आय नीड अ चेंज.....

Submitted by षण्मुखानंद on 14 February, 2011 - 10:07

च्यायला ही नोकरी माझ्या आयुष्याची वाट लावणार. तीन वर्षे झाली नाईट शिफ्ट करतोय!

यार मला ग्राफिक्स डिझाईनमध्ये जायचं होतं सॉलीड आयडीयाज आहेत डोक्यात पण कोणते ग्रह फिरले आणि कायमचा टेस्टींगमध्ये अडकलो यार!

माझी ही फिरती कधी संपणार रे देवा? तीन वर्ष झाले लग्न होऊन सलग तीन दिवस सुद्धा घरी जेवायला
मिळत नाही. आज इंदुर, उद्या दिल्ली परवा जयपूर, पुढे कसं निभावणार?

विक्या साल्या सात वर्ष झाली तुला ह्या कंपनीत, टीम लीड होऊन दोन वर्षे झालीत येड्या आहेस कुठं?
तो दिल्लीवाला सुखबीर बघ दोन वर्ष ज्युनिअर आहे तुला आणि जर्मनीच्या प्रोजेक्टचा मॅनेजरपण झाला. का? तर आयआयएम लखनौचा शिक्का आहे त्याच्या कपाळावर. तू साल्या युनि टॉप फाईव्ह मध्ये होता ना आणि एवढी ब्राईट मेमरी आहे तुझी, तू करना कॅटचा अभ्यास आणि जा बी स्कूलला. लाईफ बनेल तुझी.

मुलगा हॉटेल मॅनेजमेंटला जायचं म्हणातोय, दोन वर्षांचा पाच लाख खर्च आहे, कसं जमवू. आडीपीएलवाले जॉब द्यायला तयार आहेत पण काम सध्या करतोय त्याच्याएवढं चांगलं नाही, पुन्हा हुद्दाही सध्यापेक्षा जरा कमीचाच मिळतोय, नुसत्या पैशांकडे बघून करू का शिफ्ट. मग इथे कमावलेल्या क्रेडीटचं काय?

काय वैताग नियम आहेत या देशाचे? आता माझ्याकडे भारतातली चांगली एमडी डीग्री असतांना, दोन वर्षांची प्रॅक्टीस असतांना इथे काम करण्यासाठी पुन्हा दोन वर्ष अभ्यास करा आणि परीक्षा द्या. छ्या नुसता टाईमपास. कशाला आलो ह्या देशात. ह्याच्या बदलीपायी माझ्या करीयरची वाट. पण मला कथ्थक फार छान येतं. पूर्ण पाच वर्ष महाराजांकडे प्रशिक्षण घेतलंय, रियाज चालूच आहे, स्टेज शोजचा अनुभव आहे मग मी इथे पण शोज करू का? प्रशिक्षण पण देऊ शकतेच की मी.

मला सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जायचंय, मी फॅक्टरीतून आल्यावर रोज किमान चार तास अभ्यास करतो.
दोन महिन्यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ फक्त अभ्यास करणार. परीक्षा सहा महिन्यांनी आहे.

मला सध्याची नोकरी सोडून माझं स्वतःचं हॉटेल उघडायचंय मी आणि माझा मित्र पार्टनर होणार आहोत. एक हॉटेल चालवायलाही घेणार आहोत. पैशांची जमवाजमव करतोय.

मी आजपर्यंत सहा वेगवेगळे व्यवसाय बदलले. फार नाही पण ठीकठाक पैसा कमावलाय पण बॉडीबिल्डींग कधी सोडली नाही. दरवर्षी मी लाखो रुपये खर्च करतो त्याच्यावर.

अरे तू कसला हजरजबाबी आहेस, तू आला की गृपला हसवून हसवून मारतोस, कुणी सुद्धा मी जातो असं म्हणत नाही. स्टँडअप कॉमेडीचा जरूर विचार कर.

अंगावर कामं घेऊन त्येच त्येच सुतारकाम करायचा लय कंटाळा आलाय. हे आजकालचे पोरं काय काय कोर्स करत्येत आणि आणि कायबी डोकं लढिवत्यात फर्निचर मध्ये. परवा एक असंच पोरगं आलं होतं कंपनीकडून कमिशनवर काम देतो बोलत होतं. त्याचं डोकं माझे हात. काय करावं?

अरे तो माझा मावस भाऊ आहे ना तो कसला चंपक आहे माहित्ये, थरमॅक्समधली पन्नासहजाराची एसीमध्येबसून कीबोर्ड बडवायची नोकरी सोडली आणि आता २० बाय २० च्या आणि पत्र्याच्या शेडमध्ये एक मशीन घेऊन वर्कशॉप काढणार आहे म्हणे.

अरे तो आपला १२ वीच्या वर्गातला तो होता ना बघ त्याचा ९८ चा गृप येऊन पण त्याने बाप बिल्डर म्हणून त्याच लाईनमध्ये जाण्यासाठी सिव्हिलला अ‍ॅडमिशन घेतली, अरे तो मर्चंट नेव्हीत गेलाय आता.

ह्या ना अश्या असंख्य घटना, असंख्य प्रसंग. एक विचार, मनाची एक उचल, वेडाची एक लहर, एक निर्णय आणि प्रयत्नांची पराकष्ठा पूर्ण आयुष्य बदलू शकते.

