शैव मत

Submitted by अंबरीष फडणवीस on 22 May, 2012 - 06:03

शिवशंकराची उपासना भारतात अनादी कालापासून सुरु आहे. महादेव म्हणजे सृष्टीचा संहारक नवीन सृष्टीसाठी platform तयार करणारी शक्ती.. आदीगुरु.. कलाकारांचा आणि सर्व कलांचा उद्गाता.. तंत्राचा आणि तंत्रज्ञानाचा प्रणेता. योगेश्वर.. विष्णू balance दर्शवतो तर शिव extreme. ज्योतिषात शनी या ग्रहाचा स्वामी.. वेदांच्याहि आधी पासून शत्रूचे प्राण हरण करताना भारतीय रुद्राचे आवाहन करीत आलेले आहेत. असे म्हणता येईल कि भारतातला सर्वात लिबरल दैवत म्हणजे शिव. साक्षात काळ म्हणजे शिव. महाकालेश्वर आणि महाकाळ म्हणून पौराणिक वैदिक आणि बौद्धमत शंकरास संबोधते. बौद्धमतात शंकरास अवलोकितेश्वर देखील म्हंटले आहे.

भारतात सर्वात आधी शंकराचा उल्लेख वेदांत येतो. रुद्र (रडवणारा) हे अतिप्रचालीत नाव वेदातले आहे. शिव (शुभ) हे विशेषण पण वेदांत आढळते. सत्यं शिवं सुंदरम हे तिथलेच प्रसिद्ध वाक्य आहे. याच बरोबर योग या भारतीय दर्शनात ईश्वर म्हणून जो धरतात तो देखील शिव आहे. शिव आणि योगाचा प्राचीन संबंध मोहनजोदारो च्या उत्खननात सापडलेल्या पशुपतीच्या मुद्रेत दिसतो. जालंधरबंध धरून ध्यानमुद्रेत बसलेला आणि प्राण्यांनी वेढलेला पशुपतीनाथ चटकन सिंधूसंस्कृती च्या continuity ची साक्ष देतो. म्हणजे जवळपास ७००० वर्षे तरी उत्खननशास्त्रानुसार भारतात शिवपूजा होत आहे. आपल्या ऐतिहासिक पुराव्यांवर दृष्टी टाकली तर भरपूर आधी पासून रुद्रपुजा होत आहे. विष्णूची पण तशीच गोष्ट आहे. हि दैवते वेदकाळात पुजली जायची यांच्या नावाने अनेक यज्ञ आहेत. परंतु त्या काळात इंद्र-वरुण-अग्नी वगैरे देवतांना अधिक प्राधान्य होते. विष्णूस वेदांत "उपेंद्र" (इंद्राचा deputy) म्हंटले आहे. रुद्र देखील देवागणात होता.

इसपू १५००-२००० च्या सुमारास बदल घडू लागला. २५०० ते १९०० मध्ये राजस्थानातून वाहणारी सरस्वती नदी आटली. भारतीय परंपरेनुसार ३१०१ इसपू साली भारतीय युद्ध कुरुक्षेत्री झाले. आणि सरस्वती-सिंधू खोऱ्यातून गंगेकडे सत्ता आणि लोक स्थलांतर करू लागली. यमुना आणि शतुद्रू (सतलज) नद्या ज्या सरस्वतीला मिळायच्या त्यांनी दिशा बदलून अनुक्रमे गंगा आणि सिंधू नद्यांत आपल्या पाण्याचा निचरा करू लागल्या.

नागरी सभ्यता नाहीशी होऊन सप्तसिंधूतले वैदिक लोक परत बराच काळ (म्हणजे ६००-१००० वर्षे) टोळीवाले बनले असावेत. पंजाबचा परिसर कोरडा आहे. पाणी नद्यांच्या नेटवर्क मुळे मिळत राहते. परंतु खूप पाउस पडत नाही. त्यामुळे घनदाट जंगले नसत. grasslands सारखी जंगले पंजाब-सिंध-राजस्थान-गुजरात मध्ये आजही दिसतात. या उलट गंगेच्याखोरे हे घनदाट जंगलांचे म्हणून प्रसिद्ध होते. गंगेच्या खोऱ्यात वैदिक लोक अगदी रामायणाच्याच्या आधीच्या कालापासून राहत आलेली आहेत. पण भारतीय युद्धानंतर आणि सरस्वतीच्या आटल्यानंतर भारताचे सत्ताकेंद्र खऱ्या अर्थाने गंगेच्या खोऱ्यात आले. आणि विष्णू शिव ब्रह्मदेव वगैरे दैवते प्रचलित होऊ लागली.

आजकाल बरेच इतिहासतज्ञ बुद्धाचा काळ इसपू १५०० मानतात. कलिंग जिंकणारा व त्यानंतर धम्म स्वीकारणारा अशोक आणि स्तुपे बांधणारा अशोक वेगळे होते असे म्हणतात. अलक्षेन्द्राच्या स्वारीच्या वेळेस गुप्तवंश होता कारण मेगास्थिनीस नावाचा ग्रीक इतिहासकार जो भारतात राहिला तो चंद्रगुप्ताच्या पोराचे नाव समुद्रगुप्त काहीसे सांगतो. चाणक्याचा शिष्य मौर्यकुलीन चंद्रगुप्तच्या पोराचे नाव बिन्दुसार होते. चाणक्य आणि अशोक कधीही झाले असो. मुद्दा हा कि चाणक्य अर्थशास्त्रात वासुदेव आणि रुद्र या दोन देवतांबद्दल बोलतो. यापैकी विष्णुगुप्त चाणक्य म्हणतो कि रुद्रोपासना खूप दिवसांपासून चालत आलेली आहे पण हल्ली वासुदेव पंथ देखील वेगात प्रसरण पावतोय. म्हणजे कृष्ण हा देवत्व चाणक्याच्या थोड्या आधीपासून पावू लागला. विष्णू देव आधीपासूनच होता. पण ऐतिहासिक पुरुषास देवत्व बहाल करणे कृष्णापासून सुरु झाले कि काय असे वाटते. असो.

