आय नीड अ चेंज.....

Submitted by षण्मुखानंद on 14 February, 2011 - 10:07

च्यायला ही नोकरी माझ्या आयुष्याची वाट लावणार. तीन वर्षे झाली नाईट शिफ्ट करतोय!

यार मला ग्राफिक्स डिझाईनमध्ये जायचं होतं सॉलीड आयडीयाज आहेत डोक्यात पण कोणते ग्रह फिरले आणि कायमचा टेस्टींगमध्ये अडकलो यार!

माझी ही फिरती कधी संपणार रे देवा? तीन वर्ष झाले लग्न होऊन सलग तीन दिवस सुद्धा घरी जेवायला
मिळत नाही. आज इंदुर, उद्या दिल्ली परवा जयपूर, पुढे कसं निभावणार?

विक्या साल्या सात वर्ष झाली तुला ह्या कंपनीत, टीम लीड होऊन दोन वर्षे झालीत येड्या आहेस कुठं?
तो दिल्लीवाला सुखबीर बघ दोन वर्ष ज्युनिअर आहे तुला आणि जर्मनीच्या प्रोजेक्टचा मॅनेजरपण झाला. का? तर आयआयएम लखनौचा शिक्का आहे त्याच्या कपाळावर. तू साल्या युनि टॉप फाईव्ह मध्ये होता ना आणि एवढी ब्राईट मेमरी आहे तुझी, तू करना कॅटचा अभ्यास आणि जा बी स्कूलला. लाईफ बनेल तुझी.

मुलगा हॉटेल मॅनेजमेंटला जायचं म्हणातोय, दोन वर्षांचा पाच लाख खर्च आहे, कसं जमवू. आडीपीएलवाले जॉब द्यायला तयार आहेत पण काम सध्या करतोय त्याच्याएवढं चांगलं नाही, पुन्हा हुद्दाही सध्यापेक्षा जरा कमीचाच मिळतोय, नुसत्या पैशांकडे बघून करू का शिफ्ट. मग इथे कमावलेल्या क्रेडीटचं काय?

काय वैताग नियम आहेत या देशाचे? आता माझ्याकडे भारतातली चांगली एमडी डीग्री असतांना, दोन वर्षांची प्रॅक्टीस असतांना इथे काम करण्यासाठी पुन्हा दोन वर्ष अभ्यास करा आणि परीक्षा द्या. छ्या नुसता टाईमपास. कशाला आलो ह्या देशात. ह्याच्या बदलीपायी माझ्या करीयरची वाट. पण मला कथ्थक फार छान येतं. पूर्ण पाच वर्ष महाराजांकडे प्रशिक्षण घेतलंय, रियाज चालूच आहे, स्टेज शोजचा अनुभव आहे मग मी इथे पण शोज करू का? प्रशिक्षण पण देऊ शकतेच की मी.

मला सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जायचंय, मी फॅक्टरीतून आल्यावर रोज किमान चार तास अभ्यास करतो.
दोन महिन्यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ फक्त अभ्यास करणार. परीक्षा सहा महिन्यांनी आहे.

मला सध्याची नोकरी सोडून माझं स्वतःचं हॉटेल उघडायचंय मी आणि माझा मित्र पार्टनर होणार आहोत. एक हॉटेल चालवायलाही घेणार आहोत. पैशांची जमवाजमव करतोय.

मी आजपर्यंत सहा वेगवेगळे व्यवसाय बदलले. फार नाही पण ठीकठाक पैसा कमावलाय पण बॉडीबिल्डींग कधी सोडली नाही. दरवर्षी मी लाखो रुपये खर्च करतो त्याच्यावर.

अरे तू कसला हजरजबाबी आहेस, तू आला की गृपला हसवून हसवून मारतोस, कुणी सुद्धा मी जातो असं म्हणत नाही. स्टँडअप कॉमेडीचा जरूर विचार कर.

अंगावर कामं घेऊन त्येच त्येच सुतारकाम करायचा लय कंटाळा आलाय. हे आजकालचे पोरं काय काय कोर्स करत्येत आणि आणि कायबी डोकं लढिवत्यात फर्निचर मध्ये. परवा एक असंच पोरगं आलं होतं कंपनीकडून कमिशनवर काम देतो बोलत होतं. त्याचं डोकं माझे हात. काय करावं?

