फूड प्रोसेसर / मिक्सर / ग्राइंडर / चॉपर कोणता घ्यावा

Submitted by शूम्पी on 29 May, 2012 - 10:20

HBFPGoodOld.jpg
मी गेले १० वर्ष हॅमिल्टन बीच चा वरच्या फोटोतल्यासारखा फूड प्रोसेसर वापरत होते. तो किती मस्त होता ते मला तो स्वर्गवासी झाल्यावर समजले. तो मी साधारण $३० च्या आसपास घेतला होता. आठवड्यातून ३-४ वेळा वापरत होते. कणिक भिजवणे , भाज्या चिरणे, दाण्याचे कूट करणे, लसणाची कोरडी चटणी फिरवणे, (आई आली की) पुरण फिरवणे अशा नाना प्रकारच्या कामांसाठी. वापरायला तो अत्यंत सोपा आणि कमी कटकटीचा आणि सुटसुटीत होता. एकच ८ कप आकाराचं भांडं, एकच झाकण, १ चॉपिंग ब्लेड(त्यानेच कणिक पण छान मळली जायची), आणि एकच स्लायसिंग/श्रेडिंग ब्लेड, सर्व गोष्टी डिश वॉशर मध्ये बिंधास्त टाकता यायच्या.
खरतर, तो फूड प्रोसेसर नीट चालू होता (म्हणजे बटण, मोटर वगैरे) फक्त त्याच्या ब्लेडला खाली असणारी प्लॅस्टिक ची चकती तुटली होती तर मी लगेच तो रिसायकल मध्ये टाकला. मी त्यांच्या वेबसाइट वरून नुस्तं ब्लेड मागवायला हवं होतं असो. आता अक्कल येवून काही फायदा नाही. घाईघाईने आधी काय ते उरकायचं आणि मग सवडीने पश्चात्ताप करायचा...
सध्या माझी फूड प्रोसेसर क्वेस्ट सुरू आहे.
आखुड शिंगी वगैरे वगैरे हवा आहे. वापरायला सोप्पा, कमी कटकटीचा
गेल्या ८ दिवसात २ वेगळे फु प्रो आणून एकदा वापरून परत केले आहेत.
त्यातला एक होता हॅमिल्टन चा नविन मॉडेल आणि दुसरा होता किचन एड चा ९ कपांचा मॉडेल. त्यांची कहाणी प्रतिसादात लिहिते.
.
.
.
शेवटी पहिल्या पानावर अगोने रेकमेंड केलेला हा फु प्रो मी घेतला आणि मी माझ्या खरेदीवर फार खुष आहे!
HBFoodPro500Wt.jpg

रोजची पोळ्याची कणिक ह्यातच मळते. डिशवॉशरला टॉप रॅकमध्ये धुवायला टाकते. नो कटकट फु प्रो आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सीमा, "cooks 5-in-1 Rocket Power Blender" ह्यात चटण्या, वाटण एकदम बारीक होतं का?

हायला, इतकी चर्चा एक तासात.

सर्वांना धन्यवाद.
लोला, किचनएड आहे हो. मेड गलतीसे चूकून हो गया.

-----------

मला आता हॅमिल्टन बघावासा वाटतोय. इतके कौतूक एकले की.. Happy
व cuisinart बघायला पाहिजेल. भाज्या कापणं वगैरे बोरींग काम आहे.

कणिक मळायचे काम घरातील दुसर्‍याकडे कायम आहे. उगाच काढून घेत नाही. काम काढून घेवून कोणाच्या पोटावर पाय देणं बरं दिसणार नाही. Proud

मी काल २ फूड प्रोसेसर वॉलमार्ट वरून ऑर्डर केले आहेत. एक मेरा वाला पुरानाच आणि दुसरा हॅमिल्टन चाच अगो वापरत होती तो. कोणता जास्त आवडतो ते ठरलं की उरलेला परत करणार.

अगो वापरत होती त्याचे डिझाईन शूम्पीने आधी जे दोन आणले तसे आहे त्यामुळे तिला तो आवडणार नाही. म्हणजे ती पुरानावालाच ठेवणार.

