"सत्यमेव जयते" भाग ४ - (Does Healthcare Need Healing?)

Submitted by आनंदयात्री on 26 May, 2012 - 14:46

आज २७ मे च्या चौथ्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
सत्यमेव जयतेच्या वेबसाईटवरील या भागाची लिंक -
http://www.satyamevjayate.in/issue04/

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमिरला माफी मागा सांगणारे स्वत:च हसू करून घेत आहेत; त्यापेक्षा आपलि बाजू समर्थपणे मांडता यायला हवी.

FDA किंवा तत्सम संस्थांकडून परवानगी मिळाल्याखेरिज औषधांचा वापर करता येत नाही.

चिनूक्स
इंडियन नोनी नावाचं एक चेन मार्केटिंगचं प्रॉडक्ट होतं. आपल्याकडे येणारा प्रतिनिधी ९९ आजारांचं एकच औषध असं त्याचं वर्णन करतो. त्यात मधुमेह, संधिवात, हृदयरोग, रक्तदाब इ. इ. सगळे आजार होते. मी एफडीआय कडे तक्रार केली. त्यांना पुण्यातल्या हेडक्वार्टरचा पत्ता फोन नंबर दिला आणि माहितीपत्रकही पाठवून दिलं. दुस-या कि तिस-या दिवशी वर्तमानपत्रात बातमी आली होती कारवाईची. त्याच्या दोन दिवसांनंतर नोनीचा खुलासा आणि अर्धं पान जाहीरात. जाहीरातीत म्हटलं होतं कि हे फूड सप्लिमेंट असून आम्हाला नाहक त्रास देण्यासाठी काही लोक तक्रारी करत आहेत.

पुढे मला उडवाउडवीची उत्तरं मिळाली. बस इतकंच म्हणायचं होतं.

फूड सप्लिमेंतला एफ डी ए अ‍ॅप्रुवल आणि टेस्टिंगची आवश्यकता नसते... कारण ही औषधे नाहीत तर आहार मानला जातो. शुद्धता, पॅकिंग इ इ व्यवस्थित असले की झाले. तुमची तक्रार चुकीचीच आहे... एखाद्या आहार घटकामुळे एखादा आजार बरा व्हायला मदत होऊ शकते, हा दावाही चुकीचा ठरु शकत नाही.. त्यामुळे तुमची तक्रार निरर्थक आहे.

Happy

जे माहितीपत्रक देण्यात आलं होतं त्यामधे फूड सप्लिमेंट असल्याचं कुठंही म्हटलेलं नव्हतं. एजंटनेही तसं सांगितलं नव्हतं आणि जेव्हां मुख्य कार्यालयात फोन करून विचारलं तेव्हाही ..

काहीच्या काही दावे करणे हे एफडीआयच्या अधिकारक्षेत्रात येत नाही का ? एखादं उत्पादन औषध आहे असं भासवंणं हा गुन्हा नाही का ? तसं नसतं तर त्यांनी छापा टाकलाच नसता. मुंबईत पण टीव्ही वर काहीच्या काही जाहीरात केल्याने अशाच एका उत्पादनावर कारवाई करून ते कार्यालय सील केलेलं आहे.

साधं लोणचं विकायचं म्हटलं तरी परवाना लागतोच कि.. तो न घेताच नोनी विकलं जात होतं.

एखादं उत्पादन औषध आहे असं भासवंणं हा गुन्हा नाही का ?

