Submitted by आनंदयात्री on 26 May, 2012 - 14:46
आज २७ मे च्या चौथ्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
सत्यमेव जयतेच्या वेबसाईटवरील या भागाची लिंक -
http://www.satyamevjayate.in/issue04/
सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अहो, हे तर फक्त 'टिप ऑफ
अहो, हे तर फक्त 'टिप ऑफ आईसबर्ग' आहे.>>>>> पण हेच 'टिप ऑफ आईसबर्ग' मला इतके दिवस दिसतही (माहितही) नव्हतं.. त्यामुळे तसं म्हटलय..
लोकहो! या बाफच्या निमित्ताने
लोकहो!
या बाफच्या निमित्ताने डॉक्टरांची बाजूही थोडी सांगता आली.
मी इतका घसा खरवडून अॅग्रेसिव्हली बोलतो हे पाहून अनेक मायबोलिकर डॉक्टरांचेही प्रतिसाद आले. मला आजपर्यंत फक्त साती अन जामोप्या डॉक्टर आहेत हे ठाऊक होते. डॉक्टर्स बोलते झाले हेही नसे थोडके.
या व्यवसायात प्रॉब्लेम्स आहेतच.
ते कॅपिटेशन मुळे आले की पोलिटिशियन्स मुळे की एकंदरीतच डॉक्टरांमुळे, हा ब्लेम गेम सोडून प्रॉब्लेम सोडविण्यासाठीच चर्चा आहे, असे मी मानतो.
काय करता येईल याचे मार्ग माझ्या दृष्टीने मी मांडले आहेत.
त्याचा रिकॅप देतो:
१. मालप्रॅक्टिस करतो आहे अशी शंका ज्या डॉक्टरबद्दल येते, त्याच्याकडे जाऊ नका.
२. डॉक्टरांशी बोला. तुमच्या शंका निस्तरून घ्या.
३. अनेकदा शंकरापेक्षा नंदी जास्त कडक असतो. स्टाफ उर्मट वागत असतो याचा त्या डॉक्टरला पत्ताही नसतो. योग्य शब्दात अशी वागणुक डॉक्टरांच्या लक्षात आणुन द्या.
४. डॉक्टरला देव्हार्यात बसवू नका, तो तुमच्या वतीने रोगाशी लढणारा 'मर्सिनरी' : भाडोत्री सैनिक आहे हे ध्यानी घ्या.
५. आपला आजार डॉक्टरमुळे उत्पन्न झालेला नाही. ती नादुरुस्त गाडी आपण रिपेअरला आण्ली आहात याचे भान ठेवा, या गाडीचे स्पेअर्स सहसा मिळत नाहीत हे ही ध्यानी घ्या.
६. डॉक्टरही तुमच्या सारखा माणूस आहे. त्याला राग/लोभ असतात. जागरणाने थकवा येतो, त्याच्य कुटुंबियांच्य त्याच्याकडूनही काही अपेक्षा असतात. हे ही ध्यानी असू द्या.
७. डॉक्टरांनीही हावरटपणे वागू नये, अगदी एथिकल प्रॅक्टिस केली तरी कधी कधी प्रचंड प्रमाणात केसेस घेतल्या जातात ज्यांना पुरेसे लक्ष देता येत नाही..
इ.
यात अधिक भर घालता आली तर घालावी, स्वागतच आहे.
<< पण मुद्दे निराळे आहेत.
<< पण मुद्दे निराळे आहेत. अनावश्यक तपासण्या / प्रोसीजर्स (जशी गर्भाशय काढून टाकण्याची केस किंवा पॅन्क्रिआज ट्रान्सप्लान्ट) करायला लावणं, केवळ इन्शुरन्स आहे म्हणून त्याच तपासण्यांचे जास्त पैसे लावणं याबद्दल बोलत आहेत लोक. सेवा म्हणजे धर्मादाय व्यवसाय करा असं नव्हे, पण मूळ उद्देश रुग्णसेवा आहे हे (तुम्ही शपथ घेता ना तशी?) विसरू नये इतकंच >> स्वाती, +१००.
<< गरज नसताना घाबरवून सोडणे, अनावश्यक तपासण्या करायला लावणे आणि कट प्रॅक्टीस याबद्दल चर्चा होत नाही ती आमीरखानने घडवून आणली आहे याबद्दल सर्व प्रामाणिक डॉक्टरांनी त्याचे अभिनंदन करायला हवे आणि आपल्या व्यवसायाला लागलेली ही कीड कशी झटकून टाकता येईल याबद्दल आता वातावरणनिर्मिती झाली असताना एमसीआय वर दबाव आणला पाहीजे. >> +१००००.
