पुण्यात मायबोलीकरांशी भेट

Submitted by समीर on 5 April, 2012 - 00:04
ठिकाण/पत्ता: 
सध्या तरी मल्टिस्पाईस. 46/2, Opp Siddhi Gardens, Off Mhatre Bridge, Karve Nagar, Pune - 411052

****
मी २१ एप्रीलला पुण्यात असणार आहे. तेव्हा संध्याकाळी मायबोलीकरांना भेटण्याची इच्छा आहे. तुम्हाला ही तारीख्/वेळ जमत असेल तर या धाग्यावर कृपया नाव नोंदणी करा.

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, April 21, 2012 - 09:00 to 12:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> मास्तुरेंचे व्यक्तीमत्व आणी वागणे एकदम मनमोकळे आहे..

Happy

मी तर तुमच्याशी मारामारीच्या तयारीने आलो होतो. पण तुमचे बलाढ्य व्यक्तिमत्व बघून घाबरलो आणि मनमोकळेपणाने वागण्याचे नाटक केले. Lol

असो. प्रथमच बहुतेकांना भेटल्यामुळे आनंद झाला.

>>> बाकी बर्‍याच गोंधळानंतर अ‍ॅडमीनना वडापाव ऐवजी जेवण दिले याबद्दल समस्त पुणेकरांचे कौतुक <<<<< Lol Lol Lol
"जोशी" वडापाव असे लिहिले नाहीस ते? Wink

फारेंड, बेफिकीर Lol मस्तच.

(फक्त एक दुरुस्ती. 'भारतातले अ‍ॅडमिन' असा काही प्रकार अधिकृतरीत्या अस्तित्वात नाही. इतरांचाही गैरसमज होऊ नये म्हणून ही टीप.)

अनेक वैशिष्ट्यांनी युक्त असं गटग होतं हे. फारेंडाने लिहिल्याप्रमाणे चार ठिकाणी झालेले हे असे एकमेव एक्स्प्रेस गटग असेल. (थोडा किंवा संपूर्ण वेळ) हजेरी लावलेले मायबोलीकर खालीलप्रमाणे-
समीर, लिंबुटिंबु (लिंबीसह), मास्तुरे, मिल्या, पूनम (नचिकेतसह), चिनूक्स, साजिरा, अर्भाट, आशूडी, शैलजा, संघमित्रा, राम, कैवल्य, फारेंड, वरदा (श्री वरदासह), मयूरेश, रूमा (निहिरासह), बेफिकीर, आशूतोष ०७११ (पत्नी व लेकीसह), नीधप, पराग, अरुण, ऋयाम, श्यामली, केदार.
(कोण राहिलं का ते बघा प्लीज. दुरुस्त करतो.)
लिंबु, कृपया वृत्तांत लिही. Happy

राम, हो. बरेच आणि फारच तरुण आहेत अ‍ॅडमिन तुझ्यापेक्षा. Proud

रामकाका, माझा अनुल्लेख???
आपण एकतर सगळे 'मायूस' गटातले आणि तरी गद्दारी? Wink

या गटगचे गाणे म्हणून 'आज इथं तर उद्या तिथं' च्या चालीवर 'आत्ता हितं तर नंतर तिथं!' असं गाणं तयार करता येईल. किंवा हाटेलात 'जागा देता का जागा' असं एक बेलवलकरी स्वगत ठोकता येईल Wink

लिंब्या, तांदळाबद्दल धन्यवाद. लवकरच उपयोग करून मग रिपोर्ट देण्यात येईल. बादवे तू नंतर मागणीप्रमाणे विकणारेस का तांदूळ हा?

आम्ही त्या तांदुळाचा भात करून खाल्ला.

मी, यशःश्री (कधी भात न खाणारी ), बाबा या सर्वांनी ढेकरा दिल्यानंतर शेजारी वाटप केले. पण उरलेल्या भाताचे काय करायचे यावर एकमत होईना! मग आज सकाळी फोडणीचा बात करण्यासाठी थोडा वेगळा काढून ठेवला. मग उरलेला भात घेऊन मी रात्री बाहेर पडलो. कलिंगा उपहारगृहाबाहेर जागा न मिळालेले असे अनेक असंतुष्ट माबोबाह्य नागरीक आता आत घुसून तोडफोड करणार हे समजताच मी प्रत्येकाला भरपूर भात दिला. त्यांनी वाहवा चा जयघोष केला. आता उरलेला भात मी ऑफीसमध्ये घेऊन आलो आहे. बघतो आता काय करायचे.

