऊन त्यांची वेस्ट डिस्पोजल कशी होते याकडे काणाडोळा करणारा कारकून! हे असते माझ्या समोर येणारे शासनाचे स्वरूप! ते हा कायदा अन प्रिन्सिपल इम्प्लिमेंट करणार..

कसे व्हायचे?

वर आधी तुम्ही जे हट्टाने मांडलेत, की बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल डॉक्टरांनी जबाबदारपणे करणे हे त्यांचे कर्तव्य आहे,

तुम्ही माझी पोस्ट वाचलेली नाही असे दिसते आहे. त्या पोस्टमधे फक्त इंन्सिनरेटर कुठला चांगला इतकीच माहिती दिली होती. मी सातीच्या पोस्टमधे कचरा जळत नाही असा उल्लेख वाचला होता. निव्वळ तांत्रिक माहितीची ती पोस्ट होती आणि तुम्ही वर लिहीलेलं वाक्य तर सोडाच दूरान्वयेही तसा कुठला आशय त्या पोस्टीत नव्हता. भारतात कुठला इन्सिनरेटर चांगला आहे हे सांगायचा प्रयत्न मी केला होता. त्यात कुणाला व्यावसायिक हित आहे असं वाटलं तर ती पोस्ट नसणे चांगलेच. नाहीतरी ती पोष्ट कुणाच्या कामाची नव्हतीच त्यामुळे वाईट वाटण्याचे कारण राहीलेले नाही.

इतके समजण्याची अक्कल आहे,

नो कमेण्ट्स.. बास !

बायोमेडिकलचे सगळे प्लँट पैसा खायची केंद्रे आहेत... एखाद्या पुढार्‍याच्या हातात पैसे फेकून मिळवलेले गावाबाहेर एखाद्या सिवेज प्लँटजवळ एक डंपिंग ग्राउंड असते.. जवळच एखादी भट्टी असते.. थोडे भट्टीत थोडे डंप, या तत्वावर सगळे सुरु असते.. उंबर्‍याच्या बाहेर कचरा गेला आणि आपल्या दुकानात सर्टिफिकेट लटकल्याशी कारण... प्रत्यक्षात तिथे काय आणि कसे जाळतात, ते देवास ठाऊक.

@ Kiran.. | 31 May, 2012 - 23:33
अर्र्र.. चुकले.
केदार यांच्या त्या पोस्टी होत्या तुमच्या नव्हेत.. घाईत कन्फर्म न करता लिहिले, माझी गल्लत झाली. माफ करा.

साती,

>>>वर कुणीतरी उदाहरण दिलंय, व्हायरल फ्लू साठी स्पायनल फ्लूईड काढायची आवश्यकता यावर. व्हायरल फ्लू मध्ये पेशंट किती सिरीयस होऊ शकतो हे तुम्हाला माहित आहे का? दोन तीन दिवसांनी पेशंट बरा झाल्यावर दुसरा कुणीही म्हणू शकतो या टेस्टचि काय आवश्यकता?
उद्या याच व्हायरल मेनिंजायटीसने पेशंट दगावल तर ही पाच मिनीटांची टेस्ट का केली नाही वेळेतच म्हणून रूग्णाचे नातेवाईक आरडओरडा करणार. थोडक्यात सिरीयस पेशंटबद्दल कोणती टेस्ट करणे जरूरीचे आहे किंवा नाही याचा निर्णय केवळ उपचार करणारे डॉक्टरच घेऊ शकतात.<<<

वरती मी जे काही लिहिले ना, ते सर्व मी मैत्रीणीच्या बरोबर होते. सर्व काही निदान झाले दुसर्‍या डॉक्टरांच्या नुसार त्यानंतरच कळले की हि मेनिन्जायटिस लक्षणे मूळातच न्हवती. मग आम्ही विचारले की, ती कशी असतात. डॉक जर इतका अनुभवी आहे तर इतके कळू शकते ना की काय लक्षणे अस्तात? की अगदीच अंदाज येत नाही. ज्याला त्याला ताप आला की मेनिनजायटिस होतो का/असतो का?

