निसर्गाच्या गप्पा (भाग - ८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 May, 2012 - 15:17

'ऋ' किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हरघटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, साजशृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वार्‍यात कुकवणारा, भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू.

ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे.

जैसे ऋतुपतीचे द्वार / वनश्री निरंतर/
वोळगे फळभार / लावण्येसी //

ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे - म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरुन गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्षांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. 'कुणास्तव कुणीतरी' या वेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून-थटून दुसर्‍याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकरूप, एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र, सारी सजीव सृष्टी या वेळी पाहा कशी मुक्त हस्ताने वापरीत आहे.
दुर्गा भागवत - ऋतूचक्र या पुस्तकातील उतारे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संगित मानापमान होणार नाही पण आपण टाकलेल्या फोटोच्या बाबतीत आपले संगित भावबंधन झालेले असते.>>>> वा क्या बात है.....

त्या झाडाचे /फुलाचे /फळाचे नाव वगैरेच्या बाबतीत मात्र माझे कायम "संशयकल्लोळ" असते - संगीत तर लांबच राहिले........;) Wink

ओळखा, लगेच ओळखता येईल. >>> नाही Sad पण प्रचि मस्त आहे Happy
उजु, माधव, दिपकळी आणि दिपकाडी अतिशय सुंदर आहे. Happy

त्या झाडाचे /फुलाचे /फळाचे नाव वगैरेच्या बाबतीत मात्र माझे कायम "संशयकल्लोळ" >>> माझेपण Lol
धागा नि.ग वरुन सं.ग झाला Wink

जागू तुझ्या अंगणात खजीनाच पुरलाय. कसली कसली झाडे आहेत तुझ्याकडे! त्या रेडबर्डच्या फुलाबद्दल धन्यवाद.

कारवारला एका घराच्या अंगणात ही फांदी ठेवलेली होती. बहुतेक कुंपणाकरता आणली असावी. पूर्णपणे वाळली होती. पण त्या पानांचा आकार आणि रंग खूपच आवडला म्हणून फोटो काढले. कोणाला ओळखता येईल का? (मागे दिसणार्‍या हिरव्या पानांशी या पानांचा काही संबंध नाहिये Happy )

जागू करंजा नव्हता वाटत. पाने बरीच मोठी होती - साधारण जंगली बदामाच्या पानांएवढी (थोडी लहान त्यांच्यापेक्षा).

संगित मानापमान होणार नाही पण आपण टाकलेल्या फोटोच्या बाबतीत आपले संगित भावबंधन झालेले असते > +१
झाडाचे /फुलाचे /फळाचे नाव वगैरेच्या बाबतीत मात्र माझे कायम "संशयकल्लोळ" असते > +१ Lol

यंदा भोकर भरमसाठ आले आहे,
आमच्या नगरात दोन तीन झाडाला खुप दिसतात.
मला त्याचे लोणचे फार आवडते.

तो वेल आहे साधनाताई अंगणात आहे आमच्या नाव माहीत नाही आहे याला छान लांब देठाची फुले येतात

जागु तुझा फोटो मी उशीरा पाहिला

फुलाखालच्या फांदीच्या जाड दांड्यावरुन ओळखता येते पपईचे ते. पपई फुलायला लागली काय?

माझ्या एरियात पपई नीट होत नाही. तिच्यावर पांढरे ढेकूण होतात आणि सगळीच वाट लागते. Sad

तो वेल आहे साधनाताई अंगणात नाव माहीत नाही आहे याला छान लांब देठाची फुले येतात

माधवने टाकलेल्या फोटोबद्दल बोलताय का? त्याने तर झाडाची तोडलेली फांदी म्हणुन लिहिलेय.

मोठी करमळ नक्कीच नाही. त्याची पाने दातेरी असतात. कदंब असू शकते पण मी तरी कदंबाच्या वाळलेल्या पानांचा असा मस्त सोनेरी रंग पाहिलेला नाहीये.

मुक्तेश्चर वेल नव्हती हो. एक वाळकी फांदी उभी करून ठेवली होती अंगणात दुसर्‍या एका झाडाला टेकून.