(दिवा)

नीरजा : तुझा आवाज (नेहमीपेक्षा) बारीक होता तुझा घसा सुकला असल्याने (पोरांना शिकवुन शिकवुन.. गै. नसावा Happy ) त्यामुळे लोक तू होतीस हे विसरली असावित Happy

"जोशी" वडापाव असे लिहिले नाहीस ते? >>> अ‍ॅडमिनला 'जोशी' नावाची गेल्या बारा वर्षांपासून अ‍ॅलर्जी आहे Happy

फारेंडा वृत्तांत मस्त

माझा आवाज कमी होता? तू मिल्याचा तोतया नव्हेस ना? माझ्या शेजारी बसून तुला असं म्हणवतंच कसं.. Proud

अ‍ॅडमिनला 'जोशी' नावाची गेल्या बारा वर्षांपासून अ‍ॅलर्जी आहे<<< मिल्या आता मुंबईबाहेरच्या प्रांती जाताना आयुष्यभर जपून रहा काय. Wink

नीतै.. अनुल्लेख नाही एक वेगळा निषेधाचा धागा काढायचा आहे ना मायुस लोकांचा.. Happy
लिंब्या.. त्यादिवशी नाही मिळाला रे तो वडापाव.. नाहीतर मी खायच्या पुर्ण तयारीनेच आलो होतो.. Happy
साजीरा.. आपल्यापेक्षा तरुण म्हण रे..:P
मास्तुरे.. Proud

एक वेगळा निषेधाचा धागा काढायचा आहे ना मायुस लोकांचा.. <<<
ओये मायूस लोकांचा कशाला निषेध. मायूस करणार्‍यांचा निषेध करायचाय. उदा टिंब सर

मायबाप अ‍ॅडमिन मुंबईच्या गरीब जनतेवर कृपादृष्टी टाकणार की नाही?>> माझाही सेम प्रश्न मामी!! :)(त्यानिमित्ताने मामीची भेटही होईल Proud )

१. नॉन व्हेज राईस हा एक वाक्प्रचार सारखा ऐकू येत होता. त्याचे संस्प कोणीतरी द्यावे.
२. कलिंगा मधे जाऊ म्हंटल्यावर अरभाटने वरदाला हे रेस्टॉ असून त्याचा ओरिसातील एखाद्या उत्खननाशी संबंध नाही हे क्लिअर केले (ओरिसा चा कलिंगाशी संबंध नसला तर तो माबुदोस)
३. कलिंगा हे व्याकरणदृष्ट्या चुकीचे नाव (संबोधन?) असले तरी तेथे त्याबद्दल काही चिकित्सक लोकांमधे चर्चा झाल्याचे ऐकिवात नाही.
४. वरचे फवारे (नीधप च्या भाषेत "आंघोळ") काही लोकांना हवे होते तर काहींना नाही.
५. केळीच्या पानावर हाका नूडल्स घेतल्याचे अभूतपूर्व दृष्य काही लोकांना दिसले असेल. उरलेले पार्सल करायला सांगितल्यावर बराच वेळ झाला तरी वेटर व नूड्ल्स काही दिसले नाहीत. आशा आहे की त्या हॉटेलात नंतर बराच वेळ कोणी हाका नूड्ल्स ऑर्डर केली नसतील.
६. गजांतलक्ष्मी (की गजांत्कलक्ष्मी?) केदारने न ओळखल्याने त्याची माबोइतिहासमहर्षी पदवी सध्या धोक्यात आहे.
७. आशूने त्यातील हत्तीची दिशा आतल्याआत कशी बदलली ते गूढ अजूनही आहे.
८. काही अपरिहार्य कारणाने कलिंगा मधली चायनीज सूप्स यापुढे खाल्ली जाणार नाहीत. मेनू बदलेपर्यंत तरी.
९. वरच्या फवार्‍यांत अत्तर टाकले आहे का अशी कोणालातरी शंका आली. पण त्यात 'मोहब्बत की बू' नव्हती, त्यामुळे नसावे.
१०. अ‍ॅडमिनना हा सल्ला देण्यात आलेला आहे की यापुढे जर कोणी आपला आयडी डिलीट करण्यासाठी विपु किंवा मेल केली तर आउट ऑफ ऑफिस रिप्लाय सारखा एक ऑडिओ मेसेज कोणातरी नामांकित व्हिलनच्या आवाजात रेकॉर्ड करून ऐकवण्यात यावा "तुम यहॉ आ तो गये अपनी मर्जी से, लेकिन जाओगे हमारी मर्जी से" Happy

हा आमचा पुरवणी वृ Happy

बेफी, अहो, भातही क्रमशः खाता येतो की. एकाच फटक्यात दीर्घ कादंबरी संपवल्यासारखा का शिजवलात? Proud Light 1

>>> केळीच्या पानावर हाका नूडल्स घेतल्याचे अभूतपूर्व दृष्य काही लोकांना दिसले असेल. >>> Lol

>नामांकित व्हिलनच्या आवाजात रेकॉर्ड करून ऐकवण्यात यावा "तुम यहॉ आ तो गये अपनी मर्जी से, लेकिन जाओगे हमारी मर्जी से" >> Lol

अमोल, तुला अधिकृत वृत्तांतलेखक म्हणून पदवी द्यायला हरकत नाही. मस्त लिहितोस. Happy
लिही अजून, नंतरचे गटग मिसले आहे, ते तुझ्या लिखाणातून तरी कळूदेत.

Happy

Pages