आय नीड अ चेंज.....

Submitted by षण्मुखानंद on 14 February, 2011 - 10:07

च्यायला ही नोकरी माझ्या आयुष्याची वाट लावणार. तीन वर्षे झाली नाईट शिफ्ट करतोय!

यार मला ग्राफिक्स डिझाईनमध्ये जायचं होतं सॉलीड आयडीयाज आहेत डोक्यात पण कोणते ग्रह फिरले आणि कायमचा टेस्टींगमध्ये अडकलो यार!

माझी ही फिरती कधी संपणार रे देवा? तीन वर्ष झाले लग्न होऊन सलग तीन दिवस सुद्धा घरी जेवायला
मिळत नाही. आज इंदुर, उद्या दिल्ली परवा जयपूर, पुढे कसं निभावणार?

विक्या साल्या सात वर्ष झाली तुला ह्या कंपनीत, टीम लीड होऊन दोन वर्षे झालीत येड्या आहेस कुठं?
तो दिल्लीवाला सुखबीर बघ दोन वर्ष ज्युनिअर आहे तुला आणि जर्मनीच्या प्रोजेक्टचा मॅनेजरपण झाला. का? तर आयआयएम लखनौचा शिक्का आहे त्याच्या कपाळावर. तू साल्या युनि टॉप फाईव्ह मध्ये होता ना आणि एवढी ब्राईट मेमरी आहे तुझी, तू करना कॅटचा अभ्यास आणि जा बी स्कूलला. लाईफ बनेल तुझी.

मुलगा हॉटेल मॅनेजमेंटला जायचं म्हणातोय, दोन वर्षांचा पाच लाख खर्च आहे, कसं जमवू. आडीपीएलवाले जॉब द्यायला तयार आहेत पण काम सध्या करतोय त्याच्याएवढं चांगलं नाही, पुन्हा हुद्दाही सध्यापेक्षा जरा कमीचाच मिळतोय, नुसत्या पैशांकडे बघून करू का शिफ्ट. मग इथे कमावलेल्या क्रेडीटचं काय?

काय वैताग नियम आहेत या देशाचे? आता माझ्याकडे भारतातली चांगली एमडी डीग्री असतांना, दोन वर्षांची प्रॅक्टीस असतांना इथे काम करण्यासाठी पुन्हा दोन वर्ष अभ्यास करा आणि परीक्षा द्या. छ्या नुसता टाईमपास. कशाला आलो ह्या देशात. ह्याच्या बदलीपायी माझ्या करीयरची वाट. पण मला कथ्थक फार छान येतं. पूर्ण पाच वर्ष महाराजांकडे प्रशिक्षण घेतलंय, रियाज चालूच आहे, स्टेज शोजचा अनुभव आहे मग मी इथे पण शोज करू का? प्रशिक्षण पण देऊ शकतेच की मी.

मला सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जायचंय, मी फॅक्टरीतून आल्यावर रोज किमान चार तास अभ्यास करतो.
दोन महिन्यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ फक्त अभ्यास करणार. परीक्षा सहा महिन्यांनी आहे.

मला सध्याची नोकरी सोडून माझं स्वतःचं हॉटेल उघडायचंय मी आणि माझा मित्र पार्टनर होणार आहोत. एक हॉटेल चालवायलाही घेणार आहोत. पैशांची जमवाजमव करतोय.

मी आजपर्यंत सहा वेगवेगळे व्यवसाय बदलले. फार नाही पण ठीकठाक पैसा कमावलाय पण बॉडीबिल्डींग कधी सोडली नाही. दरवर्षी मी लाखो रुपये खर्च करतो त्याच्यावर.

अरे तू कसला हजरजबाबी आहेस, तू आला की गृपला हसवून हसवून मारतोस, कुणी सुद्धा मी जातो असं म्हणत नाही. स्टँडअप कॉमेडीचा जरूर विचार कर.

अंगावर कामं घेऊन त्येच त्येच सुतारकाम करायचा लय कंटाळा आलाय. हे आजकालचे पोरं काय काय कोर्स करत्येत आणि आणि कायबी डोकं लढिवत्यात फर्निचर मध्ये. परवा एक असंच पोरगं आलं होतं कंपनीकडून कमिशनवर काम देतो बोलत होतं. त्याचं डोकं माझे हात. काय करावं?