तुम्ही कधी असा विचार केलाय का? अशा पॅराडाईम शिफ्ट साठी प्रयत्न केलाय का?
पास या फेल मॅटर नही करता है बेटा बस जीजान से कोशिश करना जरूरी है. हे बाबावाक्य प्रमाण मानून कधी निर्णय घेतला आहे का? असे प्रसंग तुमच्या आसपास घडले असतील तर दुसर्‍यांसाठी प्रेरणा, सल्ला, मार्गदर्शन म्हणून ते इथे शेअर कराल का?
किंवा असं काहीतरी करायचं आहे पण प्रेरणेचा अभाव आहे, प्रयत्न चालू आहेत पण काही अडचणी येतायेत सल्ला हवाय, हो केलाय प्रयत्न, माझ्याकडे देण्यासाठी सल्ले आहेत......तरी इथे लिहा.

येस्स! आय कॅन विन, यू कॅन डू इट वगैरे सगळं ठीक आहे. पण ह्या धाग्याचा मुख्य ऊद्देश अॅस्पिरंट्सना व्यक्त होण्यासाठी असा काहीसा आहे.

मी का लिहितोय?
............मीही काहीतरी ठरवलंय, प्रयत्न करतोच आहे, कदाचित इथे लिहिणार्‍यांकडून मिळालेली प्रेरणा, सल्ला, मार्गदर्शनामुळे प्रयत्नांना गती मिळू शकेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रैना, ध्येय/ गोल्स कधीच आदर्शवादी रोमॅन्टिक नसतात. जसं आयुष्य युटोपिअन नसतं तसं. आणि जसं वय वाढतं तसं तुमच्या निवडलेल्या प्रवासात - ध्येयाच्या/ आवडीच्या किंवा बिनआवडीच्या - तडजोडी, खाचखळगे असतातच हे नीटच कळतं. मीही केल्याहेत. पण मला त्यात मोडून पडल्यासारखं वाटत नाही. आधी लिहिलंय तसं आपण कुठली गोष्ट का करत आहोत आणि आपण ती किती बदलू शकतो/ शकत नाही याचा एकदा व्यावहारिक आणि तर्कसुसंगत लेखाजोखा जर मनात स्पष्ट असेल ना तर या तडजोडींचा एका मर्यादेनंतर त्रास होत नाही. त्यामुळे ध्येयाकडे वाटचाल = आदर्श आयुष्य असं मी तरी मानत नाही. किंवा ती ध्येयं/ गोल्स काहीतरी 'उच्च' च असली पाहिजेत असंही वाटत नाही.

पण स्वानुभवाने एकच सांगते. आपल्याला खरंच आवडणारी गोष्ट आपण करत असलो ना तर तडजोडी, निवडलेल्या मार्गातलं अपयश (मार्ग आवडला, चोखाळला म्हणजे यश येईलच कशावरून?) एका मर्यादेनंतर मॅटर करत नाहीत. जे मिळतं त्यातलाही आनंद अपार सुख देणारा असतो.

अजूनही इथे बरेचसे मुद्दे चर्चेबाहेर राहिलेत असेच मला वाटतेय.
माझ्या क्षेत्रात (अकाऊंटस / फायनान्स ) फार मोठे बदल गेल्या अनेक वर्षात झालेले
नाहीत. यापुढे व्हायची शक्यताही कमीच आहे. पण तांत्रिक क्षेत्रात ते शक्य आहे का ?
गेल्या २०/२५ वर्षातच झपाट्याने बदल होताहेत. मग आज एखादा मोठा निर्णय घेऊन, ज्या क्षेत्रात जायचे ठरवले, तिथे पुढे वाव राहिलच, याची खात्री देता येते का ?

मूळात कामाचा कंटाळाच का येतो ? त्यात तोचतोच पणा येतोय कि थकायला होतेय ? रोजच्या कामातही तूम्हाला एवढे डोके चालवावे लागते का ? तूम्हाला नेमके काय करायला आवडते ? कामात राहूनही ते करणे अशक्यच आहे का ? ज्या क्षेत्रात काम करायला आवडते, त्याच क्षेत्रात कमाई व्हावी, अशी अपेक्षा ठेवायलाच हवी का ?

प्रवासात देखील आपला बराच वेळ जातो. तो वेळ सत्कारणी लावता येणार नाही का ? का त्या वेळात देखील कामाच्या ठिकाणाचे ताणतणाव डोक्यात असतात ?

वरदा,
हे मला कळतय अगं. बिलीव्ह मी.
आम्ही म्हणतेय ते पोचत नाहीये इथल्या फक्त अ‍ॅल्गोरिदमिक थॉटप्रोसेस मध्ये एवढेच. आणि दुसरे कोणीतरी त्या धारणेनुसार लिहायला लागले की मी बंद करेन. कारण त्या मुद्यावर लक्ष जात नाहीये, म्हणुन लिहीते आहे एवढेच.
पटले नाही हे समजू शकते, पण यावर बोलायचेच नाही हे नाही समजु शकत. दृष्टीकोन वेगळा असु शकतो ना.

आवडणारी गोष्ट >>> आवडच बदलु शकते ना पण. That is fine too. एवढेच.

लांबलचक कविता काय टाकता, लोकहो Proud (वाचायचा कंटाळा येतो आणि या धाग्यावरच्या पोस्टी न वाचता सोडून देतोय म्हणून अपराधीही वाटतं.)

(अवांतर पोस्टीबद्दल खम्मा घणी.)

