आय नीड अ चेंज.....

Submitted by षण्मुखानंद on 14 February, 2011 - 10:07

च्यायला ही नोकरी माझ्या आयुष्याची वाट लावणार. तीन वर्षे झाली नाईट शिफ्ट करतोय!

यार मला ग्राफिक्स डिझाईनमध्ये जायचं होतं सॉलीड आयडीयाज आहेत डोक्यात पण कोणते ग्रह फिरले आणि कायमचा टेस्टींगमध्ये अडकलो यार!

माझी ही फिरती कधी संपणार रे देवा? तीन वर्ष झाले लग्न होऊन सलग तीन दिवस सुद्धा घरी जेवायला
मिळत नाही. आज इंदुर, उद्या दिल्ली परवा जयपूर, पुढे कसं निभावणार?

विक्या साल्या सात वर्ष झाली तुला ह्या कंपनीत, टीम लीड होऊन दोन वर्षे झालीत येड्या आहेस कुठं?
तो दिल्लीवाला सुखबीर बघ दोन वर्ष ज्युनिअर आहे तुला आणि जर्मनीच्या प्रोजेक्टचा मॅनेजरपण झाला. का? तर आयआयएम लखनौचा शिक्का आहे त्याच्या कपाळावर. तू साल्या युनि टॉप फाईव्ह मध्ये होता ना आणि एवढी ब्राईट मेमरी आहे तुझी, तू करना कॅटचा अभ्यास आणि जा बी स्कूलला. लाईफ बनेल तुझी.

मुलगा हॉटेल मॅनेजमेंटला जायचं म्हणातोय, दोन वर्षांचा पाच लाख खर्च आहे, कसं जमवू. आडीपीएलवाले जॉब द्यायला तयार आहेत पण काम सध्या करतोय त्याच्याएवढं चांगलं नाही, पुन्हा हुद्दाही सध्यापेक्षा जरा कमीचाच मिळतोय, नुसत्या पैशांकडे बघून करू का शिफ्ट. मग इथे कमावलेल्या क्रेडीटचं काय?

काय वैताग नियम आहेत या देशाचे? आता माझ्याकडे भारतातली चांगली एमडी डीग्री असतांना, दोन वर्षांची प्रॅक्टीस असतांना इथे काम करण्यासाठी पुन्हा दोन वर्ष अभ्यास करा आणि परीक्षा द्या. छ्या नुसता टाईमपास. कशाला आलो ह्या देशात. ह्याच्या बदलीपायी माझ्या करीयरची वाट. पण मला कथ्थक फार छान येतं. पूर्ण पाच वर्ष महाराजांकडे प्रशिक्षण घेतलंय, रियाज चालूच आहे, स्टेज शोजचा अनुभव आहे मग मी इथे पण शोज करू का? प्रशिक्षण पण देऊ शकतेच की मी.

मला सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जायचंय, मी फॅक्टरीतून आल्यावर रोज किमान चार तास अभ्यास करतो.
दोन महिन्यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ फक्त अभ्यास करणार. परीक्षा सहा महिन्यांनी आहे.

मला सध्याची नोकरी सोडून माझं स्वतःचं हॉटेल उघडायचंय मी आणि माझा मित्र पार्टनर होणार आहोत. एक हॉटेल चालवायलाही घेणार आहोत. पैशांची जमवाजमव करतोय.

मी आजपर्यंत सहा वेगवेगळे व्यवसाय बदलले. फार नाही पण ठीकठाक पैसा कमावलाय पण बॉडीबिल्डींग कधी सोडली नाही. दरवर्षी मी लाखो रुपये खर्च करतो त्याच्यावर.

अरे तू कसला हजरजबाबी आहेस, तू आला की गृपला हसवून हसवून मारतोस, कुणी सुद्धा मी जातो असं म्हणत नाही. स्टँडअप कॉमेडीचा जरूर विचार कर.

अंगावर कामं घेऊन त्येच त्येच सुतारकाम करायचा लय कंटाळा आलाय. हे आजकालचे पोरं काय काय कोर्स करत्येत आणि आणि कायबी डोकं लढिवत्यात फर्निचर मध्ये. परवा एक असंच पोरगं आलं होतं कंपनीकडून कमिशनवर काम देतो बोलत होतं. त्याचं डोकं माझे हात. काय करावं?

अरे तो माझा मावस भाऊ आहे ना तो कसला चंपक आहे माहित्ये, थरमॅक्समधली पन्नासहजाराची एसीमध्येबसून कीबोर्ड बडवायची नोकरी सोडली आणि आता २० बाय २० च्या आणि पत्र्याच्या शेडमध्ये एक मशीन घेऊन वर्कशॉप काढणार आहे म्हणे.

अरे तो आपला १२ वीच्या वर्गातला तो होता ना बघ त्याचा ९८ चा गृप येऊन पण त्याने बाप बिल्डर म्हणून त्याच लाईनमध्ये जाण्यासाठी सिव्हिलला अ‍ॅडमिशन घेतली, अरे तो मर्चंट नेव्हीत गेलाय आता.

ह्या ना अश्या असंख्य घटना, असंख्य प्रसंग. एक विचार, मनाची एक उचल, वेडाची एक लहर, एक निर्णय आणि प्रयत्नांची पराकष्ठा पूर्ण आयुष्य बदलू शकते.

तुम्ही कधी असा विचार केलाय का? अशा पॅराडाईम शिफ्ट साठी प्रयत्न केलाय का?
पास या फेल मॅटर नही करता है बेटा बस जीजान से कोशिश करना जरूरी है. हे बाबावाक्य प्रमाण मानून कधी निर्णय घेतला आहे का? असे प्रसंग तुमच्या आसपास घडले असतील तर दुसर्‍यांसाठी प्रेरणा, सल्ला, मार्गदर्शन म्हणून ते इथे शेअर कराल का?
किंवा असं काहीतरी करायचं आहे पण प्रेरणेचा अभाव आहे, प्रयत्न चालू आहेत पण काही अडचणी येतायेत सल्ला हवाय, हो केलाय प्रयत्न, माझ्याकडे देण्यासाठी सल्ले आहेत......तरी इथे लिहा.

येस्स! आय कॅन विन, यू कॅन डू इट वगैरे सगळं ठीक आहे. पण ह्या धाग्याचा मुख्य ऊद्देश अॅस्पिरंट्सना व्यक्त होण्यासाठी असा काहीसा आहे.

मी का लिहितोय?
............मीही काहीतरी ठरवलंय, प्रयत्न करतोच आहे, कदाचित इथे लिहिणार्‍यांकडून मिळालेली प्रेरणा, सल्ला, मार्गदर्शनामुळे प्रयत्नांना गती मिळू शकेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ईन्ना बेष्टं बेष्टं !!
मी अश्याच मायबोलीकराचे अनुभव वाचण्यासाठी खूप ऊत्सुक आहे.
नवरा म्हणाला मार उडी >>> अजून काय हवं एखाद्याला लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी.

मग २ महिने सुट्टी घेतली. माझ्याच कामाच स्वरुप मुळ गाभा तोच ठेउन बदलता येइल अस वाटल. माझ्या सारखा विचार करणारे इतर तिघे ही सहभागी झाले. तेही भिन्न क्षेत्रातले. काम करण्याचा , आवाका आणि परिघ दोन्ही विस्तारले (१). प्रस्थापितान्शि टक्कर देण सोप नव्हत(२) , त्यावर तोडगा म्हणुन(३) उथळ पाण्यातल्या मारामारी ऐवजी ब्लु ओशन स्टॅटेजी वापरुन खोल , खवळत्या समुद्रात जायच ठरवल(४). पुर्वी केलेल्या बर्या कामान्ची पुण्याई होतीच जमेला.(५)

१) म्हणजे नक्की काय केलं? आधी काय करत होतात आणि नव्याने काय करायचं ठरवलं?
२) काय अडचणी होत्या? प्रस्थपितांकडे काय होतं जे तुमच्याकडे नव्हतं?
३) तोडगा काय होता?
४) हे स्ट्रॅटेजी प्लॅनिंग नक्की काय होतं?
५) काय अचिवमेंटस होत्या पूर्वीच्या?

फार फार ईच्छा आहे जाणून घेण्याची. प्लीज लिहाच.

