"सत्यमेव जयते" भाग ४ - (Does Healthcare Need Healing?)

Submitted by आनंदयात्री on 26 May, 2012 - 14:46

आज २७ मे च्या चौथ्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
सत्यमेव जयतेच्या वेबसाईटवरील या भागाची लिंक -
http://www.satyamevjayate.in/issue04/

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमीप्रमाणेच उत्तम एपिसोड ! बरेचसे महत्त्वाचे मुद्दे कव्हर केले गेले.

दुर्दैवाने ज्या कथित धक्कादायक स्टोरीज कार्यक्रमात दाखवल्या गेल्या, तशी परिस्थिती जवळपास प्रत्येक जिल्ह्यात आहे, इतका हा प्रकार सार्वत्रिक आहे.
याच क्षेत्रात असल्यामुळे हे सर्व प्रकार जवळून पाहिले आहेत. त्यामुळे धक्का वगैरे बसला नाही, पण वाईट जरूर वाटले.

वस्तुस्थिती अशी आहे की 'जनरल प्रॅक्टिशनर' ही जमात मालप्रॅक्टिसेस केल्याशिवाय आज तग धरू शकत नाही, निदान पहिली काही वर्षे तरी ! मी स्वतः प्रॅक्टिसला सुरूवात केल्यानंतर पहिल्या काही महिन्यातच हे लक्षात आले. या फंदात पडायचे नव्हते, त्यामुळे प्रॅक्टिस सेट होईपर्यंत मेडिकल ऑफिसरचा जॉब करण्याचा निर्णय घेतला. कामाचे फार समाधान नाही, मात्र नको त्या तडजोडी कराव्या लागत नाहीत, हे त्यातल्या त्यात समाधान आहे.

सत्यमेव जयते : भाग ४ .२७ में २०१२

धन्यवाद आमीर, अतिशय उत्तम विषय
डॉक्टरी पेशातील भ्रष्टाचार

वैद्यराज नमस्तुभ्यं, यमराज सहोदर |
यमे हरतु प्राणाना , वैद्ये प्राणां धनानि च ||

excellent ! outstanding !! full marks to Aamir and team !!!

NARAYAN HRUDAYALAYA & GENERIC MEDICINES बद्दलची माहिती खरेच खूप उपयुक्त

या भागावर फक्त एकच शब्द लिहीण्यासारखा आहे... अप्रतिम !!
केवळ प्रतिक्रिया बस्स.. >>>>>> अगदी अगदी

हम लोगों का एकही लक्ष्य है.

पाकिस्तान कितना खर्चा करता है? १.३ %
और हम्कितना करते है? १.४

तालियाँ.. Proud

एक फार महत्वाचा मुद्दा निसटला आहे. शहरातून हेल्थ केअर महागले त्याला एक कारण आहे. इन्शुरन्स पॉलिसी... पॉलिसी असेल तर मुद्दाम जास्त टेस्ट, जास्त कन्सल्टेशन, जास्त रुम रेम्ट असतात.. सर्जरीचे चार्जेसही जास्त होतात. पेशंटही काही बोलत नाही, कारण पैसे इन्शुरन्स कंपनी देणार असते. डॉक्टरही आजकाल आधी चौकशी करतात.. पॉलिसी आहे का? हा देखील मुद्दा चर्चेत यायला हवा होता.

लो कॉस्ट इन्शुरन्सचा मुद्दा आला. पण इन्शुरन्स ची दुसरीही बाजु यायला हवी होती.

पुन्हा एकदा खूप महत्त्वाचा विषय मांडला गेला. उत्तमरित्या.

गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आणि हॉस्पीटल्स जास्तीत जास्त असायला हवीत याला अनुमोदन. जसा नाटकासिनेमात काम करणार्‍या कलाकारांना पैसा किती याची फिकीर नसते ते जातात ते त्या क्षेत्रातील पॅशनमुळे, तसं जेव्हा डॉक्टरीपेशातही होईल तेव्हा हे दुष्टचक्र थांबेल आणि आपल्याला उत्कृष्ट डॉक्टर्स मिळतील. डोनेशन देण्याची कुवत आहे म्हणून या क्षेत्रात येणारे आणि खोर्‍यासारखा पैसा कमावायाची संधी म्हणून या क्षेत्राकडे आकृष्ट होणारे विद्यार्थी जाऊन डॉक्टरीपेशाचं महत्त्व जाणणारे आणि त्याचा मान ठेवणारे डॉक्टर्स निर्माण होण्याची गरज आहे.

भरपूर मेडिकल कॉलेजेस मधून दर वर्षी भरपूर डॉक्टर्स बाहेर पडत असूनही दुर्गम गावांमधे डॉक्टर असतोच असं नाही या वस्तुस्थितीबद्दल भाष्य यायला हवे होते का?
याला एक्झॅक्टली मालप्रॅक्टिस नाही म्हणता येणार पण गावात प्रॉस्पेक्टस/ पैसा नाही म्हणून शहरातच प्रॅक्टिस/ नोकरी करण्याकडे कल आहे हे अमान्य करता येणार नाही ना?

कार्यक्रम खरेच अप्रतिम होता. यावेळी कारणाचा शोध घेण्याचाही थोडासा प्रयत्न झाला (कॅपिटेशन फी). अनावश्यक टेस्ट्स, अनावश्यक ऑपरेशन्स, कट प्रॅक्टिस, औषधांचा धंदा,कुचकामी MCI , मेडिकल कॉलेजेसशी संलग्न इस्पितळांचा फार्स इतके वेगवेगळे मुद्दे चर्चिले गेले. डॉ तलवार यांची अवस्था कधी एकदा इथून बाहेर पडतो अशी झाली होती.

जामोप्या म्हणतात त्यात तथ्य आहे. नुसतेच हॉस्पिटलायझेशन नाही तर साध्या सर्दीतापाच्या ओषधोपचाराचे बिल मागितलेत, म्हणजे तुम्हाला ऑफिसकडून भरपाई मिळणार आहे हे समजून एरवीच्या रकमेपेक्षा दुप्पट रकमेचे बिल देऊन दीडपट रक्कम डॉक्टर खिशात घालतात. किती स्पेशालिस्ट्स न मागता बिले/पावत्या देतात?
प्रोफेशनल्सचे टॅक्स ऑडिट कसे होते?

या कार्यक्रमाच्या वेळीच अल जझीरा वाहिनीवर इंडियन हॉस्पिटल हा कार्यक्रम दाखविला जात होता. डॉ देवी शेट्टी यांनी हृदयशस्त्रक्रियांप्रमाणेच डायलिसिसमध्ये इकॉनॉमीज ऑफ स्केल साधून या दोन्ही गोष्टी स्वस्त दरात कशा उपलब्द करून दिल्या त्याबद्दल सांगितले केले.

डॉ गुलाटींनी टाळ्या घेतानाच अनेक मुद्यांना चांगला हात घातला. खाजगी शाळा, कॉलेजेस म्हणजे चांगलं शिक्षण हा समज झालेल्यांसाठी विचार करायला लावणारा एपिसोड होता. पुण्यातल्या एका संस्थेत एक कोटी रूपयांचं पॅकेज घेतलं गेल्याची एका एजंटाची माहिती आहे..

आजचा विषय आणि सादरीकरण चांगले होते.

तरीपण खुप मुद्दे आणि दुसरी बाजु राहुन गेल्यासारखे वाटले. हा प्रश्न मांडुन ढोबळ निष्कर्ष काढल्यासारखे वाटले.
उदा. जामोप्या यांनी नमुद केलेला इंशुरन्सचा मुद्दा.
उगाचच वेगवेगळ्या टेस्ट करायला सांगणे आणि इंशुरन्सकडुन पैसे वसुली करणे हे भारतातच नाही तर अमेरिकेत पण आहे. ह्यामागे वेगळे रॅकेट आहे.

