"सत्यमेव जयते" भाग ४ - (Does Healthcare Need Healing?)

Submitted by आनंदयात्री on 26 May, 2012 - 14:46

आज २७ मे च्या चौथ्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
सत्यमेव जयतेच्या वेबसाईटवरील या भागाची लिंक -
http://www.satyamevjayate.in/issue04/

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी सहमत,

डॉक्टर आणि रुग्ण हे नाते, रुग्णाकडून अतिविश्वासाचे असते. डॉक्टरला, रुग्णात तितके गुंतून चालणार नाही.
पण जसे एखाद्यावर अतिप्रेम असले तर त्याने केलेली छोटीशी फसवणूक, जिव्हारी लागते, तसेच या नात्यात,
रुग्णातर्फे होते. आपण नाडले गेलो वा लुबाडले गेलो, अशी जरा जरी शंका आली, तर तिखट प्रतिक्रिया दिली जाते.

अनेकदा डॉक्टरांचे 'मॅटर ऑफ फॅक्ट' स्वरूपाचे वागणे पण त्रासदायक असते पण डॉक्टर प्रत्येक रूग्णासाठी भावूक होत राह्यला तर तो उपचार कधी करेल?

दिनेश अनुमोदन.
रुणुझूणु तुझी पण पोष्ट आवडली. नविन व्यवसाय उभा करताना हे सर्व करावं लागत असेलही त्यात काही दुमत नाही. पण अव्वाच्या सव्वा पैसे उकळणे किंवा न करून चालणारे ऑपरेशन करायला लावणे हे अयोग्य आहे. Sad
आमिरच्या त्या एपिसोडमध्ये कुठल्या तरी भागात जवळ जवळ सर्व महिलांचे गर्भाशय काढून टाकले आहे. पैसे तर घेतलेच, शिवाय त्या बायका अत्यंत गरिब घरातल्या होत्या त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन, घाबरवून त्यांचे ऑपरेशन केले. पण ऑपरेशन नंतर त्यांना कोणत्या कोणत्या शारिरिक यातनांमधून किंवा इतर काही कॉम्प्लिकेशन्स मधुन जावे लागेल याचा ही विचार डॉक्टरांकडून व्हायला हवा होता.

येवढी सगळी चर्चा/पोस्टी अन कार्यक्रम, काहीच पाहिले/वाचले नाहीये. Happy
पण वैद्यकीय विश्वाचे अनुभव जवळून आहेत, काही अतिशय विदारक, तर काही अपवादात्मकरित्या चान्गले. Happy
मात्र या परिस्थितीला कारण, वैद्यकीय शिक्षणाचा झालेला धन्दा, क्यापिटेशन(?) फिया, इन्श्युरन्सेस इतकेच नसून, वैद्यकीय व्यवसायामागिल मूलभूत नैतिक प्रतिज्ञा/कार्यकारणभाव सरसकट खुन्टीला टान्गुन ठेवण्याची स्वार्थी वृत्ती, केवळ याच व्यवसायात नव्हे तर सगळीकडेच असल्याचे दिसते. अर्थात त्यास "गिर्‍हाईकेदेखिल" तितकीच कारणीभूत अस्तात.
फ्यामिली डॉक्टर ही संकल्पना, दरवेळेस विविध कारणान्नी डॉक्टर बदलत राहून याच समाजाने नष्ट करत आणली. (ही कारणे तरी काय, तर अमक्याच्या औषधाने लग्गेच उतार पडला नाही वा अमकातमका वीस रुपयेच घेतो पण सुई देखिल मारतो वगिअरे अनेक) आजही याच समाजाला लग्नातला भटजी जसा दोन अडिचशे रुपयातच हवा अस्तो, तद्वतच, स्थानिक जनरल डॉक्टरनेदेखिल दहावीस रुपड्यातच तपासावे ही अपेक्षा अस्ते. स्थानिक जनरल डॉक्टर्सनी औषधे देणे केव्हाच बन्द केलय, सबब कम्पाऊन्डर ही जमात नष्ट झाली, अन आता हे डॉक्टर आवाक्यातिल निदान करुन औषधे लिहूनच देणे पसन्द करतात, व जरा खुट्ट झाले की सरळ चाचण्या करवुन घेतात नि मोठ्या हॉस्पिटलकडे धाडतात. या व्यवहारात त्यान्चा टक्का अस्तो असे मानले तरी, उपचारादरम्यान हलगर्जीपणाच्या आरोपातुन पुढे येऊ शकणारी कायदेशीर रिस्क टाळणे त्यान्ना भाग पडावयास, फ्यामिली डॉक्टरवर विश्वास नसलेला हा समाजच कारैभूत आहे, अहो फ्यामिली डॉक्टर लाम्बचा, स्वतःच्या "फ्यामिलीवरही" विश्वास नसलेलेच बहुसन्ख्य सापडतील. Proud