शैवमत हे असे हळूहळू प्रचलित झाले. या मताच्या अनेक शाखा प्रचलित झाल्या. याच २७०० वर्षांच्या प्रदीर्घ काळात. (इसपू १७००-इस १०००). त्यातल्या काही शाखा आणि त्यांचे भौगोलिक प्रचलन खालील प्रमाणे..

मूळ उद्गम - वैदिक रुद्रउपासना

श्वेताश्वर उपनिषदात सर्वप्रथम शंकरास महादेव आणि ईश्वर हि विशेषणे दिली आहेत. हे उपनिषद कृष्ण-यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेचा भाग आहे. हि संहिता पांचाल देशात (आजचा पश्चिम उत्तर प्रदेश - आग्रा वगैरे परिसर) लिहिली गेली.

या पंथाच्या तीन मुख्य शाखा..

१. पौराणिक शैव मत..
२. योगिक शैव मत..
३. अपौराणिक शैव मत.

१. पौराणिक शैवमत तेच जे आपण आज मुख्यत्वे ऐकतो. मुख्य सोर्सेस - शिवमहापुराण लिंगपुराण स्कंदपुराण शिवरहस्यपुराण इत्यादी. याबद्दल मी जास्त लिहीत नाही. कारण हे सर्वश्रुत आहे.

शिवाच्या गोष्टी, लिंगपूजा, नटराज शंकर, आद्यगुरु दक्षिणमूर्ती शिव, कैलासपती शिव, तांडव करणारा आद्यनर्तक शिव, शास्त्रीय संगीताचा प्रणेता आणि पालक शिव, त्रिनेत्रधारी शिव, मदनाला भस्मसात करणारा शिव, सतीशी आणि नंतर पार्वतीशी रतीक्रीडेत रममाण होणारा शिव, कार्तिकेयाचा आणि गणेशाचा पिता शिव, नंदिवाहन शिव, अर्जुनाला पाशुपतास्त्र देणारा शिव, हनुमानरूपात अवतरित होणारा रुद्र, शत्रूचे प्राण हरणारा शिव (हर हर महादेव या घोषणेत हर म्हणजे हरण करणे, हिसकावणे. या घोषणेत आपण शंकराला आवाहन करतो कि मी शत्रूला मारतोय आता तू याचे प्राण हरण कर. महादेवा हरण कर रे), अधार्मिक शत्रूच्या आप्तांना आणि स्त्रियांना रडवणारा रुद्र.

शंकराचे हे स्वरूप आपल्याला माहिती आहेच. वैदिक, पुराणिक आणि काही अपौराणिक शैवसंप्रदायांचे संमिश्रण होऊन बनलेले हे स्वरूप आहे. यातले बहुतांश मत पुराणकाळात (इसपू १००० ते इस ५००) आणि नंतर श्री. जगद्गुरू आदी शंकराचार्य (इस ७००-८००) यांच्या कृपेने बनले आहे. मतानुमतात विभागलेला भारतीय समाजाला इस्लामच्या आक्रमणाच्या उंबरठ्यावर एक करणारा हा युगपुरुष. स्मार्त संप्रदाय यांनी सुरु केला. भक्ती आणि ज्ञानमार्ग एकमेकांचे विरोधक नाहीत हे लोकांना पटवून दिले.

प्रमुख सेश्वरवादी असे शैव-वैष्णव-शाक्त-सूर्य-गाणपत्य हे पाच संप्रदाय एक करून पंचायतन पूजा सांगितली. यांची आपसात वादविवाद करण्यात खर्ची पडणारी शक्ती येणाऱ्या काळासाठी एक केली. सांख्य, बौद्ध, मीमांसा, न्याय, वैशेषिक, चार्वाक, जैन इत्यादी निरीश्वरवादी मतांना विवादात हरवून काही मठात सीमित केले. यामुळे हि मते टिकून राहिली व स्वातंत्र्यानंतर परत वर आली.

पुढले हजार-बाराशे वर्षे हे सगळे टिकले कारण शंकराचार्यांनी केलेले मतांचे आणि लोकांचे एकीकरण. त्यांना नमस्कार करून पुढे जाऊया.

२. योगिक शैवमत हे अपौराणिक शैव मतासोबतच प्रचलित व प्रसारित होत होते.

३. अपौराणिक शैवमत - अपौराणिक शैव मताचे दोन प्रमुख उपप्रकार आहेत.

पण या आधी द्वैतवादी एकेश्वरवाद (monotheism) आणि अद्वैतवादी एकेश्वरवाद (Monism) यातला फरक लक्षात घ्यायला हवा. Monotheism मध्ये एकच ईश्वर असतो जो सृष्टीचा नियंता आणि कर्ता असतो. ईश्वर आणि त्याची सृष्टी वेगळी असते. याचे दोन प्रकार आहेत - कडक आणि सौम्य (हि नावे मी दिली आहेत). कडक (strong monotheism) म्हणजे इस्लाम, ख्रिस्तपंथ यहुदी पंथ यासारखा. सौम्य Monotheism म्हणजे हरे कृष्ण वाले, इस्कॉन वाले, वैष्णव वारकरी संप्रदाय वगैरे सारखा. Monism म्हणजेच अद्वैत. सृष्टी आणि ईश्वरात द्वैतभाव नाही. सृष्टीच ईश्वर (सर्वं खलु इदं ब्रह्म).

