शैव मत

Submitted by अंबरीष फडणवीस on 22 May, 2012 - 06:03

शिवशंकराची उपासना भारतात अनादी कालापासून सुरु आहे. महादेव म्हणजे सृष्टीचा संहारक नवीन सृष्टीसाठी platform तयार करणारी शक्ती.. आदीगुरु.. कलाकारांचा आणि सर्व कलांचा उद्गाता.. तंत्राचा आणि तंत्रज्ञानाचा प्रणेता. योगेश्वर.. विष्णू balance दर्शवतो तर शिव extreme. ज्योतिषात शनी या ग्रहाचा स्वामी.. वेदांच्याहि आधी पासून शत्रूचे प्राण हरण करताना भारतीय रुद्राचे आवाहन करीत आलेले आहेत. असे म्हणता येईल कि भारतातला सर्वात लिबरल दैवत म्हणजे शिव. साक्षात काळ म्हणजे शिव. महाकालेश्वर आणि महाकाळ म्हणून पौराणिक वैदिक आणि बौद्धमत शंकरास संबोधते. बौद्धमतात शंकरास अवलोकितेश्वर देखील म्हंटले आहे.

भारतात सर्वात आधी शंकराचा उल्लेख वेदांत येतो. रुद्र (रडवणारा) हे अतिप्रचालीत नाव वेदातले आहे. शिव (शुभ) हे विशेषण पण वेदांत आढळते. सत्यं शिवं सुंदरम हे तिथलेच प्रसिद्ध वाक्य आहे. याच बरोबर योग या भारतीय दर्शनात ईश्वर म्हणून जो धरतात तो देखील शिव आहे. शिव आणि योगाचा प्राचीन संबंध मोहनजोदारो च्या उत्खननात सापडलेल्या पशुपतीच्या मुद्रेत दिसतो. जालंधरबंध धरून ध्यानमुद्रेत बसलेला आणि प्राण्यांनी वेढलेला पशुपतीनाथ चटकन सिंधूसंस्कृती च्या continuity ची साक्ष देतो. म्हणजे जवळपास ७००० वर्षे तरी उत्खननशास्त्रानुसार भारतात शिवपूजा होत आहे. आपल्या ऐतिहासिक पुराव्यांवर दृष्टी टाकली तर भरपूर आधी पासून रुद्रपुजा होत आहे. विष्णूची पण तशीच गोष्ट आहे. हि दैवते वेदकाळात पुजली जायची यांच्या नावाने अनेक यज्ञ आहेत. परंतु त्या काळात इंद्र-वरुण-अग्नी वगैरे देवतांना अधिक प्राधान्य होते. विष्णूस वेदांत "उपेंद्र" (इंद्राचा deputy) म्हंटले आहे. रुद्र देखील देवागणात होता.

इसपू १५००-२००० च्या सुमारास बदल घडू लागला. २५०० ते १९०० मध्ये राजस्थानातून वाहणारी सरस्वती नदी आटली. भारतीय परंपरेनुसार ३१०१ इसपू साली भारतीय युद्ध कुरुक्षेत्री झाले. आणि सरस्वती-सिंधू खोऱ्यातून गंगेकडे सत्ता आणि लोक स्थलांतर करू लागली. यमुना आणि शतुद्रू (सतलज) नद्या ज्या सरस्वतीला मिळायच्या त्यांनी दिशा बदलून अनुक्रमे गंगा आणि सिंधू नद्यांत आपल्या पाण्याचा निचरा करू लागल्या.

नागरी सभ्यता नाहीशी होऊन सप्तसिंधूतले वैदिक लोक परत बराच काळ (म्हणजे ६००-१००० वर्षे) टोळीवाले बनले असावेत. पंजाबचा परिसर कोरडा आहे. पाणी नद्यांच्या नेटवर्क मुळे मिळत राहते. परंतु खूप पाउस पडत नाही. त्यामुळे घनदाट जंगले नसत. grasslands सारखी जंगले पंजाब-सिंध-राजस्थान-गुजरात मध्ये आजही दिसतात. या उलट गंगेच्याखोरे हे घनदाट जंगलांचे म्हणून प्रसिद्ध होते. गंगेच्या खोऱ्यात वैदिक लोक अगदी रामायणाच्याच्या आधीच्या कालापासून राहत आलेली आहेत. पण भारतीय युद्धानंतर आणि सरस्वतीच्या आटल्यानंतर भारताचे सत्ताकेंद्र खऱ्या अर्थाने गंगेच्या खोऱ्यात आले. आणि विष्णू शिव ब्रह्मदेव वगैरे दैवते प्रचलित होऊ लागली.

आजकाल बरेच इतिहासतज्ञ बुद्धाचा काळ इसपू १५०० मानतात. कलिंग जिंकणारा व त्यानंतर धम्म स्वीकारणारा अशोक आणि स्तुपे बांधणारा अशोक वेगळे होते असे म्हणतात. अलक्षेन्द्राच्या स्वारीच्या वेळेस गुप्तवंश होता कारण मेगास्थिनीस नावाचा ग्रीक इतिहासकार जो भारतात राहिला तो चंद्रगुप्ताच्या पोराचे नाव समुद्रगुप्त काहीसे सांगतो. चाणक्याचा शिष्य मौर्यकुलीन चंद्रगुप्तच्या पोराचे नाव बिन्दुसार होते. चाणक्य आणि अशोक कधीही झाले असो. मुद्दा हा कि चाणक्य अर्थशास्त्रात वासुदेव आणि रुद्र या दोन देवतांबद्दल बोलतो. यापैकी विष्णुगुप्त चाणक्य म्हणतो कि रुद्रोपासना खूप दिवसांपासून चालत आलेली आहे पण हल्ली वासुदेव पंथ देखील वेगात प्रसरण पावतोय. म्हणजे कृष्ण हा देवत्व चाणक्याच्या थोड्या आधीपासून पावू लागला. विष्णू देव आधीपासूनच होता. पण ऐतिहासिक पुरुषास देवत्व बहाल करणे कृष्णापासून सुरु झाले कि काय असे वाटते. असो.

