शैव मत

Submitted by अंबरीष फडणवीस on 22 May, 2012 - 06:03

शिवशंकराची उपासना भारतात अनादी कालापासून सुरु आहे. महादेव म्हणजे सृष्टीचा संहारक नवीन सृष्टीसाठी platform तयार करणारी शक्ती.. आदीगुरु.. कलाकारांचा आणि सर्व कलांचा उद्गाता.. तंत्राचा आणि तंत्रज्ञानाचा प्रणेता. योगेश्वर.. विष्णू balance दर्शवतो तर शिव extreme. ज्योतिषात शनी या ग्रहाचा स्वामी.. वेदांच्याहि आधी पासून शत्रूचे प्राण हरण करताना भारतीय रुद्राचे आवाहन करीत आलेले आहेत. असे म्हणता येईल कि भारतातला सर्वात लिबरल दैवत म्हणजे शिव. साक्षात काळ म्हणजे शिव. महाकालेश्वर आणि महाकाळ म्हणून पौराणिक वैदिक आणि बौद्धमत शंकरास संबोधते. बौद्धमतात शंकरास अवलोकितेश्वर देखील म्हंटले आहे.

भारतात सर्वात आधी शंकराचा उल्लेख वेदांत येतो. रुद्र (रडवणारा) हे अतिप्रचालीत नाव वेदातले आहे. शिव (शुभ) हे विशेषण पण वेदांत आढळते. सत्यं शिवं सुंदरम हे तिथलेच प्रसिद्ध वाक्य आहे. याच बरोबर योग या भारतीय दर्शनात ईश्वर म्हणून जो धरतात तो देखील शिव आहे. शिव आणि योगाचा प्राचीन संबंध मोहनजोदारो च्या उत्खननात सापडलेल्या पशुपतीच्या मुद्रेत दिसतो. जालंधरबंध धरून ध्यानमुद्रेत बसलेला आणि प्राण्यांनी वेढलेला पशुपतीनाथ चटकन सिंधूसंस्कृती च्या continuity ची साक्ष देतो. म्हणजे जवळपास ७००० वर्षे तरी उत्खननशास्त्रानुसार भारतात शिवपूजा होत आहे. आपल्या ऐतिहासिक पुराव्यांवर दृष्टी टाकली तर भरपूर आधी पासून रुद्रपुजा होत आहे. विष्णूची पण तशीच गोष्ट आहे. हि दैवते वेदकाळात पुजली जायची यांच्या नावाने अनेक यज्ञ आहेत. परंतु त्या काळात इंद्र-वरुण-अग्नी वगैरे देवतांना अधिक प्राधान्य होते. विष्णूस वेदांत "उपेंद्र" (इंद्राचा deputy) म्हंटले आहे. रुद्र देखील देवागणात होता.

इसपू १५००-२००० च्या सुमारास बदल घडू लागला. २५०० ते १९०० मध्ये राजस्थानातून वाहणारी सरस्वती नदी आटली. भारतीय परंपरेनुसार ३१०१ इसपू साली भारतीय युद्ध कुरुक्षेत्री झाले. आणि सरस्वती-सिंधू खोऱ्यातून गंगेकडे सत्ता आणि लोक स्थलांतर करू लागली. यमुना आणि शतुद्रू (सतलज) नद्या ज्या सरस्वतीला मिळायच्या त्यांनी दिशा बदलून अनुक्रमे गंगा आणि सिंधू नद्यांत आपल्या पाण्याचा निचरा करू लागल्या.

नागरी सभ्यता नाहीशी होऊन सप्तसिंधूतले वैदिक लोक परत बराच काळ (म्हणजे ६००-१००० वर्षे) टोळीवाले बनले असावेत. पंजाबचा परिसर कोरडा आहे. पाणी नद्यांच्या नेटवर्क मुळे मिळत राहते. परंतु खूप पाउस पडत नाही. त्यामुळे घनदाट जंगले नसत. grasslands सारखी जंगले पंजाब-सिंध-राजस्थान-गुजरात मध्ये आजही दिसतात. या उलट गंगेच्याखोरे हे घनदाट जंगलांचे म्हणून प्रसिद्ध होते. गंगेच्या खोऱ्यात वैदिक लोक अगदी रामायणाच्याच्या आधीच्या कालापासून राहत आलेली आहेत. पण भारतीय युद्धानंतर आणि सरस्वतीच्या आटल्यानंतर भारताचे सत्ताकेंद्र खऱ्या अर्थाने गंगेच्या खोऱ्यात आले. आणि विष्णू शिव ब्रह्मदेव वगैरे दैवते प्रचलित होऊ लागली.

आजकाल बरेच इतिहासतज्ञ बुद्धाचा काळ इसपू १५०० मानतात. कलिंग जिंकणारा व त्यानंतर धम्म स्वीकारणारा अशोक आणि स्तुपे बांधणारा अशोक वेगळे होते असे म्हणतात. अलक्षेन्द्राच्या स्वारीच्या वेळेस गुप्तवंश होता कारण मेगास्थिनीस नावाचा ग्रीक इतिहासकार जो भारतात राहिला तो चंद्रगुप्ताच्या पोराचे नाव समुद्रगुप्त काहीसे सांगतो. चाणक्याचा शिष्य मौर्यकुलीन चंद्रगुप्तच्या पोराचे नाव बिन्दुसार होते. चाणक्य आणि अशोक कधीही झाले असो. मुद्दा हा कि चाणक्य अर्थशास्त्रात वासुदेव आणि रुद्र या दोन देवतांबद्दल बोलतो. यापैकी विष्णुगुप्त चाणक्य म्हणतो कि रुद्रोपासना खूप दिवसांपासून चालत आलेली आहे पण हल्ली वासुदेव पंथ देखील वेगात प्रसरण पावतोय. म्हणजे कृष्ण हा देवत्व चाणक्याच्या थोड्या आधीपासून पावू लागला. विष्णू देव आधीपासूनच होता. पण ऐतिहासिक पुरुषास देवत्व बहाल करणे कृष्णापासून सुरु झाले कि काय असे वाटते. असो.

शैवमत हे असे हळूहळू प्रचलित झाले. या मताच्या अनेक शाखा प्रचलित झाल्या. याच २७०० वर्षांच्या प्रदीर्घ काळात. (इसपू १७००-इस १०००). त्यातल्या काही शाखा आणि त्यांचे भौगोलिक प्रचलन खालील प्रमाणे..

मूळ उद्गम - वैदिक रुद्रउपासना

श्वेताश्वर उपनिषदात सर्वप्रथम शंकरास महादेव आणि ईश्वर हि विशेषणे दिली आहेत. हे उपनिषद कृष्ण-यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेचा भाग आहे. हि संहिता पांचाल देशात (आजचा पश्चिम उत्तर प्रदेश - आग्रा वगैरे परिसर) लिहिली गेली.

