निसर्गाच्या गप्पा (भाग - ८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 May, 2012 - 15:17

'ऋ' किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हरघटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, साजशृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वार्‍यात कुकवणारा, भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू.

ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे.

जैसे ऋतुपतीचे द्वार / वनश्री निरंतर/
वोळगे फळभार / लावण्येसी //

ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे - म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरुन गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्षांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. 'कुणास्तव कुणीतरी' या वेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून-थटून दुसर्‍याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकरूप, एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र, सारी सजीव सृष्टी या वेळी पाहा कशी मुक्त हस्ताने वापरीत आहे.
दुर्गा भागवत - ऋतूचक्र या पुस्तकातील उतारे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सौंदर्य स्पर्धेतल्या सर्व मुली एका साच्यातल्या, ऑलिंपिक मधले एका खेळातले सर्व खेळाडू एका साच्यातले,
जगातले सर्व मॅकडोनाल्ड एका साच्याचे.....

मॅक्डीचे ठिक आहे हो पण माणसांचे काय?? भारतीय सौदर्यस्पर्धेतल्या मुलीही इतक्या एकमेकांसारख्या दिसतात ... एकदा दादरला टिळक पुलावर मोठे होर्डींग लावलेले आणि तेव्हाच्या आघाडीच्या तारका त्यावर चमकत होत्या, बहुतेक लक्सचे होते. मला एकही बाई ओळखता आली नाही. केस, मेकप, दात, हनुवटी, ओठ सगळ्यांनी एकाच स्पेशॅलिस्टाकडे जाऊन सुबक करु घेतलेले, त्यामुळे सगळ्यांचे सगळॅ सारखेच Happy

जिप्स्या आणि माधव आज मी एक क्लिप पाठवली आहे.
आणि तूला कुठे महाराष्ट्रात खडकांचे थर दिसले का, ते पण लिही.

पनवेलच्या डोंगरांचेही सपाटीकरण चालू आहे. पुर्वी उरणला येताना हिच डोंगरे हिरवगार नेत्रसुख द्यायची. आता सुरुंगामुळे सगळी धुळ पसरलेली दिसते.

हे आमच्या बुलबुलचे नवीन घरटे.

कंबोडिया आणि ईंडोनेशियामधे इथे इतकी हिरवळ बघायला मिळते ना! आणि तीही अगदी शहराच्या मधोमध. असे वाटत नाही आपण शहरात आहोत. कंबोडियामधे तर रबराची उंचच उंच झाडे विपुल प्रमाणात आहेत. ह्यावेळी मी विदर्भात गेलो तर सगळा रखरखाट बघून आपोआप माझ्या मनानी मी इतर देशांशी तुलना केली भारताची. ह्या देशांना निसर्ग प्रसन्न आहे. अधुनमधुन सारखा पाऊस कोसळत असतो. आपल्याकडे पावसाळा ओस जातो. तिथे उन्हाळाही ओलावतो.

बी, तथास्तु म्हणणारी जी कुणी देवता असेल ती या क्षणी निद्रिस्त असावी, पण कमी झाडे, कमी पाऊस म्हणून
आणखी कमी झाडे आणि आणखी कमी पाऊस, असे दुष्टचक्र आहे.

आता जिथे तेलाचे साठे सापडलेत, तिथे एकेकाळी विपुल जीवसृष्टी होती. त्यांच्याच अवशेषाचे तर खनिज तेल झाले.
आज मात्र तिथे रखरखीत वाळवंट आहे !