शैवमत हे असे हळूहळू प्रचलित झाले. या मताच्या अनेक शाखा प्रचलित झाल्या. याच २७०० वर्षांच्या प्रदीर्घ काळात. (इसपू १७००-इस १०००). त्यातल्या काही शाखा आणि त्यांचे भौगोलिक प्रचलन खालील प्रमाणे..

मूळ उद्गम - वैदिक रुद्रउपासना

श्वेताश्वर उपनिषदात सर्वप्रथम शंकरास महादेव आणि ईश्वर हि विशेषणे दिली आहेत. हे उपनिषद कृष्ण-यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेचा भाग आहे. हि संहिता पांचाल देशात (आजचा पश्चिम उत्तर प्रदेश - आग्रा वगैरे परिसर) लिहिली गेली.

या पंथाच्या तीन मुख्य शाखा..

१. पौराणिक शैव मत..
२. योगिक शैव मत..
३. अपौराणिक शैव मत.

१. पौराणिक शैवमत तेच जे आपण आज मुख्यत्वे ऐकतो. मुख्य सोर्सेस - शिवमहापुराण लिंगपुराण स्कंदपुराण शिवरहस्यपुराण इत्यादी. याबद्दल मी जास्त लिहीत नाही. कारण हे सर्वश्रुत आहे.

शिवाच्या गोष्टी, लिंगपूजा, नटराज शंकर, आद्यगुरु दक्षिणमूर्ती शिव, कैलासपती शिव, तांडव करणारा आद्यनर्तक शिव, शास्त्रीय संगीताचा प्रणेता आणि पालक शिव, त्रिनेत्रधारी शिव, मदनाला भस्मसात करणारा शिव, सतीशी आणि नंतर पार्वतीशी रतीक्रीडेत रममाण होणारा शिव, कार्तिकेयाचा आणि गणेशाचा पिता शिव, नंदिवाहन शिव, अर्जुनाला पाशुपतास्त्र देणारा शिव, हनुमानरूपात अवतरित होणारा रुद्र, शत्रूचे प्राण हरणारा शिव (हर हर महादेव या घोषणेत हर म्हणजे हरण करणे, हिसकावणे. या घोषणेत आपण शंकराला आवाहन करतो कि मी शत्रूला मारतोय आता तू याचे प्राण हरण कर. महादेवा हरण कर रे), अधार्मिक शत्रूच्या आप्तांना आणि स्त्रियांना रडवणारा रुद्र.

शंकराचे हे स्वरूप आपल्याला माहिती आहेच. वैदिक, पुराणिक आणि काही अपौराणिक शैवसंप्रदायांचे संमिश्रण होऊन बनलेले हे स्वरूप आहे. यातले बहुतांश मत पुराणकाळात (इसपू १००० ते इस ५००) आणि नंतर श्री. जगद्गुरू आदी शंकराचार्य (इस ७००-८००) यांच्या कृपेने बनले आहे. मतानुमतात विभागलेला भारतीय समाजाला इस्लामच्या आक्रमणाच्या उंबरठ्यावर एक करणारा हा युगपुरुष. स्मार्त संप्रदाय यांनी सुरु केला. भक्ती आणि ज्ञानमार्ग एकमेकांचे विरोधक नाहीत हे लोकांना पटवून दिले.

प्रमुख सेश्वरवादी असे शैव-वैष्णव-शाक्त-सूर्य-गाणपत्य हे पाच संप्रदाय एक करून पंचायतन पूजा सांगितली. यांची आपसात वादविवाद करण्यात खर्ची पडणारी शक्ती येणाऱ्या काळासाठी एक केली. सांख्य, बौद्ध, मीमांसा, न्याय, वैशेषिक, चार्वाक, जैन इत्यादी निरीश्वरवादी मतांना विवादात हरवून काही मठात सीमित केले. यामुळे हि मते टिकून राहिली व स्वातंत्र्यानंतर परत वर आली.

पुढले हजार-बाराशे वर्षे हे सगळे टिकले कारण शंकराचार्यांनी केलेले मतांचे आणि लोकांचे एकीकरण. त्यांना नमस्कार करून पुढे जाऊया.

२. योगिक शैवमत हे अपौराणिक शैव मतासोबतच प्रचलित व प्रसारित होत होते.

३. अपौराणिक शैवमत - अपौराणिक शैव मताचे दोन प्रमुख उपप्रकार आहेत.

पण या आधी द्वैतवादी एकेश्वरवाद (monotheism) आणि अद्वैतवादी एकेश्वरवाद (Monism) यातला फरक लक्षात घ्यायला हवा. Monotheism मध्ये एकच ईश्वर असतो जो सृष्टीचा नियंता आणि कर्ता असतो. ईश्वर आणि त्याची सृष्टी वेगळी असते. याचे दोन प्रकार आहेत - कडक आणि सौम्य (हि नावे मी दिली आहेत). कडक (strong monotheism) म्हणजे इस्लाम, ख्रिस्तपंथ यहुदी पंथ यासारखा. सौम्य Monotheism म्हणजे हरे कृष्ण वाले, इस्कॉन वाले, वैष्णव वारकरी संप्रदाय वगैरे सारखा. Monism म्हणजेच अद्वैत. सृष्टी आणि ईश्वरात द्वैतभाव नाही. सृष्टीच ईश्वर (सर्वं खलु इदं ब्रह्म).

अपौराणिक शैव मताचे दोन प्रमुख उपप्रकार आहेत.

