निसर्गाच्या गप्पा (भाग - ८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 May, 2012 - 15:17

'ऋ' किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हरघटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, साजशृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वार्‍यात कुकवणारा, भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू.

ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे.

जैसे ऋतुपतीचे द्वार / वनश्री निरंतर/
वोळगे फळभार / लावण्येसी //

ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे - म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरुन गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्षांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. 'कुणास्तव कुणीतरी' या वेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून-थटून दुसर्‍याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकरूप, एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र, सारी सजीव सृष्टी या वेळी पाहा कशी मुक्त हस्ताने वापरीत आहे.
दुर्गा भागवत - ऋतूचक्र या पुस्तकातील उतारे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकाच विषयावर ७००० पेक्षा जास्त पोस्ट, हा मायबोलीवरचा विक्रम आहे.

हे असेच स्वप्न राहू दे.. राहू दे.

माधव मला त्या झाडाचे नाव माहीत नाही. पण नंतर ह्या फुलांच्या जागी मण्यांसारखी पिवळी फळे धरतात. शोभेसाठी ही झुडपे लावतात. माझ्याकडे आहे हे झुडूप व मला ती फुले खुप आवडतात.

दिनेशदा जोपर्यंत हा निसर्ग आहे आणि आपल्यासारखे निसर्गवेडे आहेत तो पर्यंत ह्या पोस्ट चालूच राहणार.

पण फोटो नाही काढले तर आपण ह्या गोष्टी शेयरही नाही करू शकत. >>>>> यावर जरा वेगळा विचार आहे माझा (कोणाला दुखवायचा हेतू नाही) - समुद्राचे किती फोटो काढून कोणाला दाखवाल हा समुद्र असा विराट, गंभीर, वगैरे , वगैरे - पण प्रत्यक्ष समुद्र पाहिल्यावर त्या फोटो पाहिलेल्या व्यक्तिच्या लक्षात येईल की फोटो काहीच दाखवू शकले नाही यातील एकही गोष्ट........ अखेर अनुभव तो अनुभवच..
फोटो / वर्णन वगैरे औत्सुक्य निर्माण करु शकतील पण अनुभव तो अनुभवच.....
कालच मी बहाव्याची (अमल्ताश) फुले प्रथमच जमिनीवर पडलेली पाहिली - ओळखूही शकलो नाही हातात घेऊनही - अंजूने सांगितले तेव्हा जरा डोक्यात प्रकाश पडला....(जरासाच, सगळा नाही..)... तो पूर्ण वृक्ष पहायचा, जमले तर हात लावायचा....त्याची पाने, फुले, शेंगा, खोड सगळे असेच स्पर्श्,डोळे व वास घेऊन अनुभवायचे - ते ही वेगवेगळ्या ऋतूत - काय काय फोटोत पकडणार ????
आपण सर्व निसर्ग प्रेमी असल्याने शेयर करण्याची ओढ मी समजू शकतो पण त्याच्या मर्यादाही लक्षात घ्यायला हव्या नं ??
फोटो काढायला/ पहायला / शेयर करायला मलाही खूप आवडतातच पण तरीही........

आपण सर्व निसर्ग प्रेमी असल्याने शेयर करण्याची ओढ मी समजू शकतो पण त्याच्या मर्यादाही लक्षात घ्यायला हव्या नं ??
फोटो काढायला/ पहायला / शेयर करायला मलाही खूप आवडतातच पण तरीही......>>>>>>>>>>.शशांकजी, अनुमोदन. Happy

एकाच विषयावर ७००० पेक्षा जास्त पोस्ट, हा मायबोलीवरचा विक्रम आहे. >>>> दिनेशदा - नक्की बघा हं, नाही तर खाद्यपदार्थावरच्या पोस्ट्स जास्त असतील याच्यापेक्षा.....;) Wink

८ व्या भाग आणखी लवकर k पूर्ण करो. Happy

खालील प्रचिमध्ये दिसत आहे, तिचं नांव मला कारवारी कोथिंबीर सांगितलं गेलं. याची पाने चुरडल्यावर कोथिंबीरीसारखाच उग्र वास येतो आणि स्वयंपाकातही कोथिंबीरीऐवजी म्हणून उपयोग केला जातो. मला ही वालावलला दिसली.

कॅमेराचे दु:ख मलाही नाही आहे. सुटीच्या दिवशी टीव्ही न पाहता छान झाडाखाली बसतो , अशोकाची कोवळी पाने, नुकतचे बाळस धरत असेले आवळा, थोडावेळ पेपर वाचन मग निवांत बसतो, छान वाटते

सुटीच्या दिवशी टीव्ही न पाहता छान झाडाखाली बसतो , अशोकाची कोवळी पाने, नुकतचे बाळस धरत असेले आवळा, थोडावेळ पेपर वाचन मग निवांत बसतो, छान वाटते>>>> अरे वा क्या बात है..... खरे भाग्यवान आहात बुवा....

