शैव मत

Submitted by अंबरीष फडणवीस on 22 May, 2012 - 06:03

शिवशंकराची उपासना भारतात अनादी कालापासून सुरु आहे. महादेव म्हणजे सृष्टीचा संहारक नवीन सृष्टीसाठी platform तयार करणारी शक्ती.. आदीगुरु.. कलाकारांचा आणि सर्व कलांचा उद्गाता.. तंत्राचा आणि तंत्रज्ञानाचा प्रणेता. योगेश्वर.. विष्णू balance दर्शवतो तर शिव extreme. ज्योतिषात शनी या ग्रहाचा स्वामी.. वेदांच्याहि आधी पासून शत्रूचे प्राण हरण करताना भारतीय रुद्राचे आवाहन करीत आलेले आहेत. असे म्हणता येईल कि भारतातला सर्वात लिबरल दैवत म्हणजे शिव. साक्षात काळ म्हणजे शिव. महाकालेश्वर आणि महाकाळ म्हणून पौराणिक वैदिक आणि बौद्धमत शंकरास संबोधते. बौद्धमतात शंकरास अवलोकितेश्वर देखील म्हंटले आहे.

भारतात सर्वात आधी शंकराचा उल्लेख वेदांत येतो. रुद्र (रडवणारा) हे अतिप्रचालीत नाव वेदातले आहे. शिव (शुभ) हे विशेषण पण वेदांत आढळते. सत्यं शिवं सुंदरम हे तिथलेच प्रसिद्ध वाक्य आहे. याच बरोबर योग या भारतीय दर्शनात ईश्वर म्हणून जो धरतात तो देखील शिव आहे. शिव आणि योगाचा प्राचीन संबंध मोहनजोदारो च्या उत्खननात सापडलेल्या पशुपतीच्या मुद्रेत दिसतो. जालंधरबंध धरून ध्यानमुद्रेत बसलेला आणि प्राण्यांनी वेढलेला पशुपतीनाथ चटकन सिंधूसंस्कृती च्या continuity ची साक्ष देतो. म्हणजे जवळपास ७००० वर्षे तरी उत्खननशास्त्रानुसार भारतात शिवपूजा होत आहे. आपल्या ऐतिहासिक पुराव्यांवर दृष्टी टाकली तर भरपूर आधी पासून रुद्रपुजा होत आहे. विष्णूची पण तशीच गोष्ट आहे. हि दैवते वेदकाळात पुजली जायची यांच्या नावाने अनेक यज्ञ आहेत. परंतु त्या काळात इंद्र-वरुण-अग्नी वगैरे देवतांना अधिक प्राधान्य होते. विष्णूस वेदांत "उपेंद्र" (इंद्राचा deputy) म्हंटले आहे. रुद्र देखील देवागणात होता.

इसपू १५००-२००० च्या सुमारास बदल घडू लागला. २५०० ते १९०० मध्ये राजस्थानातून वाहणारी सरस्वती नदी आटली. भारतीय परंपरेनुसार ३१०१ इसपू साली भारतीय युद्ध कुरुक्षेत्री झाले. आणि सरस्वती-सिंधू खोऱ्यातून गंगेकडे सत्ता आणि लोक स्थलांतर करू लागली. यमुना आणि शतुद्रू (सतलज) नद्या ज्या सरस्वतीला मिळायच्या त्यांनी दिशा बदलून अनुक्रमे गंगा आणि सिंधू नद्यांत आपल्या पाण्याचा निचरा करू लागल्या.

नागरी सभ्यता नाहीशी होऊन सप्तसिंधूतले वैदिक लोक परत बराच काळ (म्हणजे ६००-१००० वर्षे) टोळीवाले बनले असावेत. पंजाबचा परिसर कोरडा आहे. पाणी नद्यांच्या नेटवर्क मुळे मिळत राहते. परंतु खूप पाउस पडत नाही. त्यामुळे घनदाट जंगले नसत. grasslands सारखी जंगले पंजाब-सिंध-राजस्थान-गुजरात मध्ये आजही दिसतात. या उलट गंगेच्याखोरे हे घनदाट जंगलांचे म्हणून प्रसिद्ध होते. गंगेच्या खोऱ्यात वैदिक लोक अगदी रामायणाच्याच्या आधीच्या कालापासून राहत आलेली आहेत. पण भारतीय युद्धानंतर आणि सरस्वतीच्या आटल्यानंतर भारताचे सत्ताकेंद्र खऱ्या अर्थाने गंगेच्या खोऱ्यात आले. आणि विष्णू शिव ब्रह्मदेव वगैरे दैवते प्रचलित होऊ लागली.

आजकाल बरेच इतिहासतज्ञ बुद्धाचा काळ इसपू १५०० मानतात. कलिंग जिंकणारा व त्यानंतर धम्म स्वीकारणारा अशोक आणि स्तुपे बांधणारा अशोक वेगळे होते असे म्हणतात. अलक्षेन्द्राच्या स्वारीच्या वेळेस गुप्तवंश होता कारण मेगास्थिनीस नावाचा ग्रीक इतिहासकार जो भारतात राहिला तो चंद्रगुप्ताच्या पोराचे नाव समुद्रगुप्त काहीसे सांगतो. चाणक्याचा शिष्य मौर्यकुलीन चंद्रगुप्तच्या पोराचे नाव बिन्दुसार होते. चाणक्य आणि अशोक कधीही झाले असो. मुद्दा हा कि चाणक्य अर्थशास्त्रात वासुदेव आणि रुद्र या दोन देवतांबद्दल बोलतो. यापैकी विष्णुगुप्त चाणक्य म्हणतो कि रुद्रोपासना खूप दिवसांपासून चालत आलेली आहे पण हल्ली वासुदेव पंथ देखील वेगात प्रसरण पावतोय. म्हणजे कृष्ण हा देवत्व चाणक्याच्या थोड्या आधीपासून पावू लागला. विष्णू देव आधीपासूनच होता. पण ऐतिहासिक पुरुषास देवत्व बहाल करणे कृष्णापासून सुरु झाले कि काय असे वाटते. असो.

शैवमत हे असे हळूहळू प्रचलित झाले. या मताच्या अनेक शाखा प्रचलित झाल्या. याच २७०० वर्षांच्या प्रदीर्घ काळात. (इसपू १७००-इस १०००). त्यातल्या काही शाखा आणि त्यांचे भौगोलिक प्रचलन खालील प्रमाणे..

मूळ उद्गम - वैदिक रुद्रउपासना

श्वेताश्वर उपनिषदात सर्वप्रथम शंकरास महादेव आणि ईश्वर हि विशेषणे दिली आहेत. हे उपनिषद कृष्ण-यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेचा भाग आहे. हि संहिता पांचाल देशात (आजचा पश्चिम उत्तर प्रदेश - आग्रा वगैरे परिसर) लिहिली गेली.

या पंथाच्या तीन मुख्य शाखा..

१. पौराणिक शैव मत..
२. योगिक शैव मत..
३. अपौराणिक शैव मत.

१. पौराणिक शैवमत तेच जे आपण आज मुख्यत्वे ऐकतो. मुख्य सोर्सेस - शिवमहापुराण लिंगपुराण स्कंदपुराण शिवरहस्यपुराण इत्यादी. याबद्दल मी जास्त लिहीत नाही. कारण हे सर्वश्रुत आहे.

शिवाच्या गोष्टी, लिंगपूजा, नटराज शंकर, आद्यगुरु दक्षिणमूर्ती शिव, कैलासपती शिव, तांडव करणारा आद्यनर्तक शिव, शास्त्रीय संगीताचा प्रणेता आणि पालक शिव, त्रिनेत्रधारी शिव, मदनाला भस्मसात करणारा शिव, सतीशी आणि नंतर पार्वतीशी रतीक्रीडेत रममाण होणारा शिव, कार्तिकेयाचा आणि गणेशाचा पिता शिव, नंदिवाहन शिव, अर्जुनाला पाशुपतास्त्र देणारा शिव, हनुमानरूपात अवतरित होणारा रुद्र, शत्रूचे प्राण हरणारा शिव (हर हर महादेव या घोषणेत हर म्हणजे हरण करणे, हिसकावणे. या घोषणेत आपण शंकराला आवाहन करतो कि मी शत्रूला मारतोय आता तू याचे प्राण हरण कर. महादेवा हरण कर रे), अधार्मिक शत्रूच्या आप्तांना आणि स्त्रियांना रडवणारा रुद्र.