अरे तो माझा मावस भाऊ आहे ना तो कसला चंपक आहे माहित्ये, थरमॅक्समधली पन्नासहजाराची एसीमध्येबसून कीबोर्ड बडवायची नोकरी सोडली आणि आता २० बाय २० च्या आणि पत्र्याच्या शेडमध्ये एक मशीन घेऊन वर्कशॉप काढणार आहे म्हणे.

अरे तो आपला १२ वीच्या वर्गातला तो होता ना बघ त्याचा ९८ चा गृप येऊन पण त्याने बाप बिल्डर म्हणून त्याच लाईनमध्ये जाण्यासाठी सिव्हिलला अ‍ॅडमिशन घेतली, अरे तो मर्चंट नेव्हीत गेलाय आता.

ह्या ना अश्या असंख्य घटना, असंख्य प्रसंग. एक विचार, मनाची एक उचल, वेडाची एक लहर, एक निर्णय आणि प्रयत्नांची पराकष्ठा पूर्ण आयुष्य बदलू शकते.

तुम्ही कधी असा विचार केलाय का? अशा पॅराडाईम शिफ्ट साठी प्रयत्न केलाय का?
पास या फेल मॅटर नही करता है बेटा बस जीजान से कोशिश करना जरूरी है. हे बाबावाक्य प्रमाण मानून कधी निर्णय घेतला आहे का? असे प्रसंग तुमच्या आसपास घडले असतील तर दुसर्‍यांसाठी प्रेरणा, सल्ला, मार्गदर्शन म्हणून ते इथे शेअर कराल का?
किंवा असं काहीतरी करायचं आहे पण प्रेरणेचा अभाव आहे, प्रयत्न चालू आहेत पण काही अडचणी येतायेत सल्ला हवाय, हो केलाय प्रयत्न, माझ्याकडे देण्यासाठी सल्ले आहेत......तरी इथे लिहा.

येस्स! आय कॅन विन, यू कॅन डू इट वगैरे सगळं ठीक आहे. पण ह्या धाग्याचा मुख्य ऊद्देश अॅस्पिरंट्सना व्यक्त होण्यासाठी असा काहीसा आहे.

मी का लिहितोय?
............मीही काहीतरी ठरवलंय, प्रयत्न करतोच आहे, कदाचित इथे लिहिणार्‍यांकडून मिळालेली प्रेरणा, सल्ला, मार्गदर्शनामुळे प्रयत्नांना गती मिळू शकेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

याच सुमाराला माझे एक वरिष्ठ प्राध्यापक स्टीव्ह जॉब्ज्च्या चरित्राच्या भाषांतराचे काम करीत होते >>> डॉ. साळुंखे का?

वावा रेव्यु मस्त!!!
म्हणजे तुम्ही कॉलेजच्या 'ट्रेनिंग & प्लेसमेंट' संबंधित कामात आहात तर. फार सही काम आहे हे. कॉलेजमधल्या होतकरू मुलांना खरंच खूप गरज असते ह्याची. पास आऊट झाल्यानंतर ओपनमार्केट च्या रेस मध्ये पाचोळ्यागत ऊडवले जाऊन जे चटके ह्या बिचार्‍या होतकरू मुलांना सहन करावे लागतात त्यातून सगळेच सही सलामत सुटतात असे नाही. बरेचसे प्रतिभा असूनही पर्याय नाही म्हणून कमी प्रतीच्या (हा शब्द खरं बरोबर नाही, पण प्रतिभेला किंवा शिक्षणाला न्याय न देऊ शकणार्‍या कामाला दुसरं काय म्हणणार?) किंवा नावडत्या कामाला जुंपून घेतात आणि चक्रव्युहात अजूनाजून अडकत राहतात.
परिणाम त्या कामातले त्यांचे थ्रूपुट कधीच १००% येत नाही. तुमच्या सारख्या अनुभवी माणसांचा आधार फार फार मोलाचा वाटत असणार मुलांना.
ती मुलं कदाचित तुम्हाला येऊन बोलणार नाहीत पण कोरड्या नजरेने टेक्निकल विषय शिकवणार्‍या मास्तरांपेक्षा तुम्ही त्यांना नक्कीच जवळचे वाटत असणार हे नक्की. ओपन मार्केट मधल्या रेसमध्येच पळण्याआधीच जर तुम्ही कंपन्या त्या मुलांपर्यंत आणू शकत असाल तर ती मुलं आणि त्यांचे मायबाप तुम्हाला अगणित आशिर्वाद देत असतील हेही नक्कीच.

