च्यायला ही नोकरी माझ्या आयुष्याची वाट लावणार. तीन वर्षे झाली नाईट शिफ्ट करतोय!
यार मला ग्राफिक्स डिझाईनमध्ये जायचं होतं सॉलीड आयडीयाज आहेत डोक्यात पण कोणते ग्रह फिरले आणि कायमचा टेस्टींगमध्ये अडकलो यार!
माझी ही फिरती कधी संपणार रे देवा? तीन वर्ष झाले लग्न होऊन सलग तीन दिवस सुद्धा घरी जेवायला
मिळत नाही. आज इंदुर, उद्या दिल्ली परवा जयपूर, पुढे कसं निभावणार?
विक्या साल्या सात वर्ष झाली तुला ह्या कंपनीत, टीम लीड होऊन दोन वर्षे झालीत येड्या आहेस कुठं?
तो दिल्लीवाला सुखबीर बघ दोन वर्ष ज्युनिअर आहे तुला आणि जर्मनीच्या प्रोजेक्टचा मॅनेजरपण झाला. का? तर आयआयएम लखनौचा शिक्का आहे त्याच्या कपाळावर. तू साल्या युनि टॉप फाईव्ह मध्ये होता ना आणि एवढी ब्राईट मेमरी आहे तुझी, तू करना कॅटचा अभ्यास आणि जा बी स्कूलला. लाईफ बनेल तुझी.
मुलगा हॉटेल मॅनेजमेंटला जायचं म्हणातोय, दोन वर्षांचा पाच लाख खर्च आहे, कसं जमवू. आडीपीएलवाले जॉब द्यायला तयार आहेत पण काम सध्या करतोय त्याच्याएवढं चांगलं नाही, पुन्हा हुद्दाही सध्यापेक्षा जरा कमीचाच मिळतोय, नुसत्या पैशांकडे बघून करू का शिफ्ट. मग इथे कमावलेल्या क्रेडीटचं काय?
काय वैताग नियम आहेत या देशाचे? आता माझ्याकडे भारतातली चांगली एमडी डीग्री असतांना, दोन वर्षांची प्रॅक्टीस असतांना इथे काम करण्यासाठी पुन्हा दोन वर्ष अभ्यास करा आणि परीक्षा द्या. छ्या नुसता टाईमपास. कशाला आलो ह्या देशात. ह्याच्या बदलीपायी माझ्या करीयरची वाट. पण मला कथ्थक फार छान येतं. पूर्ण पाच वर्ष महाराजांकडे प्रशिक्षण घेतलंय, रियाज चालूच आहे, स्टेज शोजचा अनुभव आहे मग मी इथे पण शोज करू का? प्रशिक्षण पण देऊ शकतेच की मी.
मला सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जायचंय, मी फॅक्टरीतून आल्यावर रोज किमान चार तास अभ्यास करतो.
दोन महिन्यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ फक्त अभ्यास करणार. परीक्षा सहा महिन्यांनी आहे.
मला सध्याची नोकरी सोडून माझं स्वतःचं हॉटेल उघडायचंय मी आणि माझा मित्र पार्टनर होणार आहोत. एक हॉटेल चालवायलाही घेणार आहोत. पैशांची जमवाजमव करतोय.
मी आजपर्यंत सहा वेगवेगळे व्यवसाय बदलले. फार नाही पण ठीकठाक पैसा कमावलाय पण बॉडीबिल्डींग कधी सोडली नाही. दरवर्षी मी लाखो रुपये खर्च करतो त्याच्यावर.
अरे तू कसला हजरजबाबी आहेस, तू आला की गृपला हसवून हसवून मारतोस, कुणी सुद्धा मी जातो असं म्हणत नाही. स्टँडअप कॉमेडीचा जरूर विचार कर.
अंगावर कामं घेऊन त्येच त्येच सुतारकाम करायचा लय कंटाळा आलाय. हे आजकालचे पोरं काय काय कोर्स करत्येत आणि आणि कायबी डोकं लढिवत्यात फर्निचर मध्ये. परवा एक असंच पोरगं आलं होतं कंपनीकडून कमिशनवर काम देतो बोलत होतं. त्याचं डोकं माझे हात. काय करावं?
अरे तो माझा मावस भाऊ आहे ना तो कसला चंपक आहे माहित्ये, थरमॅक्समधली पन्नासहजाराची एसीमध्येबसून कीबोर्ड बडवायची नोकरी सोडली आणि आता २० बाय २० च्या आणि पत्र्याच्या शेडमध्ये एक मशीन घेऊन वर्कशॉप काढणार आहे म्हणे.