ह्या भागात मांडलेले प्रश्न /समस्या हे गंभीर आहेच पण ह्या समस्या कशा सोडवायच्या हे जरा अजुन मांडायला पाहिजे. एकटा एम्.सी.आय. फार काही करु शकणार नाही. एकटे डॉ. तलवार काही करु शकणार नाहीत. अख्खी यंत्रणाच भ्रष्टाचाराने ग्रासलेली आहे. यांची पण अनेक उदाहरणे आहेत.

कट प्रॅक्टिस , एम.आर. कडुन महागडी गिफ्ट्स यासारखे प्रकार वैद्यकीय व्यवसायातच नव्हे इतर अनेक व्यवसायात आहे. जो पर्यंत काळा पैसा कसा रोखायचा ही यंत्रणा राबवली जात नाही तो पर्यंत काही करणे अवघड आहे.

खाजगी महाविद्यालये हे सर्व राजकारण्यांचे कुरण झाले आहे. कॅपिटेशन फी हा त्यांच्यासाठी एक काळ्या उत्पन्नाचा सोर्स आहे. अगोदर कॉलेजला मान्यता देतात आणि मग हॉस्पिटल आहे की नाही हे बघतात. त्याऐवजी हॉस्पिटल आहे का, किती वर्षे चालले आहे, त्यांचे रेकॉर्ड्स तपासुन मग कॉलेजला मान्यता दिली तर त्या कॉलेजमधुन बाहेर पडणारी टाळकी जरा अनुभव घेउन येतील. आत्ताच्या प्रायव्हेट कॉलेज मधील हॉस्पिटलमधे सुविधा नसल्याने रुग्ण नाहीत आणि रुग्ण नाहीत म्हणुन विद्यर्थ्यांना अनुभव नाही आणि अनुभव नाही म्हणुन ह्याव्यवसायातील इतर क्लुप्त्या वापरुन पैसे कमावणे हेच चालले आहे.
डॉ. गुलाटींनी सांगितले की ५०-६० लाख बँकेत ठेउन त्यावरील व्याजात आरामात राहता येउ शकते. याबाबतचा एक किस्सा. माझ्या एका दुरच्या नातेवाईकाने ७० च्या दशकात बेळगावहुन एम्.बी.बी.एस्. केले. त्यावेळी त्यांनी ६५ हजार डोनेशन दिले. त्यावेळी पण सगळे म्हणाले की इतके पैसे बँकेत ठेवा , आयुष्यभर आरामात काढाल. आज ६५ हजाराला किंमत किती ते माहितीच आहे. आणि ते म्हणतात की ६५ हजार काही वर्षात वसुल झाले.

अजुन एक मुद्दा.. सरकार वैद्यकीय शाखेला इतर दुकानदारांप्रमाणे नियम लावते. उदा. सेल्स टॅक्स इ. त्या ऐवजी एक वेगळी नियमावली असुन सर्व जीवनावश्यक सेवांचा यात समावेश व्हायला हवा.

त्या आंध्रातल्या खेड्यात सरसकट जी ऑपरेशन्स झाली ती सरकारी दवाखान्यात की खाजगी? खाजगी डॉक्टरांनी पैसे काढण्यासाठी जर ऑपरेशन्स झाली तर सरकारी दवाखानाकडे लोक हा फिरकत नव्हते? हे पण विचार करायला पाहिजे. ह्याबाबत एका डॉक्टरांनी विचार मांडला आहेच. पण ग्रामीण भागात ह्या सुविधा पुरवणे जास्त गरजेचे आहे. नाहीतर खाजगी डॉक्टरांचे आणि त्यांच्या धंद्याचे फोफावेल.

जनेरीक वि. ब्रँडेड औषधे यावर चांगले दाखवले आहे. ह्याचा काही प्रमाणात तरी इफेक्ट होईल असे वाटते.

सगळ्याच गोष्टींचा पाठपुरावा करणे तासाभरात शक्य नाही पण जे काय लोकांसमोर आणले त्याकरिता परत आमिरचे अभिनंदन.