आचारी आणि बटाटेवडे खाणारे दोघांचीही पिळवणूक होत आहे.
चोर सोडून संन्याशाला फाशी देणं आता दोघांनीही थांबवायला हवं.
आणि मूळ समस्या...लाचखाऊ सरकार....कशी सोडवता येईल ह्याचा संगनमताने विचार करायला हवा.
<< कुठल्याही क्षेत्रामधे जर त्यातल्या काही लोकांनी अनैतिक पद्धतीने व्यवसाय केला तर त्या व्यवसायातल्या चांगल्या(म्हणजे वैद्यकिय क्षेत्रात उदाहरण द्यायचे म्हणजे तुमच्यासारख्या) इतर लोकांनी तश्या वाइट लोकांना पाठीशी न घालता त्यांचा व ते करतात तश्या अनैतिक प्रॅक्टीसचा निषेध केलाच पाहीजे >> +१०००००
<< बाय द वे.. रुणुझुणु.. तुझे वडापावचे उदाहरण छान होते व पटलेही पण ते वाचताना मला क्षणभर मी मेडिकल कॉलेजला असताना फिजिऑलॉजी चे गायटन म्हणा किंवा अॅनॅटॉमीचे ग्रे म्हणा किंवा मेडिसिनचे हॅरिसन म्हणा या पुस्तकांचा अभ्यास करताना त्या पुस्तकांच्या पानात वडापाव कसा करावा याच्या कृत्या व वडापावचे फोटो होते व त्याचा मी अभ्यास करत होतो असा भास व्हायला लागला...>>

ते लिहून झाल्यावर मला किती तरी वेळ कामा हॉस्पिटलसमोरच्या कळकट टपरीतल्या वडापावचा वास येत होता.
<< फक्त हे सगळे, गैरप्रकार न करता जमवणे शक्य नाही असे काही डॉक्टरांना का वाटावे? >> भरतजी, अवघड आहे, पण अशक्य नक्कीच नाही. खूप संघर्ष करावा लागतो, पण जमेल.
वैयक्तिक माझ्या पुरतं बोलायचं झालं तर, मी आणि माझा नवरा दोघंही ह्याबाबत एकाच आणि ठाम विचाराचे आहोत. कमी पैसे मिळाले तरी चालेल पण वाममार्ग नको.
पण ह्या विचारांमुळे आमच्या घरच्यांनी आमच्यावरच्या आशा केव्हाच सोडून देऊन "आशीर्वाद" देऊन टाकले आहेत - " तुम्हारा कभी कुछ नहीं हो सकता "
सत्याच्या मार्गावर चालूनही श्रीमंत होता येतं हे सिद्ध करण्याच्या प्रयत्नात खूप संघर्ष करावे लागत आहेत. काही धागे तोडावे लागत आहेत. पण विश्वास आहे की यश मिळेल.
भावनेच्या भरात थोडं पर्सनल लिहिलं. पण एका दृष्टीने बरंच आहे.
पब्लिक फोरमवर संकल्प बोलून दाखवला आहे.
पुढेमागे कधी चूका घडल्या तर इथल्या वडीलधार्यांनी येऊन हक्काने कान धरावेत.
<< मी इतका घसा खरवडून
<< मी इतका घसा खरवडून अॅग्रेसिव्हली बोलतो हे पाहून अनेक मायबोलिकर डॉक्टरांचेही प्रतिसाद आले. मला आजपर्यंत फक्त साती अन जामोप्या डॉक्टर आहेत हे ठाऊक होते. डॉक्टर्स बोलते झाले हेही नसे थोडके.>>
इब्लिस,
एका परीक्षेच्या तयारीत असल्याने सध्या माबोगिरी बंद आहे.
पण इथे, फेसबुकवर आणि इतरही सगळीकडे परवाच्या एपिसोडबद्दल गदारोळ उठलेला पाहून राहवलं नाही. म्हणून चर्चेत उतरले.
मेनोपॉजविषयी एक लेखमालिका कमिट केली आहे. तेवढी पूर्ण झाली की मी हिम-अस्वलासारखं पुन्हा एकदा गुहेत जाणार आहे.