अरे तो आपला १२ वीच्या वर्गातला तो होता ना बघ त्याचा ९८ चा गृप येऊन पण त्याने बाप बिल्डर म्हणून त्याच लाईनमध्ये जाण्यासाठी सिव्हिलला अॅडमिशन घेतली, अरे तो मर्चंट नेव्हीत गेलाय आता.
ह्या ना अश्या असंख्य घटना, असंख्य प्रसंग. एक विचार, मनाची एक उचल, वेडाची एक लहर, एक निर्णय आणि प्रयत्नांची पराकष्ठा पूर्ण आयुष्य बदलू शकते.
तुम्ही कधी असा विचार केलाय का? अशा पॅराडाईम शिफ्ट साठी प्रयत्न केलाय का?
पास या फेल मॅटर नही करता है बेटा बस जीजान से कोशिश करना जरूरी है. हे बाबावाक्य प्रमाण मानून कधी निर्णय घेतला आहे का? असे प्रसंग तुमच्या आसपास घडले असतील तर दुसर्यांसाठी प्रेरणा, सल्ला, मार्गदर्शन म्हणून ते इथे शेअर कराल का?
किंवा असं काहीतरी करायचं आहे पण प्रेरणेचा अभाव आहे, प्रयत्न चालू आहेत पण काही अडचणी येतायेत सल्ला हवाय, हो केलाय प्रयत्न, माझ्याकडे देण्यासाठी सल्ले आहेत......तरी इथे लिहा.
येस्स! आय कॅन विन, यू कॅन डू इट वगैरे सगळं ठीक आहे. पण ह्या धाग्याचा मुख्य ऊद्देश अॅस्पिरंट्सना व्यक्त होण्यासाठी असा काहीसा आहे.
मी का लिहितोय?
............मीही काहीतरी ठरवलंय, प्रयत्न करतोच आहे, कदाचित इथे लिहिणार्यांकडून मिळालेली प्रेरणा, सल्ला, मार्गदर्शनामुळे प्रयत्नांना गती मिळू शकेल.
रेव्ह्यू, मास्तुरे, निर्णय
रेव्ह्यू, मास्तुरे,
निर्णय घेण्याचं धाडस दाखवलंत, घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करून मागे वळून न बघता पर्याय शोधलेत इथेच तुमचं निम्मं यश आहे. अभिनंदन. प्रत्येकाची मानसिक, भौतिक गरज वेगवेगळी असते. पण आपली गरज नेमकी ओळखून त्याप्रमाणे पावलं उचलणं सगळ्यांना जमतंच असं नाही. न जमण्याची कारणंही वेगवेगळी असू शकतात, पण प्रयत्न करणं महत्त्वाचं.
मागे साजिर्याने त्याच्या व्यवसायाबद्दल असंच काहिसं लिहीलं होतं. मुळात मेकॅनिकल इंजिनीअर असूनही एका टप्प्यावर नोकरी सोडून त्याने जाहिरात एजन्सी सुरू केली. तेव्हाची त्याची मनःस्थिती इथे लिहिली आहे. त्यानंतरचा त्याचा प्रवास त्याने उद्योजक बाफवर मांडला आहे. An inspiring story.
मास्तुरे तुमचा शब्द अन शब्द
मास्तुरे
तुमचा शब्द अन शब्द मला उमजत आहे.जावे त्या च्या --------व.न्शा
अभिनन्दन
मास्तुरे, अभिनंदन! खुप
मास्तुरे, अभिनंदन! खुप विचारांती निर्णय घेतला आहे तुम्ही वेगळ्या वाटेवर जाण्याचा.
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद! आधीचे क्षेत्र सोडून नवीन क्षेत्राची चाचपणी करायची असेल, तर स्वतःचे SWOT Analysis करणे आवश्यक आहे. ते केल्यावर आपण काय करू शकतो आणि काय करू शकत नाही याचा अंदाज येतो व नक्कीच योग्य ती दिशा मिळू शकते.
>>> तुमचा शब्द अन शब्द मला उमजत आहे.जावे त्या च्या --------व.न्शा
धन्यवाद रेव्यु! तुम्ही स्वतःबद्दल सविस्तर लिहिल्यामुळेच मला लिहावेसे वाटले.