शंकराचे हे स्वरूप आपल्याला माहिती आहेच. वैदिक, पुराणिक आणि काही अपौराणिक शैवसंप्रदायांचे संमिश्रण होऊन बनलेले हे स्वरूप आहे. यातले बहुतांश मत पुराणकाळात (इसपू १००० ते इस ५००) आणि नंतर श्री. जगद्गुरू आदी शंकराचार्य (इस ७००-८००) यांच्या कृपेने बनले आहे. मतानुमतात विभागलेला भारतीय समाजाला इस्लामच्या आक्रमणाच्या उंबरठ्यावर एक करणारा हा युगपुरुष. स्मार्त संप्रदाय यांनी सुरु केला. भक्ती आणि ज्ञानमार्ग एकमेकांचे विरोधक नाहीत हे लोकांना पटवून दिले.

प्रमुख सेश्वरवादी असे शैव-वैष्णव-शाक्त-सूर्य-गाणपत्य हे पाच संप्रदाय एक करून पंचायतन पूजा सांगितली. यांची आपसात वादविवाद करण्यात खर्ची पडणारी शक्ती येणाऱ्या काळासाठी एक केली. सांख्य, बौद्ध, मीमांसा, न्याय, वैशेषिक, चार्वाक, जैन इत्यादी निरीश्वरवादी मतांना विवादात हरवून काही मठात सीमित केले. यामुळे हि मते टिकून राहिली व स्वातंत्र्यानंतर परत वर आली.

पुढले हजार-बाराशे वर्षे हे सगळे टिकले कारण शंकराचार्यांनी केलेले मतांचे आणि लोकांचे एकीकरण. त्यांना नमस्कार करून पुढे जाऊया.

२. योगिक शैवमत हे अपौराणिक शैव मतासोबतच प्रचलित व प्रसारित होत होते.

३. अपौराणिक शैवमत - अपौराणिक शैव मताचे दोन प्रमुख उपप्रकार आहेत.

पण या आधी द्वैतवादी एकेश्वरवाद (monotheism) आणि अद्वैतवादी एकेश्वरवाद (Monism) यातला फरक लक्षात घ्यायला हवा. Monotheism मध्ये एकच ईश्वर असतो जो सृष्टीचा नियंता आणि कर्ता असतो. ईश्वर आणि त्याची सृष्टी वेगळी असते. याचे दोन प्रकार आहेत - कडक आणि सौम्य (हि नावे मी दिली आहेत). कडक (strong monotheism) म्हणजे इस्लाम, ख्रिस्तपंथ यहुदी पंथ यासारखा. सौम्य Monotheism म्हणजे हरे कृष्ण वाले, इस्कॉन वाले, वैष्णव वारकरी संप्रदाय वगैरे सारखा. Monism म्हणजेच अद्वैत. सृष्टी आणि ईश्वरात द्वैतभाव नाही. सृष्टीच ईश्वर (सर्वं खलु इदं ब्रह्म).

अपौराणिक शैव मताचे दोन प्रमुख उपप्रकार आहेत.

I. मंत्रमार्ग
II. अतिमार्ग

I. मंत्रमार्ग

मंत्रमार्गाचे खालील उपप्रकार

अ. कपालिक शैवमत - यास काश्मिरी शैवमत देखील म्हणतात. हे एकेश्वर अद्वैतवादी मत मत. हा घरघुती गृहस्थाश्रमात असणाऱ्या लोकांसाठी असलेला पंथ आहे (होता). या मताचे शिवसूत्र आणि भैरवसूत्र हे प्रमुख ग्रंथ (आगम) आहेत. वसुगुप्त, सोमानंद, अभिनवगुप्त, क्षेमराज, उत्पलदेव आदी ऋषी या संप्रदायाचे प्रमुख आणि प्रसिद्ध आचार्य व उद्गाते आहेत. अभिनवगुप्त नाट्यशास्त्राचेपण खूप प्रसिद्ध आचार्य होते.

कापालिक शैवमत हे खुपसे शंकराचार्यांच्या अद्वैतवादासारखे आहे. शंकराचार्य आणि एका कापालिकाचा वाद शंकर-विजयं या ग्रंथात नमूद आहे. पण शंकराचार्यप्रणीत अद्वैतासारखे संन्यासप्रधान नसून गृहस्थप्रधान आहे.

या मताचा गोषवारा असा.

१. चिती - वैश्विक उर्जा/चेतना. हिलाच कापालिक शिव म्हणतात.
२. मल - चेतना जेव्हा लहानश्या भागात केंद्रित होते त्यास जीव म्हणतात. जीव स्वतःला शिवापेक्षा (वैश्विक चेतनेपेक्षा) वेगळा समजायला लागतो तीन प्रकारच्या मलांमुळे (मळ). आणव मळ (अहंकार), मायीय मळ (मायेमुळे उत्पन्न झालेला आणि मनापुरता सीमित असलेला), कर्ममळ (शरीरापुरता सीमित असलेला).
३. उपाय - तीन मलात अडकलेला जीव शिवाशी एकरूप व्हायला तडफडत असतो. त्या साठी लागणारी साधना यात सांगितलेली आहे.
४. मोक्ष - जीवाचे शिवाशी एकरूपत्व.

काश्मिरी कापालिक शैवसंप्रदायातल्या अन्य काही संकल्पना म्हणजे - अनुत्तर, अहं, प्रत्याभिज्ञ, कौल आणि स्वातंत्र्य..

काश्मिरी कापालिक शैव पंथ परत तीन उपप्रकारात विभागलेला आहे -
त्रिक (संन्यासी लोकांसाठी), कौल (सामान्य गृहस्थ लोकांसाठी) आणि अघोरी (तांत्रिक लोकांसाठी).

ब. शैव सिद्धांत - यास तांत्रिक शैवमत देखील म्हणतात. हे मत समस्त भारतभर प्रचलित होते. हे भारतातच नव्हे तर श्रीलंका, दक्षिणपूर्व आशिया मध्येही पसरले होते. इस्लामी आक्रमणानंतर हे दक्षिणेतच राहिले. दक्षिणेत नयनार संतांचे काव्य शैवसिद्धांतात मिसळले. याची सरमिसळ होऊन पेरियपुराण आणि तीरुमुराई या दक्षिणी शैवमताची रचना ६३ नयनार संतांनी मिळून केली.

मुळात हा संप्रदाय द्वैतवादी आहे. सांख्यतत्वज्ञान हे याचा कणा आहे. शिव आणि शक्ती यांच्या द्वैताद्वैत फॉर्म ची उपासना या मतात होते. कापालिक संप्रदायात आणि शैवसिद्धांतात भरपूर आदानप्रदान झाले आहे. अधिक योगमार्ग आणि तंत्रमार्ग हे देखील मंत्रमार्गातील सर्व शैवसंप्रदायांना जवळचे आहेत.

मुळात हा संप्रदाय ज्ञानमार्ग होता. तामिळनाडूमध्ये नयनार संतांनी त्याचे भक्तीमार्गात रुपांतरण केले. मूळ शैव सिद्धांत याचे आणखी एक Monist अद्वैतवादी अपत्य म्हणजे नाथसंप्रदाय. (गोरक्षनाथादी नवनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, चांगदेव वगैरे या शाखेचे). हा संप्रदाय मध्यभारतात, बंगाल आणि समस्त गंगेच्या खोऱ्यात प्रचलित होता व आहे.

असे म्हणता येईल कि मूळ शैवसिद्धांत काश्मिरात कापालिक बनला, मध्य भारतात नाथसंप्रदाय, राजपुतांच्या प्रदेशात तंत्रमार्ग आणि शाक्तमार्गाशी संलग्न झाला, दक्षिणेत नयनार संतांनी त्यास भक्तीमार्गाचे रूप दिले. योगाशी आणि तंत्राशी संलग्न होऊन हठयोग प्रदीपिका सारखे ग्रंथ निर्माण झाले. पुढे तामिळी शैवमताचे विशिष्टद्वैत वेदांताशी लग्न होऊन त्याचे पर्यावसान बसवण्णा यांच्या लिंगायत संप्रदायात झाले. त्याची गोष्ट पुढे आहे.