अरे तो माझा मावस भाऊ आहे ना तो कसला चंपक आहे माहित्ये, थरमॅक्समधली पन्नासहजाराची एसीमध्येबसून कीबोर्ड बडवायची नोकरी सोडली आणि आता २० बाय २० च्या आणि पत्र्याच्या शेडमध्ये एक मशीन घेऊन वर्कशॉप काढणार आहे म्हणे.

अरे तो आपला १२ वीच्या वर्गातला तो होता ना बघ त्याचा ९८ चा गृप येऊन पण त्याने बाप बिल्डर म्हणून त्याच लाईनमध्ये जाण्यासाठी सिव्हिलला अ‍ॅडमिशन घेतली, अरे तो मर्चंट नेव्हीत गेलाय आता.

ह्या ना अश्या असंख्य घटना, असंख्य प्रसंग. एक विचार, मनाची एक उचल, वेडाची एक लहर, एक निर्णय आणि प्रयत्नांची पराकष्ठा पूर्ण आयुष्य बदलू शकते.

तुम्ही कधी असा विचार केलाय का? अशा पॅराडाईम शिफ्ट साठी प्रयत्न केलाय का?
पास या फेल मॅटर नही करता है बेटा बस जीजान से कोशिश करना जरूरी है. हे बाबावाक्य प्रमाण मानून कधी निर्णय घेतला आहे का? असे प्रसंग तुमच्या आसपास घडले असतील तर दुसर्‍यांसाठी प्रेरणा, सल्ला, मार्गदर्शन म्हणून ते इथे शेअर कराल का?
किंवा असं काहीतरी करायचं आहे पण प्रेरणेचा अभाव आहे, प्रयत्न चालू आहेत पण काही अडचणी येतायेत सल्ला हवाय, हो केलाय प्रयत्न, माझ्याकडे देण्यासाठी सल्ले आहेत......तरी इथे लिहा.

येस्स! आय कॅन विन, यू कॅन डू इट वगैरे सगळं ठीक आहे. पण ह्या धाग्याचा मुख्य ऊद्देश अॅस्पिरंट्सना व्यक्त होण्यासाठी असा काहीसा आहे.

मी का लिहितोय?
............मीही काहीतरी ठरवलंय, प्रयत्न करतोच आहे, कदाचित इथे लिहिणार्‍यांकडून मिळालेली प्रेरणा, सल्ला, मार्गदर्शनामुळे प्रयत्नांना गती मिळू शकेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जीव घेणी कुत्तर ओढ? कैच्याकै. तुमच्या कडे नेहमीच चॉइस असतो. शिवाय स्वतःचा उद्योग धंदा करणारे/ फ्रीलान्सर्स यांना कसलेही सेफ्टी नेट नसते. जे नोकरी वाल्यांना असते. सॉफ्टवेअरवाल्यांचे फार कवतिक करायची प्रथाच आहे.त्यांचे बरेच प्रश्न अगदी फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम्स टाईप असतात. जुन्या पिढीतही कमी पगारावर मोठ्या कुटुंबाचा गाडा ओढणारे होते. लहान भावंडांची शिक्षणे , लग्ने करवून देणारे कर्ते पुरूष, स्त्रीया अगदी बघण्यात होत्या. आता ही जे जबाबदारी घेऊन करणारे असतात ते करतात. सारखा कंटाळा येणे हे कमिटमेंट फोबिक असण्याचे लक्षण असू शकते. असे लोक त्यांचा कंटाळा कायम एक्सटर्नली प्रोजेक्ट करतात. त्यामुळे इतर लोकांच्या तसेच पूर्ण डिपार्ट मेंट चा पर्फॉरमन्स डाउन होउ शकतो. यात उगीच कमेंट करण्याचा उद्देश नाही पण प्रत्येकाने आपले वर्क लाइफ बॅलन्स सिच्युएशन वर्काउट करून काम करावे. यू नीड नॉट ब्लेम द वर्ल्ड फॉर इट.

देअर यु आर नताशा.
पण मला वाटतय असेही लोकं वाढतायेत हळुहळु, सबॅटिकल्सचे प्रमाण वाढते आहे. फ्लेक्सीवर्क वगैरे वाढते आहे. (कमी वेळ काम करताना) त्याकाळापुरता सेटबॅक ठिकच, पण पुन्हा परत पूर्णवेळ वर्कफोर्समध्ये येताना भेदभाव करु नये खरंतर. कारण असे लोकं फ्रेश एनर्जी घेऊन येतात उलट.
निदान हे एवढे परदेशात निश्चित बरे आहे.