रेव्ह्यु,मास्तुरे मस्त पोस्ट.
रेव्ह्यु,मास्तुरे मस्त पोस्ट.
मस्त पोस्ट मास्तुरे व रेव्यू.
मस्त पोस्ट मास्तुरे व रेव्यू.
मोठे पोस्ट लिहिलेले गायब झाले.
मस्त पोस्ट मास्तुरे व रेव्यू.
मस्त पोस्ट मास्तुरे व रेव्यू.
मोठे पोस्ट लिहिलेले गायब झाले.
अप्रतिम पोस्ट रेव्यु व
अप्रतिम पोस्ट रेव्यु व मास्तुरे!
रॅट रेस ही एक सर्वव्यापी
रॅट रेस ही एक सर्वव्यापी ब्याद आहे
-मूल्ये म्हणजे व्हॅल्युज चा उदो उदो व प्रत्यक्षात घडोघडी पायमल्ली
-चॅलेंज या गोंडस नावाखाली दुसर्याच्या उरावर ते लादणे.
- एकदा पगार दिला की ती व्यक्ती आपल्याकडे वेठबिगारीस आहे असे त्याला वागविणे ( हे अगदी मोठ्मोठ्या कॉर्पोरेट्स मध्ये देखील आहे.)
- बॉटम लाईन व टोप लाईन हे एवढेच सर्वस्व मानणे.
- वैयक्तिक संकटात कोणी कितीही असला तरी वरवर सहानुभूती ,ती ही फार थोडा काळ दाखविणे.
-स्वतः ग्राहक पक्षात असल्यास सप्लायर ला पायातील चप्पल समजणे व त्याला केंव्हाही डिस्टर्ब करणे
-कुठलाही निर्णय स्वतःच्या ताब्यात ठेवणे ( याला काही कंपन्या अपवाद आहेत).
-टार्गेट सेटिंग करताना दुसर्याच्या अनुभवाचा विचार न करता कुठल्यातरी विदेशी कंपनीचा बेंच मार्क देणे पण तेथील प्रोसेस फॉलो न करणे.
- बोर्ड रूम मध्ये खोटी आश्वासने देत कसा तरी वेळ काढ्णे
इ.इ.इ.
रेव्ह्यु,मास्तुरे अभिनंदन!!
रेव्ह्यु,मास्तुरे अभिनंदन!! अनुभव फार आवडले.
मास्तुरे तुमचे अनुभव इतक्या
मास्तुरे तुमचे अनुभव इतक्या मोकळे पणाने लिहिल्या बद्दल आभार!
केवळ व्यवसायात बदल केल्याने रॅट्रेस सारख्या परिस्थितिने आलेले प्रष्ण सुटतात असा सुर जाणवतोय (तसा नसेलही ) व तो मला काहिसा खटकत आहे. आगाऊ म्हणाला ते मला पटते. त्यापुढे असे वाटते की तुमच्या आपेक्षा, म्हत्वकांक्षा, जबाबदार्या व कुवत ह्यां सर्वाचा पाय्मेळा बसला नसेल तर कुठल्याही क्षेत्रात फरपट होतेच होते. मग उर फुटेपर्यंत वा मन मारून जबाबदार्या पेलण्यासाठी किंवा आपेक्षा व महत्वकांक्षा ह्यांचा मेळ घालण्यासाठी धावणे बाकि उरते. केवळ क्षेत्र बदलल्याने ह्या मुलभुत गोष्टित कसा फरक पडेल?
पण एखाद्या क्षेत्राचा कंटाळा आला असेल व नवीन क्षेत्रात जायचे असेल तर त्यासाठी पुन्हा अथक परिश्रम घेणे येतेच. म्हणजे धावणे सुटत नाही. केवळ एक प्रष्णसंच बदलून दुसरा उचलायचा इतकेच... त्यातला नव्या नात्याचा जो हनिमुन काळ असतो तो संपला की पुन्हा तेच प्रष्ण समोर उभे रहातात....
तुमच्या जगण्यासाठी लागणारे द्रव्य मिळवणे जर तुमच्या आत्मसंतुष्टि देणार्या कामाशी निगडित असेल तर कुठेतरी समाधान व महत्वकांक्षा ह्यांचा मेळ घालावा लागतोच. व त्यामुळे होणारी कुत्तरोढ भोगावी लागतेच असे वाटते.
