निसर्गाच्या गप्पा (भाग - ८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 May, 2012 - 15:17

'ऋ' किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हरघटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, साजशृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वार्‍यात कुकवणारा, भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू.

ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे.

जैसे ऋतुपतीचे द्वार / वनश्री निरंतर/
वोळगे फळभार / लावण्येसी //

ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे - म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरुन गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्षांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. 'कुणास्तव कुणीतरी' या वेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून-थटून दुसर्‍याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकरूप, एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र, सारी सजीव सृष्टी या वेळी पाहा कशी मुक्त हस्ताने वापरीत आहे.
दुर्गा भागवत - ऋतूचक्र या पुस्तकातील उतारे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधना - फारच भारी ब्लॉग आहे या माणसाचा - स्वतः मातीत हात घालून काम करणारा दिसतोय....... माहितीही अफाटच आहे त्याच्याकडे - आता हळुहळू सर्व वाचेन.... धन्स .....

आमच्या अकोल्यात 'आरोग्य नगर' आहे आणि ह्या नगराची खासियत म्हणते गर्द गच्च झाडीच झाडी दिसतात घरे त्यात लपून गेली आहेत. ते दृष्य पाहूनचं कळत इथले आरोग्य चांगले आहे.

शशांक, सूर्यापासून अन्न तयार करायची प्रक्रिया पहिल्यांदा अल्गी (शैवाल) ने सुरु केली आणि आजतागायत
ते आपले अस्तित्व टिकवून आहेत. खरे स्वावलंबी जीव.
डायनोसॉर काय कि मनुष्य काय, त्यांच्यासाठी " आले - गेले " आहेत.

माधव हे पालवीचे कोंब आहेत ना, की हे उमलतात देखील ?

बी, निंबाचा मोहोर असावा आणि चांदणी रात्र असावी... त्याखाली गप्पा मारत, गार वार्‍यांच्या झुळकी अंगावर घेत,
बसून रहावे..

निंबाचा मोहोर >>> काय सुवास असतो याचा - इथे माझ्या ऑफिसात आहे एक झाड - मी वाटच पहात असतो त्याच्या मोहोराची - एकदा मोहरला की काही ना काही कारणाने जात रहातो त्याच्या आसपास आणि अनुभवतो तो सुवास......

दिनेश त्या कळ्या आहेत. फुलल्या की आकार जास्त बदलत नाही फक्त केसर बाहेर येतात. फुलांचा फोटो काढायला नाही जमले.

वॉव आठवा भाग आता पाहाते... सगळ्यानी मस्त मस्त फोटो टाकलेत .. Happy
सब्जाचं झाड मी कधी पाहिलंच नव्हतं. मला वाटायचं की कुठल्याही तुळशीच्या बी ला सब्जा म्हणायच .. Lol

सूर्याची उष्णता वापरून आपले अन्न तयार करायची आणि निव्वळ कार्बन डाय ऑक्साईड व पाणी वापरुन, साखर
तयार करायची झाडांची क्षमता विलक्षण आणि अफाट आहे. हि क्षमता कुठल्याही प्राण्याकडे नाही. आपण
जेमतेम ड जीवनसत्व मिळवू शकतो, बाकी काही नाही !

ही पृथ्वी मानवाच्याच काय, कुठल्याही प्राण्याच्या राहण्याच्या लायकिची करण्यात, वनस्पतींचाच हातभार लागला
आहे, आणि आपण अक्षरशः त्यांच्या मूळावर उठलो आहोत.
>>>>> दिनेशदा, खरंच विचार करायला लावणारं आहे हे.

ही पृथ्वी मानवाच्याच काय, कुठल्याही प्राण्याच्या राहण्याच्या लायकिची करण्यात, वनस्पतींचाच हातभार लागला आहे,>>>>
आणि न राहण्याच्या लायकिची करण्यात मानवाचा हात आहे व चुकून उरलेल्या वनस्पतींवर त्याचा भार आहे.

उजु - किती सुंदर फुल - कुठे दिसले, नाव काय आहे ?

इन मिन तीन - अप्रतिम फोटो - कुठे मिळालं हे ?

उजू अगदी सुंदर आहे फूल. नाव काय त्याचे?

खरे स्वावलंबी जीव. >> दिनेश अगदी. आणि माणूस खरा स्वाहंकारी जीव.

साधना बरोबर म्हणतेय. हे फूल हेलिकोनिया कुळातलेच आहे.
ह्याला दिपकळी म्हणतात असे मला ज्या ऑफिसातून मी फोटो काढला तेथिल माळीबूवांनी सांगीतले होते.

इथे इतक्या भराभर पोस्टी पडतात की आधीच्या पोस्टींवर प्रतिक्रिया देणे अशक्य होऊन बसते. सगळ्यांचे फोटोही इतके अप्रतिम असतत.. पण प्रतिक्रिया देईपर्यंत नविन फोटो आलेले असतात.

दिपकळी - वा काय काव्यमय नाव........ ज्या कोणाला असे काही सुचते त्याला सलाम.....
अमलताश, बहावा, गुलमोहर, शाल्मली, जाई, जुई, निशीगंध - कशी छान छान नावे आहेत........

