मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या शिवाजी सावंतांचं 'युगंधर' वाचायला घेतलं आहे. पण तेवढं गुंतून जायला होत नाही. मृत्युंजय प्रचंड आवडलं होतं. तो फील हे पुस्तक वाचताना येत नाही. निम्मं वाचून झालं आहे. पुढे बघू आता.

मयेकर, लिंकसाठी धन्यवाद.
सध्या माल्कम ग्लॅडवेलचे 'ब्लिंक' वाचतोय. इंटरेस्टींग आहे,
काही मुद्दे जसे की- अतिचिकित्सा निर्णयक्षमतेवर विपरीत परिणाम कसा करते, एखाद्या क्षेत्रातला प्रचंड अनुभव तुम्हाला कोणत्याही विश्लेषणाशिवाय एखाद्या गोष्टीबद्दल क्षणार्धात मत बनवायला कसा मदत करतो इ.इ.
ग्लॅडवेलची उदाहरणे नेहमीच जबरदस्त असतात. या पुस्तकातही पेप्सी चॅलेंज, मिलेनिअम वॉर वगैरे उदाहरणे फार भारी आहेत. कधीकधी तर त्याच्या मुद्द्यापेक्षा उदाहरणेच जास्त लक्षात राहतात.
एकदा वाचण्यासारखे आहे पण त्याचे 'टिपिंग पॉईंट' आणि 'आउटलायर्स' जास्त छान होते.

स्टेफनी मेयरचं द होस्ट वाचायला घेतलं पण शंभर पानाच्या वर वाचू शकले नाही. अत्यंत रटाळ आणि भयंकर डोकं उठवणारं पुस्तक.

सध्या, आयडीयाज दॅट वर्क्ड नावाचं एक पुस्तक वाचतेय. त्यामधे भारतातील काही नामवंत लोकानी दिलेल्या सेमिनार्समधील लेक्चर्स लेख रूपात आहेत. ई श्रीधरन यांचे कोकण रेल्वे, आलोक शर्मा यांचे कुंभ मेळ्यासंदर्भातला लेख आणि पाठक यांचा सुलभ इंटरनॅशनल वरचे लेख अति वाचनीय आहेत.

'द ब्रेड विनर' आणि 'ब्लासफेमी' वाचलं अक्षरशः सुन्न व्हायला झालं. 'परवाना' व 'शौझिया' इतक्यात तरी वाचायची हिम्मत नाही आहे.

सध्या शिवाजी सावंतांचं 'युगंधर' वाचायला घेतलं आहे. पण तेवढं गुंतून जायला होत नाही >>>> + १०

मी ही उत्साहात वाचायला घेतले होते पण कंटाळा आला.

मला वाढदिवसाची भेट म्हणून प्रकाश संतांचं 'वनवास' मिळालंय...
मला माहिती हवी होती की मायबोली पुस्तक खरेदी विभागात पहिला आणि 'वनवास' च्या पुढचे दोन भाग मिळतील का? अजून पूर्ण नामावली पहिली नाहीये मी..
माहिती असल्यास कळवावे..धन्यवाद! Happy

चिनूक्स, धन्यवाद.. मला पंखा हवं होतं कधीपासुन.
मुग्धा, या तीन पुस्तकांबरोबर शारदा संगीत पण घ्या. मायबोलीवर नाही मिळालं तर फ्लिपकार्ट मिळेल.

मायबोलीवर शारदा संगीत आहे. थोड्या वेळात लिंक देतो इथे. मायबोली असताना फ्लिपकार्ट कशाला? Happy

INRमध्ये घेता येतं. शिवाय ३०० रुपयांहून अधिक खरेदी असेल तर शिपिंग भारतात मोफत आहे.

चिमुरी>> ओके बघते नक्की...आभार.. Happy आणि मला एकेरीत संबोधले तर खूप आवडेल Happy

चिनूक्सजी >> अरे वा..मग छानच..वाट बघते! आत्ताच बाकीची दोन्ही पुस्तके घेतली.. Happy

व्यंकटेश माडगुळकर - माझे अत्यंत आवडते लेखक. त्यांच्या ४१ पुस्तकांचा संग्रह प्रसिद्ध झाला नुकताच. आता सगळी ४१ पुस्तक पुन्हा वाचतेय.
बरीचशी आधी वाचली होती, पुनःप्रत्ययाचा आनंद घेतेय....!

स्वस्ति, चिकू,
युगन्धर बद्दल मलाही तोच अनुभव आला. म्रुंत्युन्जय ची जादू सावन्तान्च्या पुढ्च्या कुठ्ल्याच पुस्तकात नाहिये. छावा पन तसच आहे.
frankly (totally my opinion) पण लेखन शैली नीट बघितली तरी म्रुत्युन्जय ची मला ययाति च्या जास्त जवळची वाट्ते छावा, युगन्धर पेक्शा. तोच format पण आहे.
-शिरीन

गोनीदांचं 'छंद माझे वेगळे' आणि डॉ. संजीव चौबळ यांचं 'गावाकडची अमेरिका' ही दोन पुस्तकं वाचली. दोन्ही आवडली.