कापालिक मताच्या सर्व उपप्रकारांचे शैवसिद्धांतातील सर्व उपप्रकारांशी आणि इतर भारतीय आस्तिक आणि नास्तिक मतांशी विचारांचे आदानप्रदान आणि वादविवाद चालू असतच. त्यामुळे हे सतत गतिमान असे Dynamic चित्र होते. बौद्धमतात तंत्र खूप प्रख्यात आहे. वज्रयान बौद्धमत आणि कापालिक मत यांच्यात तर कल्पनांची खूप exchange आढळते.तीच गोष्ट तिबेटीय बौद्धमताची. अवलोकितेश्वर हे बुद्धाचे "शिवस्वरूप" म्हणून वज्रयानात प्रसिद्ध आहे.

कालमुख वीर-शैव हा संप्रदाय विशिष्टद्वैत वेदांत, सांख्य आणि शैवसिद्धांत यांचे मिश्रण आहे. शिव-शक्ती जोडी यांच्यातील अचिंत्य भेदाभेद (एक आहे आणि नाहीही) निरुपण करणारे हे मत आहे. सेश्वरवादी सांख्यमत या पंथासोबत थोडे साधर्म्य दाखवते.

अघोरी लोक देखील मंत्रमार्गात येतात.

II. अतिमार्ग

अ. पाशुपत शैवमत - हे सर्वात जुने शैवमत आहे असे मानण्यात येते. हे प्रामुख्याने मुलतान, पंजाब, गांधार, नेपाळ, गुजरात आणि तामिळनाडू मध्ये प्रचलित होते. मोहनजोदारो येथील पशुपातीनाथाचे योगमुद्रेतले चित्र याच संप्रदायातले. ऋषी लकुलीष या संप्रदायाचे उद्गाते होते. यांचा आणि या पंथाचा रेफरन्स महाभारतात देखील आहे. म्हणजे इसपू ३००० च्या आधी पासून हे मत नक्कीच भारतात प्रचलित आहे.

हा प्रामुख्याने संन्यस्त शैव भक्ती मार्ग आहे. हा मार्ग स्वीकारावयास लागणारे व्रत पाशुपतव्रत म्हणवते आणि याची विधी अथर्ववेदातल्या अथर्वशिरस उपनिषदात आढळते. या संप्रदायाची प्रमुख ग्रंथे आहेत - गणकारिका, पंचार्थ भाष्यदीपिका, राशीकर भाष्य. या मताला कालमुख असेही म्हणतात.

पाशुपातीय लोक वैष्णव मताचे कट्टर विरोधक होते. हे द्वैत एकेश्वरवादी आहे. वास्तविक हे खूप strong monotheism सांगतात. पण इस्लाम आणि मध्यपूर्वेतील सम्प्रदायांसमोर यांची कट्टरता क्षुल्लक भासते. त्यामुळे सौम्य एकेश्वरवाद हे म्हणणे योग्य राहील.

कापालिक आणि पाशुपत शैवमतांविरुद्ध काही इतर शैवमतांनी उपहास आणि टीकात्मक साहित्य लिहिले आहे. मत्तविलासप्रहसन नावाचे पल्लवकालीन संस्कृत एकपात्री नाटक या दोन्ही मतांची यथेच्छ खिल्ली उडवते. पशुपातीय शैवमत आता फारसे प्रचलित नाही.

बसवण्णा यांचे लिंगायत वीरशैव मत यांनी भक्तीमार्गी तामिळी शैवसिद्धांत आणि पाशुपातीय अतिमार्गी मत एकत्र करून नवीन पंथ सुरु केला. तो आजतागायत व्यवस्थित सुरु आहे. मुख्यत्वे कर्नाटक, आंध्र आणि महाराष्ट्र प्रांतात हा शैवसंप्रदाय पसरलेला आहे. जरी यात मंत्रमार्गाचे अनेक influences आहेत तरी हा अतिमार्गात गणल्या जातो कारण लकुलीष ऋषींची परंपरा आणि कालमुख परंपरा या पंथात सुरु असल्याचे म्हणतात.

उपसंहार

गांधार, पंजाब प्रांतातून आता अपौराणिक शैवमत काय तर समस्त भारतीय संस्कृतीच पुसल्या गेली आहे. १९८५ नंतर (काश्मिरी पंडितांचे शिरकाण झाल्यानंतर) तिथूनही शैवमत नाहीसे झाले आहे. बहुतांश भारतात पौराणिक शैवमत प्रचलित आहे. या मताने अनेक अपौराणिक मते आपल्यात धारण करून टिकवून ठेवली आहेत. बाकी तांत्रिक, लिंगायत आणि काही तामिळी कुळे वगळता शुद्ध अपौराणिक शैवमत फारसे शिल्लक नाही. ग्रंथ आहेत, कल्पना आहेत, त्याचे पालन हि होते आणि या परंपरांच्या आचार्यांचा आदरही होतो. पण फक्त हि मते आचरणारी एक डेडीकेटेड जनसंख्या नाही.

एका अर्थी चांगलेच आहे. भारतास असलेला धोका अजून पूर्ण टळला नाहीये. जेव्हा ते होईल तेव्हा हि मते देखील कालसुसंगत होऊन कुणीतरी reinvent करेल आणि भारतात प्रचलित करेल याची खात्री मला आहे.

http://agphadnavis.blogspot.com/2012/05/blog-post_19.html

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज या घडीला कोणी शिवाची अवैदिक पद्धतीने उपासना करतं का?

आज या घडीला शिवाची अवैदिक पद्धतीनेच उपासना चालते.. Proud

पूजा करणे, हळद कुंकु वाहणे, उदबत्ती, आरती ओवाळणे या सगळ्या प्रथा अनार्य अवैदिकांच्याच आहेत. वैदिक देवताना मूर्त्याच नव्हत्या तर हळद कुंकू घालणार कोठे? आणि ओवाळणार कुणाला ?तीर्थक्षेत्रे हीही अवैदिक परंपरा... बहुतांश तीर्थक्षेत्रे शंकराचीच आहेत. इंद्राचे तीर्थक्षेत्र, वरुणाचे तीर्थक्षेत्र अशा वैदिक देवांचे तीर्थक्षेत्र कुणी पाहिले आहे काय? . मूर्तीच नाही तर तीर्थक्षेत्र कुठल्रे असणार?

हे वर लिहिलेले वाचायचे विसरलात की काय?

पूर्वी प्रतिके, प्रतिमा यात गूढ अर्थ लपलेला असायचा. एका कुठल्यातरी महामहोपाध्यायांचा लेख वाचनात आला होता त्याप्रमाणे

श़ंकराची पूजा ही प्रतिकपूज असते. हे प्रतिक म्हणजे लिंग ( स्त्री आणि पु ) आहे. या दोन्हीचा संगम याचा गूढ अर्थ निर्मिती होय. मोहेंजोदरो संस्कृतीत पण प्रतिकांचीच पूजा होत होती ना ?

वेदांच्या रचनाकारांचीही नावं माहीत नाहीत

वेदातील प्रत्येक सुक्ताच्या सुरुवातीला त्या सुक्ताची देवता आणि ते रचणारा ऋषी यांचे नाव असते... असंख्य ऋषींनी शेकडो वर्षे मिळून रचत आणि वाढवत गेलेला डेटाबेस म्हणजे वेद.. कुणी एक व्यक्ती नाही..

जामोप्या - पूजा करणे, हळद कुंकु वाहणे, उदबत्ती, आरती ओवाळणे या सगळ्या प्रथा अनार्य अवैदिकांच्याच आहेत. वैदिक देवताना मूर्त्याच नव्हत्या तर हळद कुंकू घालणार कोठे? आणि ओवाळणार कुणाला ?तीर्थक्षेत्रे हीही अवैदिक परंपरा... बहुतांश तीर्थक्षेत्रे शंकराचीच आहेत. इंद्राचे तीर्थक्षेत्र, वरुणाचे तीर्थक्षेत्र अशा वैदिक देवांचे तीर्थक्षेत्र कुणी पाहिले आहे काय? . मूर्तीच नाही तर तीर्थक्षेत्र कुठल्रे असणार?