काही मुद्दे सुटले तरी कार्यक्रम चांगला झाला. सकारात्मक बाजू फार चांगली मांडली गेली.
आपल्याकडेही एसिक (एम्प्लॉयी स्टेट इन्शुरन्स स्कीम) होती, तिचे बारा वाजले.
मला वाटतं, मेडीकल कॉलेज उघडणे हा धंदा झाल्यापासून् हे सर्व सुरु झाले.

काही वर्षांपुर्वी एका मायबोलीकरणीच्या आईच्या बाबतीत पुण्यातील एका जगप्रसिद्ध डॉक्टरांच्या
हॉस्पिटलमधे भयानक अनुभव आला होता. मी स्वतः आणि काही इतर मायबोलीकर त्या प्रसंगाचे
साक्षीदार आहेत. हा अनुभव एवढा भयाण आणि त्या डॉक्टरचे प्रसिद्धीवलय एवढे मोठे आहे कि तिने
आजवर इथे त्याचा उल्लेख टाळलाय.

माझ्या मुलीला नेहमी ज्या बालरोग तज्ञाकडे घेऊन जातो त्या उपलब्ध नसल्याने एकदा घराजवळच्या दुस-या डॉक्टरकडे घेऊन गेलो. मुलीला उत्साहच नसतो वगैरे बायकोने पाढा सुरू केला तसा त्याने लगेचच कागद घेऊन ढोले पाटील रोड इथल्या एका पंचतारांकित इस्पितळात अ‍ॅडमिट करा असं सांगितलं. हार्टला होल असेल तर तपासण्या कराव्या लागतील. पण ९९.९९% तेच लक्षण आहे असंही सांगितलं.

आधीच्या दोन डॉक्टरांनी कधीही ही शक्यता वर्तवली नव्हती. तसंच त्याने सांगितलेल्या रूग्णालयातच ती जन्माला आली तेव्हां सतराशे साठ टेस्ट गोळवलकर मध्ये केल्याच होत्या तेव्हां असं काही दिसून आलं नव्हतं हे सांगितलं तर म्हणाला कि नंतर डेव्हलप झालं असेल. त्या गुजराथी डॉक्टरला नीट इंग्लिश देखील बोलता येत नव्हतं. उच्चारही घाणेरडे होते. पिढीजात व्यापार सोडून डॉक्टरीच्या धंद्यात तो शिरलेला आहे ही माहिती आधी त्याचं क्लिनिक जिथं होतं तिथल्या ओळखीच्यांनी पुरवली. तिथंही त्याने पेशंट रिफर करण्याव्यतिरिक्त काही केलेलं नव्हतं.

डॉक्टर आल्यानंतर खबरदारी म्हणून त्यांना हा प्रसंग सांगितला. त्यांनी काळजीचं कारण नसल्याचं सांगितलं आणि एक डॉक्टर असल्याने दुस-या डॉक्टरबद्दल वाईट बोलणं योग्य वाटत नसल्याचं सांगितलं. पण कायदेशीर कारवाई करणारच असाल तर त्यांनी दिलेल्या चिट्ठीबद्दलचा माझा अभिप्राय मी जरूर नोंदवेन हे सांगितलं. आजचा एपिसोड पाहता जर थोडा वेळ देऊन कारवाई केली असती तर इतरांना जरब बसली असती असं वाटतं.

दुसरा अनुभव पुतणीच्या वेळी आला. ती लहान असताना एका महिला वैद्यिणीने असंच घाबरून सोडलं होतं. तिला माझ्या घरी घेऊन जाते. रक्त भरावं लागेल. मी सलाईन लावते. स्वतः लक्ष ठेवीन. तिथंच सरांना बोलावून शस्त्रक्रिया करवून घेते. घरातच असल्याने काळजी घेईन वगैरे वगैरे. पुन्हा म्हणाली रक्त पाहीलं कि मला कसंसंच होतं... !!