आमच्या कॉलेजचा टी&पी ऑफिसर दूर्दैवाने आर्मी मधून रिटायर्ड झालेला प्रचंड ठोकळा माणूस होता. ईंडस्ट्री बद्दलचं ज्ञान शून्य, कंपन्यातल्या चांगल्या हुद्द्यावरच्या लोकांशी संपर्कयंत्रणा शून्य, अ‍ॅल्यूम्नायजशी काँटॅक्ट्स शून्य, नुसते कडक ईस्त्रीचे कपडे घालून पोरांना घाबरवणे एवढेच त्याचे काम. डोळे कायम नशेच्या अंमलाखाली असल्यासारखे. आम्ही त्याला टी&पी म्हणजे टाईमपास, टोटल पिएला ऑफिसर ई. ई. म्हणायचो.

तुमचं काम जबाबदारीचं पण प्रचंड मानसिक समाधान देणारं आहे. तुम्हाला त्यात भरपूर यश मिळून खूप मुलांना तुमच्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि संपर्कयंत्रणेचा फायदा व्हावा अश्या शुभेच्छा देतो.

ते मोठ्या पगाराची नोकरी सोडून कमी पगाराची घेतली ... हे वाक्य म्हणणं किंवा लिहिणं एवढं सोपं आहे पण चेंज झालेल्या लाईफस्टाईलने जगतांना त्याच्या नुसत्या विचारानेही जगबुडीच येणार की काय असे वाटायला लागते. यशस्वी निर्णयाबद्दल तुमचे अभिनंदन.

मास्तुरे वर लिहिलेले थोड्याफार फरकाने तुम्हालाही लागू पडतेच.

ज्ञानदान सर्वश्रेष्ठं दान.

दोघांचेही अभिनंदन आणि शुभेच्छा!!

आयडीपलीकडला माणूस कळायला लागला की मायबोलीवर घालवलेला मिनिट सार्थकी लागला असं वाटतं.

<<आयडीपलीकडला माणूस कळायला लागला की मायबोलीवर घालवलेला मिनिट सार्थकी लागला असं वाटतं.>>
खूप छान !! अनुमोदन..

चमन
सविस्तर प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद.
मी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट आवडते म्हणून आपणहून करतो.
पण माझा मुख्य जॉब शिक्षकाचा ( असिस्टंट प्रोफेसर) असा आहे. मी इंडस्ट्रीयल इंजिनीयरिंग व टेक्नोलॉजी मॅनेजमेंट व मेट्रॉलॉजी व क्वालिटी शिकवतो-तृतीय व चतुर्थ मेकॅ. ला शिकवतो शिवाय एम बी ए ला स्ट्रॅटेजी मेनेजमेंट व इंटरनॅशनल बिझिनेस मॅनेजमेंट शिकवतो. या पैकी दुसरा विषय नवीन होता व त्याचा बराच अभ्यास करावा लागला. आता खूप चांगला जमतो

ललिता प्रीति
बरोबर .ते माझे गुरु आहेत या क्षेत्रातील व परिचय ----- त्यांच्या लग्ना पासूनचा --- दॅट्स अनदर स्टोरी- तुम्ही कशा त्यांना ओळखता??

रेव्ह्यु खूप आवडले तुम्ही तुमच्या बदलाबद्दल लिहीलेले. अतिशय प्रेरणादायी. मास्तुरे तुमचेपण खूप कौतुक वाटले.

रेव्यु छानच जमले आहे. पण वाचताना प्रष्ण पडला. की ह्या नव्या वाटेवर रॅट्रेस गाठणार नाही ह्या संबंधी काय काळजी घेतलीत? कारण रॅट्रेस हे मिळणार्या संध्या व महत्वकांक्षा ह्यांच्या मिश्रणाचे फलीत आहे. नव्या आवडीच्या क्षेत्रात आलात तरी सगळे स्वांत सुखाय म्हणुन करायचे असेल तर काही (जसे की आर्थिक) महत्वकांक्षेला लगाम लावावा लागतो .. केवळ क्षेत्र बदलले म्हणुन रॅटरेस कशी चुकेल ते समजले नाही.