या पंथाच्या तीन मुख्य शाखा..

१. पौराणिक शैव मत..
२. योगिक शैव मत..
३. अपौराणिक शैव मत.

१. पौराणिक शैवमत तेच जे आपण आज मुख्यत्वे ऐकतो. मुख्य सोर्सेस - शिवमहापुराण लिंगपुराण स्कंदपुराण शिवरहस्यपुराण इत्यादी. याबद्दल मी जास्त लिहीत नाही. कारण हे सर्वश्रुत आहे.

शिवाच्या गोष्टी, लिंगपूजा, नटराज शंकर, आद्यगुरु दक्षिणमूर्ती शिव, कैलासपती शिव, तांडव करणारा आद्यनर्तक शिव, शास्त्रीय संगीताचा प्रणेता आणि पालक शिव, त्रिनेत्रधारी शिव, मदनाला भस्मसात करणारा शिव, सतीशी आणि नंतर पार्वतीशी रतीक्रीडेत रममाण होणारा शिव, कार्तिकेयाचा आणि गणेशाचा पिता शिव, नंदिवाहन शिव, अर्जुनाला पाशुपतास्त्र देणारा शिव, हनुमानरूपात अवतरित होणारा रुद्र, शत्रूचे प्राण हरणारा शिव (हर हर महादेव या घोषणेत हर म्हणजे हरण करणे, हिसकावणे. या घोषणेत आपण शंकराला आवाहन करतो कि मी शत्रूला मारतोय आता तू याचे प्राण हरण कर. महादेवा हरण कर रे), अधार्मिक शत्रूच्या आप्तांना आणि स्त्रियांना रडवणारा रुद्र.

शंकराचे हे स्वरूप आपल्याला माहिती आहेच. वैदिक, पुराणिक आणि काही अपौराणिक शैवसंप्रदायांचे संमिश्रण होऊन बनलेले हे स्वरूप आहे. यातले बहुतांश मत पुराणकाळात (इसपू १००० ते इस ५००) आणि नंतर श्री. जगद्गुरू आदी शंकराचार्य (इस ७००-८००) यांच्या कृपेने बनले आहे. मतानुमतात विभागलेला भारतीय समाजाला इस्लामच्या आक्रमणाच्या उंबरठ्यावर एक करणारा हा युगपुरुष. स्मार्त संप्रदाय यांनी सुरु केला. भक्ती आणि ज्ञानमार्ग एकमेकांचे विरोधक नाहीत हे लोकांना पटवून दिले.

प्रमुख सेश्वरवादी असे शैव-वैष्णव-शाक्त-सूर्य-गाणपत्य हे पाच संप्रदाय एक करून पंचायतन पूजा सांगितली. यांची आपसात वादविवाद करण्यात खर्ची पडणारी शक्ती येणाऱ्या काळासाठी एक केली. सांख्य, बौद्ध, मीमांसा, न्याय, वैशेषिक, चार्वाक, जैन इत्यादी निरीश्वरवादी मतांना विवादात हरवून काही मठात सीमित केले. यामुळे हि मते टिकून राहिली व स्वातंत्र्यानंतर परत वर आली.

पुढले हजार-बाराशे वर्षे हे सगळे टिकले कारण शंकराचार्यांनी केलेले मतांचे आणि लोकांचे एकीकरण. त्यांना नमस्कार करून पुढे जाऊया.

२. योगिक शैवमत हे अपौराणिक शैव मतासोबतच प्रचलित व प्रसारित होत होते.

३. अपौराणिक शैवमत - अपौराणिक शैव मताचे दोन प्रमुख उपप्रकार आहेत.

पण या आधी द्वैतवादी एकेश्वरवाद (monotheism) आणि अद्वैतवादी एकेश्वरवाद (Monism) यातला फरक लक्षात घ्यायला हवा. Monotheism मध्ये एकच ईश्वर असतो जो सृष्टीचा नियंता आणि कर्ता असतो. ईश्वर आणि त्याची सृष्टी वेगळी असते. याचे दोन प्रकार आहेत - कडक आणि सौम्य (हि नावे मी दिली आहेत). कडक (strong monotheism) म्हणजे इस्लाम, ख्रिस्तपंथ यहुदी पंथ यासारखा. सौम्य Monotheism म्हणजे हरे कृष्ण वाले, इस्कॉन वाले, वैष्णव वारकरी संप्रदाय वगैरे सारखा. Monism म्हणजेच अद्वैत. सृष्टी आणि ईश्वरात द्वैतभाव नाही. सृष्टीच ईश्वर (सर्वं खलु इदं ब्रह्म).

अपौराणिक शैव मताचे दोन प्रमुख उपप्रकार आहेत.

I. मंत्रमार्ग
II. अतिमार्ग

I. मंत्रमार्ग

मंत्रमार्गाचे खालील उपप्रकार

अ. कपालिक शैवमत - यास काश्मिरी शैवमत देखील म्हणतात. हे एकेश्वर अद्वैतवादी मत मत. हा घरघुती गृहस्थाश्रमात असणाऱ्या लोकांसाठी असलेला पंथ आहे (होता). या मताचे शिवसूत्र आणि भैरवसूत्र हे प्रमुख ग्रंथ (आगम) आहेत. वसुगुप्त, सोमानंद, अभिनवगुप्त, क्षेमराज, उत्पलदेव आदी ऋषी या संप्रदायाचे प्रमुख आणि प्रसिद्ध आचार्य व उद्गाते आहेत. अभिनवगुप्त नाट्यशास्त्राचेपण खूप प्रसिद्ध आचार्य होते.

कापालिक शैवमत हे खुपसे शंकराचार्यांच्या अद्वैतवादासारखे आहे. शंकराचार्य आणि एका कापालिकाचा वाद शंकर-विजयं या ग्रंथात नमूद आहे. पण शंकराचार्यप्रणीत अद्वैतासारखे संन्यासप्रधान नसून गृहस्थप्रधान आहे.

या मताचा गोषवारा असा.

१. चिती - वैश्विक उर्जा/चेतना. हिलाच कापालिक शिव म्हणतात.
२. मल - चेतना जेव्हा लहानश्या भागात केंद्रित होते त्यास जीव म्हणतात. जीव स्वतःला शिवापेक्षा (वैश्विक चेतनेपेक्षा) वेगळा समजायला लागतो तीन प्रकारच्या मलांमुळे (मळ). आणव मळ (अहंकार), मायीय मळ (मायेमुळे उत्पन्न झालेला आणि मनापुरता सीमित असलेला), कर्ममळ (शरीरापुरता सीमित असलेला).
३. उपाय - तीन मलात अडकलेला जीव शिवाशी एकरूप व्हायला तडफडत असतो. त्या साठी लागणारी साधना यात सांगितलेली आहे.
४. मोक्ष - जीवाचे शिवाशी एकरूपत्व.