मात्र दुसर्‍या बाजूस, वरील परिस्थितीचाच लाभ उठवुन, फार मोठ्या प्रमाणात रॅकेट्स उभा राहिल्यात, व आता तो "व्यावसायिक तन्त्राचा" अधिकृत भाग बनत चालला आहे.
पुण्यातीलच एका नामवन्त संस्थेमधे, नेमेलेल्या डॉक्टरकडून, दारूचे व्यसन सोडताना होणार्‍या उपचारान्चेवेळेस, मनातील एक अनामिक भिती घालविण्यासाठी "मेन्दुचे स्कॅन करुन घ्या - तर उपाय सुचविता येईल" हा सल्ला बरेच काही सान्गुन जातो.
पूर्वीच्या काळी केवळ वधुपिता विचारीत असलेल्या कोणत्या हापिसात काम करता, काय पोझिशनवर, कितीक पगार, इन्श्युरन्स असेलच, वगैरे बाबी गेली काही वर्षे कोणत्याही दवाखान्यात गेल्यास विचारल्या जाऊ लागल्या तेव्हाच हे सुनिश्चित झाले की आता उपचार हे माझ्या रोगावर अवलम्बुन नसुन माझ्या खिशातील पैशावर नजर ठेऊन केले जातिल.
या व्यवसायाबद्दल अफाट लिहीण्यासारखे आहे. पण जौद्याना.
शक्यतो आजारीच न पडण्याचि काळजी घेणे हेच उत्तम नाही का?
मी तर सान्गुन टाकलय घरात, की कधी काळी वेळ आलीच (म्हणजे हल्ली ती येतेच हो, त्याशिवाय डेथ सर्टिफिकेट मिळत नाही) कुठे अ‍ॅडमिट बिडमिट करायची, तर या या या हॉस्पिटल मधे चूकुनहि जाऊ नका. सरळ सरकारी दवाखान्यात भरती करा. Happy अर्थात मी तशी वेळ तुमच्या वर येऊच देणार नाही ती बाब वेगळी. पण कोर्टाच्या पायरीबरोबरच हल्ली दवाखान्याची पायरी देखिल चढू नये, अन माझ्या अन्तिमवेळी शब्दशः "मढ्याच्या ताळवेवरचे लोणी खाणार्‍या" हल्लीच्या वैद्यकीय व्यवस्थेमुळे तुम्ही कर्जबाजारी/देशोढडीस लागलेले असे बनू नयेत या मताचा मी आहे.

>>> आमिरच्या त्या एपिसोडमध्ये कुठल्या तरी भागात जवळ जवळ सर्व महिलांचे गर्भाशय काढून टाकले आहे. पैसे तर घेतलेच, शिवाय त्या बायका अत्यंत गरिब घरातल्या होत्या त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन, घाबरवून त्यांचे ऑपरेशन केले. <<<<
आयल्ला मला शन्का येत्ये, हल्ली हल्लीच गर्भाशयाचे पुनर्रोपण तर होऊ लागले नाहीये ना? तस असेल तर अवघड आहे बोवा. काढलेले गर्भाशय "वैद्यकीय घातक कचरा" म्हणून नष्ट होण्याऐवजी कुणाच्या पोटात एखाद्या गर्भाला नान्दवायची वाट बघत सुखनैव नान्दत असेल तर काय सान्गा? हल्ली काय, काहीही होऊ शकते. कलियुग रे बाबान्नो, घोर कलियुग हे!