I. मंत्रमार्ग
II. अतिमार्ग

I. मंत्रमार्ग

मंत्रमार्गाचे खालील उपप्रकार

अ. कपालिक शैवमत - यास काश्मिरी शैवमत देखील म्हणतात. हे एकेश्वर अद्वैतवादी मत मत. हा घरघुती गृहस्थाश्रमात असणाऱ्या लोकांसाठी असलेला पंथ आहे (होता). या मताचे शिवसूत्र आणि भैरवसूत्र हे प्रमुख ग्रंथ (आगम) आहेत. वसुगुप्त, सोमानंद, अभिनवगुप्त, क्षेमराज, उत्पलदेव आदी ऋषी या संप्रदायाचे प्रमुख आणि प्रसिद्ध आचार्य व उद्गाते आहेत. अभिनवगुप्त नाट्यशास्त्राचेपण खूप प्रसिद्ध आचार्य होते.

कापालिक शैवमत हे खुपसे शंकराचार्यांच्या अद्वैतवादासारखे आहे. शंकराचार्य आणि एका कापालिकाचा वाद शंकर-विजयं या ग्रंथात नमूद आहे. पण शंकराचार्यप्रणीत अद्वैतासारखे संन्यासप्रधान नसून गृहस्थप्रधान आहे.

या मताचा गोषवारा असा.

१. चिती - वैश्विक उर्जा/चेतना. हिलाच कापालिक शिव म्हणतात.
२. मल - चेतना जेव्हा लहानश्या भागात केंद्रित होते त्यास जीव म्हणतात. जीव स्वतःला शिवापेक्षा (वैश्विक चेतनेपेक्षा) वेगळा समजायला लागतो तीन प्रकारच्या मलांमुळे (मळ). आणव मळ (अहंकार), मायीय मळ (मायेमुळे उत्पन्न झालेला आणि मनापुरता सीमित असलेला), कर्ममळ (शरीरापुरता सीमित असलेला).
३. उपाय - तीन मलात अडकलेला जीव शिवाशी एकरूप व्हायला तडफडत असतो. त्या साठी लागणारी साधना यात सांगितलेली आहे.
४. मोक्ष - जीवाचे शिवाशी एकरूपत्व.

काश्मिरी कापालिक शैवसंप्रदायातल्या अन्य काही संकल्पना म्हणजे - अनुत्तर, अहं, प्रत्याभिज्ञ, कौल आणि स्वातंत्र्य..

काश्मिरी कापालिक शैव पंथ परत तीन उपप्रकारात विभागलेला आहे -
त्रिक (संन्यासी लोकांसाठी), कौल (सामान्य गृहस्थ लोकांसाठी) आणि अघोरी (तांत्रिक लोकांसाठी).

ब. शैव सिद्धांत - यास तांत्रिक शैवमत देखील म्हणतात. हे मत समस्त भारतभर प्रचलित होते. हे भारतातच नव्हे तर श्रीलंका, दक्षिणपूर्व आशिया मध्येही पसरले होते. इस्लामी आक्रमणानंतर हे दक्षिणेतच राहिले. दक्षिणेत नयनार संतांचे काव्य शैवसिद्धांतात मिसळले. याची सरमिसळ होऊन पेरियपुराण आणि तीरुमुराई या दक्षिणी शैवमताची रचना ६३ नयनार संतांनी मिळून केली.

मुळात हा संप्रदाय द्वैतवादी आहे. सांख्यतत्वज्ञान हे याचा कणा आहे. शिव आणि शक्ती यांच्या द्वैताद्वैत फॉर्म ची उपासना या मतात होते. कापालिक संप्रदायात आणि शैवसिद्धांतात भरपूर आदानप्रदान झाले आहे. अधिक योगमार्ग आणि तंत्रमार्ग हे देखील मंत्रमार्गातील सर्व शैवसंप्रदायांना जवळचे आहेत.

मुळात हा संप्रदाय ज्ञानमार्ग होता. तामिळनाडूमध्ये नयनार संतांनी त्याचे भक्तीमार्गात रुपांतरण केले. मूळ शैव सिद्धांत याचे आणखी एक Monist अद्वैतवादी अपत्य म्हणजे नाथसंप्रदाय. (गोरक्षनाथादी नवनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, चांगदेव वगैरे या शाखेचे). हा संप्रदाय मध्यभारतात, बंगाल आणि समस्त गंगेच्या खोऱ्यात प्रचलित होता व आहे.

असे म्हणता येईल कि मूळ शैवसिद्धांत काश्मिरात कापालिक बनला, मध्य भारतात नाथसंप्रदाय, राजपुतांच्या प्रदेशात तंत्रमार्ग आणि शाक्तमार्गाशी संलग्न झाला, दक्षिणेत नयनार संतांनी त्यास भक्तीमार्गाचे रूप दिले. योगाशी आणि तंत्राशी संलग्न होऊन हठयोग प्रदीपिका सारखे ग्रंथ निर्माण झाले. पुढे तामिळी शैवमताचे विशिष्टद्वैत वेदांताशी लग्न होऊन त्याचे पर्यावसान बसवण्णा यांच्या लिंगायत संप्रदायात झाले. त्याची गोष्ट पुढे आहे.

कापालिक मताच्या सर्व उपप्रकारांचे शैवसिद्धांतातील सर्व उपप्रकारांशी आणि इतर भारतीय आस्तिक आणि नास्तिक मतांशी विचारांचे आदानप्रदान आणि वादविवाद चालू असतच. त्यामुळे हे सतत गतिमान असे Dynamic चित्र होते. बौद्धमतात तंत्र खूप प्रख्यात आहे. वज्रयान बौद्धमत आणि कापालिक मत यांच्यात तर कल्पनांची खूप exchange आढळते.तीच गोष्ट तिबेटीय बौद्धमताची. अवलोकितेश्वर हे बुद्धाचे "शिवस्वरूप" म्हणून वज्रयानात प्रसिद्ध आहे.