नंतर मैत्रीणीन मग दोन तीन डॉककडे मुदाम जावून चौकशी केली(दिल्ली बाहेर सुद्धा, मग जेलसीचा प्रश्णच न्हवता जसे इब्लिश म्हणतात दुसरा डॉ़ जेलसीने सांगत असेल पहिल्याबद्दल).
तिने चौकशी केली जेव्हा मुलगी बरी झाल्यावर तिला माहित करून घ्यायचे होते की खरेच काय कारण होते. पहिला डॉक तर बोलायला हजर न्हवते. नर्सला विचारले, तर डॉ़ बोला वो करनेका, हॅमको नहि पुचनेका असे सांगून नाहीशी झालेली.
औषधे सुद्धा मेनिन्जायटिस ची न्हवती. हॉस्पिटलात नेल्या नेल्या पहिल्याच दिवशी तासाभरात स्पायनल फ्लूड काढायला नेले. दुसर्‍या दिवशी पर्यंत सकाळी कोणीच फिरकले नाही. डॉक रात्री ११ ला आला. १० मिनीटे बोलला ते ही नर्सशी. बोलायला गेल्यावर नर्स काय ते सांगेल. विझिटींग फी ८०० रुपये १० मिनीटाचे???? कोरडंपणे येवून बघणार १० मिनीटे, उर्मट उत्तर?
स्वतःची प्रायवेट प्रॅक्टीस संपली की आला तो डॉ़क रात्री. नसेल झेपत तर नका घेवु ना इतकी विझिट्स असे म्हणावेसे वाटते.
तिसर्‍या दिवशी हलवले मैत्रीणीने. रीपोर्ट्स तर मिळालेच न्हवते. कारण सांगितले एक आठवदा लागतो असले रीपोर्ट यायला. Sad

सर्व चौकश्या केल्या वरच ह्या अनुमानावर आली मैत्रीण. उगीच कशाला कोण खोटं सांगेल?

ताप गेला ४ थ्या दिवशी. दोन आठवड्यात मुलगी बरी झाली चांगली, थकवा होता. पण स्पायनल फ्लूड काढल्याने डोकेदुखीचा त्रास होता कित्येक दिवस. ह्याला कोण जबाबदार?
हे हॉस्पिटल एक फालतू आहे. इतके आम्हाला बर्‍याच जणांकडून कळले. माज असल्यासारखे बोलतात नर्सपासून सर्वच.

>>>>थोडक्यात सिरीयस पेशंटबद्दल कोणती टेस्ट करणे जरूरीचे आहे किंवा नाही याचा निर्णय केवळ उपचार करणारे डॉक्टरच घेऊ शकतात.<<
हो बरोबर आहे, पण डॉक असे गायब नाही होत व उर्मट उत्तरं देत नाहीत. अगदी ह्या शब्दात खेकसून सांगितले, " नर्सला विचारा" तिसर्‍या दिवशी हलवले तर रीपोर्टस बद्दल सांगायला तयार न्हवते. Sad
दुसर्‍या डॉकने रीपोर्टस न बघता कशी काय ट्रीटमेंट केली? बर आणखी एक, जर डॉकला वाटत होते मेनिनजयटिस्स आहे मग तसा सिरियसपणा दिसत न्हवता त्याच्या ट्रीटमेंटमध्ये. दुसर्‍या दिवशी आलाच नाही दिवसभर. सकाळच्या डॉकला काहीच कल्पना नाही कोर्स ऑफ अ‍ॅक्शन काय आहे. ते डॉक सांगतीलच. आता येतील, आता येतील करत वाट पहाण्यात गेला.
रीपोर्ट कधी येणार तर आठवडा लागेल अशे उत्तरं? खरच आठवडा लागतो ह्याचे रीपोर्ट यायला?
तीन दिवस लागू शकतात ज्यास्तीत ज्यास्त असे दुसर्‍या डॉ़क कडून कळले. मग तोवर काय मेनिनजायटिस पेंशटस असाच ठेवतात. Sad