आम्ही काही मित्रमैत्रिणी मिळून हा प्रयोग करुन पाहणार होतो. रोटेटिंग जॉब्स टाईप. Lol

सारखा कंटाळा येणे हे कमिटमेंट फोबिक असण्याचे लक्षण असू शकते. >>> Happy
हे फक्त गृहितक आहे. Happy ते तसे नसूही शकते. असे अनेक लोकं वर्कफोर्समध्ये पाहिलेत. कंटाळा externally project करायच्या ऐवजी ते नवीन जवाबदार्‍यांच्या मागे धावताना पाहिलेय. आणि यांना नवीन काम देणे, अडकवून न ठेवणे फलदायी.

बाकी सॉफ्टवेअरबॅशिंग, नोकरीवालेबॅशिंग चालू द्या. Uhoh
कुत्तरओढ ही प्रत्येक क्षेत्रात असू शकते. जाणिवा आणि व्यक्ती सा पे क्ष.

>सॉफ्टवेअरवाल्यांचे फार कवतिक करायची प्रथाच आहे.त्यांचे बरेच प्रश्न अगदी फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम्स टाईप असतात. >> अरे बापरे अमा. किती ते चिडायचे? तुम्ही आणि तुमच्याप्रमाणे सॉफ्टवेअरवाल्यांना धारेवर धरणारे सगळेच, चिल. Wink "सॉफ्टवेअरवाले" हा विषय नाही आहे इथे. Happy

मलाही नाही पटले. येथे जे लिहीत आहेत त्यांच्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम असणारे बरेच लोक आहेत म्हणून यांनी स्वतःला वाटणार्‍या प्रॉब्लेम बद्दल लिहूच नये की काय (हे म्हणजे 'राजहंसाचे चालणे...' च्या उलटे झाले Happy ). मजूर वगैरेंच्या प्रॉब्लेम्सची चर्चा जरूर व्हावी, त्याने आपल्याला पर्स्पेक्टिव्ह मिळेल.

मुळात लिहीणार्‍यांचा प्रॉब्लेम खरा आहे आणि त्यांचे लिहीणे सिन्सियर आहे हे मान्य आहे का? तसे असेल, आणि त्यांच्या प्रॉब्लेम्स ना उत्तरे त्यांच्याकडेच आहेत पण त्यांना ती सापडलेली नाहीत असे म्हणणे असेल तर त्यात काही वाद नाही. तुम्ही पर्याय देऊ इच्छित्/शकत असाल तर जरूर द्या.

अमेरिकेत कम्युट ट्रॅफिकमधे अडकणारा एखादा गट माबोवर असेल (असेलच) तर तो त्याची चर्चा करणारच. भारतातील ट्रॅफिकमधे धूर खात अडकणार्‍यांची अवस्था त्यापेक्षा वाईट आहे हे खरे. ज्यांच्याकडे गाड्याच नाहीत त्यांची त्याहूनही वाईट आहे हे ही खरे. पण या लॉजिकने कोणत्याच प्रॉब्लेमची चर्चा होऊ शकत नाही.

सॉफ्टवेअरवाल्यांचे फार कवतिक करायची प्रथाच आहे.त्यांचे बरेच प्रश्न अगदी फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम्स टाईप असतात.>>हम्म. मला वाटत त्यामुळे थोडासा आम्हा मॅन्युफॅक्चरींग वाल्याना थोडासा अवेअरनेस आला. उलट हे घडल हे बरच झालं. नाहीतर मॅन्युफॅक्चरींग मध्ये काम करणारे आता ह्यातुन सुटका नाही हे गृहित धरुन काम करत.
जगात काय घडतं हे हल्ली आपल्याकडे लवकर पोचतयं.
सॉफ्टवेअरवाल्याच कौतुक, हेवा, दुश्मनी काहीच नाहिये माझं. उलट कधी कधी त्यातल्या काही लोकाना उर फुटेस्तोवर काम करताना पाहुन वाटतं अरे रे, पैसा असेल पण जिंदगी कुठेय??
वैयक्तिकरीत्या मला सॉफ्टवेअर मध्ये काम करणार्‍या लोकांना कॉर्पोरेट लॅडर चढायला लवकर संधी असते त्याच कौतुक वाटतं. (माझी ओब्जर्वेशन्स फार जनरल आहेत. ह्याच्या अलीकडे आणि पलीकडे लोक असतात ह्याची जाणीव आहेच. जसे की फार स्ट्रेसफुल लाइफ वाले बिजनेसमन / वुमन, मॅन्युफॅक्तरींग वाले , इतर क्षेत्रात काम करणारे. आणि उलट सॉफ्टवेअर मध्ये राहुन थोडसं आरामात असणारेही असतील)