>ही लई ड्यांजर कंडिशन हाय. काऊंन्सिलिंग मस्ट. >> चमन, हे समोरच्याला फारच चुकीच्या पद्धतीने जोखणं झालं राव! इतक्या सहजपणे आणि. ह्येला येक प्रकारचा कॉम्प्लेक्स म्हनत्यात, नव्हं? Proud

>>पण योजना न ठरवता (योजना ठरवणे म्हणजे म्हणजे मनाविरुद्ध निर्णय घेणे नव्हे) केले >> योजना ठरवणे म्हणजे मनाविरुद्ध निर्णय घेणे नव्हे हे मान्यच आहे रे. Happy कधी कधी घ्यावेही लागतात, पण योजना न ठरवता काही केलेच तर ते दर वेळी फोल ठरेलच हे मला मान्य नाही.

>>मनाला बरोबर घेऊन प्रवास करत राहिलात तर ईवॉल्व्ह होण्याची प्रोसेस आपोआप घडत राहते. >> बरोबर, पण, >>(रिअ‍ॅलिस्टिक आणि मटेरिअल) गोल ठेवा. >> ही अट मान्य नाही Happy एकदम अध्यात्न वगैरे मोठ्या गोष्टी बोलायला नकोत, आणि केवळ मटेरियल गोल ठेवला नाही, म्हणजे कोणी एकदम अध्यात्मात घुसले, असेही नाही. असे आखीव रेखीव कप्पे असतात का रे चमन? Happy

इवॉल्व्ह होण्याची माझी व्याख्या फार सोपी आहे, पण ती माझ्यापुरती. Happy एखादी वा कोणतीही गोष्ट करताना, वा योजना पार पाडताना, मला जे काही भले बुरे अनुभव येतात, शिकायला मिळते ती सर्व प्रोसेस म्हणजे माझ्यासाठी इवॉल्व्ह होणे आहे. माझे अनुभवविश्व समृद्ध होणे हे इवॉल्व्ह होणे आहे, लहान सहान वा मोठ्या बाबतीत. शेवट कसा होणार किंवा झाला, ह्यापेक्षाही तिथवर पोहोचेपरेंत मी काय शिकते हे मला इवॉल्व्ह व्हायला मदत करते, कारण त्यातून गेल्याशिवाय मला जे काय हवे होते, त्यातले चांगले वाईट मला पूर्णपणे कळत नाही. ते बर्‍यापैकी त्या त्या बाबतीत कळू लागले की तेवढ्यापुरते मी इव्हॉल्व्ड.

इन्ना, अगदी बरोबर. आणि प्रत्येकाचा पिंड वेगळा असणार, त्यामुळेच अमूक एक बरोबर वा अमूक एक कमी बरोबर असं लेबल्स नाही लावता येत.

म्हणूनच मी म्हणतो आहे की आयुष्याचे ध्येय 'अल्टिमेट गोल', ईवॉल्व्ह वगैरे फंदात न पडता...आपल्या मनाचा कौल घेऊन छोटे छोटे (रिअ‍ॅलिस्टिक आणि मटेरिअल) गोल ठेवा.>>>
बरोबर ,आज जे पटतय ते प्रॅक्टिकॅलिटी च्या परिसावर घासून पहा. मग पुढे जा.
एक दरवाजा बंद झाला की १००००० उघडतात हा माझा अनुभव आहे.
>>ब्लू ओशन स्ट्रॅटेजी>>> फारशी अ‍ॅप्ट वाटली नाही कारण त्याला प्रचंड पूर्वतयारी लागते. नुसत्या पूर्व् ग्रहावरून आपला ब्लू ओशन ठरविता येत नाही. असे माझे मत!!

चमन, हे समोरच्याला फारच चुकीच्या पद्धतीने जोखणं झालं राव! इतक्या सहजपणे आणि. ह्येला येक प्रकारचा कॉम्प्लेक्स म्हनत्यात, नव्हं? >>> अरे सॉरी!! माझा तिथे स्मायली टाकायचा राहून गेला.
नाही पण खरच अशी धरसोड वृत्ती फार धोकादायक आहे. ह्यात सगळ्यांचीच फार फरपट होते. म्हणून 'टू स्टे फोकस्ड' फारच जरूरी आहे आणि ते जमवण्यासाठी मदत घ्यावी लागली तर त्यात कॉम्लेक्स वाटू नये हे माझे मत.

पण योजना न ठरवता काही केलेच तर ते दर वेळी फोल ठरेलच हे मला मान्य नाही. >> मान्य!! पण रिस्क खूप जास्त आहे. आणि योजना नाही म्हणजे काय? मला मुंबईवरून चेन्नईला जायचे आहे म्हणजे.
तिकिट काढणे -> एअरपोर्ट पर्यंत टॅक्सी करणे -> लगेज चेक ईन->बरोबर गेट वर जाऊन विमान पकडणे -> ऊतरल्यावर लगेज कलेक्ट करणे -> ऑटो करणे -> ईच्छित स्थळी जाणे.

तू म्हणशील मी काही योजना न बनवता मुंबईवरून चेन्नईला गेले. पण तू कागदावर लिहिले नसलेस तरी तुला माहितीच होते ना की आपल्याला असेच करायचे आहे ते (त्यालाच तर योजना म्हणतात ना!). मग तू कसं म्हणतेस योजना नव्हती म्हणून.

आता असे बघ 'चेन्नईला ऑटो टॅक्सीचा संप' आहे आणि तुला ईच्छित स्थळी पोहोचण्यासाठी काहीच ऊपाय नाही. मग तू म्हणणार अरे माझ्या भावाचा जवळचा मित्र चेन्नईतच राहतो त्याला फोन करून बघते, पण त्याचा फोन नंबर नाही. आली ना रिस्क योजना न बनवल्याने. हेच तू योजना बनवून प्रत्येक स्टेप मधली रिस्क ओळखून केलेस तर तू वेळेत 'ईच्छित स्थळी' पोहोचण्याची शक्यता अधिक नाही का?

असे आखीव रेखीव कप्पे असतात का रे चमन? >> नसतात ना आणि तेच तर आपल्याला बनवायचे आहेत ना. नाही तर मग आयुष्य जातंय तसं तर जातंच राहणार. जर तू आहे त्यात खूष आहेस तर मग ...मग पुढे काय लिहू?

इवॉल्व्ह होण्याची माझी व्याख्या फार सोपी आहे, पण ती माझ्यापुरती. एखादी वा कोणतीही गोष्ट करताना, वा योजना पार पाडताना, मला जे काही भले बुरे अनुभव येतात, शिकायला मिळते ती सर्व प्रोसेस म्हणजे माझ्यासाठी इवॉल्व्ह होणे आहे. माझे अनुभवविश्व समृद्ध होणे हे इवॉल्व्ह होणे आहे, लहान सहान वा मोठ्या बाबतीत. शेवट कसा होणार किंवा झाला, ह्यापेक्षाही तिथवर पोहोचेपरेंत मी काय शिकते हे मला इवॉल्व्ह व्हायला मदत करते, कारण त्यातून गेल्याशिवाय मला जे काय हवे होते, त्यातले चांगले वाईट मला पूर्णपणे कळत नाही. ते बर्‍यापैकी त्या त्या बाबतीत कळू लागले की तेवढ्यापुरते मी इव्हॉल्व्ड. >> तिथपर्यंत पोहोचणे म्हणजे कुठवर पोहोचणे? तू काहीतरी ठरवल्याशिवाय का तुला माहित झालं का तू कुठे पोहोचू पहात आहेस Happy . मग अजून थोडे पुढे जाऊन पाहू काय आहे, अजून पुढे बघू काय सापडतंय त्यालाच तर 'गोल ठेवणं' म्हणतात ना. आणि एकातून दुसरा तिथून तिसरा असे चालूच राहते ना? मग त्याला आयुष्य म्हणतात ना? मग असे एक एक करत आपण जिथे पोहोचलेले असू त्यालाच आयुष्यात मी ध्येय गाठले असे म्हणतात ना?

चमन, तुमच्या या आधीच्या बर्‍याचश्या पोस्टी पटल्यात पण आता शेवटच्या दोन तीन फारश्या पटल्या नाहीत.

शैलजा , करेक्ट. मला पटतय तुझे. आयुष्यभर आपण आखीव रेखीव तर जगत नाही ना...

फोकस्ड राहण्यात काहीच गैर नाहीये चमन. Happy पण फोकस्ड झापडबंदमध्ये बदलू नये, इतकेच.