तुमच्या आपेक्षा,
तुमच्या आपेक्षा, म्हत्वकांक्षा, जबाबदार्या व कुवत ह्यांची सांगड >> एक्झॅक्टली.. पण भारतातलं प्रायवेट सेक्टर जसं चालतं ते बघता मला मास्तुरे आणि रेव्ह्यु ह्यांचं म्हणणं १००% पटतंय.
सांगड घालण्याचा प्रयत्न
सांगड घालण्याचा प्रयत्न वर्षानुवर्षे चालू असतो,नव्हे यात दशकही जाते. नोकर्या ही बदलल्या जातात. स्वतः अॅसेर्टिव्ह होण्याचा प्रयत्न होतो. शेवटी एवढे व्हेरियेबल असतात्,एवढे पीयर्स व स्टेकहोल्डर्स असतात की दमछाक होवू लागते. रविवारी मैफिलीत एम डी चा फोन येतो,नाहीतर कुठला तरी युनियन पुढारी तुम्हाला वेठीस धरतो. मॅन्युफॅक्चरिन्ग तर जगन्नाथाचा रथ असतो. नो स्टॉपेज अॅट एनी कॉस्ट. हे रडगाणे वाटते पण मला माझ्या निर्णयानंतर जेवढे भेटले (माझ्यासारखे ) ,ते ही एवढेच जाचले होते. वर शारिरीक व्याधी- बी पी ,शुगर्,हार्ट ( देवाच्या दयेने मी यातून वाचलो).
आय टी त ही हेच आहे. माझ्याबरोबर टी सी एस ची एक टीम होती. त्या पोरंना पाहून तर वाईट वटायचे. चक्क. एक्स्प्लॉयटेशन . रहायची सोय तात्पुरती. ३ बेड रूम फ्लॅट मध्ये ११ जण. सकाळी १० ला आले की रात्री १२-१ ला जायचे कारण काय? ९ महिन्यात एस ए पी चे ९ मॉड्युल्स ४ लोकेशन ला इम्प्लिमेंट करण्याचे 'एंबिशियस' टार्गेट घेतले आहे त्यांच्या मॅनेजमेंट ने- फर्स्ट टाईम इन इंडिया'. यात क्वालिटी ऑफ इंप्लिमेंटेशन बोन्बलले.
असा प्रकार मी परदेशात क्वचित पाहिला. सहसा शनिवार रविवार तरी तुमच्या हातात असतो.
मास्तुरे म्हणतात त्याप्रमाणे स्वॉट करायला हवा.
पण कित्येकदा जो बदल करायचा त्यात आपल्या वयाच्या जबाबदारी नुसार पैसा नसतो ,हे देखील खरे.
पण सगळा बॅक अप असूनही स्वतःला जुंपून घेतलेले महाभाग ही मी पाहिले आहे. महत्त्वाचे म्हणजे कुठल्याही अवास्तवी लाईफ स्टाईलला आहारी न जाणे व शक्य तो पुढील क्षणाची तयारी करीत राहणे महत्त्वाचे!!!
पण एखाद्या क्षेत्राचा कंटाळा
पण एखाद्या क्षेत्राचा कंटाळा आला असेल व नवीन क्षेत्रात जायचे असेल तर त्यासाठी पुन्हा अथक परिश्रम घेणे येतेच. >>
पेशवे तुम्ही 'नाविन्य' या घटकाला असलेले असाधारण वेटेज धरत नाही आहात बहुतेक.
केवळ बदल केल्यामुळे 'समाधान' वाटु शकते आणि ताळेबंदाच्या खाली लाल रेघ दिसली तरी ती काळी 'वाटु शकते'.
जे झपाटलेपण आपल्या रोजच्या जगण्यातून नाहीसे होत जाते दिवसामहिन्यावर्षागणिक, ते केवळ नाविन्यामुळे परत आल्यासारखे वाटु शकते.
समाधान आणि आनंद हा काही constant नसतो. Ceteris paribus असे आयुष्यात कधी होत नाही.
पुन्हा काही वर्षांनी काय, कुठे, कुठवर हा तसाही infinite loop आहे.
जगाच्या पाठीवर अॅकॅडेमिशियन्स ना विचारले तर ते तिथले राजकारण, लबाड्या, पोरांची नसणारी निष्ठा, शिक्षणाचे बाजारीकरण, फंडिगच्या समस्या, सतत काहीतरी प्रकाशित करत राहण्याचा ताण याबाबत बोंब मारताना दिसतील. त्यामुळे समस्या क्षेत्रनिहाय असे अजिबात नाही.