बाकी तुमची कळकळ समजतेय.
31 May, 2012 - 00:24 च्या पोस्टमधील सगळ्या मुद्द्यांना अनुमोदन.
डॉ. इब्लिस आणि डॉ रुणूझुणू -
डॉ. इब्लिस आणि डॉ रुणूझुणू - दोघांनी महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. मला वाटतं दोन्ही बाजूंनी (म्हणजे रुग्ण
आणि डॉक्टर ) थोडे सामंजस्याने वागले पाहिजे.
बाकी सरकारी अधिकार्यांकडून होणारा त्रास हे सार्वजनिक दुखणे आहे. बॉयलर इन्स्पेक्टर, फॅक्टरी इन्स्पेक्टर असेच वागतात. काही सरकारी खाती, हि लाच खाण्यासाठीच निर्माण झालेली आहेत.
सेकंड ओपिनीयन चा एक चांगला अनुभव माझ्याही गाठीशी आहे. पण सर्वच रुग्णांना तो सूचत नाही, आणि
कधीकधी परवडतही नाही.
शेवटी या काय किंवा इतरही व्यवसायात काय, चांगल्या कामाने उत्तम नाव होते, त्यामूळे अशा डॉक्टरांची ओळख आपण इतरांना करुन देऊ शकतो. मला चांगला अनुभव आलेल्या, सर्वच डॉक्टरांचा मी इथे उल्लेख केलेला आहे. डॉक्टरांना (तसेच इतर व्यावसायिकांना देखील) जाहिरात करता येत नाही, पण चांगल्या कामाचे
उत्तम परीणाम होत आहेत असे दिसल्यावर, अनेकजण या मार्गाने जातील अशी आशा नक्कीच करता येईल.
आणखी दोन डॉक्टरांची नावे घेतोच.
माझ्या वडीलांचे आत्येभाऊ डॉ. वसंत जाधव, आपली ऐन उमेदीतली, दादर, हिंदु कॉलनीतली प्रॅक्टीस सोडून,
त्यांच्या मूळ गावी म्हणजे खारेपाटण, येथे स्थायिक झाले व शेवटपर्यंत तिथेच राहिले.
माझ्या मानसकन्येचे आजोबा, डॉ. मल्हार कावळे, यांनी जाणीवपूर्वक हिंगणघाट असे एक छोटे खेडेगाव
प्रॅक्टीससाठी निवडले आणि निवृत्त होईपर्यंत, तिथेच राहिले. त्यांचे समाजकार्य, त्या ठिकाणी खूपच मोठे आहे.
इब्लिस तुमची कळकळ पोहोचतेय.
इब्लिस तुमची कळकळ पोहोचतेय. पण तुम्ही वर दिलेल्या मुद्दा नं २ वर माझा वेगळाच अनुभव आहे. पुण्यात एक प्रचंड प्रसिद्ध ऑर्थोपेडिक आहेत. एकावेळी निदान साठेक पेशंट्स ते नक्कीच तपासतात. भरमसाठ फी आहे हे मी वेगळं सांगायला नको. व्यायामाने बरं करतात म्हणे. ठिक आहे. पण व्यायाम पेशंटला नीट समजलाय का याची खात्री ही करायची तसदी घेत नाहीत. त्यांची सबऑर्डीनेट हे व्यायाम शिकवते. एकूण पेशंटला दिलेला वेळ नॉट मोर दॅन १० मिनिटस विच इन्क्लुडस व्यायाम अल्सो. एखादा प्रश्न विचारला तर उर्मट उत्तर मिळते. उदा. मला हात वर कर असे सांगितले. मी केला. वरती हेही सांगितले की अजून वर करू शकेन. समोरून डॉकचे उत्तर. आमटीत वाटीभर मीठ घालू शकतो. पण खाऊ शकतो का ?
वरती हाईट म्हणजे निघताना मला सांगण्यात आलं की हे व्यायाम करून जर तुला बरं वाटलं नाही तर तू व्यायाम चुकीचे करते आहेस हे ध्यानात घे आणि परत इथे येऊ नकोस. मी तपासणार नाही.
आमचे फॅमिली डॉक्टर (जे आता
आमचे फॅमिली डॉक्टर (जे आता हयात नाहीत.)५०, ५५ वर्षां पुर्वी हुशारी व स्कॉलरशीप च्या आधारे डॉ. झाले होते असे ऐकले आहे. सामान्य परीस्थीतल्या हुशारांना आज हे शक्य आहे का?