>>तिकिट काढणे -> एअरपोर्ट पर्यंत टॅक्सी करणे -> लगेज चेक ईन->बरोबर गेट वर जाऊन विमान पकडणे -> ऊतरल्यावर लगेज कलेक्ट करणे -> ऑटो करणे -> ईच्छित स्थळी जाणे. >>

परफेक्ट योजना, पण, ह्यात खाचखळगे आले तर?

तिकिट काढणे - इथेही लिहिणार होते काय अडचणी येऊ शकतात ते, पण राहूदेत . Happy
एअरपोर्ट पर्यंत टॅक्सी करणे - अचानक टॅक्सीवाल्यांचा संप.
लगेज चेक ईन->बरोबर गेट वर जाऊन विमान पकडणे - इतकी भली मोठी रांग की व्यवस्था कोलमडून फ्लाईटच चुकली की राव! आता काय करता? Proud
ऊतरल्यावर लगेज कलेक्ट करणे -> कसलं काय!
ऑटो करणे -> ईच्छित स्थळी जाणे. >> योजना तर होती, पण आता बदल जरुरी. नाहीतर आज डील होणार होते, ते हातातून जाईल.

होऊ शकते ना असे चमन? तू तर चेन्नईला संपाची शक्यता गृहीत धरतो आहेस. ते फारच पुढे, त्याआधीच काही होऊ शकते, कोणत्याही क्षणी, अनपेक्षित. आणि जर का असे होईल, तर कदाचित त्या exact क्षणी एखाद्याला लगेच माहित नसेल पुढची स्टेप काय घ्यायची, पण म्हणून तो काय लगेच निकामी ठरला का?
किंवा लगेच धरसोड वृत्ती होते का? शोध घेता येईल ना.

>>हेच तू योजना बनवून प्रत्येक स्टेप मधली रिस्क ओळखून केलेस तर >> १० रिस्क्स मला ठाऊक आहेत असे मानू, त्यांविषयी मी खबरदारीही घेईन पण एखादी अकरावी रिस्क, जी येऊ शकते हेच मला ठाऊक नसेल तर? ती येईपरेंत अशी रिस्क येऊ शकते हेच माझ्या गावी नसेल तर? आल्याशिवाय आणि त्यातून पार पडल्याशिवाय मला अनुभव येईल का? की हे माझ्या योजनेत बसत नाही म्हणून हात वर करायचे? Happy

>>नसतात ना आणि तेच तर आपल्याला बनवायचे आहेत ना. >> इतके आखीव रेखीव सारे फक्त कथा कादंबर्‍या, सिनेमा वा अति सोपी आयुष्ये ह्यातच शक्य वाटते मला. Happy असे कप्पे बनवायचे? कशाला? रोबोसारखे जगायला? मला समजले नाही. मग पुन्हा पहिले पाढे पंच्चावन्न होत राहणार की. चेंज हवा आहे म्हणजे to be in control at any given time and situation असे आहे का? माझ्यामते तरी नाही. तसे अपेक्षित असल्यास मग बोलायलाच रहात नाही काही शिल्लक.

>नाही तर मग आयुष्य जातंय तसं तर जातंच राहणार. >> नाही. Happy का बरं तसंच जात राहील आयुष्य? काही चेंज हवा आहे, पण काय हवे आहे हे ठाऊक नसेल, तर ते शोधता येईल. ठाऊक असेल, तर ते मिळवता येईल का हे चाचपता येईल. चाचपून पाहिले आणि जर का वाटले की काही कारणाने नाही जमणार, तर नवीन काही शोधता येईल. ह्यासाठी एकदम सगळ्या जबाबदार्‍या वा असलेली सुरक्षा फेकून देऊन काही करायचीही आवश्यकता आहे असे नाहीये. मुळात, स्वतःला शोधणे हे शेवटी महत्वाचे नाही का? ट्रायल आणि एरर बेसिसवरच होऊ शकते हे.

>>तिथपर्यंत पोहोचणे म्हणजे कुठवर पोहोचणे? तू काहीतरी ठरवल्याशिवाय का तुला माहित झालं का तू कुठे पोहोचू पहात आहेस . मग अजून थोडे पुढे जाऊन पाहू काय आहे, अजून पुढे बघू काय सापडतंय त्यालाच तर 'गोल ठेवणं' म्हणतात ना. आणि एकातून दुसरा तिथून तिसरा असे चालूच राहते ना? मग त्याला आयुष्य म्हणतात ना? मग असे एक एक करत आपण जिथे पोहोचलेले असू त्यालाच आयुष्यात मी ध्येय गाठले असे म्हणतात ना? >> हेच मी म्हणत आहे, पण मला जर मध्येच असे ल़क्षात आले की जे मी ठरवले होते ते आता माझ्यासाठी तितकेसे महत्वाचे नाही, तर मार्ग बदलायचे स्वातंत्र्यही मला आहे. ते मी गमावणार नाही. Happy

केवळ मटेरिअलिस्टीक "यश" हा एखाद्याचा गोल नसेलही. काय चुकले? ध्येय गाठणे म्हणजेच सक्सेस स्टोरी का?

जौद्यात Happy लोकांनाही कंटाळा यायला लागलाय म्हणे वाचायचा Proud

मी केला होता प्रयत्न मित्राबरोबर....जेवा इंजीनेरिंग केले तेवा आम्ही Engineering realted काम घेत होतो ......पण मंदीच्या काळात मोठे मोठे उद्योग बंद पडले.....२००७ ची गोष्ट...
आमचे पण काम मिळणे कमी झाले...नन्तर जोब केला ....म्हणजे आता पण करत आहे......पण नवीन buiseness experience फार मस्त होता ......ती धावपळ ...तो जोश ...ते या नौकरी मध्ये नाही.....पण एक शिकलो.....calculated रिस्क घेण फार महत्वाच...आणि मला अजूनही नवीन buisenss madhe उतरण्याची खूप इच्छा आहे .......

परफेक्ट योजना, पण, ह्यात खाचखळगे आले तर? >>> येणार ना. मग? योजना बनवून १० खाचखळगे येणार असतील योजना न बनवता २५ येतील. आहे तयारी?

होऊ शकते ना असे चमन? तू तर चेन्नईला संपाची शक्यता गृहीत धरतो आहेस. ते फारच पुढे, त्याआधीच काही होऊ शकते, कोणत्याही क्षणी, अनपेक्षित. आणि जर का असे होईल, तर कदाचित त्या exact क्षणी एखाद्याला लगेच माहित नसेल पुढची स्टेप काय घ्यायची, पण म्हणून तो काय लगेच निकामी ठरला का?
किंवा लगेच धरसोड वृत्ती होते का? >>> > मी असे म्हणालो का निकामी ठरतो म्हणून? शोध घेता येईल ना. तू म्हणतेस चुका करूदेत तो शिकेल. ठीक आहे अश्या प्रत्येक ठिकाणी चुका करून त्यातूनच शिकण्यासाठी वेळ आणि एनर्जी खर्च करायची तयारी असेल तर स्काय ईज द लिमिट. गो ऑन.
धरसोड वृत्ती मी 'आज असे वाटते, मग ऊद्या दुसरे हवे वाटते मग पहिले फोल वाटते ह्याला म्हणालो' तू त्याची लिंक दुसरीकडे लावते आहेस.

१० रिस्क्स मला ठाऊक आहेत असे मानू, त्यांविषयी मी खबरदारीही घेईन पण एखादी अकरावी रिस्क, जी येऊ शकते हेच मला ठाऊक नसेल तर? ती येईपरेंत अशी रिस्क येऊ शकते हेच माझ्या गावी नसेल तर? आल्याशिवाय आणि त्यातून पार पडल्याशिवाय मला अनुभव येईल का? की हे माझ्या योजनेत बसत नाही म्हणून हात वर करायचे? >>> योजना नसल्यास ११ रिस्क्स असू शकतात आणि हात वर करण्याच्या वेळा जास्त येतील असे मला वाटते. योजना बनवल्यानंतर काही प्रॉब्लेम्स आल्यास हात वर करा असं कोण म्हणतंय? ऊलट न घाबरता आत्मविश्वासाने सामोरे जा असेच मी सांगतोय सगळ्यांना.