सॉरी आपली ओळख नाही, तुम्हालाच उद्देशुन असे नाही, मुद्दा तुम्ही मांडला म्हणून लिहीले. Just thinking aloud..
स्थिरचित्त असणे हे अलौकिक आहे. मला उदाहरणार्थ झाडु मारायचे किंवा बँकेत नोटा मोजण्याचे काम दिले तरी तिथे 'काहीतरी अजून' मजेमजेचे करण्यासारखे सापडेल च्यायला. तो स्वभावाचा दोष आहे.
इतर लोकं कसे करतात मग मन मारुन आहे ते आख्खी जिंदगी मुकाट? शिवाय त्याला ग्लोरीफायही करतात..
माहित नाही. मला करता येत नाही एवढे नक्की माहित आहे.
आमचा एक मित्र आणि मी Vs त्याची बायको आणि माझा नवरा असे दोन तट आहेत. मला दर दोन वर्षांनी जाSSSSSम कंटाळ येतो. खरंतर ६ महिन्यांनी येतो पण सांगायची सोय नाही, घरचे धुवुन काढतील.
दुसरी टीम कुठेही आनंदात राहु शकते, आणि पहिलीला आटोक्यात ठेवते. 'पण कसे तुला बोर होत नाही, राग येत नाही, कंटाळ येत नाही' याला उत्तर 'तुला येतो तितका येत नाही' असेच आहे.
कुत्तरओढीचे प्रमाण हे त्यात्या व्यक्तीच्या वाटण्यावर आहे- सा पे क्ष . 
उत्तम चर्चा. वाचते आहे.
उत्तम चर्चा. वाचते आहे.
ह्म्म वाचते आहे. सुरक्षित
ह्म्म वाचते आहे. सुरक्षित भविष्याचा अंदाज बांधून, गणितं करून काम आणि क्षेत्र निवडल्यानंतरही हे सगळं आहेच तेव्हा कुठलंही भविष्याचं गणित मांडून दाखवताना मायनसमधेच किंवा अनिश्चिततेमधेच गेलेलं दिसेल असं क्षेत्र केवळ आवड-ओढ या भरवश्यावर निवडलं हे आपलं फारसं चुकलं नाही असं नक्की वाटलं. माफ करा हे ब्रॅगिंग होत असेल तर...
मला दर दोन वर्षांनी जाSSSSSम
मला दर दोन वर्षांनी जाSSSSSम कंटाळ येतो. >> ++.. मला वर्षानं प्रोजेक्ट बदलला नाही तर कंटाळा येतो..
नवीन शिकायला/चॅलेंजेस नसतील तर अगदीच!
एकदम नाविन्याची आवड सदरात पडते मी..
अलीकडे (९.५ वर्षांनी) ह्या क्षेत्राचाच कंटाळा यायला लागलाय.
लकिली, फालतू पॉलिटिक्स नाहिये २००९ मधे ज्या गृपमधे शिफ्ट झाले त्यात.. मॅनेजरही अगदी समंजस आणि (फाSSSSर बोलतो, हा एक ड्रॉबॅक सोडला तर) चांगला आहे. आमचं आयुष्य विकत घेतल्यासारखा वागत नाही. हा अनुभव आधीच्या २ प्रोजेक्टस मधे आलेला... दररोजचे २-३ तर वाजायचेच रात्रीचे पण अगदी रविवारी रात्री १२ ला निघतानाही खळखळ व्हायची.. सगळी टीम असायची.. हे सगळं तब्बल ६-६ महिने चाललेलं. सगळेच वैतागलेले.
एकदा तर एकाची ९४ वर्षाची आजी आजारी होती, म्हणून तो घरी निघालेला (फक्त रविवारी - वीकडेज ना नाही) - तरी मॅनेजर सोडत नव्हता.. सगळी टीम मिळून भांडलेलो तेव्हा..
काम करण्याचा वैताग नसतो. नॉट हॅविंग कन्ट्रोल ऑन युवर ओन लाईफ - हे भयानक फीलिंग असतं.
नुसतं अॅसर्टिव असूनही भागतच असं नाही..
प्रायवेट बॅंकिंग क्षेत्रात तर आणखीन भयानक अनुभव ऐकलेत. काय काय प्रकार असतात, बोलायलाही नको.