काश्मिरी कापालिक शैवसंप्रदायातल्या अन्य काही संकल्पना म्हणजे - अनुत्तर, अहं, प्रत्याभिज्ञ, कौल आणि स्वातंत्र्य..

काश्मिरी कापालिक शैव पंथ परत तीन उपप्रकारात विभागलेला आहे -
त्रिक (संन्यासी लोकांसाठी), कौल (सामान्य गृहस्थ लोकांसाठी) आणि अघोरी (तांत्रिक लोकांसाठी).

ब. शैव सिद्धांत - यास तांत्रिक शैवमत देखील म्हणतात. हे मत समस्त भारतभर प्रचलित होते. हे भारतातच नव्हे तर श्रीलंका, दक्षिणपूर्व आशिया मध्येही पसरले होते. इस्लामी आक्रमणानंतर हे दक्षिणेतच राहिले. दक्षिणेत नयनार संतांचे काव्य शैवसिद्धांतात मिसळले. याची सरमिसळ होऊन पेरियपुराण आणि तीरुमुराई या दक्षिणी शैवमताची रचना ६३ नयनार संतांनी मिळून केली.

मुळात हा संप्रदाय द्वैतवादी आहे. सांख्यतत्वज्ञान हे याचा कणा आहे. शिव आणि शक्ती यांच्या द्वैताद्वैत फॉर्म ची उपासना या मतात होते. कापालिक संप्रदायात आणि शैवसिद्धांतात भरपूर आदानप्रदान झाले आहे. अधिक योगमार्ग आणि तंत्रमार्ग हे देखील मंत्रमार्गातील सर्व शैवसंप्रदायांना जवळचे आहेत.

मुळात हा संप्रदाय ज्ञानमार्ग होता. तामिळनाडूमध्ये नयनार संतांनी त्याचे भक्तीमार्गात रुपांतरण केले. मूळ शैव सिद्धांत याचे आणखी एक Monist अद्वैतवादी अपत्य म्हणजे नाथसंप्रदाय. (गोरक्षनाथादी नवनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, चांगदेव वगैरे या शाखेचे). हा संप्रदाय मध्यभारतात, बंगाल आणि समस्त गंगेच्या खोऱ्यात प्रचलित होता व आहे.

असे म्हणता येईल कि मूळ शैवसिद्धांत काश्मिरात कापालिक बनला, मध्य भारतात नाथसंप्रदाय, राजपुतांच्या प्रदेशात तंत्रमार्ग आणि शाक्तमार्गाशी संलग्न झाला, दक्षिणेत नयनार संतांनी त्यास भक्तीमार्गाचे रूप दिले. योगाशी आणि तंत्राशी संलग्न होऊन हठयोग प्रदीपिका सारखे ग्रंथ निर्माण झाले. पुढे तामिळी शैवमताचे विशिष्टद्वैत वेदांताशी लग्न होऊन त्याचे पर्यावसान बसवण्णा यांच्या लिंगायत संप्रदायात झाले. त्याची गोष्ट पुढे आहे.

कापालिक मताच्या सर्व उपप्रकारांचे शैवसिद्धांतातील सर्व उपप्रकारांशी आणि इतर भारतीय आस्तिक आणि नास्तिक मतांशी विचारांचे आदानप्रदान आणि वादविवाद चालू असतच. त्यामुळे हे सतत गतिमान असे Dynamic चित्र होते. बौद्धमतात तंत्र खूप प्रख्यात आहे. वज्रयान बौद्धमत आणि कापालिक मत यांच्यात तर कल्पनांची खूप exchange आढळते.तीच गोष्ट तिबेटीय बौद्धमताची. अवलोकितेश्वर हे बुद्धाचे "शिवस्वरूप" म्हणून वज्रयानात प्रसिद्ध आहे.

कालमुख वीर-शैव हा संप्रदाय विशिष्टद्वैत वेदांत, सांख्य आणि शैवसिद्धांत यांचे मिश्रण आहे. शिव-शक्ती जोडी यांच्यातील अचिंत्य भेदाभेद (एक आहे आणि नाहीही) निरुपण करणारे हे मत आहे. सेश्वरवादी सांख्यमत या पंथासोबत थोडे साधर्म्य दाखवते.

अघोरी लोक देखील मंत्रमार्गात येतात.

II. अतिमार्ग

अ. पाशुपत शैवमत - हे सर्वात जुने शैवमत आहे असे मानण्यात येते. हे प्रामुख्याने मुलतान, पंजाब, गांधार, नेपाळ, गुजरात आणि तामिळनाडू मध्ये प्रचलित होते. मोहनजोदारो येथील पशुपातीनाथाचे योगमुद्रेतले चित्र याच संप्रदायातले. ऋषी लकुलीष या संप्रदायाचे उद्गाते होते. यांचा आणि या पंथाचा रेफरन्स महाभारतात देखील आहे. म्हणजे इसपू ३००० च्या आधी पासून हे मत नक्कीच भारतात प्रचलित आहे.

हा प्रामुख्याने संन्यस्त शैव भक्ती मार्ग आहे. हा मार्ग स्वीकारावयास लागणारे व्रत पाशुपतव्रत म्हणवते आणि याची विधी अथर्ववेदातल्या अथर्वशिरस उपनिषदात आढळते. या संप्रदायाची प्रमुख ग्रंथे आहेत - गणकारिका, पंचार्थ भाष्यदीपिका, राशीकर भाष्य. या मताला कालमुख असेही म्हणतात.

पाशुपातीय लोक वैष्णव मताचे कट्टर विरोधक होते. हे द्वैत एकेश्वरवादी आहे. वास्तविक हे खूप strong monotheism सांगतात. पण इस्लाम आणि मध्यपूर्वेतील सम्प्रदायांसमोर यांची कट्टरता क्षुल्लक भासते. त्यामुळे सौम्य एकेश्वरवाद हे म्हणणे योग्य राहील.

कापालिक आणि पाशुपत शैवमतांविरुद्ध काही इतर शैवमतांनी उपहास आणि टीकात्मक साहित्य लिहिले आहे. मत्तविलासप्रहसन नावाचे पल्लवकालीन संस्कृत एकपात्री नाटक या दोन्ही मतांची यथेच्छ खिल्ली उडवते. पशुपातीय शैवमत आता फारसे प्रचलित नाही.

बसवण्णा यांचे लिंगायत वीरशैव मत यांनी भक्तीमार्गी तामिळी शैवसिद्धांत आणि पाशुपातीय अतिमार्गी मत एकत्र करून नवीन पंथ सुरु केला. तो आजतागायत व्यवस्थित सुरु आहे. मुख्यत्वे कर्नाटक, आंध्र आणि महाराष्ट्र प्रांतात हा शैवसंप्रदाय पसरलेला आहे. जरी यात मंत्रमार्गाचे अनेक influences आहेत तरी हा अतिमार्गात गणल्या जातो कारण लकुलीष ऋषींची परंपरा आणि कालमुख परंपरा या पंथात सुरु असल्याचे म्हणतात.