भासवणं? काय भासवलं त्यानी? समजा फूड सप्लिमेम्तात कॅल्शियम आहे, तर हाडाच्या आजारावर उपयोगी असे लिहिले तर तो गुन्हा थोडाच होतो? ९९ रोगावर एकच 'औषध' नसते हे तुम्हाला कळायला नको का? एकच औषध ९९ रोगावर चालले असते तर एम बी बी एस चा पोर्शन दोन तासातच शिकवून नसता का संपला? Proud फुड सप्लिमेम्ट असे कुठे तरी कोपर्‍यात बारीक अक्षरात लिहिले असेल... नसलं तरी तो काय गुन्हा होत नाही. त्यानी डोसेज शेड्युल दिले असेल ना, मग झाले. नोनीवाल्याना फळ, खाद्य प्रोसेसींग तत्सम लायसन लागते... http://www.indian-noni.net/research/CFTRI/Licence2.htm .. त्याना एफ डी ए चा संबंध नाही. तरीही एफ डी ए ला तक्रार गेली की ते तपासतात, स्टेरोइड वगैरे तर नाही, यासाठी.. त्याअना त्यात केमिकल औषध नाही मिळाले की त्यांचा संबंध संप्ला.. तुमची तक्रार खल्लास!

जेव्हा सुशिक्षित लोक, केवळ पर्सनल स्कोर सेटलिंगसाठी श्री. चाणक्य जसे या धाग्यावर बोलत आहेत तसे बोलतात तेंव्हा, 'बिनडोक लोकांना फाट्यावर मारण्याचे रिमाइंडर' देण्यातच माझ्यासारख्यांचा वेळ जातो.

नाईलाज असतो. कारण इथे बिनडोकपणा सिद्ध करून, तद्नंतर त्यांना बिनडोकपणे वाद घालू नका, मुद्दे असतील तर बोला, असे मी सांगितलेले असते. असो.
***
किरणजी,
इये देशी प्रत्येक नावाजलेल्या कंपनीचे 'आयुर्वेदिक' प्रॉडक्ट असते. ते कां असते याचा विचार कधी केला आहात काय? ते फूड सप्लिमेंट जाऊ द्या, आयुर्वेदिक म्हटल्यावर 'एक्स्पायरी डेट'ही नसते, एफिकसी प्रूव्ह करायची कटकट नाही, अ‍ॅडव्हर्स रिअ‍ॅक्शन आहेत की नाहीत हेही पहायची गरज नाही. त्या वृंदा करातांना बाबा रामदेवांनी 'क्वॅकरी अ‍ॅक्ट'वर धोबीपछाड दिली त्याचे कारण म्हणजे या 'आयुर्वेदिक' प्रकरणाला कायद्याने दिलेले संरक्षण.

चष्मे उतरवून विचार केलात तर आयुर्वेदिकच सोडा, कोणतीही औषधे बनवून विकण्यात काय "मजा" आहे, ते सांगता येते. हा विचार अन हिशोब, अनेक डॉक्टर्स सोडा, डॉक्टर्स पर्यंत येणारे सेल्स रेप देखिल करीत नाहीत.

सोप्पे उदाहरण देतो.

सिप्रोफ्लॉक्सॅसिन चे डोळ्यात टाकायचे ड्रॉप्स. हे ०.३% असते.
यात, ०.३% W/V -वेट बाय व्हॉल्यूम, म्हणजे १ लिटरमध्ये ३०० मिलिग्राम सिप्रॉफ्लॉक्सॅसिन नावाचे औषधाचा रेणू असतो.
येथील कुणी केमिकल इंजिनियर असतील त्यांनी हा हिशोब बरोबर आहे की चूक काय ते सांगावे, मग यातील अर्थशास्त्र सांगतो...

एकंदर चर्चेतून अनेक बाबी समोर येत आहेत. पेशंट ग्राहक ठरल्यावर डॉक्टरही दुकानदारी करीत असेल तर काय बिघडले असाही सूर अनेक डॉं.चा दिसतो आहे. यात तथ्य असले तरी अशा तर्‍हेचे कायदे होण्यास त्यांच्याच कांही व्यवसायबंधूंनी झटपट श्रीमंत होण्यासाठी सुरु केलेल्या माल प्रॅक्टिसेस नव्हेत काय? याही परिस्थितीत अजूनही कांही चांगले डॉक्टर्स आहेत पण ते संख्येने फार कमी आहेत आणि ते आपल्याला भेटतील हा नशिबाचा भाग आहे. आणि तसे चांगले राहाणे हे महाकठीण काम आहे. परमेश्वर [असलाच तर ] त्यांचे भले करो!