(तरी ९.५ वर्षातले, १.५-२ वर्षच अशी म्हणजे माझी अवस्था चांगलीच म्हणायची!)
असो, विषय बदल होतोय बहुतेक. पण पेशव्यांच्या पोस्ट वरून सगळं आठवलं.. हे ज्यानं अनुभवलय त्याला कळू शकेल मास्तुरे आणि रेव्यु काय म्हणताहेत.
ज्यांनी ह्या क्षेत्रात भारतात काम करूनही हे अनुभवलं नाहिये - ते लक्कीच म्हणायचे!
अवांतर मुद्द्याबद्दल माफ
अवांतर मुद्द्याबद्दल माफ करा..
पण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नोकरीवाल्यांना कामाच्या अडनिड्या वेळांबद्दल इतकं बोलताना ऐकलंय की बस्स! घरदार, जबाबदार्या सगळ्यांनाच असतात पण तुम्ही जे काम करता त्यात तुम्हाला मजा येते की नाही? तुमचं काम तुमचं पॅशन असतं की नाही? आणि येत असेल तर कामाच्या वेळांची इतकी तक्रार? त्या कामात मजा येत नाही तर केवळ इतर व्यावहारिक गणितांसाठी कर्तव्य म्हणून करता असे असेल तर व्यावहारिक गणितं निभतायत ना मग रडतांव कित्यांक?
असं मला अनेकदा म्हणावसं वाटतं.
फ्रीलान्सर्स, बिझिनेसवाले ते हातावर पोटवाले सगळेच वाट्टेल त्या वेळांना काम करत असतात पण नाराजी व्यक्त करताना, रडताना ऐकलंय ते नोकरीवाल्या लोकांनाच. त्यामुळे खरंच प्रश्न पडतो.
मला दर दोन वर्षांनी जाSSSSSम
मला दर दोन वर्षांनी जाSSSSSम कंटाळ येतो. खरंतर ६ महिन्यांनी येतो पण सांगायची सोय नाही, >>>>
खाजगीच नोकरी असल्याने गेल्या २० वर्षात ही आठवी आहे. या नोकरीत आता ५ वर्षे जूनमधे होतील. गेल्या वर्षीपासून दुसरी शोधतेय, मिळत नाही..
+१ ग रैना..
रे व्यू अन मास्तुरे यांची पोस्टस स्फुर्तीदायक आहेत.
माझ अजूनच विचित्र आहे.. मला माझ्या कामाचा कंटाळा नाही येत, पण त्याच ठिकाणी काम वर्षानुवर्ष करण्याचा अतिशय कंटाळा येतो..
नीधप, वरच्या पोस्ट मधलं "काम
नीधप, वरच्या पोस्ट मधलं
"काम करण्याचा वैताग नसतो. नॉट हॅविंग कन्ट्रोल ऑन युवर ओन लाईफ - हे भयानक फीलिंग असतं."
वाचलयस का?
नोकरी करणार्यांना बर्याचदा 'मी हे काम करणार नाही/स्वीकारणार नाही' म्हणायचा पर्याय नसतो, कायम एक बांधलेपण असतं.
आणि फ्रीलान्सर आणि बिझनेसमननाही वेगवेगळ्या गोष्टींवरून वैताग येत नाही असं म्हणायचय का?
प्रत्येकाचे वैतागाचे पॉईंटस वेगळे, आनंद वेगळे, फायदे वेगळे, तोटे वेगळे.
तुलना कशी होईल!
छान चर्चा चालू आहे इथे.
छान चर्चा चालू आहे इथे. रेव्यु, मास्तुरे..मस्त, प्रेरणादायी.
मला जमेल का? माहीत नाही.
नानबाच्या वरच्या पोस्टशी १००% सहमत. हे सगळं अनुभवलं आहे. लकीली सध्या तेवढे वाईट हाल नाहीयेत. कुणाला वाटेल अजून दहा वर्षं झाले नाही इंडस्ट्रीत, इतक्यातच ही भाषा का? कुणास ठाऊक. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी एवढंच उत्तर असावं.
काम करण्याचा वैताग नसतो. नॉट हॅविंग कन्ट्रोल ऑन युवर ओन लाईफ - हे भयानक फीलिंग असतं.
>>> +++++
कॉर्पोरेट जग रुथलेस असतंच पण भारतात ते फारच अनप्रोफेशनलही आहे. मॅच्युअर व्हायला अजून वेळ लागेल. तोवर वाट बघणं कठीण वाटतंय.