गोनीदांचे पुस्तक हे वेगवेगळ्या वृत्तपत्रांतील त्यांच्या लेखांचे संकलन असल्याने काही ठिकाणी पुनरुक्ती होते खरी, पण पुस्तक वाचनीय आहे. आयोवातल्या एका छोट्या गावी राहून पशुवैद्यकाचे काम करणार्‍या डॉ. चौबळ यांचे पुस्तकही काहीसे वेगळ्या वाटेवरचे आहे. तिथल्या शेतीपासून ते कंट्री म्युझिकपर्यंतच्या गोष्टी एका चौकस मराठी भाषकाला कशा दिसतात, त्याचे हे निरीक्षण म्हणता येईल.

इंग्रजीत 'क्रिएटर्स' हे पॉल जॉन्सनचं पुस्तक वाचनात आलं. वेगवेगळ्या काळातल्या आणि क्षेत्रातल्या प्रतिभावंतांच्या आयुष्याचा छोट्या चरित्रात्मक स्केचेसद्वारे मागोवा घेणारं. कदाचित आवडीनिवडीतल्या फरकामुळे असेल, पण लेखक/कलाकार वगळता इतरांवर लिहिलेले लेख तितकेसे आवडले नाहीत. काही रोचक किस्से, थोडीफार कलावंतांना लाभलेल्या प्रतिभेच्या दैवी देणगीबद्दल चर्चा असं लेखांचं बहुतांशी स्वरूप असल्याने पुस्तक वाचताना आवडलं, तरी काही काळाने त्यातला किती भाग लक्षात राहील/लक्षात ठेवण्याजोगा आहे; याबद्दल थोडी शंकाच वाटते.

द गर्ल हु प्लेड विथ फायर वाचले. मिलियेनियम सिरीज मधले दुसरे. फारसे टेन्शन नाही म्हणुन विमानप्रवासात वाचायचे असेल तर ठीक ठाक पुस्तक आहे. इतर पुस्तकाप्रमाणेच "यावर कुणीतरी मुव्ही काढावा" या उद्देशाने लिहिलेले पुस्तक आहे.

साधारण दोन आठवड्यापुर्वी एक thriller वाचलं होतं
Almost Dead .....by Lisa Jackson .अजून माझा hangover उतरत नाही आहे Happy

कथानायिका सिसि कोहिल .एकामागोमाग एक वादळं ,तिच्या आयुश्यात येतायेत.
थोडीशी psycic background असलेली सिसिची आई मार्ला - तुरूंगातून पळून गेली आहे .
पुस्तकाच्या सुरवातीलाच कोणीतरी एलिस- सिसिच्या श्रिमंत आजीचा जिन्यावरुन ढकलुन खून करते .
सिसिचा नवरा जॅक .त्याचे ,आपल्या मैत्रिणी सोबत संबंध असल्याचा संशयावरून सिसिने त्याला घराबाहेर काढलं आहे. घटस्फोटाची प्रक्रिया चालु आहे म्हणून ती आपला दीड वर्शाच मुलगा ब्रायन जॅक ( बीजे) सोबत एकटी राहतेय.
इथे मार्ला , एलिसच्या घरात लपून बसली आहे .आणी दोघी मिळून नवेनवे plans बनवतायेत.
आजीच्या खूनानंतर सिसिला भावनिक आधार देण्यासाठी जॅक घरी परततो . काहीना काही कारणाने त्याचा मुक्काम वाढत जातो आणि सिसि परत त्याच्यात गुन्तत जाते.
कोहिल कुटुंबात आणखी काही दुर्घटना घडतात. सिसि या सर्वांचा संदर्भ लावत असते.काही गोष्टी तिला कळण्याच्या पलिकडच्या जाणवतात.

खरतर प्रत्येक प्रसंग एक नविन रहस्य उलगडतो त्यामुळे आणखी कथानक सांगण्यात अर्थ नाही.

कथेत अनेक माणसं आपल्याला भेटतात --
आजीचा home staff , driver, जॅक आणि सिसिची मैत्रिण मलिसा , सिसिची एस्टेट एजंट शेजारीण सेरा , जॅकचा flirt भाउ जॉन ,pricy बहीण जेनेलिन,वयाच्या मानाने तरुण दिसणारे आणि वागणारे वडिल जोनाथन, कॅफेमध्ये काम करणार्या २ मुली ,कॅफेमधली रोजची गिर्हाईक सेल्मा ,सिसिची बहिण व तिचा नवरा ,बीजेची नॅनी तान्या .......आणि संशयाचं बोट आपण प्रत्येकावर ठेवतो.

पण एलिस कोण असते ? मार्ला हे सगळ का घडवून आणत असते?यामध्ये तिला मदत करण्यात एलिसचा काय स्वार्थ असतो ? एलिसला मदत करणारी तिसरी व्यक्ती कोण असते ? जॅक खरचं सिसि आणी बीजेसाठी परत येतो का? मध्ये मध्ये स्वगत बोलणारी हॉस्पिटलमधली व्यक्ति कोण?
हे सर्व प्रश्न आपल्याला पुरते पछाडतात.एका point नंतर पुस्तक खाली ठेववत नाही .
वाचताना एक प्रसन्ग असा येतो की आपल्याला कथेचा शेवट काय आहे ते पहाव असा अनिवार मोह होतो.