<< इतर कुठल्याही व्यवसायात (सी.ए. / वकील ) पाय रोवणे कठीणच आहे. ज्यांना पालकांकडून प्रॅक्टीस आयती
मिळते, त्यांची गोष्ट वेगळी.>> खरंय दिनेशदा. कुठल्याही गोष्टीची नवीन सुरूवात कष्टाचीच असते. म्हणजे अगदी डीडीएलजे इष्टाईल सांगायचं तर " जिंदगी में तुम्हें दो रास्ते मिलेंगे...." वगैरे वगैरे Happy

आपल्याला कुठल्या मार्गाने जायचं आहे, तो आपल्याला झेपेल का ह्याचा पूर्ण विचार करूनच निर्णय घ्यावा लागतो. आणि जे सगळीकडे चालू आहे, म्हणून करावं लागणार, पण मुळात आपल्या मनाला ते पटत नाही, असल्या रस्त्यावर चालायला तर फारच हिंमत लागते....कारण न पटणार्‍या गोष्टी कराव्या तर मन खात राहणार. नाही करावं तर संघर्षाला सुरूवात आधी घरातल्यांपासूनच करायला लागते....(स्वानुभव :))

प्रिन्सेस,
थेट उपाय शोधणं कठीण आहे. पण काही मतं ( पूर्णपणे वैयक्तिक )
१. आधी म्हटल्याप्रमाणे पोस्टग्रॅज्युएशनच्या जागा वाढवायला हव्यात. म्हणजे ८० लाख - १ कोटी रूपये देऊन प्रायव्हेट कॉलेजला प्रवेश घ्यावे लागणार नाहीत. आणि मग ओतलेले पैसे परत मिळवण्याच्या प्रेशरखाली चुकीचा मार्ग अवलंबला जाणार नाही.

२. मेडिकल कॉलेजमधल्या शिक्षणाची गुणवत्ता सुधारायला हवी. जास्त इन्टरॅक्टिव शिक्षण मिळायला पाहिजे. उदा. - गायनॅकच्या बाबतीत ( ह्या क्षेत्राबद्दल मी जास्त विश्वासाने बोलू शकते, म्हणून हे उदाहरण) रेसिडेन्सी करत असताना वरिष्ठ शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया करायला संधी मिळाल्या, तर त्या गावात घडला तसा सगळ्या स्त्रियांचं गर्भाशय काढायचा प्रकार घडणार नाही.
पीजी करताना पुरेशी 'कटिंग' मिळत नाही, म्हणून बर्‍याच डॉक्टरांना असं खेडोपाडी जाऊन शस्त्रक्रियांचा अनुभव घ्यावा लागतो. (माझा अंदाज आहे की त्या गावात घडलेल्या प्रकाराचा ह्या गोष्टीशी संबंध असू शकेल.)
कारण गर्भाशय काढण्यासारखी मोठी शस्त्रक्रिया कुठलाही डॉक्टर थेट आपल्या खाजगी प्रॅक्टिसमध्ये पहिल्यांदा करण्याचा धोका पत्करायला घाबरणार !