मंजीला अनुमोदन. धागा सार्वजनिक हवा. Happy

हो बदलू शकतेच. ध्येयं बदलत राहतात. ती लिनीअरच असतात असंही नाही. आयुष्यातली परिस्थिती, तिचा लवचिकपणा, आपल्याला आयुष्यातून भौतिक पातळीवर हव्या असणार्‍या गोष्टी हेही बदलत जातं. हे सगळं तपासत, त्यानुसार स्वतःच्या आयुष्याचा बदलता लेखाजोखा मांडत मांडतच पुढे जायचं असतं असं मला वाटतं.

रेव्यु, कविता मस्त आहे.
चमन, लेबलं न लावण्याचा निर्णय उत्तम. त्यामुळे कन्फ्युजन वाढत होतं. मला वाटतं सगळ्यांनाच लिहू दे इथे. Let's not be judgemental about others' choices and circumstances. प्रत्येकच जण काहीतरी शोधतोय म्हणूनच इथे लिहितोय. तुमचा अल्गोरिथम उत्तम आहे, अनेकांसाठी उपयोगीही आहे. पण अनेकांसाठी नाही देखील.
तुम्ही जे ध्येय ठरवा म्हणताय आणि एका वाक्यात लिहा असं नानबाला म्हणालात, त्यावर मी विचार केला. तर ते साधारण असं आहे- "मला दिवसातला ८ तासाच्यावर वेळ पैसे मिळवण्यासाठी द्यायचा नाही पण तरी इतके पैसे असावेत की कुठेही तडजोड करावी लागू नये" Happy आता यात कळीचा शब्द आहे- "कुठेही". Wink म्हणूनच मी म्हणत होते की असं एका वाक्यात उत्तर येत नाही. ज्यांचं येतं ते सुखी आहेत. Happy
रैना, तू जे पोस्टमॉडर्निस्म म्हणतेय्स, ते खरंच सगळ्यांना उलगडून सांगणं कठीण आहे. मला वाटतं आपण बहुधा सेम बोटीत असू. त्यामुळे ते लगेच कळलं तुला. Happy

चमनच्या पोस्ट्स आवडल्या. केश्विनीची पोस्ट अत्यंत प्रामाणिक आणि सुंदर.

मुळात कुठलाही निर्णय घेतला की त्या निर्णयाशी प्रामाणिक राहणं अत्यंत आवश्यक असतं. एकदा आपण घेतलेला निर्णय चुकीचा आहे हे मनाशी ठसत गेलं की पुढचे सर्वच निर्णय चुकत जातात. त्यामुळे निर्णय घेण्याआधीच पूर्ण विचार करावा..

अरे मी पोस्ट करेपर्यंत बर्‍याच पोस्टी आल्या. पुन्हा मी आणि रैना एकच गोष्ट म्हणतोय. Happy

मस्त आहे हा बाफ.

चमन Happy तुमची फॅन झालीये. एक फॅन क्लब काढावा काय? Happy Proud
ऑन अ सिरिअस नोट, खूप सुरेख आणि सहज सोप्या शब्दात समजावण्याची तुमची हातोटी पाहुन वाटते की जर तुम्ही कधी चेंजचा विचार कराल तर कृपया शिक्षण क्षेत्रात जाण्याचा विचार करा. तुमच्या सारख्या लोकांची फार गरज आहे.

तर माझ्या बद्दल... मला चेंज हवाय पण कधी आणि काय ते मात्र मुळीच माहिती नाही. सध्यातरी माझे एकच ध्येय आहे ते हे की अर्थिक स्थैर्य मिळवणे. एक्दा का ठरवलेला पैसा मिळाला की मी उडी मारणार पण काय ते त्यावेळच्या स्थितीवर अवलंबुन असणार.

पण एक मात्र नक्की की सगळे हेच करत असणार ना...

रेव्यु आणि इतर सगळ्याच्या पोस्ट्स वाचुन जाणवले त्यांनीही सगळे सेटल झाल्यावर चेंजचा विचार केला. तेच मीही करणारे. पण यापेक्षा वेगळे कुणी काही केलय का? ते वाचायचय.

पैशाचा विचार न करता... कसलाही विचार न करता मारलेल्या उड्या वाचायला मजा येईल.

>>> पैशाचा विचार न करता... कसलाही विचार न करता मारलेल्या उड्या वाचायला मजा येईल.

ही एक माहितीतल्या व्यक्तीची केस -

ही व्यक्ती अभ्यासात बर्‍यापैकी हुशार पण अत्यंत अस्थिर स्वभाव. छानछौकीची व चित्रपटांची खूप आवड. बीएससी ला प्रथम वर्ग मिळून रसायनशास्त्रात एमएससी केलं. एमएससी करताकरता डोक्यात वेगळे विचार यायला लागले. एमएससी करताकरताच आर्मीत ऑफिसर रँकला प्रवेश मिळवायचा दोन वेळा प्रयत्न केला व दोन्ही वेळा तो फसला. असे करण्यामागे आर्मीची आवड नसून काहीतरी वेगळे करावेसे वाटत होते (ही व्यक्ती शालेय व महाविद्यालयीन जीवनात कधीही एन सी सी किंवा स्काऊटमध्ये सुद्धा गेलेली नव्हती, पण वयाच्या एकविशीनंतर एकदम आर्मीत जायची उर्मी आली).