एकंदर थरारप्रेमींसाठी उत्तम.

"बाकी शून्य" वाचलं. (लेखक - कमलेश वालावलकर) ठीकठाक पुस्तक आहे. (आव बराच आणलाय). शेवटी शेवटी कंटाळा आल्याने शेवटची १५-२० पानं नुसती चाळून सोडून दिली. खरं तर, पुस्तक असं अर्धवट सोडून देणं मला पटत नाही. पण शेवटी महान बोअर झालं, ब्वा !
कथानायकाचं शालेय जीवन, कॉलेज, मित्रपरिवार, प्रेमप्रकरणं, नोकरी-धंद्याचे प्रयत्न, करता करता नायकाला आलेली विरक्ती - असा प्रवास दाखवलाय. मित्रांचा सततचा उल्लेख, पण घरातल्या सदस्यांचा केवळ ओझरता उल्लेख - हे पटत नाही. घरच्यांशी अजिबातच काही इण्टरअ‍ॅक्शन नाही हे ही पटत नाही.
निवेदनातल्या काही जागा परिणामकारक आहेत. पण त्या मोजक्याच आहेत.
'कोसला'ची स्टाईल उचललीय. पण कथानायकाने कोसला वाचलेली नाहीये असा एके ठिकाणी उल्लेख करून डिस्क्लेमर टाकायचा केविलवाणा प्रयत्न केलाय. नंतर एके ठिकाणी नेमाडेंची तोंड भरून स्तुती करून त्यांच्या चाहत्यांच्या भावनांना सांभाळायचाही प्रयत्न केविलवाणाच वाटतो.
(शुध्दलेखनाच्या मुळीच चुका नसलेलं मराठी पुस्तक बर्‍याच काळानंतर वाचलं. त्यामुळे मात्र बरं वाटलं. फक्त एका ठिकाणी "खूश" असा शब्द दिसला. "संयुक्तिक" की "सयुक्तिक" हा प्रश्न पुन्हा एकदा पडला. पुस्तकात "संयुक्तिक" वापरलं गेलंय.)

पराग, तो बीबी वाचला. (आधी वाचलेला नव्हता.) पण तरीही, माझं वरचं मत अजूनही तेच आहे Proud

चिनुक्स, दोन्ही पुस्तके घरपोच मिळाली..हो, आणि जयवी ह्यांची कविता असलेला बुकमार्क ही मिळाला..अनेक आभार.. Happy

@ प्रीती - सयुक्तिक म्हणजे 'युक्ती-सह' केलेले असा विग्रह मागे एकदा (बहुतेक पुरुषोत्तम धाक्रसांच्या लोकसत्तेतल्या एका शुद्धलेखनविषयक लेखात) वाचलेला आठवतो. 'संयुक्त-इक' अशी फोड अर्थाच्या संदर्भात तितकीशी बरोबर वाटत नाही.

संयुक्तिक = coherent सयुक्तिक = reasonable, proper असे अर्थ मिळाले.

नंदन,भरत मयेकर, थॅन्क्स. Happy

शब्दार्थ बीबी वर चिन्मयने दिलेल्या लिंकवर दोन्ही शब्द शोधले. सयुक्तिक = reasonable, proper, तर्कसंगत - अशा प्रकारचे अर्थ मिळाले.

'संयुक्तिक' हा शब्द तिथे नाहीय.

पुस्तकात तर्कसंगत या अर्थानेच 'संयुक्तिक' वापरला गेला आहे.

रोआल् डालच्या कथांचा 'स्कीन अँड अदर स्टोरीज' हा संग्रह वाचला. काही कथा अफलातून आहेत. कथावस्तूपेक्षा डालची निवांत शैली, शेवटचा दणकाच जास्त खास!

मी वाचलंय. पुस्तक चांगल आहे. मला निरनिराळ्या देश/ प्रदेशातल्या रुढी- चालीरीती सांगणारी पुस्तक आवडतात. त्यामुळे हेदेखील आवडल. वाचून बघायला हरकत नाही.

"मी सायुरी" याबद्द्ल म्हणताय का मुग्धा? ते वाचलय मी हल्लीच, चांगल आहे वर अनया यांनी म्हटल्या प्रमाणे वेगळ्या देशातल्या रुढी परंपरा समजतात.
सध्या ह्या धाग्यावर कोणी लिहीतच नाही आहे. सुचवा थोडी नविन पुस्तक वाचायला, या आधी ज्या पुस्तकांबद्द्ल चर्चा झालीय ती आता माझी वाचुन झाली आहेत. इथे चर्चा झालेली पुस्तक वाचायला खरच खूप आवडली. सद्या भैरप्पांच "पर्व" वाचत आहे, अप्रतिम पुस्तक आहे.

मुग्धा, 'मी सायूरी' बद्दल म्हणत असशील तर ते मी वाचलय.मला खूप आवडलं.पण ते डायरी ऑफ अ गेशा नसून मेमरीज ऑफ अ गेशा आहे.

Pages