३. जनरल प्रॅक्टिशनरला मानाचा दर्जा मिळायला हवा.
MBBS झाल्यानंतर मेडिकल कॉलेजमधून बाहेर पडलेलं प्रॉडक्ट हे बर्‍याचदा "जॅक ऑफ ऑल, मास्टर ऑफ नन" अशा अवस्थेत असतं.
ज्यांना पुढे शिकायचं नाहीये ( पीजीच्या जागा कमी आहेत म्हणून, कुटुंबाला आधार देण्याची जबाबदारी आहे म्हणून, किंवा कुठल्याही कारणाने ) त्यांच्यासाठी खास जनरल प्रॅक्टिस करण्याच्या दृष्टीने- त्यांनी कुठल्या आजारांवर उपचार करावेत, कधी पेशंटला पुढे पाठवावं ह्यासंदर्भात काही गाइडलाइन्स बनवायला हव्यात.

फॅमिली डॉक्टर ही संकल्पना परत रूळली तर स्पेशालिटी ( आणि आता तर सुपरस्पेशालिटी !) ला आलेलं अवास्तव महत्व कमी होईल.

४. स्पेशालिस्ट डॉक्टरांनी एकमेकांच्या क्षेत्रातली घुसखोरी थांबवावी.
म्हणजे सर्जनने गर्भाशय काढू नये, आणि गायनॅकने अपेंडिक्स काढू नये. Happy

५. डॉक्टरांना स्वतःचं आयुष्य जगायचा पूर्ण हक्क आहे ह्याची जाणीव लोकांनीही ठेवावी.
बर्‍याचदा लोकांच्या अवास्तव अपेक्षा असतात. पेशंट प्रसूतीच्या अगदी प्राथमिक अवस्थेत आहे, सगळं आलबेल आहे आणि डॉक्टर त्याच्या मुलाच्या शाळेत अ‍ॅन्युअल गॅदरिंगला गेला, तर त्यात गैर वाटून घेऊ नये. तो डॉक्टरचा आणि त्याच्या मुलांचा दोघांचा हक्क आहे. पण बर्‍याचवेळी लोकांना हे मान्य होत नाही.
मग डॉक्टर " दुसर्‍या ठिकाणचा पेशंट बघून येतो " असं सांगून कलटी मारतात आणि त्याच कार्यक्रमामध्ये पेशंटचा नवर्‍याने किंवा इतर नातलगाने त्यांना बघितलं की...विश्वासाचे वाजले बारा...:)

६. डॉमिनोमध्ये एक पिझ्झा खाल्ला तरी दोन-अडीचशे रूपये हसत हसत काढून देणार्‍या पेशंटने आपल्या आरोग्याची काळजी घेणार्‍या डॉक्टरची फी देण्यात घासाघीस करू नये. Happy

७. डॉक्टर आणि पेशंटच्या नात्यात 'संवाद' असायलाच हवा.
पेशंटने प्रश्न विचारायला हवेत आणि त्यांचं समाधान होईपर्यंत डॉक्टरांनी चित्रांच्या मदतीने, व्हिडिओ क्लिप्स दाखवून त्यांना उत्तरे द्यायलाच हवीत.
एका खाजगी ओपीडीत ७०-८० पेशंटना नंबर देऊन क्वालिटी टाइम देणं अशक्य आहे. त्यामुळे संख्या मर्यादित ठेवावी.
सेकंड ओपिनियन नाकारू नये.
डॉक्टरांना झालेल्या हाणामारीच्या बर्‍याचशा प्रसंगात तुटपुंजा संवाद हे प्रबळ कारण असतं.

८. डॉक्टरांनी गुंतवणूकीचं प्रशिक्षण जरूर घ्यावं. आणि वैद्यकीय व्यवसायाव्यतिरिक्त इतर मार्गांनी...(अर्थात एथिकल मार्गांनी ) पुंजी जोडत जावं.

९. हेल्थकेअरमध्ये समस्या आहे, हे डॉक्टरांनी नाकारू नये. नाहीतर ती सुटणं केवळ अशक्य आहे. समाजातल्या चांगल्या डॉक्टरांना पाठबळ देत रहावं.

१०. काळ कठीण आहे, पण आशा सोडू नये. सत्यमेव जयते ! (इति ह.भ.प. साध्वी रुणुझुणू :फिदी:)

<<डॉक्टर प्रत्येक रूग्णासाठी भावूक होत राह्यला तर तो उपचार कधी करेल?>> नी, अनुमोदन.