शेवटी रसायनशास्त्रात एमएससी करून ३-४ वर्षे एका रासायनिक कंपनीत नोकरी केली. शेवटी जीआरई, टोफेल इ. परीक्षा देऊन अमेरिकेतल्या एका विद्यापीठात एमएस साठी प्रवेश घेतला (वयाच्या २८ व्या वर्षी). शिक्षणासाठी बँकेकडून कर्ज घेतले होते. तिथे गेल्यावर तिथल्या प्राध्यापकांच्या सांगण्यावरून थेट पीएचडी (रसायनशास्त्रात) सुरू केले (कारण ही व्यक्ती आधीच एमएससी असल्यामुळे एमएस करण्यात काही पॉईंट नव्हता). एक वर्षभर पीएचडीचा प्रयत्न केल्यावर कंटाळा आल्यामुळे ते सोडून अभिनय शिकण्याकरता तिथेच एमएफए ला प्रवेश घेतला (ही व्यक्ती आयुष्यात कधीही रंगमंचावर गेलेली नव्हती, तरीसुद्धा वयाच्या ३० व्या वर्षी अभिनय हे करिअर करायचे ठरविले). तिथे 'अभिनय' हा एकच प्रॅक्टिकलचा विषय होता, उरलेले सर्व थिअरीचे विषय होते. थिअरीचे विषय या व्यक्तीला बाऊन्सर जायला लागले. शेवटी एका प्राध्यापकांच्या सल्ल्यावरून एमएफए ऐवजी बीएफए सुरू केले कारण त्यात थिअरीचे विषय खूपच कमी होते आणि 'अभिनय' हा प्रॅक्टिकलचा विषय होताच.

म्हणजे आधी एमएस चा प्रयत्न, नंतर ते सोडून पीएचडी चा प्रयत्न, नंतर ते सोडून एमएफए चा प्रयत्न आणि नंतर खाली उतरून बीएफए! एका वर्षाने बीएफए पूर्ण झाले. नंतर वर्षभर अमेरिकेत चित्रपट, मालिका क्षेत्रात काम मिळविण्याचा प्रयत्न केला, पण कोठेही काम मिळाले नाही. मग वयाच्या ३३ व्या वर्षी मुम्बईत परत येऊन स्थानिक मालिकांमध्ये काम मिळविण्याचा प्रयत्न ३ वर्षे केला. इथेही काही जमले नाही. शेवटी वयाच्या ३६ व्या वर्षी एका कॉलसेंटरमध्ये जॉब मिळाला. २-३ वर्षे तिथे काम केल्यावर एका परदेशातील मुलीशी ऑनलाइन लग्न जमले. ४० व्या वर्षी लग्न करून परदेशी गेल्यावर गेली ५-६ वर्षे तिथे एका बँकेत काम करत आहे. म्हणजे रसायनशास्त्र, सैन्यात करिअर, अभिनयात करिअर, कॉलसेंटर, बँक . . . असा रँडम प्रवास करताकरता एकंदरीत उशीरा का होईना पण गंगेत घोडं न्हालं!

हा प्रतिसाद विषयाशी अजिबात संबंधित नाही. विषयांतराबद्दल क्षमस्व! विचार न करता मारलेल्या उड्या ह्या मजेशीर आहेत का ती एक शोकांतिका आहे हे वाचकांनी ठरवावे.

मित्रहो,मला हे पूर्णतः मान्य आहे की ज्यावर अजून बरीच जबाबदारी आहे व जो अजून स्थिरस्थावर झाला नाहीये ( आयुष्यातील आर्थिक स्थैर्य ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब असून त्यावर मी भाष्य करू शकत नाही) ,त्याला हा निर्णय घेता येणे अवघड आहे. त्यामुळे तिशी चाळिशीत हा निर्णय घेणे व पन्नाशीत घेणे यात खूप फरक आहे.
पण काही महाभाग असेही आहेत ( इथे महाभाग हा शब्द दूषण म्हणून वापरण्यात आलेला नाही) ,त्यांना नोकरी शिवाय दुसरा विरंगुळा नाही ,म्हणून ते कितीही त्रास झाला तरीही दुसरे काहीही करू इच्छित नाहीत- त्यांची ही तशी चूक नाही.अन रॅट रेसमधील अनेक लोक मी असेही पाहिलेले आहेत.
नैराश्य असूनही ,एकट्याने घरी बसल्यास ते अजून वाढेल या भितीने तो निर्णय ते घेत नाहीत.

रैना आणि ईतर,
मला खरंच चर्चा करायला खूप मजा येतेय. पुन्हा एकदा माझे म्हणणे थोडे वेगळ्या प्रकारे सांगून बघतो.

रैना,
मला वाटतं तुला 'मटेरिअल गोल' विषयी न बोलता 'अल्टिमेट गोल' बद्दल चर्चा करण्यात जास्त ईंट्रेस्ट आहे. कल्पना मस्त आहे पण त्यात अडचणी आहेत

१) ही चर्चा फक्त वन्-टू-वन समोरासमोरच होणे शक्य आहे.
२) ऑनलाईन बाफवर केलेल्या चर्चेतून अजून दहा पानं खरडली तरी काहीही निष्पन्न होणार नाही

आयुष्याचे ध्येय, अल्टिमेट गोल वगैरे चर्चा हळूहळू अध्यात्मिक पातळीवर जाऊन वाचण्यास आणि समजण्यास जड होत राहणार.

तू 'ट्रेझर हंट' सारखा विचार का नाही करून बघत. 'अल्टिमेट गोल' ट्रेझर मिळवणं हाच आहे पण आधीच्या प्रत्येक क्लूची पायरी पार केल्याशिवाय का तिथपर्यंत पोहोचता येणार आहे? आणि प्रत्येक पायरीला तू 'मटेरिअल गोल' म्हणून न बघता 'अल्टिमेट गोल' कडे जाण्याची पायरी म्हणून का बघत नाहीस. गोल जरी मटेरिअल असला तरी त्या दरम्यान करायचा प्रवास आयुष्याचे धडे देणाराच आहे ना,पर्यायाने अल्टिमेट गोल कडेच नेणार आहे ना. बघ पटतंय का?