कॉर्पोरेट जग रुथलेस असतंच पण
कॉर्पोरेट जग रुथलेस असतंच पण भारतात ते फारच अनप्रोफेशनलही आहे. मॅच्युअर व्हायला अजून वेळ लागेल. >> यू सेड इट!
नाही पटलं. पण ठिके कॅरी ऑन.
नाही पटलं. पण ठिके कॅरी ऑन.
नानबा, नताशा +१. आणि आपली
नानबा, नताशा +१.
आणि आपली मराठी मव समस्या ही की एकरेषिय विचारपद्धती.
२१व्या वर्षी जे नाकासमोर नोकरीला चिकटुन बसायचे की तिथेच. काय बोर आहे. (मीपण तसलीच बोर आहे).
जरका बाहेर पडलात तर आत रिंगणात यायला जबर्या बायसेस ना तोंड द्यावे लागते.
रिंगणाच्या आत बाहेर 'नाच गं घुमा' हा पर्याय का नाही ते कळले नाही.
भारताबाहेर सुद्धा सगळे आलबेल आहे असे नाही. फक्त ते तसे वाटते कारण इतर समस्या कमी असतात (कम्युट, रहदारीतील गिचगिचाट, वेळच्यावेळी होणार्या इतर गोष्टी, इतर). ढोरमेहनत करुन निदान आर्थिक सुबत्ता मिळते. कारण देशी जनता राजकारणापर्यंतच्या पातळीवर सुद्धा पोचत नाही बर्यचदा. खिजगणतीत नसते. डिलबर्टमधल्या 'अशोक' स्टाईल काम करते पब्लिक.
अनघा-
नीरजाचा मुद्दा पटलाय. पण अनुभवल्याशिवाय ते कळत नाही हेही खरेच आहे. दिवसमहिनेवर्ष 'तेच' काम आणि 'तेच लोक' आणि त्याच घाणेरड्या वेळा हे फार वैतागवाणे आहे. फ्रीलान्सरना 'नवीन' प्रोजेटमध्ये मजा असते. एक प्रोजेक्ट केला, काही काळ गेला पुन्हा दुसरा.. यात नेमेचि, नेमेचि मधली जीवघेणी कुत्तरओढ थोडीशी कमी होते की काय?
मागे एकदा रॉबिनहुड की टोणगा की कोणीतरी पोस्ट लिहीली होती. की चहाटपरीवरील पोरांपासुन गवड्यांपासुन सॉवे पर्यंत सगळेच जग मरमर मरत असते, मग यांच्याच वेळांचे काय कौतुक?
या निमित्ताने चांगली चर्चा
या निमित्ताने चांगली चर्चा होते आहे.
आवडत्या क्षेत्रात काम (करियर) करायला मिळणे हे जरा दुर्लभच वाटते. पुर्वी
करियर गायडन्स असे काही नव्हतेच. आणि दुसरे म्हणजे, कामाच्या ठिकाणचे राजकारण, दबाव हे तर कुठल्याही क्षेत्रात असतातच.
त्यापासून कसा बचाव करायचा, याचे उत्तर मी माझ्यापुरते शोधले ते असे. अलिप्त रहायचे. हि मानसिकता जरा प्रयत्नाने सहज साधू शकते. मला याबाबतीत डॉ. लागूंचे
एक वक्तव्य आठवते. ते म्हणाले होते, भुमिकेत झोकून देणे असे काही नसतेच, कारण
त्याचवेळी अनेक व्यवधाने संभाळायची असतात. (त्यांच्या बाबतीत, नेपथ्य, प्रकाशयोजना, पाठांतर ) त्यामूळे तसा आभास निर्माण करणे, हे महत्वाचे.
आणि हा एक अगदी माझा वैयक्तीक दृष्टीकोन म्हणजे, आवडते क्षेत्र हेच पोटापाण्याचा उद्योग म्हणून स्वीकारले तर त्यातला रस आणि उस्फुर्तता (निदान माझी
तरी ) नक्कीच कमी होईल.
शिकवणे मला आवडते, मी ते केलेही आहे. पण त्यावाचून मी राहू शकत नाही, असे
नाही.
