फूड प्रोसेसर / मिक्सर / ग्राइंडर / चॉपर कोणता घ्यावा

Submitted by शूम्पी on 29 May, 2012 - 10:20

HBFPGoodOld.jpg
मी गेले १० वर्ष हॅमिल्टन बीच चा वरच्या फोटोतल्यासारखा फूड प्रोसेसर वापरत होते. तो किती मस्त होता ते मला तो स्वर्गवासी झाल्यावर समजले. तो मी साधारण $३० च्या आसपास घेतला होता. आठवड्यातून ३-४ वेळा वापरत होते. कणिक भिजवणे , भाज्या चिरणे, दाण्याचे कूट करणे, लसणाची कोरडी चटणी फिरवणे, (आई आली की) पुरण फिरवणे अशा नाना प्रकारच्या कामांसाठी. वापरायला तो अत्यंत सोपा आणि कमी कटकटीचा आणि सुटसुटीत होता. एकच ८ कप आकाराचं भांडं, एकच झाकण, १ चॉपिंग ब्लेड(त्यानेच कणिक पण छान मळली जायची), आणि एकच स्लायसिंग/श्रेडिंग ब्लेड, सर्व गोष्टी डिश वॉशर मध्ये बिंधास्त टाकता यायच्या.
खरतर, तो फूड प्रोसेसर नीट चालू होता (म्हणजे बटण, मोटर वगैरे) फक्त त्याच्या ब्लेडला खाली असणारी प्लॅस्टिक ची चकती तुटली होती तर मी लगेच तो रिसायकल मध्ये टाकला. मी त्यांच्या वेबसाइट वरून नुस्तं ब्लेड मागवायला हवं होतं असो. आता अक्कल येवून काही फायदा नाही. घाईघाईने आधी काय ते उरकायचं आणि मग सवडीने पश्चात्ताप करायचा...
सध्या माझी फूड प्रोसेसर क्वेस्ट सुरू आहे.
आखुड शिंगी वगैरे वगैरे हवा आहे. वापरायला सोप्पा, कमी कटकटीचा
गेल्या ८ दिवसात २ वेगळे फु प्रो आणून एकदा वापरून परत केले आहेत.
त्यातला एक होता हॅमिल्टन चा नविन मॉडेल आणि दुसरा होता किचन एड चा ९ कपांचा मॉडेल. त्यांची कहाणी प्रतिसादात लिहिते.
.
.
.
शेवटी पहिल्या पानावर अगोने रेकमेंड केलेला हा फु प्रो मी घेतला आणि मी माझ्या खरेदीवर फार खुष आहे!
HBFoodPro500Wt.jpg

रोजची पोळ्याची कणिक ह्यातच मळते. डिशवॉशरला टॉप रॅकमध्ये धुवायला टाकते. नो कटकट फु प्रो आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बायांनो, वरती ज्या फूड प्रोसेसर चा फोटो / कौतूक आहे तसा ब्लॅक & डेकरचा मला वॉलमार्टात दिसला आणि मी लगेच घेतला..कणिक मळणे, बटाट्याच्या चकत्या, बीट किसणे, कांदा चॉप करणे हे करून बघितले, आणि पटले की वरचे कौतुक किती सार्थ आहे ते..its too good! फक्त मी घेतला तेव्हा ३० ला होता आणि आता २५ ला Sad

स्नेहा तू तो ८ कप चा घेतलास का? माझाही तोच विचार आहे घ्यायचा. यात एकच भांडं आहे का कणीक मळायचे आणि भाज्या चिरायचे?

कॉलिंग असंबा..

अमेरिकेत मिक्सर / फुप्रो घ्यायचा आहे.. (दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत माहित आहे).. पण मुख्य काम भारतात असतो तसा मिक्सर, चटण्या बिटण्या करायला.. प्युरी आणि इडली डोसा बॅटर वाटायला..
बाफचं सार म्हणून खालील गोष्टी कळल्या..

http://www.amazon.com/Hamilton-Beach-70450-8-Cup-Processor/dp/B000M2FCWC... बहुतेक हा शुम्पीने मागवला.. ह्यात इडलीचं बॅटर होतं का ?

http://www.amazon.com/Ninja-622356527972-NJ600-Pro-Blender/dp/B003VWXXXK... हा मृ वाला.. वरचाच प्रश्न . ह्यात इडलीचं बॅटर होतं का ?

http://www.walmart.com/ip/Hamilton-Beach-500-Watt-Chef-Prep-Food-Process... >>> हा अजून एक दिसला..

आणि एक प्रिथीचा दिसला..
तर कुठला घ्यावा ?

http://www.amazon.com/Hamilton-Beach-70450-8-Cup-Processor/dp/B000M2FCWC... बहुतेक हा शुम्पीने मागवला.. ह्यात इडलीचं बॅटर होतं का ?
>>> हा माझा ओरिजिनल वाला. ह्यात मी इडलीचे बॅटर करायचे.

http://www.walmart.com/ip/Hamilton-Beach-500-Watt-Chef-Prep-Food-Process... >>> हा अजून एक दिसला..
>>> हा माझा नविनवाला. ह्यातही मी इडलीचे बॅटर करते.