कालमुख वीर-शैव हा संप्रदाय विशिष्टद्वैत वेदांत, सांख्य आणि शैवसिद्धांत यांचे मिश्रण आहे. शिव-शक्ती जोडी यांच्यातील अचिंत्य भेदाभेद (एक आहे आणि नाहीही) निरुपण करणारे हे मत आहे. सेश्वरवादी सांख्यमत या पंथासोबत थोडे साधर्म्य दाखवते.

अघोरी लोक देखील मंत्रमार्गात येतात.

II. अतिमार्ग

अ. पाशुपत शैवमत - हे सर्वात जुने शैवमत आहे असे मानण्यात येते. हे प्रामुख्याने मुलतान, पंजाब, गांधार, नेपाळ, गुजरात आणि तामिळनाडू मध्ये प्रचलित होते. मोहनजोदारो येथील पशुपातीनाथाचे योगमुद्रेतले चित्र याच संप्रदायातले. ऋषी लकुलीष या संप्रदायाचे उद्गाते होते. यांचा आणि या पंथाचा रेफरन्स महाभारतात देखील आहे. म्हणजे इसपू ३००० च्या आधी पासून हे मत नक्कीच भारतात प्रचलित आहे.

हा प्रामुख्याने संन्यस्त शैव भक्ती मार्ग आहे. हा मार्ग स्वीकारावयास लागणारे व्रत पाशुपतव्रत म्हणवते आणि याची विधी अथर्ववेदातल्या अथर्वशिरस उपनिषदात आढळते. या संप्रदायाची प्रमुख ग्रंथे आहेत - गणकारिका, पंचार्थ भाष्यदीपिका, राशीकर भाष्य. या मताला कालमुख असेही म्हणतात.

पाशुपातीय लोक वैष्णव मताचे कट्टर विरोधक होते. हे द्वैत एकेश्वरवादी आहे. वास्तविक हे खूप strong monotheism सांगतात. पण इस्लाम आणि मध्यपूर्वेतील सम्प्रदायांसमोर यांची कट्टरता क्षुल्लक भासते. त्यामुळे सौम्य एकेश्वरवाद हे म्हणणे योग्य राहील.

कापालिक आणि पाशुपत शैवमतांविरुद्ध काही इतर शैवमतांनी उपहास आणि टीकात्मक साहित्य लिहिले आहे. मत्तविलासप्रहसन नावाचे पल्लवकालीन संस्कृत एकपात्री नाटक या दोन्ही मतांची यथेच्छ खिल्ली उडवते. पशुपातीय शैवमत आता फारसे प्रचलित नाही.

बसवण्णा यांचे लिंगायत वीरशैव मत यांनी भक्तीमार्गी तामिळी शैवसिद्धांत आणि पाशुपातीय अतिमार्गी मत एकत्र करून नवीन पंथ सुरु केला. तो आजतागायत व्यवस्थित सुरु आहे. मुख्यत्वे कर्नाटक, आंध्र आणि महाराष्ट्र प्रांतात हा शैवसंप्रदाय पसरलेला आहे. जरी यात मंत्रमार्गाचे अनेक influences आहेत तरी हा अतिमार्गात गणल्या जातो कारण लकुलीष ऋषींची परंपरा आणि कालमुख परंपरा या पंथात सुरु असल्याचे म्हणतात.

उपसंहार

गांधार, पंजाब प्रांतातून आता अपौराणिक शैवमत काय तर समस्त भारतीय संस्कृतीच पुसल्या गेली आहे. १९८५ नंतर (काश्मिरी पंडितांचे शिरकाण झाल्यानंतर) तिथूनही शैवमत नाहीसे झाले आहे. बहुतांश भारतात पौराणिक शैवमत प्रचलित आहे. या मताने अनेक अपौराणिक मते आपल्यात धारण करून टिकवून ठेवली आहेत. बाकी तांत्रिक, लिंगायत आणि काही तामिळी कुळे वगळता शुद्ध अपौराणिक शैवमत फारसे शिल्लक नाही. ग्रंथ आहेत, कल्पना आहेत, त्याचे पालन हि होते आणि या परंपरांच्या आचार्यांचा आदरही होतो. पण फक्त हि मते आचरणारी एक डेडीकेटेड जनसंख्या नाही.

एका अर्थी चांगलेच आहे. भारतास असलेला धोका अजून पूर्ण टळला नाहीये. जेव्हा ते होईल तेव्हा हि मते देखील कालसुसंगत होऊन कुणीतरी reinvent करेल आणि भारतात प्रचलित करेल याची खात्री मला आहे.

http://agphadnavis.blogspot.com/2012/05/blog-post_19.html

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चान्गला लेख आहे Happy
मात्र कालसुसन्गतरित्या मेन्दुत तर्कसन्गती लावणे माझेमलाच थोडे अवघड जात असल्याने मला नीट आकलला नाही (तो दोष लेखाचा नाही, माझ्या कमी अभ्यासाचा आहे)

कालसुसंगत तर्कसंगती.... Proud ते कशाला अशी मांडणी करतील? मग त्यांचं भांडं नाही का फुटणार? Proud

मेकॉलेच्या आधी सर्वांना मोफत शिक्षण, व्यवसाय प्रशिक्षण, अर्थशास्त्र, दर्शनशास्त्र यांचं अध्ययन असा अभ्यासक्रम होता. शूद्रांना केवळ त्यात प्रवेश असून इतरांना शिक्षणास बंदी असे. मेकॉलेने सर्वांना शिक्षण दिले. परंतु त्यातून क्लार्कच उत्पन्न झाले असा आता साक्षात्कार होत आहे तो महत्वाचा आहे. मेकॉलेच्या आधी सर्व राजपत्रिअ अधिकारी, लष्करातले अधिकारी असत. त्यांच्यामुळेच तर पाच हजार वर्षे इंग्रज भारताकडे डोळे वक्र करून पाहू शकले नव्हते.