अपौराणिक शैव मताचे दोन प्रमुख उपप्रकार आहेत.

I. मंत्रमार्ग
II. अतिमार्ग

I. मंत्रमार्ग

मंत्रमार्गाचे खालील उपप्रकार

अ. कपालिक शैवमत - यास काश्मिरी शैवमत देखील म्हणतात. हे एकेश्वर अद्वैतवादी मत मत. हा घरघुती गृहस्थाश्रमात असणाऱ्या लोकांसाठी असलेला पंथ आहे (होता). या मताचे शिवसूत्र आणि भैरवसूत्र हे प्रमुख ग्रंथ (आगम) आहेत. वसुगुप्त, सोमानंद, अभिनवगुप्त, क्षेमराज, उत्पलदेव आदी ऋषी या संप्रदायाचे प्रमुख आणि प्रसिद्ध आचार्य व उद्गाते आहेत. अभिनवगुप्त नाट्यशास्त्राचेपण खूप प्रसिद्ध आचार्य होते.

कापालिक शैवमत हे खुपसे शंकराचार्यांच्या अद्वैतवादासारखे आहे. शंकराचार्य आणि एका कापालिकाचा वाद शंकर-विजयं या ग्रंथात नमूद आहे. पण शंकराचार्यप्रणीत अद्वैतासारखे संन्यासप्रधान नसून गृहस्थप्रधान आहे.

या मताचा गोषवारा असा.

१. चिती - वैश्विक उर्जा/चेतना. हिलाच कापालिक शिव म्हणतात.
२. मल - चेतना जेव्हा लहानश्या भागात केंद्रित होते त्यास जीव म्हणतात. जीव स्वतःला शिवापेक्षा (वैश्विक चेतनेपेक्षा) वेगळा समजायला लागतो तीन प्रकारच्या मलांमुळे (मळ). आणव मळ (अहंकार), मायीय मळ (मायेमुळे उत्पन्न झालेला आणि मनापुरता सीमित असलेला), कर्ममळ (शरीरापुरता सीमित असलेला).
३. उपाय - तीन मलात अडकलेला जीव शिवाशी एकरूप व्हायला तडफडत असतो. त्या साठी लागणारी साधना यात सांगितलेली आहे.
४. मोक्ष - जीवाचे शिवाशी एकरूपत्व.

काश्मिरी कापालिक शैवसंप्रदायातल्या अन्य काही संकल्पना म्हणजे - अनुत्तर, अहं, प्रत्याभिज्ञ, कौल आणि स्वातंत्र्य..

काश्मिरी कापालिक शैव पंथ परत तीन उपप्रकारात विभागलेला आहे -
त्रिक (संन्यासी लोकांसाठी), कौल (सामान्य गृहस्थ लोकांसाठी) आणि अघोरी (तांत्रिक लोकांसाठी).

ब. शैव सिद्धांत - यास तांत्रिक शैवमत देखील म्हणतात. हे मत समस्त भारतभर प्रचलित होते. हे भारतातच नव्हे तर श्रीलंका, दक्षिणपूर्व आशिया मध्येही पसरले होते. इस्लामी आक्रमणानंतर हे दक्षिणेतच राहिले. दक्षिणेत नयनार संतांचे काव्य शैवसिद्धांतात मिसळले. याची सरमिसळ होऊन पेरियपुराण आणि तीरुमुराई या दक्षिणी शैवमताची रचना ६३ नयनार संतांनी मिळून केली.

मुळात हा संप्रदाय द्वैतवादी आहे. सांख्यतत्वज्ञान हे याचा कणा आहे. शिव आणि शक्ती यांच्या द्वैताद्वैत फॉर्म ची उपासना या मतात होते. कापालिक संप्रदायात आणि शैवसिद्धांतात भरपूर आदानप्रदान झाले आहे. अधिक योगमार्ग आणि तंत्रमार्ग हे देखील मंत्रमार्गातील सर्व शैवसंप्रदायांना जवळचे आहेत.

मुळात हा संप्रदाय ज्ञानमार्ग होता. तामिळनाडूमध्ये नयनार संतांनी त्याचे भक्तीमार्गात रुपांतरण केले. मूळ शैव सिद्धांत याचे आणखी एक Monist अद्वैतवादी अपत्य म्हणजे नाथसंप्रदाय. (गोरक्षनाथादी नवनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, चांगदेव वगैरे या शाखेचे). हा संप्रदाय मध्यभारतात, बंगाल आणि समस्त गंगेच्या खोऱ्यात प्रचलित होता व आहे.

असे म्हणता येईल कि मूळ शैवसिद्धांत काश्मिरात कापालिक बनला, मध्य भारतात नाथसंप्रदाय, राजपुतांच्या प्रदेशात तंत्रमार्ग आणि शाक्तमार्गाशी संलग्न झाला, दक्षिणेत नयनार संतांनी त्यास भक्तीमार्गाचे रूप दिले. योगाशी आणि तंत्राशी संलग्न होऊन हठयोग प्रदीपिका सारखे ग्रंथ निर्माण झाले. पुढे तामिळी शैवमताचे विशिष्टद्वैत वेदांताशी लग्न होऊन त्याचे पर्यावसान बसवण्णा यांच्या लिंगायत संप्रदायात झाले. त्याची गोष्ट पुढे आहे.