दक्षिणा, खरंय. आणि असल्या प्रकाराला कसलंच समर्थन असू शकत नाही. ही फसवणूकच.

प्राची, साती Happy

माझा विरोध सरसकट डॉक्टर्सना शिव्या देणार्‍यांना आहे. तुमच्यासाठी स्पेशल थोडा वेळ फुकट घालतो, कारण काही बाबतींत तुमचे अन माझे विचार पटतात >>>>>>> आनंद वाटला समजुतदारपणा दाखवल्याबद्दल.
माझी पहिली पोस्ट वाचा या धाग्यामधली. नाव घेउन एका चांगल्या डॉक्टरबद्दल लिहिले आहे.

पण वैद्यकिय उपचारात बाजारिकरण बोकाळले आहे आणी त्यात सामान्य माणुस भरडला जातो आहे हे विदारक सत्य आहे ! आणी त्यासाठी डॉक्टरांशिवाय दुसर्या कोणालाहि दोष देता येत नाहि!

दोन्ही बाजूंची मतं कळतात आणि पटतातही.
रुणुझुणू, तुमची शेवटची पोस्ट आवडली. अगदी नेमकं लिहिलं आहात.

महागुरूंनी म्हटल्यानुसार पहिले तीन भाग हे अशा सामाजिक समस्यांबाबत होते ज्या सोडवायचा प्रयत्न सामान्य माणूस स्वतःपासून, स्वत:च्या घरापासून करू शकतो. या भागात मांडल्या गेलेल्या समस्येबद्दल ते शक्य वाटत नाही. तरीही आपल्या पाल्याने (कुठूनही/कितीही फी भरून/कसंही करून एकदा) डॉक्टर/इंजिनीअरच व्हायला हवं या मानसिकतेबद्दल, त्या व्यवसायातील नैतिकतेबद्दल नव्याने त्यात पडणार्‍यांना विचार करायला लावणं इतकं तरी साध्य झालं असेल अशी आशा वाटते.

आणखी काही बाबी - जसं जेनेरिक औषधांबद्दल सामान्य माणसाला माहिती होणं हे ही महत्त्वाचं आहे. सर्वच केसेसमधे ती लागू पडत असतील असं नाही, पण निदान त्याबद्दल विचारण्याइतकी माहिती लोकांना झाली तर चांगलंच आहे की.

सादरीकरणाबद्दल आस्चिगला अनुमोदन. कार्यक्रम जास्तीत जास्त परिणामकारक व्हावा यासाठी केलेले कोणतेही प्रयत्न मला गैर वाटत नाहीत. मांडलेल्या समस्या खर्‍या आहेत - कोणी मांडल्या यामुळे का फरक पडावा? अडखळत बोलणार्‍याने प्रेक्षकांचा वेळ का घ्यावा? आजचा 'फोकस' वैद्यकीय व्यवसाय हा असेल तर प्रेक्षकांचं लक्ष त्यावरून उडून वृद्धाश्रमातील वृद्धांच्या परीस्थितीवर किंवा अन्य कशावर भरकटू नये हा विचारही चुकीचा नाही. त्यामुळे जे मुद्दे मांडले जात आहेत त्यांचं गांभीर्य कमी होत नाही.

रुणुझुणू - कुणीतरी या व्यथा मांडायलाच पाहिजे होत्या.

पण सरकारी कॉलेजमधल्या सीट्स वाढवायला, सगळ्यात मोठी अडचण, हॉस्पिटलमधल्या बेड्स ची आहे का ?
मग त्या कॉलेजच्या परिसरातील हॉस्पिटल्स, त्या कॉलेजच्या अधिपत्याखाली आणता येतील का ?

मला वाटते भारतात, पोस्ट ग्रॅज्यूएशनशिवाय ऑपरेशन करायला देत नाही. ( खरे ना ?) पण इथे केनयात अगदी
सेकंड सेमिस्टर पासून, ऑपरेट करायला देतात.