एक सोपं ऊदाहरण देऊन बघतो....

मला रोज थोडी मनःशांती पाहिजे, त्यासाठी मला अर्धा तास मेडीटेशन आणि अर्धा तास फक्त माझ्या मुलीबरोबर खेळण्यासाठी द्यायचे आहेत. ह्या दोन गोष्टीतून मला मनःशांती मिळते हे मला कळालं की माझं काम सोपं होऊन माझा गोल निश्चित झाला ना. मग त्यासाठी माझी योजना काय?

१) लंच ब्रेकचे १५ मिनिटं कमी करायचे.
२) ऑफिसला सकाळी १५ मिनिटे लवकर पोहोचणे.
३) कॉफी ब्रेकला बाहेर न जाता डेस्कवरच कॉफी आणणे
४) मॅनेजरशी बोलून मी रोज ७ ऐवजी ६:३० ला जाईन पण कामं कुठलीच पेंडींग ठेवणार नाही असे ठरवून घेणे.

झाले तुझा त्या दिवसापुरती मनःशांतीसाठी १ तास मिळवण्याचा, मुलांबरोबर वेळ घालवण्याचा ई. गोल पूर्ण झाला? पण त्यासाठी तुला ४ छोटे मटेरिअल गोल पार पाडावेच लागले ना. वरच्या चार पैकी प्रत्येक पायरी नुसता नंबर म्हणून दिसत असली तरी रोजच्या स्केड्यूलमध्ये ते बसवणे ह्यासाठी तुला योजना आखावीच लागणार ना.
आता एखादा बॅचलर म्हणेन हा असा एक तास वेळ वाचवून मी मॅरॅथॉन ची प्रॅक्टीस करेन मला सहा महिन्यात १३ मैलांची मॅरॅथॉन पळायची आहे तो माझा ह्या वर्षीचा गोल आहे.
कोणी म्हणेन मला कॅटचा, यूपीएससीचा अभ्यास करायचा आहे. तो झाला त्याचा गोल.

म्हणून मी आधी म्हणालो तसे आपल्याला नेमके काय पाहिजे आहे हे ध्येयनिश्चितीसाठी अत्यावश्यक आहे. हे तुझे ध्येय आयुष्यासाठीचे, पुढच्या दोन वर्षांसाठीचे, सहा महिन्याचे की त्या दिवसाचे आहे हे तुझ्या गरजेप्रमाणे तूच ठरवू शकतेस. तू म्हणशील मला हे सगळे माहित आहे.
तर मग मला काही म्हणायचे नाही.

तू ती 'स्लो डाऊन किड' वाली कविता लिहिलीस ती फार मस्त आहे पण माझे आपले पुन्हा तेच म्हणणे ती ह्या बाफवर योग्य नाही. आता ललिताने इंग्रजी कविता बॅन केल्या म्हणून पुन्हा इंग्रजी कविता मी देत नाही. पण ह्या बाफवर

रोके तुझको आंधियाँ
क्या जमीं और आसमाँ
पायेगा जो लक्ष्य हौ तेरा
लक्ष्य तो हर हाल मे पाना है

बरसे चाहे अंबर से आग
लिपटे चाहे पैरोंसे नाग
पायेगा जो लक्ष्य हौ तेरा
लक्ष्य तो हर हाल मे पाना है

हे जास्त संयुक्तिक वाटेल.

'लक्ष्य' मध्ये ह्रितिक रोशनचा ते शिखर काबीज करणं हा जरी मटेरिअल गोल झाला तरी तिथपर्यंतच्या प्रवासात तो माणूस म्हणून मोठा होतंच राहतो ना. तो पूर्ण सिनेमाच ध्येयनिश्चितीबद्दलचा आहे. मटेरिअल आणि अल्टिमेट दोन्ही ध्येय.

मटेरिअल गोल्स टाळून अल्टिमेट गोल कडे जाण्यासाठी मला नाही वाटत बुद्धाने सांगितल्याशिवाय अजून कुठला मार्ग आहे. आणि आपण सगळेच मटेरिअल जगात राहतो हे पण खोटे नाही. नाही का?

मामी>> वयाचा मुद्दा का म्हणून विचारात घ्यावा ते तुम्हीच सांगा. (खूप सॉरी मला हे लिहिणं फारंच डिस्क्रिमिनेटिंग वाटतंय) आपण स्वतः काहीतरी करायचं ठरवलंय (तुम्ही तरी सांगा तुम्ही काय बदल घडवायचा ठरवलंय )कोणीही आपल्यावर काही लादलेलं नसतांना वयाचा मुद्दा पुढे करणं म्हणजे काही ठरवायच्या आतच कारणं देण्यासारखं आहे. जिथे मन काहीतरी ठरवून बसतं आणि ते घडवून आणल्याशिवाय स्वस्थ बसवत नाही तर त्याबद्दल आपल्याला लिहायचं आहे ना.

