पुण्यात मायबोलीकरांशी भेट

Submitted by समीर on 5 April, 2012 - 00:04
ठिकाण/पत्ता: 
सध्या तरी मल्टिस्पाईस. 46/2, Opp Siddhi Gardens, Off Mhatre Bridge, Karve Nagar, Pune - 411052

****
मी २१ एप्रीलला पुण्यात असणार आहे. तेव्हा संध्याकाळी मायबोलीकरांना भेटण्याची इच्छा आहे. तुम्हाला ही तारीख्/वेळ जमत असेल तर या धाग्यावर कृपया नाव नोंदणी करा.

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, April 21, 2012 - 09:00 to 12:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पग्या... अश्या आतल्या गोष्टी सरळ सरळ उघड करायच्या नसतात हे तुला कधी कळणार रे..... Happy

वृत्तांत जबरी लिहिला आहेस... उशिरा फोन करायला पाहिजे होता म्हणजे निदान बडीशेप खायच्या निमित्ताने तरी भेटता आले असते.. पण अ‍ॅडमिननी गटगवेळ ९ पर्यंतच ठेवली होती त्यामुळे फोन केला नाही...

पण अ‍ॅडमिननी गटगवेळ ९ पर्यंतच ठेवली होती>>> अ‍ॅडमीनने अब्बीतक हम पुणेकर्सको ओळख्याच नही .. Happy
पराग.. मस्त रे.. एकदम सही लिहले आहेस..:)

अ‍ॅडमिन अत्यंत शांत स्वभावाचे आहेत (असं वाटलं). आसपासची इतकी वचवच ऐकूनही ते शांतपणे जेवत होते >>>> अ‍ॅडमिन हे संतपदाला पोचलेले आहेत ह्याचा आम्हाला १० वर्षांपूर्वीच लागलेला शोध आता सिद्ध झाला आहे. Proud

मी फक्त गंमतीच सांगितल्या.. तिच्याकडे "जमती" ही होत्या. >>> "अ‍ॅडमिन" आयडीचा "अ‍ॅडलिंबू">>> :d धम्माल वृत्तांत

अ‍ॅडमिन हे संतपदाला पोचलेले आहेत ह्याचा आम्हाला १० वर्षांपूर्वीच लागलेला शोध आता सिद्ध झाला आहे.<<
हो हो शैल्याच्या घरी एका गटगमधे त्याचे संत एस्व्हिएस असे नामकरण करण्यात आले होते आणि तेव्हा नुकतंच लग्न करून तो सुप्रियासह उसगावात परतला होता.. म्हणजे बघ! Wink

मित्रांनो विशेषतः समीर ,
मी माफी मागतो की येतो म्हणूनही आपल्याला भेटता आले नाही.
कारण जरा वेगळे आहे. मी वीरु आणि केपीची मारधाड बॅटींग पहाता पहाता निघालो तेही विमाननगरहून मल्टीस्पाईसला पोहचलो तर तिथे कोणीच नव्हते. सिक्युरिटी गार्डने हार्वेस्टला पहा म्हणून सुचवले पण तिथला माहौल पाहून इथे गप्पा मारणे शक्य नाही असे वाटून मी काय झाले असावे असे विचार करत परतलो.
शिवाय आपल्या पैकी कोणाचा मो नंबर ही उपलब्ध नव्हता नाही तर विचारणा करून नव्या जागी येता आले असते. असो,
आपल्या सर्व मित्रांशी ओळख करून घ्यायला आवडले असते. पुढील वेळी अशा स्नेह मेळाव्याच्या आयोजकांचा फोन मो नंबर मिळाला तर अशी गैरसोय होणार नाही असे सुचवावेसे वाचते.

थोडं उशीराच लिहित आहे त्याबद्दल क्षमस्व. पण गोव्यात आल्यावर जरा वैयक्तिक कामात अडकलो होतो. खूप धमाल आली शनीवारी. मस्त संयोजन. सर्व कार्याध्यक्षांची कार्यक्षमता दिसून आली Happy फारेंड म्हणाला तसं एकदम मेगा गटग होतं. बर्‍याच सदस्यांना आधी भेटलो होतो. उरलेल्या काही आयडीनां चेहरे मिळाले Happy

वरदा: "आसपासची इतकी वचवच ऐकूनही ते शांतपणे जेवत होते." हे वाक्य एकदम लोडेड आहे. कोणीच त्याचा फायदा अजून घेतला नाही म्हणून आभार Wink

ललिता-प्रिती - ठाण्यातदेखील गेल्या वर्षी चॉकलेट्स आणली होती की. 'जोशी' वड्यांमुळे तुझ्या लक्षात नसेल Happy

नी... Lol

व्वा! मस्त आहेत फोटो Happy

शेवटचा फोटू एपिक! एक विशिष्ट व्यक्ती नाटकातलं स्वगत सादर करतीये.. शेजारची व्यक्ती आवंढा गिळतीये. आणि समोरच्या व्यक्ती 'ऑमार मॉरॉठी शॉम्जॉत नॉय.' म्हणून मान फिरवतायत

आजचा सवालः- ती व्यक्ती नक्की कोणाशी आणि नक्की काय बोलत होती??
आपली उत्तरं 34043 वर पाठवून द्या. Proud Light 1

अ‍ॅडमिन साऽब.. ते कावेरी नव्हे, कलिंगा हो Happy

ती व्यक्ती फोटोत दिसत नसलेल्या अ‍ॅडमिनना 'पोस्टखाली सिग्नेचर सुविधा पुन्हा सुरू करा, आणि तुमची स्वतःची सिग्नेचर "झालं समाधान??!!" अशी ठेवा'- अशी सूचना करत होती. Proud

Pages