ते शेवट पर्यंत स्वत:जवळचे औषध दिले तरच पैसे घेत. केवळ प्रिस्क्रीप्शन, किंवा टेस्ट लिहुन दिल्या तर पैसे घेत नसत.
वाममार्गाने प्रॅक्टिस न
वाममार्गाने प्रॅक्टिस न करणार्या डॉक्टरांची लिस्ट मायबोलीवर केली तर?
वर बर्याच प्रतिसादांमध्ये उल्लेख केलेले चांगले डॉक्टर्स पण आहेत. असे प्रत्येक गावात असतीलच. त्यांची माहिती एका ठिकाणी असल्यास माबोकरांना, त्यांचे नातेवाईक, परिचित वगैरे लोकांना त्याचा नक्कीच फायदा होईल!
माझ्या आईचे ४ वर्षांपुर्वी कॅन्सरचे मोठे ऑपरेशन + १ वर्ष केमो याचा खर्च साधारण ८ लाख रु आला होता! इंन्शुरन्सकडुन काहीही मिळाले नाही! तिचे ऑपरेशन झाले तेव्हां मी भारतात नव्हते. भावाचा एक जवळचा मित्र तेव्हां आँकॉलोजी सर्जन नुकताच झाला होता. तो आमच्या कुटुंबाला खुप जवळचा असल्याने त्याने सँपल टाटालाच तपासायला न्यायचे असे सांगितले. ठाण्यातल्या अतिशय मोठ्या दवाखान्यातील डॉ/मॅनेजमेंटने नकार दिला. पण भाऊ आणि तो डॉ मित्र ठाम होते. खुप प्रयत्नांती त्यांना यश आले आणि ते सँपल त्यांनी दोघांनी स्वतः जाऊन टाटाला पोहोचते केले.
मागच्या वर्षी वडीलांचे कॅन्सरमुळे ब्लॅडर काढले. ती ९ तासांची सर्जरी डॉ मित्राने केली! तो दोन्ही वेळेस सतत सोबत असल्याने खुपच मानसिक आधार होता. नाहीतर कठीण होते! पण प्रत्येकालाच असा घरातुन सपोर्ट मिळतो असे नव्हे.
@ रुणुझुणू परिक्षेसाठी 'बेस्ट
@ रुणुझुणू
परिक्षेसाठी 'बेस्ट ऑफ लक'
तुमच्या सगळ्या पोस्टींना अनुमोदन आहेच.
@दक्षिणा | 31 May, 2012 - 11:52 नवीन
मला वाटते मला माहितेय कुणाबद्दल बोलता आहात? स्पोर्ट्स मेडिसिन वाले आहेत नं ते? त्यांचे हास्यास्पद किस्से बरेच ठाऊक आहेत मलाही. पण तसं पाहिलं तर टीव्ही वरचे बाबा नुसत्या व्यायामाने सगळे आजार अगदी कॅन्सर पासून एड्स पर्यंत बरे करतात, वरून योगबलाने देशातला भ्रष्टाचारही हटवतात.
अशा लोकांचे देव्हारे माजले, की त्यांचा माजही असाच दिसतो..
@जो_एस | 31 May, 2012 - 11:52 नवीन
आमचे फॅमिली डॉक्टर (जे आता हयात नाहीत.)५०, ५५ वर्षां पुर्वी हुशारी व स्कॉलरशीप च्या आधारे डॉ. झाले होते असे ऐकले आहे. सामान्य परीस्थीतल्या हुशारांना आज हे शक्य आहे का?
<<
सहमत.
दक्षिणा त्या ऑर्थोपीडिक (
दक्षिणा
)बद्दल माझा ही हाच अनुभव आहे व अनेकांचा ही. मग असे असताना तो का सोकावलाय?
त्या ऑर्थोपीडिक ( सा......णीच ना?
काहीतरी वलय आहे-तिरसटपणाचे.
मी वैयक्तीक रित्या, इब्लिस,
मी वैयक्तीक रित्या, इब्लिस, रुणूझूणू, साती आणि मायबोलीवरच्या इतर डॉक्टरांना अशी विनंती करतो, कि
त्यांनी निदान आपल्या प्रोफाईलमधे त्यांच्या क्लीनीकचा पत्ता लिहावा. आमच्यापैकी कुणाला संदर्भ हवा असेल,
तर आम्ही हक्काने लोकांना सांगू. डॉ. कैलास यांनी अशी मदत पुर्वी केलीच होती. अॅडमिनचा याला अक्षेप नसेल, असे मी गृहित धरतोय.