कापालिक मताच्या सर्व उपप्रकारांचे शैवसिद्धांतातील सर्व उपप्रकारांशी आणि इतर भारतीय आस्तिक आणि नास्तिक मतांशी विचारांचे आदानप्रदान आणि वादविवाद चालू असतच. त्यामुळे हे सतत गतिमान असे Dynamic चित्र होते. बौद्धमतात तंत्र खूप प्रख्यात आहे. वज्रयान बौद्धमत आणि कापालिक मत यांच्यात तर कल्पनांची खूप exchange आढळते.तीच गोष्ट तिबेटीय बौद्धमताची. अवलोकितेश्वर हे बुद्धाचे "शिवस्वरूप" म्हणून वज्रयानात प्रसिद्ध आहे.

कालमुख वीर-शैव हा संप्रदाय विशिष्टद्वैत वेदांत, सांख्य आणि शैवसिद्धांत यांचे मिश्रण आहे. शिव-शक्ती जोडी यांच्यातील अचिंत्य भेदाभेद (एक आहे आणि नाहीही) निरुपण करणारे हे मत आहे. सेश्वरवादी सांख्यमत या पंथासोबत थोडे साधर्म्य दाखवते.

अघोरी लोक देखील मंत्रमार्गात येतात.

II. अतिमार्ग

अ. पाशुपत शैवमत - हे सर्वात जुने शैवमत आहे असे मानण्यात येते. हे प्रामुख्याने मुलतान, पंजाब, गांधार, नेपाळ, गुजरात आणि तामिळनाडू मध्ये प्रचलित होते. मोहनजोदारो येथील पशुपातीनाथाचे योगमुद्रेतले चित्र याच संप्रदायातले. ऋषी लकुलीष या संप्रदायाचे उद्गाते होते. यांचा आणि या पंथाचा रेफरन्स महाभारतात देखील आहे. म्हणजे इसपू ३००० च्या आधी पासून हे मत नक्कीच भारतात प्रचलित आहे.

हा प्रामुख्याने संन्यस्त शैव भक्ती मार्ग आहे. हा मार्ग स्वीकारावयास लागणारे व्रत पाशुपतव्रत म्हणवते आणि याची विधी अथर्ववेदातल्या अथर्वशिरस उपनिषदात आढळते. या संप्रदायाची प्रमुख ग्रंथे आहेत - गणकारिका, पंचार्थ भाष्यदीपिका, राशीकर भाष्य. या मताला कालमुख असेही म्हणतात.

पाशुपातीय लोक वैष्णव मताचे कट्टर विरोधक होते. हे द्वैत एकेश्वरवादी आहे. वास्तविक हे खूप strong monotheism सांगतात. पण इस्लाम आणि मध्यपूर्वेतील सम्प्रदायांसमोर यांची कट्टरता क्षुल्लक भासते. त्यामुळे सौम्य एकेश्वरवाद हे म्हणणे योग्य राहील.

कापालिक आणि पाशुपत शैवमतांविरुद्ध काही इतर शैवमतांनी उपहास आणि टीकात्मक साहित्य लिहिले आहे. मत्तविलासप्रहसन नावाचे पल्लवकालीन संस्कृत एकपात्री नाटक या दोन्ही मतांची यथेच्छ खिल्ली उडवते. पशुपातीय शैवमत आता फारसे प्रचलित नाही.

बसवण्णा यांचे लिंगायत वीरशैव मत यांनी भक्तीमार्गी तामिळी शैवसिद्धांत आणि पाशुपातीय अतिमार्गी मत एकत्र करून नवीन पंथ सुरु केला. तो आजतागायत व्यवस्थित सुरु आहे. मुख्यत्वे कर्नाटक, आंध्र आणि महाराष्ट्र प्रांतात हा शैवसंप्रदाय पसरलेला आहे. जरी यात मंत्रमार्गाचे अनेक influences आहेत तरी हा अतिमार्गात गणल्या जातो कारण लकुलीष ऋषींची परंपरा आणि कालमुख परंपरा या पंथात सुरु असल्याचे म्हणतात.

उपसंहार

गांधार, पंजाब प्रांतातून आता अपौराणिक शैवमत काय तर समस्त भारतीय संस्कृतीच पुसल्या गेली आहे. १९८५ नंतर (काश्मिरी पंडितांचे शिरकाण झाल्यानंतर) तिथूनही शैवमत नाहीसे झाले आहे. बहुतांश भारतात पौराणिक शैवमत प्रचलित आहे. या मताने अनेक अपौराणिक मते आपल्यात धारण करून टिकवून ठेवली आहेत. बाकी तांत्रिक, लिंगायत आणि काही तामिळी कुळे वगळता शुद्ध अपौराणिक शैवमत फारसे शिल्लक नाही. ग्रंथ आहेत, कल्पना आहेत, त्याचे पालन हि होते आणि या परंपरांच्या आचार्यांचा आदरही होतो. पण फक्त हि मते आचरणारी एक डेडीकेटेड जनसंख्या नाही.