इथे इतक्या भराभर पोस्टी पडतात की आधीच्या पोस्टींवर प्रतिक्रिया देणे अशक्य होऊन बसते. सगळ्यांचे फोटोही इतके अप्रतिम असतत.. पण प्रतिक्रिया देईपर्यंत नविन फोटो आलेले असतात.>>> अगदी अगदी,
- त्यामुळे सर्व फोटोग्राफर्सना विनंती - कोणाच्या फोटोला प्रकट दाद देता आली नाही वा या भराभर पोस्टी येतात त्या वाचण्याच्या नादात दाद देण्याची राहून गेली तर कृपया राग मानू नये - सर्व फोटोंना कायमच दाद, अग्रक्रम, कौतुकच - (standing invitation सारखे... standing कौतुकच Happy Happy ....)

सुप्रभात.

बापरे भराभर पोस्टी वाचल्या.

काल पनवेल येथिल आयुष रेसॉर्ट मध्ये दुपारी गेलो. बच्चे कंपनी पोहत होती तोपर्यंत मी पुर्ण रेसॉर्टला फेरफटका मारुन झाडे पाहीली. खुप छान आहे. वेगवेगळे पक्षी पिंजर्‍यात आहेत. सिताअशोकची झाडेही भरपुर आहेत. तसेच कांचन, बहावा, पितमोहोर, स्पॅथेडीया, तामणाची झाडेही जागोजागी आहेत. फोटो उद्या टाकते.

आजही मी रजेवर आहे.

वा माधव सुंदर आहे दिपकाडी.

वरचे सगळ्यांचेच फोटो खुप सुंदर आहेत.

माधव तुम्ही टाकलेली फुले माझ्या कुंपणाला आहेत.

शशांक, इथले सगळे गडी एवढे साधे आहेत कि मानापमानाचे प्रयोग इथे होतच नाहीत !!

जिप्सी /माधव दोघांनी टेस्ट केलीय तेव्हा आता मी आल्यावर सगळ्यांना ते माहितीपट घेऊन येतोच.

एरंडाच्या, उंडीच्या बिया एखाद्या काडीत ओवून पेटवल्या तर प्रखर पिवळ्या ज्योतिने जळतात. अंधारात वाट दिसण्या इतपत उजेड असतो तो.

खुप वर्षांपुर्वी केरळ मधे घडणार्‍या कथानकावर एक मालिका बघितली होती. त्यात नारळाच्या हिराचा सैलसर बांधलेला जूडगा, याच कामासाठी वापरला होता.
दुसर्‍या घरी आपण गेलो तर तो जूडगा फुंक मारून विझवायचा आणि परत घरी निघतेवेळी तो जरा जोरात झटकला
कि परत पेटतो. नैसर्गिक टॉर्च.

इथले सगळे गडी एवढे साधे आहेत कि मानापमानाचे प्रयोग इथे होतच नाहीत
अगदी खरे दिनेशदा म्हणुनच तर हा धागा इतका टिकुन आहे, मजबूत आहे.

इन मिन तीन - अप्रतिम फोटो - कुठे मिळालं हे >> शशांकजी , रतनगडला जाताना एक वाट हरिश्चंद्रगडाकडे जाते त्या वाटेवर आहे हे टाके, पाणि अतिशय शीतल आणि गोड त्यात ही वनस्पती उगवली होती, हे निरखने अतिशय सुंदर अनुभव होता Happy

जागू व माधव - खूप सुंदर फुले व सुंदर फोटो....

वेगवेगळे पक्षी पिंजर्‍यात आहेत. >>>>> हा प्रकार मला अजिबात आवडत नाही. कुठल्याही प्राणी - पक्षी यांना बंदिस्त कशाला करायचे - आणि संग्रहालय म्हणून असेल तर ते एवढे मोठे पाहिजे की त्या प्राणी/पक्ष्याला वाटताच कामा नये की आपण बंदिस्त आहोत - इतके नैसर्गिक वातावरण पाहिजे - त्यांची योग्य ती निगापण राखली गेली पाहिजे...

मागे पेशवेपार्कात पाहिले ते ओरँग उटांग ठेवले होते त्यासमोर कच्ची केळी वगैरे ठेवले होते - कसे खाणार ते..... भुकेमुळे बिचारे हात पसरत होते प्रेक्षकांना पाहून - काही मूर्ख प्रेक्षक - बघा कसा माणसारखा भिक मागतोय म्हणून हसत होती... सर्व प्राण्यांचेच असे हालहाल करतात....

आमच्या कंपनीच्या मालकांनी एक अतिशय दुर्मिळ जातीचा घोडा आणला होता (शोपीस म्हणून) - पण काय बडदास्त होती त्याची..... तरी माझा एक व्हेटर्नरी मित्र म्हणत होता की त्याला कंपॅनियन (मेट) नसेल तर लवकर मरेल तो.....

या इतक्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करतील हे संग्रहालयवाले......

(कोणी योग्य प्रकारे प्राणी/पक्षी पाळत असतील त्यांनी कृपया राग मानू नये ही विनंती...)

संगित मानापमान होणार नाही पण आपण टाकलेल्या फोटोच्या बाबतीत आपले संगित भावबंधन झालेले असते. मग तो फोटो इतरांनी बघुन त्याचे कौतुक केले नाही जरासे वाईट वाटते. Happy

Pages