आज टेलिकम्यूनिकेशन एवढे सुधारलेय तर तज्ञ सिनीयर डॉक्टरचे मार्गदर्शन, छोट्या शहरातील विद्यार्थ्यांना
पण मिळाले पाहिजे. त्यांनी केलेल्या सर्जरीज, अभ्यासायला मिळायला पाहिजेत.

महागुरू, बरोबर निरीक्षण! रुणूझुणू, ही नंतरची पोस्ट आवडली. आधीचीही जीपींच्या वागण्याबद्दल लिहीलेले सोडून आवडली.

रुणुझुणु च्या सर्व पोस्ट्ला +१

एक मुद्दा सोडुन

६. डॉमिनोमध्ये एक पिझ्झा खाल्ला तरी दोन-अडीचशे रूपये हसत हसत काढून देणार्‍या पेशंटने आपल्या आरोग्याची काळजी घेणार्‍या डॉक्टरची फी देण्यात घासाघीस करू नये. >>>>> -१
पेशंटला द्यावे लागते , इलाज नसतो म्हणुन डॉक्टरने काहिहि वाटेल ते मागु नये हा आक्षेप आहे. डॉमिनोमध्ये एक पिझ्झा दोन-अडीचशे रूपयाला मिळतो, तो ज्याला परवडते तोच खातो. पन्नास रुपयाचा पिझ्झा देणारी होटेल देखील आहेत आणी पाच रुपयाचा वडा-पाव विकणार्या गाड्या देखील !

पाच रुपयाचा वडा-पाव दोन-अडीचशे रूपयाला विकत मिळाल्यामुळे सामान्य गरिबांनी काय करायचे ह्यावर सर्व इपिसोड होता. त्यात डॉक्टरांनी काहिहि चिडण्यासारखे नाहि.

रुणु, पोस्ट आवडली.
इथे जीपी होण्यासाठी डिग्रीनंतर एक कोर्स आहे. तसेआपल्या़कडे होऊ शकेल का?
नंतर लिहीते. मोबाएल वरुन टाईपिंग कट्।ईण आहे.

आधीचीही जीपींच्या वागण्याबद्दल लिहीलेले सोडून आवडली.>>>>>>> मला पण.
कट न घेताहि भरपूर कमवता येतं.अर्थात भरपूर हे सापेक्ष आहे. पण माझ्यामते ७०-८०००० तर आरामात कमवता येतील.कदाचित जास्तपण.(स्पेशली पावसाळ्यात) आणि जीपींना कदाचित हॉस्पिटलसारखा अतिरिक्त खर्चहि नसतो.उदा, पेशंटकरीता बेड्स, नर्सेसचा व ईतर स्टाफचा पगार, ई.
बॉंबे हॉस्पिटलमध्ये काम करत असताना काहि(च) डॉक्टरांचा हावरेपणा जवळून बघितला आहे. श्रीमंत पेशंटकरीता रविवारी पण वाट वाकडी करून येणारे डॉक्टर जनरल वॉर्डमधील पेशंटना मात्र ईतर दिवशीपण उपकार केल्यासारखे बघायचे.:(

माझ्या मित्राची मुलगी, नुकतीच मॉस्को येथून मेडीकल ग्रॅज्यूएट होऊन आली. तिथे इंग्रजीमधूनच शिक्षण दिले जाते, दर्जा उत्तम आहे व खर्च भारतातल्यापेक्षाही बराच कमी आहे.

पुर्वी झेकोस्लोव्हाकिया ला पण अशी सोय होती.