बाकी चर्चेतील भाषाविलास ?
' न बृयात सत्यमप्रियम!'

>>तुम्ही माझी पोस्ट वाचलेली नाही असे दिसते आहे>>

असे १ जून्च्या पोस्टीत किरणजी तुम्ही म्हणावे?
कांहीजणांच्या लिखाणांबद्दल नापसंति दाखवण्यासाठी ' असल्या फालतु बाबी वाचायला आम्हाला वेळ नाही ' असे तुम्ही लिहिले होतेत, तेव्हां "तुम्ही प्रतिसाद न वाचताच नुसत्या आय डी कडे पाहून लिहिता कि काय ? असा संशय येतो " असे आम्हीच मागे तुम्हाला विचारले होते. असो. यावरून मला काय म्हणायचे आहे हे सूज्ञास सांगणे नलगे!

>>@ Kiran.. | 31 May, 2012 - 23:33
अर्र्र.. चुकले.
केदार यांच्या त्या पोस्टी होत्या तुमच्या नव्हेत.. घाईत कन्फर्म न करता लिहिले, माझी गल्लत झाली. माफ करा.<<
१ जूनच्या पोस्टीत इब्लिस जी तुम्ही लिहिलेत हे.
वा! वा! दोन प्रतिष्ठीत आय डीं ची ही तर्‍हा. चालू द्या.

अशा उघड चाचण्या कोणीही करत नाहीत. FDA किंवा तत्सम संस्थांकडून परवानगी मिळाल्याखेरिज औषधांचा वापर करता येत नाही. अनेक इस्पितळांमध्ये रुग्णांवर प्रयोग केले जातात, हे खरं आहे. पण त्यासाठी ब्रॅण्डेड औषधं वापरली जात नाहीत. डॉक्टर जर सांगत असतील, की (उदाहरणार्थ) बायोकॉनने तयार केलेलं नवं औषध आहे, कर्करुग्णांना याचा बराच फायदा झाला आहे, पण खूप महाग आहे, तर याचा अर्थ ते तुमच्यावर चाचण्या करत असतात, असं नव्हे.>>>>>>>>>>>>>>>> धन्यवाद चिनुक्स...

> सिप्रोफ्लॉक्सॅसिन चे डोळ्यात टाकायचे ड्रॉप्स. हे ०.३% असते.
यात, ०.३% W/V -वेट बाय व्हॉल्यूम, म्हणजे १ लिटरमध्ये ३०० मिलिग्राम सिप्रॉफ्लॉक्सॅसिन नावाचे औषधाचा रेणू असतो.
येथील कुणी केमिकल इंजिनियर असतील त्यांनी हा हिशोब बरोबर आहे की चूक काय ते सांगावे, मग यातील अर्थशास्त्र सांगतो...

ईब्लिस, होऊन जाउद्या हिशोब. होमिओपदीपेक्षा बराच असणार.
१० मिलिग्राम च्या त्या बाटल्या असतात ना?

अस्चिगजी:
हिशोब असा होतो:
१० मिली ची बाटली. सुमारे १५ रुपये बाजारातील किंमत.
१ लिटर निर्जंतुक पाणी (सुमारे रुपये १५) + ३०० मि.ग्रा. औषध. (त्याच कंपनीची ५००मि.ग्रा.ची गोळी बाजारातच २-४ रुपये किंमतीला मिळते.) १ लिटरची 'प्रॉडक्शन कॉस्ट' किती होईल होऊन होऊन? इथे २० चा हिशोब केला, आपण पॅकिंग इ. धरून १५० रुपये धरू.
१००० मिली = १५० रुपये.
१० मिलीच्या १०० बाटल्या = १५०० रुपये. ५ मिलीची बाटली केली तर ३००० रुपये Wink आजकाल ३ मिलीच्या बाटल्यांच्या किमती ६-७०० रु. पर्यंत आहेत. (इतर औषधे. सिप्रो नाही)
नक्की किती टक्के प्रॉफिट मार्जिन आहे? ही आहे गम्मत ब्रांडेड औषधांची.