आवडिचे क्षेत्र नसेल वा आवड बदलली असेल तर नव्या वाटा धुंडाळणे समजु शकतो पण रॅटरेस व कामाचे क्षेत्र ह्यांचा संबंध कितपत? रॅट्रेस ही मनात / विचारात असते... असे वाटले...

पेशवा:
मला हा प्रश्न पडला होता. रॅट रेस हे एक वेगळे मिश्रण असते,त्यात महत्त्वाकांक्षा हुद्द्याशी, पगाराशी संबंधित बहुतांशी असते. या क्षेत्रात मला त्याची कसलीही हाव नाही. मला प्रिन्सिपॉल बनायचे नाही.मला प्रोफेसर व्हायचे नाही. मला अ‍ॅड्मिन अन इतर क्षेत्रात काही ही करायचे नाही. जो पगार मिळतो तो खूप आहे. जे शिकवतो ते उत्तमोत्तम कसे करायचे व मुलांचे कल्याण कसे होईल ते पहायचे ,त्यांना जीवनासाठी कसे तयार करायचे हे पहायचे ,हे ठरविले आहे अन आजपर्यंत तरी ( गेली २ वर्षे) रॅट रेसची उद्विग्नता माझ्या जवळपास ही फटकली नाही.
दुसरा उद्योग अनुवादकर्ता म्हणून्.तो देखील तसाच करतोय.
माझे म्हणणे कदाचित पटणार नाही पण ही वस्तुस्थिती आहे.

पेशवा आणि रेव्यु. हे बेस्ट केलेत. हा मुद्दा राहिलाच होता. Happy

महत्त्वाकांक्षी असण्यात फारसे वाईट काही आहे असे बहुत विचारंती वाटत नाही. पण महत्त्वाकांक्षेची किंमत जेव्हा वैयक्तिक आयुष्याला फार जास्त चुकवायला लागली तेव्हा ते चेकपॉईंटस. आणि ताण हा कुठेही enjoy न करता, नुसतेच ताणाखाली येणे. ताण असणारच की, पण जेव्हा नवनिर्मीतीची स्वप्ने असतात तेव्हा त्याचे काहीच वाटत नाही हेही खरं.

व्यावसायिक रॅटरेसमध्ये उरफुटेस्तोवर धावणे याला बरेचदा मार्केट्स, आणि स्किलसेटबदल कारणीभूत असतात का? हे म्हणजे एखाद्या Howard Roark ला ऑडिटिंगच्या समस्या सोडवायला लावण्यासारखे आहे. He is not meant to do that. Leave him alone. असे जॉब्स जगाच्या पाठीवर कुठे सापडतील मग ते जमले नाहीत म्हणून मागे पडणे इतर.

दुसरे म्हणजे सारख्या नवीन कल्पना सुचणे, जे आहे त्यापेक्षा हे निश्चित अजून चांगले होऊ शकते असे वाटणे हे दुर्दैवाने फार घातक. नवीन कल्पना सुचणे याला जग जे विरोध करते त्याला तोड नाही. त्या कशा साकार होतील यापेक्षा जिने/ज्याने सुचवले तिलाच/त्यालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे हे फनी आहे. व्यावसायिक आयुष्यातील रम्य स्वप्ने आणि त्यातली बेदम, बेफाट मजा जिने मला तरूणपणी दाखवली त्या अ‍ॅनरँडची मी याकारणासाठी अजूनपावेतो ऋणी आहे. Lol

या क्षेत्रात मला त्याची कसलीही हाव नाही. मला प्रिन्सिपॉल बनायचे नाही.मला प्रोफेसर व्हायचे नाही. मला अ‍ॅड्मिन अन इतर क्षेत्रात काही ही करायचे नाही. जो पगार मिळतो तो खूप आहे. >>> त्यामुळे हे उत्तर योग्यच.