जामोप्या,

योग्य कथन.. मूळ वैदिक पद्धतीत या प्रथा नाहीत..

पण यास योग्य शब्द आर्य-अनार्य नसून "श्रौत आणि स्मार्त" हा आहे..

श्रौत लोक (फार कमी राहिले आहेत, केरळ आणि यूपीच्या काही लहान निवडक जातीच आता श्रौत राहिले आहेत) हे अजूनही यज्ञयाग करतात. त्या जाती अजूनही मूर्तीपूजा वगैरे करत नाही. माझ्या माहिती प्रमाणे केरळ च्या नंबुद्रीपाद ब्राह्मणांची काही कुळे फक्त श्रौत राहिली आहेत. उर्वरित स्मार्त झालीत. हे लोक शंकराची उपासना करायची झाल्यास रुद्रास अग्निहोत्रात आवाहन करतात आणि त्याची पूजा तशी करतात. कुठल्याही देवाची अगर देवीची उपासना करायची असल्यास पद्धत तीच.

पण हे फार कमी राहिले आहेत आणि हळूहळू नामशेष होत आहेत. त्यातले बरेचसे स्मार्त पंथात मतांतरित झाले. या ज्या सगळ्या पद्धती आहेत त्या स्मार्त आणि श्रौतेतर संप्रदायांच्या परंपरा आहेत. आर्य-अनार्य हा भेद नाही..

शब्दच्छल नाही हा. पण योग्य गोष्टीला योग्य नावाने हाक मारणे आवश्यक असते. आजच्या शिवात रुद्राचे काहीच गुण नाहीत काय? आणि रुद्राच्या वर्णनात आजच्या शंकराचे वर्णन नाही काय?

काश्मिरी कापालिक लोकांचा शंकर आणि खंडोबा यात काय साम्य आहे? पशुपती आणि नटराज यात काय साम्य आहे? अर्धनारीश्वर आणि शैवसिद्धांतामधला शिव आणि यजुर्वेदातला शिव हे तीन एक का? मदनाला मारणारा आणि पार्वतीशी रतीक्रीडेत मग्न होणारा एकच मानवा क? दक्षिणामूर्ती आणि काळभैरव यात काय साम्य आहे?

कि एकच देवतेची विविध रूपे. यांचे आचार्य हि विविधांगी होते. उदाहरण द्यायचे झाले तर काश्मिरी कापालिक अघोरी शैवमताचे आचार्य (हा पूर्णपणे अपौराणिक संप्रदाय बरे का. हे लोक त्यांच्या अगमांना सर्व पुराणाहून वर लेखित आणि आगम वाक्य याला वेदवाक्य सारखे महत्व देत) अभिनवगुप्त हे नाट्यशास्त्र याचे देखील खूप प्रसिद्ध आचार्य आहे. शिवाचे नटराज स्वरूप कदाचित इथूनच आले असेल, कुणी सांगावे. आता वेदांत आणि पुराणात शंकरास नटराज सर्वत्र म्हंटलेले नाही. पण शिव नटराज आहेच ना.

लहान नद्या मिळत जातात, गंगा बनत जाते. गांगोत्रीची गंगा आणि ढाका येथील गंगा यात फरक आहे कि नाही. मग गंगोत्रीला ज्या तीन धारा आहेत (अलकनंदा-भागीरथी-जान्हवी) त्या तिघींना गंगा म्हणतात. त्यातली हीच खरी हे म्हणता येत नाही, कारण तिघी एकच आहेत. तेच शिवाचे आहे. वैदिक शिव हा कमअस्सल आणि फुले-कुंकू लावून घेणारा शिव खरा, हे म्हणणे मूर्खपणाचे. तितकेच जितके नटराज खोटा आणि भैरव खरा हे म्हणणे आहे.

योग्य.. मूळ वैदिक पद्धतीत या प्रथा नाहीत..

देव पावला!

मला वाटलं होतं आता हेही खोटं म्हणताय की काय! पुरावा इतका सुस्पष्ट आणि उघड आहे! Happy

या प्रथा वैदिक नाहीत, हे मान्य केलंत की विषय संपला.. आता त्याला श्रुत म्ह्णताय, का अवैदिक म्हणताय, का अनार्य म्हणताय.. याला अर्थ उरत नाही. या प्रथा वैदिकांच्या नाहीत, त्यामुळं वैदिकानी आपण इतरांच्या प्रथा घेतलेल्या आहेत, हे मान्य करावं, उगाच प्रत्येक गोष्टीला वैदिक लेप लावू नयेत. ना देव वैदिकांचे, ना पूजा पद्धत वैदिकांची, तरी आम्हीच हिंदु धर्माचे ठेकेदार म्हणून काही वैदिक मंडळी नाचत असतात ! सगळी गंमतच !!

Kiran.. ,

>> वेदांचे मूळ ग्रंथही उपलब्ध नाहीत. रचनाकार माहीत नाहीत. या लेखात आणि काही
>> प्रतिसादकर्त्यांच्या न्यायाने वैदिक हे देखील थोतांड म्हणावे लागेल.

कोण म्हणतो मूळ ग्रंथही उपलब्ध नाहीत? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांच्या संहिता उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ : ऋग्वेद संहितेचं पुस्तक इथे खरीदण्यास उपलब्ध आहे.

रच्याकने : वेदांना बुद्धानेही मूळ श्रुती म्हणून मानलंय. आपण खुशाल वेदांना थोतांड मानताय यावरून आपण बुद्धापेक्षा उच्च कोटीचे सत्य सांगत आहात असं आम्ही समजावं का?

आ.न.,
-गा.पै.

वेद थोतांड आहेत असे कुणी म्ह्टले आहे का?

उलट, स्वतःला वैदिक समजणार्‍या लोकानी इंद्र, वरुण, अग्नी यांचे यजन करावे, यज्ञ करावेत.. आणि मग आपला धर्म हा वैदिक परंपरेतला आहे, असेही म्हणावे असे आमचे म्हणण आहे.. अवैदिकांच्या परंपरा जपल्या गेल्या तशा वैदिकानीही जपाव्यात.. श्रद्धेने करावे, उगाच बाजाराच्या मागे पळू नये हीच अपेक्षा आहे. उगाच काहीतरी करायचं आणि हे वैदिकच आहे, असे म्हणायचे हे ढोंग नको.

चंद्रगुप्त,

>> उगाच काहीतरी करायचं आणि हे वैदिकच आहे, असे म्हणायचे हे ढोंग नको.

वैदिक परंपरा काळानुसार साधना करण्यास महत्त्व देते. उगीच काहीतरी करीत नाही. कृतयुगात उपासनेस मूर्तींची गरज नव्हती. जसजसा काळ बदलत गेला तसतशा उपासनेच्या विविध पद्धती विकसित होत गेल्या. उदा : शिल्पकलेद्वारे मूर्तीशास्त्र उदयास आले.

या फांद्यांना कोणाला अवैदिक म्हणायचं असेल तर खुशाल म्हणोत. मात्र त्या वैदिक उपासनेच्या विरोधात नाहीत.

आ.न.,
-गा.पै.

उगाच काहीतरी म्हणजे जे वेदात नाही, या अर्थाने म्हटले आहे.. ते चुकीचे आहे, असे म्हणणे नाही.. तेही बरोबरच.. पण वैदिकानी वैदिक पद्धतीनी केलं तर आनंदच होईल.

काळानुसार बदलतच जाणार तर आता दिवसातून पाच वेळा मक्केकडे तोंड करुन नमाज पढायची प्रथा आली आहे, तेही स्वीकारणार का? ( नाहीतरी मक्का शिव एकच आहे, असे ओक म्हणतातच. ! मग काळानुसार ते का नको?)

