फूड प्रोसेसर / मिक्सर / ग्राइंडर / चॉपर कोणता घ्यावा

Submitted by शूम्पी on 29 May, 2012 - 10:20

HBFPGoodOld.jpg
मी गेले १० वर्ष हॅमिल्टन बीच चा वरच्या फोटोतल्यासारखा फूड प्रोसेसर वापरत होते. तो किती मस्त होता ते मला तो स्वर्गवासी झाल्यावर समजले. तो मी साधारण $३० च्या आसपास घेतला होता. आठवड्यातून ३-४ वेळा वापरत होते. कणिक भिजवणे , भाज्या चिरणे, दाण्याचे कूट करणे, लसणाची कोरडी चटणी फिरवणे, (आई आली की) पुरण फिरवणे अशा नाना प्रकारच्या कामांसाठी. वापरायला तो अत्यंत सोपा आणि कमी कटकटीचा आणि सुटसुटीत होता. एकच ८ कप आकाराचं भांडं, एकच झाकण, १ चॉपिंग ब्लेड(त्यानेच कणिक पण छान मळली जायची), आणि एकच स्लायसिंग/श्रेडिंग ब्लेड, सर्व गोष्टी डिश वॉशर मध्ये बिंधास्त टाकता यायच्या.
खरतर, तो फूड प्रोसेसर नीट चालू होता (म्हणजे बटण, मोटर वगैरे) फक्त त्याच्या ब्लेडला खाली असणारी प्लॅस्टिक ची चकती तुटली होती तर मी लगेच तो रिसायकल मध्ये टाकला. मी त्यांच्या वेबसाइट वरून नुस्तं ब्लेड मागवायला हवं होतं असो. आता अक्कल येवून काही फायदा नाही. घाईघाईने आधी काय ते उरकायचं आणि मग सवडीने पश्चात्ताप करायचा...
सध्या माझी फूड प्रोसेसर क्वेस्ट सुरू आहे.
आखुड शिंगी वगैरे वगैरे हवा आहे. वापरायला सोप्पा, कमी कटकटीचा
गेल्या ८ दिवसात २ वेगळे फु प्रो आणून एकदा वापरून परत केले आहेत.
त्यातला एक होता हॅमिल्टन चा नविन मॉडेल आणि दुसरा होता किचन एड चा ९ कपांचा मॉडेल. त्यांची कहाणी प्रतिसादात लिहिते.
.
.
.
शेवटी पहिल्या पानावर अगोने रेकमेंड केलेला हा फु प्रो मी घेतला आणि मी माझ्या खरेदीवर फार खुष आहे!
HBFoodPro500Wt.jpg

रोजची पोळ्याची कणिक ह्यातच मळते. डिशवॉशरला टॉप रॅकमध्ये धुवायला टाकते. नो कटकट फु प्रो आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फुड प्रोसेसर्च्या एइवजी चांगला मिक्सर घ्या..... फुप्रो आणि व्हॅक्ली या दोन गोष्टी फक्त डेमोच्या वेळएसच चांगल्या वाटतात Proud

फुड प्रोसेसर्च्या एइवजी चांगला मिक्सर घ्या>> नाही नाही. दोन्ही ची अ‍ॅप्लिकेशन्स वेगवेगळी आहेत तेव्हा दोन्ही घ्याच Happy

फुप्रोच घ्यायचा आहे. बजाज चा कोणता वापरतेयस चैत्राली? मी २-३ दुकानात चौकशी केली तर त्यांनी रिको बेस्ट आहे सध्या असे सांगितले. बजाज ६०० पॉवर आणि रिको ७५० पॉवर. रिको मध्ये खोबरं खवण्याची अटॅचमेन्ट आहे, कोणी वापरलीय का ही अटॅ? खोबरं खवता येत का व्यवस्थित?

बजाजच्या फुप्रोच्या किंमतीत इतकी तफावत का आहे? त्याची एमआरपी ६५३० समथिंग आहे, बहुतेक दुकानदार ५००० पर्यंत तयार होतात. स्टार सीजे वर तर ३८९० आसपास आहे. कोणाला काही माहिती?

माझ्याकडे आहे बजाजचा एफ एक्स १०. तसा चांगलाय, पण त्याच्या ब्लेदची पाती तितकीशी (माझ्या जुन्या महाराजा व्हाइटलाइन इतकी) धारधार नाहीयेत. टॉमॅटो चांगला बारिक चिरला जात नाही.
फिलिप्सचा पण छान आहे फुपो - ७०० किंवा ७५० वॅटचा आहे फिलिप्सचा. बाकी बहूतेक सगळे महाराजा, बजाज, केनस्टार इ. ६५० वॅटचेच आहेत.
रिकोचा अनुभव नाही.

