"सत्यमेव जयते" भाग ४ - (Does Healthcare Need Healing?)

Submitted by आनंदयात्री on 26 May, 2012 - 14:46

आज २७ मे च्या चौथ्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
सत्यमेव जयतेच्या वेबसाईटवरील या भागाची लिंक -
http://www.satyamevjayate.in/issue04/

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रुणुच्या सर्व पोस्ट्सना तहेदिलसे अनुमोदन. पीजी करतांना शांत डॉक्टर जमदग्नी होतांना पाहिलेत. Happy
एक बोरिवलीचे सुप्रसिद्ध पेडि त्यांचा एक किस्सा सांगावासा वाटतो. स्वतःचे मोठे हॉस्पिटल. दवाखान्यात पाय ठेवायला जागा नाही अशी गर्दी. हाताला गुण. पण पैसा दाबुन घ्यायचेत. अगदी दोन तासाने पुन्हा गेलात -सेम तक्रारीसाठी तरी पुन्हा पैसे घेणार. आपयासारखे मध्यम / उच्च मध्यम वर्गीय लोक द्यायचेत. नाही म्हटले तरी एवढी मोठी फी भरतांना त्रास व्हायचाच.
तर हे डॉक्टर गरिब पेशंट्स्ना सांगायचेत की माझ्याकडे येउ नका तुम्ही तुम्हाला माझी फी परवडणार नाही. हे स्वतःपाहिएय , ऐकलय स्वतः. त्यावेळी त्यांच्याबद्दल वाटणारा आदर संपला. अरे दिवसभरात शंभर पेशंट्स बघतात ना तुम्बी हजार रोख घेउन मग त्यातले दहा फुकट तपासले तर काय बिघडेल? असो
पण त्यांच्या ज्ञानाची बरोबरी कुणीच करु शकत नव्हते म्हणुन पैसे उधार घेउनही लोक त्यांच्याकडेच येत. एक डॉक्टर म्हणुन ते मला नेहमीच ग्रेट वाटतात पण एक माणुस म्हणुन ते तेवढे चांगले वाटत नाहीत.
रुणु म्हणते तसे खूपसे प्रश्न पीजी ह्या सीट्सवाढवयाने कमी होतील. देव सरकारला सुबुद्धी देओ अन आमीर दाखवत असलेल्या समस्यांच्यामुळापर्यंत जाउन त्यांचे समूळ उच्चाटन होवो.

<< बातमी वाईट आहे. योग्य ती चौकशी व्हावी. मृतांच्या नातेवाईकांबद्दल सहानुभूती आहे पण त्याबरोबरच कायदा हातात घेउन तोडफोड / मारधाड करणार्‍या वृत्तीचा पण निषेध.>> +१

अशा सगळ्या प्रसंगात डॉक्टरचीच चूक असते असं मुळीच नाही. पेशंट हाय रिस्क असू शकेल. तिचा जीव वाचवण्यासाठी गर्भाशय काढणे हा शेवटचा उपाय करूनही तो असफल झाला असू शकेल.
कुठल्याही डॉक्टरला....मग तो कटप्रॅक्टिस, अवास्तवी बिलं वगैरे आक्षेपार्ह प्रकार करत असेल तरी .....आपली पेशंट आपल्या हातून दगावावी हे स्वप्नातही वाटणार नाही....माणुसकी म्हणूनही, आणि स्वतःची प्रॅक्टिस, नाव-प्रतिष्ठा सगळंच धोक्यात येईल म्हणूनही.

आणि कसल्याही अवस्थेतल्या रूग्णाचे प्राण वाचवणं, हे जर डॉक्टरच्या हातात असतं तर त्याने निदान स्वतःच्या कुटुंबीयांना तरी कधीच मरू दिलं नसतं. Happy

अशा प्रकारांत चौकशी व्हायला हवी.
कायदा हातात घेऊन मारहाण, तोडफोड हे एकदम चूक.
अशाच ठिकाणी डॉक्टर-पेशंट मधील संवादाचं महत्व जास्त असतं.

चाणक्य,
थोडावेळ असं समजू या की, वडापाव हे सगळ्या जनतेचं जीवनावश्यक अन्न आहे.
जनतेला किमान सुविधा पुरवणं हे सरकारचं कर्तव्य आहे.कारण जनता त्यासाठी सरकारला निवडून देते, शिवाय कर देते.
सरकारी वडापावकेंद्रात एक वडापाव ५ रूपयाला मिळतोय. पण ती केंद्रे पुरेशा संख्येत नाहीत.
५०० लोकसंख्या असलेल्या एका गावात ५० माणसांसाठी एक अशा प्रमाणात पुरवठा करणारी १० केंद्रे हवीत. तसं असेल तर लोकांना चांगल्या पद्धतीने बनवलेला वडापाव योग्य वेळी मिळेल.

पण सरकार जीवनावश्यक असलेल्या वडापावसाठी पुरेसा खर्च न करता तो पैसा इतर, त्यामानाने कमी महत्वाच्या कामाकडे वळवत आहे. ( इथे लाचखाऊ पुढार्‍यांचा पैसा तर मी गृहित धरलेलाच नाही.)

आता १० केंद्रांची गरज असलेल्या त्या गावात १ च केंद्र आहे.
तिथे वडापाव बनवायचं शिक्षण घेण्यासाठी ठेवलेले आचारी सुद्धा ५० माणसांसाठी वडापाव बनवू शकतील एवढ्याच संख्येत आहेत. पण त्यांच्यावर ५०० माणसांसाठी वडापाव बनवायची सक्ती आहे.

काय घडेल ?
बटाट्याची साली न काढता, न धुता उकडले जातील, उकडलेल्या बटाट्यात हाताला लागेल तितका मिरची-मसाला टाकला जाईल, ते सारण बनवताना त्यात एखादं झुरळ पडलं तरी त्या कोलाहलात कोणाच्या लक्षात येणार नाही, मग ते वडे अर्धे-कच्चे कसेही तळले जातील आणि रात्रंदिवस फक्त वडेच तळून थकल्या-भागलेल्या आचार्‍यांकडून टपरीबाहेर झुंबड करणार्‍या लोकांपुढे नेऊन आदळले जातील. (वडापावप्रेमींनो माफ करा :फिदी:)

वडापाव असा का आदळला म्हणून, त्यात झुरळ निघालं म्हणून किंवा सकाळच्या नाष्त्यासाठी हवा असलेला वडापाव दुपारच्या जेवणाला मिळाला म्हणून लोक त्या आचार्‍यांवर संतापतील, त्यांना मारहाण करतील.

चूक कोणाची ???

लोकांची ?? नाही. त्यांना वेळेवर, चांगल्या गुणवत्तेचा वडापाव मिळणं हा त्यांचा हक्क आहे.
मग आचार्‍यांची ?? नाही. कोणाच्याही पोटात अन्न घालणं हे पुण्याचं काम आहे . ते करता करता आपल्यालाही पोटापाण्याचा धंदा मिळेल म्हणून ते आचारी झाले. पण आपल्यावर हा प्रकार लादला जाईल ह्याची त्यांना कल्पना नव्हती.

चूक दोघांची नाही. चूक कमी केंद्रे आणि कमी आचारी ठेवणार्‍या सरकारची.
पण भांडतंय कोण ? आचारी आणि जनता.

आता गोष्टीचा पुढचा भाग.:)
त्या आचार्‍यांचा शिक्षणकाळ संपल्यावर ते तिथून बाहेर पडले. काहींना स्वतःचं वडापावकेंद्र उघडणं शक्य नव्हतं म्हणून ते सरकारी केंद्रात कामावर ( तुटपुंज्या पगारावर ) रुजू झाले.

काहींनी स्वतःची दुकाने उघडली. वडापावची क्वालिटी चांगली ठेवली. ते सर्व करताना हातात ग्लोव्हज घातले, स्वयंपाकात केस पडू नयेत म्हणून डोक्यावर टोप्या घातल्या. हे सगळं सामान स्वतःच्या पैशाने विकत आणलं.
गिर्‍हाईकाला ताटकळत रहावं लागू नये म्हणून हाताखाली स्टाफ ठेवला. फुकट नाही हां. स्वतःच्या खिशातून त्यांना पगार देऊन. गिर्‍हाईकांना त्रास होऊ नये म्हणून रूममध्ये एसी बसवला. दुकानाला जो दर असतो त्याच दराने सरकारला वीजबिल भरून. सवलतीत नाही.
शिवाय वडापावचे नवनवीन प्रकार बनवले. त्याच्यात चांगल्या प्रतीचे बटाटे, पीठ, तेल वापरलं.

मग आता त्यांनी काय करावं ?

तो वडापाव सरकारी केंद्रात मिळतो तसा ५ रूपयाच्या दरानेच द्यावा आणि उरलेला पैसा आपल्या खिशातून घालावा ? का तर अन्नदान हे पुण्यकर्म आहे ?