उलट, स्वतःला वैदिक समजणार्‍या लोकानी इंद्र, वरुण, अग्नी यांचे यजन करावे, यज्ञ करावेत.. आणि मग आपला धर्म हा वैदिक परंपरेतला आहे, असेही म्हणावे असे आमचे म्हणण आहे.. अवैदिकांच्या परंपरा जपल्या गेल्या तशा वैदिकानीही जपाव्यात.. श्रद्धेने करावे, उगाच बाजाराच्या मागे पळू नये हीच अपेक्षा आहे. उगाच काहीतरी करायचं आणि हे वैदिकच आहे, असे म्हणायचे हे ढोंग नको.

जे श्रौत लोक आहेत ते हे सगळे करतात.. इतर सगळे स्मार्त आणि पौराणिक आहेत. ते वैदिक विधी इतक्या कसोशीने पाळत नाहीत. इथे बाजार काहीच नाही. महाराष्ट्रातल्या बहुतेक सगळ्या जाती (ब्राह्मण धरून) स्मार्त आहेत. वर म्हंटल्या प्रमाणे काशी, केरळ आणि इतर काही तुरळक ठिकाणी फक्त श्रौत लोक राहिले आहेत.

ज्या गोष्टीला जे नाव आहे ते वापरा ना.. चंद्रगुप्त आहत, तुम्हास समुद्रगुप्त म्हंटलेले कसे चालेल?

यज्ञयाग करणारे, इंद्रादी देवांना मानणारे, इतर देवांची पूजाही यज्ञरूपात करणारे, ह्याच लोकांबद्दल तुम्हाला म्हणायचे आहे न? या पंथाचे नाव "श्रौत" आहे.. कृपया ते वापरा.. आणि जी कुळे श्रौत आहेत ती अजून हि जुन्या पद्धतीने अर्चना करतात. ज्यांना मतांतरित व्हावेसे वाटते ते स्मार्त होतात. ज्यांना श्रौत व्हावेसे वाटते, ते श्रौत होऊ शकतात (पण हि संख्या फार कमी आहे).

श्रौत, स्मार्त, शैव, वैष्णव, सूर्य, देवी, गणपती, इतर दर्शने, वेदांती बौद्ध, जैन, चार्वाक हि सगळी धार्मिक संस्कृतीतली वेगवेगळी मोक्षमार्गे आहेत. एकमेकांनी प्रभावित झालेली, एकच भूमीत आणि संस्कृतीत उदय आणि प्रसारण पावलेल्या या वेली आहेत. यातील सर्व आस्तिक पंथ (वेदांना प्रमाण मानणारे, ज्यात शैव देखील आले) आपल्या परंपरेचा उगम वेदात आहेत असे मानतात. याचा अर्थ सगळे क्रेडीट वेदांना आहे असे नाही. इतरही शाखा आहेत. जे वेदवाक्यास ग्राह्य प्रमाण मानीत नाहीत ते नास्तिक. शैव आगमे वेद्वाक्यांना प्रमाण मानतात हि वस्तुस्थिती आहे, अघोरी आणि कापालिक लोक सुद्धा..

या धाग्यात आपण शैवमत या द्वैत वेदांती (द्वैत वेदांत म्हणजे जिथे ईश्वर आणि सृष्टी वेगवेगळ्या आहेत अशी व्यवस्था) मताविषयी आणि त्याच्या विविध शाखांविषयी बोलतो आहोत.

चंद्रगुप्त,

१.
>> उगाच काहीतरी म्हणजे जे वेदात नाही, या अर्थाने म्हटले आहे.. ते चुकीचे आहे, असे म्हणणे नाही..
>> तेही बरोबरच.. पण वैदिकानी वैदिक पद्धतीनी केलं तर आनंदच होईल.

जामोप्या यांनी इथे म्हंटलंय : >> रावण राम या काळात व्यक्तीवर वैदिक अवैदिक लेबले नव्हती..

हीच लेबलं आज तरी कशाला चिकटवावीत?

२.
>> काळानुसार बदलतच जाणार तर आता दिवसातून पाच वेळा मक्केकडे तोंड करुन नमाज पढायची प्रथा
>> आली आहे, तेही स्वीकारणार का? ( नाहीतरी मक्का शिव एकच आहे, असे ओक म्हणतातच. !
>> मग काळानुसार ते का नको?)

असं केल्याने अध्यात्मिक लाभ काय होणार आहे?

आ.न.,
-गा.पै.

वैदिक लोकांना श्रौत म्हणणे या साठी योग्य कारण वैदिक हा काही वंश नाही राहिला, कि जात नाही. वास्तविक वैदिक लोक हे एका वेगळ्या वंशाचे होते, हेच मुळात खोटे आहे. श्रौतमत एक उपासना पद्धती आहे. ती एक मतप्रणाली आहे. आणि लोक मतांतर करीत असतात. कित्येक श्रौत लोक बौद्ध झाले आणि कित्येक बौद्ध लोक नंतर परत श्रौत अथवा स्मार्त झाले कि अजून काही झाले.

रक्त आणि वंश एकच... फक्त उपासना पद्धती वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या. आपल्या सर्वांचे पूर्वज वैदिक, श्रौत, स्मार्त, बौद्ध, जैन, चार्वाक असतील. म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या कालखंडात आणि आयुष्याच्या टप्प्यात वेगवेगळे अध्यात्मिक मत स्वीकारले असेल. त्यामुळे अमुक व्यक्ती वैदिक (श्रौत) आणि अमुक व्यक्ती शैव हे उचित ठरते.

अध्यात्मिक मार्ग रेशियल नव्हते. अध्यात्मिक मतभेद वांशिक विद्वेषात रुपांतरीत होता काम नये..

छान

गामा पैलवान

आपली आकलनशक्ती, बुद्धीमत्ता याबद्दल आम्हास कधीही शंका नव्हती आणि नाही. प्रतिसादाची वेळ नीट पाहिली आणि उत्तर द्यायचं टाळणे हेच श्रेयस्कर ! सकाळी ती पोस्ट कुठल्या संदर्भात आणि कुठल्या युक्तीवादाला शह म्हणून लिहीली आहे हे लक्षात येईल अशी आशा आहे... Wink

अंबरीष

इतिहास माझा प्रांत नाही. रोज त्यासाठी वेळ देणं शक्यही नाही आणि व्यवहार्यही नाही. मात्र, तुमचं
वाचन तोंडात बोटं घालणारं आहे हे मुद्दाम नमूद करतो. पुस्तक लिहायचं आहे या उद्देशाने अभ्यास चालू ठेवा. मात्र वरदा सारख्या अधिकारी व्यक्तींची मतं खोडून काढण्याऐवजी त्यांच्या मार्गदर्शनातून अभ्यासाला काही दिशा मिळते का हे पाहणे योग्य ठरेल. काही वेळा तुमचं लिखाण एकांगी वाटतंय. हा दोष टाळता आला तर पहा. एखाद्या विधारधारेचा प्रभाव असेल तर निग्रहाने आणि अभ्यासाने तो झटकून टाका..

लवकरच तुमची दखल घ्यावी लागेल असं वाटतं.

"मात्र, तुमचं वाचन तोंडात बोटं घालणारं आहे हे मुद्दाम नमूद करतो. पुस्तक लिहायचं आहे या उद्देशाने अभ्यास चालू ठेवा."

~ श्री.किरण यांचे हे निरीक्षण आणि अपेक्षा इतके सुयोग्य आहेच की त्याबद्दल त्यांचेच अभिनंदन करावे. अंबरिष फडणविस यानी इथल्या चर्चेच्या अनुषंगाने आपल्या अभ्यासाची दिशा निश्चित केलीच पाहिजे असे काही नाही. पण अशा चर्चांचा मतितार्थ इतकाच असू शकतो की मुख्य लिखाण करतेसमयी (पुस्तकरुपाने म्हणतोय मी) वाचकाला कोणत्या पद्धतीने आपण केलेला अभ्यास भावेल हे तरी काही अंशी जरूर समजेल.

अर्थात हेही तितकेच खरे की केवळ वाचकाचा अनुनय करण्यासाठीच संशोधनात्मक लिखाण करणे शक्य नाही, करूही नये. नाहीतर मग इतिहास बाजूला पडून ती केवळ 'व्यक्तिपूजा' होऊन बसते. श्री.अंबरिष यांच्या विषयातील अभ्यासातील क्लिष्टता आणि त्या संदर्भात उपलब्ध असणारे अधिकृत दाखले यांची वानवा पाहता त्याना संशोधनासाठी किती मोठा पल्ला गाठावा लागेल हे खुद्द तेही जाणत असतीलच.