मला फक्त इतकेच म्हणायचेय , इतका कोरडेपणा कशाला तो? पैसा कमवा ना पण अश्या रीतीने की ज्याने विश्वास ठेवलाय त्यालाच लूबाडून.
ह्या विषयावर हे. मा. शे. पो. नवीन काही असेल तर लिहिन. Happy
---------------------------------------------------------------------------------------------------

आजची बातमी: आमीरने डॉक्टरांची माफी मागावी! >>>>>>> जे गुन्हा करतात त्यांच्याकडुन याहुन वेगळे काय अपेक्षा करणार ? दांभिकपणाचा कळस आहे.
जर स्वतः काहि चुकेचे करत नसाल तर त्यात एवढे चिडण्यासारखे काय आहे हे समजण्यापलीकडचे आहे. माबोवर देखील असे doctor आहेतच म्हणा Sad

स्वतः जर स्वच्छ आहात तर बिचार्या आमीरवर का माफि मागायची मागणी करता ? स्त्री भ्रुण हत्या करणार्या doctor नी माफी मागावी, केतन देसाइने देशाची माफि मागावी अशी मागणी कधी केली नाहि यांनी! तेव्हा काय anesthecia घेतला होता सहव्यावसायिकांकडुन ? (घेतला असेल तर सहव्यावसायिकांनी कमिशन घेतले होते काय हा वेगळाच प्रश्न आहे Proud )

इब्लिस तुम्हि माझ्यावर ५ रुपयात उपचार करणार असे म्हणला होतात कारण मला महाग doctor परवडणार नाहि असे तुमचे म्हणणे आहे. आभारी आहे. तुमचा क्लिनिकचा पत्ता द्या. तुमचे क्लिनिक विकत घेउन तुम्हि ज्यांना नोकरीवर ठेवले आहे त्यांनाही मी नोकरी देइन. हवे तर तुम्हालाही देतो! Proud

आजच्या फोन इन कार्यक्रमात श्रोत्याकडून सांगितला गेलेला आणखी एक गैरप्रकार :
अत्यवस्थ रुग्ण मेल्यावरही तो जिवंत आहे असे भासवून व्हेंटिलेटर, आयसीयू इत्यादीचे शुल्क उकळणे करणे. (ज्यांना या सेवांची गरज आहे असे आणखी अत्यवस्थ व जिवंत रुग्ण नसतात की काय?)

इथल्या डॉक्टर मंडळीच्या पोस्ट्वरुन असे वाटतेय, कि जे एकहाती क्लीनिक चालवतात त्यांना सगळीकडेच
लक्ष द्यावे लागते. मोठ्या हॉस्पिटलमधे अशी कामे अ‍ॅडमिन करत असते आणि डॉक्टरांना रुग्णांकडे लक्ष देता येते.

भरत तो वेगळा मुद्दा आहे. माझ्या जून्या मायबोलीकर मैत्रिणीच्या आईबाबतचा किस्सा असाच आहे.
कृत्रिम शासोच्छ्वास कधी द्यायचा, याबाबत आपण बहुतेक जण अनभिज्ञच असतो. याबाबतीत तज्ञ लोकच, सांगू शकतील.

डॉक्टर जाहिरात करू शकत नाही असे ऐकले होते..इथेही काही डॉक्टर तसेच म्हणाल्याचे वाचले...
पण हल्ली वृत्तपत्रात सर्रास काही डॉक्टरांच्या,क्लिनिक्सच्या जाहिराती येतात त्या कशा? असे करण्यासाठी ते कोणती पळवाट शोधतात?
तसेच दूरदर्शनवर आरोग्यविषयक कैक कार्यक्रम होतात..तिथेही बरेच तज्ञ डॉक्टर हजेरी लावत असतात...त्यांच्याबद्दल तिथेही माहिती दिली जाते...
जाहिरातीच्या बाबतची नेमकी व्याख्या काय आहे कुणी सांगू शकेल का?