आता, या नफ्यात डॉक्टरला काही मोठे घबाड मिळते असे जर लोकांना वाटत असेल, तर तो बावळटपणा आहे असे माझे स्पष्ट मत आहे. पेशंट लुटला जातो तो वेगळ्या कारणाने, अन शिव्या डॉक्टरला मिळतात. हेच पहिल्यापासून सांगतो आहे मी इथे. असो. आता कंटाळा आला तेच तेच बडवायचा.

दामोदरसुतकाका

तुम्ही मला प्रतिष्ठित आयड्यांच्या रांगेत बसवून भयंकर निराश केलंत. माझं मानसिक खच्चीकरण झालं. उमेद ढासळली. असं करून तुम्ही शहाण्या मुलासारखं वागायला भाग पाडता आहात असा मला दाट संशय आहे.

रच्याकने - तो प्रतिसाद तुम्हाला उद्देशून होता का ?

Kiran...
>>तुम्ही मला प्रतिष्ठित आयड्यांच्या रांगेत बसवून भयंकर निराश केलंत. माझं मानसिक खच्चीकरण झालं. उमेद ढासळली. असं करून तुम्ही शहाण्या मुलासारखं वागायला भाग पाडता आहात असा मला दाट संशय आहे.<<

वरील प्रतिसादाबद्दल अणुमोदक!
ए भो, मी बी! मला बी पर्तिष्टीत म्हनून र्‍हाय्लेत त्ये!

मंदार
मला वाटत होतं कि मी तुला काही लिहीलं किंवा तू मला उद्देशून काही लिहीलंस तर आक्षेप घेता येतात म्हणून...पण युनिवर्सिटीच्या झाडीत जाऊन प्रेमी युगुलांच्या रंगलेल्या संवादात भाषेच्या व्याकरणाच्या चुका काढता येतात हे इतकी वर्षे माहीतच नव्हतं रे. फुकट गेलं आयुष्य Sad

किरण , युनिवर्सोटीच्याझाडित प्रेमी युगुलं गप्पा मारतायत? त्यांच्यावर तर संस्कृतीसंरक्षक नक्किच आक्षेप घेतील . Happy

जेव्हा सुशिक्षित लोक, केवळ पर्सनल स्कोर सेटलिंगसाठी श्री. चाणक्य जसे या धाग्यावर बोलत आहेत तसे बोलतात तेंव्हा, 'बिनडोक लोकांना फाट्यावर मारण्याचे रिमाइंडर' देण्यातच माझ्यासारख्यांचा वेळ जातो.

नाईलाज असतो. कारण इथे बिनडोकपणा सिद्ध करून, तद्नंतर त्यांना बिनडोकपणे वाद घालू नका, मुद्दे असतील तर बोला, असे मी सांगितलेले असते. असो. >>>>>>>>>>

तुम्हि आलात का परत ? छान ! जमले का नाहि अजुन नउ ? चला नउ काढा पटापट! Proud चार दिवस झाले ! अजुन १० अंक येत नाहित तुम्हाला. सारखे असेच 'बिनडोक, बिनडोक' करत राहिलात तर तुम्चे पेशंटच तुम्हाला टाकतील येरवड्याच्या इस्पितळात Proud आणी हो, ........... तिथेहि तुमचे सहव्यावसायिकच आहेत. तुम्हाला लुबाडतील. ते काहि जनरिक औषधे देणार नाहित. मग तुमच्या जवळच्यांना तुमचे क्लिनिक विकावे लागेल तुमच्या उपचारांसाठी मला! Proud

बरे, तुम्हि केस करताय का नाहि आमीरखानवर ? तुम्हिहि मत दिले होते असे सांगीतले होतेत ! Proud

