फूड प्रोसेसर / मिक्सर / ग्राइंडर / चॉपर कोणता घ्यावा

Submitted by शूम्पी on 29 May, 2012 - 10:20

HBFPGoodOld.jpg
मी गेले १० वर्ष हॅमिल्टन बीच चा वरच्या फोटोतल्यासारखा फूड प्रोसेसर वापरत होते. तो किती मस्त होता ते मला तो स्वर्गवासी झाल्यावर समजले. तो मी साधारण $३० च्या आसपास घेतला होता. आठवड्यातून ३-४ वेळा वापरत होते. कणिक भिजवणे , भाज्या चिरणे, दाण्याचे कूट करणे, लसणाची कोरडी चटणी फिरवणे, (आई आली की) पुरण फिरवणे अशा नाना प्रकारच्या कामांसाठी. वापरायला तो अत्यंत सोपा आणि कमी कटकटीचा आणि सुटसुटीत होता. एकच ८ कप आकाराचं भांडं, एकच झाकण, १ चॉपिंग ब्लेड(त्यानेच कणिक पण छान मळली जायची), आणि एकच स्लायसिंग/श्रेडिंग ब्लेड, सर्व गोष्टी डिश वॉशर मध्ये बिंधास्त टाकता यायच्या.
खरतर, तो फूड प्रोसेसर नीट चालू होता (म्हणजे बटण, मोटर वगैरे) फक्त त्याच्या ब्लेडला खाली असणारी प्लॅस्टिक ची चकती तुटली होती तर मी लगेच तो रिसायकल मध्ये टाकला. मी त्यांच्या वेबसाइट वरून नुस्तं ब्लेड मागवायला हवं होतं असो. आता अक्कल येवून काही फायदा नाही. घाईघाईने आधी काय ते उरकायचं आणि मग सवडीने पश्चात्ताप करायचा...
सध्या माझी फूड प्रोसेसर क्वेस्ट सुरू आहे.
आखुड शिंगी वगैरे वगैरे हवा आहे. वापरायला सोप्पा, कमी कटकटीचा
गेल्या ८ दिवसात २ वेगळे फु प्रो आणून एकदा वापरून परत केले आहेत.
त्यातला एक होता हॅमिल्टन चा नविन मॉडेल आणि दुसरा होता किचन एड चा ९ कपांचा मॉडेल. त्यांची कहाणी प्रतिसादात लिहिते.
.
.
.
शेवटी पहिल्या पानावर अगोने रेकमेंड केलेला हा फु प्रो मी घेतला आणि मी माझ्या खरेदीवर फार खुष आहे!
HBFoodPro500Wt.jpg

रोजची पोळ्याची कणिक ह्यातच मळते. डिशवॉशरला टॉप रॅकमध्ये धुवायला टाकते. नो कटकट फु प्रो आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी घेतलाय मागच्या वर्षी फूड प्रोसेसर .. पण फारच कमी वेळा वापरला आहे .. फार साफ सफाई करावी लागते .. पण ज्या गोष्टींकरता वापरलाय त्याकरता रेझल्ट्स बेस्ट .. (पेस्टो, पाय क्रस्ट्स, एखाद दोन वेळेला ओलं वाटण) .. मॅजिक बुलेटही आहे .. तो अर्थातच जास्त वापरला जातो कन्व्हिनिअन्स् मुळे .. तोही छानच आहे ..

>> दोन्ही पन्नास-साठ डाॅलरमध्ये मिळतील
>> दोन्ही म्हणजे दोन्ही मिळून

माझी हौस फारच महागात पडली मग मला .. Wink

दोन्ही म्हणजे दोन्ही मिळून >>> हे सगळ्यात महत्त्वाचं वाक्य Happy थँक्स चिवा. मी या सगळ्या कूकिंग प्रकारात खूप जास्त मुरलेली नाहीये त्यामुळे जरासं जास्त कन्फ्युजन आहे.

बस्के, ज्ञाती आणि स्वराली... थँक्स गं!! Happy

रमड, भाज्या चिरण, पिठ मळण हातानेही करता येईल पण मसाला बारीक वाटता येईल असाच ग्राईन्डर घे Happy

दिविजाबेन, द ब्लॅक फ्रायडे डाॅट काॅम वर जावे. तिथून मेसीज च्या अॅड वर जावे. पान क्र ६/७ वर डाव्या कोपच्यात अॅड आहे. रजिस्टर्ड प्राइस ४९$ - डोअरबस्टर २९$ ... बास का बाई.. हे आता आम्ही तुम्हाला सांगायचं म्हणजे अगदी लाजवून राह्यले की.. डायरेक्ट मेसीच्या साइटवर ्ॅड लोड व्हायला जमाना लागतो, तस्मात वरील साइटवर जगभरातील डील्स पाहावी.