मग त्यांच्या कुटुंबाने काय खावं ? आणि ह्या वरच्या सगळ्या कष्टाचं मोल नको का ?
काय हरकत आहे त्यांनी त्यांचं उत्पादनमूल्य ( जे नक्कीच ५ रूपयापेक्षा कितीतरी जास्त असेल) आणि माफक नफा धरून वडापावची किंमत ठरवली तर ?

ज्यांना ह्या सुविधांसहित चांगल्या क्वालिटीचा वडापाव खायचा आहे, ज्यांना परवडतो आहे ते इथे येतील.
ज्यांना ते शक्य नाही ते सरकारी केंद्रात जातील.

जीवनावश्यक गोष्टी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारचीच आहे.

आपण बर्‍याचदा एखाद्या गोष्टीला देवत्व देऊन त्या गोष्टीकडून अवाजवी अपेक्षा करतो.
एक म्हण आहे - " घरोब्याला घर खावं, हिशोबाला चोख रहावं "
व्यवसाय वेगळा, पुण्य वेगळं.

इथे एका गोष्टीचं भान मात्र ठेवायला हवं की, अशा एखाद्या खाजगी केंद्रात सरकारी केंद्रात नंबरच लागत नाही म्हणून भुकेने मरणावस्थेला टेकलेला माणूस येऊन पोहोचला तर त्याच्याकडे पैसे नाहीत म्हणून त्याला उपाशी मरू न देण्याइतकी माणुसकी दुकानदाराने दाखवायलाच हवी !

चला, प्रॅक्टिस करायला नाहीच जमलं तर वडापावची गाडी टाकायला हरकत नाही. बराच गृहपाठ झाला आहे. Proud

सगळ्यात आधी चाणक्य यांची पोस्ट हातावेगळी करतो, कारण त्यांनी जो मुद्दा मांडला आहे, तो अर्धवट विचारांती आहे.

>>>
चाणक्य. | 30 May, 2012 - 18:53

रुणुझुणु च्या सर्व पोस्ट्ला +१

एक मुद्दा सोडुन

६. डॉमिनोमध्ये एक पिझ्झा खाल्ला तरी दोन-अडीचशे रूपये हसत हसत काढून देणार्‍या पेशंटने आपल्या आरोग्याची काळजी घेणार्‍या डॉक्टरची फी देण्यात घासाघीस करू नये. >>>>> -१
पेशंटला द्यावे लागते , इलाज नसतो म्हणुन डॉक्टरने काहिहि वाटेल ते मागु नये हा आक्षेप आहे. डॉमिनोमध्ये एक पिझ्झा दोन-अडीचशे रूपयाला मिळतो, तो ज्याला परवडते तोच खातो. पन्नास रुपयाचा पिझ्झा देणारी होटेल देखील आहेत आणी पाच रुपयाचा वडा-पाव विकणार्या गाड्या देखील !

पाच रुपयाचा वडा-पाव दोन-अडीचशे रूपयाला विकत मिळाल्यामुळे सामान्य गरिबांनी काय करायचे ह्यावर सर्व इपिसोड होता. त्यात डॉक्टरांनी काहिहि चिडण्यासारखे नाहि.
<<

चाणक्या,
वडापावाच्या गाडीशिवाय इतर परवडत नसेल तर डोमिनो मधे यायची जबरदस्ती केली आहे का तुम्हाला?

ससून मधे जावा. ५ रुपयात सगळ्याप्रकारचे क्वालिफाईड डाक्टर्स भेटतात, तेही नामांकीत. मग तिथे बिस्लरीचं पाणी मिळत नाई अशी बोम्ब कशाला? ब्रीच कँडीत यायचे तर पैकं घेऊन या?
बिन्डोक अर्ग्युमेंट्स करू नका. सामान्य गरीबांसाठी डॉक्टर्स काय करतात हे बडबडण्या आधी सामान्य गरीब कोण, ते डिफाईन करा Happy मग बोलू.

बादवे, इथे चिडण्यासारखे काहीही नाहिये. तुम्हाला खासगी डॉक्टर परवडत नाहीत हे मान्य आहे मला. ससूनमधे वार असतो माझा Wink काही प्रॉब्लेम असेल तर व्यनीतून सांगा. बघू काही करता येतंय का ते..

मुद्दा: तुमच्यासाठी माझी फी जरी ५ रुपये घेतली तरी कधी कधी ५०० रुपयाच्या गोळ्या/औषधे लिहून द्याव्या लागतात. ते पैसे डॉक्टर घेत नाही हो. मेडिकल स्टोर्स व कंपनी वाल्यांना शिव्या द्या. मीही येतो द्यायला. आयायटी शिकून अर्धवट विचार का करताय तुम्ही??

पुन्हा चाणक्य.
>>
तुम्हाला मुद्दा समजला नाहि. परत तेच लिहितो - पाच रूपयाचा वडापाव पाच रुपयालाच विकावा हा मुद्दा आहे - सरकारी हॉस्पिटल्स असो कि खाजगी ! खाजगी डॉक्टरांना हॉस्पिटल चालवण्याकरता येणारा खर्च काढुन घेण्यासाठी पाच रूपयाचा वडापाव सात रुपयाला, दहा रुपयाला विकला तर कोणी तक्रार करणार नाहि. करतहि नाहि. पण तो दोन- अडिचशे रुपयाला विकु नये एवढेच म्हणणे आहे.

आमीरने शोमध्ये सांगितलेल्या वाक्याशी शतशः सहमत आहे. जर पैसाच कमवायचा असेल तर दुसरे काहि करा (नैतिक मार्गाने ) पण वैद्यकिय व्यवसायाचा बिझनेस करु नका. हॉस्पिटल टाकुन उपचाराचा खरा खर्च ५०० असताना तो ५००० दाखवु नका. त्यापेक्षा मग फाइव्ह स्टार होटेल काढा आणी खरोखरच पाच रूपयाचा वडापाव दोनशे रुपयांना विका (साठेबाजी न करता) . ज्यांना परवडते ते खातील, नाहि ते पाच रुपयाचा खातातच.<<

मुद्दा तुम्हाला समजलेला नाहीये.

तुम्ही आयायटि शिकलात. तुम्हाला जर मी 'सेवा' करायला लावली तर कसे होईल?
तुम्ही म्हणाल मी स्पेशल स्किल मिळवले आहे.
माझ्या ज्ञानाच्या वापराची ही किम्मत आहे.

आता तुमच्या समोर २ मार्ग आहेत. १. तुमचे ज्ञान फुकट वाटणे/नोकरी करणे. किंवा २. स्वत:चा व्यवसाय करणे.

खासगी डॉक्टर दुकान मांडून बसला. तो म्हणतो माझ्या अकलेची किम्मत १०० रुपये.
ससूनमधे दुसरा त्याच क्वालिफिकेशनचा डॉक्टर बसलाय. तो तुम्हाला पैसे मागतच नाहीये. 'सरकार' त्याला पगार देतेय, अन तुम्हाला ५ रुपये फी मागते आहे. (हेच कॉर्पोरेट हॉस्पिटल्स मधे असते. फी डॉक्टर ठरवीत नाही. बिलातील फार कमी रक्कम त्या डॉ.ला मिळते. २० हजार बिलात ३-५ हजार. फक्त २० टक्के किंवा २५)

कुणाकडे जावे हा तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला कुणीच जबरदस्ती केलेली नाही की अमक्याकडे जा.

तुमचे आर्ग्युमेंट आहे, की खासागी दुकान मांडण्याचा याला अधिकारच नाही, कारण हा डॉक्टर आहे. याने फक्त सेवाच करावी.
याला माझे उत्तरः
अरे हूट! काब्र भो?? डाक्टर म्हंजे काय कुनाच्या बा चा वेठबिगार हाय का??

त्या बिन्डोक एपिसोडमधे जनेरिक मेडिसिन म्हंजे काय्तरी लै भारी जादू अस्लं दाखवलं आहे. मेडिसिन डॉक्टर्स ना तयार करत, ना विकत. तुमच्या खर्चाला ते जबाबदार नाहीत. त्या औषधांना तुम्ही ५ रुपयाचा वडापाव म्हणून डॉक्टराला दोषी समजत आहात. हे चुकिचे आहे.

औषधे विसरा. साधा चष्मा विकत घेणे असा हिशोब करा.
डोल्याच्या डॉक्टरची फी १००-२०० रुपये
टाटा च्या शोरुममधे चष्मा २-४ हजार रुपये
डोक्यात इच्चार काय? तर डाक्टराने मला चश्मा लाव्ला. मी ४ हजारात डुबलो..
अरेच्च्या??
अहो साहेब. आज फक्त १ किलो गोडेतेल येतं हो १५० रुपयांत. डाक्तराची तेवढीच कमाई झाली त्यात. बाकी पैकं कुटं गेलं?