@ चाणक्यजी,
ऑफरबद्दल आभार!
खरेच कधीकधी इतका पकलेला असतो सगळे रहाटगाडगे सांभाळताना, की असे कुणी विकत घेतो म्हटले की खरेच छान वाटते.
बाकी हॉस्पिटलची बिल्डिंग, माझा स्टाफ व मला 'विकत' घेऊन, खरी रुग्णसेवा तुम्ही अधिक उत्तम रितीने कशी काय करणार हे समजले तर पुढील व्यवहार करता येईल Wink कारण माझे वैद्यकीय ज्ञान विकायला काढले तरी तुम्हालाच काय, कुणालाही देता येईल अशी ती वस्तू नाही.

असो. तुमच्याबद्दल व्यक्तिगत रोखाने केलेल्या लिखाणाबद्दल वर दिलिगीर आहे असे म्हटलो होतोच, तरीही तुमचे सुरूच आहे. तेव्हा पुढील असल्या प्रकारच्या वार्तालापासाठी हा बाफ आपण दोघांनीही वापरू नये इतकेच म्हणतो.

मुद्दा क्र.२ :
आमीर व माफी.
माफी ची मागणी/ टीका करणारे यांत डॉ. टावरी हे एम.एम.सी.चे निर्वाचित अध्यक्ष आहेत.
त्यांना मीही मत दिलेले आहे. Wink
सबब त्यांनी केलेली मागणी योग्य आहे, तिला माझाही पाठिंबा आहे.

मयेकरजी, दिनेशदा.

व्हेंटीलेटर बाबत मुद्दा निघालाच आहे म्हणून त्या अनुषंगाने थोडे:

व्हेंटीलेटर व पेसिंग केलेला रुग्ण. याचा श्वास व हृदय दोन्ही मशिनमुळे सुरू असतात. ब्रेन डेथ ची व्याख्या केली, तरीही हे तिन्ही अवयव : श्वास, हृदय व मेंदू 'मेल्या' शिवाय तो रुग्ण 'गेला' असे कायदेशीररित्या सांगता येत नाही. 'फ्लॅटलाईन' इसीजी हे एक लक्षण आहे, ज्याशिवाय डेथ डिक्लेअर होत नाही. इतरांना 'गेला' असे वाटणारा. 'गेल्यात जमा' असा रुग्णही जिवंत असतो.

आता कायदेशीर पंचाईत अशी असते, की मी पेसमेकर व व्हेंटिलेटर ही दोन यंत्रे, (जी अनुक्रमे हृदय व फुफ्फुसे 'सुरू' ठेवतात) जोपर्यंत बंद करीत नाही, तोपर्यंत कायद्याने तो रुग्ण मेलेला नाही. मी बटन बंद केले तर ते 'मर्सी किलिंग' / नुसती फॉर्म्यालिटी जरी असले, तरी कायद्याच्या दृष्टीकोणातून 'खून' असतो..

बटन बंद करण्या आधी अनेक मानवी स्वभावाचे कंगोरे चाचपून मग ते बटन बंद करायला त्याच रुग्णाच्या जबाबदार नातेवाईकासही कधी कधी सांगावे लागते. इतके करूनही कुणी दूरचा भाऊ दुसर्‍या दिवशी येतो व तुम्ही आमच्या पेशंटला 'मारले'. आम्ही त्यांना मुम्बईच्या/अमेरिकेच्या मोठ्या इस्पितळात नेणार होतो. तुम्ही मशीन बंदच का केलेत?? असा गळा काढून टाका ५० लाख अशी सुरुवात करतो.

व्हेंटी सुरू ठेवून फारतर १ दिवसाचे बिल वाढेल हो. खराच पूर्ण मेला असेल पेशंट तर खोटा व्हेंटी लावूनही ४-६ तास उशीरा नंतर प्रेत कडक होईल (रिगर मॉर्टीसने), किंवा कुजायला लागेल २४ तासात. तसे मिळते का ते तुमच्या ताब्यात?? असे भीषण आरोप करायच्या आधी खरेतर लोकांनी विचार केलाच पाहिजे.

मयेकरजींनी म्हटल्या प्रमाणे,
हॉस्पिटलात त्या मशीनची गरज असणारे इतर अत्यवस्थ रुग्ण असतातच असतात. मेलेल्याला १ दिवस व्हेंटी लावण्यापेक्षा त्या जिवाला नाही लावणार का हो ते?

