Submitted by वैद्यबुवा on 29 March, 2012 - 09:56
ठिकाण/पत्ता:
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात
तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.
मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे
९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि
माहितीचा स्रोत:
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत
विषय:
तारीख/वेळ:
शनिवार, May 12, 2012 - 14:00 to 20:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
समोसे, मी,नात्या व रुनी ने
समोसे, मी,नात्या व रुनी ने मिळुन आणले होते.
श्री-सौ. देसायांच्या अत्यंत
श्री-सौ. देसायांच्या अत्यंत आगत्यशील आदरातिथ्यासह एविएठी अत्यंत धूमधडाक्यात पार पडलं.>>>>>> +१०!
सहा राज्यातल्या मायबोलीकरांची उपस्थिती, पुस्तकं आणि मोगरा/रातराणी इ रोपांची अदला बदल, माझ्याकडे उत्तरेकडील मंडळी मुक्कामी ह्या सर्व घटकांमुळे ह्या गटगस ह्या वर्षीचा कल्लोळ जाहीर करण्यात यावं नक्कीच
फोटो मला पण पाठवा कोणीतरी.
फोटो मला पण पाठवा कोणीतरी.
वेमांचं गाणं चमनला डेडिकेट
वेमांचं गाणं चमनला डेडिकेट केलं होतं ना? >> खरं की काय?

मी, रुनी आणि बिल्वा थोड्यावेळ वरती गप्पा बसलो होतो तर शेवटचे काही 'आयटम परफॉर्मन्सेस' मिस झाले.
आता तर गटगला ऊपस्थित असूनसुद्धा मलाच वृत्तांत वाचण्याची ऊत्सुकता लागली आहे.
श्री-सौ. देसायांच्या अत्यंत आगत्यशील आदरातिथ्यासह एविएठी अत्यंत धूमधडाक्यात पार पडलं.>>>>>> +१०!
बाराबाहेरून, प्रवास करून गटगला हजेरी लावणार्या मायबोलीकरांच्या ऊत्साहाला सलाम.
बारात राहूनही गटगला न आलेल्यांसाठी 'वर्षातून तुम्हाला जास्तीतजास्त एकाच बारा गटगला अनुपस्थित राहता येईल' असा जाचक नियम लादला पाहिजे.
नात्याने 'प्रमुख पाहुणे' पदाला अनुसरून वर्तन न केल्याने (ऊशीरा येणे आणि लवकर जाणे) त्या पदावरून त्याचे कोर्टमार्शल करावे आणि ते पद विकुंना (कायमसाठी) बहाल करावे असा प्रस्ताव मी मांडतो.
मेधाने फोन वरुन हजेरी
मेधाने फोन वरुन हजेरी लावली.