आमचे गुरु सांगायचे... डॉक्टरने प्रचंड पैसा मिळवावा.. प्रत्येक पेशंटकडून मिळणारा निम्मा पैसा एका अकाउंटला ठेवावा.... आयुष्यात कधीतरी कॉम्प्लिकेशन, पोलिस केस, वकील, मोडतोड ... याला सामोरे जावे लागणारच... तेंव्हा तो पैसा स्वाहा करुन टाकावा.

जय गुरुदेव ! Proud

रुणुझुणूच्या बहुतेक पोस्टना माझे ही अनुमोदन. ह्या सगळ्यां परिस्थितीला फक्त डॉक्टर जबाबदार नाही आहेत असे मला ही सुरवाती पासून माहीत आहे पण ही माहिती योग्य शब्दात कशी मांडायची तेच समजत न्हवते. रुनुदीनि मस्त मुदेसूद पटवून दिले.

रुणुदि म्हणते तसे खूपसे प्रश्न पीजी ह्या सीट्सवाढवयाने कमी होतील. पण त्या पीजी करतानाच्या काळात डॉक्टरांना सरकारने काही मुलभूत सुविधा नक्कीच दायला हव्यात.
अतिशय निराशाजनक वातावरण असते Govt हॉस्पिटल आणि वसतीगृहात. वरती दिनेशदानी सांगितल्या प्रमाणे असते अगदी सगळी परिस्थिती.

माझा ही ससून चा अनुभव दिनेशदा च्या सारखाच आहे. २००७ मध्ये मी भारतात गेले होते तेव्हा प्रथमच पुण्याला गेले. माझ्या नवर्याने (तेव्हाच स्टेटस इन रिलेशनशिप विथ) मला मोठ्या उत्साहाने त्याचे बी जे मेडीकल आणि ससूनचे वसतिगृह दाखवायला नेले होते. ही अतिशयोक्ती नाही पण माझ्या पाहण्यात मी आत्ता पर्यंत पाहिलेली सगळ्यात गलिच्छ जागा होती. रेसिडेंट डॉक्टरच्या मुलींच्या रेस्ट रुम्स अगदी हॉरर सिनेमा मध्ये दाखवतात त्या सारख्या. मला एकटीला आत पाउल ठेवताना सुधा भीती वाटत होती. त्या रेसिडेंट डॉक्टरांच्या वसतीगृहात सगळीकडे बेड बग्स आहेत अस मला समजल त्या मुळे त्या रूम मध्ये बसायला सुधा भीती वाटत होती . त्या एकूणच रेसिडेंट डॉक्टरांच्या वसतिगृहात मला पाणी सुधा पिता आले नाही. बहुतेक असा अंधार, वर्षानुवषे रंग न दिलेल्या भिंती, मधेच जिन्याच्या पायरया गायब. चढताना सुधा भीती वाटते. सगळ अस कोंदट वातावरण. अतिशय जुनाट.........एक नको असलेला वास त्या सर्व वातावरणात भरून राहिलेला होता. (कदाचित आत्ता चांगले बदल घडले असतील तर मला त्याची कल्पना नाही......)

मला पहिला प्रश्न पडला पेशंटना स्वच्छतेची काळजी घ्या म्हणून सांगणारे डॉक्टर स्वतः इतक्या अस्वच्छ वातावरणात कसे काय राहतात रोज च्या रोज? बहुतेकांच म्हणन अस असत की कामाचे दिवस इतके मोठे असतात आणि रात्री इतक्या लहान की ह्या सगळ्यांकडे पाहायला वेळच नसतो.....सगळी कडे एकप्रकारचे निराशाजनक वातावरण.

मला वाटत त्या इमारती मध्ये जरा चांगला स्वच्छ सूर्यप्रकाश, खेळती हवा, भिंतीना चांगला रंग, स्वच्छ रेस्ट रूम्स, गरम पाणी आणि स्वच्छ झोपण्याची व्यावस्था करायला हवी. त्यांना जेव्हा रुरल इंटर्नशिपची सक्ती करता तेव्हा त्यांच्या राहण्याची सोय करायला हवी. आणि मुख्य म्हणजे तिथे सरकारी दवाखाना प्रत्यक्षात असायला हवा नुसता सरकारी कागदावर नको. ह्या साध्या सुविधा जरी त्यांच्या पर्यंत पोहोचल्या तरी एक प्रकारे Positive बदल घडून येईल. सतत त्याच निराशाजनक जागेत राहिल्यामुळे, वरिष्ठ डॉक्टरांच्या Bossing मुळे आणि सरकारच्या, स्थानिक पुढार्यांच्या लुडबुडी मुळे बहुतेक नवीन डॉक्टरांचा कल हा खाजगी किवा प्रायवेट प्रक्टिस कडेच असतो.

जर Govt ने सुरवातीच्या काळात ह्या साध्या साध्या सुविधा कडे जरी लक्ष्य पुरविले तरी बरयाचश्या डॉक्टरांन मध्ये Govt सेक्टर विषयी सकारात्मक भावना निर्माण होईल आणि ते आपणहून पुढे येतील चांगली आणि सर्वाना परवडेल अशी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी.

माझ्या पतिना शिक्षण पूर्ण करून मग IAS साठी प्रयत्न करायचे होते. अभ्यासही सुरु केला होता. त्यांना सिस्टीम मध्ये जाऊन सिस्टीमला बदलायचे होते. विचार खूप चागंले होते पण ते प्रत्यक्षात येणे किती कठीण आहे हे त्यांना निमगाव सावे आणि जळगाव येथे रुरल इंटर्नशिप करताना राजकीय पुढारी आणि सरकारी नोकरी करीत असलेल्या लोकांचा त्यांना इतका वाईट अनुभव आला की त्यांना रुरल इंटर्नशिप सुधा नीट करता आली नाही. Accident आणि Postmortem Report चे राजकारण खूपच भयानक होत. हे स्थानिक राजकारण इतक भयानक की जिवंत परत पुण्यात आले हेच खूप झाल.

चांगल्या डॉक्टरांनी ठरवल तरी Govt सेक्टर मध्ये ते टिकू नाही शकत कारण राजकीय पुढारी आणि लाचखाऊ सरकारी कर्मचारी ह्यांच्या बरोबर Communicate करण्यासाठी त्यांना त्यांच्या level ला उतरावं लागेल म्हणून बहुतेक डॉक्टर ह्या सगळ्या पासून दूर राहण पसंत करतात.

ह्याला जर कोणी जबाबदार असेल तर ती कुणीच घाबरत नसलेली भारतीय न्याय व्यवस्था, घाणेरडे राजकारणी आणि गुंडांना पैसे खाण्यासाठी निवडून देणारे भारतीय लोक. हे सगळ चित्र तेव्हाच पालटेल जेव्हा राजकीय हस्तक्षेपा शिवाय कडक कायदे बनवायला देतील आणि त्यांची काटेकोरपणे अंमलबजवणी सुधा करायला देतील.

@ मयेकर जी & दिनेशदा.

वर शॉपअ‍ॅक्टचा मुद्दा आला व तुम्हा दोघांच्या सेन्सिबल पोस्ट्स आल्या.

आजपर्यंत कधी पेशंटला गिर्‍हाईक म्हणून वागविण्याची वेळ आली नाही. पण संताप प्रचण्ड होतो..

यानिमित्ताने कुणाला फारशी ठाऊक नसलेली एक दुखरी नस उघडून दाखवतो.

आधी एक किस्सा.
कालचाच.
शॉपअ‍ॅक्ट इन्स्पेक्टर. हॉस्पिटल माझे नाही. मागितलेली लाच = रु. ३० हजार.
कारण : मिनिमम वेजेस दिल्या नाहीत.
unskilled labourer. on daily wages. law says minimum wage is Rs. 273 / day. with 6 hours duty. म्हणजे पडतो महिना पगार ८-९ हजार रुपये. तिथे ७ देतात. वॉर्डबॉयला. हजारेक रुपये कमी पगार दिला जातो आहे. हा कायदा हॉस्पिटलने मोडलेला आहेच.
आता,
सरकारी 'शिक्षणसेवक': महिना ३००० रुपये पगार. म्हंजे १०० रुपये रोज.
अंगणवाडी सेविका: महिना १२०० रुपये. रोज किती झाला? ४० रुपये.
दोघेही 'स्किल्ड' आहेत. अन हे सरकारी पगार आहेत.
पण शॉप अ‍ॅक्ट लागू झालेल्या व्यावसायिकाने, जो टॅक्स तर देतोच,, वरून ४ लोकान्ना नोकरी देतो, त्याने काय करायचे? तर यान्ना लाचही द्यायची, रजिस्टर्स ठेवायची अन वेळ मिळेल तेव्हा पेशंटांना बरे करायचे?
हे कसे काय चालते??
या शॉपअ‍ॅक्ट वाल्याची जर 'सुपारी' दिली तर १० हजारात त्या कुत्र्याचे चारी पाय (दोन पुढचे अन दोन मागचे पाय) तोडून मिळतील.....