नाही तर मग आयुष्य जातंय तसं तर जातंच राहणार. >> नाही. का बरं तसंच जात राहील आयुष्य? काही चेंज हवा आहे, पण काय हवे आहे हे ठाऊक नसेल, तर ते शोधता येईल. ठाऊक असेल, तर ते मिळवता येईल का हे चाचपता येईल. चाचपून पाहिले आणि जर का वाटले की काही कारणाने नाही जमणार, तर नवीन काही शोधता येईल. ह्यासाठी एकदम सगळ्या जबाबदार्‍या वा असलेली सुरक्षा फेकून देऊन काही करायचीही आवश्यकता आहे असे नाहीये. मुळात, स्वतःला शोधणे हे शेवटी महत्वाचे नाही का? ट्रायल आणि एरर बेसिसवरच होऊ शकते हे. >>>> घ्या!! अहो मग तेच तर करा म्हणतोय ना मी. काय बदल हवा आहे हे शोधत रहा, सापडलं तर त्यासाठी प्रयत्न करा. नाही जमले तर योजना आखा पुन्हा प्रयत्न करा. हेच तर म्हणालो ना मी मागे अगणित वेळा. 'होल्ड करा' मी मागचे मराठीतंच लिहिलंय ना बघून येतो.

हेच मी म्हणत आहे, पण मला जर मध्येच असे ल़क्षात आले की जे मी ठरवले होते ते आता माझ्यासाठी तितकेसे महत्वाचे नाही, तर मार्ग बदलायचे स्वातंत्र्यही मला आहे. ते मी गमावणार नाही. >> कोण तुमचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं म्हणे? सराऊंडीग्ज बदलल्या तर बदला ना योजना. ती आपण काही भारत सरकारच्या स्टँप पेपरवर लिहून ठेवली नाहीये ना बदलता न यायला.

केवळ मटेरिअलिस्टीक "यश" हा एखाद्याचा गोल नसेलही. काय चुकले? ध्येय गाठणे म्हणजेच सक्सेस स्टोरी का? >> आता खरंच काय लिहावे कळेना. ज्यांना काही बदलवण्याची ईच्छा आहे त्यांच्याबद्दल बोलतोय ना. मग तुम्हाला काय बदलायचं आहे हे तुम्ही एखाद्या मटेरिअल गोष्टीच्या अनुषंगाने नाही तर कशाचा आधार घेऊन सांगाल?

मला माझा आत्मा बदलायचा आहे.
मला स्पिरिचुअली वरचा टप्पा गाठायचा आहे.
मला ईवॉल्व्ह व्हायचे आहे.

असे लिहून बघ आणि त्यावर त्यासाठी मी काय करू शकते असा प्रश्न विचारून पहा. काय ऊत्तर येईल ते आपण बघूया.

ध्येय गाठणे म्हणजेच सक्सेस स्टोरी का >> मग सक्सेसफुल झालं असं कधी म्हणायचं असतं?

प्रश्न फार साधा होता आणि त्याचा खूप कीस निघाला असे मला वाटते.
'तुम्हाला तुमच्या आयुष्यात एखादी गोष्टं बदलावीशी वाटतेय का? ऊत्तर हो असेल तर त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय ते लिहा.

ह्या चर्चेला कंटाळून साक्षात ब्रम्हदेव खाली आला आणि विचारलं 'प्रत्येकाने आपापल्याला हवा असलेला बदल सांगा पटकन मी करून देतो'
तर तुम्ही 'माझ्या सेलफोनची रिंगटोन बदलून दे' ईथपासून तर 'माझा आत्मा बदलून दे' असं काहीही सांगू शकता' फक्त काय सांगायचं हे तुम्हाला माहित आहे का? एवढंच विचारलं होतं.

पण आपण ब्रम्हदेवालाच विचारतोय 'Define change, what do you exactly mean by change spiritual or practical. planned or unplanned, ethical or unethical, forward or backward.!!!'
Proud

>>अशी रिस्क येऊ शकते हेच माझ्या गावी नसेल तर?
तेच तर. म्हणून आपल्या योजना आणि नंतर खरे काय घडले त्याबद्दलचे अनुभव लिहा असे म्हणणे आहे. जर योजना आखून सगळे त्याप्रमाणे झाले तर उत्तमच, पण सहसा तसे होत नाही. म्हणून असे अनुभव शेअर करणे उपयोगाचे आहे. माझ्या ठेचेतून कोणी शहाणे होऊ शकले तर हवे आहे म्हणून.

हे सर्व पॅरलल चेंजेस आहेत. असे कोणास वाट्ते का? कि एक कंपनी हेड केली, मग दुसरी, मग एक गृप ऑफ कंपनीज व मग एक औद्योगिक साम्राज्य? मग सरकारला पॉलिसी संबंधी सल्ला देणे इत्यादी? हा ही चेंज होऊ शकतो ना? प्रत्येक पातळीवर जीवन बदलूनच जाणार आहे एक्स्पोजर वाढणार आहे. किंवा एक विषय शिकवला मग तो युनी. पातळी वर शिकविला, मग त्याच विषयातील पेटंट्स घेतली, मग ते वापरून उत्पादने सर्विसेस बनविल्या, विकल्या इत्यादी. नव्या पिढीचे जीवनच बदलले. ह्यावर पुस्तक लिहीले, शिवाय बरोबरीने जग अनुभवले. वाद्य शिकले, छान मैत्र्या केल्या. तर्‍हे तर्‍हेचे अन्न चाखून पाहिले? एक इंटलेक्च्युअल ट्रॅक व एक भावनिक, फीलिन्ग्ज अनुभव, एक्स्प्रेशन्स चा अशी पण ग्रोथ होते ना? फाइन मन, स्टीव जॉब्स, व्हर्जिन मोबाइलचा मालक, रहमान, हे माझे गुरू आहेत. त्यामुळे अशी विचारसरणी आहे कदाचित. मी डेटुडेच इंटेन्स व मल्टिलेव्हल जगते त्यामुळे काही लेव्हल्स बदलत राहतात काही कायम राहतात. अर्थात जबाबदार्‍या नसत्या तर एक स्कॉर्पिओ, एक कॅमेरा अन एक लॅप्टॉप घेऊन पळून जावे असे मलाही वाट्ते.

चमन अहो वयाचा मुद्दा कारण मी प्रॅक्टिकल आणि प्रोअ‍ॅक्टिव आहे ना. काही एक स्टेप घ्यावी व आजारी पडावे असे होउ नये इतकेच.

वरील उदाहरणातील माणूस ड्रिफ्टरही असू शकेल.

चमन, माझी ही शेवटची पोस्ट Happy We definitely agree to disagree. पण लगेच उचकू नकोस. तुझ्या पोस्टी मस्त sarcastic आणि चिडचिड्या होत चालल्यात. Happy

>>योजना न बनवता २५ येतील. आहे तयारी? >> होय, आहे.
>>धरसोड वृत्ती मी 'आज असे वाटते, मग ऊद्या दुसरे हवे वाटते मग पहिले फोल वाटते ह्याला म्हणालो' तू त्याची लिंक दुसरीकडे लावते आहेस. >> नाही. मी दुसरीकडे काही लिंक लावत नाही.

मला नाही वाटत इथे कोणी इतक्या superficially आज हे, उद्या ते असे म्हणत आहे. तसे समजणे म्हणजे इथे कळकळीने लिहिणार्‍यांबद्दल वा त्यांची समज ह्याबद्दल फार चुकीचा विचार करणे, असे झाले. खरंच. समोरच्याला इतकेही समजत नाहे, हे चुकीचे आणि arrogant assumption झाले. हे तुला वैयक्तिक अजिबात म्हणत नाही, गैरसमज नसावा. ह्या विचारसरणीबद्दल बोलते आहे, पण ते अवांतर होईल, तेह्वा राहूदेत. प्रत्येकालाच ठरवलेला गोल हासिल करणेच म्हणजेच यशस्वी होणे, असे वाटत नसण्याची शक्यता असते. जरी "गोल गाठता" आला नाही, तरी त्यासाठी केलेला प्रवास हाही खूप काही शिकवून जातो. अनुभवविश्व समृद्ध होणं हेही यशस्वी होणंच वाटतं मला.

इन्ना >>माझी आजी म्हणायची तस प्रत्येकाला आपल्या परसातल आळु किती खाजत त्याचा अन्दाज असतो. त्यामुळे आपण आपापल्या अळुची भाजी करावी. न खाजणारी>> हे भारीये आणि किती खरंय Proud

अजय जवादे, थँक्स, Lol TED Talk मस्तय.
स्टीव्हन जे कोण आहे ते गुगलुन पाहीले.

इन्ना मस्त पोस्ट. ते आजीचे वाक्यही मस्त. सायो+१.