पिठ मळायचे असेल आणि त्याबरोबरच चटण्या, मिल्कशेक असं सगळंच व्हायला हवं असेल तर कुठला योग्य आहे?

माझ्याकडे इथून घेतलेला सुमीतचा मिक्सर, किचन एडचा फुप्रो दोन्ही आहेत. पण आठवड्यातून दोन तीनदा कपाटातून काढा, धुवा बिवा फार कटकटीचं वाटतं. त्यामुळे १७ वर्षापूर्वी टोक्योतून घेतलेला बेसिक मिक्सरच झिंदाबाद. कणीक भिजवता येत नाही त्यात पण शेक्स, चटण्या, बाकीची लागणारी सगळी वाटाघाटी त्यात होते.

या बाफाच्या वर डकवलेल्या फोटोवाल्या फुप्पो मध्ये- शुम्पीचा फुप्रो - चटण्या, कणिक, चिराचिरी, किसाकिसी होते़.
तो सब काम एक हाथ असा आहे... छोटुशा जागेत मावतो.. माझ्या दृष्टीने हा फुप्पो पप्पु पेजर आहे... सर्व्यांनी घ्यावा... आणि स्वस्त आहे. आणि डिवाॅ सेफ आहे.

thanks ग भान
या आठवड्यात घेतेच.
बरीच खरेदी करायची आहे . हा फूड प्रोसेसर . एक वेट grinder,

माझा Singer चा फूड प्रोसेसर आहे. १६ वर्षं झाली अजून काहीच कंप्लेंट नाही. एकदाही दुरुस्ती नाही. भरपूर वापरलाय. अजूनही कितीतरी वर्षं जातील. चिरणं/किसणं ह्यासाठी खूप वापरला नाहीये पण जास्त पाहुणे असतील तर गाजर, दुधी किसणे, कोबी चिरणे वगैरे फटाफट होतं. पण कणिक मळणं, चटण्या वगैरे वाटप भरपूर केलंय. कणिक मळून झाल्यावर ते भांडं धुणंही सोपं आहे.

फायनली मी काल फुप्रो घेतला. वॉलमार्ट मधून ब्लॅक & डेकरचा. वापरून पाहिल्यावर असे वाटले मी इतकी वर्ष का घेतला नाही :डोक्यावर हात मारून घेणारी बाहुली:
हा धागा उशीराच वाचला बहुतेक Proud

तर पहिला प्रयोग कणीक मळण्यावर झाला. मळली गेली पण अगदी पुरणपोळीसारखी झाली तारवाली. तेल जास्त झाले का? की मी जास्त वेळ पल्स वर फिरवले?

इथे वाचून कॉस्ट्को मधून कुझिन आर्ट प्रोसेसर घेतला. वर्षभर मस्त चालला पण हल्ली कणकेची कन्सिस्टन्सी एकसारखी होत नाही. मध्येच एखादा घट्ट गोळा लागतो. पाणी हळूहळू घालतेय. काय चुकतेय कळत नाही. एक-दोनदा ब्लेड/ भाडे डिश्वॉशर ला टाकले होते. त्याने काही व्हायला नको खरंतर. कुणाला असा अनुभव आलाय का फूड प्रोसेसर चा?

चिवाचं ऐकू की बस्कूचं? Happy पीठ मळणं अगदी काही गरजेचं नाही. प्रमुख गरज प्युरी, वाटप, भाज्या चिरणे आणि मिल्कशेक वगैरे.
आता कोणीतरी प्लीज फायनली सांगा. Sad

कणिक मळणे व भाज्या चिरणे सोडून सगळं होईल मॅजिक बुलेटला. मी या दोन्ही गोष्टींसाठी हात वापरत असल्याने फुड प्रोसेसर पडून आहे कपाटात. बाकी गोष्टींना मॅजिक बुलेट. आता तू ठरव. Happy

रमड दोन्ही घे एक एक करून ! कणिक तर मळायला लागेलच न ! Hamilton Beach cha 8 cup पण मस्त आहे .गाजर, बटाटा चिप्स मस्त होतात ..

रमड, माझ्याकडे दोन्ही आहे. बुलेट आणि फुप्रो सतत वापरला जातो. वस्त्रगाळ पूड वगैरेसाठी बुलेट पप्पु पेजर आहे. पण हा फुप्ोही महान आहे. दोन्ही घेऊन टाक. उपयोगी आहे. दोन्ही पन्नास-साठ डाॅलरमध्ये मिळतील. ब्लॅक फ्रा ला बुलेटवर नक्की डील मिळेल.

Pages