पण वर किरण म्हणतात त्याप्रमाणे...किंबहुना त्यासाठीच "अंबरिष यांची लवकरच दखल घ्यावी लागेल असं वाटतं..."

हार्दिक शुभेच्छा अर्थात आहेतच.

अशोक पाटील

किरणजी आणि अशोक जी,

माझ्या लिखाणाबद्दल critique दिल्या बद्दल धन्यवाद. मी तुमच्या अभिप्रायावर जरूर विचारपूर्वक अंमल करेन.

कुठल्याही एका विचारधारेचा प्रभाव आहे असे विचार केल्यावर वाटत नाही. पण काही आपल्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्यावर मत ठाम होते आहे.

http://4.bp.blogspot.com/-BRUVsdRIonQ/Tk9J9Yd6hcI/AAAAAAAAB24/kSdRlpI2Dg...

४ पुरुषार्थ वेगळे आहेत, ४ आश्रम वेगळे आहेत आणि ४ वर्ण वेगळे आहेत.

उदाहरणार्थ, बौद्धमत फक्त मोक्ष (किंवा निर्वाण) या पुरुषार्थाविषयी बोलते. संन्यास या आश्रमाविषयी बोलते. आणि संन्यास आश्रम स्वीकारल्यावर मोक्ष पुरुषार्थ मिळवायचा अधिकार चारही वर्णांना समान आहे, असे म्हणते. बौद्धमत हे जरी त्याकाळात क्रांतिकारक मत असले तरी हे फक्त एका पुरुषार्था आणि एका आश्रामापुर्ते मर्यादित आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. मोक्षाव्यतिरिक्त आणि संन्यासाव्यतिरिक्त प्रत्येकी ३ आश्रमे आणि पुरुषार्थ आहेत, चारही वर्णातील गृहस्थांसाठी. (वर्ण फक्त गृहस्थाला असतो, ब्रह्मचारी, वानप्रस्थी आणि संन्याशाला नाही).

या तीन चतुःसुत्रींना आपण "धर्म" म्हणतो. यास धार्मिक अथवा भारतीय अथवा आधुनिक काळात हिंदू सभ्यता म्हणतो. तीन चतुःसूत्र म्हणजे ४ वर्ण-४ आश्रम- ४ पुरुषार्थ.

जी व्यवस्था या तिघींना एकत्र संबोधित करते त्या व्यवस्थेला "धर्म" म्हणतात. मीमांसा, सांख्य, बौद्ध, जैन, शैव वगैरे मोक्षमार्ग आहेत. मते आहेत. चाणक्य अर्थशास्त्र, विदुराचे अर्थशास्त्र, वाशिष्ठाचे अर्थशास्त्र, नारदाचे अर्थशास्त्र, भीष्माचे अर्थशास्त्र हे सगळे वेगवेगळे "अर्थमार्ग" आहेत... जयादेवाचे कामशास्त्र, वात्सायनाचे कामसुत्र, आणि इतर हे वेगवेगळे "काममार्ग" आहेत.. आणि मनु चे धर्मशास्त्र, याज्ञवल्क्याचे धर्मशास्त्र, आपस्तंभ, जैमिनी, आधुनिक घटना आणि इतर बरेच हे सगळे "धर्म किंवा दंड-मार्ग" आहेत.

आपल्या व्यवस्थेत हि कल्पना आहे कि या तीनही चौकड्या वेगळ्या राहिले पाहिजे. म्हणजे आतून जुळलेले तरी विकेंद्रित राहिले पाहिजे. मोगल-भारत, ब्रिटीश इंडिया, आधुनिक भारत, आणि ओवरऑल पश्चिमी सभ्यता सत्तेचे केंद्रीकरण यावर आधारित आहे (एक जन्म, एक देव, एक पुस्तक, एक चर्च, एक केंद्र सरकार जिच्याकडे असीमित सत्ता आणि सगळी शस्त्रे, हे सगळे सांभाळायला एक मोठी नोकरशाही व्यवस्था. थोडक्यात काय तर पश्चिमेत आयुष्याची "ल.सा.वि" म्हणजे "एक"). हि पद्धत वाईट आहे असे नाही पण याचे भारतात कितीसे महत्व आहे, यावर मुलभूत शंका आहे (भारतीय पद्धतीत काळ सायक्लिक आहे. लीनियर नाही. भारतीय व्यवस्थेची अथवा धार्मिक दृष्टीकोनाची "ल.सा.वि." इन्फिनिटी आहे). जेव्हा भारतीय मन हा दृष्टीकोन सोडून पाश्चात्य दृष्टीकोनात शिरायचा प्रयत्न करते तेव्हा प्रचंड गोंधळ उडतो.

आता आपल्याकडील रा.स्व.संघाचे उदाहरण घ्यायचे झाले तर ते जरी प्रखर राष्ट्रवादी असले तरी एकचालकानुवर्तीत्व या पद्धतीमुळे त्यांची पोहोच सीमित राहिली आहे. ज्या काळात संघ स्थापन झाला त्याकाळात कदाचित हि गरज असेल पण आता ते बदलायला हवे. कुठलीही भारतीय संस्था अथवा राज्यव्यवस्था अशी एकचालकानुवर्तीत नव्हती. गुप्त, पंजाबातील, नर्मदेच्या खोऱ्यातील आणि दक्षिणापथ येथील "गणराज्ये", गुप्त-मौर्य-मराठे हे सगळे "संघ-राज्ये" (फेडेरेशन) होते. आपले सगळे तत्वज्ञान, रामायण-महाभारातादी इतिहास, पुराणे व त्यातल्या गोष्टी, वेद आणि इतर श्रुती साहित्य, हे सगळे असेच काहीशी व्यवस्था सांगतात. आपल्या पौराणिक कथांमध्ये देवगण नेहमी "गण" असतात. असुर नेहमी सर्वशक्तिमान असा "एक" असतो. असीमित शक्तींचा स्वामी असतो. देवगण हे त्रिदेवांना अथवा देवीला उत्तरदायी असतात. आणि तीन देवही एकमेकांना सांभाळून विचार वगैरे करून (थोडक्यात अंडरस्तांडिंग ठेऊन) असतात. स्वातंत्र्योत्तर संघाच्या ढाच्यात हा संदेश दिसत नाही. म्हणून त्यांच्या बहुतेक संघटना उग्रविचारसरणीच्या आणि एक्स्ट्रीम मताच्या वाटतात. जो पर्यंत ते अजून जास्त विकेंद्रित होत नाहीत तो पर्यंत संघ देखील नेहरूवियन प्रणालीचा एक हिस्सा राहील. भाजपा तर दुसरे कॉंग्रेस आहेच.

या सगळ्याचा मूळ मुद्दा हा कि विकेंद्रित राहूनही एकत्र राहता येणे शक्य आहे, दंड, अर्थ, काम, मोक्ष यांचे अनेक मार्ग आहेत आणि त्या सर्वांचा काम एकच आहे, ते म्हणजे आत्मशांती. त्यामुळे आत्मशांती मिळवायचे, सुख मिळवायचे, पैसा आणि सत्ता मिळवायचे सर्व मार्ग श्रेयस्कर आहेत जो पर्यंत "धर्माचे" पालन होते . हा मुद्दा प्रत्येक गोष्टीत (पंचतंत्र, जातक कथा, हितोपदेश, आस्तिक/बौद्ध/जैन पुराणे सर्वत्र) ठसावला आहे. या सगळ्या गोष्टींचा मूळ मुद्दा हा आहे. इतिहासातील एका घटनेवर व तिच्या सत्यतेवर धर्म टिकलेला नाही. (जसे बायबल म्हणते कि ४००४ इसपू साली सृष्टीचे निर्माण झाले. म्हणून आधीच्या सर्व इतिहासकरांनी सर्व घटनांचे आणि ग्रंथांचे तारीख ४००० इसपू नंतर ठरवली, कारण बायबल अंतिम सत्य.) अर्थात हे आता खोडल्या गेले आहे. पण हे ठसलेले अनेक कारकुनी पिढ्या भारतात उत्पन्न झाल्या ज्यातले अनेक आय.सी.एस आणि नंतर आय.ए.एस बनले, इतर पदाधिकारी बनले जे इतिहासतज्ञ नव्हते पण ह्या साच्यातून आले होते.