माझ्याकडे बजाज चा FX10 आहे. नक्की लक्षात नाही, पण किंमत ३२०० - ३५०० च्या आसपास होती. ६५३० -५००० म्हणजे फारच आहे. छोटं भांडं वापरताना मोठं भांडं पण compulsory लावावं लागतं एव्हढीच मला कटकट वाटते. नाहीतर वर हेडर मधे शुम्पीने लिहिल्याप्रमाणे कणिक भिजवणे , भाज्या चिरणे, दाण्याचे कूट करणे, पुरण फिरवणे,ताक करणे अशा नाना प्रकारच्या कामांसाठी वापरायला तो अत्यंत सोपा आणि कमी कटकटीचा आणि सुटसुटीत आहे.

माझा लाडका ब्राउनचा मल्टि क्विक हँडब्लेंडर/ ग्राईंडर kaput झाला.
त्यात २-३ कप कॅपसिटीचा जार होता - ज्यात दाण्याचं कूट, टोमेटो / कांदा बारीक चिरणे, भिजवलेली चण्याची डाळ भरड वाटणे अशी कामं होत होती.
एक इमर्शन अटॅचमेंट होतं ज्याने पालक / टोमेटो प्युरे करणे , मिल्क शेक वा स्मूदी ब्लेंड करणे , सूप / पास्ता सॉस ब्लेंड करणे, चक्का -साखर मिसळ्णे अशी कामं होत होती.
शिवाय एक बीटर अटॅचमेन्ट होती ज्याचा वापर केक , कपकेक बॅटर साठी व्हायचा.
एक नीडिंग अटॅच्मेंट होती -पण मी कधी ब्रेड डो वगैरे केलं नाही.

आता तसलं मॉडेल बनवतच नाहीत ब्राउन वाले. तर हे सर्व एकात होईल असलं काही प्रॉड्क्ट कोणी वापरलंय का ?

मेधा, अगं नशीबवानच तू एकात सगळं होणारं एकतरी प्रॉडक्ट वापरलंस Happy
मी कुट्/चट्ण्यासाठी मॅजीक बुलेट्ला प्रथम पसंती. मग लागेल तसं एखादा ब्लेंडर, फुप्रो असं काहीबाही घेऊन कलेक्शन वाढवायच Proud

मेधा, इतका लाडाचा होता तर एकदा ब्राउअन च्या कस्टमर केयर ला इमेल कर आणि बघ काय म्हणतात ते. मॉडेल जरी रिटायर केलं असेल तरी स्पेअर पार्टस ते पाठवतात. कोणता छोटासा पार्ट बदलून चालू होणार असेल तर प्रयत्न करायला काहीच हरकत नाही.

मी मागे माझा सनबीम च्या(मॅजिक बुलेट ऑन बजेट) ब्लेडची रबराची चकती गेल्याने मॅ. बु. घ्यायचा विचार करत होते पण जनरल कस्टमर केयर ला इमेल केली तर त्यांनी अजून एक ब्लेड ची अटॅचमेंतच पाठवून दिली होती. सुखद अनुभव होता तो.

तात्पर्यः लाडाच्या ब्लेंडर/फुप्रो/मिक्सर वर गिव्ह अप मारु नये. Proud

http://www.braunhousehold.com/global/All-Products/Food-Preparation/hand-... हा बघ ना मेधा. यात मळणं नाही होत. पण बाकी सगळं आहे.
माझ्याकडे पण ब्राउन मल्टी॑क्विक आहे, ६०० वॅट टर्बो. मळण्याची अ‍ॅटॅचमेंट नाहीये त्यात, पण

<<त्यात २-३ कप कॅपसिटीचा जार होता - ज्यात दाण्याचं कूट, टोमेटो / कांदा बारीक चिरणे, भिजवलेली चण्याची डाळ भरड वाटणे अशी कामं होत होती.
एक इमर्शन अटॅचमेंट होतं ज्याने पालक / टोमेटो प्युरे करणे , मिल्क शेक वा स्मूदी ब्लेंड करणे , सूप / पास्ता सॉस ब्लेंड करणे, चक्का -साखर मिसळ्णे अशी कामं होत होती.
शिवाय एक बीटर अटॅचमेन्ट होती ज्याचा वापर केक , कपकेक बॅटर साठी व्हायचा.>>
हे सगळं आहे.
त्यांच्या साइटवर एक चक्कर मारून बघ. छान आहेत सगळेच प्रॉडक्ट्स.

आमचा बजाजच आहे चांगला आहे !फुप्रो. पण एकावेळी दोन्ही फिरतात. फुप्रो. बंद राहात नाही मिक्सर कॅप लाऊन बंद होते फुप्रो. काम नसतानाही सोबत फिरत राह्ते.

बजाजचा वापरतेय वर्ष-दिड वर्षापासून. चांगला आहे. फक्त त्याच्या फुडप्रोसेसरमध्ये कांदा /टॉमॅटॉ माझ्या जुन्या महाराजा इतकं छान बारिक होत नाही.