पण कमी झाडे, कमी पाऊस म्हणून आणखी कमी झाडे आणि आणखी कमी पाऊस, असे दुष्टचक्र आहे.>>>> परवा शांकली सांगत होती की तिचे बॉटनीचे सर म्हणत होते - खूप उष्णतेमुळे झाडे बाष्प कमी बाहेर टाकतात (नैसर्गिकरित्या)... पर्यायाने ग्लोबल वॉर्मिंगमधे हा झाडांचा वाटा लक्षणीय असतो (१५% का असाच काहीसा...)
अमाप वृक्षतोड झाल्यावर अजून काय होणार......
अगदी साधा प्रकार आहे - या रखरखीत उन्हाळ्यातही जिथे वृक्षराजी खूप आहे तिथे बर्‍यापैकी थंडावा भरुन असतो वातावरणात.... तर ज्याठिकाणी वृक्ष नाहीत तिथे जास्त रखरख, जास्त उष्मा..... मागे पुण्यातला तापमानाचा नकाशा कोणी तरी काढलेला पाहण्यात आला - मध्यवस्तीत (जिथे झाडे नाहीत, माणसे व वहानांची वर्दळ खूपच तिथे) तापमान जास्त तर बाहेरील (सबर्ब) बाजूस तापमान कमी.....
मी जिथे रहातो (पदमावती/सहकारनगर) तिथे १९८०च्या सुमारास आम्ही पहिल्यांदी पंखा घेतला, कारण उन्हाळ्यातही इतके वारे असायचे की रात्री दारे-खिडक्या पूर्ण बंद करुन घ्यावी लागत - आणि आता त्याच भागात ए सी शिवाय चालत नाही मंडळींचे...

सूर्याची उष्णता वापरून आपले अन्न तयार करायची आणि निव्वळ कार्बन डाय ऑक्साईड व पाणी वापरुन, साखर
तयार करायची झाडांची क्षमता विलक्षण आणि अफाट आहे. हि क्षमता कुठल्याही प्राण्याकडे नाही. आपण
जेमतेम ड जीवनसत्व मिळवू शकतो, बाकी काही नाही !

ही पृथ्वी मानवाच्याच काय, कुठल्याही प्राण्याच्या राहण्याच्या लायकिची करण्यात, वनस्पतींचाच हातभार लागला
आहे, आणि आपण अक्षरशः त्यांच्या मूळावर उठलो आहोत.

मागे 'सई'ने झाडांच्या बीया मोकळ्या जागेत फेकून त्या रुजवण्याचा एक उपक्रम हाती घेतला होता. नंतर त्याचे काय झाले माहिती नाही.

ही पृथ्वी मानवाच्याच काय, कुठल्याही प्राण्याच्या राहण्याच्या लायकिची करण्यात, वनस्पतींचाच हातभार लागला
आहे, आणि आपण अक्षरशः त्यांच्या मूळावर उठलो आहोत.>>>
खरय दा Sad

बी, सईशी संपर्कात आहे मी अजून. आता ती बाळाला वाढवण्यात रमलीय !

परवा आई फोनवर म्हणाली, मुंबईत जरी हवा गरम असली तरी आमच्या शिवसृस्टी कॉलनीत थंडावा असतो. आम्ही ३५ वर्षांपूर्वी लावलेली झाडे आता चांगलीच फोफावली आहेत. आणि ती सोसायट्यांच्या आवारात असल्याने
तोड करु दिली जात नाही.

ही पृथ्वी मानवाच्याच काय, कुठल्याही प्राण्याच्या राहण्याच्या लायकिची करण्यात, वनस्पतींचाच हातभार लागला
आहे, आणि आपण अक्षरशः त्यांच्या मूळावर उठलो आहोत.
>> खरे आहे.
एक सांगावेसे वाटते की ज्यांचेकडे घर आहे, थोडे आंगण आहे तो १ ना १ झाडं लावतोच, त्यामूळे परिसर चांगला दिसतो, फ्लॅट संस्कॄतीत हे सारे लोप पावत आहे. बोन्साय मधे मजा नाहीच

वाचत आहे.

दिनेशदा, कमी पाण्यात जगु शकतील अशी काही झाडं सुचवु शकाल का? गावाकडे शेतजमीन आहे, पण पाण्याअभावी पाउस चांगला असेल त्याच वर्षी पीक घेता येतं. थोडीफार जमीन पडीक आहे. मी खुप वर्षांपासुन काकांना सांगत आहे की त्या जमिनीवर काही झाडं लावा म्हणुन, परंतु आहे तीच बाभळीची झाडं तोडली गेली आहेत. आता एकदा वडीलांना सांगुन बघते.. साधारण शेताच्या बांधावर आणि एखाद्या पडीक जमीनीच्या तुकड्यात (जमिनीचा पोत वगैरे कळत नाही मला त्यामुळे मला सांगता येणार नाही जमीन नक्की कशी आहे ते) लावता येतील अशी काही झाडं सुचवा ना..