बॅशिंगचा मुद्दा कसा काय आला? फ्रिलान्सर्स आणि बिझिनेसवाल्यांना फ्लेक्झिबिलिटी असते हे अतिशय सहजपणे म्हणलं जातं ते बॅशिंग नाही की काय?
सगळ्यांनी नोकरी करणेच कित्ती बाई अवघड मान्य करायला हवेय का? नोकरीला सेफ्टीनेट असते हे चूक आहे का? हे बॅशिंग कसे काय लगेच?

नोकर्‍यांमधे वेळाअवेळांचा मुद्दा अगणित वेळा ऐकलाय. अरे एवढा प्रॉब्लेम आहे तर द्या नकार, सोडा नोकर्‍या. करा फ्रिलान्सिंग जे तुमच्यामते सोपे असते. पण मग ते आर्थिक स्थैर्य सोडायची तयारी नसते ना?

रेव्यु आणि मास्तुरेंनी अतिशय मस्त लिहिलेय. तुम्हाला तुमच्या गरजा, क्षमता आणि इच्छा ओळखता आल्या पाहिजेत. जे पटत नाहीये/ आवडत नाहीये ते नाकारता आलं पाहिजे किंवा मग खुल्या मनाने स्वीकारलं पाहिजे.

वेळांचं म्हणायचं तर इथे आमच्या फिल्डमधल्या वेळांची उदाहरणं दिली तर सगळ्यांना गप्प बसावं लागेल. मला माझं काम आवडतं आणि मग त्यासाठी वेळाअवेळा, हातावर पोट असण्यातली इन्सिक्युरिटी, कायमचेच विंचवाचे बिर्‍हाड पाठीवर हे सगळं मी पार्ट ऑफ द गेम म्हणून स्वीकारते. मला त्यात मजा येते. म्हणजे ते सोपे असते का? तर नाही.

तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी काय सोडता हे महत्वाचे आहे. पण एकदा ते सोडणं स्वीकारलं की त्याबद्दल बघावं तिथे तक्रार करत रहाणे ह्याचा अर्थ तुमच्या निर्णयाचे समाधान नाहीये आणि परत विचार करायची गरज आहे असा होतो.

>करा फ्रिलान्सिंग जे तुमच्यामते सोपे असते. >> असे कोणी, कधी आणि कुठे म्हटले?

private job madhye safety net? ithe lokanche ase mhanane diste ki bharlya poti honare dukkh he khare nahich. Tase asel tar mag charchela arth nahi.

रेव्ह्यु आणि मास्तुरे तुम्ही दोघेही खूप ग्रेट आहात.

आयुष्यात कधी असा निर्णय घेण्याची हिम्मत झाली तर तुम्हाला आठवुनच घेईन.

इतर चर्चेबद्दल फारेंडला अनुमोदन.

एकंदरीत पोस्ट्स वऋन असे वाटते आहे कि मिसकमुनिकेशन होते आहे. इथे मुद्दा नोकरि करणे विरुद्ध फ्रिलांसीन्ग बिझनेस असा नाही असे मला वाटते (निदान माझ्या दृष्टिने तरी नाही) . एक सोपी व दुसरे अवघड असा तर अजिबात नाही ...

मुळ मुद्दा: सद्य कामात/ विषयात मन लागत नाही रॅटरेस चा कंटाळा आला आहे तर बदल कसा करावा वा केला? काय खबरदारी घ्यावी?