प्रॉब्लेम हा होतो कि भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशास केंद्रसरकारला युरोपीय नेशन-स्टेट चे मॉडेल वापरून एक ठेवणे या साठी व्यवस्थेला साम-दान-दंड-भेद वापरून लोकांना शांत ठेवावे लागते. इंग्रजांनी हा प्रॉब्लेम coalition of minorities theory निर्माण करून सोडवला. नेहरूंनी आणि गांधी घराण्याने तो वारसा पुढे चालवला आणि त्याची परिणीती म्हणजे आजचा भारत. यात ऐतिहासिक रिसर्च देखील आला. या थियरी साठी वरील ऐतिहासिक इंजिनियरिंग आवश्यक आहे. म्हणजे भारत हा कधीच एक राष्ट्र नव्हता हे ठसवून सांगायचे आणि राष्ट्र याची व्याख्या "नेशन-स्टेट" वरून करायची. खरे आहे, भारत हे एक "नेशन-स्टेट" कधीच नव्हते. पण राष्ट्राच्या अस्तित्वाचे "नेशन-स्टेट" हे एकच मॉडेल नाही, हे शिकवल्या जात नाही. सांस्कृतिक एकता ही कल्पना देखील आह, आणि संस्कृती म्हणजे "कल्चर" नाही आणि "सिविलायझेशन" नाही हे देखील सांगत नाही.

बंगालची मंदिरे आणि आपल्याकडील हेमाडपंथी मंदिरे वेगळी असतात, घरे वेगळी असतात, पूजाविधी वेगळ्या असतात, भाषा वेगळ्या आहेतच, विधी वेगळे आहेतच, मग कल्चर देखील वेगळे. पण संस्कृती या शब्दात कल्चर आणि "सिविलायझेशन" (जो नागरी वसाहती आणि बांधकामे याचे वर्णन करणारा शब्द आहे) हा अर्थ घुसडला कि पूर्ण फ्रेम ऑफ रेफरन्स बदलते. कारण बंगाल आणि महाराष्ट्राची संस्कृती एक आहे. आतून जोडणारा एक धागा आहे. जो या फ्रेम मध्ये नाकारल्या जातो.

आता शैवमताचेच उदाहरण घ्या. १८४१ ते १९०४ या काळात तामिळी शैवमत हे "हिंदूइझम" पेक्षा कसे वेगळे आहे, ते सेंट.थोमास च्या आगमनानंतर कसे प्रचलित झाले (म्हणजे तामिळी लोकांचा शिव हा ख्रिस्ताकडून आला आहे असे भासवले आणि प्रचंड प्रमाणात ख्रिस्तपंथात लोकांनी मतांतर केले, तामिळनाडू मध्ये एक चक्कर मारली कि हे सहज दृष्टीस पडेल), सिंहिली भाषा हि आर्यभाषा, आणि तामिळीभाषा हि खरी भाषा, पण ती उत्तरभारतीय (म्हणजे सगळे तामिलेतर) आर्यांनी कशी संस्कुतप्रचुर केली यावर पूर्ण मायथोलॉजी रचली आहे. याचे दोन फायदे - समाज दुभंगला (१८५७ च्या आधी वेल्लोर येथे खूप मोठा उठाव तिथल्या लोकांनी इंग्रजांविरुद्ध केला होता, तो राग पूर्ण विभागला), दक्षिण जिंकणे आणि स्टेबल ठेवणे इंग्रजांना short term मध्ये सोपे झाले. या सर्वांची परिणीती एल.टी.टी.ई आणि इतर डोकेदुखीत झाली.

गेल्या शतकात आणि या शतकाच्या बहुतांश भागात (आताही) शैवमताचा पद्धतशीर वापर भारतीय समाजात फुट पाडण्यासाठी झाला आहे. फुट पडण्याच्या या वृत्तीला उत्तर देणे आवश्यक आहे. आजकाल हे लोण महाराष्ट्रात देखील पसरत आहे. जर हे अनुत्तरीत राहिले तर एल.टी. टी.ई सारखे महाराष्ट्रातही सुरु होऊ शकते. तिथे तिरुवल्लुवर आणि थोमसोत्तर ख्रिस्ती शिव यांचा उपयोग झाला. इथे शिवाजी महाराज आणि मुलनिवासी शिव यांचा वापर होईल. राजपुतान्यात एकलिंगजी या शैवमताचा वापर होईल (म्हणजे होऊ शकतो).

शंकरात असे काय आहे जे "भारतीय" आणि "हिंदू" नाही? काहीच नाही. वेदांत असे काय आहे जे भारतीय आणि हिंदू नाही? काहीच नाही.. रुद्र आणि शंकर असा उगाच शब्दच्छल करून भ्रम पसरवायचा, हे सगळे अनुत्तरीत राहता काम नये.

वरदाजींकडून खूप शिकायला मिळाले आणि जर त्यांनी या धाग्यात (व अन्यत्र) प्रतिसाद दिला तर अजून खूप शिकायला मिळेल. मी त्यांची मते खोडून काढली नाहीत. फक्त एक वेगळा दृष्टीकोन देऊन बघितला. तो माझा स्वतंत्र दृष्टीकोन पूर्णत्वाने आहे असेही नाही. माणूस इतरत्र वाचूनच शिकत असतो व त्यात आपली भर घालत असतो. त्यामुळे माझ्या मते हा संवाद आहे. आणि तो वरदाजी आणि इतर अधिकारी मंडळी यांनी चालू ठेवावा.

संप्रदाय, मोक्षमार्ग, आध्यात्मिक मत आणि शास्त्राचा वापर जेव्हा राजसत्ता शस्त्रासारखा करते, तेव्हा सावध होणे आवश्यक आहे. भारतीय व्यवस्थेत, जिला आपण "धर्म" म्हणतो, अध्यात्म ही वैयक्तिक बाब आहे. ती पूर्णपणे वैयक्तिक राहावी. ती राहिली नाहीये. म्हणून प्रतिकार आवश्यक आहे.

अंबरीश,

अत्यंत वाचनीय, माननीय आणि चिंतनीय संदेश.

वरदांबाबतच्या विनंतीला अनुमोदन. मला काही शिकता आलं नाही त्यांच्याकडून! Sad पण त्यांनी प्रतिसाद द्यावा अशी खूप इच्छा आहे.

आ.न.,
-गा.पै.

ख्रिश्चनानी शिव हा ख्रिस्तापासुन आला, असे सांगितल्यावर ऐकायला लोक खुळे आहेत का?

हे झालंय.. जरा महाराष्ट्राबाहेर उघड्या डोळ्याने चक्कर मारून या.. १९व्या शतकात काय परिस्थिती होती, याची कल्पना करून बघा. द्रमुक वाल्या विचारसरणी च्या विद्वानांशी आणि सामान्य लोकांशी आणि एल.टी.टी.ई. च्या समर्थक लोकांशी जरा बोलून पहा. हे माझे प्रथमदर्शनी अनुभव आहेत, आणि वाचन देखील हेच सांगते. त्यामुळे आधी वाचा मग चावा.. दंतहीन आणि विषरहित सापाला कुणी विचारीत नाही.

आणि तुम्ही तरी काय दुसरं केलय? बुद्ध विष्णूपासुन आला, काबा म्हणजे शिव , ख्रिस्ताचे हिंदुत्व .. .. हे असले लिहून तुम्ही तरी काय वेगळं केलंत? तुम्ही एकेकाळी केलेलंच पाप तुमच्यावर उलटलं. आता कर्मविपाक असे समजून कर्मफल भोगत बसा.

मित्रा, मग स्वतः बुद्धानेही जातक कथांमध्ये दाशरथी श्रीरामाला बोधीसत्व म्हणून दाखवायचा प्रयत्न केलाय. जातक कथा क्रमांक ४६१ वाचून बघा. मूळ मुद्दा समजावून घ्या. उगाच बोटे दाखवून फिदीफिदी हसण्यात काहीही अर्थ नाही.

http://ia700506.us.archive.org/2/items/dasarathajatakab00fausuoft/dasara...

