फूड प्रोसेसर / मिक्सर / ग्राइंडर / चॉपर कोणता घ्यावा

Submitted by शूम्पी on 29 May, 2012 - 10:20

HBFPGoodOld.jpg
मी गेले १० वर्ष हॅमिल्टन बीच चा वरच्या फोटोतल्यासारखा फूड प्रोसेसर वापरत होते. तो किती मस्त होता ते मला तो स्वर्गवासी झाल्यावर समजले. तो मी साधारण $३० च्या आसपास घेतला होता. आठवड्यातून ३-४ वेळा वापरत होते. कणिक भिजवणे , भाज्या चिरणे, दाण्याचे कूट करणे, लसणाची कोरडी चटणी फिरवणे, (आई आली की) पुरण फिरवणे अशा नाना प्रकारच्या कामांसाठी. वापरायला तो अत्यंत सोपा आणि कमी कटकटीचा आणि सुटसुटीत होता. एकच ८ कप आकाराचं भांडं, एकच झाकण, १ चॉपिंग ब्लेड(त्यानेच कणिक पण छान मळली जायची), आणि एकच स्लायसिंग/श्रेडिंग ब्लेड, सर्व गोष्टी डिश वॉशर मध्ये बिंधास्त टाकता यायच्या.
खरतर, तो फूड प्रोसेसर नीट चालू होता (म्हणजे बटण, मोटर वगैरे) फक्त त्याच्या ब्लेडला खाली असणारी प्लॅस्टिक ची चकती तुटली होती तर मी लगेच तो रिसायकल मध्ये टाकला. मी त्यांच्या वेबसाइट वरून नुस्तं ब्लेड मागवायला हवं होतं असो. आता अक्कल येवून काही फायदा नाही. घाईघाईने आधी काय ते उरकायचं आणि मग सवडीने पश्चात्ताप करायचा...
सध्या माझी फूड प्रोसेसर क्वेस्ट सुरू आहे.
आखुड शिंगी वगैरे वगैरे हवा आहे. वापरायला सोप्पा, कमी कटकटीचा
गेल्या ८ दिवसात २ वेगळे फु प्रो आणून एकदा वापरून परत केले आहेत.
त्यातला एक होता हॅमिल्टन चा नविन मॉडेल आणि दुसरा होता किचन एड चा ९ कपांचा मॉडेल. त्यांची कहाणी प्रतिसादात लिहिते.
.
.
.
शेवटी पहिल्या पानावर अगोने रेकमेंड केलेला हा फु प्रो मी घेतला आणि मी माझ्या खरेदीवर फार खुष आहे!
HBFoodPro500Wt.jpg

रोजची पोळ्याची कणिक ह्यातच मळते. डिशवॉशरला टॉप रॅकमध्ये धुवायला टाकते. नो कटकट फु प्रो आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या विकांताला हॅमिल्टन बीच चा एक नविन मॉडेल च फु प्रो आणला पण एकदा वापरल्यावर आवडला नाही म्हणून परत केला. प्रमाण कमी असेल तर एक छोटं भांडं येतं पण ते स्वतंत्रपणे न फिक्स करता मोठ्या भांड्यात च लावावं लागतं आणि मोठ्या भांड्यातून चॉप केलेलं मिश्रण छोट्या भांड्यात पडतं.झाकण लावणं कटकटीच वाटलं उगाचच कॉम्प्लिकेटेड. ते टारगेट मधून आणलं होतं किंमत होती ७२.००

HBDualBowl1.jpg

कालच किचनेड चा एक फु प्रो आणला तो पण आवडला नाही. ९ कपांचा होता आणि त्याला पण मोठ्या भांड्यात छोट्या भांड्याची भानगड होती. झाकण पण साधं सोपं नव्हतं, ९ कप मावतील असं जरी लिहिलं असलं तरी ब्लेडचा आकार खूप मोठा होता त्यामुळे ब्लेड लावल्यावर भांड्यात जास्त जागा नव्हती उरत. अजून एक मेजर फ्लॉ म्हणजे लो/हाय्/ऑफ ही बटण अतिशय घट्ट होती.
माहितीलिहिलेली त्यात डिशवॉशर सेफ आहे असं म्हटलं होतं पण आत एक चिट्ठी टाकली की जर तुम्ही हाताने भांडी न धुता डिशवऑशर ला लावणार असाल तर टॉप ररॅक मध्येच लावा, पॉट स्क्रबर ऑन करू नका, हिटेड ड्राय ऑन करू नका वगैरे वगैरे..