चर्चा भरकटु नये म्हणुन काही मुद्दे (मला कळलेले)

१. कामाचे क्षेत्र बदलुन रॅट रेस जात नाही व त्या रॅटरेस मधुन बाहेर येण्या करता मानसिकता बदलण्याची गरज आहे
२. नविन क्षेत्रात जाण्यासाठि पुन्हा कष्ट घ्यावे लागतात व नव्याची नवलाई संपलि कि पुन्हा ये रे माझ्या मागल्या होते.
३. नवलाई राखणे महत्वाचे आहे. त्यामुळेच काम इंटरेस्टिंग होते.
४. भारतातील कोर्पोरेट मधे जो अनप्रोफेशनलपणा आहे त्याने काम्+आयुश्य ह्यांचा योग्य तोल सांधता येत नाही.
५. क्षेत्र बदल करताना फ्रिलांसीन्ग वा बिझनेस सोपा आहे अशा समजुतीने करू नये.
६. क्षेत्र स्विकारल्या नंतर चेरी पिकिंग सारखे फक्त चांगलेच अनुभव कसे येतील ? केल्या कामाचा मोबदला , धन पुरवठ्याची सुरक्षा ह्या काही महत्वाच्या गोष्टी नोकरीत असतात जेंव्हा त्यासाठी नोकरी करता तेंव्हा बसणारे चटके सोसायची तयारी हवी.

राग आजिबात नाही. पण आयटी मध्ये एक सेन्स ऑफ एंटायटल्मेंट आढळून येतो बरे च वेळा. बाकी पोस्ट घरून Happy

नताशा, ते जाऊ दे. तू तुझे मुद्दे मांड. इथे आम्हीही आहोत आणि वाचतोय. सॉफ्टवेअरवर एवढा राग तर बँकिगचा विषयही काढत नाही, कुठल्याकुठे जाईल विषय. Proud
कोणाचे काही म्हणणे का असेना, काय फरक पडतो?

व्यक्तिगत शोध, वेगळ्या वाटांचा शोध इथपतच.
आणि व्यवसायाचे प्रतिनिधीत्व करत असलो तरी हे मनुष्यजातीसाठी सर्वात महत्त्वाचे काम असेही काही नाही. पोटापाण्याचा उद्योग, व्यावसायिक निष्ठा आणि दुराभिमान यात फरक आहे.
माझ्या क्षेत्रातले तुम्हाला काही कळत नाही तेव्हा बोलू नका असेही काही नाही.

जातीवादासारखाच व्यवसायवाद, म्हणजेच पुन्हा पूर्वग्रहांचे दुकान. अतार्किक.

झकासराव, पेशवा+१. फ्रीलान्सिंगमध्ये रॅटरेस नाही असेही नाही.
झकासराव, मलाही इतर क्षेत्रांचे सोडाच, पार फिल्मस्टार्सबद्दलही असूया वाटत नाही. Lol उन्हात काय ते नाचायचं. १० वर्षात जिंदगीतले सगळे क्षण काम करायचे. बापरे.

To affect the quality of the day, that is the highest of arts.
Henry David Thoreau

Day म्हणजे आपल्याच क्षेत्रातला नव्हे. जगाच्या पाठीवरील कोणत्याही व्यक्तिचा दिवस. Happy

अमा, कदाचित तुमची मुद्दा समजून घ्यायची किंवा आयटीवाल्यांना समजून घ्यायची पद्धत चुकत नसेल कशावरुन? किती अझम्शन्स हो! Happy

नताशा, नसते गं सेफ्टी नेट आणि आता इथे आयटीवाल्यांचा तसाही उदो होत आहे आणि मीही त्याच क्षेत्रात आहे, तर, सद्ध्याच आमच्या कंपनीत इतक्या धडाधड नोकर्‍या गेल्या लोकांच्या. एका सकाळी मॅनेजरने बोलावून सांगितले की उद्यापासून येऊ नका. भयानक दिवस होते.. बॅंकीगवाले आयटी क्षेत्र. कुठे गेले सेफ्टी नेट?

>>> नताशा, नसते गं सेफ्टी नेट आणि आता इथे आयटीवाल्यांचा तसाही उदो होत आहे आणि मीही त्याच क्षेत्रात आहे, तर, सद्ध्याच आमच्या कंपनीत इतक्या धडाधड नोकर्‍या गेल्या लोकांच्या. एका सकाळी मॅनेजरने बोलावून सांगितले की उद्यापासून येऊ नका.