मला कोल्हापूरात गेल्या आठवड्यात गरज पडली असती. मी नुसते तसे इथे लिहिल्यावर अशोक, भ्रमर, दक्षिणा, तिची ताई, तिचे बाबा, झकास, मित या सर्वांनी प्रतिसाद दिला. त्यामूळे आपल्या या नेटवर्कचा सदुपयोग नक्कीच करुन घेऊ या.
>>दिनेशदा | 31 May, 2012 -
>>दिनेशदा | 31 May, 2012 - 13:06 नवीन
मी वैयक्तीक रित्या, इब्लिस, रुणूझूणू, साती आणि मायबोलीवरच्या इतर डॉक्टरांना अशी विनंती करतो, कि
त्यांनी निदान आपल्या प्रोफाईलमधे त्यांच्या क्लीनीकचा पत्ता लिहावा. आमच्यापैकी कुणाला संदर्भ हवा असेल,
<<
दिनेशदा,
धन्यवाद. तुमच्या भावना पोहोचल्या. मनातून सुखावलो. तह-ए-दिल से धन्यवाद.
पण, मला तरी ते करता येणार नाही, कारण जाहिरातच करायची तर माबोवर छोट्या जाहिराती आहेत, अशी एक माझी आपली इब्लिस एक्सेन्ट्रिसिटी.
अन दुसरं म्हणजे इब्लिसाची अनामिकता गेली, तर इब्लिसपणाच बंद करावा लागेल हो
जाहिरात मानू नका हो ही. आणि
जाहिरात मानू नका हो ही. आणि किती इब्लिस आहात ते माहित आहे आता. नोन डेव्हिल्स आर बेटर
रुणुझुणु तुझ्या क्लिनिक मधे
रुणुझुणु
तुझ्या क्लिनिक मधे वडापाव मिळेल का ?
दिनेशदा, एक प्रोफेशनल एथिक्स
दिनेशदा, एक प्रोफेशनल एथिक्स म्हणुन माझे नाव गाव कुठ्ल्याच मराठी साइटवर लिहित नाही.
हो. एथिकनुसार असे करता येत
हो. एथिकनुसार असे करता येत नाही.
एथिकमध्य डॉक्टरने किती लांबी रुंदीचा बोर्ड किती अंतरापर्यंत लावावा, किती वेळा जाहिरात करावी त्याचाही अटी आहेत.
तसे एथिक आम्हालाही (सी.ए.)
तसे एथिक आम्हालाही (सी.ए.) लागू असते. पण ते भारतापुरतेच !
मला वाटतं, खाजगी संपर्कातून एखाद्या पेशंटला तूमच्याकडे पाठवू का, असे विचारण्यास हरकत नसावी.
मायबोलीवर जशी उद्योजकांची माहिती आहे तशीच सल्लागारांची पण असावी.
कुठल्याही पानावर झळकवायची गरज नाही, पण विचारणा झाल्यास मायबोलीने ती पुरवावी.
यावर काय मत आहे ?
हुश्य!!!!!!!!!! वाचुन संपली
हुश्य!!!!!!!!!! वाचुन संपली चर्चा एकदाची.
कचरा उचलणारा मध्यस्थ तो कचरा योग्य रितीने नष्ट करीत नाहीये. एन्पीसीबिला लाच देऊन सर्रास लँडफिलमधे तो कचरा फेकला जातो आहे.>> आणि तोच पावसाळ्यात आपल्या पिण्याच्या पाण्यातुन आपल्या घरात येतो.
इब्लिसरावांनी मात्र एक हाती किल्ला लढवला आहे.
शेवटी, सगळेच प्रोफेशन पवित्र असतात. ज्याने त्याने ठरवायचे आहे कि आपण आपल्या प्रोफेशन मध्ये कसे वागायचे. संगणक बंद पडल्यावर अजुन्ही कोल्हापुर सारखया ठिकाणी देखिल अव्वाच्या सव्वा पैसे लुटतात (अर्थातच ज्यांना माहित नसते त्यांच्या कडुन).