मस्त चर्चा चाललीय, वाचतोय आणि स्वतःच्या तुटपुंज्या अनुभवाशी पडताळून बघतोय!
महत्वाकांक्षा वाईट नाही हे मान्य. पण त्यातून नक्की काय मिळवायचे आहे हे स्पष्ट असेल तर नंतरचे वैताग टळू शकतात.

सावली
मेल अजून नाही पोहोचली.
रैना -अनेकविध पैलू विश्लेषण करून मांडल्या बद्दल धन्यवाद

रॅट्रेस ही मनात / विचारात असते... असे वाटले... >>> (माझा थेट संबंध नसला तरी) हा मुद्दा बर्‍यापैकी पटतो. त्यामुळे या क्षेत्रात मला त्याची कसलीही हाव नाही. हे वाटणं, पटणं फार महत्त्वाचं आहे.

भला उसकी साडी मेरी साडीसे सफेद कैसे? - हा प्रश्न मनात आला, की संपलं. हा प्रश्न मनात येणं हा रॅट रेसच्या अनेक पैलूंपैकी एक असावा. हाव आणि त्यायोगे येणारी अहमहमिका, चढाओढ, स्पर्धा आणि कुरघोडी करण्याची इच्छा यांच्यात अगदी पुसट रेषा असावी. (पुन्हा एकदा, माझा थेट संबंध नाही, अनुभव नाही, पण जे काही दिसतं, ऐकू येतं, त्यावरून इतपत अंदाज तर नक्कीच बांधता येतो.)

रैना, अग महत्त्वाकाम्क्षा असेल तर ठीक, पण बरेचदा लोक पीअर प्रेशर, पळाव लागत, व्यवसायची गरज, बॉसन दिलेल प्रेशर असल्या कारणान पळत रहातात.

पण महत्त्वाकांक्षेची किंमत जेव्हा वैयक्तिक आयुष्याला फार जास्त चुकवायला लागली तेव्हा ते चेकपॉईंटस. >>> हो आणि हेच वाक्य "पण आपल्या महत्त्वाकांक्षेची किंमत जेव्हा संपूर्ण कुटुंबाच्या वैयक्तिक आयुष"याला फार जास्त चुकवायला लागली तेव्हा ते चेकपॉईंटस." असे झाले की अजून कळीचे, जर कुटूंब महत्त्वाकांक्षी नसेल, साथ देण्याच्या मनस्थितीत नसेल तर. Happy
कुटूंब विरुद्ध महत्वाकांक्षा हा फार मोठा लढा आहे.

ललिता-प्रीति, पोस्ट आवडली Happy
रेव्यु , इमेल मायबोली संपर्कातुन केली होती. कदाचित स्पॅम फोल्डर मधे गेली असेल तर बघणार का?

>>>> महत्त्वाकांक्षी असण्यात फारसे वाईट काही आहे असे बहुत विचारंती वाटत नाही. पण महत्त्वाकांक्षेची किंमत जेव्हा वैयक्तिक आयुष्याला फार जास्त चुकवायला लागली तेव्हा ते चेकपॉईंटस. आणि ताण हा कुठेही enjoy न करता, नुसतेच ताणाखाली येणे. ताण असणारच की, पण जेव्हा नवनिर्मीतीची स्वप्ने असतात तेव्हा त्याचे काहीच वाटत नाही हेही खरं.

सहमत! रॅटरेस व महत्त्वाकांक्षेची मला वैयक्तिक आयुष्यात खूप मोठी किंमत चुकवायला लागली आहे. पण निदान शेवटी उशीरा का होईना पण शहाणपण आले हे नशीब.

मी खूप सुरवातीपासून संगणक क्षेत्रात आहे. विश्वास ठेवा, मी पंच कार्ड रीडर इम्पुट असलेल्या जुन्या मेन फ्रेम्सच्या काळात मी या क्षेत्रात आलो. फक्त ३२ किलोबाइट्स मेन मेमरी असलेला BBC चा मायक्रोकॉम्प्युटर मी खूप दिवस वापरलेला आहे. आताच्या काळात घरातल्या पीसीला सुद्धा याच्या किमान १ लाख पट मेन मेमरी असते. ३२ किबा मेन मेमरी असलेला कॉम्प्युटर होता यावर कोणाचा विश्वास सुद्धा बसणार नाही.