"मला दिवसातला ८ तासाच्यावर वेळ पैसे मिळवण्यासाठी द्यायचा नाही पण तरी इतके पैसे असावेत की कुठेही तडजोड करावी लागू नये" >>> नताशा हे गोल न राहता स्वप्नरंजन होतंय असं प्रामाणिक पणे वाटतंय की नाही सांग. आधी तू तुझ्या कामाचा वेळ ८ तासांवर कसा आणायचा ह्यासाठी योजना बनव. ऊदाहरणादाखल वरच्या ४ पायर्‍या बघ. तो आला की मग प्रमोशन वगैरे साठी प्रयत्न करून पगारवाढ होतेय का बघ.
आता पगारवाढ झाल्यावर जबाबदारी आणि पर्यायाने कामाचे तास आपोआप वाढणार मग पुन्हा त्यासाठी नवीन योजना आखणं आलं, मग पगार वाढला की खर्च आपोआप वाढणार मग पुन्हा अजून पगारासाठी योजना बनवणं आलं. हे चक्र का चालू राहणार तर मनला कसली तरी हाव आहे.
आणि हे चक्र नको असेल तर अश्विनी सारख्या 'कर्मण्ये वाधिकारस्ते...' स्थितीत स्वतःला नेता येतंय का हा विचार करून बघ. पण त्यासाठीही तुला योजना बनवावीच लागेल. कारण जे आज तुझ्याकडे नाहीये ते तुला मिळवायचं आहे. आला का पुन्हा गोल. Happy

मास्तुरे Happy

हो अशा अविचारी आणि फसलेल्या उड्या आहेत काही पाहण्यात. पण अविचारी अन यशस्वी उड्या नाहीच का जगात?

अविचारी पण यशस्वी उडी असते हो... फक्त ती योग्य दिशेने घेतलेली हवी. असे कुणीच नाही का?

(तुमच्यासारखीच मोठ्ठी पोस्ट लिहिली होती पण अर्धी उडवली Sad )पण त्या उडीचे डिटेल्स इथे देणे प्रशस्त वाटेना.

मास्तुरे तुमचे, रेव्यु, निवांत दादांचे मात्र कौतुक. कारण आमच्यासारखे लोक कितीही ठरवले तरी उडी मारत नाहीत. बदलाला घाबरतात. आजची उडी उद्यावर ढकलण्यात समाधान मनतात.

इथे तुमचे सगळ्यांचे अनुभव वाचुन कधीतरी उडी मारण्याचे धैर्य तरी गोळा करता आले. हे ही नसे थोडके.

विचार न करता मारलेल्या उड्या ह्या मजेशीर आहेत का ती एक शोकांतिका आहे हे वाचकांनी ठरवावे. >>> मास्तुरे रेव्यु, त्यासाठीच तर मी ईथे 'योजना योजना' म्हणून घसा कोरडा करतोय. पण कोणी त्याबद्दल एक अक्षरही बोलत नाही.

रेव्यु >>> तुमच्या नव्या पोस्टीबद्दल खूप धन्यवाद.

चमन, तुमच्या आणि इतरांच्या पोस्टी वाचते आहे, काही पटतात, काही अगदीच नाही. 'योजना' असली तरी ती फसायचा वा त्यात बदल करणे अनिवार्य होऊ शकणे, हे लक्षात घेतले आहे का? योजना सरळसोट पार पडेलच असे गृहित धरले आहे का? किंवा कधी कधी अनेकोविध कारणांनी वा परिस्थितीमुळे योजना पार पाडता येतही नाही.. कायमसाठी नसेल, पण काही काळापुरते असू शकते.

शैलजा...
बरोबर आहे...योजना फसण्याची आणि त्यात बदल करावे लागण्याची शक्यता नेहमीच असते म्हणून त्यासाठी आपल्याला काय करायचंय तर... 'योजना बनवायचीये' Happy

तुम्ही म्हणतायेत ते 'रिस्क अ‍ॅनालिसिस' योजना बनवतानांच करणे जरूरी आहे.
मला नवीन ऊद्योअग सुरू करायचा आहे आणि त्यासाठी माझ्या योजनेत खालील पायर्‍या आहेत

व्यापारासाठीचे लायसन्स मिळवणे
दुकान वगैरे इंफ्रास्ट्र्क्टर सेटअप करणे
मार्केट रिसर्च करणे
भांडवल म्हणून 'बँकेकडून १० लाख कर्ज मिळवणे'
जाहिरात करणे.

आता ह्या पायर्‍या वरून खाली मी 'डन' म्हणून टिक करत गेलो. आणि बँकेच्या पायरीला येऊन मला कळाले की 'मी १० लाख लोन साठी ईलिजिबल होऊ शकत नाही, जास्तीत जास्त २ लाख मिळतील' मग झाली ना योजना फ्लॉप. पण ह्यात चूक अशी झाली की योजना बनवनार्‍याने बँक ही आऊट ऑफ कंट्रोल गोष्टं गृहीत धरून रिस्क घेतली आणि ती मिटिगेट न करता योजना राबवली. म्हणून आपल्याला फूल प्रूफ योजना बनवायची आहे

व्यापारासाठीचे लायसन्स मिळवणे किंवा लायसन्स होल्डर्ला भागिदा बनवणे.
दुकान वगैरे इंफ्रास्ट्र्क्टर सेटअप करणे किंवा आयता सेटअप रेंट करणे
मार्केट रिसर्च करणे किंवा वेळेअभावी हे काम आऊट्सोर्स करणे
भांडवल म्हणून 'बँकेकडून १० लाख कर्ज मिळवणे' किंवा जवळचं सोननाणं विकून पैसा ऊभा करणे.
जाहिरात करणे.

आता बघा हीच योजना अजून चांगली झाली ना.