मेकॉले अत्यंत नीच होता हे आम्हास पटले आहे. उगाच सगळीकडे शाळा करून ठेवली न काय..

Proud

पोस्ट एडीट केलेली आहे.. मेकॉलेपुत्र वरून वाद नको.. तो वेगळा विषय आहे आणि या धाग्याला भलतीकडे घेऊन जाईल..

चिंतन शिबिरातून बाहेर पडलेली बॅच नेटवर मेकॉलेच्या नावाने खडी फोड्त पोष्टी टाकत बसते हे गेली कित्येक वर्षे पाहतोच आहोत Proud मेकॉलेचा अभ्यासक्रम नंतर बदला हो, पण आधी चिंतनशिबिराचा अभ्यासक्रम अपडेट करायची गरज आहे.

हो ना.. मग आता तोच न्याय बुद्धाला विष्णूचा नववा अवतार काही लोक म्हणतात, त्यास लावा.. म्हणजे गैरसमज होणार नाहीत.

Proud

बुद्धानी रामाला बोधिसत्व असे म्हणणे आणि पुनाओकानी काब्याला शिव म्हणणे... हे दोन्ही तुम्हाला सारखेच वाटत असेल तर तुमच्या बुद्धीला सलाम ! Rofl

प्रत्येक वेळेला दोन वर्गांमध्ये संघर्ष झाला की जात आणि धर्माकडे कशाला बोट दाखवायचं? दंगलीला कारण एखाद्या समाजावर झालेला अन्याय, आर्थिक शोषण, सामाजिक न्याय नसणे,अशी कारणे असतात.. जात आणि धर्म ही तत्कालीक निमित्त्ये असतात.. १९४८ झालं.. तत्कालीक घटना हे केवळ निमित्त्य. ती घटना नसती झाली तर दुसर्‍या कुठल्या तरी प्रसंगी हे झालंच असतं. त्यामुळे प्रत्येक वेळेला अमुक धर्माचे लोक वाढले म्हणूण हिंदुंच्या विरोधात दंगली झाल्या हे बडबडनं थांबवावं... ते लोक जरी याच धर्मात राहिले असते, पण समजा शोषीतच राहिले असते, तरी दंगली झाल्याच असत्या. उगाच दुसर्‍या धर्माला दोष देण्यात अर्थ नाही...

मुळात जन्मजात धर्म ही थीमच आता बाद झाली पाहिजे.. तरुण वयात ज्याने त्याने सगळ्या धर्मांचा अभ्यास करुन आपल्याला हवा तो धर्म निवडावा.. ( जसं बाबासाहेबानी केलं , नेताजी पालकर, ए आर रहमान, अ‍ॅपलचा मालक ही आणखी काही उदाहरणे. आणि जो धर्म आवडला त्याचे क्रिएटिव पद्धतीने संपूर्णपणे पालनही केले... ) बाजारात मॉलमध्ये साबण ठेवलेले असतात.. सगळे बघून जो तो आपला साबण निवडतो, तितकी सहजता राहिली पाहिजे. म्हणजे भांडणं, मार्‍यामार्‍या आणि कुणीही कशावरही पुस्तकं , लेख लिहित बसतो, या मधल्या धर्मदलालांची गरजच रहाणार नाही.

तुम्ही तुमचं शिवाबद्दल मौलिक मत माम्डलं, लोक वाचतील, विचार करतील, आणखी संदर्भ शोधतील, आणि अखेर आपला निर्णय ठरवतील.... तुम्ही तुमचा साबण बाजारात विकायला ठेवला, तुमचा हक्क तुम्ही बजावला.. आता लोक वास घेऊन ठरवतील, याचं काय करायचं ते! Proud तुमचा माल खपला तर आनंदच.. नाही तर अमूक अमूक यांचे विचारधन विनामुल्य असे करुन तुम्ही इंतरनेटवर तुमचे मौलिक (!!) विचार ठेऊ शकताच ! Proud

जागो ग्राहक प्यारे ! Proud

अक्षर शहा अक्षरशत्रू (उपाख्य Kiran..),

आपला इथला संदेश वाचला.

सर्वप्रथम आपली विनाअट क्षमा मागतो. आपल्या इथल्या मूळ संदेशातले विधान सकारात्मक नसून विसंगतीनिदर्शक आहे. ही बाब ध्यानी न आल्याने माझ्या इथल्या प्रतिसादात तिरकस पृच्छा केली गेली (बुद्धापेक्षा उच्च कोटीचे सत्य, इत्यादि). मी ती पूर्णपणे मागे घेत आहे.

गैरसमजाबद्दल क्षमा असावी.

आ.न.,
-गा.पै.

var lekhat 'satyam shivam sundaram' he 'vakya' vedamadhil ahe, asa ullekh ahe. To saaf chook ahe. 'satyam shivam sundaram'che janak devendranath tagore asoon, yacha mooL greek tattvadnyanat aahet. Brahmosamajachi vicharasaraNi samajavi mhanun devendranathanni he vachan tayar kela. Yachach dusara roop france madhye equality, liberty, fraternity asa dista.

अंबरीष, तेच पुस्तक.

मी म्हंटले होते:
>> पण अशा तात्वीक चर्चेचा आणि प्रत्यक्ष पुजल्या जाणार्‍या शिवाचा खूप संबंध नसणार (म्हणजे हे दोन पॉप्युलेशन्स मिनिमली ईंटरसेक्टींग असणार).