१ वर्ष सिंगापूरमध्ये व ५-६ वर्षे अमेरिकेत काम करून मी १९९८ मध्ये कायमस्वरूपी भारतात परत आलो. परदेशात जाण्यापूर्वीचे भारतातले व पुण्यातले संगणक क्षेत्र व परत आल्यानंतरचे संगणक क्षेत्र यात जमीनअस्मानाचा फरक होता. पुण्यात एका नामवंत कंपनीत दाखल झाल्यावर पहिली २ वर्षे उत्तम पार पडली. कामाचा लोड होताच, पण काम करताना मजा येत होती.

सर्वप्रथम इ.स. २००० मध्ये काही प्रॉब्लेम्स सुरू झाले. वैयक्तिक आयुष्यात मला एका मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागले. त्या समस्येचा त्रास २००८ पर्यंत सुरू होता. जॉब रिलेटेड स्ट्रेस, जेवणाच्या अनियमित वेळा, प्रचंड वर्क लोड व त्यामुळे स्वतःकडे झालेले दुर्लक्ष ही त्या समस्येमागची मुख्य कारणे होती असे बर्‍याच डॉक्टरांचे मत होते. त्यात भर म्हणजे मोठ्या कंपनीत असलेली कंपूबाजी, राजकारण व त्रयस्थाला बळीचा बकरा बनविण्याची पद्धत. स्टाफिंग, टॉप लाईन, बॉटम लाईन, ऑपरेटिंग मार्जिन, टारगेट्स, कस्टमर यांचा सतत ताण असायचा. कस्टमर तिकडे १० हजार मैलावर मजेत असायचा आणि आम्ही इकडे त्यांची धुणी धूत बसायचो. २००० ते २००३ या काळात इतका त्रास झाला की त्याचवेळी जॉब सोडून घरी विश्रांती घ्यावी असे माझ्या मनात घोळत होते. परंतु कंपनीने १९९८ पासून २००३ पर्यंत बरेच शेअर्स व ऑप्शन्स बाजारभावापेक्षा अत्यंत कमी भावात दिले होते. २००६ पूर्वी जॉब सोडला असता तर त्यावर पाणी सोडायला लागले असते. त्यामुळे नाईलाजाने रेटत राहिलो. व्यक्तिगत प्रॉब्लेम असह्य झाल्यावर शेवटी ३१ डिसेंबर २००५ ला जॉब सोडला. अर्थात सोडण्याआधी सर्व शेअर्स व ऑप्शन्स मिळालेले होते. आर्थिक स्थिरतेसाठी ते अत्यावश्यक होते.

जॉब सोडल्यानंतर १ महिन्यातच कंटाळा आला. सहा महिन्यांनी पुण्यातच नवीन जॉब मिळाला. सुरवातीचे काही महिने बरे गेले. पण नंतर येरे माझ्या मागल्या सुरू झाले. जॉब रिलेटेड स्ट्रेस, जेवणाच्या अनियमित वेळा, प्रचंड वर्क लोड, टारगेट्स, कस्टमर इश्यूज आणि मॅनेजमेंट एक्स्पेक्टेशन्स यात काहीच बदल झाला नाही. भरीत भर म्हणून जुने प्रॉब्लेम्स परत सुरू झाले.

शेवटी प्रचंड मानसिक व शारिरीक त्रास सहन केल्यावर २००८ मध्ये निर्णय घेऊन जॉब कायमचा सोडला. हा निर्णय घेताना,
- दोन्ही मुली शाळेत शिकत होत्या
- हाऊसिंग लोन वा इतर कोणतेही कर्ज डोक्यावर नव्हते
- राहते घर होते, पण अजून एक फ्लॅट घेतलेला होता
- मागील ३-४ वर्षांच्या बँक स्टेटमेंटवरून कुटुंबाच्या वार्षिक खर्चाचा अंदाज घेतला
- काहीही न करता व न कमावता निवृत्त आयुष्य जगलो तर उर्वरीत आयुष्य काढू शकेन का याचा विचार केला. हो आणि नाही अशी दोन्ही उत्तर आली.
- या एका विचारावर, अजून फार विचार न करता राजिनामा दिला