कोणत्याही प्रकारच्या माहिती चे, चालते बोलते एन्सायक्लोपिडिया आहेत दिनेशदा
वादच नाही ..!
हे सोळा आणे खरं आहे !
Happy

त्यामुळे सर्व फोटोग्राफर्सना विनंती - कोणाच्या फोटोला प्रकट दाद देता आली नाही वा या भराभर पोस्टी येतात त्या वाचण्याच्या नादात दाद देण्याची राहून गेली तर कृपया राग मानू नये - सर्व फोटोंना कायमच दाद, अग्रक्रम, कौतुकच - (standing invitation सारखे... standing कौतुकच स्मित स्मित ....)
शशांकजीनी जे वरील मत व्यक्त केलं आहे, त्याला आमचा (आणि आमच्यासारख्याच इतर कार्यंकर्त्यांचा) पुर्ण पाठींबा आहे.
आणि नेहमी standing invitation देखील आहेच आहे.

ए गपा रे. हा काही माझा फॅन क्लब नाही.
-------------

सध्या मुंबईत हवामान कसे आहे. पेपरमधे उकाड्याबद्दल काही खास वाचले नाही. ढग दिसायला लागले का ?
आम्हाला सध्या सूर्यदर्शन दुर्मिळ झालेय. कायम ढगाळच असते हवा.

http://www.lokprabha.com/20120511/smruti.htm -

नादलुब्धा दुर्गाबाई
अंजली कीर्तने
दुर्गाबाई भागवतांच्या दहाव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने ‘ऋतुचक्र’ ते ‘निसर्गोत्सव’ हा त्यांचा लेखनप्रवासातील रूपरसगंधस्पर्शनादमय निसर्गाचं वैभवशाली व्यक्तिमत्त्व जाणून घेण्याचा हा एक ध्यास.

दुर्गा भागवत यांच्या निधनाला दहा र्वष झाली.
७ मे २०१२ हा दुर्गाबाईंचा दहावा स्मृतिदिन. दुर्गाबाई त्यांच्या साहित्याच्या रूपानं आजही मागे राहिल्या आहेत.........पुढे

दुर्गाबाई भागवत यांच्यावर लोकप्रभा मधे वरील लेख आला होता.

मला एक माहिती हवी आहे, कोणाला माहित असल्यास लगेच कळवा.
तीन ते चार दिवसांसाठी सापूतार्याला जायचे असल्यास तेथील हॉटेलची नावे व नंबर कोणाला माहिती आहे का?
आत्ता तेथिल क्लायमेट कसे असेल?
बरोबर दोन चिल्लीपिल्लीपण असतील.

दिनेशदा,
इकडे पुण्यात तरी आज थोडं ढगाळलेल वातावरण आहे,काही भागात पाऊस पडला अशी वार्ता आहे,तसा काल/मागे सातारा भागात खुप पाऊस पडत आहे.

माधव,
ही पाने साधारण आकाराने सागवानच्या झाडासारखी वाटली....

नादलुब्धा दुर्गाबाई - या लेखातील काही भाग -

‘ऋतुचक्र’ ते ‘निसर्गोत्सव’ हा त्यांचा लेखनप्रवास म्हणजे रूपरसगंधस्पर्शनादमय निसर्गाचं वैभवशाली व्यक्तिमत्त्व जाणून घेण्याचा ध्यास होता. दुर्गाबाईंची संवेदनशक्ती अत्यंत तीव्र होती. त्यांच्या डोळ्यांना शतरंगी पोशाख घातलेली फुलपाखरं दिसत. माघातल्या आणि आषाढातल्या पानगळींचा रंगभेद जाणवे. त्यांचं नाक ओल्या जंगलाचा, भाताचा अथवा मातीचा नुस्ता गंध हुंगून सोडून द्यायचं नाही. अमूर्त गंधालादेखील व्यक्तिमत्त्व देण्याचा त्या प्रयत्न करायच्या. गंध कसा? तर स्वच्छंदी, तीव्र, आक्रमक, उद्दीपक आणि स्वेच्छाचारी.

मोनालिप - मनापासून धन्यवाद - या लेखाची लिंक दिल्याबद्दल.

फुलाखालच्या फांदीच्या जाड दांड्यावरुन ओळखता येते पपईचे ते. >>> आमच्या ट्युबा का नाही पेटत देव जाणे Proud

दुर्गाबाईंची निरिक्षणशक्ती जवरदस्त होती. ऋतूचक्र वाचताना हा अनुभव पानोपानी येतो. तरीही ते पुस्तक कुठेही
क्लीष्ट वाटत नाही.

त्यांवे व्यक्तीमत्व पण जबरदस्त होते. आणीबाणी उठल्यावर त्या आमच्या कॉलेजमधे एका कार्यक्रमासाठी
आल्या होत्या. अजूनही त्यांची मूर्ती डोळ्यासमोर आहे.

Pages