Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Knowing — and learning to
Knowing — and learning to read in — a foreign tongue heightens and complicates my relationship to sentences.>>>१००%
खूप सुंदर चर्चा.. मेधा म्हणतेय ते पटलं तरी हि एक बाजू वाटली.. कारण सध्या night and day - virginia woolf वाचते आहे.. ठीक आहे स्थळ,काळ, संस्कृती अगदीच माहिती नसली/थोडी तोंड ओळख असून सुद्धा कधी तरी वाटतच का वाचतेय ..हे पुस्तक विशेष लांबलचक वाक्यांनी भरलं आहे.. नाट्यसंगीतात जसं ते आआं किवा तेच वाक्य परत म्हणत राहतात तसं ..छोटी गोष्ट सांगायला पूर्ण १ पान.. लहानपणी sense and sensibility वगैरे खूप वाचलंय वाचताना डिक्शनरी लागायची आत्ता बाजूला नसली तरी चालते.. पण हे मोठ्ठाले वाक्य वाचताना डोकं भंजाळून जातं.. म्हणजे मराठी वाचताना परत वाचावं लागत नाही.. पहिल्यांदाच एकदम मजा येते वाचताना, तसं इथे होत नाही.. ती सहजता, तो आनंद नाहीये.. परत वाचल्यावर किवा एकूण उतार्याचा अर्थ कळला कि वाटत वॉव .. काय सुंदर लिहिलंय ..गोष्ट पुढे सरकत राहते त्यातला आनंद असतो पण हे वाक्यातलं अडकणं नको वाटतं
त्या इंग्रजीत (अधिक लक्ष देऊन वाचल्यामुळे) जास्त प्रमाणावर जाणवतात का?>> त्यामुळे हे मला तरी खूप जाणवतं काही क्लासिक/ फिलोसोफिकल पुस्तक वाचताना ..
शेवटी मी एक नॉव्हेल ज्याची भाषा सोपी असेल किवा ग्रीप सुटणार नाही असं पुस्तक वाचते दुसरं क्लासिक उचलायच्या आधी
नंदन (नेहमीच छान असतात तरी हि
नंदन (नेहमीच छान असतात तरी हि ) लिंक्स छान आहेत
http://learning.blogs.nytimes
http://learning.blogs.nytimes.com/2011/02/22/do-you-write-in-your-books/
तुम्ही लिहिता का पुस्तकाच्या समासात ? ओळी अधोरेखित करता का ?
मारुती चितमपल्ली यांची
मारुती चितमपल्ली यांची पुस्तके इबुक स्वरूपात उपलब्ध आहेत का? असल्यास लिंक द्यावी .पेड /फ्री
धन्यवाद, प्रित @मेधा - लेख
धन्यवाद, प्रित
@मेधा - लेख आवडला. त्यात म्हटल्याप्रमाणे पूर्वी पुस्तकावर काही लिहू नये, हा दंडक पाळायचो. शालेय अभ्यासक्रमात असलेल्या दिवाकरांच्या नाट्यछटेपासून ते घरी/शिक्षकांनी घालून दिलेल्या नियमाचा परिणाम. पण गेल्या काही वर्षांत - विशेषतः जुन्या इंग्रजी पुस्तकांच्या बाबतीत - तो शिथील केला आहे. एखादं वाक्य वाचताना आठवलेला वेगळाच संदर्भ, किंवा कथानकाच्या रचनेतलं एखादं लक्षात आलेलं वैशिष्ट्य जर लगेच समासात नोंदवून ठेवलं - तर पुनर्वाचनात म्हणा किंवा मोठी कादंबरी असेल तर दोन-अडीचशे पानांपूर्वी काय घडलं होतं हे पुन्हा मागे येऊन पाहताना - नक्कीच फायदा होतो.
मेधा छान आहे तो लेख. मी
मेधा छान आहे तो लेख. मी कॉलेजात असताना अभ्यासाच्या पुस्तकांवर बरेच लिहून ठेवायचो - परीक्षेच्या वेळेस उजळणी करायला उपयोगी पडायचे ते. पण इतर पुस्तके मात्र मला कोरीच ठेवायला आणि वाचायला आवडतात. वाचन हा माझ्याकरता एक्स्लुसीव अनुभव असतो मग वाचताना मधेच थांबून काहीतरी लिहायचे आणि वाचनाच्या अनुभवात खंड पाडायचा हे जमतच नाही. दुसरे म्हणजे 'कोरे पुस्तक' हा जिव्हाळ्याचा विषय. पूर्वी तर नविन पुस्तक आणले की ते उघडून त्याचा 'कोरा गंध' मनसोक्त श्वासात भरून घ्यायला आवडायचा आणि प्रत्येक वाचनात त्या पानांचा करकरीत स्पर्श हा पण त्या वाचनाच्या अनुभवाचा एक भाग असतो माझ्याकरता. पण वर नंदनचा मुद्दा पण बरोबर आहे.