इतक्या लेव्हलपर्यंत संताप होतो कधी कधी...

अन हा शॉप अ‍ॅक्ट फक्त एक कायदा आहे डॉक्टरला लुटण्याचा.

एक पोल्यूशन कन्ट्रोलचा कायदा आहे.
दवाखान्यातला कचरा म्हणे बायो मेडिकल वेस्ट असतो.
तो फेकायला वेगळी व्यवस्था लागते.
प्रतिदिन, प्रती बेड, डॉक्टरकडून किमान ८ रुपये उकळले जातात. म्हणजे, समजा माझ्या हॉस्पिटलात ५ बेड्स आहेत, तर मी ४० रुपये रोज, १२०० रुपये महिना फक्त कचरा फेकण्यासाठी द्यायचे.
घरचा कचरा फेकायला मुन्शिपाल्टी पैकं मागते का वेगळं?
मुन्शिपाल्टी दवाखान्याचा वेगळा 'बॉम्बे नर्सिंग होम' ट्याक्स तर अधीच घेते आहे.
बायो मेडिकल वेस्ट म्हणजे काय?
घरोघरी व्हिस्पर फेकतात, ते बायो मेडिकल वेस्ट आहेत. अन तुम्हाला जुलाब होतात ते जे काय शौचालयात जातं तेही तेच आहे. या सगळ्याचा निचरा जर तुम्ही हॉस्पिटलात केलात तर तो डॉक्टर या प्रत्येक गोष्टिपायी किलोवर पैसे मोजतो, फक्त मुन्शिपल्टिला.
याउप्पर 'रजिस्ट्रेशन फी'
म्हणजे काय?
तर मी डॉक्टर आहे हे सरकारला मीच सांगायचे. ४ प्रतीत एक १२ पानी फॉर्म भरायचा, अन वरून ३ हजार मिनिमम फी भरायची.
या पुढे अधुनमधून ते एन्पिसीबी वाले येणार. तुम्हाला लाच मागणार.
दिली नाही, तर या कायद्यात डॉक्टरला १ वर्षे सक्त मजूरी अन १ लाख दंड आहे..

कधी तरी १ लाख कुणा गावगुंडापुढे फेकून २-४ एन्पीसीबी वाल्यांची डोकी फोडायचा विचार येतो. कारण यातले अधिक कंगोरे फार वाईट आहेत..

असो.

It is very risky and difficult to try to heal a patient in the first place, without these stupid legalities.
We doctors cope with those stresses and headaches. there are too many of them and we know its our own job hazard.
We do not expect any sympathy from anyone.
We just want NOT to be made soft targets.
डॉक्टरचा 'धंदा' किती सोपा / कठीण आहे हे तुम्हाला ठाऊक नाहीये,, तर तुम्ही त्या डॉक्टरला कसा धंदा कर ते सांगू नका इतकेच म्हणणे आहे.

डॉक्टर बेक्कार सर्विस देत असेल, त्याला वैद्यकी येत नसेल, तर तुम्ही त्याला उपाशी मारूच शकता. जाउ नका त्याच्या कडे. सध्या गाजत असलेल्या स्त्री भ्रूणहत्येतील डॉक्टरचे रजिस्ट्रेशन महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलने, -जी डॉक्टरांची सेल्फ रेगुलेटरी बॉडी आहे- ६-७ महिन्यापूर्वी रद्द केले होते. हे कलेक्टर-एसपी यांना लेखी कळविलेले होते.

तरीही पेशंट येत होते. दुकान चालू होते.

इंप्लिमेंटेशन कुणी करावे?

मी जाऊ तिथे बंदूक घेऊन? की चाणक्य येणारेत आंदोलन करायला त्यांच्या 'आयायटी' चे लोक घेऊन? इथे वडापाव टाईप करायला सोपे असते हो..

@ अनन्या
चांगल्या डॉक्टरांनी ठरवल तरी Govt सेक्टर मध्ये ते टिकू नाही शकत कारण राजकीय पुढारी आणि लाचखाऊ सरकारी कर्मचारी ह्यांच्या बरोबर Communicate करण्यासाठी त्यांना त्यांच्या level ला उतरावं लागेल म्हणून बहुतेक डॉक्टर ह्या सगळ्या पासून दूर राहण पसंत करतात. <<<<

सहमत
याचसाठी सरकारी अनुभव पोटभर घेऊन खासगी दुकान टाकलेले आहे, अन सध्या खाऊन पिउन सुखी आहे..

अहो इब्लिस तुमच्या सेल्स टॅक्स अ‍ॅक्ट, भ्रष्टाचारी कर्मचारी इत्यादींशी सहमत पण तुम्ही तरी बायो मेडिकल वेस्ट अन ह्युमन वेस्ट (किंवा इतर वेस्ट) अशी गल्लत नका करू.

घरचा कचरा पण वेग वेगळा करून फेकायचा असतो. हे सामान्य ज्ञान आपल्या भारतीय जनतेला नाही ते आहेच पण त्याहून जास्त कचरा निर्मूलन करणार्‍यांना ही नाही. ओला कचरा, दुधाच्या पिशव्या अन कोरडा वेगळा करून ठेवला तरी कचरेवाला ते सर्व एकाच डब्यात रिकामा करतो. Happy पण विस्पर काय अन इतर काय?

पण डॉक्टर कडील कचरा हा घरच्या कचर्‍यासारखा नसतो. त्याचे पैसे घेतले तर काय वाईट? कमवता तसेच खर्च पण करायला हवा.

सेवा चांगल्या हव्यात तर पैसा मोजायला हवाच. तिथे बहुदा कोणी नाही म्हणत नाही. पण गरज नसताना ह्या टेस्ट करा, त्या टेस्ट करा हे येथील लोकांना (व त्या एपिसोड मध्येही) आवडले नाही. आता ही "गरज" फक्त डॉक्टरच ठरवू शकतात आणि त्यातून ते लुबाडतात ह्याला विरोध आहे.

MRI ससून मध्ये केला तर क्ष रू लागतील पण इनलॅक्स बुधराणीत केला तर क्ष च्या काही पटीत लागतील. आणि ते द्यायला सगळे तयारही असतील इथपर्यंत सगळ्यांना इथे मान्य आहे. पण MRI करायची गरज खरच होती का हा प्रश्न आहे. डॉक्टरने भरमसाठ पैसे "फी" म्हणून आकारायला हरकत नाही. त्याच डॉकटर कडे जावे असे काही नाही, शिवाय डॉ़क्टरी म्हणजे सेवा हे पण सोडायला हवे. पण प्रश्न नियतीचा आहे. पैसे जास्त आकारायला मुळीच हरकत नाही.पण मग ट्रिटमेंटही "योग्य"ती असावी. उगाच ही टेस्ट ती टेस्ट असे नको.
तुम्ही किंवा इतर अनेक डॉक्टर प्रामाणिकपणे पैसे कमावत आहात. रादर ५०-६० टक्के तुमच्यासारखे असतील असे गृहीत धरू. पण तो एपिसोड उरलेल्या ४०-५० टक्यांसाठी आहे. (परत एकदा मुद्दा - पैसे कमवायला कोणीच नाही म्हणत नाही, पण नियत बरोबर असावी इतकेच म्हणने त्या एपिसोड मध्ये होते.)

@ केदारजी,
मी वर हे लिहीले आहे:
डॉक्टर बेक्कार सर्विस देत असेल, त्याला वैद्यकी येत नसेल, तर तुम्ही त्याला उपाशी मारूच शकता. जाउ नका त्याच्या कडे.

अन साहेबा,
बायोमेडिकल वेस्ट या विषयावर ३-४ पीएच्ड्या मिळतील इतका कीस काढून मग तो त्रागा करतो आहे हो.. पटत नसेल तर सोडून द्या.

दुसरे,

>>पण डॉक्टर कडील कचरा हा घरच्या कचर्‍यासारखा नसतो. त्याचे पैसे घेतले तर काय वाईट? कमवता तसेच खर्च पण करायला हवा.<<<

हे ज्ञान डॉक्टरला बरे शिकविता येते?
डॉक्टर फी मागेल तेव्हा ते 'अन एथिकल', मानवते विरुद्ध, किंवा लुटारूपणाचे कसे होते?? त्याची अक्कल असेल तितकी फी तो मागतो आहे. तुमची ऐपत असेल तर पायरी चढा? कसे??