तो पण बासनात गुंडाळून ठवला आहे रिटर्न करायला. त्याची किंमत होती $१४९.९९
हा त्याचा फोटो.
KFP9Cup.jpg

येस्स. आता तोच मागवणार आहे. दुकानात मिळत नाहीये तो. ऑर्डर करणार आहे. त्याचा रिपोर्ट पण लिहिनच इथे. दुकानातून वस्तू आणल्या की रिटर्न करणं सोप्पं पडतं.

लोला ने जे लिहिलेय तेच लिहायला आले होते. मी दोन घेतले आहेत - मी सगळी कामं ह्याच्या मदतीने उरकते तेव्हा एक मोडला तर काम अडू नये म्हणून दूसरा. अगदी पैसे वसूल वस्तू आहे.

अमी

अमि, दोन्ही हॅमिल्टन चे घेतेलेत? मी पण तोच धाग्याच्या डोक्यावर दाखवलेला ऑर्डर करणार आहे आजच.

मला ही तुमच्यासारखाच प्रश्न पडला होता - कोणता फू.प्रो. घ्यावा. वरदाने मला हे.बी. चा हा मोडल घ्यायला सांगितले. मी एक मागवला, आठवडाभर वापरला आणि ईतका आवडला की आणखी दोन मागवले - एक माझ्यासाठी, एक माझ्या मैत्रिणीच्या आईसाठी ज्यांना आर्थ्राईटीस आहे. त्यांना पण खूप आवडला आहे - मुख्य
महणजे फारसे पार्टसची जमवाजमव नाहीय. वापरायला सोपा, धुवायला सोपा. जरा लांबड लावली - पण अगदी रास्त किमतीत ईतका छान फू.प्रो.!

अमी

मृ, तो ब्लेन्डर आहे. Happy
इथे फूप्रो बद्दल बोला. फूप्रो, स्टँड मिक्सर, ब्लेन्डर, चॉपर ही सर्व वेगवेगळी उपकरणे आहेत. Proud

फूप्रो, स्टँड मिक्सर, ब्लेन्डर, चॉपर ही सर्व वेगवेगळी उपकरणे आहेत>पण वापरणारी एकच आहे लोला Lol

>>त्यात फूड प्रोसेस होतं
ते वरच्या सगळ्याच उपकरणांत होतं. विळ्या, सुर्‍यांबद्दलही इथेच लिहा मग! Proud

(इतरत्र असलेली माझी फूप्रो पोस्ट्स इथे डकवते मग)

एक्स्झॅक्टली.!

'स्वयंपाकघरट्यातली चिराचिरी, भिजवाभिजवी, मळामळी सोप्पी करणारी यंत्र' असं काहीतरी लाडिक नाव देऊ. Proud

तुला हवा असणारा वॉलमार्टमधूनही फ्री शिप टू स्टोअर करता येतो. ते परत करायचे झाल्यास स्टोअरमध्येच परत करु शकशील.

माझ्याकडे हा होता. तू वर वर्णन केलेल्या सगळ्या गोष्टी व्हायच्या त्यात.

सॉरी शूम्पे, माझ्याकडे हॅमिल्टन बीचचा हा होता. त्या आधीच्या आणि ह्यात अगदी थोडासाच फरक आहे. मघाशी लक्षात आला नाही. किंमतही अजून तीच आहे आणि हा स्टोअरमध्ये असतो.
हो, हा चांगला आहे. मला तरी आवडायचा Happy

शूंपी,
तीन प्रश्ण,
१)तुमचा आधीचा लाडका जुना हॅमिल्टन मध्ये भाज्या(बीन्स, गाजर)/कांदा/टोमॅटो वगैरे बारीक कापू शकतो का?
२) वाटणं/चटणी वगैरे गंधासारखे बारीक होते का?
३)सुका कोरडा मसाला बारीक पूडीसारखा होतो का?

इतरांनी पण आधी वापरलेला असेल कुठलाही जो वरील कामाला मस्त , त्यानींही लिहिले तर बरे. धन्यवाद!