अधिक, "तुम्ही" म्हणजे कोण? परत जातीवाचक होणार का? म्हणजे मुद्दे संपले कि आडनाव बघून जात काढायची का? ख्रिस्ताचे भारतीयत्व काश्मीर आणि इतर काही ठिकाणचे लोक मानतात.

http://www.cultureunplugged.com/documentary/watch-online/play/8764/Rozab...

हि एक डॉक्युमेंटरी बनवल्या गेली आहे या विषयावर. हे खरे कि खोटे यात ही इतिहासकरात वाद आहे. निघेल काही समाधान. जर काही लोकांचे असे मत आणि श्रद्धा असेल आणि त्यास पुष्टी देणारे तर्क आणि पुरावे ते देत असतील तर त्यास तुमची हरकत काय?

मग स्वतः बुद्धानेही जातक कथांमध्ये दाशरथी श्रीरामाला बोधीसत्व म्हणून दाखवायचा प्रयत्न केलाय.

महान इतिहासकार मित्रा,जातककथा बुद्धानी लिहिलेल्या नाहीत.. बुद्धाच्या विविध जन्मांवर (?) अशा या कथा नंतरच्या काळात कुणीतरी लिहिलेल्या आहेत.

आणि समजा, गौतम बुद्धाच्या बोधिसत्वाच्या व्याख्येत राम बसत असेल, तर त्याला बोधिसत्व म्हणून बुद्धाने सांगितले तर बिघडले कुठे? रावणाचा वध, राक्षसांचा वध अशा बाबी सोडल्या तर रामाचे आयुष्य मर्यादा पुरुषोत्तम म्हणूनच प्रसिद्ध आहे.. असेल बसत त्यांच्या बोधिसत्वांच्या लक्षणात राम... तुमच्या पोटात दुखायचं काय कारण आहे? रामच कशाला, रावणदेखील त्यांच्या कथांमध्ये बोधिसत्व म्हणून येतो.. जातक कथा, पुराणकथा, प्रेषिताच्या चमत्काराच्या कथा असल्या गोष्टीकेवळ समाजाचे मनोरंजनातून धार्मिक शिक्षण या हेतूने लिहिलेल्या असतात, हे आता जगातल्या सर्वच धर्मातल्या लोकाना माहीत आहे. इतकी प्रगल्भता सगळ्यांच्याचकडे आलेली आहे. आणि तुम्ही या कथांतून धर्माचा इतिहास आणि मूलतत्वे अशा गंभीर गोष्टी शिकायचा ( की लोकाना शिकवायचा? ) प्रयत्न करताय म्हणजे अजबच.

हो ना.. मग आता तोच न्याय बुद्धाला विष्णूचा नववा अवतार काही लोक म्हणतात, त्यास लावा.. म्हणजे गैरसमज होणार नाहीत. बुद्ध विष्णूचा नववा अवतार हेच लॉजिक वापरून झाला.. याला "पाप" तुम्हीच म्हणाले काही पोस्टा पूर्वी, म्हणून ही प्रतिक्रिया होती.. मुद्दा सिद्ध केल्या बद्दल धन्यवाद..

हो का? मग दशावतारात तुम्ही बुद्धाचे चित्र लावत बसा की.. तुम्हाला कोण अडवले आहे का? तुम्हाला अवतार मानायचा असेल तर माना, ज्याना ते मान्य नाही, ते मानत नाहीत. स्वातंत्र्य सर्वानाच आहे नै का? Proud

आणि हे स्वातंत्र्य मान्यच असेल तर शिव म्हणजे ख्रिस्तच असे म्हणणार्‍या लोकांचंही स्वातंत्र्य तुम्ही मान्य करा. कशाला त्याना शिव्या घालत बसलाय? Proud स्वतःला मात्र बुद्ध म्हणजे विष्णू म्हणायचा अधिकार हवा आणि कुणी ख्रिस्त म्हणजे शिव असे म्हणत असेल तर त्याला मात्र जणू काही देशद्रोही म्हणून रंगवायचं हा दुटप्पीपणा कशाला करताय? Proud

अलबत स्वातंत्र्य आहे.. आणि अलबत फोटो लावणारच.. फक्त विष्णूने बुद्धाला hijack केले, रुद्राने शंकराला hijack केले, असला कांगावा करू नका.. कारण हे उलटे ही सत्य आहे.. कारण त्या तत्त्वज्ञांच्या डोक्यात hijack करण्याचा क्षुद्र विचार नव्हता, त्याचे तत्वज्ञान लोकांना सांगून त्यांना शिक्षित करण्याचा आणि आपले मत प्रसारित करण्याचा विचार होता.

तो क्षुद्र विचार आजकालचे काही <एडीट> लोक करतात आणि त्या मोठ्या लोकांना डांबर फासतात.

हे स्वातंत्र्य मान्यच असेल तर शिव म्हणजे ख्रिस्तच असे म्हणणार्‍या लोकांचंही स्वातंत्र्य तुम्ही मान्य करा. कशाला त्याना शिव्या घालत बसलाय?

हे देखील योग्य आहे, जो पर्यंत हे मत अध्यात्मापुरते मर्यादित आहे तो पर्यंत. जेव्हा या मतामुळे आर्थिक आणि सामरिक प्रश्न उत्पन्न होतात, तेव्हा संदर्भ बदलतात. बुद्धास विष्णू म्हंटल्यामुळे भारतात सामरिक प्रॉब्लेम निर्माण झाले नाहीत. शंकरास ख्रिस्त म्हंटल्यामुळे लिट्टे ची समस्या उत्पन्न होण्यास आणि पसरण्यास हातभार लागला. इतरही अनेक प्रॉब्लेम आहेत (उदाहरणार्थ रशियन अणुप्रकल्पाला अमेरिकी मिशनरी एन.जी.ओ चा विरोध आणि त्यांनी पसरवलेला असंतोष). अध्यात्मापुरते सीमित राहणार असेल तर ख्रीस्तास विष्णूचा दहावा अवतार म्हणायची देखील तयारी आहे.

"आपले" म्हणजे काय ते डिफाईन करावे लागते. आणि त्याचे रक्षण करावे लागते. त्याला पाप-पुण्याचा प्रश्न तुम्ही बनवला. मी त्यांना हे करण्याबद्दल शिव्या घातल्या नाहीत. त्यांनी त्यांचे धर्मपालन केले. "आपण" "आपले" धर्मपालन केले पाहिजे. हे देखील विषयांतर होते आहे, म्हणून मी हे इथे थांबवतो.. तीन ग्लोबल फोर्सेस वाला माझा चालू-घडामोडी येथील धाग्यात मी यावर सविस्तर लिहिले आहे.

ता.क. दक्षिणेत बुद्धाला नववा अवतार मानीत नाहीत. तिथल्या मंदिरात हयग्रीव याला नववा अवतार म्हणून दाखवतात.

मेकॉलेपुत्र..... सगळे तमाम भारतीय मेकॉलेपुत्रच आहेत.. हे फडणवीस अणि पैलवान यांचं काही कळत नाही... दुसर्‍याचं मत खोडता येत नसले की तुम्ही मेकॉलेपुत्र आहात म्हणून बोंब ठोकतात... अरे ! आम्ही मेकॉलेपुत्र आणि तुम्ही कोण? तुम्हीही तोच सिलॅबस शिकता ना? का तुमच्या दोघांच्या खानदानासाठी खास संघाने वसिष्ठ आश्रम किंवा सांदिपनी गुरुकुल काढला आहे की काय? Proud तुम्ही दोघे वसिष्ठ आश्रमात पाणी भरायला किंवा सांदिपनींच्या आश्रमात लाकडं फोडायला जात होते का? मग बाकीच्याना कशाला मेकॉलेपुत्र म्हणता ?? Proud

ता क ... जगातल्या हिंदु धर्म फारसा नसलेल्या देशांमध्ये विष्णुचा नववाच काय कोणताच अवतार मानत नाहीत. Proud

Pages