तिसरे:

>> पण MRI करायची गरज खरच होती का हा प्रश्न आहे.<<

ही गरज नव्हती हे जर तुम्हांस समजते, तर तुम्ही त्या MRI सांगणार्‍या कुडमुड्या वैद्याची पायरी कां चढलात?
तो खोटे बोलून लुटतो असे वाटत असेल, तर या देशात कन्झ्युमर कोर्टे, सिविल कोर्टे, पोलिस इ. आहेत.
अन गरज नव्हती, तर तुम्ही केलात कशासाठी तो एमाराय?
तोंडावर विचारा त्या डॉक्टरला की का रे भाऊ? मी ही तपासणी का करू?
उत्तर पटले तर करा.
नसेल पटत तर नका करू.
नॉर्मल रिपोर्ट आला तर खुष व्हायला हवे माणसाने की बुवा माझ्या जीवाला धोका नाही. इथे नॉर्मल रिपोर्ट आला तर ती तपासणी 'अनावश्यक'?? हे ठरविण्याचे ट्रेनिंग जर तुमच्या पाशी आहे, तर जाऊच नका ना त्या डॉक्टरकडे?

केदार, +१.

------------------

आमिरने म्हटलेले आहेच एपीसोडमध्ये, की हा नियतीचा भाग आहे. ( ह्यावरच मागचा एकाचा अनुभव लिहिला होता.) .
(system)यंत्रणा खराब असली तरी काही बाबतीत पुर्णपणे डॉक्टरच जबाबदार आहेत हेच दिसून येते व आलेय. रीपोर्ट मध्ये काय आहे हे एक डॉक्टरच सांगतो व त्यावरच रोगी करायला तयार होतो. मुद्दाम पैसे उकळण्यासाठी ऑपरेशन करायला लावणे, ज्यास्तीच्या टेस्ट करायला लावणे ह्याला काय अर्थ? पैस कमवा ना पण असे खोटी फसवून कशाला? लावा ना विजिटींग फी पण असली फसवणूक कशाला?

(तरी हॉटेलची उदाहरणे देवून इब्लिस ह्यांचे चालूच आहे.) Wink

डॉक्टर फी मागेल तेव्हा ते 'अन एथिकल', मानवते विरुद्ध, किंवा लुटारूपणाचे कसे होते?? त्याची अक्कल असेल तितकी फी तो मागतो आहे. तुमची ऐपत असेल तर पायरी चढा? कसे?? >>

नाही हे असेही नसावेच. मी लिहिले आहे की बुधराणीत जा न जास्त पैसे द्या. एथीकल, अन एथीकल काहीच नाही. डॉक्टर म्हण़जे सेवा नाही असे मी लिहिलेले कदाचित तुम्ही गडबडीत वाचले नाही. जेवढी अक्कल तेवढे पैसे घ्या. अक्कल नसतानाही घ्या पण इलाजाचेच पैसे घ्या.

मुद्दा हा नाही. तो तुम्हालाही कळला आहे. पैसे इलाजाचे कितीही घ्या पण नियतीने उपचार करा. केवळ रोग्याकडे पैसे आहेत म्हणून तुम्ही ( म्हणजे इथे भ्रष्ट डॉक्टर) तो उकळणार? हे कसे काय बुवा?

>>उत्तर पटले तर करा.
नसेल पटत तर नका करू.<<
आपल्या माणसाचा जीव त्रासात असताना तेवढे डोके चालले तर बघायला नको मग.
वर तेवढे सरळ कोणी सांगत नाही ना. पण त्याच्यांतलाच दुसरा चांगला डॉ़क्टर सांगतो की अहो, ही टेस्ट कशाला केली तेव्हा कळते की पहिल्याने फसवले. आणि कोणाला आधीच अक्काल असती तर स्वतः डॉ़ नसते का झाले मग?

उदाहरण द्यायचे झाले तर साधा ताप आलेला तो बरा होत नाही म्हणून अ‍ॅडमिट केले. तर स्पायनल फ्लूड काढले. बर का विचारले तर तर डोळे वटारायचे. बर , रीपोर्ट कधी येणार तर पत्ता नाही. विझिट फी कायच्या काय आकारलेली, डॉ़क दोन दिवसात रात्रीचा एकदाच फिरकला १० मिनीटे पहिल्या दिवशी. फाइल चाळली व ह्यांव टेस्ट करा व त्यांव टेस्ट करा सांगून गेला. तोवर औषधांचा पत्ता नाही. कुडुक्मुडुक औषध दिले तापावरचे. व रीपोर्ट आल्यावर सांगतो. सायनल फ्लूड काढल्याने मुलीला त्रस झाला तो वेगळाच.

मैत्रीणीच्या मुलीला तिसर्‍या दिवशी मूव केले तेव्हा दुसरा डॉ़ म्हणला , काही गरज न्हवती हो ह्याची. वायरल फ्लू आहे. मेनिनजायटिसची लक्षणे बिलकूल नाहीयेत ही.
आता बोला..

@ केदारजी.
वरील पोस्टित सूर जरा वेगळा लागला.
संपादन न करता वेगले लिहीतो पुन्हा.

मुद्दा १ व २. ह्यूमन्/बायो मेडिकल वेस्ट.
घरी जुलाब झाले, ते टायफॉईडचे असलेत तर संपूर्ण गावाला त्या आजाराच्या प्रसाराचा धोका आहे. बरोबर?
तो पसरू नये म्हणून मुन्शिपाल्टीने व्यवस्था केली पाहिजे.
दवाखान्यातील ह्यूमन वेस्ट मला एक्स्ट्रा खर्च करून स्वतः निर्जंतुक करून मग डिस्कार्ड करावी लागते, व वरून त्या निर्जंतुक केलेल्या वेस्ट ला उचलण्यासाठी अधिकचे पैसे द्यावे लागतात.
जर मुन्शिपाल्टिने अ‍ॅलरेडी घरी होणार्‍या जुलाबातून तुम्हाला आजार होणार नाहीत याची व्यवस्था केलेलि असेल, तर मला इन हाऊस निर्जंतुकीकरण करण्याची सक्ती का?
हे ते कंगोरे आहेत. या पलिकडचे कंगोरे म्हणजे, मी तो कचरा स्वतः पूर्ण डिस्पोज पण करू शकत नाही. मला तो मुन्शिपाल्टीच्या अधिकृत माणसालाच व तो सांगेल ते पैसे देऊनच फेकावा लागतो. बरेच लोचे आहेत.

मुद्दा ३.
कम्युनिकेट करा.
डॉक्टर देव नाही. त्याला प्रश्न विचारा. तुम्हाला काय आजार झाला ते समजून घ्या. उत्तर द्यायला त्याला वेळ नाही ही सबब ऐकून घेऊच नका. मी ५०० रुपये मोजलेत. मला १० मिनिटे प्रश्न विचारण्याचा हक्क आहेच हे ठासून सांगा.
मग कोणता चोर अनावश्यक तपासणी सांगू शकतो?

केदार + १
इब्लिस, तुमचा त्रागा स्वाभाविक आहे, पण मुद्दे निराळे आहेत. अनावश्यक तपासण्या / प्रोसीजर्स (जशी गर्भाशय काढून टाकण्याची केस किंवा पॅन्क्रिआज ट्रान्सप्लान्ट) करायला लावणं, केवळ इन्शुरन्स आहे म्हणून त्याच तपासण्यांचे जास्त पैसे लावणं याबद्दल बोलत आहेत लोक. सेवा म्हणजे धर्मादाय व्यवसाय करा असं नव्हे, पण मूळ उद्देश रुग्णसेवा आहे हे (तुम्ही शपथ घेता ना तशी?) विसरू नये इतकंच.

झंपीजी,
तुमचा राग समजू शकतो.
पण तो तुमच्या दृष्टीने 'चांगला' प्राणी कदाचित professional jealousy बाळगूनही बोललेला असू शकतो हो..
आपल्या देशात पेशंट लोक डॉक्टरला एकतर देव्हार्‍यात बसवतात, नै तर खेटराने मारतात.
तो एक सिम्पल साधा माणूस आहे.
तुमचा आजार त्याने तुम्हाला दिलेला नाहिये.
त्या आजाराशी भांडण्याचा तो फक्त प्रयत्न करू शकणार आहे.
हे प्लीज ध्यानात घ्या,
खोटेनाटे दावे करणारे भोंदू भरपूर आहेत या देशात.
अनेक श्री.इन्जिन्यर्जी अन बाबाजी वैद्यकीचा गंधही नसतांना डाक्टरकी करतात, त्यांना लोक डोक्यावर घेऊन नाचतात. इमानदार डॉक्टर शिव्या खातो... हे पटत नाही.

स्वातीजी,
डॉक्टरांबद्दल असलेल्या या ज्या शंका आहेत ना, की अमुक अनावश्यक तपासणी केली, तमुक ऑपरेशन चुकीचे केले, त्यावर इलाजच तर सांगायचा प्रयत्न करतो आहे मी?

पेशंटने, म्हणजेच तुम्ही अन मीही, माझ्या डॉक्टरशी बोलले पाहिजे, अन मी डॉक्टर असेन तर मीही पेशंटला समजावून सांगितले पाहिजे.