आमीरखानची असरमध्ये आयएमएला परत चपराक ! Proud

आम्रीरने आज असरमध्ये आयएमएचे धिंडवडे उडवले ! इथे कोणीतरी बिनडोक ने आयएमएला मत दिले होते म्हणे Proud

:))
रिमाईंडर नंबर मोजा,
अन हो, 'बिनडोक' ही तुमची उपाधी आहे. तुम्हीच प्रयत्नपूर्वक आय आय टी की काय तिथून कमवलेली =))

धन्यवाद रोहित.
सुरुवात मी केली नाही. मधे दिलगिरी व्यक्त करून विषय बंद करायचा प्रयत्नही केला. पण हे हुश्शार व बुद्धिमत्तेचा वापर करण्याची इच्छा नसलेले सो कॉल्ड आय आय टीयन, (प्रोफाईल मधे लिहीले म्हणून म्हणायचे) मला 'विकत' घ्यायलाच निघालेत. अन विषय खेचत आहेत. हाच धागा वाचून पहा, अन इतरत्र या महोदयांचे लिखाणही पहा.

यांची औकात, ऐपत इ. विषयी मला घेणे देणे नाही.

मॉडरेशन करायला अ‍ॅडमिन समर्थ आहेत. मी तिथे (अ‍ॅडमिन यांचेकडे) जाऊन तक्रार आजवर केलेली नाही, अन करणारही नाही.

somebody needs to grow up though..

@ किरण.

समान धागा शोधताना स्त्रीचे या भारतीय समाजातील एकंदर स्थान अन त्यावर केलेले वक्तव्य या दृष्टीकोणातून जर या आजतागायतच्या एपिसोड्स कडे पाहिलेत, तर तुमचे एकंदर विश्लेषण बरोबर आहे.

मधेच, माझ्या 'दुखर्‍या नसे'वर बोट ठेवलेले मला पटत नाही. ती कोणते हे जरा इस्कटुन सांगतो.

-->> "परंपरा हे एक उत्तर तर आहेच. पण समाजाची अधोगती शिक्षणाने रोखली जायला हवी तसं न होता उच्चशिक्षित डॉक्टर्सच कसायाचं काम करताना दिसले. आणि मग त्या मानसिकतेचा वेध घेतला गेला डॉक्टरांच्या एपिसोडमधे. "<<

एक इथे नमूद करू इच्छितो.

सर्वांसाठीच.

स्त्रीभ्रूणहत्येचा एपिसोड होता. याच मालिकेचा. इथेच धागाही होता.

त्यात मी एकही प्रतिसाद लिहिलेला नाही.

का?

मी ना एपिसोड पाहिला, ना धागा वाचला. मी, एक डॉक्टर म्हणून, या समाजाने जी काय जळजळीत शिक्षा, /टीका, त्यांच्या दॄष्टीने 'डॉक्टर'च गर्भपात करू शकतात, सबब ते दोषी, असे गृहित धरून दिली, ती भोगली, 'अ‍ॅक्सेप्ट' केली. (मी व्यक्तीशः आजपर्यंत इंटर्नशिपमधे 'असिस्ट' केलेल्या स्त्रीरोग शस्त्रक्रीया सोडल्यात, तर पोस्ट ग्रॅज्यूएशन नंतर एकही तशी शस्त्रक्रीया कुण्या स्त्रीवर केलेली नाही, हेही इथेच नमूद करतो.)

तरीही, स्त्रीभ्रूणहत्येसाठी- 'हिच्या पोटतली ४थी पोर्गी पाडून टाका,' असे सांगत येणारा उसतोड कामगार्/त्याचा बाप्/त्याची आई/तिची सासू/तिची आई... जे कुणी असतील, अगदी तीही असेल, किंवा 'Sir, we have one daughter already. we want a square family, could u please help us to get a male child this time?' असं पॉलिश्ड इंग्रजीत ऐकवणारा आयआयटीयन अन त्याची हाय फाय बायको असो, यांच्या पैकी कुणालाच जबाबदार न धरता, डॉक्टरांचे यातील गुन्हे अ‍ॅक्सेप्ट केलेत. अन त्यासाठी क्लेशही सहन केलेत.