>>> नताशा: काम करण्याचा वैताग
>>> नताशा: काम करण्याचा वैताग नसतो. नॉट हॅविंग कन्ट्रोल ऑन युवर ओन लाईफ - हे भयानक फीलिंग असतं.>>> यु सेड इट
>>>नीधप :फ्रीलान्सर्स, बिझिनेसवाले ते हातावर पोटवाले सगळेच वाट्टेल त्या वेळांना काम करत असतात पण नाराजी व्यक्त करताना, रडताना ऐकलंय ते नोकरीवाल्या लोकांनाच. त्यामुळे खरंच प्रश्न पडतो:>>
आता मी रडत नाही .
मी थोडा फरक सांगतो.
मी आता स्वतःचा दुसर्या इनिंगमधला अनुभव सांगतो.
मी रोज रात्री ११ -१२ वाजेपर्यंत काम करतो पण ती बांधिलकी नाही . तो माझा निर्णय आहे म्हणून त्याची ओनरशिप आहे व त्यात आनंद आहे-पण हेच जर माझ्यावर लादले गेले तर ती वेळ माझ्या उरावर चढून बसेल. घरी कोणी आजारी असताना किंवा अशा कुठल्याही प्रसंगी माझा मी ताबेदार असतो.भारतात नोकरीत हे शक्य नाही.
मी नोकरीत असताना -माझ्या नातीला पहण्यासाठी यु एस ला जाण्याचा कार्यक्रम अशा कारणांसाठी दोनदा रद्द केला. किंवा करण्यास भाग पाडले गेले-क्षुल्लक कारणांसाठी. ती अगतिकदा अनुभविण्यासाठी नोकरीच करायला हवी .
परंतु
हा प्रॉब्लेम स्वतःचा व्यवसाय असणार्याना सोडविणे थोडे सोपे असते-त्याना पर्याय असतो नकारण्याचा.
जरका बाहेर पडलात तर आत
जरका बाहेर पडलात तर आत रिंगणात यायला जबर्या बायसेस ना तोंड द्यावे लागते.
हे सगळं तुम्ही करियर शिडीच्या कुठल्या पायरीवर आहात यावरही अवलंबून आहेच म्हणा. मधल्यांचे हाल तेच जाणोत..धरलं तर चावतं अन सोडलं तर पळतं 
आत बाहेर 'नाच गं घुमा' हा पर्याय का नाही ते कळले नाही.
>> हे पण बहुधा फक्त भारतातच आहे, नाही? नोकरीत ब्रेक घेतला तर पुन्हा त्यात घुसणं कठीण. नोकरीचा कंटाळा/ताप झाला, चला दुसरे काही करुन बघुया. नाही जमले तर येऊ परत इकडेच, असं काही होत नाही. पाठीमागचे दरवाजे बंद झाले की झालेच. नाहीतर पुन्हा खालच्या पातळीवरुन (याचा चुकीचा अर्थ नको कृपया) सुरुवात. चांगल्या संधींची मारामार. म्हणजे पुन्हा त्याच मर्यादा ज्यांना तोंड देत वर पोचलो होतो. त्यामुळे ब्रेक घेणे हा पर्याय उरत नाही जर "करियर" करायचे असेल तर.. निव्वळ उत्पन्न म्हणून बघायचं असेल तर गोष्ट वेगळी. पण ज्याचा मूळ कलच "उत्पन्न हवे म्हणून नोकरी" असा असेल त्याला बहुधा मुळातच इतके ताप होणार नाहीत अन झाले तरी ती नोकरी सोडून देणे "तितकेसे" कठीण जाणार नाही
हा प्रॉब्लेम स्वतःचा व्यवसाय
हा प्रॉब्लेम स्वतःचा व्यवसाय असणार्याना सोडविणे थोडे सोपे असते-त्याना पर्याय असतो नकारण्याचा. <<< स्वतःचा व्यवसाय असलेल्याने हे म्हणल्यास कदाचित पटेल. पण असो. तुमचे चालूद्या.
नोकरी भयंकर अवघड असते.
स्वतःचा व्यवसाय असलेल्याने हे
स्वतःचा व्यवसाय असलेल्याने हे म्हणल्यास कदाचित पटेल. >>> रेव्यु फ्रीलन्सर म्हणुन पुस्तकांची भाषांतरे करतात असे त्यानी म्हटले आहे
नोकरी भयंकर अवघड असते >>> नी सारकॅझम च कारण कळाले नाही ...
जिव्हाळ्याची चर्चा. कित्येक
जिव्हाळ्याची चर्चा. कित्येक मुद्दे पटत आहेत आणि काही मुद्द्यांना अगदी अगदी.
Pages