डॉ. इब्लिस, हा निर्णय घेताना डॉक्टरांनी खुप मार्गदर्शन / समुपदेशन केल्याच्या घटना मला माहित आहेत. तरी दुसर्‍या दिवशी उपटणारा, लांबचा भाऊ, घोळ घालतो हेही खरेच.

लॅण्ड सिलिंग कायदा असतो तसा डॉक्टर लोकांसाठी बनवावा. प्रत्येक ऑपरेशनसाठी ठराविक किमतिच्यावर रक्कम घेतली जाऊ नये . डॉक्टर जमात पुर्वीच्या सावकारांपेक्षा हरामखोरी करत आहे.

आधी डॉक्टर लोक एखाद्या ऑपरेशनचा खर्च दोन लाख सांगतात ,पेशंट हातचा जातोय असे लक्षात आले की कमी कमी करत लाखावर सुद्धा येतात. अरे काय आरोग्यसेवेचा लिलाव मांडलाय का? तुम्हाला यमसहोदर ऐवजी यमाचे बाप म्हणायला हवे Proud

प्रत्येक ऑपरेशनसाठी ठराविक किमतिच्यावर रक्कम घेतली जाऊ नये .

हे कसे ठरवणार? गावात पेट्रोल ८० रु लिटर तर मुंबईत तितकेच असते... बिस्किटचा पुडा ४ रु, तर सगळीकडे तीच किंमत.

पण पिशवी- गर्भाशय काढण्याचे दर ( सर्जन चार्जेस--- एकूण खर्च)

गावात ३००० -------- ६०००
तालुका ५०००--------८०००
जिल्हा १००००-----१५०००

मुंबई हार्बर लाइन.......... २००००------३५००००
मुंबई वेस्टर्न लाइन ..... ४००००........७००००
मुंबई मोठे हाय क्लास ...... ८००००....... १,५०,०००

आता लिमिट कुठे कसे अ‍ॅप्लाय करणार?

सर्जरी काढताना समजले फायब्रॉइडची मोठी गाठ होती, गर्भाशय चिकटलेले होते, अचानक ब्लीडिंग झाले.... असे काही घडल्यास सर्जरी कालावधी लांबून रेट दुप्पट होऊ शकतात... सर्जरीची पद्धत बदलली, ओपन की लॅप, की आणखी दर बदलतात.

hospitalचा दर्जा ग्रामीण शहरी भागांचा दरांवर परीणाम होतो हे खरे, तरीही अवास्तव बिलिंगवर काहितरी मर्यादा लावता येतील.

खरेच कधीकधी इतका पकलेला असतो सगळे रहाटगाडगे सांभाळताना, की असे कुणी विकत घेतो म्हटले की खरेच छान वाटते.
बाकी हॉस्पिटलची बिल्डिंग, माझा स्टाफ व मला 'विकत' घेऊन, खरी रुग्णसेवा तुम्ही अधिक उत्तम रितीने कशी काय करणार हे समजले तर पुढील व्यवहार करता येईल डोळा मारा कारण माझे वैद्यकीय ज्ञान विकायला काढले तरी तुम्हालाच काय, कुणालाही देता येईल अशी ती वस्तू नाही >>>>>>>>>
मग बरेच आहे. लगेचच पत्ता द्या. लगेच व्यवहार करु. आणी हो....... मी सर्व व्यवहार चेकने करतो ! Wink doctor पेशंट कडुन कैश घेतात फक्त म्हणुन आधीच सांगीतले ! Proud
आणी तुमच्यासारखा डॉक्टर खर्या रुग्णसेवेबद्दल कधीपासुन काळजी करायला लागला ? Wink आणी तुम्हि तुमच्याकडे काम करणार्यांना पैसे देत नाहि का काय ? आणी तुम्हि जी हॉस्पिटलची जमीन, बिल्डिंग घेतली ती फु़कट बळकावली तर नाहि ना ? विकतच घेतली ना! नाहि...... ते 'विकत' असे अवतरणचिन्हात लिहिले म्हणुन विचारले!
आता तुमच्या वैद्यकिय ज्ञानाबद्दल ! तुमचा हा जो आंधळेपणा आहे ना तो अद्वितीय आहे इब्लिस! अहो ५०-६० लाख दिले की तुमच्याहुन जास्त ज्ञान विकायला काढले आहे तुमच्या सहव्यावसायिकानी.