दिविजाबेन, द ब्लॅक फ्रायडे डाॅट काॅम वर जावे. तिथून मेसीज च्या अॅड वर जावे. पान क्र ६/७ वर डाव्या कोपच्यात अॅड आहे. रजिस्टर्ड प्राइस ४९$ - डोअरबस्टर २९$ ... बास का बाई.. हे आता आम्ही तुम्हाला सांगायचं म्हणजे अगदी लाजवून राह्यले की.. डायरेक्ट मेसीच्या साइटवर ्ॅड लोड व्हायला जमाना लागतो, तस्मात वरील साइटवर जगभरातील डील्स पाहावी.
>>> ही साठा उत्तराची कहाणी...उतू नये मातू नये हे म्हणायचं राहिलं का चिवा? Wink

मी पण घेते मॅजोक बुलेट आता काळ्या शुक्रवारच्या व्रताचं वाण म्हणून.

माझ्याकडे पण मॅजिक बुलेट आहे, मस्त प्रकरण आहे पण इतक्या अ‍ॅडिशनल कपाची मला गरज पडत नाही त्यामुळे ते सगळ पडुन आहे, शिवाय माझ्याकडे बॉस कन्पनिचा भारतातुन आणलेला ३ भान्ड्याचा मिक्सर आहे त्याच्यात बरच काही होवुन जात. त्यामुळे मॅजिक बुलेट पण एवढा वापरला जात नाही, मी असच डील म्हणुन एकदा २९ ला मिळाला म्हणून आणी बेबी-बुलेट घेण्यापेक्षा बरा म्हणून घेतला.
पार्टी करणारे , सतत गोतावळा जमवणारे असाल तर फुप्रो बरा.

तोषवी, माझ्याकडे आहे. कणीक, स्मूदीज, शेंगदाण्याचा कूट, धिरड्यांसाठी जाडसर बॅटर असले प्रकार होतात. पण दोश्याचं बॅटर, मुख्यतः भिजलेले तांदूल अजीबात चांगले होत नाहीत. बरीच कणी राहते.

त्यापेक्षा मला ऑटो आयक्यू- न्यूट्री निंजा आवडला. कणीक मळणं करून बघितलं नाही. जार्स तेवढे मोठे नाहीत. पण बाकी सगळं मस्तं होतं. अल्ट्राब्लेंड सेटिंगवर सगळ्याचं गंध! Happy

मेसीज मधे २ होते सेल वर. २९ चा आणि ४९ चा. त्यातला २९ चा कोणी घेत्ला आहे का? कसा आहे? त्यावर लिहील होत do not run more than 10 sec. म्हणुन कन्फ्युज झाले.

माझ्या मैत्रिणीची बहीण बरोबर होती. तिने सांगितले त्यांच्याकडे 'हाच' आहे आणि त्यात भेळेच्या चटण्या छान होतात.

कुणी कुणी काय घेतले ते वापरून मग इथे लिहा की सविस्तर.

क्युझिनाआर्टचा ब्लेंडर+फुप्रो असा जो सेट मिळतो तो पण चांगला आहे. एकदम कॉम्पॅक्ट आहे. दोन्हीला मिळून एकच बेस आहे. अगदीच शिकार-बिकार करत नाहीत बिचारे पण ब्लेंडरमध्ये मिल्कशेक, प्युर्‍या, इडली-दोसा बॅटर (अगदी गंध उगाळल्यासारखे होते जर इडली रवा वापरला तर(च)), इतर ओले मसाले होतात. फुप्रोमध्ये मेदुवडयाचं बॅटर, वाटल्या डाळीसाठी डाळ, मक्याच्या चिवड्यासाठी दाणे भरडणे, कणिक, करंज्यांसाठी भिजवलेला रवा तिंबणे, भाज्यांच्या चकत्या, कीस, दाण्याचा भरड कूट, कोरड्या चटण्या इ. होते.

इथे थोड्या काळासाठी आला असाल किंवा भाड्यानं ओटा लहानसा बांधला असेल तर तर हे काँबो बेस्ट आहे माझ्या मते.

do not run more than 10 sec. >> माझी पोरगी रगडते तो दहा सेकंदाच्या वर नि अजूनही नीट चालतोय.

स्वराली व्होल्टेज कन्व्हर्टर वापरून चालेल बहुदा. भारतात आला असेल ना स्टँड मिक्सर.
मी हल्ली स्टँड मिक्सर मध्ये उडिद वड्याच पीठ वगैरे बीट करून मग वडे तलतीये. एकद जास्त हल्के होताहेत असा माझा अनुभव.

मी फिलीप्स चा फुड प्रो घेतला ५ महिन्यापुर्वी.मुख्य काम कणीक ,ज्युस आनि वाटण करण.मला मेन प्रोब्लेम जाणवला तो कणीक मळण्याचा... अंदाज घेऊन कनीक आनि पाणी एकत्र करता करता कधी जास्त तर कधी पीठ व्हायच.माहेरी अंजली चा फु.प्रो होता आनि त्यात मापाची भांडी (१ कणीक- १ पाणी )दिली होती.शेवटी प्रयोग करण सोडुन ती मापाची भांडी मागवुन घेतली आनि काम सुरळीत आनि वेळेत होऊ लागल.
घेतानाच जवळ जवळ प्रत्येक ब्रॅण्ड च्या फु.प्रो ला अशी माप-भांडे मिळ्ते का हे मी सेल्समन ला विचारत होते.आनि प्रत्येक जण आताच्या अव्हलेबल असलेला फु.प्रो असली भांडी मिळत नाही. हे सांगत होता.
बाकी फु.प्रो वर कसे काय करता तुम्ही लोक्स ???

Pages