ज्यांच्याकडे वा आजूबाजूला झाड आहेत तिथे रहाणार्‍या सर्व प्राणिमात्रांना झाडांचा फायदाच होतो. खास करुन उन्हाळ्यात जेंव्हा एखादी झुळुक अंगाला स्पर्श करते तेंव्हा कळते झाडे हवीच.

भारतीय सौदर्यस्पर्धेतल्या मुलीही इतक्या एकमेकांसारख्या दिसतात >> हायला कसले बरे वाटले हे वाचून! मला वाटायला लागलेले की मलाच तसे दिसतय.

दिनेश, रात्री बघून कळवतो. ऑफीसमध्ये रीयल प्लेअर नाही टाकता येत Sad

चिमुरी,

सिताफळ, डाळींब, लिंबू अशी काही झाडे कमी पाण्यात तग धरतात.
घायपात, खजूर पण तग धरतात. पण हि पिके आपल्याकडे घेतली जात नाहीत.

सिताफळ, डाळींब, लिंबू अशी काही झाडे कमी पाण्यात तग धरतात.>>> येस्स दिनेशदा..... मला वाटतं बोराची झाडेही अतिशय कमी पाण्यात तग धरतात.......

सिंगापुरमधे कातरलेली सगळी झाडे एकसारखी दिसतात. झाडाझाडांमधला फरक लवकर कळत नाही. आपल्याच तालात वाढणारी झाडे बघायला छान वाटतात वेडीवाकडी. आमच्या बाबांचे क्वार्टर हे कौलारु होते. उन्हाळ्यात सबंध घरच्या घर सावलीत गार व्हायचे कारण १०० वर्ष जुने कडूनिंबाचे झाड होते घराच्या अंगणात. इतका आधार होता ना त्या झाडाचा. घरी पंखे नव्हते. बालपणी खारुताई, निंबोळ्या, मकरसंक्रातीच्या सुमारास कटून अडकलेल्या पतंगा, फांदीला बांधलेले झोके, पाखरांची घरटी ह्यांची मजा काही औरच होती. ती ह्या झाडामुळे आम्हाला अनेक वर्ष लुटता आली. झाडावर चढणे मला सहज अवगत झाले कारण लहानपणीच इतका छान मित्र लाभला. I miss that Neem tree!

आपल्याकडे हि शेती होते का माहीत नाही, पण ड्रॅगन फ्रुट हे पण एका निवडुंगाचेच फळ आहे.

पुर्वी डोंगरे बालामृत ज्या फळापासून करत ती फळे फड्या निवडुंगाची आणि त्यावरच कोचिनेल या खाद्यरंगाचे
किडे पोसले जात.
आपल्याकडचा फड्या निवडुंगच गायब झाल्याने आता हि दोन्ही उत्पादने, बंद पडलीत.

आमच्या बाबांचे क्वार्टर हे कौलारु होते. उन्हाळ्यात सबंध घरच्या घर सावलीत गार व्हायचे कारण १०० वर्ष जुने कडूनिंबाचे झाड होते घराच्या अंगणात. इतका आधार होता ना त्या झाडाचा. घरी पंखे नव्हते. बालपणी खारुताई, निंबोळ्या, मकरसंक्रातीच्या सुमारास कटून अडकलेल्या पतंगा, फांदीला बांधलेले झोके, पाखरांची घरटी ह्यांची मजा काही औरच होती. ती ह्या झाडामुळे आम्हाला अनेक वर्ष लुटता आली. झाडावर चढणे मला सहज अवगत झाले कारण लहानपणीच इतका छान मित्र लाभला.>>>>> वा, बी - हे सगळे वाचूनही खूप आनंद होतोय, झाडाच्या सान्निध्यात सतत असणे यासारखे सुख नाही...... मी ही लहानपणी आजोळी झाडांच्या सान्निध्यातच असायचो व घरीही पेरु, डाळिंब, सीताफळ, आंबा असे वृक्ष असायचेच साथीला.......