एक तर ती आयुर्वेदिक. तिला परवानगी नाही. वर ती घरात शस्त्रक्रिया करणार, सेकंड ओपीनियन घेतो म्हटलं तर तुम्हाला मुलीबद्दल प्रेम आहे कि नाही म्हणाली ! अर्थातच तिचं ऐकलं नाही. आजही ती भेटली कि तोंड फिरवून जाते. बिच्चारी Proud ! कमीत कमी तो गुजराथी स्वतः असं काही करत नव्हता. दगडापेक्षा वीट मऊ !

या उदाहरणावरून अर्थातच जनरलायझेशन करता येणार नाही.

या उदाहरणावरून अर्थातच जनरलायझेशन करता येणार नाही.
>>> बरोबर.
मला २ वर्षं काही त्रास होत होता.
माझ्या जवळच्या नात्यात किमान २५ डॉक्टर्स आहेत (३ पिढ्या). त्यापैकी काहीजणांना मी सांगितलंही होतं. पण मी ते फार कॅज्युअली/ समारंभात वगैरे सांगितलं. त्यामुळे ते सिरिअसली घेतल्या गेलं नाही. शिवाय मला जो त्रास होत होता तो आणि हेमोग्लोबिन कमी असल्याने होणारा त्रास सारखाच असतो अन हेमोग्लोबिन तर सदैव कमीच. आणि मला होणारा त्रास इसीजी शिवाय डिटेक्ट करणे कठीण. वयही ३०च्या आत. बीपी नॉर्मल. त्यामुळे कुणीही कधीही टेस्ट्स करायला सांगितल्या नाहीत. इतर घराजवळचे डॉक्टरही आयर्न लिहून देत होते. पण त्याच पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये एकदा सगळ्या टेस्ट्स केल्यावर माझ्या त्रासाचं निदान झालं. इतके वर्षं ठणठणीत असल्यामुळे अन आधीही ४-५ वर्षापूर्वी २दा इसीजी मध्ये (इन्शुरन्स साठे केल्या होत्या) काही न आढळल्याने प्रकरण लाइटली घेतल्या गेलं. जेव्हा या हॉस्पीटलनी भरमसाठ टेस्ट सांगितल्या, अ‍ॅडमिट केलं, तेव्हा मला वाटलंच की उगाच लुटणं सुरु आहे. गेलं की अ‍ॅडमिट करण्यासाठी हे हॉस्पीटल कुख्यात आहे. पण घरचे डॉक्टर्स म्हणाले, करुन घे. काही हरकत नाही, बाकी काही नाही तर संशय तरी फिटेल. अन खरंच निदान झालं. तेव्हा सरसकट मोठे हॉस्पीटल्/डॉक्टर्स यावर अविश्वास दाखवू नये, हे कळलं.
अर्थात सगळ्या टेस्ट करण्याआधी इन्शुरन्स आहे ना हे नर्सने विचारुन घेतलं होतंच.
नंतर मला वाटलं समजा इन्शुरन्स नसता तर इतक्या टेस्ट सांगितल्या नसत्या अन कदाचित निदानही झालं नसतं. (मला होणारा त्रास हा मनुष्यास फार त्रास देत नाही, दिला तरी प्राणघातक नसतो. त्यामुळे अनेकदा तो डिटेक्ट होत नाही.)
अर्थात उलटसुलट अनुभव असणारच सगळ्यांचे. पण ही चर्चा एकाच दिशेने जाऊ नये म्हणून लिहिलं.

बाकी आजचा एपिसोड मस्तच होता. डॉ. तलवार यांची फार गोची झाली होती. कॅपिटेशन खरंच प्रश्नाचं मूळ आहे. फार्मा कंपन्यांबद्द्ल काही न बोलणे बरे. अमिताभ बच्चन पासून सगळ्या मोठ्या लोकांच्या फार्मा कं आहेत. अति जास्त काळा पैसा पांढरा करण्यासाठी एक्सलंट उद्योग आहे तो. अन आजकाल या कंपन्या डॉक्टर्सना अनेक एसी, फ्रीज, एक्विपमेंट्स, दरवर्षी फॉरेन ट्रिप्स, फर्निचर इ. सगळं मोफत देतात. अनेक डॉक्टर्स हे सगळं न घेता, कठीण परिस्थितीत आपलं काम प्रामाणिकपणे करत असतात. त्या सगळ्यांनाच या ४०-५०% फु़कटखाऊ लोकांमुळे लोकांच्या संशयाला बळी पडावे लागते.