(घरात आधीच लटरफटर असे तीन पडलेत. मॅजिक बुलेट, ओस्ट्रायझर, किचन्मेड(भेटीत दिलेला आहे हा)) त्यामुळे हे सर्व फेकून एकच ठेवायचा आहे. )

झंपी,
१. हो .
२. होतं पण क्वांटिटी जस्त असेल तर्च. चटण्या मी खरतर फारशा करतच नाही. माझ्या मते त्यासाठी मॅजिक बुलेट कामी येइल. डिप्स मात्र मस्त होतात.
३. हे ही मी फारसे करत नाही. Sad

पण सगळे फेकून एकच नका ठेवू. प्रत्येकाचं (उपकरणाचं) वेगळं स्पेशलायझेशन आहे. Happy आणि माझ्याकडे पण मॅजिक बुलेट चं भावंड आहे, ओस्ट्रायझर आहे पण vitamix/ब्लेंडटेक blender आणल्यापासून ओस्ट्रायझर वापरला गेला नाही. पण ह्या सगळ्या भानगडीत मी हॅमिल्टन ला फारच पिदडत होते हे लक्षात आले.
अगो, तू पण माझी स. मै. Happy

शूम्पी + १
या प्रत्येकाची कामे वेगळी आहेत. सुका मसाला बुलेटमध्ये होतो. पुन्हा कणीक मळायचे वेगळेच. Wink

>>किचन्मेड
हे काय आहे?

Totally agree about MAgic Bullet....

चटणी इ. साठी ब्येस्टच....मी अजून कणिक मळण्यासाठी काही घेतलंच नाही ....आता दोनाचे चार (मुल मिळून) झालोय तर पुढे मागे घ्यावा लागेल.
निन्जा आणि Vitamix users तुम्ही लोक यात कणिक मळता का? पाण्याचा अंदाज एकंदरित फु प्रो मध्ये कणिक तिंबायची असेल तर कसा घेता?

लोला तुझ्या लाडक्याचं मार्केटिंग करायची एकही संधी दवडत नाहीस हॉ Happy
वेका फुप्रो मध्येच मी कणिक मळते. पाणी वरच्या ट्यूब मधून हळू हळू घालते. मस्त मळली जाते.
माझ्याकडे vitamix नसून blendTech नावाचं त्याचच भावंड आहे पण त्यात कणिक मळून पाहिली नाही कधी? पहावी का? नॉट अ बॅड आयडिया!

Happy

म्हणजे आधी एक नवीन घर घ्या ( भाव कमी झाले आहेतच) त्याचा काउंटर पूर्ण रिकामी असताना तो Standing mixer ची तिथे स्थापना करून प्राण्प्रतिष्ठा इ. झालं की मग घरात आधीच असलेल्या उपकरणांनी उर्वरीत काउंटर भरा..
CUrrently that's a real big project....that's the reason why I bought Magic BUllet and this also might be reason I never went for FOod processor...we invested a lot in the real stuff...knives...;)

बघ नं शुम्पी त्यात कणीक मळुन....एकदा सगळे फायदे-तोटे कळले की आम्ही पण बघतो कुठला घेऊन कामात मदत होते का...:)

माझ्याकडे cuisinart चा आहे. साडे पाच वर्षापासून. रोज वापरते. पाहुणे पण भरपुर येतात आमच्याकडे. so अगदी अति वापर असतो.
डिश वॉशरमध्ये वरचा, खालचा रॅक जिथे जागा असेल तिथे लावते. ब्लेडही. काही झाल नाही आहे. हे मॉडेल आहे. ११ कप.

http://www.amazon.com/Cuisinart-DLC-2009CHB-Processor-Brushed-Stainless/...

झाकण लावायला कठिण वाटतय म्हटलय म्हणुन , फक्त एक दोन दिवस ट्रिक कळायला जातात. रिटर्न करण्यापुर्वी एकदा चान्स देईन मी तरी. HB ची मोटर फक्त ३५० W आहे.

किचनएडचा स्टँड मिक्सर आहे. तो ही अगदी मस्त चालतो. दोन्ही ब्रँडचा अनुभव इक्वली चांगला आहे.

झंपी , फुप्रोमध्ये गंधासारखे बारीक काही होत नाही.

अलिकडे हे घेतलय. भारी आहे एकदम. पटकन स्मुदी, चटणी ,वाटण वगैरे करायच असेल तर. छोटस आहे. किंमतही फक्त $२२. . खुप आवडल. cooks 5 in 1 Rocket

सीमा, ते पॉवर ब्लेंडर मॅजिक बुलेट सारखंच आहे.
$५० ची बुलेट परवा $२५ ला कॉस्टकोत पाहिली.
छान उपयोगी आहेत हे प्रकार.

Pages