त्यानंतर काही महिने काहीच केलं नाही. जॉबमुळे भेटीला आलेले प्रॉब्लेम्स जॉब सोडल्यामुळे निघून गेले होते. पण पुन्हा एकदा कंटाळा यायला लागला. आयटीत् परत जायचं नाही हा निर्धार डळमळायला लागला. काय करावे हे सुचत नव्हते. अंगात फारशी कला नव्हतीच. खूप पूर्वी काही काळ तबला वाजवायला शिकत होतो. पुन्हा तबला शिकायला सुरवात करावी का असे वाटू लागले. दरम्यानच्या काळात एका संस्थेत एथिकल हॅकिंगचा कोर्स केला. पण, कोर्स पूर्ण केल्यावर लक्षात आले की हे क्षेत्र आपले नाही. स्वतःची एक वेबसाईट करण्याची कल्पना मनात होती. त्या दृष्टीने काम सुरू केले, पण त्यात फारशी प्रगती झाली नाही. दरम्यानच्या काळात २ कंपन्यात इन्टरव्ह्यू साठी कॉल आला. पण जॉब कंडिशन्स न पटल्यामुळे पुढे गेलो नाही.

एक विचित्र रिकामपण आले होते. आपण जॉब सोडून बाहेर आलो आणि आपल्या पाठीमागे आयटीचे दरवाजे कायमचे बंद झाले अशी एक समजूत झाली होती. या क्षेत्रात आता आपल्याला परत प्रवेश मिळणार नाही, अशी एक विचित्र हूरहूर लागली होती. आपल्याला आता काहीच करता येणार नाही, हा विचार असह्य होत होता.

पण काहीतरी करणे आवश्यक होते. शेवटी हातपाय हलवायचे ठरविले. एक्सेल मध्ये एक मॅट्रिक्स तयार केला. त्यात वेगवेगळे कॉलम केले. आपल्यासाठी आता यापुढे कोणते पर्याय शिल्लक आहेत, त्या पर्यायासाठी लागणारी कोणती कौशल्ये आपल्यात आहेत (तांत्रिक कौशल्ये, अनुभव, सॉफ्ट स्किल्स इ.), त्या पर्यायासाठी लागणार्‍या कोणत्या गोष्टींची आपल्यात कमतरता आहे (तांत्रिक कौशल्ये, अनुभव, सॉफ्ट स्किल्स इ.), तो पर्याय निवडला तर कोणत्या अडचणी येऊ शकतील (वाढते वय, आर्थिक पाठबळ, पुन्हा एकदा ताणतणावांचा सामना करावा लागेल का, स्वतःसाठी व घरासाठी पुरेसा वेळ देता येईल का, किती गुंतवणूक करावी लागेल, त्या क्षेत्राची कितपत माहिती आहे इ.), तो पर्याय निवडण्यासाठी आपल्याकडे कोणत्या अनुकूल गोष्टी आहेत (आजवरचा अनुभव व मिळविलेले ज्ञान आणि कौशल्य, आर्थिक पाठबळ इ.), हा पर्याय प्रत्यक्षात येण्याची शक्यता कितपत आहे (खूप चांगली/मध्यम्/खूप कमी), आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली सर्व परिस्थिती बघता हा पर्याय योग्य ठरेल का (खूप योग्य्/मध्यम योग्य्/फारसा योग्य नाही) . . . असे वेगवेगळे कॉलम्स तयार केले.

जे पर्याय यादीत टाकले ते म्हणजे, (१) आता यापुढे काहीही न करता पूर्ण निवृत्त जीवन जगायचे (२) परत पुण्यातल्या एखाद्या आयटी कंपनीत जॉब मिळवायचा (३) परदेशात जॉब शोधणे (४) आयटीतल्या नेहमीच्या डीलिव्हरी/मॅनेजमेंट स्ट्रीम ऐवजी क्वालिटी मॅनेजमेंटचे ट्रेनिंग घेऊन त्या स्ट्रीममध्ये जाणे, (५) फाइनान्शिअल व बँकिंग डोमेनचे बर्‍यापैकी ज्ञान असल्याने त्याचे अधिक ज्ञान मिळवून डोमेन सल्लागार या स्ट्रीममध्ये जाणे, (६) स्वत:चा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा व्यवसाय सुरू करणे, (७) ट्रेनिंग्/कोचिंग या क्षेत्रात जाणे, (८) शेअर ट्रेडिंग करणे इ.