४ वर्षांपूर्वी माझ्या कंपनीत एका ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलीला दुपारी २ वाजता बोलावून तातडीने राजीनामा पत्र लिहून देण्यास सांगितले. त्यानंतर तासाभरात तिचा एम्प्लॉयी बॅच व इतर गोष्टी काढून घेऊन ती कंपनीच्या कॅम्पसबाहेर गेलेली होती. रिसेशनमुळे बर्‍याच ट्रेनींना कमी करण्यात आले होते त्यात दुर्दैवाने तिचा नंबर लागला. ती मूळची मुम्बईची. पुण्यात फ्लॅट २-३ जणींबरोबर शेअर करून राहत होती. पगार १५००० दरमहा. इतक्या पगारात पुण्यात राहणे अवघड होते. अचानक जॉब गेल्यावर बरीच धडपड करून टीसीएसने तिला ट्रेनी म्हणून घेतले व मद्रासच्या ऑफिसात पाठविले आणि ते सुद्धा १२५०० दरमहा एवढ्या पगारावर. इतक्या कमी पगारावर ती मद्रासमध्ये कशी राहणार होती खुदा जाने.

कुठे आहे सेफ्टी नेट?

आपले क्षेत्र सोडून दुसरीकडे सगळे अगदी सोपे आहे असा कोणी समज करून घेत असेल तर ते केवळ दुरून डोंगर समजावे. त्यामुले फ्रीलान्सिंग, बिजिनेस वगैरेंचे प्रश्न वेगळे, जास्त कॉम्प्लिकेटेड असतील. पण ते सोपे आहे असा सूर येथे कोणी धरलाय असे वाटले नाही. कदाचित माझे हुकले असेल.

माझे एक आवडते लॉजिक असे आहे: एखाद्या क्षेत्रातील/सिच्युएशनमधले ९०% लोक जर एखाद्या पद्धतीने वागत असतील आणि त्या बाहेरच्या माणसाला ते अ‍ॅब्सर्ड वाटत असेल तर ते त्या क्षेत्राची/सिच्युएशनची पूर्ण ओळख नसल्यानेच शक्यतो असते. अशा वेळेस आपण त्या क्षेत्रात गेलो तर त्या ९०% लोकांसारखेच आपण वागण्याची शक्यता असते. याला अपवाद असतात पण बहुतांशी असेच पाहिले आहे. स्वतः अनुभव घेतलेला आहे.

नीधप, अ.मा - तुम्ही सरधोपट मार्गापेक्षा वेगळे काहीतरी करत आहात आणि ते नक्कीच जास्त चॅलेंजिंग आहे यात काही वादच नाही. त्यामुळे ही चर्चा तुम्हाला चॅण्डलर रॉसला त्याच्या डायलेमा बद्दल म्हणतो त्याप्रमाणे "My wallet's too small for my fifties and my diamond shoes are too tight" सारखी वाटू शकते Happy पण या लोकांनी लिहीलेले प्रश्न खरे आहेत.

एखाद्या क्षेत्रातील/सिच्युएशनमधले ९०% लोक जर एखाद्या पद्धतीने वागत असतील आणि त्या बाहेरच्या माणसाला ते अ‍ॅब्सर्ड वाटत असेल तर ते त्या क्षेत्राची/सिच्युएशनची पूर्ण ओळख नसल्यानेच शक्यतो असते. अशा वेळेस आपण त्या क्षेत्रात गेलो तर त्या ९०% लोकांसारखेच आपण वागण्याची शक्यता असते. याला अपवाद असतात पण बहुतांशी असेच पाहिले आहे. स्वतः अनुभव घेतलेला आहे.>> मस्त लिहीले आहेस फारएण्ड. तुझ्या वरच्या पोस्ट्स पण छान आहेत.

फारएण्डाचे म्हणणे एकदम पटले.

रैनाने लिहिलेले कुठल्याही कामात मजा येणे मला लागू. मला या माझ्या कामाचा कंटाळा येत नाही. गेल्या १२ वर्षात मी त्यातल्या त्यात सगळ्या प्रकारचे काम करून बघितले आहे. म्हणजे चिपेच्या संदर्भातले. स्वतःहून बदल मागितला नाही, पण बदल झाला तेव्हा विरोध केला नाही. करून बघू हेही असे म्हटले. त्याचा तोटा म्हणजे एकाच क्षेत्रातली कुशलता नाही. पण मजा भरपूर. Happy राजकारण, स्पर्धा सगळीकडेच असते. सगळ्याच क्षेत्रात. स्पर्धेत उतरायचे की नाही; आपली स्पर्धा नक्की कोणाशी; कश्यासाठी; बक्षीस काय .. हे सगळे ठरवणे आपल्याच हातात असते ना.