<< पण सरकारी कॉलेजमधल्या सीट्स वाढवायला, सगळ्यात मोठी अडचण, हॉस्पिटलमधल्या बेड्स ची आहे का ?>> ठराविक बेड संख्या असल्याशिवाय त्या हॉस्पिटलला आणखी पीजी सीटस मिळत नाहीत. पण हा नियम शिथिल करता यायला हवा...किंबहुना तो शिथिल करायलाच हवा.
एका वॉर्डमध्ये ४०-५० पेशंट आणि ते बघायला मोजके डॉक्टर्स...दिवसरात्र तेवढंच करत रहायचं. मुळात शांत स्वभावाचे कितीतरी डॉक्टर्स पीजी केल्यावर जमदग्नींचे वंशज होतात.
जागा वाढवल्या तर पेशंट आणि डॉक्टर्स दोघांचाही फायदा होईल. पण त्या वाढलेल्या डॉक्टर्सना स्टायपेंड द्यावा लागणार ( तुटपुंजा का होईना !) , त्यांच्या राहण्याची सोय करावी लागणार,....म्हणजे हेल्थकेअरवर केल्या जाणार्‍या खर्चाच्या बजेटमध्ये वाढ करावी लागणार......आणि त्याच वेशीशी तर घोडं अडलंय Proud असा 'व्यर्थ' पैसा खर्च केला तर राजकारण्यांच्या ऐशो आरामाचं काय ???

<< आज टेलिकम्यूनिकेशन एवढे सुधारलेय तर तज्ञ सिनीयर डॉक्टरचे मार्गदर्शन, छोट्या शहरातील विद्यार्थ्यांना
पण मिळाले पाहिजे. त्यांनी केलेल्या सर्जरीज, अभ्यासायला मिळायला पाहिजेत.>> नक्कीच मिळायला हवे. पण नाही मिळत. आवश्यक त्या शस्त्रक्रिया करण्यासाठी कन्सल्टन्टच्या मागेपुढे झुलावं लागतं, प्रत्येक येणार्‍या पेशंटकडे सगळे रेसिडेंटस आशाळभूतपणे बघत असतात, ज्याचं नशीब जोरावर त्याला त्यादिवशीचं कटिंग...:(

<<आधीचीही जीपींच्या वागण्याबद्दल लिहीलेले सोडून आवडली.>> फारएण्ड, भान, जीपींबद्दल माझी तक्रार नाहीच. त्यांना ह्या स्टेजला आणून सोडायला ही ढासळलेली व्यवस्था जबाबदार आहे.

चाणक्य,
पाच रूपयाचा वडापाव परवडणार्‍यांसाठीच सरकारने किमान चांगल्या सोयी आणि योग्य प्रमाणात डॉक्टर्स असलेली हॉस्पिटल्स उघडायला हवीत.
खाजगी डॉक्टरांना हॉस्पिटल चालवण्याकरता येणारा खर्च बघता त्यांच्याकडून ह्या किंमतीत पेशंट तपासण्याची अपेक्षा करणं अवाजवी आहे.
<< आणी त्यासाठी डॉक्टरांशिवाय दुसर्या कोणालाहि दोष देता येत नाहि!>> हे तुमचं वाक्य नाही पटलं Happy

<< इथे जीपी होण्यासाठी डिग्रीनंतर एक कोर्स आहे. तसेआपल्या़कडे होऊ शकेल का?>> व्हायला हवं असं मला मनोमन वाटतं.

जीपी किती कमावू शकतात, ते पुरेसे आहेत का हे ठरवण्याचा हक्क त्यांना आहेच. त्यात पडायचे नाही. मला पटले नाही ते त्या मुद्द्यात थोडे कट प्रॅक्टिसचे समर्थन वाटले ते. तो मुद्दा ताणून मग इतर असंख्य भ्रष्टाचारांचे समर्थन करता येइल.