अत्यंत गुंतागुंतीच्या विषयावरील अप्रतिम भाग!
जेनेरीक औषधाच्या किमतीबद्दलची माहिती धक्कादायक होती.
डॉक्टरी शिकणार्‍या विद्यार्थ्यांना 'मेडीकल एथिक्स' शिकवणारा असा विषयच अस्तित्वात नाही.
खोलात जाउन विचार केला तर डॉक्टरचा अधिकार (ऑथॉरिटी) आणि पेशंटची स्वायत्तता (ऑटॉनॉमी) यातला हा झगडा आहे. कोणतीही एक बाजू वरचढ होणे धोकादायक.

कालचा एपिसोड पाहून काय बोलावं तेच कळत नाहिये. Sad
डॉक्टर लोक आपल्या जीवाशी किती खेळतात?
तो लिव्हर ट्रान्स्प्लान्ट बरोबर पॅन्क्रियाज रीप्लेस करण्याचा किस्सा तर भयंकर होता. Sad
सुदैवाने माझ्या पाहण्यात कुठेही चुकिची ट्रिटमेंट वगैरे नाहीये अजुन तरी, पुढे ही ती होऊ नये अशी आशा आहे.

मी तर म्हणते प्रायव्हेट असो वा सरकारी. कोणत्याही टेस्ट्स, ऑपरेशन यासाठी सरकारने विशिष्ट रक्कम ठरवून द्यावी. (रेट कार्ड टाईप) जास्त पैसे उकळणार्‍या हॉस्पिटलवर कार्यवाही करावी.

अजुन बरेचसे मुद्दे राहिले आहेत पण ते सहाजीकच आहे. इतकं सगळं एकाच भागात नाही दाखवता येत..

जेनेरीक औषधाच्या किमतीबद्दलची माहिती धक्कादायक होती.>>>> हे माझ्याकरता नवीन नव्हतं. याचं मुळ पेटंट लॉ मधे आहे. यावर वेळ मिळाल्यावर अजुन लिहीन कदाचीत. पण हेही मान्य की बर्‍याचदा डॉ ब्रॅन्डेड ड्रग्जच प्रिस्काईब करतात. जर कोणाला ड्रग प्राइज कंट्रोल अ‍ॅक्ट बद्दल माहिती असेल तर प्लीज इथे लिहा. मला जाणुन घ्यायला आवडेल.

अजुन एक महत्वाची गोष्ट म्हणजे औषधं किंवा लसी मार्केट मधे यायच्या आधी, आणि त्यांना FDA कडुन अ‍ॅप्रूव्हल मिळायच्या आधी, त्यांच्या क्लिनिकल ट्रायल्स घेतल्या जातात. त्यात ज्याच्यावर ही ट्रायल घेण्यात येते त्याला त्याचे फायदे तोटे व्यवस्थित समजाउन सांगुन (इन्फॉर्म्ड कन्सेंट) मगच ट्रायलमधे सहभागी व्हायचं की नाही याचा निर्णय सर्वस्वी त्या व्यक्तीवर सोपावण्यात येतो. पण दरवेळी यातले तोटे सांगितले जातातच असं नाही. भारतात बर्‍याच प्रकारचे रोग आणि त्याचे मुबलक रोगी असल्याने भारत अश्या क्लिनिकल ट्रायल्स करता एक मोठी बाजारपेठ बनत आहे. पुण्यातल्या एका नामांकीत हॉस्पिटलमधे गरीब लोकांना रोटा व्हायरस ची लस त्यांच्या लहान मुलांना informed consent न घेता, त्यातले तोटे न सांगता, फक्त आम्ही तुम्हाला ही लस फुकट देत आहे त्याबदल्यात तुम्ही तुमच्या बाळाला फक्त ठरावीक वेळी इथे घेउन यायचं आणि काही टेस्ट्स करायच्या, त्यापण फुकट असतील. आणि तुमच्या येण्या जाण्याच्या खर्चाकरता आम्ही तुम्हाला काही रक्कम देउ असं सांगुन त्या क्लिनिकल ट्रायलमधे भाग घ्यायला लावलेलं आहे. .