उपसंहार

गांधार, पंजाब प्रांतातून आता अपौराणिक शैवमत काय तर समस्त भारतीय संस्कृतीच पुसल्या गेली आहे. १९८५ नंतर (काश्मिरी पंडितांचे शिरकाण झाल्यानंतर) तिथूनही शैवमत नाहीसे झाले आहे. बहुतांश भारतात पौराणिक शैवमत प्रचलित आहे. या मताने अनेक अपौराणिक मते आपल्यात धारण करून टिकवून ठेवली आहेत. बाकी तांत्रिक, लिंगायत आणि काही तामिळी कुळे वगळता शुद्ध अपौराणिक शैवमत फारसे शिल्लक नाही. ग्रंथ आहेत, कल्पना आहेत, त्याचे पालन हि होते आणि या परंपरांच्या आचार्यांचा आदरही होतो. पण फक्त हि मते आचरणारी एक डेडीकेटेड जनसंख्या नाही.

एका अर्थी चांगलेच आहे. भारतास असलेला धोका अजून पूर्ण टळला नाहीये. जेव्हा ते होईल तेव्हा हि मते देखील कालसुसंगत होऊन कुणीतरी reinvent करेल आणि भारतात प्रचलित करेल याची खात्री मला आहे.

http://agphadnavis.blogspot.com/2012/05/blog-post_19.html

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुरातत्वाचा या धाग्याशी नेमका कसा संबंध आहे हे लक्षात येत नाहीये

घ्या, सगळे शिवपुराण वाचून शंकराची पार्वती कोण? Happy

वरदा, ठिक आहे. आय रिस्पेक्ट योर ओपिनिअन. Happy

वरदाजींशी सहमती, अन तुमच्या लिखाणातून जे थोडे ज्ञानाचे मोती मिळाले त्याबद्दल धन्यवाद.

आपल्या विधानाच्या पुष्ट्यर्थ तुमच्या सारख्या अभ्यासू व्यक्तींनी कष्टपुर्वक पियर-रिव्ह्यूड लिटरेचरचा हवाला दिला तर त्याला अर्धवट व भोंगळ प्रत्युत्तरे बायस्ड लिटरेचरचा हवाला देऊन देण्यात येतो. त्याचे खंडन केले तरी सहज वरवर वाचणार्‍या वाचकांना समजत नाही. तेंव्हा त्यांचा प्रतिवाद येथे करण्यात अर्थ नसतो, हे सत्यच आहे. तरीही न राहवून का होईना तुम्ही प्रतिसाद दिलात त्याने आनंद झाला.

बाकी आनगापै, व झिलतोड्यांचे प्रतिसाद हे दुर्लक्षिलेलेच बरे असतात. असल्या एका प्रतिसादाचा प्रतिवाद करण्यात तुम्ही वेळ घालवलात हे बघून वाईट वाटले.

हरे राम! अंबरीशने लिहिले ते एक बहुतेक चांगली चर्चा घडावी या हेतूने , पण काय आहे ना की शिव, शंकर राम, गणपती अशी हिंदु देवतांची नावे दिसली की काही जणांना भरपूर चेव येतो आणी ते असे तुटुन पडतात अशा लेखकांवर की जणू मायबोली हे एक समरांगण झालेय, आणी हे त्यातले भीम आणी अर्जून.. सर्वसामन्यांना काही घेणे नाही अशाशी की शिव हा वेदिक आहे की इतर कुणी.

देवाची, मग तो कोणताही असो मनापासुन प्रार्थना करा, तो मदतीला येतोच. मग पुजारी ब्राम्हण नाही गुरवच आहे, मंदिरच असे आहे आणी तसे आहे, असे वाद कशाला?

अंबरीश तुम्ही लिहा. आम्ही सामान्य आहोत आम्ही ते वाचणार, तो आमचा हक्कच आहे, कारण आम्ही मायबोलीकर आहोत. Proud

वरदा, आपल्याला माझे इथले प्रश्न वस्तुनिष्ठ वाटतात का? वाटत असल्यास कृपया शंकानिरसन कराल काय? वस्तुनिष्ठ वाटत नसल्यास योग्य प्रश्न कसे शोधावेत हे कृपया सांगाल काय? तसेच पूर्वतयारी म्हणून कोणती पुस्तके वाचावीत हेही कळल्यास बरे पडेल. माझ्याच्याने जमेल तेव्हढे वाचेन.

आ.न.,
-गा.पै.

रामायन ने राम दिला तसा महाभारताने कृष्ण दिला ...... बाकीचे लोक का नाही पुजले जात नाही.. उदा> अर्जुन, पांडव, कर्ण इत्यादी महापुरुषांना का नाही पुजले जात ? काय कारण आहे या मागे ?

या लेखात मेगास्थेनिसच्या साक्षीने अशोकाबद्दल शंका घेतली आहे आणि चाणक्याबद्दल साहेब निश्चिंत आहेत.

खरं तर इंडिका या ग्रंथात चाणक्याचा उल्लेखच नाही. म्हणजेच चाणक्य होता कि नाही इथपासून सुरूवात व्हायला हवी

आर्यांचे भारतात आगमन

श्री दीपक साळुंखे या तरूणाची मतं नेटवरच्या प्रत्येक तरूणाने वाचावीत.

त्याचं म्हणणं.. आर्यांच्या भारतातील आगमनाविषयी तीन प्रमुख प्रवाह आहेत.

१. आर्य बाहेरून आले.
यात आर्य कॉकेशस पर्वत किंवा भूमध्य समुद्र या ठिकाणाहून आले हा एक प्रवाह आहे तर दुसरा आर्य पर्शियामधून आले असं म्हणतो. ग्रीक संकृतीतले काही ग्रंथ, देव, देवता हे वैदिकांशी जुळणारे असल्याचं आणखी एक प्रवाह सांगतो.

२. आर्य इथलेच आहेत. असं मानणारा एक प्रवाह आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार रामायण, महाभारत, वेद हे ग्रंथ कधी लिहीले हे सांगता येत नाही. रामायण दहा हजार वर्षे जुने असून वेद अपौरूषेय आहेत अशी त्यांची मान्यता आहे.

३. आर्य इथलेच. काही काळ ते बाहेर गेल होते आणि पुन्हा परत आले. असं मानणारा वर्ग इतिहासाच्या कालनिश्चितीमधे असलेला गोंधळ पुढे करतो.

तिन्ही प्रवाहांचं अस्तित्व मान्य करणे आणि तथ्य मांडणं हेच शहाणपणाचं आहे असं त्याचं म्हणणं आहे.

> ३. आर्य इथलेच. काही काळ ते बाहेर गेल होते आणि पुन्हा परत आले.

हे आवडले. असे काँप्रमाईज सगळ्यांनीच, सर्व बाबतीत केले तर जग किती सुखी होईल!

