निसर्गाच्या गप्पा (भाग - ८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 May, 2012 - 15:17

'ऋ' किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हरघटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, साजशृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वार्‍यात कुकवणारा, भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू.

ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे.

जैसे ऋतुपतीचे द्वार / वनश्री निरंतर/
वोळगे फळभार / लावण्येसी //

ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे - म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरुन गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्षांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. 'कुणास्तव कुणीतरी' या वेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून-थटून दुसर्‍याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकरूप, एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र, सारी सजीव सृष्टी या वेळी पाहा कशी मुक्त हस्ताने वापरीत आहे.
दुर्गा भागवत - ऋतूचक्र या पुस्तकातील उतारे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानुषी चा उल्लेख राहिलाच की... तुझ्या वर्णनावरून नारळ पाहायची उत्सुकता वाढलीये.. मोबाईल वरून तरी काढ फोटो Happy

मानुषी, वेलकम बॅक!

नारळ उतरवण्याची पद्धत मला फार आवडली. धन्यवाद.

माधव, जिवेत शरदः शतम्!

आता मानुषीकडून पुढचा प्रश्न,

नारळाचे काय करता येईल !! Happy

जागू, वाघाटीची भाजी तर तूझ्याकडूनच होती ना ? शिवाय त्याचा वेल असतो. फळे हिरवी असतात.
पक्ष्यांनी खाल्ली आहेत म्हणजे जहाल विषारी नसावीत, थोडेफार विष, ते माती खाऊन पचवू शकतात.

जागू, करवत हे झाड आहे का ते?

शुभेच्छांबद्दल सगळ्यांना धन्यवाद. मला तुमच्या सगळ्यंच्या शुभेच्छांनी खूप मस्त वाटले.

स्निग्धा, सागाची फुलं सुंदरच! मस्त आलाय फोटो! (ही आत्ता कशी काय फुलली? म्हणजे मी समजत होते की साग पावसाळ्यात फुलतो!) >>>>> बरोबर आहे तो फोटो मागच्या ऑगस्ट मधला आहे.
By the way, असंच सागाच फुललेल जंगल मी नेपानगरला पाहील होत, खांडव्याला जाताना.

ईनमीन तीन गोगलगाय मस्तच!
मी नि.ग. वाचायला येइपर्यंत बरीच पाने पुढे लिखाण गेलेले असते. त्यामुळे प्रतिसाद देता येत नाहीत (खूप उशीर झालेला असतो) Uhoh . पण मी सर्व रोज वाचत असते. आणि सर्व आवडते हे वेगळ सांगायला नकोच. Happy

उजु, हि फुले आणि मुंबईतला पाऊस अशा एकत्र आठवणी आहेत माझ्या.
इथे केनयात या फुलांना, फळे पण लागतात >>>>> ती लिली आहे ना? माझ्या आईकडे अशीच गुलाबी रंगाची आणि माझ्याकडे पिवळ्या रंगाची आहे. नेहमी पावसाळ्यातचं फुलते पण गेल्याच आठवड्यात १५ - २० फुलं आली होती आणि आता त्याला फळ (बी) लागली आहेत.

व्वा! गोगल्गाई छान दिसतायत. हल्ली पहायला मिळतच नाहीत. >>>
हल्ली फारच गोगल गायी वाढू लागल्या आहेत. माझ्याकडे गेल्या पावसाळ्यात बारीक कोनीकल शंखाच्या आणि वरच्या फोटो सारख्या साधारण पाऊण ईंची गोगलगाई असंख्य झाल्या होत्या. दुसर्‍या काही ठिकाणी तर ३,४ ईंची गोगलगाई पाहिल्या. त्या सगळ्या झाडांची वाट लावतात, घाण करतात.
आता गोगलगाई कंट्रोल कश्या करायच्या ते पावसाळ्या आधीच पाहिले पाहिजे.

गोगलगायी आता कशालाच जुमानत नाहीत. अगदी कडूनिंबावरही हल्ला करतात त्या.
( आफ्रिकेतल्या अनेक देशांत आणि फ्रांसमधे देखील आवडीने खातात त्या, हा उपाय करायचा का ?)

पानाच्या मळ्यात एकदा का या गोगलगायी झाल्या तर पानाच्या वेलीच्या मुळींवर हल्ला करतात, १-२ दिवसात संपुर्ण वेल पिवळी पडायला चालु होते आणि वाळते, हे मुख्यतः पावसाळ्यात खुप घडतं,यावर उपाय म्हणुन तंबाखुचा भुकटी/पावडर (चुरा) पाण्यावाटे सोडली जाते. (....त्यांना पान चालतं पण तंबाखु चालत नाही ...)

पानाच्या मळ्यात एकदा का या गोगलगायी झाल्या तर पानाच्या वेलीच्या मुळींवर हल्ला करतात, १-२ दिवसात संपुर्ण वेल पिवळी पडायला चालु होते आणि वाळते, हे मुख्यतः पावसाळ्यात खुप घडतं,यावर उपाय म्हणुन तंबाखुचा भुकटी/पावडर (चुरा) पाण्यावाटे सोडली जाते. (....त्यांना पान चालतं पण तंबाखु चालत नाही ...) >>> जो_एस तुम्ही हा उपाय करुन बघा काय फरक पडतो का.

आमच्या ऑफिसमध्ये पावसात मोठ्या मोठ्या भरपूर गोगलगायी येतात. झाडावर-भिंतीवर सगळीकडेच संचार असतो.