मातोश्रींना पुस्तकात खाणाखुणा
मातोश्रींना पुस्तकात खाणाखुणा करण्याची, प्रतिक्रिया लिहिण्याची जबरी सवय. माझ्याकडल्या पुस्तकांवर खाणाखुणा केल्यास मी फार कटकट करत असे. पण आता कधी कधी तीच पुस्तके चाळताना तिच्या कमेंटस वाचताना मजा येते. या वाक्यांवर ती थबकली असेल, तो परिच्छेद वाचून खुदकन हसली असेल असे वाटत रहाते.
त्यामुळे मी तिला कटकट करत नाही. कामानिमित्ताने वाचन असलं तर त्यात कधी कधी वाक्यं अधोरेखित करते. समासात लिहिणे वगैरे कधीच नाही.
शोनू, मजेशीर लेख. मी कद्धीच
शोनू, मजेशीर लेख. मी कद्धीच नाही लिहीत पुस्तकांवर. (नाव घालायलाही आवडत नाही खरंतर, पण नाव न घालता लोकांना दिलेली पुस्तकं 'परतोनि पाहत' नाहीत असा अनेकदा अनुभव आल्याने आता घालते. :P)
त्यावरून आठवलं, किंडलवरही नोट्स लिहायची सोय आहे.
>> या वाक्यांवर ती थबकली असेल, तो परिच्छेद वाचून खुदकन हसली असेल असे वाटत रहाते.

लोकहो, महेश येलकुंचवार
लोकहो, महेश येलकुंचवार ह्यांच्या लेखनावर कुठे चर्चा झाली आहे का? शोधले तर काही येत नाहिये.
या वाक्यांवर ती थबकली असेल,
या वाक्यांवर ती थबकली असेल, तो परिच्छेद वाचून खुदकन हसली असेल असे वाटत रहाते.<< किती गोड!
मेधा/नंदन- पोस्टी मस्त.
मेधा/नंदन- पोस्टी मस्त.
सुनिधी, एलकुंचवारांवर चर्चा
सुनिधी,
एलकुंचवारांवर चर्चा झालीच नाहीये. आठवत तरी नाहीये. पण जुन्या जाणत्यांना विचार एकदा. त्यांनी २००० साली त्यावर चर्चा केली असल्यास..

जून महिन्यात घेणार आहे वाचायला नीट व्यवस्थित. कोणी कंपनी देणार का?
जून महिन्यात घेणार आहे
जून महिन्यात घेणार आहे वाचायला नीट व्यवस्थित.>>> त्यांचं 'मौनराग' वाच'च'!
जून महिन्यात घेणार आहे
जून महिन्यात घेणार आहे वाचायला नीट व्यवस्थित.>>> मी सद्ध्या एलकुंचवारांचं 'वासनाकांड' वाचतोय, पुस्तक अंगावर येणं म्हणजे काय असतं त्याचा मुर्तीमंत अनुभव
सॉलीड आहे.....
एका अतिबुद्धिमान मुलाला अगदी
एका अतिबुद्धिमान मुलाला अगदी जन्मल्यापासून आईवदिलांचे जे प्रेम सहज मिळायला हवे ते न मिळाल्यामुळे,

उलट त्याच्यावर तो मतिमंद आहे असा शिक्का त्यांनी मारल्यामुळे, त्याचा जो कोंडमारा झाला त्यातून त्याला बाहेर काढून त्याला त्याच्या स्वत्त्वाची ओळख करून देणार्या प्रयोगाची ही ह्रदयस्पर्शी कथा.
एक शोध स्वतःचा
मूळ लेखिका - व्हर्जिनिया एम. अॅक्सलिन
स्वैर अनुवाद - डॉ. म. अ. मेहेंदळे, डॉ. संजय ओक.
डॉ. संजय ओक छान लिहितात त्यांचे आणखी लेख इथे वाचता येतील.
http://www.sanjayoak.com/Artical1.htm
जी.ए.कुलकर्णी आणि ग्रेस ~ दोन
जी.ए.कुलकर्णी आणि ग्रेस
~ दोन अशी नावे की जी उच्चारताच मराठी वाचक कुठेही असला तरी क्षणभर स्वतःचे अस्तित्वच विसरतो आणि त्या दोघांच्या शब्दसामर्थ्याच्या गुहेत डोकावण्यास उत्सुक असतो. परवा 'ग्रेस' दिक्कालापलिकडे निघून गेले आणि मग त्यांच्या स्मरणार्थ इथल्या सदस्यांनी वाहिलेली श्रद्धासुमने वाचताना त्या दोघांच्या पत्रव्यवहाराची आठवण झाली. सुदैवाने जी.ए.नी ग्रेस [आणि डॉ.मिथिला...ग्रेसकन्या] ना लिहिलेल्या पत्रांचा संग्रह पॉप्युलरने काढला : नाव "जीएंची पत्रवेळा...". यात भटकळांनी खंत व्यक्त केली की ग्रेस यानी जीएंना लिहिलेल्या पत्रांचा समावेश करता आला नाही. त्यामागील कारण अर्थातच खाजगी. पण जीएकडून ग्रेसना....हा वाचन आनंद घ्यायचा असेल तर या दोघांवर निर्वाणीचे प्रेम करणार्या साहित्यप्रेमीनी 'जीएंची पत्रवेळा....' वाचावे.