याशिवाय विनाकारण बर्‍याचश्या लसी लहान बाळांना देण्याचा अट्टाहास पण चालतो.

वरचा आगाऊचा मुद्दा बघितला तर आमच्या अभ्यासक्रमात (सी.ए.) एथिक्स वर अजिबात भर नव्हता. काही मोजके प्रश्न असत. सी.ए. झाल्यावर मात्र कोड ऑफ कंडक्ट चे जाडजूड बाड दिले जात असे. आणि ते मुकाट्याने पाळावे, अशी अपेक्षा असे.

कामगार विमा योजनांचा, इतर देशातही बोर्‍या वाजलेला बघितला आहे / बघतो आहे. पण ती यशस्वी करुन दाखवल्याबद्दल, दक्षिणेकडील राज्यांचे कौतुक करायला पाहिजे.

एक फार महत्वाचा मुद्दा निसटला आहे. शहरातून हेल्थ केअर महागले त्याला एक कारण आहे. इन्शुरन्स पॉलिसी... पॉलिसी असेल तर मुद्दाम जास्त टेस्ट, जास्त कन्सल्टेशन, जास्त रुम रेम्ट असतात.. सर्जरीचे चार्जेसही जास्त होतात. पेशंटही काही बोलत नाही, कारण पैसे इन्शुरन्स कंपनी देणार असते. डॉक्टरही आजकाल आधी चौकशी करतात.. पॉलिसी आहे का? हा देखील मुद्दा चर्चेत यायला हवा होता. >>>>>>+१

खूप छान एपिसोड.

माझ्या नात्यातल्या दोघांचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे. पण माणूस गमावल्यावर काय केस करणार असा विचार करून काहीच करण्यात नाही आले.

चांगले डॉक्टर पण आहेत पण अपवादाने.:-(

कॅन्सरच्या उपचारासाठी बर्‍याचदा testing चालु असलेली औषधेच वापरतात. याची किंमत लाखात असु शकते. ही पण एक प्रकारची क्लिनिकल ट्रायलच. परंतु या औषधांचे पैसे मात्र पेशंटला भरावे लागतात. कोणी जाणकार anticancer drugs च्या क्लिनिकल ट्रायलमधल्या या मुद्द्यावर प्रकाश टाकु शकेल का?

कॅन्सर च्या उपचाराकरता जेनेरिक ड्रग्ज खरच खुप फायद्याचे असु शकतात, किंमती नुसार. परंतु काही डॉक्टर्स पेशंटच्या नातेवाईकांना असं सांगतात की हे ओरिजिनल ड्रग आहे आणि हे दुसरं तसच आहे पण कमी किमतीचं आहे. तर तुम्ही ठरवा कोणतं वापरु ते. हे माझ्या जवळ्यांच्या बाबतीत घडलेलं आहे. त्यांना मी परोपरीने सांगण्याचा प्रयत्नही केला की जेनेरिक सुद्धा तितकंच इफेक्टिव्ह असतात. पण उपयोग नाही.

माझ्या पोस्टींमधे डॉक्टर हा शब्द सर्वसाधारणपणे वापरला गेला आहे, त्याचा अर्थ सगळेच डॉक्टर असेच असतात असा होत नाही आणि तसा अर्थ काढुही नये.. खुपसे चांगले डॉक्टर्सही मी बघितलेले आहेत. त्यामुळे गैरसमज नसावा..

Pages