आर्य बाहेरचेच, काही काळ ते भारतात रहाणार आहेत आणि कधीतरी भविष्यात एक दिवस ते परत निघून जातील.... असादेखील एक ऑप्शन हवा.. लोक आणखी आनंदाने हा पर्याय स्वीकारतील. Proud

>>श्री दीपक साळुंखे या तरूणाची मतं नेटवरच्या प्रत्येक तरूणाने वाचावीत.
का ? ही व्यक्ती कोणी भारी अभ्यासू वगैरे आणि त्या विषयातील तज्ज्ञ आहे का ?

किरण - या लेखात मेगास्थेनिसच्या साक्षीने अशोकाबद्दल शंका घेतली आहे आणि चाणक्याबद्दल साहेब निश्चिंत आहेत. खरं तर इंडिका या ग्रंथात चाणक्याचा उल्लेखच नाही. म्हणजेच चाणक्य होता कि नाही इथपासून सुरूवात व्हायला हवी

किरणजी,

१. अशोकाबद्दल शंका घेतली नाही. अशोकाचा काळ ३०० कि १३०० इसपू हा प्रश्न काही लोक विचारात आहेत त्या बद्दल बोललो आहे. त्यामुळे नीट बघून घ्या.

२. इंडिका हा ग्रंथ नष्ट झाला आहे. फक्त त्यातले काही उतारे त्रयस्थ सोर्सेस ने उद्धृत केलेले, ते उपलब्ध आहेत. त्यामुळे इंडिकाला किती किंमत द्यायची?

३. अलक्षेन्द्र याची स्वारी खरोखरच झाली होती का? मग त्या बद्दल सगळे भारतीय सोर्सेस गप्प का आहेत, हा तिसरा प्रश्न आहे. जर दोन्ही बाजूची माहिती घेऊन इतिहास ठरतो तर भारतीय लोक तर त्या काळात कुठल्याच आक्रमणाबद्दल चकार शब्द उच्चारात नाहीत.

४. अर्थशास्त्र हा ग्रंथ चाणक्याने लिहिला आहे. त्या ग्रंथात तो वासुदेव आणि रुद्र यांच्या विषयी बोलतो, हा मुद्दा होता. विषय अशोक अथवा चाणक्याच्या ऐतिहासिक सत्यतेचा नाहीये.

@वरदाजी,

१. विट्झेल आणि तलगेरी वादाच्या तपशीलात न जाता एवढंच म्हणते की विट्झेल गेली अनेक दशकं वैदिक साहित्याचं अध्ययन करतोय. त्याचं प्रशिक्षण त्यात आहे. तलगेरींना किती संस्कृत (वैदिक) येतं त्याबद्दल मला शंका आहे.

आणि विट्झेल ला किती पुरातत्वशास्त्र येते? मुळात तलेगिरी आणि विट्झेल यांचा वाद झालाच नाही कारण तलेगीरींच्या प्रश्नाला विट्झेल ने नीट उत्तर दिलेच नाही. वरून साळसूद पणे हार्वर्ड ला येऊन पी.एच.डी कर, असा फुकटचा सल्ला दिला. विट्झेल आणि त्याचे अनुयायी यांनी काझानास यांच्या सरस्वती या ग्रंथात विचारलेल्या प्रश्नांनाही उत्तर दिले नाही. उत्तर द्यायचे नसेल तर विट्झेल प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला ल्युनाटिक फ्रिंज म्हणतो. हा "नवब्राह्मणवाद" कुठून सुरु झाला?

आणि तलगेरींचं म्हणणं जर खरं असेल तर आख्खं वैदिक विद्वानांचं जग एका बाजूला आणि तलगेरी एका बाजूला हे शक्य नाही.

कोपर्निकस च्या वेळेस तत्काली अख्खं शास्त्रजगत देखील हेच होते. मी हे म्हणत नाही कि तलेगिरी आधुनिक कोपर्निकस आहेत. पण त्याचे डाउट योग्य आहेत. आणि त्यांना नीट संबोधित करून उत्तर दिल्या गेले पाहिजे. तीच गोष्ट काझानासची आहे. विट्झेल वर अनेकांनी पुरावे फेरफार केल्याचे आरोप केले आहेत. तुम्ही जे निकष दिले आहेत, ते विट्झेल वर हि लागू होतात.

२. दानिनो वगैरेनी नक्की काय मूलभूत संशोधन केलंय? पुरातत्व किंवा संस्कृतमधे? शून्य. फक्त प्रकाशित साहित्यावरून अभ्यास करून आर्टिकल्स खरडण्याला संशोधन म्हणत नाहीत.

वर म्हंटल्या प्रमाणे, विट्झेलने देखील पुरातत्वशस्त्र शिकलेले नाही. ते इंदोलोजीस्त आहेत. आणि संशोधन असे होत नाही. आर्यन मायग्रेशन थियरी ला एका अर्थी चूक दाखवणारे हे जनुकीय संशोधन (http://articles.timesofindia.indiatimes.com/2009-09-25/india/28107253_1_... - मी वृत्तपत्रातील बातमी देतो. तुम्हाला जेनेटीक्स मधले ज्ञान असेल तर नेचर जर्नल मध्ये छापला गेलेला तो पेपर हि पेस्टतो) करणारे जेनेटीसिस्ट संस्कृत प्राध्यापक नाहीत. त्यामुळे त्या कालावधीवर तोंड उघडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने पुरातत्वशास्त्र, इंडोलोजी या सगळ्यात अनेक दशके "मूलभूत" संशोधन केले पाहिजे, हे तुमचे म्हणणे चूक आहे कारण सायंस असे काम करत नाही. डेटा एनेलीसीस देखील खूप मोठा भाग असतो आणि रेव्युअर देखील. आणि सगळ्यांनी या दोन्ही डिग्र्या घेतल्या असणे आवश्यक नाही (वास्तविक या दोन्ही गोष्टीत गती असणारी व्यक्ती फारच विरला असते).

त्यामुळे ऋषीचे गोत्र नका विचारू, त्यांनी केलेले काम योग्य आहे कि नाही ते सांगा. आणि काही विरोधकांनी त्यांना प्रश्न विचारले असतील तर त्यांना उत्तरे द्या, उडवून लाऊ नका. विट्झेल ला देखील हाच सल्ला.

सिंधुसंस्कृतीचा वैदिक धर्माशी संबंध लावणारा एकही थेट पुरावा अजून हाताला लागलेला नाही. जे सिंधुसंस्कृतीत सध्या उत्खनन करतात, विश्लेषण करतात त्यांचं यावर एकमत आहे.

योगमुद्रेत बसलेल्या पशुपती वरून तुम्ही ठरवले कि योग वैदिक ओरिजिन चे नाही. हे विश्लेषण आहे. पण तुम्ही म्हणता ते योग्य आहे. संशोधन जारी आहे.