दोन शब्द मध्ये ग्रेस लिहितात :
"जी.ए.
तुम्ही आत्ता जिथे स्थायिक झाला आहात, तिथल्या पडशाळांतील जीवनधर्माची सृजनभाषा फक्त मला कळतेय; शिवाय लौकिक अलौकिकाच्य सरहद्दरेषेचा कुठलाही संधिकाळ मला बाधक नाही !
"शोधून काढले मी ते कूळही करंटे;
पहिल्या वधास लागे काळीज फार मोठे....."
अशोक पाटील
ओळींमुळे चित्र आणखी छान वाटले
ओळींमुळे चित्र आणखी छान वाटले बघायला.
अनिरुद्ध भट्टाचारजी आणि
अनिरुद्ध भट्टाचारजी आणि बालाजी विट्टल लिखीत 'आर.डी.बर्मन-द मॅन द म्युझिक' हे पुस्तक सध्या वाचतोय.
मस्त आहे. माहिती तर आहेच पण अॅनॅक्डोट्सच्या पलिकडे जाउन त्याच्या सांगितीक प्रवासाचे विश्लेषण उत्तम आहे, विशेषतः ८०च्या दशकातील त्याच्या अपयशाची कारणमिमांसा फार समतोल आहे.
विशेषतः ८०च्या दशकातील
विशेषतः ८०च्या दशकातील त्याच्या अपयशाची कारणमिमांसा >>> इंटरेस्टिंग !!!
जीएंच पिंगळावेळ आहे
जीएंच पिंगळावेळ आहे माझ्याकडे.
सध्याचय बिजी श्येड्युल मधुन वेळ काढुन एक कथा वाचली. " फुंका " केवळ जबरदस्त........
प्रचंड सामर्थ्य आहे जी एंच्या लेखणीत अस आजवर मी वाचल होत त्याचा कडक अनुभव पहिल्याच कथेत..
चौघीजणी च्या २ र्या भागाचे
चौघीजणी च्या २ र्या भागाचे नाव पण चौघीजणी भाग २ वगैरे असेच आहे का? काल लायब्ररी मध्ये शोधायचा प्रयत्न करत होते पण नाही सापडले.. (मला ते पुस्तक हवेय जे लिटिल वुमन चा भाग २ असलेल्या 'गुड वाईव्ज' चा अनुवाद आहे) लेखिका शांता शेळकेच आहेत का?
>त्यांचं 'मौनराग' >>
>त्यांचं 'मौनराग' >> +१
) एलकुंचवारांनी घेतलेल्या प्रदीर्घ मुलाखतीचे पुस्तकही वाचण्यासारखे आहे.
शेवाळकरांच्या (हपभ नसलेली
मुंबईत १४ एप्रिल-१ मे
मुंबईत १४ एप्रिल-१ मे सुंदरबाई हॉल, न्यू मरिन लाईन्स, आशिष बुक सेन्टरचं पुस्तक प्रदर्शन आहे. सकाळी ९:३० ते रात्री ८:३०.
शेवाळकरांच्या (हपभ नसलेली )
शेवाळकरांच्या (हपभ नसलेली )
ओके. नोटेड.
मृनिश, हो शांता शेळके
मृनिश,
हो शांता शेळके ह्यांनी लिहिले आहे 'चौघीजणी'. हे अनुवादीत पुस्तक आहे. पण ह्या पुस्तकाचे दोन भाग नाही तर फक्त एकच पुस्तक आहे. भाग वगैरे नाही. खंड पण नाही.
डॉ. स्नेहलता देशमुख यांचं
डॉ. स्नेहलता देशमुख यांचं ''आई'' वाचतेय सध्या. एकीकडे श्यामची आई ची पारायणं सुरू आहेत.
ओह असे आहे होय!! धन्यवाद बी..
ओह असे आहे होय!! धन्यवाद बी..
आज जागतिक पुस्तक दिन (की वाचक
आज जागतिक पुस्तक दिन (की वाचक दिन ?) आहे
आज जागतिक पुस्तक आणि
आज जागतिक पुस्तक आणि प्रताधिकार दिन आहे. शेक्सपियरचा स्मृतिदिन.
अनुवादित पुस्तकांची
अनुवादित पुस्तकांची युनेस्कोकृत सूची
Pages