फूड प्रोसेसर / मिक्सर / ग्राइंडर / चॉपर कोणता घ्यावा

Submitted by शूम्पी on 29 May, 2012 - 10:20

HBFPGoodOld.jpg
मी गेले १० वर्ष हॅमिल्टन बीच चा वरच्या फोटोतल्यासारखा फूड प्रोसेसर वापरत होते. तो किती मस्त होता ते मला तो स्वर्गवासी झाल्यावर समजले. तो मी साधारण $३० च्या आसपास घेतला होता. आठवड्यातून ३-४ वेळा वापरत होते. कणिक भिजवणे , भाज्या चिरणे, दाण्याचे कूट करणे, लसणाची कोरडी चटणी फिरवणे, (आई आली की) पुरण फिरवणे अशा नाना प्रकारच्या कामांसाठी. वापरायला तो अत्यंत सोपा आणि कमी कटकटीचा आणि सुटसुटीत होता. एकच ८ कप आकाराचं भांडं, एकच झाकण, १ चॉपिंग ब्लेड(त्यानेच कणिक पण छान मळली जायची), आणि एकच स्लायसिंग/श्रेडिंग ब्लेड, सर्व गोष्टी डिश वॉशर मध्ये बिंधास्त टाकता यायच्या.
खरतर, तो फूड प्रोसेसर नीट चालू होता (म्हणजे बटण, मोटर वगैरे) फक्त त्याच्या ब्लेडला खाली असणारी प्लॅस्टिक ची चकती तुटली होती तर मी लगेच तो रिसायकल मध्ये टाकला. मी त्यांच्या वेबसाइट वरून नुस्तं ब्लेड मागवायला हवं होतं असो. आता अक्कल येवून काही फायदा नाही. घाईघाईने आधी काय ते उरकायचं आणि मग सवडीने पश्चात्ताप करायचा...
सध्या माझी फूड प्रोसेसर क्वेस्ट सुरू आहे.
आखुड शिंगी वगैरे वगैरे हवा आहे. वापरायला सोप्पा, कमी कटकटीचा
गेल्या ८ दिवसात २ वेगळे फु प्रो आणून एकदा वापरून परत केले आहेत.
त्यातला एक होता हॅमिल्टन चा नविन मॉडेल आणि दुसरा होता किचन एड चा ९ कपांचा मॉडेल. त्यांची कहाणी प्रतिसादात लिहिते.
.
.
.
शेवटी पहिल्या पानावर अगोने रेकमेंड केलेला हा फु प्रो मी घेतला आणि मी माझ्या खरेदीवर फार खुष आहे!
HBFoodPro500Wt.jpg

रोजची पोळ्याची कणिक ह्यातच मळते. डिशवॉशरला टॉप रॅकमध्ये धुवायला टाकते. नो कटकट फु प्रो आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा धागा पुन्हा वर काढते आहे. माझ्याकडच्या मॅजिक बुलेट ने ऑलमोस्ट राम म्हटला आहे. नवर्‍याकडे आधीपासून असलेला Cuisinart कसाबसा चालू आहे. पण त्याचं काही खरं नाही. शिवाय त्यात गोष्टी खूप बारीक होत नाहीत. मला इडली-डोशाची पिठं, प्युर्‍या, ओली वाटणं (चिकन/फिश करी साठी लागणारी), चटण्या (ओल्या नारळाची टाइप) हे सगळं करता येईल असा मिक्सर्/ब्लेंडर घ्यायचा आहे. अमेरिकेतल्या एक्स्पर्टांनो, प्लीज मदत करा.
मी बेड बाथ अँड बियाँड मधे हे २ ब्लेंडर पाहिले. त्यातला कुठला वरच्या सर्व कामांसाठी उपयुक्त आहे का? -

१.
blender1.jpg
हा 700W चा आहे. ही याची माहिती -
https://www.blackanddeckerappliances.com/products/blenders-and-juicers/c...

२.
blender2.jpg
हा 800W चा आहे. ही याची माहिती -
https://www.oster.com/blenders-juicers/kitchen-blenders/oster-master-ser...

यातला कुठलाही उपयोगाचा नसेल तर दुसरा कुठला मिक्सर सजेस्ट कराल?

आमच्या अनुभवा नुसार अमेरिकेतले सगळे ब्लेंडर्स भारतीय (एस्पेशियली मालवणी) स्वैपाका करता कुचकामी आहेत. आमचा सध्याचा बर्न रेट साधारण वर्षाला एक असा आहे. यात ऑस्टर, न्युट्रिबुलेट, किचनेड, क्विझिनआर्ट आणि कॉस्कोत मिळणार्या सगळ्या ब्लेंडर्सचा समावेश आहे...

बर्न रेट बद्दल फारशी चिंता नाही कारण तेवढा रेग्युलर वापरही नसेल. पण यातल्या कशातही वाटण वगैरे चांगलं स्मूथ आणि कमीत कमी पाणी घालून होतं का हा प्रश्न आहे.

ऑस्टर घेऊ नकोस, फारसा वापर नसून सुद्धा माझा ६ महिन्यात बंद पडला. >>> बरं झालं सांगितलंस. तो बाद करते मग माझ्या लिस्ट मधून.

न्यूट्रीबुलेट ६०० किंवा ९०० W वाला कसा आहे? कोणी वापरलाय का बॅटर, चटण्या, वाटणांसाठी?