कारण विदेशी संशोधक येण्याआधी आपल्या समाजाने स्वतःच्या इतिहासाचा, वाङ्मयाचा, संस्कृतीचा, धर्माचा तटस्थ अभ्यास कधीच केला नव्हता. नाही का? वेदांचा अभ्यास हीही परकीयांचीच देणगी आहे महाशय!

हे महाभागा (आपण मला महाशय म्हणून सन्मानित केल्यामुळे मी आपणास सन्मान देणे उचित),

सायणाचार्य, शंकराचार्य वगैरे मंडळींनी जी वेदांत, खुद्द वेद, आणि इतर श्रुतीसाहित्याचा अभ्यास केला आणि आणि टीकात्मक ग्रंथ लिहिले आहेत तो काय परकीयांच्या प्रेरणेने केला का?

कोण मानतं? नावं? त्यांचं संशोधनातलं योगदान? कुठला पुरावा दाखवतात? मग या आधी झालेली उत्खनने, शास्त्रीय कालमापनातून मिळालेल्या तारखा, पुरापर्यावरणीय संशोधन, पुरातत्वीय सर्वेक्षणं-उत्खननं यातून उभे राहिलेले उत्तर आणि पूर्व आणि वायव्य भारताचे सांस्कृतिक कालखंडाचे तपशील (रीजनल कल्चरल क्रोनोलॉजीज), विविध शिलालेख -त्या लिपीचा, मजकूराचा वाचन आणि अभ्यास, नाणकशास्त्राचा सखोल अभ्यास, संस्कृत साहित्याचा अभ्यास, इतर संशोधन हे सगळं कुठे टाकून देणार? कारण हे सगळं काही या मतांशी मेळ खात नाही.

http://controversialhistory.blogspot.com/2009/08/date-of-buddha.html#.T7...

हा विषय या वादाचा नाही म्हणून फक्त हि लिंक देत आहे. ब्लॉग आहे म्हणून शिव्या घालू नका. त्यात बुद्धाच्या कालासंबंधीच्या ज्या धारणा आहेत त्यांचे फक्त संकलन केलेले आहे.

शिवाय पुरातत्वात रोज, दरवर्षी नवी माहिती येत असते, जुनी गृहितकं बदलत असतात. ती तुम्हाला माहित आहेत का? रामायण घडलं असा कुठला पुरातत्वीय पुरावा आहे? महाभारत घडलं असावं अशी किंचित शक्यता दर्शवणारा पुरावा किती त्रोटक आणि अंदाजपंचे आहे ते माहित आहे का? कृष्णाचा ऐतिहासिक पुरावा कुठंय?प्राचीन संस्कृत वाङ्मयात किती कृष्ण आहेत माहित आहे का? कृष्ण देवतेची डेवलपमेन्ट वेगवेगळ्या शतकात कशी झाली, त्याच्या आयुष्याचे वेगवेगळे भाग कसे जोडले गेले हे लक्षात आहे का? जेव्हा तुम्ही कुठल्याही ग्रंथाचा पुरावा वापरता तेव्हा त्या ग्रंथात किती कालस्तर आहेत, किती प्रक्षिप्त असू शकतं, जे लिहिलंय त्याची सत्यासत्यता कशी पडताळून पहातात इ. माहिती आहे का (मेथडॉलॉजी ऑफ टेक्स्चुअल क्रिटिसिझम)? ज्या व्यक्तीने तो संदर्भ दिलाय त्याची ग्राह्यता पडताळता येते का?

विषयांतर....

आणि हे सगळं करता येणार नसेल, आपण जे 'संशोधन' वाचतोय त्याची ग्राह्याग्राह्यता कळणार नसेल तर त्या पुराव्यांविषयी आपण बोलू नये हे संशोधनातले सर्वमान्य संकेत आहेत.

हा संशोधन निबंध नाही. आणि विषय शैवमताच्या विविध शाखा, हा आहे. त्याचे संदर्भ हवे असतील तर खुशाल देतो.

तुम्हाला रुद्र-शिव या बद्दल लिहायचंय तर विषयाला धरून लिहा ना प्लीज.

विषयाला धरूनच लिहिलंय वरदाजी... संपूर्ण पोस्ट शैवमता विषयी आहे. आणि तुम्हाला विचारलेला एक प्रश्न सोडल्यास मी विषयाला धरूनच लिहिलंय..

धर्माचा इतिहास हा { वेद - उत्तर वैदिक यज्ञसंस्था आणि लोकधर्म - बौद्ध, जैन व इतर संन्यासी पंथ - सॅवियर गॉड्सची संकल्पना - मूर्तीपूजा - वैदिक अवैदिक परंपरा आणि लोकधर्म यातून देवाणघेवाण होऊन उदयाला आलेले नवे देवदेवता, जुन्या देवतास्वरूपात, त्यांच्या कार्यात झालेले मूलगामी बदल आणि या सगळ्या परंपरांना सामावून घेऊन एकत्र करणारी पौराणिक परंपरा - त्यांचे पुराण ग्रंथ - थोडक्यात आपण आज ज्याला हिंदु धर्म म्हणून ओळखतो त्याचं प्राथमिक स्वरूप }

हेच मी मूळ पोस्टात आणि कॉमेंट मध्ये इतरत्र वारंवार लिहिलंय. आजचा शिव हा रुद्रापासून उद्भवून आणि इतर अनेक अवैदिक आणि अपौराणिक शाखा आणि मतप्रवाह मिसळत बनलेला आहे.. आपल्यात एकमत झाल्याचे बघून आनंद जाहला.. Good going.. I like to end on the notes of agreement..

> बृहदारण्यक उपनिषदात १० रुद्र म्हणजे ५ प्राण आणि ५ उपप्राण आणि महारुद्र म्हणजे आत्मा अशी तात्विक माहिती दिलेली आहे.

III.IX.1 मधे वरील माहिती दिली आहे. या ११ च्या (किंवा त्यांच्या सबसेटच्या) जाण्याने "रडायला येते" म्हणून ते रूद्र.

पण अशा तात्वीक चर्चेचा आणि प्रत्यक्ष पुजल्या जाणार्‍या शिवाचा खूप संबंध नसणार (म्हणजे हे दोन पॉप्युलेशन्स मिनिमली ईंटरसेक्टींग असणार). कुणाला राग येणार नाही अशा आशेने वरदाच्या भाष्याचा आणि टुनटुनच्या म्हणण्याचा उल्लेख करतो. वरदा म्हणते या गोष्टींचा भाषेशी संबंध आहे, ते लोक काय खायचे, कुठले होते याच्याशी संबंध आहे, आणि ते दुवे लक्षात आल्याशीवाय त्यात शिव नाही. टुनटुन म्हणते - तो आमचा जीव (इथे किंवा तिथे) वाचवेल का? हो असेल तर तुम्ही सांगा, ऐकतो आम्ही.