त्यात 'मिनिमली ईंटरसेक्टींग' द्वारे तेच म्हणायचे आहे: शंकराचार्यांसारखे दोन्ही गोष्टी करणारे विरळेच. पोट भरले असले तरच तत्वज्ञान सुचते. आधार शोधणाऱ्या लोकांना देव आहे हे पुरेसे असते, तो का आहे, कसा आहे, आधि काय होता याच्याशी त्यांना देणेघेणे नसते. Every god has her day. काशी शिवाची पण आज तिथल्या (कोण)कोणत्या मंदिरांमधे जास्त गर्दी असते ते पाहिले तर देवांचे(तरी) कसे डेमोक्रेटायझेशन होते आहे ते लक्षात येइल.

> बंगालची मंदिरे आणि आपल्याकडील हेमाडपंथी मंदिरे वेगळी असतात, घरे वेगळी असतात, पूजाविधी वेगळ्या असतात, भाषा वेगळ्या आहेतच, विधी वेगळे आहेतच, मग कल्चर देखील वेगळे. पण संस्कृती या शब्दात कल्चर आणि "सिविलायझेशन" (जो नागरी वसाहती आणि बांधकामे याचे वर्णन करणारा शब्द आहे) हा अर्थ घुसडला कि पूर्ण फ्रेम ऑफ रेफरन्स बदलते. कारण बंगाल आणि महाराष्ट्राची संस्कृती एक आहे. आतून जोडणारा एक धागा आहे. जो या फ्रेम मध्ये नाकारल्या जातो.

संस्कृती ही भाषेप्रमाणेच दर काही किमीनी बदलते. मुंबई ते ममता, ती सारखीच असायला हवी असा अट्टाहास का? ही अशी ठिगळांची चौघडी 'शिवा'यची गरज नसावी. संस्कृती ही संकराचाराने पसरते. सध्या आपल्याला जोडणारा दुवा हा भारतीय असण्याचा आहे. ही परीस्थीती न भुतो आहे, पण ती भविष्यात कायम राहील का हे आपल्यावरच अवलंबुन आहे - तिथे त्रिकालेश्वराची किंवा त्रिभुवनसुंदरीची काही मदत होणार नाही.

aschig,

>> संस्कृती ही भाषेप्रमाणेच दर काही किमीनी बदलते. मुंबई ते ममता, ती सारखीच असायला हवी
>> असा अट्टाहास का?

परत तुम्ही संस्कृती = कल्चर + सिव्हिलायझेशन असं समीकरण मांडताय! Happy

नेमकं हेच अंबरीशना अमान्य आहे. (त्यांच्या मते) संस्कृती म्हणजे आपलेपणा. जो मर्‍हाटा आणि बंगाल्यात आहे. पण पंजाबी मुस्लीम आणि सिंधी मुस्लीम यांत नाहीये.

(बरोबर ना अंबरीश?)

आ.न.,
-गा.पै.

संस्कृती ही भाषेप्रमाणेच दर काही किमीनी बदलते. मुंबई ते ममता, ती सारखीच असायला हवी असा अट्टाहास का? >>> त्याशिवाय एकगठ्ठा मते मिळवून 'शत प्रतिशत सत्ता' मिळवता येत नाही.

var lekhat 'satyam shivam sundaram' he 'vakya' vedamadhil ahe, asa ullekh ahe. To saaf chook ahe. 'satyam shivam sundaram'che janak devendranath tagore asoon, yacha mooL greek tattvadnyanat aahet. Brahmosamajachi vicharasaraNi samajavi mhanun devendranathanni he vachan tayar kela. Yachach dusara roop france madhye equality, liberty, fraternity asa dista.

सत्यं शिवं सुंदरम चा संबंध फ्रेंच राज्यक्रांतीच्या equality, liberty, fraternity शी जोडलेला वाचून आश्चर्य वाटले. सत्य म्हणजे समता, शिव म्हणजे मुक्ती आणि सुंदर म्हणजे बंधुता - हा विचार म्हणून मस्त आहे. हा वाक्प्रचार यजुर्वेदामधला आहे असे मी वाचून आहे. शोध घेऊन यातील तथ्य रिपोर्ट करतो. शिवाचे इतर दाखले वेदांत आहे, हे मात्र नक्की. या वाक्प्रचाराच्या वैदिक उगमाबद्दल काही दिवसात क्लियर करतो.

पोट भरले असले तरच तत्वज्ञान सुचते. आधार शोधणाऱ्या लोकांना देव आहे हे पुरेसे असते, तो का आहे, कसा आहे, आधि काय होता याच्याशी त्यांना देणेघेणे नसते. Every god has her day. काशी शिवाची पण आज तिथल्या (कोण)कोणत्या मंदिरांमधे जास्त गर्दी असते ते पाहिले तर देवांचे(तरी) कसे डेमोक्रेटायझेशन होते आहे ते लक्षात येइल.

अर्थात जनतेचे पोट भरलेले ठेवणे हे व्यावास्थेचे आणि राजाचे कर्तव्य आहे. प्रत्येक देवतेचे दिवस असतात हे तुमचे म्हणणे योग्य आहे. जे लोक कालानुरूप देवतेला अपडेट करीत असतात त्यांची देवता टिकते. इतरांची विस्मृतीत जाते.

संस्कृती ही भाषेप्रमाणेच दर काही किमीनी बदलते. मुंबई ते ममता, ती सारखीच असायला हवी असा अट्टाहास का? ही अशी ठिगळांची चौघडी 'शिवा'यची गरज नसावी. संस्कृती ही संकराचाराने पसरते. सध्या आपल्याला जोडणारा दुवा हा भारतीय असण्याचा आहे. ही परीस्थीती न भुतो आहे, पण ती भविष्यात कायम राहील का हे आपल्यावरच अवलंबुन आहे - तिथे त्रिकालेश्वराची किंवा त्रिभुवनसुंदरीची काही मदत होणार नाही.