मी न्यूट्रीबुलेट १२०० W वाला घेतला आहे. त्यात वाटण वगैरे होते चांगले. चटण्याही होतात कोरड्या असतील एकदम तर.
इडली डोश्याचे पिठ थोडेसे असेल तर वाटते मी. छान वाटल्या जाते मात्र मिक्सर जसा गरम होतो तसा हा पण गरम होतो ते वाटताना.

माझ्याकडे १९९० मधला ऑस्टर मिक्सर आहे. पहिली पंधरा वर्षे त्यात इडली / डोश्याची पीठं, ओल्या/ सुक्या चटण्या , वेगवेगळे मसाले होत असत. भारतात त्या मिक्सरच्या बेसवर फिट होणारे छोटे जार मिळायला लागले ते तर भरपूर वापरले. १०-१२ वर्षांपूर्वी इडली/ डोसा साठी अल्ट्राचा ग्राइंडर घेतला. त्यामुळे ऑस्टर आता फक्त चटण्या आणि मसाले याकरता वापरतो. आठवड्यातून १-२ वेळा वापरला जातो तो मिक्सर अजूनही. ( आता दृष्ट काढते त्याची Happy )

एक जडभूत व्हिटामिक्स आहे. त्यात स्मूदी, मार्गरिटा , मिल्क शेक असे प्रकार किंवा मोठ्या प्रमाणात कोथिंबीर चटणी / कोल्हापुरी रस्सा अशी वाटणं होतात.

पेरू : जास्ती पाणी घालावं लागतं का वाटणासाठी? आणि एकदम कोरड्या असतील तर चटण्या होतात म्हणजे कश्या?

मेधा : करेक्ट. मला वाटतं याच धाग्यावर तुझी ऑस्टर बद्दल पोस्ट वाचली होती. पण ते मॉडेल आता मिळत नाहीये आणि आत्ताच्या मॉडेल मधे तेच सगळं होत नाहीये बहुतेक. Sad शिवाय ओटा छोटा असल्याने २-३ मिक्सर बाळगणं अवघड जाणारे. तुला एखादा चांगला मिक्सर माहिती असेल तर प्लीज सांग.

वाटणं, कोरड्या चटण्या, स्मूदी, मिल्कशेक्स, ज्युचेस या सर्वांसाठी आम्ही बेला कंपनीचा स्मुदी मेकर वापरतो. एका मैत्रिणीनं गिफ्ट दिला होता तो ४ वर्ष वापरून झाल्यावर गेल्या वर्षी घरगुती खतं तयार करण्याच्या उद्योगात मोडला. आता पुन्हा त्याच कंपनीचं तेच मॉडेल घेतलं आहे.

हा वर ऑस्टरचा फोटो आहे तसं २ इन १ ब्लेन्डर आणि फुप्रो मॉडेल मिळतं क्युझिनाआर्टचं. ब्लेन्डरमध्ये इडली दोश्याची पिठं आणि फुप्रोमध्ये भाज्यांच्या चकत्या, कीस, मेदुवड्याचं पीठ, हलव्यासाठी किंवा वाटल्या डाळीसाठी डाळ, करंज्या/चिरोट्यांची पिठं मळणे (***) इ. कामं होतात. दोन्ही अगदी कॉम्पॅक्ट असल्यानं ओट्यावर राहिले तरी चालतात पण काम झालं की लगेच उचलून कपाटात ठेवायला पण फार जड नाहीत.

*** मी करंज्या/चिरोटे करत नाही पण इतरांना ते एस आकाराचं ब्लेड लावून पिठं मळून घेताना बघितलं आहे.

अपडेट :
किमान २ मिक्सर / ग्राइंडर बाळगण्याला पर्याय नाही असं लक्षात आल्याने चटण्या / वाटण यासाठी वेगळा आणि चॉपिंग / स्मूदी वगैरे साठी वेगळा मिक्सर घ्यायचे ठरवले आहे. त्यापैकी चटण्यांसाठी म्हणून शार्डर कंपनीचा एक कॉफी ग्राइंडर घेतला आहे -
https://www.amazon.com/dp/B07LG33LV3?tag=aboutcom02thespruceeats-20&link...

यामधे खरंच अगदी चमचाभरच पाणी घालून गोष्टी चांगल्या वाटल्या जात आहेत. चटणी उत्तम झाली होती.

दुसरा मिक्सर बहुतेक सिंडीने सांगितलेला घेण्यात येईल.

मला वेट आणि ड्राय ग्राईंडर सुचवा. (कणीक मळायला किचन एड आहे) यात कोरड्या चटण्या, इडली पीठ, जे काही आपल्या भारतीय जेवणासाठी लागेल ते व्हायला हवे.

वंडरशेफ चा Nutri-blend कुणी वापरला आहे का? तुमचा अनुभव कसा आहे? मला स्मूदी, जूस, मसाले, चटणी साठी हवा आहे.
जर चांगला नसेल तर दुसरा कोणता चांगला ब्लेंडर आहे?

Nutriblend चांगला आहे. मी गेले चार वर्षे वापरतेय. जास्त प्रमाणात वाटप असेल तर फार वेळ लागतो कारण जार्स छोटे आहेत आणि सलग जास्त वेळ चालवल्यास फार गरम होतो. बाकी रोजचे छोटे वाटप, स्मुदी, शेक्स साठी चांगला आहे.
इडली पीठ वगैरे वाटायला त्रास होतो.

Cusinart custom pro 11 cup फूड प्रोसेसर. अतिशय कमी आवाज, जबरदस्त पॉवर. अगदी बाळ हॉल मध्ये असताना लावला तरी चालतं. हॅमिल्टन beach बेस्ट आणि economical आहे फक्त आवाज.

Pages