आपले आयुष्य आपण आपल्या मॅनेजराला कंट्रोल करू दिले तर मग आपण तक्रार करू शकत नाही. मॅनेजर रजा देत नाही म्हणाली, तर तिच्या वरची माणसे, एचआरचे लोक असे भरपूर असतात. नोकरी सोडण्याचा पर्याय असतोच. इथे रजा मिळत नाही म्हणजे इथे आपण महत्त्वाचे आहोत. म्हणजे दुसरीकडेही आपल्या कौशल्याला वाव असेल हा साधा तर्क आहे.

आपले आयुष्य आपण आपल्या मॅनेजराला कंट्रोल करू दिले तर मग आपण तक्रार करू शकत नाही>>> मृदुला,
अगं हे थोडेसे सोपे झाले. यात संस्कृती आणि कार्यसंस्कृतीचा मुद्दाही येतो. उदाहरणार्थ जपानात सगळे जण उशीरापर्यंत काम (?) करतात. एकजण (जपानी) उठल्याशिवाय बाकीचे (सहसा) उठत नाहीत वगैरे. Uhoh

भारतात रजा ही बर्‍याचदा भिकेसारखी मागावी लागते. मग लोकं खोटी कारणं देऊन रजा घेतात, दांड्या मारतात इतर. ते चालतं. पण मला गप झोपायला रजा हवी आहे असे सांगणे अब्रहण्यम.
खरतर रजा ही entitlement आहे, त्याच्या उप्पर मागीतली तर कारण विचारणे ठिकच. पण त्याच मर्यादेत असेल तर कारण तरी का विचारावे?
अर्थात मला बारा वर्षात दोनच असले येडपट मॅनेजर मिळाले. बाकींच्यांनी कधी ढवळाढवळ केली नाही. पण अशा तक्रारी लोकांकडुन कायम येत असतात त्यामुळे माहितीये.

ओये लोक्स.
वेळच्यावेळी म्हणजे महिन्याचा वट्ट पगार याला सेफ्टीनेटच म्हणतात की. Uhoh
सरकारी अनुदान वगळता तो मिळतोच नोकरदाराला वेळेवर. हो, नोकरी कधीही जाऊ शकतेच.

>>पण त्याच मर्यादेत असेल तर कारण तरी का विचारावे?
+१
मला एकही असा मॅनजर न भेटल्याने सोपे वाटत असावे बहुतेक.
कार्यसंस्कृतीबद्दलही सहमत. सध्या अमेरिकन कंपनीने आमची ब्रिटिश कंपनी विकत घेतल्यापासून इथले जुने लोक अमेरिकनांच्या शनिवारी सकाळी फोन करून काही बाही विचारण्याच्या सवयीवर सारखे विनोद करत असतात. (अमेरिकेत अजून शुक्रवार संध्याकाळ असते. इंग्लंडात शुक्रवार दुपारनंतर अगदीच कुठे आग लागली असेल तर गंभीर काम, नाहीतर बीयर पीत गप्पा टप्पा.)

फ्रेन्च/मेडिटेरेनियन युरोपियन-> ब्रिटिश -> अमेरिकन -> जर्मन -> भारतीय -> चायनीज्/जपानी

वर्क लाईफ बॅलन्स या देशातील कार्यसंस्कृतींच्या क्रमाने चांगला-> वाईट आहे हे बरोबर आहे का? Happy

हे अगदी सार्वत्रिकरण करता येणार नाही. उदा. स्टार्टप मध्ये कायमच 'फ्लेक्सी' अवर्स - म्हणजे कधीही तिन्ही त्रिकाळ काम करावे लागू शकते. मोठ्या कंपन्यात त्या मानाने थोडी शिस्त. जर्मन शिस्तीत काम करतात त्यामुळे त्यांना खरे तर एकदम उत्तम टोकाला घातले पाहिजे.

भारतात मोठ्या भारतीय कंपन्यांतही फारशी शिस्त नव्हती, माझ्या अनुभवात. पण तेही तुमच्या गटावर अवलंबून. मुळात चांगली मॅनेजर असेल तर कुठेच फारसा प्रश्न येत नाही. खरेतर आपल्या शिक्षणात कामाच्या नियोजनाचे किमान मुद्दे असायला पाहिजेत असे वाटते.

Pages