पेशंट्ने कन्सेन्ट नाही दिली तर कुणीच त्याला कापू शकत नाही. किती वेळा तुम्ही तो फॉर्म वाचायचा प्रयत्न करता? किंवा डॉक्टरशी त्याबद्दल चर्चा करता?

ती करा.

"मेन्यू कार्ड" मागून घ्या. ते उर्दू स्टाईलने वाचा. पैसे किती लागतील? ते का लागतील हे किमान विचारा. स्टाफ नीट सेवा देत नसेल तर आधी किमान सभ्य भाषा वापरून डॉक्टरकडे/हॉस्पिटल अ‍ॅडमिन कडे तक्रार करा. प्रत्येक पैशाचं बिल मागा. छोट्या गोष्टी आहेत.

इतके केलेत तरी ९९% अडचणी दोन्हीकडुन निवळतात.

वर लिह्ल्या प्रमाणे आचारी अन बटाटावडा खाणारे यांच्यात मारामार्‍या या कम्युनिकेशन गॅपमुळे आहेत, ती कमी झाली तर बरे.

>> पेशंटने, म्हणजेच तुम्ही अन मीही, माझ्या डॉक्टरशी बोलले पाहिजे, अन मी डॉक्टर असेन तर मीही पेशंटला समजावून सांगितले पाहिजे.
>> मारामार्‍या या कम्युनिकेशन गॅपमुळे आहेत

मान्य. Happy

मला तो मुन्शिपाल्टीच्या अधिकृत माणसालाच व तो सांगेल ते पैसे देऊनच फेकावा लागतो. बरेच लोचे आहेत. >> होय आणि अगदी असेच व्हायला पाहिजे. फक्त ते पैसे किती असतात हे पालिकेने तुम्हाला कळविने जरूरी आहे. तेवढेच पैसे देऊन तो कचरा तसाच फेकायला पाहिजे. लोचा वाटत असला तरी. घरी कचरा कसाही डिस्पोज होतो म्हणून मी का करू? हा सूर काही कामाचा नाही. हे म्हणजे वन वे मध्ये रिव्हर्स गाडी घालन्यासारखे आहे. Happy

उलट डॉ़क्टरचे कर्त्यव्य आहे ही एखाद्या रोगामुळे लागण होत असेल तर त्याला इतरांपासून (घरच्या मेंबरांपासून) योग्य त्या अंतरावर ठेवणे, उरलेल्या औषधाची विल्हेवाट कशी लावायची ते सांगणे इ इ. पण करतो कोण? (तुम्ही करतही असला पण इतरांचे काय?)

केदारजी,
अमेरिकेत, कचरा उचलणार्‍यांच्या माफिया आहेत म्हणे.. त्या का असतात ते पुढे वाचा:

बायोमेडिकल वेस्टच्या कचरा उचलण्याचे गणित सांगतो तुम्हाला.
समजा गावात महा पालिका म्हणजे ५ लाख लोक आहेत.
सुमारे २५० दवाखाने आहेत.
प्रत्येक दवाखान्यात सरासरी १० बेड्स आहेत.
प्रति बेड, प्रतिदिन ५ रुपये 'फी' कचरा उचलण्याची आहे. मग त्या बेडवर पेशंट असो, वा नसो.

5x10x250x30 = रु. ३ लाख ७५ हजार फक्त, दरमहा. हे तो कचरा उचलणारा कंत्राटदार कमवतो. (रच्याकने. फक्त ससूनचे बेड्स ५०० पेक्षा जास्त आहेत. पुण्यातले सगळे मिळून बेड्स किमान ५-१०,००० असतील. हिशोब करा.)
कायद्यात लिहिलेली इन्सिनरेटर इ. व्यवस्था सर्व डॉक्टरांनी मिळून स्वतः स्वखर्चाने केली, तर त्याला मुन्शिपाल्टी परवानगी देत नाही. कारण काय असावे ते तुम्हीच पहा.

इतरांची कर्तव्ये नीट सांगता येतात साहेबा. तुमची कोणती?

इतरांची कर्तव्ये नीट सांगता येतात साहेबा. तुमची कोणती? >>> तुम्ही फार पर्सनली घेता बॉ. डॉक्टरने आरोग्यविषयक सल्ला द्यायचा नाही तर काय CA ने द्यायचा का? असे विचारण्या आधी मी काही लिहिले ते चूक आहे ते सांगा. मग वाद घालू. तुम्ही प्रथमपुरषी एकवचणी घेणे आधी सोडा. डॉ़क्टर म्हणजे तुम्ही नाही तर डॉ़क्टर म्हणजे ते सर्व लोक ज्यांनी वैद्यकिय प्रशिक्षण घेतले. आणि उरलेल्या औषधाची विल्हेवाट कशी लावायची हे ते सांगणार नाही तर आय टी कन्सलंटंट सांगतील का? जेने काम तेने थायो. Happy

तुमचे म्हणणे बरोबर आहे असे गृहीत धरले तरी बायोकचर्‍याची वेगळी विल्हेवाट लावण्यात यावी ह्या म्हणन्यात काय चूक आहे ते मला कळत नाही. हे आपण करत नसू (बायोची वेगळी विल्हेवाट) तर आपण एक देश म्हणून लै मागासलेले आहोत. तुमच्या गणितात दवाखान्यातला सगळाच कचरा बायो असतो असे एक गृहित दिसते. कचर्‍याचे वेगवेगळ्या प्रकार करून ती विल्हेवाट लावायची आपल्याला देश म्हणून गरज आहे असे तुम्हाला नाही का वाटत? स्पेशली दवाखान्याच्या सिरिंज अन इतर काही आरोग्यास घातक गोष्टी ज्या तुम्हीच जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकता, त्या इतर कचर्‍यातून वेगळ्या व्हायलाच पाहिजेत. नाही का?

पैशाचे गणित कसेही असो. आरोग्यास हितकारक असेल तर तेवढा पैसा खर्च व्हावाच. नाही तर पाणीच आहे म्हणून सरळ नदीचे पाणी घरात येत नाही, आधी फिल्टरेशन होते. तसेच बायो कचरा हा खराब असू शकतो. तेवढा पैसा पालिकेने सरकारी दवाखान्यावर अन तुम्ही तुमच्या प्रायव्हेट दवाखान्याच्या हक्काचा कमाईतून द्यायला पाहिजे असे वाटते. त्यावर तुम्हाला टॅक्स वजावटही मिळायला पाहिजे कारण असलेल्या धंद्यासाठीचा तो खर्च म्हणून दाखवता आला पाहिजे.

असो अनएन्डींग होत चालले आहे. मुळात सर्व काही आलबेल आहे. कोणी डॉ़क्टर कोणत्याही पेशंटला कधीही त्रास देत नाही. डॉक्टर देव आहेत. (म्हणजे पर्यायाने पेशंट राक्षस, त्यामुळे राक्षसांना काही देवांनी त्रास दिला तर काय चूक Happy )

इब्लीसजी

एका चांगल्या माणसाला इतरांमुळे माझ्या व्यवसायाची बदनामी का व्हावी या भावनेतून जे काही वाटतं ते तुमच्या पोष्टीतून तुम्ही मांडलेलं आहे. मी समजू शकतो. डॉक्टरला समाजामधे आज जी प्रतिष्ठा, जो दर्जा आहे तो इतर व्यावसायिकांना नाही. ही प्रतिष्ठा तुमच्यासारख्या डॉक्टरांमुळे प्राप्त होते. पण या प्रकारे इतरांची ( अनैतिक प्रकार करणारे) जबाबदारी घ्यायची आवश्यकता नाही असं मला वाटतं. मी इंजिनियर झालो, मा़झ्या व्यवसायात भ्रष्ट, निष्काळजी इंजिनीयर्स अनेक आहेत. त्यांची प्रकरणेही उजेडात येतात, वेळोवेळी त्यांना झोडपण्यातही येते आणि त्यांच्या वागण्याचे मी समर्थन करू शकत नाही. तीच गोष्ट वकील, सीए किंवा इतर तत्सम व्यावसायिकांची. या प्रत्येक क्षेत्रातल्या गैरप्रकारांना वेळोवेळी तोंड फुटत असतं तेव्हा त्यातले चांगले लोक त्याचे समर्थन करण्यासाठी पुढे येत नाहीत. वाईट प्रवृत्ती सर्व क्षेत्रात आहेत. ज्या ज्या वेळी या प्रवृत्ती एक्स्पोज होतील तेव्हा त्यांना आपल्या मौतीने मरू द्यावे. मात्र एखाद्या नोबेल प्रोफेशन मधे चाललेल्या प्रकारांबद्दल उघडपणे बोललं जात नाही ते प्रतिष्ठेला धक्का पोहोचू नये म्हणूनच.

त्या एपिसोडमधे हलगर्जीपणाने होणारे मृत्यू हा विषय नव्हता असं मला वाटतं. तो एक डिबेटचा भाग आहे. खरं तर प्रबोधनाचा आहे.