फिलिप्सचा छान आहे वरदा. त्याची मोटर बरीच पॉवरफुल आहे. जनरली ६०० वॅटची असते सगळ्या फुपोची मोटर. फिलिप्सची ७०० की ७५० ची आहे. जावेकडे ३ वर्षांपासून आहे. मस्त चाललाय. फक्त त्याचं भांडं लवायचं टेक्निक बाकी सगळ्यांपेक्षा खूप वेगळं आहे.

मी विकत घ्यायला गेले त्यावेळी मला ते हाताळायला किचकट वाटले म्हणून मी घेतले नाही. आता जावेच्या घरी वापरून बघितलं तर वापरायला काहीही त्रास झाला नाही. दोन तिन वेळा वापरल्यावर सवय पण झाली . Happy तू आधी दुकानात एकदा हाताळून बघ आणि मगच ठरव.

ओके. मला नेटवर फिलिप्सचे दोन फुप्रो दिसताहेत. एक ५०० आणि एक ७५० वॅ. चा. पण दोन्हीत नक्की काय फरक आहे हे वाचूनही लक्षात आलेलं नाहीये.
भाज्याअ चिरायला स्टीलचं ब्लेड चांगलं का पॉलीकार्बोनेट पण तितकंच चांगलं/धारदार असतं?

एक ५०० आणि एक ७५० वॅ. चा. पण दोन्हीत नक्की काय फरक आहे हे वाचूनही लक्षात आलेलं नाहीये.>>>

'एक ५०० आणि एक ७५० वॅ.' हाच फरक आहे. Happy

ते वरून हँडलसारखं लावायचं प्रकरण सवयीचं नाहीये.>>> त्या हँडलमुळे मिक्सर चालू असताना झाकणावर हात ठेवून उभे राहावे लागत नाही.

फिलिप्स, केनस्टार, ब्राउन चांगले आहेत. पण महाग आहेत.
इनाल्साही चांगला आहे. Happy

जावेकडचा ७५० वाला आहे. मेजर फरक दोन्हीमध्ये मोटरच्या कॅपॅसिटीचा आहे.
७५० - चार भांडी आहेत. फुपो जार १ ली, बाकी २.२ ली, १.६ ली, १ ली आणि ०.४ ली अशी वेगवेगळी भांडी.
५०० - २ भांडी. एक फुपो चे आणि एक मिक्सरचे.

स्पीड सेटींग्ज पण एकात २ आहेत एकात ३ आहेत.

जर फिलिप्सचा घ्यायचा असेल तर ७५० वाला घे. त्या ५०० वॅ वाल्या बजाज, महाराजा व्हाइटलाइन इ चांगले.

आत्तापर्यंतच्या सगळ्या फुपो मध्ये भाज्या चिरायला स्टीलचंच ब्लेड बघितलं आहे. पॉलीकार्बोनेट्बद्दल माहित नाही.

फिलिप्स, केनस्टार, ब्राउन चांगले आहेत. पण महाग आहेत.>>> हो.

जर कणिक मळायची नसेल तर नुसत्या चिराचीरीसाठी ब्राउनचा मल्टीक्विक हँड ब्लेंडर मस्त आहे. हा वापरायला लागल्यापासून माझा फुप्रोचा वापर बंद झालाय. कधी पोळ्यावाली आली नाही तर कणिक मळण्यापुरता आणि अर्थात मिक्सरवर चटण्या / कोरडे मसाले करताना आणि इडली वैगरेसाठी वाटतानाच वापर होतो. वर मी लिंक दिलिये.

अमेरिकेत वापरता येईल असा फूड प्रोसेसर कोणता घ्यावा? भारतातून घेऊन जावा की तिथेच घ्यावा? मला कणिक मळणे, टोमॅटो प्युरे करणे, दाण्याचे कूट करणे, काजूची पेस्ट करणे, कांदा-आलं-लसूण-मिरची वाटण करणे, गाजर किसणे, बटाटा किसणे - यासाठी हवा आहे. शिवाय कांदा बारीक चिरणे, मिल्कशेक, ज्यूस वगैरे.

शुम्पे, हा तुझावाला बीपीए फ्री आहे का... फुप्रो घेताना हे बघण्याची गरज आहे का... मला आता हातानं कणिक भिजवायचा कंटाळा आला.. बादवे, तुझ्या फुप्रोमध्या कणिक भिजवू नका असं लिवलय तरी तू त्यांचं न ऐकता भिजवतेसच का? सर्व माहिती दे.. विकत घ्यायच्या उंबरठ्यावर उभी आहे.

हॅमिल्टनचे सर्व प्राॅडक्ट्स २०१० नंतर बीपीए फ्री असतात असं त्यांच्या कके ने सांगितलं, तस्मात आॅर्डर करणेत आला आहे. शुम्पे धन्यवाद..

Pages