निसर्गाच्या गप्पा (भाग - ८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 May, 2012 - 15:17

'ऋ' किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हरघटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, साजशृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वार्‍यात कुकवणारा, भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू.

ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे.

जैसे ऋतुपतीचे द्वार / वनश्री निरंतर/
वोळगे फळभार / लावण्येसी //

ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे - म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरुन गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्षांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. 'कुणास्तव कुणीतरी' या वेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून-थटून दुसर्‍याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकरूप, एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र, सारी सजीव सृष्टी या वेळी पाहा कशी मुक्त हस्ताने वापरीत आहे.
दुर्गा भागवत - ऋतूचक्र या पुस्तकातील उतारे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही माधव हा अशोक आयुष रेसॉर्ट मधला. सध्या आयुष रेसॉर्ट चे फोटो टाकतेल. एक धागाच नंतर टाकणार आहे.

बी, त्या लिंक्स देणे कितपत कायदेशीर आहे, त्याची कल्पना नाही. पण त्या नावाने शोधलं तर नक्कीच
सापडतील.

शांकली,

रामायण किंवा महाभारत कितपत खरे, किंवा त्यात ज्या स्थळांचा संदर्भ आलाय त्या जागांचा शोध घेत केलेले
माहितीपट देखील आहेत, यू ट्यूबबर.
सर्व धार्मिक आणि भावनिक संदर्भ बाजूला सारून, खरेच असा वेध घेता आला आणि आपल्याला तो स्वीकारता आला, तर किती छान, नाही का ?

नाहीतर आपण सर्वच गुहांना, पांडवलेणी, असे नाव देऊन टाकतो !

उजु, हि फुले आणि मुंबईतला पाऊस अशा एकत्र आठवणी आहेत माझ्या.
इथे केनयात या फुलांना, फळे पण लागतात !

कसल्या धडाधड पोस्टस पडतायत.... बॅकलॉग भरुन काढेपर्यंत धागा अजुन पुढे... Happy Happy

सगळ्यांनी टाकलेले प्रचि बेस्ट.... Happy

थोडसं.. अवांतर..
मध्ये एका नातेवाईकांना लग्नाच्या वाढदिवसाबद्दल २ रोपं दिली... एक पिवळा गुलाब... अन एक अबोली...
इकडे मुद्दाम सांगतेय... कारण जी काही थोडीफार निसर्गाबद्दल आवड, प्रेम निर्माण झालय... त्यात हा धागा, या गप्पांचा मोठ्ठा वाटा आहे... Happy

Happy

जागू, माधव - खरं तर तुम्हाला दोघांनाही माहिती आहेच हे... पण इतर कोणा नवीन मंडळींचा गोंधळ व्हायला नको म्हणून लिहितो आहे -
ती वरील जागूने टाकलेली लालकेशरी फुले - सीता अशोकाची आहेत Saraca asoca
बर्‍याचदा रस्त्याच्या कडेने दिसतात ती उंचच उंच अशोकाची झाडे दिसतात तो फॉल्स अशोक म्हणजेच Polyalthia longifolia, Asopalav किंवा आसूपालव असे गुगल्यावर लक्षात येईलच.....
जागू - फुलांचा फोटो सुरेखच.....

नाहीतर आपण सर्वच गुहांना, पांडवलेणी, असे नाव देऊन टाकतो !>>>>> अगदी खरे दिनेशदा - कुठल्याही पुरातन देवळाला भेट द्यायला गेलात व गावकर्‍यांना विचारले तर लगेच उत्तर येते -"अहो खूप जुने आहे - पांडवांनी एका रात्रीत बांधलंय......"

पद्मजा खुप छान काम केलस. शेवटी प्रत्यक्षात करण्यातही तितकाच आनंद आणि महत्व असत.

माझ्या मते हा निसर्गाच्या गप्पा असा धागा असुन फक्त फुल झाडे याविषयीच जास्त फोटो वा माहीती टाकतात. निसर्गाशी संबंधीत प्राणी नद्या याविषयी चर्चा कमी होते.

मध्ये एका नातेवाईकांना लग्नाच्या वाढदिवसाबद्दल २ रोपं दिली... एक पिवळा गुलाब... अन एक अबोली... >>>> खूपच मस्त व अनोखी भेट - मला स्वतःला भेट म्हणून फुलेच द्यायला व घ्यायला आवडतात (कुठलीही -अगदी रानातली असली तरी किंवा चिमणचारा म्हणून फार नाजुक सुंदर गवत असते ते ही....)

इकडे मुद्दाम सांगतेय... कारण जी काही थोडीफार निसर्गाबद्दल आवड, प्रेम निर्माण झालय... त्यात हा धागा, या गप्पांचा मोठ्ठा वाटा आहे... स्मित - >>>>> आपल्या सगळ्यांना लहानपणापासूनच ही आवड असते - सगळ्या लहान मुलांना अंगणातच जेवायला आवडते - चिऊ-काऊच्या, झाडांच्या संगतीत - बडबडगाणीही तीच आवडतात...... पुढे मोठे झाल्यावर आपण फार शुष्क होऊन जातो (सभ्य भाषेत ...व्यवहारी)

माझ्या मते हा निसर्गाच्या गप्पा असा धागा असुन फक्त फुल झाडे याविषयीच जास्त फोटो वा माहीती टाकतात. निसर्गाशी संबंधीत प्राणी नद्या याविषयी चर्चा कमी होते.>>>>> मुक्तेश्वर - निसर्गसंबंधातली कुठलीही माहिती व फोटो द्या ना - इथे सगळ्यांनाच त्याची आवड आहे...... तुमच्याकडे असल्यास जरुर शेअर करा, काहीच ना नाही.......