गरज नसताना घाबरवून सोडणे, अनावश्यक तपासण्या करायला लावणे आणि कट प्रॅक्टीस याबद्दल चर्चा होत नाही ती आमीरखानने घडवून आणली आहे याबद्दल सर्व प्रामाणिक डॉक्टरांनी त्याचे अभिनंदन करायला हवे आणि आपल्या व्यवसायाला लागलेली ही कीड कशी झटकून टाकता येईल याबद्दल आता वातावरणनिर्मिती झाली असताना एमसीआय वर दबाव आणला पाहीजे.

मा़झ्या मुलीचा अनुभव वर मी दिलेला आहे. चांगल्या डॉक्टर्सची उदाहरणेही दिलेली आहेत. वीस हजाराचे अनावश्यक बिल करून त्यातले सहा हजार खिशात टाकताना हे आपले नाहीत याची जाणीव असतानाही अशी सवय लागलेल्या डॉक्टरांचा ही मी मोघम उल्लेख केला आहे. हे अनुभव जवळपास प्रत्येकाला येतात. हा केवळ भ्रष्ट आचार नाही तर आपण पेशंटला लुबाडतोय , आपल्या ज्ञानाचा, पेशंटचा आपल्यावर असलेल्या विश्वासाचा केसाने गळा कापतोय ही जाणीव असताना केलेल्या अनैतिक प्रॅक्टीसचा प्रश्न आहे. जेव्हां कॅपिटेशन फी नव्हती तेव्हांही हे प्रकार होतच होते. म्हणजेच पुन्हा हा वृत्तीचा प्रश्न आहे.

खाजगी डॉक्टरांनी किती फी घ्यावी, खा़जगी रूग्णालयांनी किती चार्जेस आकारावेत, सरकारी रूग्णालयांची संख्या दर हजारी असावी कि दर दहा हजारी असावी हे निराळे प्रश्न आहेत. पैकी सरकारी रूग्णालयांची संख्या न वाढवण्यामागे कुणाचा दबाव आहे कि इथेही हलगर्जीपणा आहे या विषयावर बोलूयात पण वेगळ्या धाग्यावर !

इब्लिस. मला तुमची कळकळ व संताप समजतो. पण केदार म्हणतो त्याप्रमाणे प्रथम पुरुषी एकवचनी न घेण्याचे शक्यतो प्रयत्न केलात तर मनस्ताप थोडा कमी होइल.मला तुमचे बरेचसे मुद्दे पटले व त्यामागची कळकळही समजली. काही बॅड अ‍ॅपल्समुळे सरसकट सर्व वैद्यकिय पेशा करणारे अनैतिक ठरत नाहीत हा तुमचा मुद्दा बरोबर आहे. मला नाही वाटत मायबोलीवरचे सुजाण वाचकही तसे म्हणत आहेत. त्यांचा रोख फक्त अनैतिक प्रॅक्टिस करणार्‍यांवरच आहे.

वरच्याच पोस्टमधे किरणने अगदी मर्मावर घाव घातला आहे. इब्लिस..मीही तुमच्याच क्षेत्रातला आहे पण किरण म्हणतो ते अगदी बरोबर आहे... कुठल्याही क्षेत्रामधे जर त्यातल्या काही लोकांनी अनैतिक पद्धतीने व्यवसाय केला तर त्या व्यवसायातल्या चांगल्या(म्हणजे वैद्यकिय क्षेत्रात उदाहरण द्यायचे म्हणजे तुमच्यासारख्या) इतर लोकांनी तश्या वाइट लोकांना पाठीशी न घालता त्यांचा व ते करतात तश्या अनैतिक प्रॅक्टीसचा निषेध केलाच पाहीजे. मला असे मुळीच म्हणायचे नाही की तुमच्या इथल्या सर्व पोस्टींमधे तुम्ही तश्या लोकांचे व तश्या पद्धतींचे समर्थन करत आहात.तुम्ही चांगल्या डॉक्टर्सचीच बाजु मांडत आहात पण इथे काही लोकांनी अशी गल्लत केलेली मला वाटत आहे की तुम्ही "सगळ्याच" डॉक्टरांचे समर्थन करत आहात.

आणी एक गोष्ट म्हणजे ही टेस्ट करा.. ती टेस्ट करा हे जे सध्या जास्त प्रमाणात दिसत आहे त्याचे कारण म्हणजे आता भारतातही तश्या टेस्ट करण्याच्या सुविधा निर्माण झाल्या आहेत हे असावे.अमेरिकेत त्या फार पुर्वीपासुन छोट्या छोट्या हॉस्पिटलमधे सुद्धा करता येत होत्या. अश्या सुविधांचा रोगनिदान करण्यासाठी वापर गरण्यात काहीच गैर नाही पण गैरवापर मात्र जरुर गैर आहे अश्या मताचा मीसुद्धा आहे. अमेरिकेत पुष्कळ वेळा माल्प्रॅक्टिसची केस होउ नये म्हणुन बहुतेक डॉक्टर डिफेन्सिव्ह प्रॅक्टीस करतात व रोगनिदान करणे अगदी साधे व सोप्पे असुनसुद्धा एक बॅक अप म्हणुन ते एम आर आय, कॅट स्कॅन अश्या टेस्ट ऑर्डर करतात. कारण समजा त्यांनी तश्या टेस्ट केल्या नाहीत व त्यांचे रोगनिदान चुकले तर मग इथले पेशंट बाकीच्या टेस्ट उपलब्ध असुनही त्याचा वापर डॉक्टरने केला नाही म्हणुन त्या डॉक्टरला मिलिअन्स ऑफ डॉलर्सच्या नुकसानभरपाइसाठी कोर्टात खेचतात.. इन्फॅक्ट इथे टिव्हिवर सर्रास वकिलांच्या अ‍ॅड्स असतात.. तुम्हाला हॉस्पिटलमधे हलगर्जी झाली असे वाटत असेल तर मिलिअन्स ऑफ डॉलर्सचा दावा करायला आमच्याकडे या! म्हणुन मग डिफेन्सिव्ह प्रॅक्टिस.. म्हणुन मग जास्त टेस्ट्(त्यात काही अनावश्यकही) व मग जास्त बिल.. व म्हणुन मग जास्त इंशुरंसचा हप्ता.. असे हे सगळे चक्र आहे. आता भारतातही अश्या कारणांसाठी अश्या किती अनावश्यक टेस्ट होतात यावर इब्लिस किंवा रुणू़झुणुच प्रकाश टाकु शकतील..

पण जर डॉक्टरचे पेंशंट हिस्टरी टेकींग व क्लिनिकल स्किल चांगले असेल तर नुसत्या त्यावरुन रोगनिदान चुकण्याची शक्यता फार फार कमी असते असे आमचे जी एस मेडिकमधले डॉ. परुळकर, डॉ भालेराव, डॉ. दस्तुर व डॉ रवी बापट शिकवायचे. पण जर का मॉडर्न टेक्निक्स व टेस्ट जर उपलब्ध असतील तर त्याचा उपयोग का करुन घेउ नये असाच सगळे जण आता विचार करतात.

या टेस्ट्सबाबतीतही इब्लिस तुमचे म्हणणे अगदी पटले .. जर निगेटिव्ह टेस्ट आली तर पेशंटने आभारच मानले पाहीजेत की ती निगेटिव्ह आली म्हणुन..पण केदार म्हणतो तेही बरोबर आहे की मुळात ती टेस्ट करणे हे जरुरीचे होते का हेही पाहीले पाहीजे व त्यात इब्लिस तुम्ही म्हणता त्याप्रमाणे डॉक्टर व रुग्ण यांच्यात चांगले कम्युनिकेशन व त्याहीपेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे विश्वास पाहीजे..

बाय द वे.. रुणुझुणु.. तुझे वडापापवचे उदाहरण छान होते व पटलेही पण ते वाचताना मला क्षणभर मी मेडिकल कॉलेजला असताना फिजिऑलॉजी चे गायटन म्हणा किंवा अ‍ॅनॅटॉमीचे ग्रे म्हणा किंवा मेडिसिनचे हॅरिसन म्हणा या पुस्तकांचा अभ्यास करताना त्या पुस्तकांच्या पानात वडापाव कसा करावा याच्या कृत्या व वडापावचे फोटो होते व त्याचा मी अभ्यास करत होतो असा भास व्हायला लागला...:)

कार्यक्रमात डॉ गुलाटींनी एक मुद्दा मांडला की १९९१ मध्ये सुरू झालेल्या आर्थिक उदारीकरणामुळे (LPG) शासनाने खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांना मोठ्या प्रमाणात परवानगी देणे सुरू केले. सध्या वैद्यकीय क्षेत्रात दिसणारे कट प्रॅक्टिस, अनावश्यक चाचण्या, गैरवाजवी शुल्क इ. गैरप्रकार खा.वै.म.चे भरमसाठ शिक्षणशुल्क आणि प्रवेशासाठी द्यावी लागणारी कॅपिटेशन फी यामुळे सुरू झाले.