एका अर्थी चांगलेच आहे. भारतास असलेला धोका अजून पूर्ण टळला नाहीये. जेव्हा ते होईल तेव्हा हि मते देखील कालसुसंगत होऊन कुणीतरी reinvent करेल आणि भारतात प्रचलित करेल याची खात्री मला आहे.

http://agphadnavis.blogspot.com/2012/05/blog-post_19.html

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख. पशुपती हेच शिवाचे खरे रुप आहे. तो निर्मितीचा देव आहे. पण वैदिकानी ब्रह्म, विष्णू याना महत्व देऊन शंकराला संहाराचा देव करुन टाकले... ज्या देवाचे प्रतीकच लिंग आहे, तो देव संहाराचा देव हा कसा असेल, हा प्रश्नही भाबड्या जनतेला पडत नाही. वेदातील रुद्र हा वेगळा होता. वेदात लिंगपूजक लोकांची निर्भत्सना आहे. नंतर रुद्र म्हणजे शिव असे रूढ करुन त्यालाही वैदिक मुलामा दिला.

वेदातील रुद्र हा वेगळा होता. वेदात लिंगपूजक लोकांची निर्भत्सना आहे. नंतर रुद्र म्हणजे शिव असे रूढ करुन त्यालाही वैदिक मुलामा दिला.

अर्थात, याला काडीमात्र पुरावा नाही.. पशुपती हे शिवाच्या अनेक रूपांपैकी एक रूप.. वेदांत लिंगपूजाकरणाऱ्यांची निर्भत्सना नाही. लिंग म्हणजे "खूण"..

वेदांत फक्त एका ऋचेत शिश्नपूजेचा निषेध सांगितला आहे. त्याचा अर्थ कामविकारात वेडे होणाऱ्या लोकांसंबंधी आहे.

वेदांत इतरत्र अनेक ठिकाणी रुद्राचा आणि शिव (सत्यं शिवं सुंदरम हे वेदवाक्य, आहे) उल्लेख आणि स्तुती आहे. वर श्वेताश्वरउपनिषदाचा संदर्भ दिलाय कि.. उपनिषदे वेदाचाच भाग असतात, वेगळी पुस्तके नाहीत.

 

चला, म्हणजे शंकरही वैदिक देव म्हणून ओकार्‍या काढणारे 'ब्रह्मसमंध' आले का ? .. फडणवीस गुरुजी, लोकाना सत्य माहीत असते.

http://sanjaysonawani.blogspot.in/2011/10/blog-post.html

अधिक माहितीसाठी वाचा.. हिंदु धर्माचे शैव रहस्य.. लेखक संजय सोनावणी

सत्य पुराव्यांवर आधारलेले असते जिल्लेइलाही.. फतव्यावर नाही...

रुद्र, त्र्यंबक, शिव आणि अनेक नावे एकच देवतेला उद्देशून लिहिली आहेत वेदांमध्ये. संजय सोनवणी यांचा ब्लॉग वाचला आहे मी. तथ्य नाही त्यात.

अधिक, वैदिक संप्रदाय हा अनेक भारतीय संप्रदायांपैकी एक आहे. हिंदू हे जे काही नाम आहे त्यात सर्व भारतीय संप्रदाय येतात. कायदा देखील हेच मानतो. त्यामुळे उगाच विषयांतर नको. शैव हिंदू नाही, हे फक्त एल.टी.टी.ई वाले म्हणत असतात. इतर सुज्ञ व्यक्ती नाही. याचेच महाराष्ट्रातील परिमाण म्हणजे शिव वैदिक नाही आणि वैदिक हिंदू नाहीत.

विषय राजकारणाकडे जाईल म्हणून थांबतोय. या मूर्खपणावर वेगळा बा.फ काढतो थोड्या वेळात... इथे शैवमतावर चर्चा होऊ देत..

शिवधर्म समजावून घेऊ असा लेख आला.. पाठोपाठ शैव मत असे गोम्डस नाव देऊन शिवावर वैदिकत्व थापणारा लेख आला... सगळी ब्रह्मसमंधी भुतावळ शिव-शैव- शिवधर्म यांच्या मागे लागली की काय? मुसलमान, बौद्ध, ख्रिश्चन सगळ्यांच्यावर बडबडून कंताळा आला वाटतं.

असं कोण म्हणलं? का उगाचच आगपाखड करताय?

तुमच्याच विचारसरणीचे द्रमुक वाले आणि इतर प्रभाकरन आणि एल.टी.टी.ई समर्थक मित्र जिथून या सगळ्या आर्ग्युमेंट उद्भवल्या आहेत.

ते म्हणतात शैव हिंदू नाहीत.
तुम्ही म्हणता वैदिक हिंदू नाहीत..

पण दोघांच्या आर्ग्युमेंट एकच. ज्यांना ते हिंदू म्हणतात, त्यांना तुम्ही वैदिक म्हणता. फरक नाही दोघात..

तुम्ही म्हणता वैदिक हिंदू नाहीत..

आता हे मी कधी म्हटले??

वेदातला रुद्र म्हणजे शिव.... शिव शिव शिव.... !!! कोण पुना ओकानी शोध लावला काय हो? ते तर म्हणतात काबा म्हणजेसुद्धा शिवच ! Proud याला शिव, त्याला शिव.. कशालाही शिवलं की सगळं शिवच ! Proud स्वतःचे इंद्र, वरुण, सविता, अग्नी वार्‍यावर सोडून दिले आणि आता शिव शिव करत बसलेत.