जरा विचार करा कि आपली किती ठिकाणी फसवणुक होते. बरेच ठिकाणी अगदी वाण्याच्या दुकानापासुन ते अगदी म्ल्टीनॅशनल कंपनी पर्यंत. आपण काय करतो. दुकान बदलतो / कंपनी बदलतो. तोच न्याय इथे का लावत नाही?
कारण हे पवित्र क्षेत्र आहे. डॉ. नी सेवाभाव जपला पाहिजे ब्ला ब्ला ब्ला....
त्या डॉ. ला पण इतर ठिकाणी लाच लुचपत द्यावी लागते (आपल्या सर्वांसारखी). शेवटी तो पण माणुस आहेच. राग लोभ माया यापसुन कसा काय वंचित राहिल? पण वर अगदी समजावुन सांगितल्या प्रमाणे सब घोडे बारा टके न्याय कसा काय बरोबर असु शकेल.
आता शिक्षण क्षेत्र किती पवित्र. !!!!
पण त्यात काय काय चालते याची खबर अजुन डॉ. पेशासारखी बाहेर फुटली नाहिय. नाहेतर सगळेच शिक्षक नालायक , पेशाला काळिमा फासणारे असे चित्र रंगवले असते.
आता प्रश्न असा येइल, कि डॉ. पेशाचा संबंध सरळ सरळ रुग्णाच्या जीवन मरणाशी निगडित आहे. त्याच्याशी बाकि पेशाची तुलना कशी काय करता येइल?
इकडे डॉ. रुग्णाला फसवतो, लुटतो. पण शिक्षण क्षेत्रात सगळा समाज नागवला जातोय.
यावर आता दुसर्या धाग्यावर लिहतो.
इब्लिस, तुमच्या पोस्ट्स
इब्लिस, तुमच्या पोस्ट्स आयओपनर आहेत. उदा. बीएमडब्ल्यूबद्दल कल्पना नव्हती.
या निमित्ताने दोन्ही बाजू नीट कळताहेत.
भरपुर पोस्त पडल्या
भरपुर पोस्त पडल्या आहेत.असो.
इब्लिस आणी रुणुझुणु,
मुद्दा तुम्हाला कळला आहे हे मला माहित आहे. उगीचच शाब्दिक वाद्विवाद करण्यात मला रस नाहि. तुम्हाला मुद्दा कळुनही उगाचच वाद्विवाद घालण्याचा असल्याने मी माझी पोस्ट इथेच थांबवतो.
***प्रतिसाद संपादीत***
-अॅडमीन
चाणक्य, हा आय्डी हायजॅक झालाय
चाणक्य, हा आय्डी हायजॅक झालाय का?
आत्ताआत्ता पर्यंत तर माझ्या "टु बी टेकन सिरीयसली" आयडींपैकी एक होता.
इब्लिस इन जनरल बोलतायत तर एकदम वैयक्तिक आगपाखड कशाला तुमची. तुम्हाला डोक्टरांवर एकतर्फी आगपाखड करायचीय का? समोरच्याची बाजू ऐकायचीच नाही असं ठरवलं तरच माणूस या वैयक्तीक लेवल्पर्यंत येऊ शकतो.
चंद्रगुप्त, चांगलीय पोस्ट.
कसं आहे की वरवर डॉक्टरांचं काम सेवाभावी म्हणायचं आणि मग हळूच कंज्यूमर लॉ लावून स्वतःच डॉक्टरला दुकानदार आणि रूग्णांना ग्राहक करायचं हा खेळ भारतीय कायदाच खेळलाय. आता डॉक्टर सेवाभाव वैगेरे विसरून दुकानदाराचीच भूमिका करणार ना? बर एकदा दुकानदार ठरवल्यावर मग जाहिराती करू नये हा नियम कशाला?
वर कुणीतरी उदाहरण दिलंय, व्हायरल फ्लू साठी स्पायनल फ्लूईड काढायची आवश्यकता यावर. व्हायरल फ्लू मध्ये पेशंट किती सिरीयस होऊ शकतो हे तुम्हाला माहित आहे का? दोन तीन दिवसांनी पेशंट बरा झाल्यावर दुसरा कुणीही म्हणू शकतो या टेस्टचि काय आवश्यकता?
उद्या याच व्हायरल मेनिंजायटीसने पेशंट दगावल तर ही पाच मिनीटांची टेस्ट का केली नाही वेळेतच म्हणून रूग्णाचे नातेवाईक आरडओरडा करणार. थोडक्यात सिरीयस पेशंटबद्दल कोणती टेस्ट करणे जरूरीचे आहे किंवा नाही याचा निर्णय केवळ उपचार करणारे डॉक्टरच घेऊ शकतात.