हा घोस लटकलेला जाड खोडाचा वेलही वालावलीच्या जंगलात दिसला. ही करड्या रंगाची जांभळाच्या आकाराची फळे विषारी असावीत हा माझा तर्क खरा ठरला. (स्थानिकाला विचारल्यावर..! ..पण त्याला नांव सांगता आले नाही). कुणी सांगू शकेल??

ओह गोल्डन ड्युरांटा माझ्या परिचयाचे. त्याची फुले इतकी बारीक की मी कधी त्यांना निरखुन पाहिलेही नाही Sad

मलाही कॅमेरा आवडत नाही. कारण सगळे जग त्याच्या डोळ्यातुन पाहण्याची सवय जडते.

पण कॅमेरा नसला तर आपण पुनःप्रत्ययाचा आनंद कसा घेणार? ज्यांना मुळ प्रत्ययच आला नाही त्यांना कसे समजवणार?

मागच्या पानावर कामिनी/कुंतीसदृश्य झाडाचा उल्लेख आलाय. त्याचा फोटोच नसल्याने ते झाड नक्की कसलेय ते कुठे माहित आहे?

मला महोगनीचे झाड पाहायची खुप उत्सुकता आहे कारण हे झाड प्रचंड मोठे असते असे ऐकलेय. इथे आजुबाजुला असेलही पण फोटोशिवाय ओळखणार कसे? नेटवर पाहिले पण पुर्ण फोटो आहेत, जवळुन नाही.

बंडोपंत मत पहिला कुंडीत लावा चांगली वाढली की जमिनीत लावा.

हो शशांक तिच फुले.

हेम ही कोथिंबीर पहिलाच पाहिली.

बंडोपंत मत पहिला कुंडीत लावा चांगली वाढली की जमिनीत लावा.>> तेच तर केले होते चांगले १ दिड फुट मोठे होते झाडं

शशांकजी तुमच म्हणण ९५% पटलं, पण माझे ५% मत थोडं वेगळं आहे. Happy मी आधी निसर्ग अनुभवतो आणि मग फोटो काढतो. ज्यांना काहि कारणास्तव प्रत्यक्ष जाऊन पाहता येणार नाही/अनुभवता येणार नाही त्यांना कदाचित या फोटोतुन थोडातरी आनंद मिळावा हा माझा हेतु असतो. कित्येक फुले/झाडे/पक्षी फोटो पाहिले म्हणुन ओळखु लागलो. नाहीतर आत्तापर्यंत पीतमोहरला बहावा आणि साळुंकीला मैना समजणार्‍यातला मी. Proud

मायबोलीकर "अवल" यांचा माझ्या "गडकोटांचा राजा, महाराष्ट्र माझा" या थीमवरची हि बोलकी प्रतिक्रिया.
"योगेश, तुला किती म्हणून धन्यवाद देऊ ?
माझी आणि त्याहूनही माझ्या आईची (वय ७८) कित्येक वर्षांची इच्छा तू पुर्ण केलीस.
१९७५ मध्ये पुण्यात आल्यापासून जमतील तेव्हढे गड पहायचे असे आम्ही ठरवले होते. पण अनेक अडचणींतून फक्त सिंहगड, कर्नाळ, पन्हाळ, पुरंदर, सज्जनगड, शिवनेरी एवढेच बघू शकलो. शिवाय तेव्हा कॅमेरा नसल्याने तेही किल्ले आटवणी धुसर होउ लागले होते.तुझ्या या फोटोंनी आमच्या सगळ्या इच्छा एकत्रित पुर्ण केल्यास, खरच मनापासून धन्यवाद!" (माझ्यासाठी हा लाखमोलाचा प्रतिसाद आहे. :-))

माझ्याबरोबर इतरांनाही तो निसर्ग (फोटोंच्या रुपात का होईना) अनुभवता यावा आणि मला स्वतःलाही पुनःप्रत्ययाचा आनंद मिळावा हा माझा उद्देश असतो. समुद्राची विशालता, गंभीरता कदाचित फोटोतुन दाखवता येणार नाही पण त्याची एक छबीही पाहुन जर कुणाला आनंद होत असेल तर ते मला जास्त आवडेल. Happy
(अर्थात हेमावैम चुभुद्याघ्या :-))

माझ्याबरोबर इतरांनाही तो निसर्ग (फोटोंच्या रुपात का होईना) अनुभवता यावा आणि मला स्वतःलाही पुनःप्रत्ययाचा आनंद मिळावा हा माझा उद्देश असतो. समुद्राची विशालता, गंभीरता कदाचित फोटोतुन दाखवता येणार नाही पण त्याची एक छबीही पाहुन जर कुणाला आनंद होत असेल तर ते मला जास्त आवडेल. स्मित>>>>>>> हे मात्र जिप्सी एकदम मान्य..... पटेशच...
अवलचा प्रतिसादही खरंचच लाख काय अनमोलच ......