असो. तुमच्याबद्दल व्यक्तिगत रोखाने केलेल्या लिखाणाबद्दल वर दिलिगीर आहे असे म्हटलो होतोच, तरीही तुमचे सुरूच आहे. >>>>>> सुरवात तुम्हि केली आहे तेव्हा मी जे लिहिले आहे ते स्विकारुन तुमचे उलटे उत्तर येत आहे तोपर्यत माझ्याकडुन तरी चालु राहिल

मुद्दा क्र.२ :
आमीर व माफी.
माफी ची मागणी/ टीका करणारे यांत डॉ. टावरी हे एम.एम.सी.चे निर्वाचित अध्यक्ष आहेत.
त्यांना मीही मत दिलेले आहे.
सबब त्यांनी केलेली मागणी योग्य आहे, तिला माझाही पाठिंबा आहे. >>>>>>>>>> तुमचा पाठिंबा असणार हे मला माहित आहेच. तुमच्याकडुन याचीच अपेक्षा आहे.
पण हा दुसरा मुद्दा नव्हता. Proud Proud नेहमीप्रमाणे तुम्हाला मुद्दा समजला नाहि. Proud
स्त्री भ्रुण हत्या करणारे doctor , केतन देसाइ यासारख्यानी जे केले त्याने डॉक्टरांची बदनामी झाली आहे त्याबद्दल त्या डॉक्टरांनी, केतन देसाइंनी माफी मागावी अशी मागणी ना आत्तापर्यत झाली ना तुमच्यासारखे दांभिक लोक तशी मागणी करतील. मुद्दा हा होता !

http://www.hindustantimes.com/India-news/Maharashtra/Referral-fees-or-br... हि कबुली किशोर तावरिंनी दिलेली. त्याबद्दल ते डॉक्टरांच्या आणी MMC च्या वतीने कधी माफि मागणार हे तरी कळु द्या! आणी त्यांना मत देणारे इब्लिस महाराज , धन्य आहे तुमची! Proud

माझा प्रतीसाद कोणाही डॉक्टरला विनोदीच वाटेल.पेशंटला तो विनोदी वाटणार नाही हे नक्की. >>>>>>> +१०००००००

आधी डॉक्टर लोक एखाद्या ऑपरेशनचा खर्च दोन लाख सांगतात ,पेशंट हातचा जातोय असे लक्षात आले की कमी कमी करत लाखावर सुद्धा येतात. अरे काय आरोग्यसेवेचा लिलाव मांडलाय का? तुम्हाला यमसहोदर ऐवजी यमाचे बाप म्हणायला हवे >>>>>>>>> +१०००००००००००००

अत्यवस्थ रुग्ण मेल्यावरही तो जिवंत आहे असे भासवून व्हेंटिलेटर, आयसीयू इत्यादीचे शुल्क उकळणे करणे. (ज्यांना या सेवांची गरज आहे असे आणखी अत्यवस्थ व जिवंत रुग्ण नसतात की काय? >>>>> डॉक्टरांना एवढे तारतम्य असते तर मग इथे वादविवाद करायला किंवा आमिरखानने माफि मागावी असा आरडाओरडा करायला कोण आले असते.!

चाणक्य!
एकदा अ‍ॅडमिनने तुमचे बरळणे बंद केले त्याने तुमचे समाधान झाले नाही काय?

रच्याकने.
५ रुपयांत ट्रीटमेंट मी देणार नाही. मला परवडत नाही. बर्‍याच गरीबांना फ्री करतो मी पण तुमची ती लायकी नाही. अन चॅरिटी केली तरी कुणाला करावी हे मी ठरवीत असतो. ५ रुपयांत ससूनला जा असे सांगितले होते मी.