अश्विनीमामी, मस्त पोस्ट. पॅरालल चेंजेस भन्नाट असतात. पण परवाच तुम्ही असे लोकं स्वतःचा कंटाळा इतरांवर प्रोजेक्ट करतात असे म्हणलेत ना ? Uhoh
Drifters गंमत आणतात स्वतःसोबत..

शैलजाचे बरेचसे मुद्दे पटले.

ओये चमन, मुद्दे अपार्ट तू खरंच बरेच सोपे निष्कर्ष काढतो आहेस आता. Uhoh

आता 'आय डोंट नीड अ चेंज' अशी विचारधारा असलेले कोणीतरी लिहायला हवेय. केश्विनी सारखे.

चमन, माझी ही शेवटची पोस्ट We definitely agree to disagree. पण लगेच उचकू नकोस. तुझ्या पोस्टी मस्त sarcastic आणि चिडचिड्या होत चालल्यात. >>> अगं नाही तुला कदाचित तसे वाटले असेल. मी थोडी नम्र विनोदाची पखरण करावी म्हणून तसे लिहिले. स्थितप्रज्ञासारखे ह्या बाफाच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी लिहीन, तू अजूनही तुला वाटते ते लिही. मी आजिबात चिडून वगैरे प्रतिसाद देत नाही. शेवटचे वगैरे काही न म्हणता तू लिही, चर्चा करत राहू कुठेतरी तू नक्की अ‍ॅग्री होशील. Lol

>>योजना न बनवता २५ येतील. आहे तयारी? >> होय, आहे. >>> मग प्रश्नच मिटला. बेस्ट लक. पण अनुभव ईथे नक्की लिही. मला त्यातून शिकता आले तर चांगलेच आहे. माझे अनुभवविश्व खुर्चीवर बसल्याबसल्या समृद्ध होतेय तर मला हवेच आहे.

मला नाही वाटत इथे कोणी इतक्या superficially आज हे, उद्या ते असे म्हणत आहे. तसे समजणे म्हणजे इथे कळकळीने लिहिणार्‍यांबद्दल वा त्यांची समज ह्याबद्दल फार चुकीचा विचार करणे, असे झाले. खरंच. समोरच्याला इतकेही समजत नाहे, हे चुकीचे आणि arrogant assumption झाले. हे तुला वैयक्तिक अजिबात म्हणत नाही, गैरसमज नसावा. ह्या विचारसरणीबद्दल बोलते आहे, पण ते अवांतर होईल, तेह्वा राहूदेत.>>> नाही नाही गैरसमज आजिबात नाही. काळजी नसावी.

प्रत्येकालाच ठरवलेला गोल हासिल करणेच म्हणजेच यशस्वी होणे, असे वाटत नसण्याची शक्यता असते. जरी "गोल गाठता" आला नाही, तरी त्यासाठी केलेला प्रवास हाही खूप काही शिकवून जातो. अनुभवविश्व समृद्ध होणं हेही यशस्वी होणंच वाटतं मला. >>> १००% मान्य!
काय ठरवले होते, काय केले आणि काय झाले तेच तर लिहायचं आहे. लिही बरं. बाकी समज/गैरसमज
अ‍ॅरोगन्ट्/नाईव वगैरे राहूदेत. त्याने काहीही फरक पडत नाही.

शैलजा/ रैना
माझं काही टेरिबली चुकलंय असं मला खरंच वाटत नाही. लिहितांना एखादा शब्द ईकडे तिकडे कमी जास्तं झाला असेल. पण चर्वित चर्वण आणि शब्दांचे खेळ टाळून स्पेसिफिक लिहा हेच तेव्हाही आणि आत्ताही म्हणणे आहे. निष्कर्ष वगैरे नाही काढले आणि त्याची गरजही वाटत नाही.

काय ठरवले होते/आहे, काय केले/करतो आहे आणि काय झाले/करायचे आहे.
एवढेच वाचायचे होते.

दुसर्‍यांच्या अनुभवातून काहीतरी आपल्याला हवं असलेलं मिळावं हाच स्वार्थी ऊद्देश बाकी काही नाही.
रेव्यु , मास्तुरे, निवांत आणि राजू व ईन्ना, नंदिनी आणि अश्विनी एवढ्यांच्याच पोष्टी काय त्या बाफला धरून वाटल्या बाकी माझ्यासकट सगळ्यांच्याच पोष्टी असल्या नसल्याने काही फरक पडेल असे वाटत नाही.

मला माझी पूर्ण गोष्ट (अ‍ॅट द कॉस्ट ऑफ बीइंग ब्रँडेड आत्म प्रौढी ) लिहाविशी वाटते.
-वय वर्ष १५- घरची परिस्थिती वाईट- यथा तथा महिना जायचा-घरात सर्व हुषार्-वडील प्रकांड पंडित्-इंग्रजी व संस्कृत- शिक्षक्,मुख्याध्यापक पेशा- अचानक निधन
- वय १६- नातेवाईकांनी घेतलेली जबाबदारी- त्यांच्याप्रमाणे ,मी बी.ई करावे- मी नकार दिला-
आदर्श -मामा- घरी मर्सिडिझ बेंझ- उद्योगपती- चाकोरी बदलून मॅट्रिक नंतर वर्क शॉप टाकले- वय २९- वर्ष १९६६-तो पहिला आदर्श -कारण त्याचे वडिल म्हणजे आजोबा भिक्षुकी करायचे- अन हा पठ्ठ्या त्या काळी १९५७ मध्ये लंडनला जावून अ‍ॅप्रेंटिस होवून आला होता.
-मॅट्रिक ला बोर्डात ३ रा- मी- पण चक्क -अ‍ॅप्रेंटिस म्हणून लागलो-फिटर -ट्रेड मध्ये-
पहिली यशस्वी धडाडी-कारण मला स्वतः अर्थार्जन करून शिकायचे होते-पगार प्रिंसली रु २२५ -वर्ष १९७०-प्रोस्पेक्टस- रिटायर्मेट पर्ञंत मुकादम व्हायची शक्यता- मनाने दिला नकार
- मग वाटले- शिक्षण अत्यावश्यक- रात्र पाळी व दिवसा कॉलेज - एम ई पर्यंत- का -किक म्हणून्-पण तरीही युनियनाएज्ड लेबर म्हणून काम केले
-कंटाळा आला त्या ग्रेड मध्ये- कारण सर्वात मोठी ग्रेड ८ वर्षात गाठली ( नॉर्मली याला २० वर्षे लागतात)
- मग कंपनीच्या इतिहासात पहिली युनियन ते मॅनेजमेंट ग्रेड मध्ये बढती. लोकेशन मात्र बदलले
-७~८ वर्षांनंतर जनरल मॅनेजमेंट मध्ये जायची खुमखुमी- मग एम बी ए व जनरल मॅनेजर
-मग जनरल मॅनेजर म्हणून ४ नोकर्‍या बदलल्या- रॅट रेसचा अनुभव पदोपदी
-मग जे पॅराडाएम्स होते यशाचे ते बदलले-(वैयक्तिक व व्यावसायीक) -अन मग नोकरी सोडली- पुढचे -मायबोलीकरांना विदित आहे
- मतितार्थ
-गोल फिक्स नसतात
=अनुभवानुसार बदलतात
-बदल अत्यंत आवश्यक्-स्वांतसुखाय
- अन पण हा वैश्विक सिध्दांत नाही
-काही जण काहीही न बदलता सुखात रहातात म्हणून त्यांचे सुख अथवा"दु;ख" -दुय्यम ठरविणारे आपण कोण?

>>> मास्तुरे रेव्यु, त्यासाठीच तर मी ईथे 'योजना योजना' म्हणून घसा कोरडा करतोय. पण कोणी त्याबद्दल एक अक्षरही बोलत नाही.

चमन,

उशीरा प्रतिसाद देतोय. तुमचे सर्व प्रतिसाद आवडले. त्यातले बहुतेक मुद्दे पटले. योजना आखल्याशिवाय बदल करणे खूप अवघड आहे. आपली बलस्थाने, दुर्बलस्थाने, जबाबदार्‍या, आर्थिक परिस्थिती, आपल्याला कितपत रिस्क घेता येणे शक्य आहे याचे विश्लेषण, इ. अनेक पैलूंचा विचार करूनच बदलाची योजना आखावी लागते व निव्वळ एकच योजना न आखता एखादा पर्यायी बॅकअप प्लॅन पण तयार ठेवावा लागतो.