हे असे वापरून अदलाबदली करून घेतात का परत? आवडतो का बघणार म्हणजे थोडा काळ वापरावा लागणार ना म्हणून हा सहज प्रश्ण. Happy

लोला इथे पैजा लावायचा विचार आहे का? Happy
झंपी, हो. एकदा वापरून बघणार १०-१५ वेळा नाही. किचनेड चा घेतला तेव्हा रिटर्न पॉलिसी विचारली होती. ते म्हणाले की आवडला नाही तर बिंधास्त परत करा, वापरला असला तरी. Happy

सॉरी रचु. मी प्रश्न वाचलाच नाही तुझा.आपल्या इंडियन मिक्सर सारख गंधासरख बारीक ग्राईंड नाही होणार.
पण शेंगदाण्याचा कुट, खोबर्‍याची चटणी , डाळीची चटणी वगैरे एकदम मस्त होते.
मो, हो मला पण तसच वाटल.

अगं माझ्याकडे हॅमिल्टन चा ब्लेंडर आहे त्यात पाणी घातलं तर सर्व व्यवस्थित वाटलं जातं पण कोरडं काहीच वाटलं जात नाही म्हणुन विचार करत आहे की मॅजिक बुलेट घ्याव का की दुसरा एखादा बघावा Happy

रचु, फूडप्रोसेसरमध्ये कोरड्या वस्तू रवाळ वाटल्या जातात. चटणी, दाण्याचं कूट, रवाळ वाटायच्या डाळी ह्यासाठी बेस्ट. कोरडे मसाले बारीक दळायचे असतील तर कॉफीग्राईंडरमध्ये चांगले होतात Happy

मला अगो ने रेकमेंडकेलेला हॅमिल्टन बीच चा १० कप चा २ स्पीड असलेला फूड प्रोसेसर पसंत पडला आहे. Happy

माझ्याकडे होता तसाच आणला होता तो ही छान आहे फक्त तो ८ कपांचा आहे आणि त्याला एकच स्पीड आहे आणि ३०० वॉट ची मोटर आहे म्हणून वरचा जास्ती कपॅसिटीचा आणी थोड्या जास्ती पावरचा निवडला. क३९.८८$३९.८८
स्वस्त आणि मस्त मॉडेल!

कॉफी ग्राईंडरबद्दल अगोला अनुमोदन! अगदी बारीक होते त्यात. माझे कॉफी कम स्पाईस ग्राईंडर आहे.
मॅजिक बुलेट पण मला आवडते. पण बाकीचे ज्युस वगैरे बनवण्याचे कप्स कधी वापरले जात नाहीत माझे.
शुंपी, अभिनंदन. Happy अगो तुझंही अभिनंदन. तुझं प्रोसेसर गेम जिंकलं Happy

वा,वा, 'आखुडशिंगी, बहुदुधी' मिळाला का मनासारखा. छान झाले Happy
मो Happy कॉफीग्राईंडर घेताना त्याचे भांडे निघून येते का ते बघून घ्यावे. बर्‍याच कॉग्राची भांडी फिक्स्ड असतात. नुसती पुसून घ्यायची. वेगवेगळे मसाले दळायचे तर प्रॉब्लेम होतो. तसेच वेळप्रसंगी अगदी थोड्या प्रमाणात कांद्याची, आलं-लसणाची पाणी न घालता पेस्टही करता येते त्यात.

अभिनंदन शुम्पी....:)

आता त्यात पीठ मळताना पाण्याचं प्रमाण कसं ठरवता तेही लिहा नं कुणी??