रोहित यांनी म्हटलेत, तसे अव्वाच्या सव्वा दर जर कुणाचे असलेच, तर ते स्पेसिफिकली तुमच्या सारख्या 'हुश्शार' लोकांमुळेच लावण्यात आलेले असतील असे वाटते.

बाकी विकत घेतलेली/कॉप्या करून मिळविलेली डिग्री अन 'ज्ञान' यांतील फरक तुम्हाला समजेल असे वाटले नव्हते, ते तुम्ही सिद्ध केलेतच.

तुमच्या एकंदरीतच शिक्षण, पाचपोच इ. विषयी संशय बळावू लागला आहे..

यापुढे तुमच्या फालतू बडबडीस फाट्यावर मारण्यत येईल असे नमूद करतो.

५ रुपयांत ससूनला जा असे सांगितले होते मी.

तेच तर... त्यानी तुम्हाला ५ रुपयात ट्रीटमेंट देतो असे कुठे सांगितले होते? उगाच काहीही बरळत बसले तुम्ही चानक्यराव

रोहितजी.

'रेट' फिक्स करण्याबद्दलचे तुमचे लॉजिक कसे काम करते ते ठाऊक नाही.

कृपया पूर्वग्रह सोडून समजून घेण्याचा प्रयत्न कराल ही आशा करतो.

उदा. कटींग्/दाढी करण्याचे रेट सहसा गावागावांतून सलून मधे लावलेले असतात. ते 'किमान' रेट असतात. मोठ्या बुटिकमधे किंवा डिझायनर हेयर कटचे १०-१० हजारही वसूल केले जातात. त्याच वेळी किमान ४० रुपये हे नवख्या व नाक्यावर धोपटी घेऊन बसणार्‍या व्यावसायिकास मिळावे असाही त्यात हेतू असतो.

या दोन्ही गोष्टी बहुतेक सर्वांनाच वैद्यकीय सेवे इतक्याच अत्यावश्यक असाव्यात, अगदी जिवावर बेतणार्‍या नसल्यात तरी.

आता, कधी तुम्ही सलून मधे जाऊन घासाघीस केल्याचे आठवते आहे का ते बघा.

किंवा कुणा न्हाव्याने, *व्यवसायदर्शी तुमची वा इतराची हजामत धर्मार्थ म्हणून फुकट केली आहे का कधी तेही आठवून बघा.

याउलट, तुमची परिस्थिती पाहून स्वतःचे प्रॉफिट मार्जिन सोडून देऊन, वा कधीकधी खिशातून खर्च करूनही, जर एकादा डॉक्टर तुमची फी कमी/माफ करत असेल, तर तो 'आरोग्यसेवेचा लीलाव' कसा होतो?

खासगी दवाखान्यात ते दुकान असल्या कारणाने, तो सांगेल ती फी. शासनाने आजपर्यंत कुणा आर्किटेक्टची फी किती असावी हे रेग्युलेट केलेय का? किंवा तत्सम कुणाची??

तावातावाने वाद घालताना दुसरी बाजू आहे हेही आपण विसरतो आहोत काय, हे पाहिले तर समोरचा अगदीच चुकीचे बोलत नाही असे दिसेल..

एकदा अ‍ॅडमिनने तुमचे बरळणे बंद केले त्याने तुमचे समाधान झाले नाही काय? >>> अ‍ॅडमिनने तुमचे बरळणे हि बंद केले होते हे विसरलात की काय! Proud

५ रुपयांत ट्रीटमेंट मी देणार नाही. मला परवडत नाही. बर्‍याच गरीबांना फ्री करतो मी पण तुमची ती लायकी नाही. अन चॅरिटी केली तरी कुणाला करावी हे मी ठरवीत असतो. ५ रुपयांत ससूनला जा असे सांगितले होते मी. >>>>>>> तुमचे अक्खे क्लिनिक मी विकत घेतो पत्ता द्या हे आधीच सांगीतले आहे. तेव्हा तुम्ची लायकी आणी माझी लायकी हे दिसेलच!