माझ्या माहितीतले अजून एक यशस्वी उदाहरण -

ही व्यक्ती आयटीमध्ये होती. ६ वर्षे एच १ व्हिसावर अमेरिकेत काम करून वयाच्या ३७ व्या वर्षी ही व्यक्ती भारतात परत आली. त्यानंतर २ वर्षे एका मोठ्या कॉर्पोरेट आयटी कंपनीत जॉब केला. अमेरिकेतल्या कॉन्टॅक्ट्समुळे या व्यक्तीला एक छोटीशी सिस्टिम तयार करण्याचे काम मिळाल्यावर याने चांगल्या पगाराचा जॉब सोडून इतर २-३ जणांना मदतीला घेऊन एक छोटीशी कंपनी स्थापन करून सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम सुरू केले. पहिले मिळालेले काम संपायला वर्ष लागले व नंतर त्याच्या देखभालीचे काम अजून १-२ वर्षे सुरू होते. पण नंतर सर्व काही थंड पडले. स्थानिक किंवा बाहेरचे कोणतेही नवीन काम मिळाले नाही. शेवटी वैतागून आपला छोटासा सेटअप बंद करून याने परत जॉब शोधायल सुरूवात केली. पण वय ४२ च्या पुढे गेल्यामुळे आता जॉब मिळणे सोपे नव्हते. शेवटी एका खूप लहान कंपनीत जॉब मिळाला. २००८ च्या सबप्राईम ब्रोकरेजमुळे आलेल्या मंदीत तो जॉब गेला. काही महिन्यांनी अजून एका छोट्या कंपनीत जॉब मिळाला. त्यात प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या बरोबरीने कोडिंग देखील करावे लागते. पण अजून जॉब टिकून आहे. सध्या त्याचे व्यवस्थित चालले आहे. त्याने घेतलेली उडी खूपच मर्यादित प्रमाणात यशस्वी ठरली. त्याने धाडस करून बघितले. पण फार पुढे जाता येत नाही हे लक्षात आल्यावर शेवटी जॉबच्या जुन्या वाटेनेच प्रवास सुरू केला.

माझ्या माहितीत अजून एक इंटरेस्टिंग केस आहे. एका अत्यंत मोठ्या पदावरच्या व्यक्तीने घेतलेली उडी योग्य नियोजन न केल्याने व योग्य पार्टनर न निवडल्याने कशी फसली व त्याचे सर्व आयुष्यच कसे बदलून गेले ते पुढच्या प्रतिसादात लिहीन.

काही जण काहीही न बदलता सुखात रहातात म्हणून त्यांचे सुख अथवा"दु;ख" -दुय्यम ठरविणारे आपण कोण? >>> पटले. वेल सेड. आणि उलटही. ज्यांना बदल महत्त्वाचा वाटतो त्यांनाही सुखी अथवा दु:खी असे जज करायला जाऊ नये.

ओके चमन. Happy

ते 'ब्लु ओशन' काय प्रकरण आहे? नवीन मॅनेजमेंट फंडा का?

हा जुना फंडा आहे -साध्या शब्दात्-तुमच्या मध्ये तुमच्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत काही तरी डिफरंशियेटिंग फॅक्टर हवा मग तुम्ही त्या व्यवसाय्रूपी अथांग सागरात ( म्हणजे तो ब्लु ओशन) मध्ये आपले स्थान अबाधित ठेवून विहार करू शकता.ज्यांच्या कडे हे नसेल ते रेड ओशन मध्ये असतात व ते घातक प्रतिस्पर्धेत ब्लड बाथचे भक्ष्य बनतात्ए २००५ साली W. Chan Kim and Renée Mauborgne यांनी लिहिलेले पुस्तक आहे.
अधिक माहिती साठी
http://en.wikipedia.org/wiki/Blue_Ocean_Strategy
क्षमस्व्-थोडे विषयांतर
हे सर्वेसर्वा आहे असे नाही

रेव्यु, सगळ्या पोस्ट्स आवडल्या.
शैलजाच्या पोस्टसनाही अनुमोदन.

मला थोरोचं हे वाक्य फार फार आवडतं, पटतं:
If a man does not keep pace with his companions, perhaps it is because he hears a different drummer. Let him step to the music which he hears, however measured or far away.

चमन, तुला मोठी गाडी, मोठ्या पगाराची नोकरी, मोठं घर, मोठा काऊच हे सगळं फॉरवर्ड वाटत असेल, म्हणून मलाही ते वाटावं असा अट्टाहास का?
हे सगळं ह्या क्षणी घेण्याची कपॅसिटी माझ्याकडे असेल आणि तरिही मला हे सगळं 'ध्येय' म्हणावं असं वाटत नसेल, किंवा करावसही वाटत नसेल (समजा फुटकळ वाटत असेल :))ही शक्यता तू लक्षात घेतली आहेस का?

माझ्या दृष्टीनं हा सगळा प्रवास आहे, मुक्कामाचं ठिकाण नाही.
विविध अनुभव - त्यातून माणुस म्हणून येणारी परिपक्वता हे माझ्या दृष्टीनं मुक्कामाचं ठिकाण आहे.
जे मला जगताना 'बाय द वे' येत असतील किंवा मी 'आऊट ऑफ द वे' जाऊन मिळवत असेन.
किंवा माझे अजूनही काही 'प्लॅन्स' असतील, जे लोकांना सांगायला मी रेडी नसेन/ कम्फर्टेबल नसेन.
आपली वैचारिक आंदोलनं चालू असताना, व्ह्यू तयार होण्याची प्रक्रिया चालू असताना - ते शेअर करायला समोरचा माणूस तितका जवळचा लागतो, त्याच्या पात्रतेवर आपला विश्वास असावा लागतो.
इथ लिहिलेली अनेक लोकं 'आपल्याला आयुष्याकडून काय मिळवायचं आहे' हे शोधण्याचा प्रयत्न करताहेत - असं त्यांच्या पोस्ट वरून दिसतं, ह्यात मटेरिअलिस्टिक गोल्स, माणूस म्हणून घडणं ह्या सगळ्या गोष्टी येतात. असं असताना एखाद्याला 'काऊन्सेलरची गरज आहे', म्हणून गाळात काढण्यात काय अर्थ आहे.
----
नोकरी करताना वाईट अनुभव येताहेत, आयुष्यावर कन्ट्रोल नाही असं वाटतय तर व्यवसाय करा, असा सल्ला देताना - त्या माणसावरच्या जवाबदार्‍या, त्याची परिस्थितीही माहित नको का? त्यातूनही ऑल्रेडीच असा विचार चालला असण्याची शक्यता का गृहीत धरत नाहियात? आणि डोक्यात, एक्सेलवर जो प्लॅन असेल - तो पार पाडण्यापूर्वीच इथे शेअर करावा हा आग्रह का?
इथे बोलणं, वेग़ळ्या लोकांचे अनुभव ऐकणं, हा ही तिथवर पोचण्याचा भाग असू शकेल ना!

आपण वेगवेगळी माणसं आहोत, आणि जर आपल्यात येवढे रंग नसते तर जग एवढं रंगीबेरंगी, बॅलन्स्ड झालच नसतं म्हणून एकाचा टाईप दुसर्‍यापेक्षा चुकीचा असं कसं ठरवणार?

चांगली चर्चा चालली आहे, वेगवेगळे व्ह्युज वाचायला मिळताहेत, त्यातला चूक बरोबर, ह्याच अँगलनं चर्चा व्हायला पाहिजेचा सूर सोडूयात का?

सगळे वाचले नाही (बहुदा शक्यही नाही).
पण थोडे जनरलायझेशन होते आहे असे वाटते.
आयुष्यात बदल घडवून आणायचा की नाही यात खूप जास्त व्हॅरीएबल्स असतात (शिक्षण, कुवत, ऐपत, नातेवाईक हे अतिशय बेसीक झाले). स्वतःला पूर्णपणे जगापेक्षा वेगळे करुन विचार करणे शक्य नसते. अनेक ध्येयांमधे जगाला (जगाच्या कोणत्या तरी भागाला, प्रॉपर्टीला - मटेरियलिस्टीक नव्हे) बदलायचे पण ध्येय असते.