अंबरीश, तुम्ही जिल्लेईलाही, जामोप्या इत्यादी पिलावळीच्या पोष्टी चक्क गांभिर्याने घेताय?<<< +१००

तुम्ही लिहत रहा, आणि या असल्या फालतू पोष्ट दुर्लक्षित करा,

काय आहे अंबरीष, "तुम्ही पुराणकालीन भात संबंधी पाककृती" यावर लेख लिहीलात तरी त्यातला "पुराण" हा शब्द बघितल्या बघितल्या पार्श्वभागाला चटका लागल्यागत हे आचरटपणा करतील येऊन त्यावर. तेव्हा तुमचा अभ्यासपुर्ण लिखाण चालू ठेवा आणि यांच्या पोष्टींना उत्तर देउ नका. अर्थात, निर्णय तुमचा.

मंदारजी,

जिल्लेईलाही यांच्याशी बोलायचे सद्भाग्य प्रथमच लाभले.. म्हणून पहिले नीट ओळख पटली नाही. आता दर्शन घडले आहे. आता घेतो काळजी. जामोप्याजींशी सत्संग आधी अनेकदा घडला असल्या कारणाने लसीकरण झालेले आहे.

असे लई आहेत.. सगळ्यांच्या विरोधात लशी टोचुन घेत बसला तर अंगाची जाळी होईल आणि नंतर 'शिव'त बसाल Proud

अंबरिश....

आपल्या अभ्यासपूर्ण लेखाबद्दल अभिनंदन. विषयच असा आहे की त्यावर वादप्रतिवाद होणे क्रमप्राप्त असते. अशा चर्चांतून, विचारमंथनातून ज्ञानाचे आणखीन् दोनचार कण अभ्यासकाला सापडले तर ते हवेच असतात.

त्या अनुषंगाने माझा हा प्रतिसाद....जो आहे फक्त 'रुद्र' संदर्भात.
वैदिक साहित्यसंदर्भात माझे जे काही त्रोटक वाचन आहे त्यामध्ये रुद्राला 'रडविणारा' या संबोधनाने कुठे उल्लेखिलेले मला आढळलेले नाही....अर्थात हा माझा वाचनदोषही असू शकेल. ऋग्वेदात तर रुद्राची भूमिका गौणच दिसते. त्याला अनुलक्षून रचलेल्या सूक्तांची संख्याही पाचापेक्षा जास्त नसावी. मात्र त्याचे भौतिक रूप पुष्कळ वेळा निर्देशिले गेले आहे [ज्यामुळे 'शंकरा' चा भास होऊ शकतो]. अक्राळ पसरलेली त्याची जटा, सामर्थ्यवान शरीरसंपदा, पिंगट गौरवर्ण, दृढ अवयवामुळे श्रेष्ठ असलेला रुद्र दशदिशांचा चक्रवर्ती मानला जातो. वेदात कुठेतरी त्याला 'नृघ्न' = मनुष्यघाती असे जरूर म्हटले आहे. ऋग्वेदातील तो दुष्ट देवताही असू शकेल, पण त्याची बरे करण्याची शक्तीही पुनःपुनः उल्लेखिली गेली आहे.

रुद् = रडणे ही व्याख्या मनी ठेवून "रुद्र" शब्दाचा अर्थ गळा काढून रडणारा असा घेतात. पण इथे त्याच्या प्रवृत्तीचा आणि प्रकृतीचा विचार करतात 'रडणे' अपेक्षित नसावे.

रुद्राचा भौतिक पाया आणि त्याच्या नावाची व्युत्पत्ती दोन्ही अगदी स्पष्ट नाहीत. त्याचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करणारी विविध मते आहेत. पण त्याचा अर्थ 'रडवणारा' असे न मानता 'वादळवारा' वा 'झंझावात' असे मानले तर त्याच्या संदर्भातील रौद्र स्वरूप अधिक स्पष्ट होईल.

असो....हा काही वादाचा विषय नाही तुमच्या लिखाणाच्या अनुषंगाने. फक्त वाचत असताना ही बाब प्रकर्षाने नजरेसमोर आली म्हणून हा नामअर्थ विषय इथे छेडला आहे.

अशोक पाटील

कसला पुरावा? जे लिहिले आहे तोच पुरावा !

ज्याला जे पटते ते त्याने मानावे.

क्या बात, जिओ जामोप्या.
मायबोलीवरचे अर्धे विद्वान असे मानतात आणि अर्धे विकीपिडियाचे संदर्भ Happy देतात.

खरोखर ज्यांचा या बाबतीत अभ्यास आहे आणि जे खरेखुरे इतिहास अभ्यासक आहे ते विद्वान आणि विदुष्या कुणाच्या नादाला लागणे नको म्हणून अशा बाबतीत काही बोलतच नाहीत.

पण मूर्खांच्या बडबडीपेक्षा खर्‍या विद्वानांची शांतता सत्याला मारक असते असे काहीसे विधान आहे ते या खर्‍याखुर्‍या विद्वानांना कोणी सांगेल का?

<<पण मूर्खांच्या बडबडीपेक्षा खर्‍या विद्वानांची शांतता सत्याला मारक असते असे काहीसे विधान आहे ते या खर्‍याखुर्‍या विद्वानांना कोणी सांगेल का?>>
साती, गैरसमज नसावा. मी विद्वान अजिबात नाही. फक्त त्या विषयाची विद्यार्थिनी आहे. पण संशोधकांच्या बाजूने मी या पानावर पूर्वी एक प्रतिसाद दिला होता. तो प्लीज वाच Happy

वरदा,धन्यवाद.