रोहित यांनी म्हटलेत, तसे अव्वाच्या सव्वा दर जर कुणाचे असलेच, तर ते स्पेसिफिकली तुमच्या सारख्या 'हुश्शार' लोकांमुळेच लावण्यात आलेले असतील असे वाटते. >>>>>>> ह्याहुन विनोदी वाक्य असु शकत नाहि. म्हणजे doctor कमिशन घेतात ती पेशंटचीच चुक का काय. ह्या वाक्यामुळे तुमचे लायसेन्स रद्द करण्यात यावे.

बाकी विकत घेतलेली/कॉप्या करून मिळविलेली डिग्री अन 'ज्ञान' यांतील फरक तुम्हाला समजेल असे वाटले नव्हते, ते तुम्ही सिद्ध केलेतच.
तुमच्या एकंदरीतच शिक्षण, पाचपोच इ. विषयी संशय बळावू लागला आहे.. >>>>> तुमच्या एकंदरीतच शिक्षण, पाचपोच इ. विषयी माझा संशय बळावलेला नाहि तर खात्रीच आहे आता. माझ्याव्यवसायात मी लोकांच्या आयुष्याशी तरी खिलवाड करत नाहि!

यापुढे तुमच्या फालतू बडबडीस फाट्यावर मारण्यत येईल असे नमूद करतो. >>>> तुम्हा doctor ना पेशंटला फाट्यावर मारण्याची सवय असते हे मला माहित आहे. ते सगळिकडेच वापरुन चालत नाहि. Proud

किंवा कुणा न्हाव्याने, *व्यवसायदर्शी तुमची वा इतराची हजामत धर्मार्थ म्हणून फुकट केली आहे का कधी तेही आठवून बघा. >>>>>>>>> डॉक्टर काय करतो, न्हावी काय करतो, डॉक्टरकडे आलेले लोक आणी दाढी करायला येणारे लोक यांच्या अपेक्षा काय असतात, डॉक्टरकडे आणी नाव्ह्याकडे आलेले लोक कोणत्या वेगवेगळ्या मनस्थितीत येतात, नाव्ह्याकडे दाढी झाली नाहि तर काय होते आणी डॉक्टरकडे उपचार झाला नाहि तर काय होते,
उद्या नाव्हि जर १००० रुपये घेउ लागला तर मी घरी दाढी करिन पण डॉक्टरने अव्वाच्यासव्वा पैसे मागितले तर मला घरी सर्जरी करायचा option नसतो, इत्यादी सर्व तुम्हाला माहितच नसल्याने तुम्हाला सर्व काहि माफ आहे! Proud

या दोन्ही गोष्टी बहुतेक सर्वांनाच वैद्यकीय सेवे इतक्याच अत्यावश्यक असाव्यात, अगदी जिवावर बेतणार्‍या नसल्यात तरी.>>>दाढी वाढुन व्यक्तीचा मृत्यु अशी बातमी मी वाचलेली नाही, त्यामुळे दाढीचे उदाहरण चुकीचे आहे. घासाघीस मी भाजी विक्रेत्याशीही करतो ,जीवनावश्यक अन्नधान्य, भाजीपाला ,फळे विकणारे बार्गेनिंगनंतर दर कमी करतात, भाज्या डाळी AC मॉलमध्ये किंवा रस्त्यावर जवळपास एकाच किंमतीत मिळतात,तुम्हाला काय अडचण आहे?

खासगी दवाखान्यात ते दुकान असल्या कारणाने, तो सांगेल ती फी. शासनाने आजपर्यंत कुणा आर्किटेक्टची फी किती असावी हे रेग्युलेट केलेय का? किंवा तत्सम कुणाची?>>>करावी, वकिल ,आर्किटेक्ट सर्वांचे दर किंमतपट्ट्यात ठरवावेत .रिक्षा आणि टॅक्सिवाल्यांनी आमच्या खाजगी गाड्या आहेत आम्ही एक किमिला दोनशे घेणार असा रेट लावला तर शासनाला परवाने रद्द करावे लागतील. तसेच तुमचे आहे.

Pages