कोणता ना कोणता बदल आवश्यक मात्र नक्कीच आहे. तो नकळत का होईना होत असतोच. वेगवेगळ्या गोष्टींमधे अ‍ॅडजस्ट करणे हा पण एक प्रकारचा बदलच आहे. बदल हा मुद्दाम, स्वत:ला हवा तसा घडवून आणलेला केंव्हाही चांगला (कुणाकरता? का?). लोक इतरांना काय वाटेल, त्यांच्यावर काय प्रभाव पडेल याचा नको तितका विचार करत असतात.

अवांतर आणि अनरिलेटेड. १२ महिन्यांपुर्वीचे लमाल 'बदल' या विषयावर होते. तेंव्हाची सायफायः http://www.maayboli.com/node/25605

बदल करताना एक ठराविक कक्षा असते त्यातले बदल सोपे जातात. म्हणजे जे तुम्ही करत आहत व ज्यात तुम्ही बर्‍यापैकि महारथ मिळवली आहे त्याशी संलग्न असे बदल करायला पर्यायाने सोपे असते. उदाहरण द्यायचे झाले तर इंजीनिअरींग ते कंपुटेर्स. ह्यात दुसर्‍या क्षेत्राचे बरेच ज्ञान तुमच्या व्यवसायाचा भाग असते व "बदल" करताना बदलाशी सलग्न लोजिस्टिक्स तुलनेने मॅनेज करण्यासारखे असतात. माझ्या अनेक मित्रांनी मॅकॅनिकल इंजिनिअरींग केले व त्या नंतर 'मला बदल हवाय' ह्या बॅनर खाली ते कंप्युटेर स्ट्रिम मधे गेले. तसे अनेक इंजिनिअर मित्र पुढे मॅनेजमेंट मधे गेले. असे बदल मला संलग्न स्वरुपाचे वाटतात. ते तुलनेने करणे सोपे असते.

ह्या विरुद्ध पुर्ण पॅरेडाइम शिफ्ट लागणारे बदल अवघड असतात. वरती इथे कोणितरी म्हणाले "अता मला माझ्या आवडत्या क्षेत्रात काम करायचे आहे" हे आवडतीचे क्षेत्र तुमच्य अत्तच्या क्षेत्रापासुन खुप लांब असेल तर ह बदल प्रचंड बिकट असतो. कारन ह्यात फक्त लोजिस्टिक नसतात तर विचारसरणितला भेद खूप महत्वाचा असतो. स्वतःचे उदाहरण द्यायचे तर जेंव्हा मी इंजिनिअरींग करत होतो तेंव्हा एका टप्यावर ते सोडुन प्युअर मॅथ मधे करिअर करायची प्रबळ इच्छा झाली होति. त्या अनुसंगाने मॅथ मधे हात्पाय मारल्यावर कळले. की इतकि वर्ष इंजिनिअरींग ह्या फिल्ड मुळे आलेला वैचारिक भावनिक दृष्टिकोन व प्युअर मॅथ साठिचा दृष्टिकोन ह्यात बराच फरक आहे. जर मला क्षेत्र बदलायचे असेल तर तो ड्रुष्टिकोन मिळवायला मला ह्या क्षेत्रात बराच पल्ला गाठायला लागेल.. जर दृष्टिकोनच चुकिचा असेल तर आधिपासून दुसर्‍या क्षेत्रातले गोल ठरवणॅ व त्याप्रमाणे योजना आखण्याने फारसा फायदा होत नाही. कारण त्या क्षेत्राची "माहिती" असणे वेगळॅ व त्या क्षेत्रात पडल्यावर कळणारी ग्राऊंड रिअ‍ॅलिटी वेगळी अशी स्थिती होते.

मला अभिनेता व्हायचय असे ठरवल्यावर त्या क्षेत्रातले गोल कसे ठरवायचे ? कारण प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो. येणार्‍या अडचणि व असलेलि कुवत वेगळी असते अशा वेळेस आधिच योजना कशा आखणार? अनेक मार्ग असतात त्यातला एक निवडता येतो म्हणजे उदा द्याय्चे झाले तर मी एम.एफ.ए करेन असे ठरवता येते कारण ते टँजिबल ओब्जेक्टिव आहे ते मिळवता येते. पण त्याने अभिनेते कसे होणार? वा अभिनेत्याला लागणारे विचार त्याची ड्रुष्टि कशी मिळवणार?

आयुश्यात मुलभूत बदल करायचे अस्तिल तर तो बदल रोज थोड थोडा करावा अशा मताचा मी आहे. एक दिवस तुम्ही अशा पातळीवर पोचता कि अपेक्षीत बदल हा बदल न वाटता नैसर्गीक प्रोग्रेशन वाटते.

रेव्यु!! मानलं तुम्हाला !!
आता तुम्ही ईथे लिहिल्याने कितीतरी लोकांना आज काहीतरी गवसले हे नक्की.
प्रेरणा प्रोत्साहन ज्यांनी एका गोलकडून दुसर्‍याकडे प्रवास चालू केला आहे त्याला तर नक्कीच मिळेल.
मलाही थोडाफार असाच प्रवास करायचा आहे. त्याबद्दलही मी लिहिणारंच आहे लवकर. सध्या सहा सहा महिन्यांची ऊद्दिष्टं ठेऊन काम करतोय. कधी जिंकतोय कधी हरतोय. कधी चुकतोय कधी अचानक काहीतरी फार बरोबर करून जातोय की अचानक तीन महिने वाढवून मिळाल्यासारखे वाटतात.
अशी काही स्ट्रिक्ट डेडलाईन नाही पण छोटे मोठे सेट बॅक्स गृहीत धरून २ महिन्यांची टॉलरन्स लेवल ठेवतो आहे.

मतितार्थ
-गोल फिक्स नसतात >> नक्कीच!! पण काहीना काही गोल जरूर असावेत. ह्या मताचा मी आहे.
=अनुभवानुसार बदलतात
-बदल अत्यंत आवश्यक्-स्वांतसुखाय >> अगदी बर्रोबर.
- अन पण हा वैश्विक सिध्दांत नाही
-काही जण काहीही न बदलता सुखात रहातात म्हणून त्यांचे सुख अथवा"दु;ख" -दुय्यम ठरविणारे आपण कोण? >> बरोबर पटले. (खरेतर हे मुद्दाम म्हणून केले नाही. पण ठीक आहे अजून एक लेसन ऑफ द डे)

मास्तुरे >>> तुम्ही म्हणतायेत तशी सेम केस मलाही माहितीये. सॉफ्टवेअर तयार करण्यासाठीची कंपनी डोमेस्टिक शुगर आणि तत्सम फॅक्टरीज साठी होती का? आपण ज्या लोकांशी डील करतोय त्यांचा व्यवस्थित अंदाज न आल्याने पेमेंट रिकवरी थकली आणि कंपनी बंद पडली असे काहीसे?

असताना एखाद्याला 'काऊन्सेलरची गरज आहे', म्हणून गाळात काढण्यात काय अर्थ आहे. >> अरर्र.. प्रचंड गैरसमज केलात तुम्ही माझ्या पोष्टीचा. जाऊद्यात मी कितीही स्पष्टीकरण दिले तरी आता तुम्ही क्रेडीट डाऊन केल्याने तुमचा विश्वास पटणार नाही, तुमचे समाधान होणार नाही.. हरकत नाही.

तुम्ही म्हणाल हा काय सिनेमाच्या गोष्टी सांगतो पण....दिग्दर्शकाला जे सांगायचे ते व्यवस्थित कन्वे करता आले की गोष्टं मस्त समजते. तर तशीच ही गोष्टं

मार्कला वाटतं हार्वर्डला जाणं माझ गोल आहे. तो प्रयत्न करून जातो.
मग मार्कला वाटतं फिनिक्स क्लबात जाणं त्याच्या आयुष्याचा गोल आहे त्यासाठी त्याला सगळ्यांना ईंप्रेस करायचे आहे. तो प्रयत्न करत राहतो.
मग त्याला मैत्रिणीकडून झालेल्या अपमानाचा बदला घेणं हे ईतिकर्तव्य वाटतं. तो त्या वेडात पावलं ऊचलतो.
मग त्याला मिळालेल्या कल्पनेतून काहीतरी मूर्त स्वरूपाचं घडवून आणावं असं वेड लागतं.
त्यासाठी तो प्लॅन बनवून मित्राच्या मदतीने साईट घडवून आणतो.
हे साईट प्रकरण हीट व्हायला लागतं तसं त्याला वाटतं हार्वर्ड माझा गोल नाही ही साईट पूर्णत्वाला नेणं माझा गोल आहे. तो त्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतो.
त्याला शॉन भेटतो. मार्क ईंप्रेस होतो. मग त्याला कॅलिफोर्निआला जाऊन बस्तान बसवणे हाच गोल वाटतो.
तो तसे करतो मग त्याला साईट अजूनाजून आणि अजून आणि अजून मोठी करणे हाच गोल वाटत राहतो आणि तो त्यासाठीच कायम आणि कायम प्रयत्न करत राहतो.