'इतिहास ही इतिहासकाराची एकट्याची मक्तेदारी नव्हे पण कुणीही उठावं आणि स्वतःला जी माहिती (ज्ञान नव्हे) आहे ती अंतिम सत्य आहे अशा थाटात अभिनिवेशात विधानं करावीत हेही उचित नव्हे...
सॉरी टु से, ५-७ पुस्तकं पाहून/वाचून आणि नेटवरची माहिती वाचून हिरीरीने वाद घालणं तसं तुलनेने सोपं असतं'

मला अगदी हेच माझ्या वरच्या प्रतिसादातून म्हणायचं होतं.

अगदी तूच असं नव्हे पण इतरही जे खरोखर ईतिहासाचे अभ्यासक आहेत त्यांनी या अनुशंगाने व्यवस्थित संदर्भ वैगेरे देत इथे लिहायला काय हरकत आहे. या रोजच्या त्याच त्या लोकांच्या धुळवडीपेक्षा तुम्हा धुळीत राबून खापरे गोळा करणारांचे मत नक्कीच ग्राह्य असेल. Happy

साती, आहे डोक्यात लिखाण करायचं. फक्त सध्या हातात वेळ नाही. मी गेली तीन वर्षं वैदिक धर्माचा इतिहास शिकवत होते. त्यामुळे याही विषयावरची पुस्तकं वाचलीत. शिवाय सध्या वैदिक ग्रंथ, धर्म यावर काम करणारे विद्वान कोण हे माहित आहे. नव्या पिढीतल्या काही जणांशी ओळख आहे. जर या विषयावर काही लिहायचं असेल तर त्यांना विचारून व्यवस्थित संदर्भ देत लिहायला आत्ता शक्य नाही.
शिवाय मी इथे लिहिलं तरी परदेशी विद्वानांची (म्हणजे हिंदुत्ववादी अजेण्डा असलेल्या स्वतःला विद्वान म्हणवणार्‍या स्वघोषितांची सोडून) इथल्या अनेको लोकांना जब्बरदस्त अ‍ॅलर्जी आहे. त्यामुळे त्यांची मतं नाकारायला (स्वतःला शालेय संस्कृतपलीकडे काडीमात्र काही कळत नसताना) ते विदेशी आहेत हे एकच कारण पुरेसं असतं की... इतका कुटाणा फुकटचा कुणी करायला सांगितलाय? त्यापेक्षा माझी २-३ कामं हातावेगळी होतील त्या वेळात Happy

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, अशोकजी..

अशोक इ म्हणाले "वैदिक साहित्यसंदर्भात माझे जे काही त्रोटक वाचन आहे त्यामध्ये रुद्राला 'रडविणारा' या संबोधनाने कुठे उल्लेखिलेले मला आढळलेले नाही....अर्थात हा माझा वाचनदोषही असू शकेल. ऋग्वेदात तर रुद्राची भूमिका गौणच दिसते. त्याला अनुलक्षून रचलेल्या सूक्तांची संख्याही पाचापेक्षा जास्त नसावी. मात्र त्याचे भौतिक रूप पुष्कळ वेळा निर्देशिले गेले आहे [ज्यामुळे 'शंकरा' चा भास होऊ शकतो]. अक्राळ पसरलेली त्याची जटा, सामर्थ्यवान शरीरसंपदा, पिंगट गौरवर्ण, दृढ अवयवामुळे श्रेष्ठ असलेला रुद्र दशदिशांचा चक्रवर्ती मानला जातो. वेदात कुठेतरी त्याला 'नृघ्न' = मनुष्यघाती असे जरूर म्हटले आहे. ऋग्वेदातील तो दुष्ट देवताही असू शकेल, पण त्याची बरे करण्याची शक्तीही पुनःपुनः उल्लेखिली गेली आहे.

रुद् = रडणे ही व्याख्या मनी ठेवून "रुद्र" शब्दाचा अर्थ गळा काढून रडणारा असा घेतात. पण इथे त्याच्या प्रवृत्तीचा आणि प्रकृतीचा विचार करतात 'रडणे' अपेक्षित नसावे.रुद्राचा भौतिक पाया आणि त्याच्या नावाची व्युत्पत्ती दोन्ही अगदी स्पष्ट नाहीत. त्याचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करणारी विविध मते आहेत. पण त्याचा अर्थ 'रडवणारा' असे न मानता 'वादळवारा' वा 'झंझावात' असे मानले तर त्याच्या संदर्भातील रौद्र स्वरूप अधिक स्पष्ट होईल."

तुम्ही योग्य कथन करीत आहत, अशोक जी.. पण ऋग्वेदाला असे सेपरेट घेणे माझ्या मते अयोग्य आहे. आपल्या परंपरेत संपूर्ण श्रुती साहित्य एकत्र एका क्लासचे म्हणून घेतात.

रुद्र या शब्दात "रुद्" हा धातू आहे. आपण म्हंटल्या प्रमाणे, त्याचा अर्थ रडण्याशी (विशेषतः घाबरून रडण्याशी) आहे. आपटे संस्कृत शब्दकोशात देखील हा अर्थ दिलेला आहे. रुद्र "घाबरवणारा, भीतीदायक" या अर्थाने शब्दकोशात वापरला आहे. आणि मूळ शब्दात रुद् हा धातू असल्यामुळे रडवणारा

मरुत नावाच्या देवता देखील याच अर्थात सांगितल्या आहेत. मरुत त्यांच्या आईच्या गर्भात ते असताना इंद्र गर्भात शिरला आणि गर्भाला मारणार इतक्यात ते घाबरून रडू लागले. तर इंद्र त्यांना "मा रुद् (रडू नका)" असे म्हणाला व ते जगले. तेव्हा पासून त्या देवतांना "मरुत" म्हणू लागले, अशी एक कथा आहे.