मी समाजाला तिथे जबाबदार धरलेच नाही. फक्त डॉक्टराला धरले, कारण माझ्या मते, त्याचे शिक्षण अन त्याचे सामाजिक स्थान त्याला हे 'स्टँडिंग' देते, की, पोट पाडून टाकण्यासाठी त्याच्या कडे आलेल्याचे त्याने प्रबोधन करावे.

परंतू, या भागात, त्याच एपिसोडचा संदर्भ डोक्यात ठेवून, सर्वच डॉक्टरांना, सरसकट रक्तपिपासू असल्यासारखे संबोधून जे काय --
प्रत्येक एपिसोडनंतर चर्चा चालूच आहेत . फक्त मायबोलीवर नाही तर, कार्यालयात. कॉलेजकट्ट्यावर, सकाळी फिरायला जाणा-या ज्येष्ठ नागरिकांमधे, दुपारच्या महिलाष्टकांत.. सगळीकडेच.
-या चचर्चांत, अन इथेही, चाललेलं आहे, ती माझी दुखरी नस आहे.

***

काय होतं आहे, अन जे काय होऊ घातलेलं आहे याची कल्पना या कट्ट्या वरल्या लोकांना अन तुम्हालाही येतच नाहीये.

खिशात १० रुपये घेऊन डॉक्टराकडे जाउन, उधारीवर सुई मारून घेऊन, किंवा डाक्टरच्याच 'सुजुकी'वर बसून तालुक्याला अडलेल्ली बायको नेऊन शिजर करून आणलेला दाजिबा जो या देशात आहे, त्याची तुलना, अमेरिकेत ज्यांना 'ट्रेलर ट्रॅश' म्हणतात, किंवा ज्यांना 'हेल्थ इन्शुरन्स' परवडत नाही, त्यांचे काय होते, त्यांच्याशी करून पहा.

शेजारचा पाकिस्तान लै अमेरिकी मदत मिळवतो, एक कॉम्बिफ्लामची गोळी किती रुपयाला मिळते पाकिस्तानात, त्याचे रुपये कुणी लिहिलेत इथे तर मी खुश राहीन.

मेडिक्लेम/ऑफिशियल इन्शूरन्स वाले माझे पेशंट्स तर सोडाच, स्वतः मलाही माझ्या ट्रीटमेंटच्या कॅशलेस क्लेम सेटलेमेंट साठी काय झक मारावी लागली अन लागते, ते मला ठाऊक आहे. टीपीए : Third Party Arbitrator हा शब्द ज्यांनी औषधोपचाराच्या खर्चा संदर्भात ऐकला, ते चळचळा कापतात.

माझे म्हणणे खोटे असेल तर अनुभव इथेच लिहा लोक हो.

People will say, and already ARE saying that 'Dr.' Iblis is ranting. आक्रस्ताळेपणा करीत आहेत, अन आमीरचे बरोबर आहे. असो.

मी म्हणतो,
ऐश करा! मला काहीही फरक पडत नाही. जरा दूर दृष्टी ठेवून बघा काय होईल ते. दहा वर्षांनी इन्शूअर्ड रहा अन मग पुन्हा एकदा असे धागे बोलू/टायपू आपण.

यार! I simply hate this....

>डॉक्टर्सच कसायाचं काम करताना दिसले. <

आई शपथ, तुम्हा सर्वांना नं, कसाई किंवा डॉक्टरच बनवायला हवंय!

हातात सुरी घेऊन कुणाचा जीव घेणं काय असतं??

अन कसाई ते जीव कुणासाठी घेतो?? समोर लाईनीत कोण उभे असते मटण चिकन विकत घ्यायला?