म्हणून तर योजनेबद्दल ईथे चर्चा घडवून आणून ती अजून फूल प्रूफ कशी बनवता येईल हे आपल्याला बघायचं आहे. पण तरीही शेवटी काहीतरी गृहीत न धरलेले घडू शकतेच जसे आग, पूर.
मग त्यासाठी 'डिसआस्टर रिकवरी' प्लॅन (आली का पुन्हा योजना) ही बनवणं आलंच.

फार छान धागा आहे. अजुन सगळ्या पोस्ट वाचल्या नाहित, पण आधिच काही लिहावस वाटल.
कदाचित पुनराव्रुत्ती होइल.
मी आर्किटेक्ट आहे. प्रत्येक नवा प्रोजेक्ट नविन अनुभव घेउन येतो. पण १०-१२ वर्ष हे केल्यावर शेवटी प्रोसेस तिच ती आणि कन्टाळवाणी व्हायला लागली. मग दुसर्या बाजुला बसुन पाहिल. म्हणजे मोठे प्रोजेक्ट करणार्या कॉर्पोरेटस ची इन हाउस आर्किटेक्ट म्हणुन. हे काम करताना मजा आली. एकटीनी करता आले असते त्यापेक्शा मोठे प्रोजेक्ट्स, प्रतिथयश लोकांबरोबर करायला मिळाले. पण २-३ वर्षानी परत साचले पणा. मग माझ्याच क्षेत्रात जरा वेगळा सेक्टर म्हणुन इंडस्ट्रिञल प्रोजेक्ट्स करायची सन्धी मिळाली. एक नविन दार उघडल . ४ वर्ष हे केल्यावर त्याची कळ सापडली .तरी साचलेपणा येत होताच परत. मग वाटल हा एक पॅटर्न होतोय, नव्याची उत्सुकता , झिन्ग उतरली की साचले पणा येतो. मग आवान्तर माझ्या विषयाच सोडुन वाचायचा सपाटा लावला. यान्त्रीक पणे काम करताना मला नक्की काय करायचय ह्या विचारचा बॅग्राउन्ड स्कोर चालु ठेवला मनात. ( त्यातुन कळल की ह्यात सुधारणा होणार नाही, आपल मन दर काही दिवसाने मला कन्टाळा आला ची रेकॉर्ड वाजवणार)
ह्या विचारमन्थनातुन (?) काही गोष्टी ठरवल्या. एकतर नोकरी नको , स्वतःसाठी काम करायचे. ह्यामुळे मला हवे तसे बदल माझ्या कामात करता येण शक्य होईल. (नविन घेतलेल घर , माझ ४० कडे पोचणार वय, त्या वेळच्या नोकरीतले उतरन्डीवरचे स्थान, मिळणारी घसघशित आणि नियमित रक्कम पाहता १०० टक्के मुर्खपणा!)
पण नवरा म्हणाला मार उडी ( बहुधा माझ्या दर साल कन्टाळा रेकॉर्डला कन्टाळुन Wink )
मग २ महिने सुट्टी घेतली. माझ्याच कामाच स्वरुप मुळ गाभा तोच ठेउन बदलता येइल अस वाटल. माझ्या सारखा विचार करणारे इतर तिघे ही सहभागी झाले. तेही भिन्न क्षेत्रातले. काम करण्याचा , आवाका आणि परिघ दोन्ही विस्तारले. प्रस्थापितान्शि टक्कर देण सोप नव्हत , त्यावर तोडगा म्हणुन उथळ पाण्यातल्या मारामारी ऐवजी ब्लु ओशन स्टॅटेजी वापरुन खोल , खवळत्या समुद्रात जायच ठरवल. पुर्वी केलेल्या बर्या कामान्ची पुण्याई होतीच जमेला.
बस्तान हळुहळु बसतय आता. खोल पाण्यात होडी घालायची झिन्ग न्यारीच आहे. कथा, पटकथा, सन्गित, निर्माता , दिग्दर्शक ,आपले आपण त्यामुळे मुळ पदार्थ तोच ठेउन वेगवेगळ गार्निश करता येतय, साइड डिश ,डेझर्ट बदलुन रन्गत आणता येतेय, कधी पाट रान्गोळी, कधी कॅन्डल लाइट , कधी ढाबा अस सेटिन्ग बदलुन पाहता येतय. एकुणात मज्जा येतेय.
लिहिलय तेवढ सोप नव्हत, पण उभ रहाताना, गटान्गळ्या खाताना आणि आता मस्त गुणगुणत सफर करताना अस वाटल हे लिहुन काढाव. Happy

हुश्श! लिहिल ! आता वाचते बाकीच!

इन्ना <<<< (नविन घेतलेल घर , माझ ४० कडे पोचणार वय, त्या वेळच्या नोकरीतले उतरन्डीवरचे स्थान, मिळणारी घसघशित आणि नियमित रक्कम पाहता १०० टक्के मुर्खपणा!) >>>

मस्तच ! तुझी पोस्ट वाचायला खरच मजा आली.

चमन तेच तर. तसेच प्रत्येक टप्प्यावर जसजसे आपण वेगवेगळ्या मनस्थितीमध्ये, परिस्थितीमध्ये असू शकतो, तसतसे, विचार बदलत जातात, काय हवे काय नको ह्यांचे आडाखे बदलत जातात. जे आज हवेसे वाटते, ते उद्या तसे राहीलच असे नाही. म्हणजे काय ते कमी महत्वाचे ठरते का किंवा जेह्वा कधी वाटले तेह्वा होते का? तर, माझ्या मते नाही. हीच तर इवॉल्व्ह व्हायची प्रक्रिया ना?