सौ. देसाई सगळा स्वयंपाक स्वता करणार होत्या.
बिल्वा च्या छोट्याला माझ गाण आवडल. माझ्या जवळ येवुन तु गाण छान म्हंटलस अस म्हणाला.
निलेश नाईक ने आणलेल्या जिलेब्या आता प्रत्येक एवेएठिला मस्ट.
फवारा चौक चा चिवडा वेरी हॉट आयटम..
मिसळीचा कट मस्त.
मस्साला च्या मारी एकदम भारी.
नविन लोकाना मी व त्यानी मला बरोबर ओळखल.
केड्याला ओळखायला सगळ्याना वेळ लागला.
वेमानी वजन कमी केलय. हे त्याना सांगितल्यावर त्यांच्या अंगावर मुठभर मांस चढल. त्यांची सगळी मेहनत वाया गेली.
आर हा आर्च चा डुप आयडी नाहिय
आर हा आर्च चा डुप आयडी नाहिय ना?. >>> अनिलभाई, मी डुप आयडी नाहि. मी हे.मध्ये रहाते, माझा आयडी आणि आमचा हे. धागा बघा मग तुम्हाला समजेल.
देसायांकडे गेल्या गेल्या
देसायांकडे गेल्या गेल्या नमस्कार्-गाठीभेटीत सव्वादोन मिनिटं घालवून लागलीच समोसे, डाळवडे, चटण्या आणि नुस्ताच कट यांचा समाचार घेण्यात आला. हे सगळे आयटमं चवदार होते. काहीतरी सॉलिड तिखट होतं. म्हणून आधीच आम्रखंड ओरपून घेतलं. स्वर्गीय होतं.
जेवणात शेंगदाण्याची चटणी, आळूचं फदफदं, कुळिथाची आमटी, वांग्यांची भाजी, मसालेभात, सखुबत्ता, खमंग काकडी, चपात्या खाल्ल्या. खाताना अफाट मजा आली. खाल्ल्यावर काय झालं आठवत नाही. नंतर सोलकढी असल्याचंही आठवलं. पोटाचं काय ते नंतर बघू, आधी सोलकढी पिऊ हा योग्य विचार करून तीही स्वाहा झाली. चवीबद्दल क्या केहेने!
जिलब्या, चॉकलेट केक, चीजकेक, बकलावा यांनी क्षमा करावी.
इतकं खा खा खाल्लं की जवळपास फूड्कोमात जायची वेळ आली. झकास मनोरंजन आणि कडक चहा मारल्यावर किंचित शुध्दीवर आल्याचं जाणवलं.
जेवणानंतर चमनने आणलेले विडे हाणले. बुवांनी एका पिशवीत ५ विडे वेगळे काढून, घरी घेऊन जायला दिले.
पण मी तीनच विडे घरी आणलेत. बाकी उदार मनाने वाटले. (जेवणातलं बाकी काही घरी न्यायची सोय नसल्यामुळे विडे नेणं जस्टीफाइड आहे!) 
चमन आणि चमी अत्यंत आगत्यशील आहेत. त्यांच्याकडे पण बेसनलाडू, चहा आणि खारी(?) खाण्यात आली. गप्पा झाल्या.
आम्हाला बारा बशीत येताना आणि
आम्हाला बारा बशीत येताना आणि जाताना झक्कींची कमी जाणवली. ह्यावेळी पदार्थांची फारच रेलचेल होती. खुप दिवसांनी इतकं खाललं. सहज म्हणून वजन काट्यावर चढलो तर ४ पाऊंड वाढलेलं होतं.
पण मी तीनच विडे घरी आणलेत.
पण मी तीनच विडे घरी आणलेत. बाकी उदार मनाने वाटले>> मीच लंपास केले त्यातले दोन. खाली जाऊन आणायचा आळस.
एवेएठि संपल्यावर जो झोपलोय तो
एवेएठि संपल्यावर जो झोपलोय तो आत्ता उठतोय... आजारी पडलो दुसरं काय?
स्वाती, तुझी पळी जपून ठेवण्यात आलेली आहे.. पुढच्या एवेएठिला मिळेल..
मॄ.. सगळ्या पदार्थांचा उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद..
सगळ्यांना भेटून खूप मजा आली. 'हु हु ही' हावडल्याचं हळवल्याहद्दल हन्यहाद..
देसाई, आता तब्येत कशी आहे?
देसाई, आता तब्येत कशी आहे? गटगला खुप मजा आली. गटग होस्ट केल्याबद्दल आपले आभार.
वेगवेगळे पदार्थ पोटफुटेस्तोवर खाल्यामुळे सगळ्या पदार्थांना पुरेसा न्यात देता आला नाही याची हुरहुर वाटते.
मनोरंजनाच्या कार्यक्रमांनी नेहेमीप्रमाणेच रंगत आणली. हहाहुहू प्रोग्रामला स्पेशल मायबोली टच असल्याने अजुन मजा आली.
बुवा, आता परत कधी?
म्हणून आधीच आम्रखंड ओरपून
म्हणून आधीच आम्रखंड ओरपून घेतलं. स्वर्गीय होतं.
तरीच, मी येइपर्यंत जवळ जवळ संपलं होतं. आम्रखंडाचा ट्रे चाटणे अगदीच वाईट दिसलं असतं म्हणून मोह टाळला.
साधारण क्वार्टरली होतच नात्या
साधारण क्वार्टरली होतच नात्या जिटिजी. ३-४ महिन्यात करुयात!
देसायनू, आजारी पडलात? आधी लगीन एवेएठिचे लावलेत अन मग आजारी पडलात? टडोपा अगदी.

माबोराज्याचे खरे शिलेदार आहात!
मासे मस्त झाले होते. मुडदुश्या नाव होते माश्याचे ऐकून जाम हसायला आलं!