दिनेशदा, खरच पाऊस अन् हि फूल! फळ कधी पाहीली नाहित पण.
ह्या फूलांना एक गोडसर अगदी चॉकलेटसारखा वास येतो. मस्त वाटत एकावेळी बरीच फूल येतात तेव्हा ,बघत बसावस वाटत त्या ईटूकल्या फूलांना.

कुलकर्णीजी हे खरे आहे की जास्त गप्पा झाडांवर होतात पण पुर्वीचे धागे जर पाहीलेत तर कमी का होईना पण नद्या व इतर विषयांवर गप्पा झालेल्या आहेत. तसे इथे येणार्‍या बहुतेकांना झाडांविषयी आवड आहे त्यामुळे ह्या गप्पा जास्त चालतात. तुम्हाला इतर घटकांविषयी शेयर करायचे असेल तर स्वागत व आनंदच आहे.

ही फळे कसली आहेत ?

ही त्या झाडावरील पाने.

हाय ऑल ...........सध्या रोमात आहे.
२ दिवसांपूर्वी दोन्ही नारळाच्या झाडांवरचे नारळ उतरवले. एका झाडाचा पहिला बहार. दुसऱ्याचा तिसरा बहार. सगळे मिळून जवळ जवळ १५० नारळ उतरवले. त्या लोकांची नारळ उतरवण्याची सिस्टीम खूप छान आहे.
तीघे येतात. त्यातल्या त्यात "लाइटवेट" वर चढतो...हत्यारासह. मग नारळाच्या लोंगरात(की घोसात?) एक जाडा दोरखंड टाकतात. त्याचं टोक खाली एकजण उभा असतो त्याच्याकडे असतं. मग वर चढलेला "लाइटवेट" घोसाच्या अगदी मुळापासून घोस कोयतीने तोडतो. मग खालचा तो घोस हळूच ओढून खाली घेतो. खाली घतलेले घोस इतके सुंदर टवटवीत दिसतात. सध्या कॅमेरा ठीक नाहीये. नाहीतर मस्त फ़ोटो मिळाले असते.
मग एक टेंपोत हे घेऊन जातात. मी घरच्यासाठी आणि आजूबाजूला वाटण्यासाठी काही ठेऊन घेतले. आता
खोबरं चांगलं जाड आहे आणि नारळाचा साइज जंबो आहे.
बाकी सध्या रातराणी, टाबुबिया, एक्झोरा, तगर, मदनबाण पांढरा, लाल गुलाब(चिनी) फुलला आहे.

जागू मोहाची फळे अशीच दिसतात पण या झाडाची पाने वेगळी वाटताहेत.

शशांक, ओमानमधल्या सलालाह मधे पण अशी लेणी आहेत, आणि त्यालाही पांडवलेणीच म्हणतात.
जैन, बौद्ध असे पंथ जेव्हा निर्माण झाले त्यावेळी त्या धर्माच्या प्रसारासाठी भिक्षु भ्रमंति करत असत. त्यांच्या
निवासासाठी ही लेणी / विहार खोदले गेले. ते साधारणपणे कुणाच्याही घरी वास्तव्य करत नसत.

पुढे या पंथांचा आणि शिवाय महानुभाव पंथांचा प्रभाव वाढू लागला तसा हेमाडपंताने अनेक मंदीरे, अनेक गावात बांधली. पण ती अर्थातच एका रात्रीत नाही... या सगळ्याचे सुंदर विवेचन, कमानकलाकार (आर्किटेक्ट)
फिरोज रानडे, यांच्या इमारत या पुस्तकात आहे.

पुण्यातील शनवार वाडा, ओंकारेश्वर मंदीर याबद्दल पण खुपच रंजक माहिती आहे.
मस्तानी मेल्यावर तिच्या नावाने दरवाजा कसा बांधला ? किंवा शनवारवाड्याला गणेशपट्टी का नाही ?
याची उत्तरे मिळतात त्यात.

मानुषीताई, टॅबूबिया पिवळा,गुलाबी आणि पांढरा अश्या तीन रंगांत असतो.
पण मला पिवळाच जास्त भावतो, फार झळाळता रंग असतो त्याचा.

ती फळे वाघाटीची तर नसावीत ?>>>> जागू - ते एक अर्धवट खाल्लेलं फळ आहे त्या वरील फोटोत - कृपया त्याचा क्लोज अप टाकशील का इथे? तसेच या झाडाच्या फुलाचा वगैरे फोटो आहे का ?

नाही शशांक माझ्याकडे क्लोजअप पण नाही आणि फुलांचाही नाही. पण त्या खाल्लेल्या फळावरूनच मला वाघाटीच्या फळांचा भास झाला.

बंडोपंत अंजीराचा आकार उंबरांसारखा असतो. शिवाय अंजीराची पानेही मोठी आणि त्रिकोणी असतात.

हा!!! दोन दिवसाचा बॅकलॉग.. ९८ प्रतिसाद्...,विविध माहिती वाचून डोक्यात रजिस्टर करताना दम लागला... हुश्श्य!!!
आता बरं वाटतंय... Happy
सर्वात आधी माधव,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
(बिलेटेड)

नक्षीदार नाजुक झुडपं खूपच कमनीय दिसतात..
दिनेश दा चा 'गुरुत्वाकर्षणावरचा पॅरा खूपच रंजक..
आता जुलै मधे जिप्सी चा अनुभव आणी फोटो बघूच .. (अ‍ॅडवांस मधेच वॉव Happy )
बर्‍याचशा झाडांची,फुलाफळांची मराठी नावं समजतायेत.. किती छान!!!

Pages