ज्यांना कोणाला एखादी गोष्ट प्रत्यक्ष बघणे शक्य नाही त्यांना फोटोवरच अवलंबून रहावे लागते व तुझ्यासारख्या अव्वल दर्जाचा फोटोग्राफर असला तर "प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट" असाच अनुभव देऊन जातो यात शंकाच नाही............

शासनाने ८ /१० वर्षापुर्वी १०० रु. विक्रीला काढली होती >> 'ज्ञानदेवी' असे नाव होते तिचे. पण भाषा बरीच रुक्ष आहे तिची. ज्ञानेश्वरीतील काव्याचा आढावा आहे तो (प्रस्तावनेत्च तसा उल्लेख केला आहे) त्यामुळे दृष्टांतांची उकल नीट झालीच नाही असे मला वाटले होते. त्यापेक्षा आयडिअलवाल्याला विचारा तो सांगेल कुठली चांगली आहे ते. (मी त्याच्याच सांगण्यावरून श्री.भिडे यांची सटीप आवृत्ती घेतली होती. सुंदर अहे ती)

शशांक फुलाच्या नावाबद्दल धन्यवाद.

अरे वा वर यादीमधे माझेही नाव आले आहे. ध.. ध. धन्स!

वरच्य पुस्तकांच्या यादीमधे दुर्गा भागवतांची 'ऋतुचक्र' हवेच हवे.

हेम - ते कारवारी कोथिंबीरीबद्दल अजून काही कळू शकेल का ? गुगलून काहीही मिळत नाही.
दुसरे ते - करड्या रंगाची जांभळाच्या आकाराची फळे - याचे स्थानिक भाषेतले नाव काय ?

हेम, सध्या तो वसा शांकली कडे दिलाय. कारण आता हाताशी पुस्तके नाहीत माझ्या.

माझे आणि फोटोचे म्हणाल तर मी जे बघितले / अनुभवले त्यातले एक शतांशही फोटो नसल्यामूळे मी तूम्हाला
दाखवू शकत नाही.

यात स्वित्झर्लंड च्या ९ वार्‍या, सिंगापूरच्या ३ वार्‍या, जर्मनी आणि बेल्जीयमची प्रत्येकी एक, दुबईमधली
१ महिनाभर केलेली भटकंती, नायजेरियातील किर्र जंगलातून केलेली भटकंती, ओमानमधले पाच वर्षांचे
वास्तव्य,केनयाच्या किसुमू भागातले ३ वर्षांचे वास्तव्य, किलिमांजारो, युगांडा, सलालाह, हि सगळी ठिकाणे
मनात अजून ताजी आहेत.. पण त्या मनातल्या जागांचे फोटो कसे काढू ?

केनयाच्या किसुमू भागातले ३ वर्षांचे वास्तव्य>>>> दिनेशदा - एवढ्यावरच खरे तर तुम्ही एक पुस्तक लिहू शकाल... पण आमच्याकरता काही तरी लिहाल का इथे ? काही विशेष अनुभव.....

यात स्वित्झर्लंड च्या ९ वार्‍या, सिंगापूरच्या ३ वार्‍या, जर्मनी आणि बेल्जीयमची प्रत्येकी एक, दुबईमधली
१ महिनाभर केलेली भटकंती, नायजेरियातील किर्र जंगलातून केलेली भटकंती, ओमानमधले पाच वर्षांचे
वास्तव्य,केनयाच्या किसुमू भागातले ३ वर्षांचे वास्तव्य, किलिमांजारो, युगांडा, सलालाह, हि सगळी ठिकाणे
मनात अजून ताजी आहेत.. पण त्या मनातल्या जागांचे फोटो कसे काढू ?>>>>>>>>>>दिनेशदा - एवढ्यावरच खरे तर तुम्ही एक पुस्तक लिहू शकाल... पण आमच्याकरता काही तरी लिहाल का इथे ? काही विशेष अनुभव...>>>>>>अगदी अगदी. १००% अनुमोदन. दिनेशदा, एक धागा सुरू करा. त्यात तुमचे अनुभव लिहा. येवढ कराच आमच्या साठी. Happy

अरे बापरे दिनेदा एवड्या वार्‍या ,
आम्ही त बापा देश सोडलाच नाही,
महाराष्ट्र ही पुरा पालथा घातला नाही
छान निसर्गचे वेड तर मलाही आहे.
म्हणुन तर अंगणात बरीच झाडे लावलीत

Pages