साती | 31 May, 2012 -
साती | 31 May, 2012 - 10:22
~थोडक्यात सिरीयस पेशंटबद्दल कोणती टेस्ट करणे जरूरीचे आहे किंवा नाही याचा निर्णय केवळ उपचार करणारे डॉक्टरच घेऊ शकतात.~
सातीदी हा शेवटचा मुद्दा पटला. गुजरातीत एक म्हण आहे..."जेनो काम तेनो थाई, बीजा करे सो गोता खावे "
चाणक्यजी, 'बिनडोक' हा
चाणक्यजी,
'बिनडोक' हा शब्दप्रयोग समजला नसावा बहुतेक. डोके न वापरता, मी काय म्हणतो आहे ते समजून घेण्याचा प्रयत्नही न करता, असे अभिप्रेत होते. असो तुमच्या भावना त्या शब्दांनी दुखावल्या असतील तर दिलगीर आहे.
बाकी, चर्चेत अशी तिखट फोडणी घालून करमणूक केल्याबद्दल धन्यवाद! मागे एकदा माबोवरील दुसर्या एका आयडीने असेच भेटायला बोलावले होते. त्यानंतर तुमच्यासारख्यांचे काय करायचे ते शिकलो आहे.
तसे वर मघा मी बुद्धीभेदाबद्दल लिहिले होते.
इथे तुमचा हेतू फक्त वितंडवाद घालण्याचा दिसतो.
तेव्हा, तुमच्याशी चर्चेत यापुढे मलाही स्वारस्य नाही
अन नांव पत्ता इ. तुम्हाला काहीही देण्यास मी बांधील नाही. हे तुम्हाला इथे दिलेले शेवटले उत्तर.
***
स्वयंसंपादनः
वरील प्रतिसाद टंकून पोस्ट करण्याच्या दरम्यान चाणक्यजींनी त्यांचा प्रतिसाद संपादित केला असावा, किंवा अॅडमिन यांनी. वरील प्रतिसादात चुकीचे काही दिसल्यास क्षमस्व!
इब्लिस, बायोमेडिकल वेस्टचा
इब्लिस, बायोमेडिकल वेस्टचा प्रॉब्लेम सार्वत्रिक दिसतोय.
आमची कंसलिंग रूम एखाद्या ऑफिससारखीच आहे.
कचरा काही होत असेल तर ईसीजी काढल्यावर जेल पुसायला वापरलेल्या कॉटनचा. तरीही मी दररोज आठ रूपयाच्या ३ रंगाच्या ३ पिशव्या घ्याव्या हे ईपीसी वाल्यांचे म्हणणे.
बरं हा कचरा इनसिनरेट होतो का तर नाही. गावाबाहेर डंप होतो. तिथल्या आसपासच्या लोकांनी तक्रार केल्यावर आण डॉक्टरांनिही ईपीसी वाल्यांचा कारभार लक्षात आणून दिल्यावर कचरा उचलणारा कॉट्रॅक्टर बदलला. इन्सिनरेटरची भट्टी काही पेटली नाही.
दररोज माझ्या नवर्याची आणि इपीसि वाल्याची खडाजंगी. नवरा म्हणणार की पिशव्या भरल्याशिवाय नेऊ नको आणि ईपीसी वाला तीन पिशव्या घ्या म्हणुन मागे लागणार. एके दिवशी हे बंद झालं अचानक. आम्हाला वाटले आम्ही जिंकलो. पण नेमके कारण कारण काय तर आमच्या मेडिकलवाल्याने गूपचूप १५०० रू. देऊन ३ वर्षांसाठी सेटलमेंटच करून टाकली इपीसी वाल्यांशी.
@ साती बायोमेडिकल वेस्टचा
@ साती
बायोमेडिकल वेस्टचा प्रॉब्लेम : अन किस्सेही सार्वत्रिक आहेत.
बादवे, ३ नाही, ४ रंग आहेत. ४था पांढरा कन्टेनर. (प्लास्टीकचा डब्बा) शार्प्स डिस्पोसल साठी.
बाजारात १ रुपया/५० पैशाला मिळणारी पिशवी ही त्याच कंत्राटदाराकडून ३ रुपयाला एक अशी घेण्याची सक्ती होते.