मला आनंद चित्रपटातला रमेश देव यांनी रंगवलेला डॉक्टर आठवतोय जो (गरीब रुग्णांच्या उपचाराचा खर्च काढण्यासाठी) श्रीमंत -चोचलेदार रुग्णाला अनावश्यक तपासण्या आणि उपचार सुचवतो. हाच मुद्दा विजया मेहता-प्रतिमा कुलकर्णी यांच्या लाइफलाइन या LPG च्या पूर्वीच्या मालिकेत ही स्पर्शिला गेला होता. साहित्य समाजाचा आरसाबिरसा असेल तर खा.वै.शि., कॅपिटेशन फी हे एकच कारण या गैरप्रकारांमागे नाही.

स्पेशालिस्ट्सना स्वतःच्या ज्ञानाबरोबरच आपल्याकडे असलेल्या सुविधा/यंत्रसामुग्रीही अद्यावत ठेवावी लागत असेल. स्पेशालिटी युनिट स्थापन करण्याच्या खर्चाप्रमाणेच हा खर्चही अवाढव्य असेल.

वैद्यकीय क्षेत्र हे उच्च बुद्धिमत्ता असणार्‍यांचे प्रथम/एकमेव पसंतीचे कार्यक्षेत्र असल्याचा काळ आज तितकासा राहिलेला नाही. पण आपल्या बुद्धिमत्तेच्या प्रमाणात, अन्य क्षेत्रांतील आपल्या मित्र/नातेवाईक/सहाध्यायींच्या बरोबरीने आपण पैसे कमवले पाहिजेत असे डॉक्टरांनीच वाटून घेऊ नये असे म्हणणेही योग्य नाही.

फक्त हे सगळे, गैरप्रकारां न करता जमवणे शक्य नाही असे काही डॉक्टरांना का वाटावे?

ज्ञानदान आणि आरोग्यसेवा या क्षेत्रात येणारे लोक पैशाच्या मागे लागणारे नसावेत असे भाबडे, कदाचित अन्यायकारक मत आहे.

@केदारजी.
>>केदार | 31 May, 2012 - 04:25 नवीन

इतरांची कर्तव्ये नीट सांगता येतात साहेबा. तुमची कोणती? >>> तुम्ही फार पर्सनली घेता बॉ. डॉक्टरने आरोग्यविषयक सल्ला द्यायचा नाही तर काय CA ने द्यायचा का? असे विचारण्या आधी मी काही लिहिले ते चूक आहे ते सांगा. मग वाद घालू. तुम्ही प्रथमपुरषी एकवचणी घेणे आधी सोडा. डॉ़क्टर म्हणजे तुम्ही नाही तर डॉ़क्टर म्हणजे ते सर्व लोक ज्यांनी वैद्यकिय प्रशिक्षण घेतले. आणि उरलेल्या औषधाची विल्हेवाट कशी लावायची हे ते सांगणार नाही तर आय टी कन्सलंटंट सांगतील का? जेने काम तेने थायो<<

वाद घालण्याच्या भरात माझा तोल कुठे ढासळतोय ते लक्षात आणून दिल्याबद्दल आभार.

माझी चिडचिड वेगळीच होती.

बीएमडब्लू (बायो मेडिकल वेस्ट) तिचे वर्गीकरण व निचरा हे आता सुमारे ८-१० वर्षांपासून होऊ लागलेले आहे.
ते करायलाच पाहिजे आहे. त्यासाठी डॉक्टर्स खर्च व आपल्याच समव्यावसायिकांचे प्रबोधनही करीत आहेत. गावोगावी आय.एम.ए. यासाठी कार्यरत आहे.

प्रॉब्लेम हा असतो, की बीएमडब्लू च्या नावाखाली जो कायदा इंडस्ट्रीज ला लागू आहे, तोच डॉक्टरना आहे. अन इंडस्ट्रीजने उदा. दूषित पाणी नदीत सोडू नये इ. साठी जो कारकून्/इन्स्पेक्टर बसवलाय तो लठ्ठ लाच घ्यायला सोकावलेला आहे. तोच डॉक्टरांवर 'वचक' ठेवण्यासाठी आहे.

याचे परिणाम फिल्ड मधे कसे होत असतील ते समजून घेतलेत तर लक्षात येईल, की मी वर्गीकरण करून कितीही सांगितले, की बाबारे ही इतके किलो वेस्ट 'काँटामिनेटेड' नाही, तरी त्या कारकुनाला काही घेणे देणे नसते. तो 'सगळेच' किलो एकत्र मानतो. म्हणून मीही तसे मांडले.

लाच न दिल्यास खिशात एक वापरलेलि सिरिंज घेऊन येऊन, ही बीएमडब्लू तुमच्या हॉस्पिटल समोर/मधे पडलेली सापडली असे सांगून खटले दाखल केलेल्या केसेस मला ठाऊक अहेत.

निमूटपणे डॉक्टर्स पैसे तर देत आहेतच, पण यात बीएमडब्लू डिस्पोजल चा मूळ हेतूच साध्य होत नाहिये. कचरा उचलणारा मध्यस्थ तो कचरा योग्य रितीने नष्ट करीत नाहीये. एन्पीसीबिला लाच देऊन सर्रास लँडफिलमधे तो कचरा फेकला जातो आहे. याबद्दल आवाज उठवून आजपर्यंत काहीही झालेले नाही. उलट तक्रार केली की एकतर्फी बिल वाढवून येते. कचरा उचलणे बंद केले जाते.

जैविक कचरा मी (म्हणजे डॉक्टर) फक्त ४८ तास मजकडे ठेऊ शकतो. त्याउप्पर तो उचलला गेला नाही तर कायद्याने मलाच गुन्हेगार ठरवले आहे. कंत्राटदाराने ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट केला तरी. कचरा उचलणे बंद करून मग इन्स्पेक्टरला पाठविले जाते.. वर मी सांगितले की अनेक कंगोरे आहेत.

या सग्ळ्याला पुरुन उरलो, तरी जो माणूस व्यक्तीशः लाच मागतो त्याचे मी काही वाकडे करू शकत नाही असेच दिसते. मी खटला लढलो तरी तो एन.पी.सी.बी. नावाच्या सरकारी संस्थेसोबत 'डुकराशी कुस्ती' असतो. लाच मागणारा कारकून मजेत फिरत असतो, अन मी काम धंदे सोडून कोर्टात.

म्हणून वर म्हटलो तसे ते १ लाख फेकून यांची डोकी फोडायचा विचार येतो. याचा अर्थ मला बीएमडब्लू ची योग्य विल्हेवाट लावणे मान्य नाही, असा होत नाही Happy ते केले पाहिजे, अन करतोही आहोत.

या निमित्ताने वैद्यकिय क्षेत्राबाहेरच्या ४ शहाण्या लोकांनी हा प्रॉब्लेम असा आहे हे जाणून घेतलेत तरी भरपूर झाले. कितीही प्रयत्न केलेत तरी पाळता येणे शक्यच नसलेले हे असे कायदे डॉक्टरांना पाळावयास लावण्यात येत आहेत...

इन्शुरन्स चा वेगळाच गमतीदार इश्यू आहे.

एक अजुन नवा कायदा येऊ घातला आहे. हॉस्पिटल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट. हेल्थ मिनिस्ट्रीच्या साईटवर ड्राफ्ट सापडेल. आमच्या बर्‍याच डॉक्टर मित्रांना त्याबद्दल काहीच कल्पना नाहिये. त्यांबद्दल पुन्हा कधी तरी.

@ चिमुरी.
>> नवी माहिती

अहो, हे तर फक्त 'टिप ऑफ आईसबर्ग' आहे.

लाच मागण्याचे नवे मार्ग संशोधित करण्यासाठी काही पुरस्कार असतो की काय कुणास ठाऊक..

गमतीदार उदाहरण सांगतो.

आपल्याला गावात अनेक होर्डिंग्ज, भिंतींवर रंगविलेल्या जाहिराती इ. दिसतात. यासाठी कॉर्पोरेशनला काही फी भरावी लागत असते. महामार्गावर होर्डिंग लावले तर हायवे अ‍ॅथॉरिटी पैसे मागते.

माझ्या खासगी जागेतील दवाखान्याचा बोर्ड, किती बाय किती फुटाचा आहे, त्याप्रमाणे मोजून, तुम्ही ही 'जाहिरात' लावली आहेत, त्याचे इतके पैसे भरा असे सांगत एक माणूस आला होता. हा बोर्ड मी माझ्या खासगी जागेत लावला आहे हे सांगितले तर म्हणे पण तो हायवे वरून दिसतो. असं करा तोडीपाणी करून टाकू..

हसावे की रडावे याला?

Pages