आता ही घिसीपिटी कथा कोणत्या मार्कची आहे त्याचं पुढे काय झालं आणि पडद्यामागचे डीटेल्स काय आहेत हे सगळ्यांनाच जगजाहीर आहे. सांगायचं हेच आहे की मला मार्कची विचारसरणी आवडते. कश्यानकश्यासाठी तरी झटत रहायचे. ते कदाचित चूकही असेल, त्याचं वागणं वेडं ही असेल. कधी कधी अनएथिकल ही असेलच, नाही नसे नाही पण त्याच्या बुद्धीला पटते तो करत राहतो. त्याला वाटत राहते. तो टारगेट ठरवत राहतो, अचिव करत राहतो. त्याच्यात फ्लॉज असतील तो भाग अलाहिदा. ही कथा सिनेमासारखी ९० मिनिटात घडलेली नाही, त्याला दहा वर्षे लागली हे ही खरं.
दहा वर्षापूर्वीचा मार्क आज आहे का ? कदाचित नाही. वेगळा असावा.
तो इवोल्व्ह झाला का (म्हणजे मच्युअर का?) मला माहित नाही? त्याचं त्याला माहित असेल.
त्याने चुका केल्या का? हो केल्या नक्कीच.
पण सगळ्यात महत्त्वाचं तो टप्प्या टप्प्याने वहात राहिला, असे मला वाटते.
कमावण्याबरोबर त्याने बरंच काही गमावलं ही असेल.
ईतरांची पर्वाही केली नसेल. स्वार्थीही झाला असेल.
तो श्रीमंत झाला का. पैशाने हो बहूतेक.
पण त्याहीपेक्षा अचिवमेंटच्या समाधानाने कैकपटीने झाला असेल असे मला वाटते. असमाधानी असेल तर अजून कश्यासाठी तरी प्रयत्न करत असेल.

मला डॉक्टर बनायचे होते मी बनलो. मला मोठ्या हॉसिट्लात नाव काढायचे होते. मी प्रयत्न केला.. काढले.
मला एम डी बनायचे होते, प्रयत्न केला, झालो. मला लंडनला जायचे होते...परीक्षा दिल्या.. गेलो.
तिथे प्रॅक्टीस करायची...प्रयत्न केला..लायसन्स मिळवले..केली. पैसा...ठरवला होता त्याच्यापेक्षा जास्त कमावला. भारतात जायचे..ठरवले. प्लॅन केले... गेलो. समाजेसेवा करायची...ठरवले...केली.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मी हा बदल घडवायचा म्हणून ठरवून प्रयत्न करत राहिलो ना.
आणि ह्या आयुष्यभराच्या प्रवासा दरम्यान, मला मुलाला गणित सुधरवण्यात मदत करून त्याची १५% तरी प्रगती घडवून आणायची आहे. मला पोहायला शिकायचं आहे. मला चारचाकी शिकायची आहे. एवढेही साधे काहीही नावीन्य नसलेले गोलही होतेच ना माझे.
मग मी ठरवून मुलाला गणितासाठी वेळ दिला का? त्याची प्रगती कशी होती? त्याचे गणितातले मार्क वाढले का? माझे समाधान झाले का? ठरवलेला गोल अचिव झाला का? असे प्रश्न पडले नाहीत का?

आता ह्या विचारसणीची आज माझा पाच मिनिटांनी कॉफी बनवायचा गोल आहे असे म्हणत थट्टाही करता येईल. पण आज स्टारबक्स नको , डंकिन पिऊ, आज त्या नेहमीच्या मॉल मध्ये नको तिथे फार्मचा बाजार भरलाय तिथे जाऊ. हा बदल करण्याचे मी का व कसे ठरवले?

मग गोल नाही ...बदल अपेक्षित नाही असे ...खरंच शक्य आहे का?

ध्येय म्हंटले की आयुष्याचेच आणि बदल म्हंटले की आयुष्यभरासाठीचाच असे काही असते का?

रेव्यु, चमन आणि बर्‍याच जणांचे चांगले प्रतिसाद...वाचतेय अजून....असं काही डोक्यात असायलाच हवं असं नाही पण इतरांचे अनुभव वाचायला काही हरकत नाही..एक हटके विषय.....इतर काही "सुंदर" विषयांचे धागे वर असण्यापेक्षा अशा चर्चा हव्यातच...

माझ्या एका मैत्रीणीने ठरवून केलं का माहित नाही पण आय टी सोडून बेकिंग या विषयात खूपच चांगलं करियर (मुलं झाल्यानंतर) सुरू केलं..तिला खूप आधीपासून आवडायचं जेवण बनवणे इ. जेव्हा आय टी च्या निमित्ताने जगभर हिंडली एका बाजुला हेही शिकत गेली आणि आता आर्थिक/मानसिक दृष्ट्या तिला या क्षेत्रात असणं जास्त आवडतंय हे मी पाहातेय......शिवाय देशात राहून मनाजोगतं वर्क लाइफ़ बॅलन्स होतोय तेही वेगळं.....:)

प्रत्येकाला आपल्या परसातल आळु किती खाजत त्याचा अन्दाज असतो. त्यामुळे आपण आपापल्या अळुची भाजी करावी. न खाजणारी. >>> वा! सुंदर वाक्य. Happy

चमनच्या पोस्टींना अनुमोदन. (चमन, माझ्या नवर्‍याचं आणि तुमचं चांगलं जमेल. अगदी घरगुती, साध्यातलं साधं काम असू दे, पण त्या कामाला हात घालण्यापूर्वी त्याच्याकडे कायम त्याची 'योजना' तयार असते, त्यातले संभाव्य धोके, त्यावरच्या उपाययोजना यांचं अगदी स्पष्ट चित्र त्याच्या मनात तयार असतं. त्याच्या या गुणाचा मला अतिशय अभिमान - आणि असूयाही Wink - वाटते.)

बाकी, मी इंग्रजी कविता ब्यान केलेल्या नाहीत हां, मी फक्त माझी वैयक्तिक अडचण सांगितली. (मी कवितांच्या वाटेला फारशी जात नाही, मला त्यात विशेष गती नाही, हे जगजाहीर आहे :फिदी:)

अश्विनीमामींनी मांडलेला वयाचा मुद्दा अत्यंत रास्त वाटतो मला.

काही एक स्टेप घ्यावी व आजारी पडावे असे होउ नये इतकेच. >>> अगदी!! फारच अनुमोदन.

बादवे चमन,
तू जे म्हणतोयस ना की धागाकर्त्याला सध्याच्या नोकरीतल्या प्रोब्लेम्सच्या अनुषंगानं /तुझ्यामते बॅकवर्ड असलेले बदल अपेक्षित नाहियेत, तर
१. च्यायला ही नोकरी माझ्या आयुष्याची वाट लावणार. तीन वर्षे झाली नाईट शिफ्ट करतोय!
२. माझी ही फिरती कधी संपणार रे देवा? तीन वर्ष झाले लग्न होऊन सलग तीन दिवस सुद्धा घरी जेवायला
मिळत नाही. आज इंदुर, उद्या दिल्ली परवा जयपूर, पुढे कसं निभावणार?
३. काय वैताग नियम आहेत या देशाचे? आता माझ्याकडे भारतातली चांगली एमडी डीग्री असतांना, दोन वर्षांची प्रॅक्टीस असतांना इथे काम करण्यासाठी पुन्हा दोन वर्ष अभ्यास करा आणि परीक्षा द्या. छ्या नुसता टाईमपास. कशाला आलो ह्या देशात. ह्याच्या बदलीपायी माझ्या करीयरची वाट. पण मला कथ्थक फार छान येतं. पूर्ण पाच वर्ष महाराजांकडे प्रशिक्षण घेतलंय, रियाज चालूच आहे, स्टेज शोजचा अनुभव आहे मग मी इथे पण शोज करू का? प्रशिक्षण पण देऊ शकतेच की मी.
ही उदाहरणं काय म्हणतात?

(चर्चेला खीळ घालायचा हेतू नाहीये.. i got one or the other thing from most of the posts)

Pages