(त्यांच्या मते) संस्कृती म्हणजे आपलेपणा.

धन्यवाद गापै जी...

आस्चिगजी,

तुम्ही ज्या गोष्टी वर्णील्या त्यांना संस्कृती म्हणावे का? सिविलायझेशन आणि कल्चर म्हणजे परंपरा म्हणता येतील. हो "कोस कोस पर पाणी बदले बारा कोस पर बानी" हा तर भारताबद्दलचा खूप जुना सुप्रसिद्ध वाक्प्रचार आहे.

प्रॉब्लेम शब्दाचा आहे. शब्दाच्या चुकीच्या भाषांतरामुळे परिमाण बदलते. जसे धर्म=रिलीजन या चुकीच्या भाषांतरणामुळे अर्थ बदलतो.

इतिहासात अनेक गोष्टीतून भारताला गुंफणारा अंतर्गत एकसुत्रतेचा धागा शब्दात दर्शवायचा असेल आणि जर "संस्कृती" हा शब्द कल्चर ने घेतलेला असेल आणि त्यामुळे तो वरील कामासाठी अवेलेबल नसेल तर नवीन शब्द शोधणे आवश्यक आहे. कदाचित "धर्म" हा शब्द अधिक चपखल बसेल. अर्थात धर्म म्हणजे रिलीजन नाही हे वारंवार सांगून क्लियर करावे लागेल.

धर्म हाच शब्द कशाला हवा? या शब्दाला मुळातच १७६० अर्थ आहेत.. मग पुन्हा असलाच शब्द का हवा? भारतीय संस्कृती याला अगदीच समान शब्द हवाच असेल तर भारतीयत्व हा शब्द आहेच. या शब्दाची जागा धर्म किंवा हिंदु हिंदुत्व हे शब्द घेऊ शकतच नाहीत.

धर्म हाच शब्द कशाला हवा? या शब्दाला मुळातच १७६० अर्थ आहेत.. मग पुन्हा असलाच शब्द का हवा? भारतीय संस्कृती याला अगदीच समान शब्द हवाच असेल तर भारतीयत्व हा शब्द आहेच. या शब्दाची जागा धर्म किंवा हिंदु हिंदुत्व हे शब्द घेऊ शकतच नाहीत.

दादा मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला भारतीयत्व आवडत असेल तर तो शब्द वापरतो. पण मग याचे परिणाम लक्षात घ्या. याचा परिणाम म्हणजे भारत हे सदैव राष्ट्र होते आणि चर्चिल म्हणतो तसा फक्त भूगोल नाही. यावरून आपले बोलणे झाले आहे आधी, नाही का?

आणि भारत या शब्दाची समस्या ही कि कधीचा भारत? १४ ऑगस्ट ४७ चा, १५ ऑगस्ट चा, १७५८ चा, १६७४ चा, ४०० चा, इसपू ३०० चा कि इसपू २००० चा? भारताचा भूगोल भारतीयांच्या पराक्रमानुसार बदलत आला आहे. धर्म या शब्दात एक जीवनपद्धत अभिप्रेत आहे जी सगळ्या भारतीय दंड-अर्थ-काम-मोक्ष मार्गांमध्ये कॉमन आहे, नव्हे तर ती या सर्व मार्गांची सर्वात महत्वाची प्रीरिक्वीझिट आहे. आणि ही एक युनिक भारतीय कन्सेप्ट आहे. मला हिंदुत्व या शब्दाबद्दल आणि कल्पनेबद्दल देखील विशेष आपुलकी नाही. तिटकाराही नाही.

भगतसिंहाचे "भारतीयत्व" हे ले. सौरभ कालिया यांच्या भारतीयत्वाच्या श्रेणीतले मानायचे का? सौरभ कालिया पाकिस्तानशी लढताना हुतात्मा झाले. भगतसिंह इंग्रजांशी. पण भगतसिंह लाहोर ला गेले. कालीयांच्या काळात लाहोर शत्रूप्रदेश झाला होता. दोघांचे देशप्रेम समान श्रेणीतले. पण जी ओढ अखंडपंजाब चा रहिवासी जो भगतसिंह यांना तत्कालीन भारताबद्दल वाटत होती ती कालीयांना देखील वाटत होती. पण भारत बदलला होता. तीच ओढ सदाशिव भाऊंना वाटत होती (त्यांच्या काही पत्रात हे दिसते).

मुद्दा हा कि ही एकसूत्रता जीवनपद्धतीशी निगडीत आहे, फक्त भूगोलाशी नाही.

आज भारतीयत्व या शब्दाय भारतीय सीमारेखेच्या आत असलेली इतकाच भाग अपेक्षित आहे.. कोणे एके काळी अखंड भारत होता.. अफगाणिस्तान पासुन श्रीलंकेत एकच संस्कृती होती वगैरे वगैरे... इतिहासाचा उल्लेख करताना हे ठीक आहे. पण वर्तमानकालीन संदर्भात भारतीयत्व या शब्दात लाहोर, ढाक्का, यांगून वगैरे आज येत नाही.. उगाच परदेशात बसून कुठली तरी अगम्य पुस्तके वाचण्यापेक्षा भारतीय कायदा, घटना वाचली तरी हे मुद्दे समजतात की.. Proud

जामोप्याजी विषय बघा अन मुद्दा बघा.. हे कुठून सुरु झाले ते तपासा जरा.. अशोक आणि किरण यांना दिलेल्या उत्तराचा भाग आहे तो.. पुढे आस्चिग यांनी टिप्पणी केली. सौरभ अन भगत सिंह हे उदाहरण फक्त हे दाखवायला होते कि भारतीयत्व या शब्दाला ऐतिहासिक संदर्भात वापरले तर काय होऊ शकते. इतिहासाचा उल्लेख करतानाचेच म्हणत होतो मी. आधी वाचा अन मग चावा हो....