यातल्या पहिल्या पर्यायात अजिबात उत्पन्न मिळणार नव्हते व काहीच करावे लागणार नव्हते. उरलेल्या काही पर्यायात मला आधी स्वत:ला वेगळ्या विषयात ज्ञान मिळवून मग त्या क्षेत्रात जायला लागणार होते. काही पर्याय घरबसल्या काम करण्याचे होते. शेवटी पर्याय (७) आणि (८) हेच आपल्याला बर्‍यापैकी जमू शकतील, यात फारशी बंधने नसतील, स्वत:साठी व घरासाठी पुरेसा वेळ देता येईल व मुख्य म्हणजे ताणतणावांचा फारसा सामना करावा लागणार नाही, असे लक्षात आले.

त्यानंतर काही दिवसांनी एका मित्राच्या ओळखीतून एका आयआयटी कोचिंग संस्थेच्या संचालकांची ओळख झाली आणि आता तिथेच फाऊंडेशन बॅचला शिकवायला सुरूवात केली आहे. इतक्यात (म्हणजे अजून २-३ वर्षे तरी) ११ वी/१२ वी ला शिकविणे शक्य नाही. पण ८-१० वी या फाऊंडेशन बॅचेसला शिकवून अनुभव मिळाल्यानंतर ते शक्य होईल. सध्या शिकवायला खूप मजा येत आहे. याच्या बरोबरीने घरून थोडेफार शेअर ट्रेडिंग ही करतो. एकंदरीत आयटी जॉब असताना जेवढी कमाई होती, त्याच्या तुलनेत खूपच कमी कमाई होते, पण कोणतेच ताणतणाव नाहीत. आयटी जॉब सुरू असताना स्वतःकडे व घराकडे बरेचसे दुर्लक्ष झाले होते. आता मात्र दोन्हीकडे व्यवस्थित लक्ष देता येते. मार्जिन, टॉपलाईन, टारगेट्स इ. भानगडी नाहीत. १० हजार मैलावरच्या कुठल्यातरी कस्टमरच्या समस्या स्वत:च्या खांद्यावर वाहून नेण्याची व त्यासाठी मोलाचे आयुष्य पणाला लावण्याची अजिबात गरज नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जॉबमुळे मला ७-८ वर्षे ज्या वैयक्तिक समस्यांना तोंड द्यावे लागत होते, त्या सर्व समस्या जॉब सोडल्यापासून पूर्ण नष्ट झालेल्या आहेत.

आईवडीलांची पुण्याई, पत्नीने सतत दिलेले भक्कम पाठबळ आणि परमेश्वरावर असलेली श्रद्धा यामुळेच अनेक बर्‍यावाईट प्रसंगातून सहीसलामत बाहेर पडून आजवरचा प्रवास झालेला आहे व पुढेही होत राहील अशी माझी श्रद्धा आहे.

इतकं सविस्तर इथे लिहावं की नाही, या विचारात होतो. पण रेव्यु व इतरांचे प्रतिसाद वाचल्यावर लिहायचं धाडस करत आहे.

मास्तुरे, धन्यवाद. आवडले!

आपल्याकडे आयटी=सर्विस कंपन्या असेच बरेचसे समीकरण दिसते (इन्फोसिस, विप्रो ई). तेथे वरती लिहीलेल्या गोष्टी कमीअधिक प्रमाणात लागू असतात. पण आयटी मधे इतर कंपन्या - स्वतःचे प्रॉडक्ट असलेल्या- असतात (उदा: ओरॅकल, एसएपी) अशा कंपन्यांची पुण्यात कार्यालये किती आहेत? तेथे किमान दूरवर असलेल्या ग्राहकाची कामे उशीरापर्यंत करत बसलोय अशी परिस्थिती नसते.

मास्तुरे, किती सहज आणि प्रामाणिकपणे लिहिलेत. धन्यवाद. कधीतरी आयटीमधली नोकरी मीही सोडू शकेन, असे मला तुमची पोस्ट वाचून वाटले.
रेव्ह्यू, तुमच्या पोस्टीही प्रेरणादायी आहेत.

Pages