मो माझ्याकडे ते ज्युसचे कप आहेत नं त्यात मी स्ट्रॉबेरी दूध आणि थोडा सुका मेवा असं जोरदार फिरवून मुलांना देते.. आणि मोठा चमचा घालून दिलं की मुलं मजेत खातात्/पितात... जशी कंसिस्टंसी असेल त्याप्रमाणे....
प्रत्य्केकाल एकेक कप देता येतो आणि झालं की डीश वॉटरला...वापरून बघा....:)

प्रमाण कसं ठरवता... म्हणजे असा एक परफेक्ट नाही पण ढोबळ अंदाज....याबद्दल माहिती हवी होती..म्हंजे थोडा धीर येईल.नुस्त हळूहळू थोडं रिस्की वाटतंय..;)

रिस्कीच आहे ते. Proud
वरच्या ट्यूब मधून हळूहळू घालायचं म्हणे. कळलं नाही तर मशीन थांबवून झाकण उघडून मिश्रणाला हात लावून बघायचं. Wink
नाहीतर स्वतः प्रयोग करुन पीठ आणि पाणी यांचं प्रमाण ठरवायचं आणि त्या प्रमाणात घ्यायचं..
देवा!

मे वाटच बघत होते कधी लोला टपकते आणी स्टँड मिक्सर ची जाहिरात/प्रस्तावना करते Happy
वेका तू सरळ कणकेसाठी $२५० चा किचनेड चा स्टँड मिक्सर घेउनच टाक.
भानगडच नको अंदाच मेरा मस्तानाची.

धन्स लोला...मी पोळ्या करणे हीच मोठी रिस्क आहे.. Wink इकडच्या कणीकेच्या .....हे अवांतर

सगळ्या पोळी रिलेटेड रेसिपी मध्ये कधीच पाण्याचं प्रमाण दिलेलं नस्तं न ही मोठीच रिस्क ...(आमच्यासारख्यांसाठी) Proud

तो मिक्सर घ्यायला मला फक्त मागे सांगितलं नं तसं प्राणप्रतिष्ठा इ. ची गरज आहे गं शुम्पी.:.. Wink

हा हा...अगं रिस्क असली तरी ती इतकी वर्षे घेतलेली (किंवा घ्यावी लागलेली) रिस्क आहे नं..म्हणून त्यातल्या त्यात काही फरक पडेल का त्याचा अंदाज घेत होते....;)

55 टक्क्यांचं गणित....:P
अबोली, मला चुकून मी हापिसातला रिस्क mangaement च कागदपत्र वाचते की काय असंच वाट्लं... Happy

५५% Wink
बरं, अगं सुजताच्या ( किंवा दुसर्या कुठल्यातरी, मला आता आठवत नैय्ये ) पाकिटावर लिहिलं आहे की १ कप पिठाला १/३ कप पाणी घ्यावे. मला ती कणीक थोडीशी घट्ट वाटते, आणि १/२ पाणी घेतले की फार सैल वाटते, म्हणून मी १/३ पेक्शा थोडे जास्त घेते.
तू १/३ ने सुरुवात कर, येईल तुला अन्दाज.
आणि हो, स्टँड मिक्सरच हं Wink

हॅमिल्टन बीच Happy मला खूप आवडला. माझ्याकडे छोटाच आहे ८ कप आणि सिंगल स्पीड वाला. इथे येउन मला कणीक मळणे हेच एक टेन्शन होते. पण हे हॅमिल्टन राव भारी आहेत. Happy कणिक मस्त होते.. ईडली साठी डाळ वगैरे वाटणं पण जमलं. बेश्ट Proud

आता मला एक सांगा मुलींनो.. आख्खा गरम मसाला.. कांदा खोबर्‍याचे वाटण बनवण्यासाठी कुठला मिक्सर गाईंडर घ्यावा ?

ह्या विकांताला हॅमिल्टन बीच वापरून चिकन बनवले.. पण वाटण म्हणावे तेव्हढे छान नाही वाटले गेले Uhoh

माझ्याकडे हा एक ब्लेंडर आहे. कुणी वापरलाय का ? काय काय करता येते ह्यात ?

हॅमिल्टन चा मोठा भाउ चांगला आहे का वाटणा साठी .. की कॉफी ब्लेंडर घेउ ? Uhoh
सांगा सांगा लवकर सांगा Wink

Pages