अन तुमच्या शरीरातली विकृती कापून टाकण्यासाठी डॉक्टर शस्त्र हातात घेतो तेव्हा त्याच्या कशात किती दम असावा लागतो, हे तुम्हाला समजणार नाही. हातात सुरी घेऊन पेशंटला काप, ते ऑपरेश कर, असे म्हटल्यावर वेड लागलेले 'डॉक्टर्स' मला ठाऊक आहेत. त्यांना कुणाला कापण्याची कल्पनाही सहन होत नव्हती...

अहो, मला हातात सुरी घेऊन, पेशंटाला सांगावे लागते, "I have a knife in my hand. I am going to CUT you. AND you WILL pay me 'this much money' for that. YOUR LIFE or my knife..'

What i cut away is the cancer that is going to eat away the LIFE..

फरक आहे का काही माझ्यात अन दरवडेखोरात???

तुम्ही सगळेच प्रत्येक डॉक्टर "ती" रेखा ओलांडून पलिकडे गेलाय असे बोलू लागलात?

डॉक्टर प्रत्येकाला बनता येत नाही, कसाई बनण्याचा प्रयत्न करून पहा. तुमच्या शिरावर कुणाचा जीव आहे, अन तो तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून तुमच्या समोर बेशुद्ध पडलाय. 'अ‍ॅडव्हान्स' पैसे जमा आहेत ऑलरेडी. घ्या ती स्कालपेल हातात, अन चालवा सुरी...

बघू जमतंय का??
*****
ही, व यावरील पोस्ट या दोन्ही, श्री किरण यांच्या पोस्टीला उत्तर आहेत., जी त्यांनी 'प्रकाटाआ' करून काढून टाकलेली आहे.
संदर्भा शिवाय ही पोस्ट भयंकरच विचित्र वाटते. सबब २ मार्ग आहेत, त्यापैकी पहिला इथे करतो:
किरण यांची ही पोस्ट, जी प्रत्येक सत्यमेव जयतेच्या धाग्यावर होती, ती इथे डकवतो आहे.
>>>>>

Kiran..

मित्रांनो

पाच भाग झाले या मालिकेचे. एका रात्रीत क्रांती वगैरे असं उद्दिष्ट तर नक्कीच नसावं या शो चं. प्लीजच इथे धंदा वगैरे बद्दल चर्चा नको. तो मुद्दा निकालात निघालेला आहे. या पाच भागात काही समानता आहे का ? स्वतंत्रपणे एपिसोडस पाहीले तर नव्याने हा मुद्दा मांडला जातोय असं नाही. मग एखादी थीम घेऊन हा शो चालला आहे का ?

पहिला भाग स्त्री भ्रूण हत्येचा. बळी आहे ते असहाय्य भ्रूण. ज्याला आपल्या हक्कांबद्दल तर सोडाच मारेक-यांबद्दलही काही माहिती नाही. मारेकरी आहेत आईवडील. आणि सुपारी घेताहेत डॉक्टर्स. स्त्री भ्रूण हत्याच का ? याच आढावा घेताना मुद्दा येतो तो अस्तित्वात असलेल्या परंपरा आणि सामाजिक रूढींचा. मुलीला जन्म देण्यापेक्षा गर्भातच मारली असती तर बरं झालं असतं हे बोलून दाखवलं जायचं त्याला विज्ञानाची साथ मिळाली आणि ते बोल प्रत्यक्षात खरे झाले.

स्त्री च्या जन्माची ही दैना जाणवली पहिल्या भागात आणि कारणं दिसली दुस-या भागात. लग्नावरचा खर्च, त्यानंतरची परवड. स्त्री जन्मा ही तुझी कहाणी हे दाखवणारा हा एपिसोड पहिल्या भागाचं उत्तर देऊन गेला.

परंपरा हे एक उत्तर तर आहेच. पण समाजाची अधोगती शिक्षणाने रोखली जायला हवी तसं न होता उच्चशिक्षित डॉक्टर्सच कसायाचं काम करताना दिसले. आणि मग त्या मानसिकतेचा वेध घेतला गेला डॉक्टरांच्या एपिसोडमधे.