नृघ्न प्रमाणे रुद्रास गोघ्न (गायींना मारणारा) देखील म्हंटले आहे (रुद्रप्रश्न येथे). रुद्रप्रश्न अथवा श्रीरुद्र यजुर्वेदातल्या तैत्तिरीय संहितेतला भाग आहे.. त्यात रुद्राला नीलग्रीवाय शितिकंठ अशी अनेक विशेषणे आहेत. त्र्यंबक हे नाव, शिव हे नाव सर्व योजले आहे. नमः शिवाय हा प्रसिद्ध पंचाक्षरी मंत्र यजुर्वेदातला आहे. याच रुद्रप्रश्नातला. इथे सरळ सरळ रुद्राला नमःशिवाय म्हणून वंदन केलेले आहे.

वास्तविक नीलकंठ वगैरे विशेषणे पौराणिक समजली जातात. आणि समुद्रमंथनाची गोष्ट निश्चित पौराणिक आहे. पण हे सगळे पुराणकाळाच्या खूप आधी लिहिल्या गेले आहे, हे १९व्या शतकातले इंग्रज इतिहासकार देखील मानतात (ज्यांनी आर्यन इंवेजन थियरी प्रतिपादिली होती). त्यामुळे कुठेतरी आपला इतिहास आपण परकीय चष्म्यातून बघतोय असे जाणवते. खरंच पुराणे आणि वेद यांच्यात इतका फरक आहे का? भाषा वेगळी आहे कारण पुराणे स्मृती आहेत. त्यांना आधुनिक भाषेत लिहिता येते. वेद श्रुती असल्यामुळे त्यांच्या भाषेतच काय तर उच्चारात देखील कानामात्रेचा फरक पडला नाहीये. गेली ५००० वर्षे तरी हि परंपरा कायम ठेवली आहे.

आपल्या परंपरेत हे दिलेले आहे कि पुराण (स्मृती) आणि वेद (श्रुती) यांच्यातील संबंध काय. आणि कुठे कुणाला कसा प्रेफरन्स द्यावा. आपण ते विसरलो आहोत.

पहिल्या परिच्छेदात लिहिल्याप्रमाणे, भटक्या अवस्थेत असताना हळूहळू वेदांची रचना होत होती. जसेजसे नागरी जीवन येऊ लागले, तसतसे समाजात आणि त्याच्या धर्मशास्त्रात (कायद्यात) आणि अर्थशास्त्रात कसा फरक पडत गेला याच्या गोष्टी आपल्याला पुराणात सापडतात. पण आपण त्यांना स्मृती म्हणून दुय्यम दर्जाचे ठरवतो. वास्तविक हे दोन्ही समांतर डेवेलप झाले आहेत असे वाटते.

रुद्राला 'रडविणारा' या संबोधनाने कुठे उल्लेखिलेले मला आढळलेले नाही.... >>>>>>>>
रुद्र म्हणजे भीषण रौद्र रुप.......... या अर्था ने आहे..........हा शब्द.....
रुद्रप्रताप हे नाव म्हणजे रौद्र प्रताप करणारा ...पण.. तुमच्या अर्थाने रडुन प्रताप करणारा होतो . . लिहिले चांगले आहे पण काही काही ठिकाणी अजुन विचार करा.......

वरदाजी

या विषयावरील तुमचा इन्पुट खूप शिकवून जाईल..

पण खरंच १९व्या शतकात जी भाषांतरे झालीत ती योग्य भाषांतरे आहेत का? साध्या साध्या शब्दांचे उदाहरण घ्या. धर्म, मूर्ती, अर्थ, देव, आर्य, (इतर बरेच आहेत) यांचे पॉप्युलर इंग्रजी प्रतिशब्द योग्य आहेत का?

पण हे पुढचे मुद्दे आहेत..

मी क्वालिफाईड इतिहास संशोधक नाही. म्हणजे इतिहासाची डिग्री माझ्याकडे नाही. पण वाचन बरेच दिवसांपासून सुरु आहे. जसेजसे समजते आहे, तसेतसे कळते कि आपला narrative हा अपह्रत झाला आहे. समस्त.

माझा काहीही अजेंडा हे पोस्ट करण्यात नाही. ना मुलनिवासी ना हिंदुत्ववादी. पण समाजाचे प्रचंड मेंटल इंजिनियरिंग झाले आहे. आणि एक हिस्सा ते undo करायचा प्रयत्न करतोय. हा संघर्ष, हे समुद्रमंथन नक्कीच दिसते आहे. यातून अमृताबरोबर विष देखील बाहेर येणारच. पण माझ्यामते भारताच्या उद्भावासाठी हे मंथन आवश्यक आहे.

त्यामुळे कृपया आपला अभिप्राय द्यावा. शिकायला मिळेल खूप.

उदय जी,

ते वाक्य अशोकजींनी लिहिले आहे. जर ते मला संबोधून असेल तर. नसेल तर सॉरी. फक्त कुणाला संबोधून लिहिता आहत ते लिहिले कि प्रतिक्रिया द्यायला सोपे पडेल.

भारतात सर्वात आधी शंकराचा उल्लेख वेदांत येतो. रुद्र (रडवणारा) हे अतिप्रचालीत नाव वेदातले आहे.>>>>>>>>>> हे आपले वाक्य आहे आणि त्याच संदर्भात मी आपणास बोललो आहे... आपण अर्थ चुकीचा लावला तो कसा चुकीचा आहे हे सुध्दा संदर्भासहीत स्पष्टीकरण करुन सांगितले आहे मी

Pages