असो भारताचे राष्ट्रीय परिमाण यावर मी वेगळा धागा काढला होतं. इच्छा असल्यास तिथे ही चर्चा सुरु ठेऊ..

वास्तविक शैवमताचे भारतातिल अंतर्गत एकसूत्रता जपण्यात अन वाढवण्यात प्रचंड योगदान आहे. भारतभर पसरलेले ज्योतिर्लिंगे हे इतर गोष्टींसोबत ही एकसूत्रता जपण्यास आणि दृढ करण्यास मदत करीत आलेले आहे. (इतर गोष्टी म्हणजे देवी ची शक्तीपीठे चार धाम चार पीठे नाथसंप्रदायांचे विविध तीर्थे सात नद्या तीन समुद्रे इत्यादी)

या सर्वत्र पसरलेल्या पीठांमुळे जनता तीर्थयात्रेच्या निमित्ताने भारत भ्रमण आणि दर्शन करीत आली आहेत. यामुळे होणाऱ्या तीर्थाटन अन पर्यटन यांमुळे तो एकसुत्रतेचा धागा मजबूत होत गेला.

कठीण काळात पीठे नवीन ठिकाणी स्थलांतरित झाली. महाराष्ट्रातले नागनाथ भीमाशंकर आणि वैद्यनाथ ही तीन ज्योतिर्लिंगे अनुक्रमे पंजाब, आसाम आणि झारखंड येथून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेली आहेत असे म्हणतात.

वैद्यनाथ परळी (महाराष्ट्र), देवघर (झारखंड) आणि बैजनाथ (हिमाचल) या तीन ठिकाणी आहे. भीमाशंकर महाराष्ट्राबरोबरच गौहत्ती, आसाम अन गुनुपूर ओडिशा येथे देखील आहे. नागनाथ अल्मोरा (उत्तराखंड), औंढा (महाराष्ट्र) अन द्वारका (गुजरात) या तीन ठिकाणी आहे.

असे सर्वत्र पसरलेले ६४ ज्योतिर्लिंगे होती पण आता १२ राहिली आहेत असे शैवपरंपरा सांगते. हे पुस्तक त्याबद्दल अधिक विस्तृतपणे सांगते.

http://books.google.dk/books/about/The_Concept_of_Rudra_%C5%9Aiva_Throug...

छ्या छ्या छ्या

आर्यन थिअरीचे पुरावे मागितले कि मानवजात आफिक्रेतून इवॉल्व झाली म्हणायची. मग हिंदू, ख्रिस्ती, यहुदी, मुस्लीम सगळे भाऊच म्हटले कि धर्म काय जीवनपद्धती काय..

जीवनपद्धती म्हणायचं असेल तर दाक्षिणात्य किंवा नागा जीवनपद्धती, आदिवासी जीवनपद्धती अभिप्रेत आहे का ? इथं वेदांना मानणा-यांचं कामच नाही. शिवाला मानणारे बहुसंख्य लोक वैदीक जीवनपद्धतीशी अनभिज्ञ आहेत. म्हणजे पुन्हा जीवनपद्धती बळीराजाची अभिप्रेत आहे कि वामनाची ?

जनमेजयाची अपेक्षित आहे कि तक्षकाची ? परीक्षिताची अपेक्षित आहे कि कालिया राजाची ?
या संस्कृती एकमेकांशी फटकून आहेत यावर एकमत व्हायला हरकत नसेल. शब्द॑च्छल आणि कोलांटौड्या पहायला येतोच...

आर्यन थिअरीचे पुरावे मागितले कि मानवजात आफिक्रेतून इवॉल्व झाली म्हणायची. मग हिंदू, ख्रिस्ती, यहुदी, मुस्लीम सगळे भाऊच म्हटले कि धर्म काय जीवनपद्धती काय..

जीवनपद्धती म्हणायचं असेल तर दाक्षिणात्य किंवा नागा जीवनपद्धती, आदिवासी जीवनपद्धती अभिप्रेत आहे का ? इथं वेदांना मानणा-यांचं कामच नाही. शिवाला मानणारे बहुसंख्य लोक वैदीक जीवनपद्धतीशी अनभिज्ञ आहेत. म्हणजे पुन्हा जीवनपद्धती बळीराजाची अभिप्रेत आहे कि वामनाची ?

+१

>>आर्यन थिअरीचे पुरावे मागितले कि मानवजात आफिक्रेतून इवॉल्व झाली म्हणायची.

ती थिअरी थोतांड आहे हे सिद्ध करणारा पुरावा इंग्रजीतून का होईना दिलाच आहे Happy

Stephen Knapp हे इंग्रजीतून लिहिनारे ओक आहेत. त्यांचा पुरावा (उत्साही शिशु स्वयंसेवक वगळता) कुणीही गंभीरपणे घेत नाही.

वा रे वा!! जो पुरावा तुमच्या सोयीचा नाही त्याला इंग्रजी ओक, हिंदी ओक वगैरे लेबले चिकटवून मोकळं व्हायचं, मज्जाय!!
ते फोटो तरी बघा हो!! सगळं लिखाणाकडे डोळेझाक केली तरी शेवटी जे दिसतं तो पुरावा तर उरतोच ना!! आणि जो पुरावा
परत एकदा सांगतो. उगाचच्या उगाच काहीही माहिती नसताना संघाला नको तिथे खेचू नका. संघाच्या सामाजिक कार्याबद्दल छटाकभर सुद्धा माहिती नसताना उगाच गरळ ओकून काही उपयोग नाही. लोकं हसतात तुम्हाला!!!

Pages