आम्रखंडाचा ट्रे चाटणे अगदीच वाईट दिसलं असतं म्हणून मोह टाळला.>>>>>>> बरं झालं टाळला मोह ते. तुमच्या एकट्याच्याच डोक्यात हे आलं नव्हतं येवढच आता मी म्हणेन.
हा आमच(श्री व सौ याचं) पहिलाच
हा आमच(श्री व सौ याचं) पहिलाच ग ट ग. फार दिवसांनी येवड्या सर्वांना भेटून मजा आली.
देसायांचे मासे(देसायांनी केलेले मासे) फार मस्त. मिसळ आणि प्याटीस ही मस्त होते.
आता वाट फोटोनची आणी फूडच्या ग ट ग ची ........
प्याटीस कुणी आणले होते? कुठे
प्याटीस कुणी आणले होते? कुठे लपवून ठेवले होते??
देसाई आजाराचं स्वरूप काय? (त्यानुसार त्याचं कारण मेहेनत की जेवण ते ठरवता येईल.)
आम्रखंडाची भांडी बिल्वाच्या हातात दिसली तेव्हा स्वच्छ होती. विकुंना जे वाईट दिसलं असतं असं वाटलं त्याची कुणीतरी अजीबात पर्वा केलेली दिसत नाही.
मृण,
मृण,
घ्या! विकु, मला काय माहित
घ्या! विकु, मला काय माहित तुम्हाला मिळालं नाही ते. मिष्टरांना ती भांडी धुवायला देताना माझ्या मनात अगदी आलं होतं, कुणीतरी अजून चाटून पुसून घ्यायचं ठरवलं तरी चांगलं डावभर आम्रखंड निघेल.
पण असं कुणाला म्हणणार? 
पॅटीस म्हणजे ते अभिप्राने आणलेलं अॅपेटायझर म्हणताय का नाईक? पॅटीस नव्हते ते.
देसाई आजाराचं स्वरूप काय? (त्यानुसार त्याचं कारण मेहेनत की जेवण ते ठरवता येईल.)>> मृ
एकंदर भरपूर धमाल केलेली
एकंदर भरपूर धमाल केलेली दिसत्येय मंडळी
वृंदाताईंनी परवाच इमेल करुन आवर्जुन सांगितले की त्या मस्साला च्यामारी बनवणार आहेत आणि फोटो इथे डकवले आहेत. धन्स वृंदाताई
आवडल्या का च्यामारीज पब्लिकला???
>>फूडच्या ग ट ग ची आत्ताही
>>फूडच्या ग ट ग ची
आत्ताही एवढे फूड होते ना..
च्या मारी लै आवडल्या!
लाजो, च्या मारी मस्त हाँ. मी
लाजो, च्या मारी मस्त हाँ. मी वृंदाताईंकडून एक पुडा मागून आणला.
मुडदुशा ? कुठे मिळाल्या ?
मुडदुशा ? कुठे मिळाल्या ? व्हायटिंग नावाने विकतात अमेरिकन स्टोअर्समधे तेच का ? फ्राय केलेले की कालवण ?
देसाई आजाराचं स्वरूप काय? <<<
देसाई आजाराचं स्वरूप काय? <<< मेहनत आणि फक्त मेहनत (जेवण्याची)..
विषाणू बाधले.. ते शनिवारी कसे बसे थोपवून (औषधांचा मारा करून) धरले होते..
फुडच गटग. तुम्ही नविन होतात
फुडच गटग.

तुम्ही नविन होतात म्हणुन का?. आता या पुढे नुसतच फुडच गटग नको. बाकी पण कार्यक्रम हवेत.
देसायानु, काळजी घ्या. तुमचा
देसायानु,
काळजी घ्या. तुमचा चमन गटग हुकला त्यामुळे.
भाई, पदार्थांचे फोटो टाका.
भाई, पदार्थांचे फोटो टाका.
मुडदुशा ? कुठे मिळाल्या ?
मुडदुशा ? कुठे मिळाल्या ? व्हायटिंग नावाने विकतात अमेरिकन स्टोअर्समधे तेच का ? <<< मेधा.. देसायांकडे सगळे Original असते.. उगाच whiting/blacking काही नाही..
यावेळी कालवण केले होते... तुला टुकटुक..
(Route 130 वर पातिदार grocery आहे, त्यात Lady Fish म्हणुन बर्फाळलेली पाकिटं मिळतात Original मुडदुश्या/सुळे.. ).
देसाई , धन्यवाद. आता लंच
देसाई , धन्यवाद. आता लंच टाइमात चाललेच देशी स्टोअरमधे
तब्येत बरी आहे का आता ?
पॅटिस बेडेकरांनी आणले होते.
पॅटिस बेडेकरांनी आणले होते.
टांगारुंना कशाला हव्यात माशांच्या चौकशा ?
बरोबर, पॅटिस बेडेकरांनी आणले
बरोबर, पॅटिस बेडेकरांनी आणले होते. मस्त लागले चिंचेच्या चटणी बरोबर.
मी नाईकांना म्हंटलं , जिलेबीची पॅकिंग इतकी जबरी होती तुम्ही ती जिलेबी आणताना पुढे बँजो पार्टी शोभली असती.
सगळच खाता नाही आलं पण प्रयत्न केला!

मिसळीचा असला घमघमाट सुटला होता की जाऊन आधी वाढून घेणं भाग होतं, एक नंबर ए वन झाली होती मिसळ!
कालवण ही जबरी! बाकी सगळं खाऊन माझाच मुडदुश्या झाला होता (कंबर बारिक आणि पोट पुढे)
आम्रखंड रॉक्किंग झालं होतं. मला वाटलं फक्त जि एसच श्रीखंड हॉल ओफ फेमात राहिल पण बिल्वाला तातडीने इंडक्ट करावे लागेल.
फोटो......फोटो टाका जरा.
फोटो......फोटो टाका जरा. (सगळेजन खाऊन सुस्तावलेत वाट्ट
)
Pages