एकीकडे लग्न हा असा धंदा बनत असतान प्रेमविवाह करणे हे उत्तर असू शकतं. पण भारतात ते ही सोपं नाही हे दाखवून देणारा पाचवा भाग होता. एकातून दुसरा , दुस-यातून तिसरा, हे सगळे भाग एकात एक गुंफले गेले आहेत आणि फक्त सदसदविवेकबुद्धीला आवाहन करताहेत. विवेक कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहे. घटनेपेक्षाही श्रेष्ठ आहे आणि रूढी परंपरांपेक्षाही. आजची उच्चसिक्षित पिढी सुशिक्षित आहे का असा विचार करायला लावणारी ही मालिका आहे.

न्युलीअर फॅमिलीच्या जमान्यात आजचा माणूस समाजापासून तुटत असताना सामाजिक उत्तरदायित्वाबद्दल फॉर अ चेंज म्हणून विचार व्हावा हे माफक उद्देश असायला हरकत नाही. असा फोरम नाहीच ना कुठे !

प्रत्येक एपिसोडनंतर चर्चा चालूच आहेत . फक्त मायबोलीवर नाही तर, कार्यालयात. कॉलेजकट्ट्यावर, सकाळी फिरायला जाणा-या ज्येष्ठ नागरिकांमधे, दुपारच्या महिलाष्टकांत.. सगळीकडेच.
काही असो, समाजाचं रूप समोर येतंय. महाराष्ट्रात भ्रूण हत्यांविरोधात धडक कारवाई चालू आहे, राजस्थानात जीवनदायिनी योजना चालू आहे, काही आदर्श उदाहरण समोर येत आहेत. त्याच वेळी निषेध, बहिष्काराच्या धमक्या हे समोर येतंय. डॉक्टरांवरच्या एपिसोडमुळे अत्यानंद होणंही समोर येतंय तर डॉक्टरांचा अनाकलनीय बहिष्कारही. त्या वेळी खूष असणारे काही लोक ज्या वेळी आपल्या समाजाच्या पंचायतींविरुद्ध एपिसोड आला त्या वेळी नाराज झाले. दुस-याची फजिती ती आपली करमणूक. या निमित्ताने समाजाने यावरही विचार केला पाहीजे. एकीकडे विजन २०२० डोक्यावर घेऊन तरुण पिढी नाचतेय त्याच वेळी समाजाचे काही ठेकेदार चर्चाही घडू देत नाहीत. विरोधी विचार मांडू देत नाहीत हे समोर येतंय. पण ,आपणही या सर्वांचा भाग असू कदाचित. प्रत्येक गोष्ट दुस-यावर नेउन ठेवलं कि संपलं असं नको आता. सध्या राजकारणी हे असेच नारळ फोडायचे दगड झालेत. ही संधी आहे बदल घडवायची.

मात्र, तेरा भागानंतर सगळं थंड होईल कदाचित . मग या विचारमंथनाचं काय ? पुढे स्टार प्लस, आमीर खान काय करणार आहेत ? त्यांनी काही केलं तरच आपण चर्चा करायच्या का ? कि मग पुन्हा सत्यमेव जयतेची वाट बघत बसायचं ?

परदेशी राहणा-यांच्या बोलण्यात, लिखाणात विचार स्वातंत्र्याचा आदर, व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर या बद्दल खूप काही येतं. अशी कुठली गोष्ट आहे जी खाल्ल्याने ही प्रगल्भता आली असावी ? एक समाज म्हणून कुठे कमी पडतोय आपण ?
<<

अन हो, 'बिनडोक' ही तुमची उपाधी आहे. तुम्हीच प्रयत्नपूर्वक आय आय टी की काय तिथून कमवलेली =)) >>>>>>>>
आय आय टी कानपुर ला तुम्हि नावे ठेवता आहात यावरुन समजले की तुम्हाला बिनडोक उपाधी कीती शोभुन दिसते! Proud

Pages