वर्षू अगं मदर्स डेचा लेकाने नवा सेल फोन दिलाय. अजून सगळं नाही समजलंय. नाहीतर फोटो काढलाच असता. इतकं छान दृश्य होतं. आणि संपूर्ण एपिसोडच इतका इंटरेस्टिंग होता की गेटबाहेर पोराटोरांची गर्दी झाली होती.
बी धन्यवाद! तशी मी रोमात असतेच!
उजू झगमगीत पिवळा टाबुबिया मिळाला गं!
दिनेशदा झाडं उक्तीच देऊन टाकली. आता भुंडी झाडं बघताना वाईट वाटतय. ७ रु. १ नारळ गेला. (घरी पडून राहून वाया गेला नाही किंवा वाटताना काय होतं असोला(हिरवा नारळ कुणाला द्यायचा म्हणजे किती कटकट घेणारयाला! नाहीतर आपणच सोलत बसा(शरदच्या मदतीने!). म्हणून देऊन टाकले.
आणि हो इनमिनतीन.........गोगलगाय "बूटिफुलच"!

अगदी साधी गोष्ट बघा, छत्रपति शिवाजी महाराज, जर गवताच्या गंजीबाबत सुद्धा जागरुक होते तर ते
गडांवरील वनस्पती, हवामान याबद्दलही तितकेच दक्ष असणार. पण त्या काळात गडांवर कुठल्या वनस्पती
होत्या, याबाबत मी कुठे काही वाचले नाही. सध्या आहे तसे उजाड माळरान नक्कीच नसणार.

महाराज, जिजाबाई आणि राणीवश्यातील स्त्रिया पूजा अर्चा नक्कीच करत होत्या मग त्या पूजेसाठी लागणार्‍या पुष्पे, पत्री यांची काय व्यवस्था असणार ? एका कादंबरीत मी रायगडावरील तलावात, हजारो कमळे असल्याचा उल्लेख वाचला ( तो काल्पनिकच असणार ) सध्या तरी तिथे काही दिसत नाही.>>>>

दिनेशदा, गोनींच्या दुर्गभ्रमण गाथेत पान नं २३ ते पान नं २७ मधे जे लिहिलंय ते वाचल्यानंतर महाराजांच्या तसबिरीकडे बघायची सुद्धा हिंमत होत नाही. माझी कित्येक रात्री झोप उडाली होती......

जागू तू दिलेला फोटो फायकस च्या फळांचा वाटला म्हणून गुगलून बघितलं. Ficus ulmifolia या फळांशी आणि पानांशी साधर्म्य वाटलं. तू पूर्ण झाड बघितलं आहेस, त्यामुळे तुला हे झाड तेच आहे का ते कळेल.

नाही शांकली ती फळे निमुळती आहेत शिवाय पान मुलायम आहेत. तु सांगतेस ती वेगळी आहेत. शिवाय मी दिलेल्या फोटोतील फळांचे घड जवळ आहेत तर लिंक मधली फळे जरा तुटक लागली आहेत.

Mothers day resized.jpg

संयुक्ता मातृदिन २०१२ उपक्रम!

दरवर्षी जगाच्या कानाकोपर्‍यांत मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी 'मदर्स डे' किंवा 'मातृदिन' मोठ्या उत्साहात साजरा होतो. मातृशक्तीला, मातृत्वाला साजरे करण्याचा हा दिवस!

मायबोलीकरांनो, या निमित्ताने संयुक्तातर्फे सुरु केलेल्या खालील धाग्यांवर आपले प्रतिसाद स्वागतार्ह आहेत. हे धागे सर्वांसाठी खुले आहेत. तरी तुम्ही तिथे आपले अनुभव अवश्य मांडावेत यासाठी हे आवाहन!


decorative.gif

आई शाळेत जाते (संयुक्ता मातृदिन २०१२)

आई बिझी आहे (संयुक्ता मातृदिन २०१२)

आईची भूमिका जगतांना (संयुक्ता मातृदिन २०१२)

3. Healing. Plants are also widely known from their abilities to heal people. Present science rationally explains this healing in a chemical manner. But the folk wisdom of various nations believes that plants can also heal in a spiritual manner. For example, in cases of illness or feeling down, New Zealand Maori used to touch healthy trees, to receive from them the strength and life energy. Actually, if we feel down and touch any healthy tree, the powerful flow of life energy can be easily sensed by almost everyone.

http://hosta.20fr.com/index.html या लिंकवर अजून अशाच भन्नाट गोष्टी आहेत.

शशांक, न्यू झीलंडच्या माओरी लोकांचे बहुतेक देव, लाकडातूनच कोरुन काढलेले असतात. तिथली अनेक झाडे
त्यांच्या श्रद्धेचा भाग आहेत.

मी असा विचार करतो, कि प्राणी हे वनस्पतींच्या मानाने खुपच नंतर निर्माण झाले. नव्या सभासदाला
संभाळून घेण्याची, त्याचे दुखलं खुपलं बघायची वनस्पतिंची विचारधारा असावी. हे उपयोग प्राण्यांनी अनुभवातून
शोधले हे जरी खरे असले तरी मूळात तशी रसायने, वनस्पतिंजवळ होतीच.. हेच खरे.

जागु, सहिये रेन शॉवर ट्री.
कूठे पाहिलस हे झाड? आता शोधायलाच हव ह्याला, मला बघायचच आहे. कसली मस्त फूल आहेत.
झाडाची माहिती असेल तर दे.(कधी फूलत , फूलांना गंध असतो का? वगैरे)

Pages