धन्यवाद दिनेशदा, शशांक.. खरंतर घरच्यांना कमी पाण्यात वाढणारी झाडं माहिती असणारच. पण त्यांच्या डोक्यात ज्याचं दरवर्षी उत्पन्न मिळतं तेच शेतात लावायचं असलं काहीतरी असतं. असो, सांगुन बघते परत एकदा..

ही पृथ्वी मानवाच्याच काय, कुठल्याही प्राण्याच्या राहण्याच्या लायकिची करण्यात, वनस्पतींचाच हातभार लागला
आहे, >>>>> दिनेशदा - वनस्पतींचे कौतुक करता करता आमच्या सूक्ष्मजीवांना विसरु नका हं ....... त्यांच्याशिवाय पृथ्वीवर "जीवनच" राहू शकत नाही हो... (मी स्वतः सूक्ष्मजीव शास्त्राचा विद्यार्थी आहे ना....;) ;-))

आमच्याकडच्या ह्या कडूनिंबाची एक गम्मत म्हणजे त्याचे खोड ढेबरे होते. त्याचा ढेबर्‍या पोटावर पाय ठेवून आम्ही सहज वर चढायचो. आई कधीकधी शेणाच्या गोवर्‍या त्याच खोडावर थापायची. बाबा स्नान करुन आले की ओला टॉवेल त्याच ढेबर्‍या खोडावर वाळत घालायचे. बहिण अंगण झाडाताना खाली ठेवलेल्या किरकोळ वस्तू पण ह्याच खोडावर ठेवायची. आत्या तिची साडी सुकवण्यासाठी साडीचे एक टोक खोडाच्या खपलीला अडकवून त्याचा उपयोग खिळ्यासारखा करायची. घरात डास झाले की कडूनिंबाच्या पानांचा दाट दुर माझा भाउ करत असे. डास पळून जात नसत पण आम्हीच मग घराबाहेर नाक दाबून पळून जायचो. काका ऊन ऊन पाण्यात कडूनिंबाची पाने टाकून ते पाणी स्नानाला वापरायचे. बहिणीच्या मुलांना जंत झाले होते तेव्हा कडूनिंबाच्या पानांचा घट्ट गार हिरवा रस नाक दाबून तिने तिच्या पोरांना पाजला होता. खूप काही आठवते आता. खरच वृक्षवल्ली सोयरेचं असतात.

माधव - हे कॅक्टस किती छान आहे, पहिल्यांदाच पाहिले....... गुलाबी पक्षी बसल्यासारखे वाटतात अगदी......

पुर्वी डोंगरे बालामृत ज्या फळापासून करत ती फळे फड्या निवडुंगाची आणि त्यावरच कोचिनेल या खाद्यरंगाचे
किडे पोसले जात.>>>>>> दिनेशदा - तुम्हाला माहित नाही असा एक तरी विषय आहे का?????? कम्माल आहे बुवा तुमची - कुठली कुठली माहिती असते तुम्हाला - या विविध झाडे, पाने, फुले आणि त्यांच्यापासून केलेल्या विविध उत्पादनांची........... वेगवेगळे प्रदेश - तिथले प्राणीसृष्टी, वनस्पतीसृष्टी..... हॅट्स ऑफ.....
बाकी खाद्यपदार्थ व संगीत तर विचारायलाच नको......

.. कमाल आहे तुमची खरच..
कोणत्याही प्रकारच्या माहिती चे, चालते बोलते एन्सायक्लोपिडिया आहेत दिनेश दा Happy

पण त्यांच्या डोक्यात ज्याचं दरवर्षी उत्पन्न मिळतं तेच शेतात लावायचं असलं काहीतरी असतं.

http://sundayfarmer.wordpress.com/

ह्या ब्लॉगवर शोध. या मणसाने पडिक जमिनीवर त्याने काय लावले याबद्दलही लिहिलेय.

एक सांगावेसे वाटते की ज्यांचेकडे घर आहे, थोडे आंगण आहे तो १ ना १ झाडं लावतोच, त्यामूळे परिसर चांगला दिसतो, फ्लॅट संस्कॄतीत हे सारे लोप पावत आहे. बोन्साय मधे मजा नाहीच>>>>बंडोपंत +१

बी, मस्तच Happy
कडुलिंब म्हणजे कल्पवृक्षच जणु. Happy

Pages