अंबरीष, मला यात अजुन 'रंग' भरायचा नाही, पण तुम्ही श्टेला क्रामरीश आणि वेण्डी डोनीगर ओ'फ्लहेर्तीला शिवाबद्दल काय म्हणायचे आहे ते पाहिले आहे का?

वरदा, वेळात वेळ काढून 'प्रोसेस' बद्दल थोडे तरी लिहिल्याबद्दल धन्यवाद.

aschigजी,

http://books.google.co.in/books?id=O5BanndcIgUC&pg=RA1-PA40#v=onepage&q&...

तुम्ही या पुस्तकाविषयी बोलत आहत काय? जर हो, तर मी हे पुस्तक जुजुबी डोळ्याखालून घातलंय.. पण माझ्या "टू रीड" लिस्ट मध्ये आहे हे पुस्तक..

पंचप्राण आणि पंचउपप्राण हे माधवजी यांच्या महारुद्र आणि इतर १० रुद्र यांच्या संबंधीच्या माझ्या उत्तरात होते.

माझ्या मते (परत कुणी ओरडू नये म्हणून सांगतो कि इतिहासात पी.एच.डी नाही) हे रुद्रांचे तात्विक वर्णन आहे. वेगवेगळे दृष्टीकोनातून पहिले कि शिव (किंवा कृष्ण किंवा इतर कुणीही) वेगवेगळे भासतात.

पण तात्विक चर्चा करणारे आणि पूजणारे नेहमी वेगळे असतील काय? म्हणजे हा नियम म्हणून घ्यायचा काय? शंकराचार्य तात्विक होते आणि त्यांनी खूप सुंदर आणि भावूक भक्तीरचना केल्या आहेत. तीच गोष्ट ज्ञानेश्वर, तुकाराम, समर्थ रामदास यांची. त्यामुळे या जनसंख्या वेगळ्याच राहिल्या पाहिजे, हा "माझ्या मते" नियम नाही.

रडण्याबद्दल तुमचे लॉजिक योग्य आहे. हे एकादश रुद्र जाण्यामुळे प्राण जातो आणि जीव मरतो. म्हणजे त्याचे आप्तेष्ट रडतात. म्हणजे रुद्र आप्तेष्टांना "रडवतो"... म्हणून रुद्र म्हणजे रडवणारा.

अंबरीश,

आपला इथला प्रतिसाद मुद्देसूद आहे. वरदा योग्य प्रतिसाद देतील अशी आशा आहे. Happy मीही काही प्रश्न विचारलेत. त्यांच्याकडून उत्तरांची वाट बघतोय.

आ.न.,
-गा.पै.

फडणवीस बुवा..

या अशा चर्चेत फार अडकायला होतं ब्वॉ. माझी ही पोस्ट तुमच्या उत्तराच्या प्रतिक्षेत आहे. (पुन्हा प्रश्न विचारून मला इथे बोलावू नका , वेळ मिळेलच असं नाही ).

२. इंडिका हा ग्रंथ नष्ट झाला आहे. फक्त त्यातले काही उतारे त्रयस्थ सोर्सेस ने उद्धृत केलेले, ते उपलब्ध आहेत. त्यामुळे इंडिकाला किती किंमत द्यायची?

हा मुद्दा मी तीन चार वर्षांपूर्वी एका वेगळ्या संदर्भात मांडला होता. त्याचा विपर्यास नेटवर अनेक ठिकाणी झाला आणि सोयीने तो कॉपी पेस्ट होत राहिला. इंडिका आज अर्ध्या स्वरूपात शिल्लक आहे. इंडिका हा ग्रंथ जेव्हां होता तेव्हा त्यातील संदर्भावरून झालेला पत्रव्यवहार ग्रीस आणि युरोप मधे अभ्यासला गेला आहे जो अधिकृत मानला गेला.

तुमचा युक्तिवाद ग्राह्य धरायचा झाल्यास

कौटील्य हाच चाणक्य हे कसे सिद्ध करणार? कौटील्यचा मूळ अर्थशास्त्रावरचा ग्रंथ कुठे उपलब्ध आहे आणि तो नेमका कुठल्या साली लिहीला गेला हे सांगू शकाल ? तसे पुरावे तुमच्याकडे उपलब्ध आहेत का ?
चाणक्य किंवा विष्णुगुप्त किंवा कौटील्य इतक्या भिन्न भिन्न नावाने एकच व्यक्ती इतिहासात कशी काय होऊन गेली असेल ? जर अशोक दोन असू शकतात असे मत आहे तर या तीन नावाच्या व्यक्ती एकच हे कशाच्या आधारे ठरवले गेले ?

रामायण, महाभारत आणि त्रिपीटक हा ग्रंथरूपी ठेवा मूळ स्वरूपात कुठे उपलब्ध आहे हे सांगू शकाल का ?

के बी लाल यांनी आर्य बाहेरून आले हे धुडकावून लावले आहे मात्र डॉ जय दीक्षितांच्या चित्पावनिझम या संशोधनात्मक ग्रंथाबद्दलची ही लिंक .. विकीपीडिया आणि इतर संस्थळांवर उपलब्ध आहेच. चित्पावन या संस्थळावर देखील त्याचा उल्लेख आहे आणि जय दीक्षित यांच्या संस्थळावर देखील.

http://www.faithfreedom.org/forum/viewtopic.php?t=45164&sid=f8550dbda1fa...

भारतातले दाक्षिणात्य हे मूळचे भारतीय असल्याचे सिद्ध करणारी डीएनए टेस्ट तुम्ही विचारात घेतलीय का ? तुम्हाला या टेस्टबद्दल नक्कीच माहिती आहे. ऑर्कुटवर तुम्हाला कुणीतरी त्याची लिंक दिल्याचे माझ्या वाचनात आले होते. कलकत्त्याच्या फॉरेन्सिक लॅब चे काही निष्कर्ष नेटवर पण उपलब्ध आहेत. ते देखील याला पुष्टी देतात. गैरसोयीचं संशोधन टाळू नये. नेटवर अनेक इतिहासतज्ञ आहेत जे गैरसोयीचे पुरावे बघत देखील नाहीत. अशा लिखाणाला प्रचारकी थाटाचे लिखाण म्हणतात. सकस आणि दर्जेदार लिखाण म्हणजे ज्यामध्ये विरोधी मताचा विचार केला जातो आणि त्याबद्दलचे उल्लेख केलेले असतात. अशा काही लेखकांपैकी एक लेखक श्री दीपक साळुंखे हे आहेत. अंबरिश, तुमचा ऑर्कुटवरचा एका थ्रेड मध्यंतरी वाचनात आलेला होता. त्यात तुम्हाला एकाने आर्य बाहेरून आलेले आहेत हे सिद्ध करणा-या डीएनए टेस्टची एक लिंक दिलेली आहे. त्यावर चर्चा देखील झालेली दिसते. मी आता ऑर्कुटवर नाही. तुम्ही उदार मनाने ती लिंक इथे देऊ शकाल का ? किमान त्याचा उल्लेख कराल का ?