<<मला पटले नाही ते त्या मुद्द्यात थोडे कट प्रॅक्टिसचे समर्थन वाटले ते.>>
तसं झालं असेल तर माझी वाक्यरचना गंडली असावी. पण मी स्वतः कटप्रॅक्टिसच्या पूर्ण विरोधात आहे.
एकदा ते चक्र सुरू झालं की गुणवत्ता नसेल तरी त्याच लॅबमध्ये किंवा सोनोग्राफी सेंटरमध्ये पेशंटला पाठवणं सुरू राहतं. त्यात पेशंटला धोका होऊ शकतो...आणि आपली रात्रीची झोप उडू शकते ! Happy

पाच रूपयाचा वडापाव परवडणार्‍यांसाठीच सरकारने किमान चांगल्या सोयी आणि योग्य प्रमाणात डॉक्टर्स असलेली हॉस्पिटल्स उघडायला हवीत.
खाजगी डॉक्टरांना हॉस्पिटल चालवण्याकरता येणारा खर्च बघता त्यांच्याकडून ह्या किंमतीत पेशंट तपासण्याची अपेक्षा करणं अवाजवी आहे. >>>>>>>>> हे वाक्य मलाहि नाहि पटले Happy

११० कोटी जनतेसाठी (त्यापैकी ५०% जनता दारिद्र्य रेषेखालील ) सरकारने किमान चांगल्या सोयी आणि योग्य प्रमाणात डॉक्टर्स असलेली हॉस्पिटल्स उघडायला हवीत आणी खाजगी डॉक्टरांनी मन मानेल तशी फी आकारावी हि धारणा चुकिची आहे! सहव्यावसायिक खाजगी डॉक्टरांनी मन मानेल तशी फी आकारल्यावर सरकारि हॉस्पिटल्स मध्ये कोण जाणार हो नोकरी करायला ?

तुम्हाला मुद्दा समजला नाहि. परत तेच लिहितो - पाच रूपयाचा वडापाव पाच रुपयालाच विकावा हा मुद्दा आहे - सरकारी हॉस्पिटल्स असो कि खाजगी ! खाजगी डॉक्टरांना हॉस्पिटल चालवण्याकरता येणारा खर्च काढुन घेण्यासाठी पाच रूपयाचा वडापाव सात रुपयाला, दहा रुपयाला विकला तर कोणी तक्रार करणार नाहि. करतहि नाहि. पण तो दोन- अडिचशे रुपयाला विकु नये एवढेच म्हणणे आहे.

आमीरने शोमध्ये सांगितलेल्या वाक्याशी शतशः सहमत आहे. जर पैसाच कमवायचा असेल तर दुसरे काहि करा (नैतिक मार्गाने ) पण वैद्यकिय व्यवसायाचा बिझनेस करु नका. हॉस्पिटल टाकुन उपचाराचा खरा खर्च ५०० असताना तो ५००० दाखवु नका. त्यापेक्षा मग फाइव्ह स्टार होटेल काढा आणी खरोखरच पाच रूपयाचा वडापाव दोनशे रुपयांना विका (साठेबाजी न करता) . ज्यांना परवडते ते खातील, नाहि ते पाच रुपयाचा खातातच.

म्हणजे शेवटी, सरकारी विचारशून्य नियोजनच सगळ्याला कारणीभूत आहे तर. त्या कार्यक्रमात जे गौरवले गेले ते प्रकल्प तिथल्या राज्य सरकारानींच राबवले होते.

मुंबईत पुर्वी काही सिनियर डॉक्टर्स, दिवसाचा ठराविक वेळ, सरकारी रुग्णालयांना देत असत. म्हणजे ज्यांना
जास्त खर्च परवडत नाही, त्यांना पण त्या सिनियर डॉक्टरांचा सल्ला घेता येत असे. ज्यांना जास्त सुविधा हव्या असतील, ते रुग्ण त्यांच्या खाजगी रुग्णालयात जात असत. सध्याची स्थिती मला माहित नाही. पण
हि व्यवस्था चांगली होते, एवढे मात्र नक्की.

बातमी वाईट आहे. योग्य ती चौकशी व्हावी. मृतांच्या नातेवाईकांबद्दल सहानुभूती आहे पण त्याबरोबरच कायदा हातात घेउन तोडफोड / मारधाड करणार्‍या वृत्तीचा पण निषेध.

Pages