अन सगळ्यात वाईट म्हणजे, जर सर्व डॉक्टर्स मिळून कोऑपरेटिव्ह तत्वावर स्वतः डिस्पोसल फॅसिलिटी उभारतो असे म्हटले, तर 'ऑथरायझेशन' मिळत नाही.
गावात समजा मेडीकल कॉलेज आहे, अन तिथे इन्सिनरेटर आधीच आहे, तिथे आमची वेस्ट नेऊन देतो म्हटले, तरी परवानगी देत नाहीत. एका खासगी मेडीकल कॉलेजवाल्यांनी एका गावी परवानगी दिली. तिथे जाऊन त्या एन्पीसीबी इन्स्पेक्टरने इतक्या लीगॅलिटीज काढल्या, की ते संचालक डॉक्टर स्वतः पोलिटीकली स्ट्राँग असूनही, आय एम ए च्या मीटींगमधे माफी मागून म्हणाले, की माफ करा, मी तुम्हाला इन्सिनरेटर वापरू देऊ शकत नाही.
थोडक्यात काय, तर तुम्ही डॉक्टर लोक इतके "फुकटचे" पैसे कमावताहात, मग आम्ही "थोडे" खाल्ले त्यातून तर काय झालं? अशी मनोवृत्ती. हे एक्झॅक्ट शब्द ऐकलेत मी
आयला, हि सगळी आतल्या गोटातली
आयला, हि सगळी आतल्या गोटातली वस्तुस्थिती पाहता; you wanna know the truth? you can't handle the truth! या वाक्याचा प्रत्यय येतोय...
<< परिक्षेसाठी 'बेस्ट ऑफ
<< परिक्षेसाठी 'बेस्ट ऑफ लक'>> धन्यवाद इब्लिस. जॉब आणि छोकरा सांभाळत परिक्षा म्हणजे दिव्यच आहे. त्यामुळे शुभेच्छांची खूप गरज आहे.:)
दिनेशदा, नाव-पत्त्याबद्दल इब्लिस आणि सातीला अनुमोदन. इन फॅक्ट मी माझ्या मागच्या एका वैद्यकीय लेखाखाली लिहिलेलं नावही काढून टाकत आहे.
अजून मी भारतात प्रॅक्टिस करत नाही. पण जेव्हा करीन तेव्हा माबोकरांच्या संपर्कात असीनच.
किरण, वडापाव नक्की मिळेल.
<< मुद्दा तुम्हाला कळला आहे हे मला माहित आहे. उगीचच शाब्दिक वाद्विवाद करण्यात मला रस नाहि. तुम्हाला मुद्दा कळुनही उगाचच वाद्विवाद घालण्याचा असल्याने मी माझी पोस्ट इथेच थांबवतो.>> चाणक्य, हेच वाक्य मी तुम्हाला म्हणतेय असं समजा.
साती,
डॉक्टरांकडून दाबून पैसे घेऊन नंतर हे लोक डिलीव्हरीनंतरच्या प्लासेन्टा नाल्यात नेऊन टाकतात.
म्हणजे लोकांच्या आरोग्याशी खेळ तर थांबलेलाच नाही.
..
..
किरण, आमच्याकडून त्याने
किरण, आमच्याकडून त्याने कचरा नेला तर तो त्याने कशातही जाळावा, पावाच्या भट्टीत जाळला तरी चालेल.. आम्ही विचारु शकत नाही तुझी भट्टी कुठल्या बनावटीची आहे.
बायोमेडिकलवाल्याची मेंबरशिप घेतली एक सर्टिफिकेट मिळते. ते आम्ही तपासणीच्या रुमच्या दारावर लावून ठेवतो. बास्स... तेच तेवढं महत्वाचं... बाकी त्या कचर्याचं त्याने काहीही करावे.
खरे तर बायोमेडिकल वेस्टच्या खाली पोल्ट्री फॉर्म, मटण मार्केट हेही येतात.. सर्वानी मेंबरशिप घेतली तर कॉस्ट कमी होईल.. पण दयाळु सरकारने हा कायदा फक्त डोक्टराना लागु केला आहे.
इब्लिस तुमच्या पोस्ट्स मधून
इब्लिस तुमच्या पोस्ट्स मधून बरेच नवे मुद्दे समजले.
बाकी रुणुझुणू आणि इअतर बर्याच जणांच्या पोस्ट्स आवडल्या.
Pages