वेदांमध्ये उल्लेख केलेले मित्र, ब्रह्मा, इंद्र, वरुण या देवांची उपासना करताना कुणीही दिसत नाही. या देवांची देवळेही शोधावी लागतात. याउलट शिवाचं देऊळ हे भारतातल्या प्रत्येक गावात असल्याचं आढळून येतं. दक्षिणेत तर शिवाची उपासना अतिशय महत्वाची आहे.

वेदांमधे मात्र शिवाचाच काय विष्णूचाही उल्लेख नाही. शिवाचा उल्लेख थेट पुराणात येतो. दक्षिणेत आडवे भस्म लावले जाते तर उत्तरेत उभे ! शैव वैष्णव झगड्याच्या कथा पुराणातही आहेत. ज्यांना दानव म्हटले गेलेय ते दाक्षिणात्य लोक असून शिव हा त्यांचा देव असल्याचे पौराणिक कथात दिसते. त्यातली राक्षसाची वर्णने त्यांना लागू पडतात.

पुराणाचा केवळ संदर्भ. आज उपलब्ध असलेल्या निरनिराळ्या टेस्टस. दाक्षिणात्य आणि आर्यन संस्कृतीतला फरक, भाषेचा फरक, भाषेची उत्पत्ती, वेद आणि ग्रीक यांच्या देवतांची साम्यस्थळं, शरीररचना, मानववंशशास्त्र ( वर्ण, चेह-याची ठेवण, शरीराची रचना इ. चा अभ्यास ) या काही पुराव्यांचा अभ्यास करून या संस्कृती भिन्न असल्याचे आधीच सिद्ध केले गेलेले आहे.

यावरून वेदांमध्ये नसलेल्या देवांची आणि वेदांमधे असलेल्या काही देवांची नंतर सरमिसळ झाली असावी इतकं तर नक्की म्हणता येतं. वेदातल्या देवांची उपासना काहीच लोकांकडून आज केली जाते हे देखील लक्षात घ्यायला हवं.

धन्यवाद.

( या पोस्टीत प्रत्येक विधानासाठी लिंक द्यायचा कंटाळा केलेला आहे. गुगळल्यावर सापडेलच Happy )

आजचा शिव हा रुद्रापासून उद्भवून आणि इतर अनेक अवैदिक आणि अपौराणिक शाखा आणि मतप्रवाह मिसळत बनलेला आहे..

शब्दच्छल करुन असा इतिहास लपवता येत नाही.

शिव हा रुद्रापासूण इवॉल्व झाला हे चुकीचे आहे.. ज्या काळात वैदिक लोक रुद्र यजत होते, त्याच वेळी किंवा त्याच्या पूर्वीपासून अवैदिक लोक शिव पूजत होते... पूजा करणे, हळद कुंकु वाहणे, उदबत्ती, आरती ओवाळणे या सगळ्या प्रथा अनार्य अवैदिकांच्याच आहेत. वैदिक देवताना मूर्त्याच नव्हत्या तर हळद कुंकू घालणार कोठे? आणि ओवाळणार कुणाला ?

पण कालांतराने वैदिक लोक आपली यज्ञ करण्याची पद्धत सोडून अवैदिकांच्या देवळात घुसले. तिथले देव, तिथल्या पूजा त्यानी आपल्याशा केल्या.. मग ऋग्वेदातील देवांच्याच या मूर्ती आहेत असा अपप्रचार केला गेला.

तीर्थक्षेत्रे हीही अवैदिक परंपरा... बहुतांश तीर्थक्षेत्रे शंकराचीच आहेत. इंद्राचे तीर्थक्षेत्र, वरुणाचे तीर्थक्षेत्र अशा वैदिक देवांचे तीर्थक्षेत्र कुणी पाहिले आहे काय? . मूर्तीच नाही तर तीर्थक्षेत्र कुठल्रे असणार?

अवैदिक शैवधर्म हा वैदिकांपेक्षा कदाचित जास्तच जुना आणि सुस्थापित धर्म होता. अगदी प्राचीन काळापासून शंकराची पिंड एकाच दिशेत असते.. आसेतु हिमाचल हा नियम पाळला जात होता.. टेलिफोन, इंटरनेट नसतानाही पूर्ण भारतभर एकच नियम कसा काय पाळला गेला? कारण हा धर्म अगदी प्राचीन काळापासून असल्याने मधल्या काळात केवळ मौखिक परंपरेद्वारे या धर्माची तत्वे पसरलेली होती, हेच यातून दिसून येते.

चला, शिवतांडव स्तोत्र- रावणाने रचलेले ऐकूया.. हे रामायणातील शिवतांडव स्तोत्र-अरविंद त्रिवेदी.

जामोप्या,

रावणाचा उल्लेख वैदिक म्हणून केलात की अवैदिक म्हणून? रावण तर वेदाध्यायी होता. सामवेद त्यानेच संगीतबद्ध केला.

अवैदिक शैवधर्म म्हणजे नक्की काय? यात होऊन गेलेल्या तत्त्वज्ञांची नावे कळतील का? त्यांनी रचलेल्या ग्रंथांची नावे सांगाल काय? अवैदिक शैवधर्माची साधनापद्धती (यम, नियम, इत्यादि) कळेल काय? असे काही मिळत नसल्यास अवैदिक शिवधर्म नावाचं काहीही धर्म (वा साधनापद्धती) अस्तित्वात नाही.

आ.न.,
-गा.पै.

रावण राम या काळात व्यक्तीवर वैदिक अवैदिक लेबले नव्हती.. ज्याला जे पटते ते त्याने करावे.. रावणाने वेदांचेही अध्ययन केले. शिवाचीही उपासना केली. रामाने वैदिक परंपरेतील अश्वमेध यज्ञही केला... रामेश्वरला शिवाचीही स्थापना केली.

Kiran.. ,

वेदकर्ते भले माहीत नसतील, पण वेदपठण आजही चालतं. अवैदिक शैव असा काही पंथ आहे का? आज या घडीला कोणी शिवाची अवैदिक पद्धतीने उपासना करतं का?

वेदकर्ते माहीत नसले तरी इतर प्रसिद्ध ग्रंथांचे कर्ते जगविख्यात आहेत. उदा : वराहमिहीराचा सूर्यसिद्धांत, शंकराचार्यांचे सौंदर्यलहरी, आर्यभट्टाचा लीलावती, इत्यादि.

आ.न.,
-गा.पै.

वेदांचे मूळ ग्रंथही उपलब्ध नाहीत. रचनाकार माहीत नाहीत. या लेखात आणि काही प्रतिसादकर्त्यांच्या न्यायाने वैदिक हे देखील थोतांड म्हणावे लागेल.

Pages