योजना ठरवून त्याला टिकून राहून मी एक पॅटर्न वापरला आणि पुढे ते सारेच फोल वाटायची शक्यता आहेच ना? की नाही? Happy आयुष्यभरात मला सततच काय हवे आहे हे एकाच टप्प्यावर कसे कळू शकते? तसे कळाले तर संघर्षाची गरजच काय? आपल्याला अमूक एक नको आहे वा हवे आहे, ह्या टप्प्यापर्यंत तरी यायला हवे ना? पुन्हा सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्यातल्या जबाबदार्‍या वगैरे तर दृष्टीआड करता येत नाहीत ना?

एखाद्या प्रोजेक्टप्रमाणे टू डू लिस्ट बनवून आयुष्य जगता येते का? की हे करायचे आहे, त्यासाठी ही योजना, झाली का? टिक मार्क करा, पुढची योजना पहा, झाली का.. किंवा अगदी असे समजून चालू की योजनाही तयार आहे, पण काही कारणाने आता ती नाही पुढे जाऊ शकत. मग त्याबद्दल बोलायचेही नाही? कदाचित प्रतिकूल परिस्थितीमध्ये पुढे जाण्यासाठी वा तगून राहण्यासाठी तो एक मोटीव्हेशनल फॅक्टर ठरु शकतो कदाचित. योजना नसेल तर बोलू नका वा बॅकवर्ड थॉट प्रोसेस वगैरे कसे काय ठरते ते एकदम? Happy

थोडस आवान्तर,
शेवटची नोकरी सोडताना, सगळ्या सहकार्याना एक मेल पाठवल होत, मला बेश्ट आवडलेल वाक्य लिहुन
“I wanted a perfect ending. Now I've learned, the hard way, that some poems don't rhyme, and some stories don't have a clear beginning, middle, and end. Life is about not knowing, having to change, taking the moment and making the best of it, without knowing what's going to happen next.
Delicious Ambiguity.”
― Gilda Radner

चमन तेच तर. तसेच प्रत्येक टप्प्यावर जसजसे आपण वेगवेगळ्या मनस्थितीमध्ये, परिस्थितीमध्ये असू शकतो, तसतसे, विचार बदलत जातात, काय हवे काय नको ह्यांचे आडाखे बदलत जातात. जे आज हवेसे वाटते, ते उद्या तसे राहीलच असे नाही. म्हणजे काय ते कमी महत्वाचे ठरते का किंवा जेह्वा कधी वाटले तेह्वा होते का? तर, माझ्या मते नाही. हीच तर इवॉल्व्ह व्हायची प्रक्रिया ना? >>> ही लई ड्यांजर कंडिशन हाय. काऊंन्सिलिंग मस्ट.

योजना ठरवून त्याला टिकून राहून मी एक पॅटर्न वापरला आणि पुढे ते सारेच फोल वाटायची शक्यता आहेच ना? की नाही? >> एकच पॅटर्न वापरावा असे काही नाही. गोल बदलेल तशी योजना बदलेल. पण योजना न ठरवता (योजना ठरवणे म्हणजे म्हणजे मनाविरुद्ध निर्णय घेणे नव्हे) केले तर नक्कीच सगळे फोल ठरण्याची शक्यता जास्त आहे असे तुला वाटत नाही का?

आयुष्यभरात मला सततच काय हवे आहे हे एकाच टप्प्यावर कसे कळू शकते? तसे कळाले तर संघर्षाची गरजच काय? आपल्याला अमूक एक नको आहे वा हवे आहे, ह्या टप्प्यापर्यंत तरी यायला हवे ना? पुन्हा सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्यातल्या जबाबदार्‍या वगैरे तर दृष्टीआड करता येत नाहीत ना? >>>
म्हणूनच मी म्हणतो आहे की आयुष्याचे ध्येय 'अल्टिमेट गोल', ईवॉल्व्ह वगैरे फंदात न पडता...आपल्या मनाचा कौल घेऊन छोटे छोटे (रिअ‍ॅलिस्टिक आणि मटेरिअल) गोल ठेवा. मनाला बरोबर घेऊन प्रवास करत राहिलात तर ईवॉल्व्ह होण्याची प्रोसेस आपोआप घडत राहते. ईवॉल्व होण्यासाठी वेगळा गोल ठेवणे ही मला वाटतं जास्त करून अध्यात्माशी निगडीत बाब झाली आणि त्याबद्दलची चर्चा आजोबात सोपी नाही.

आयुष्यभरात मला सततच काय हवे आहे हे एकाच टप्प्यावर कसे कळू शकते? तसे कळाले तर संघर्षाची गरजच काय? आपल्याला अमूक एक नको आहे वा हवे आहे, ह्या टप्प्यापर्यंत तरी यायला हवे ना? पुन्हा सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्यातल्या जबाबदार्‍या वगैरे तर दृष्टीआड करता येत नाहीत ना?
>>>
मला २६ मैलांची मॅरॅथॉन पळायची आहे असा गोल मी ठरवला तर माझ्या ईवॉल्व होण्यात त्याने काय फरक पडतो. झालाच तर चांगलाच फरक पडेल पण वाईट पडणार नाही. मी माझी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मेहनत घेऊन एखादी परीक्षा पास होतो ह्याने माझ्या ईवॉल्व होण्यात काय फरक झाला?
मला एकटीने घरच्या जबाबदार्‍या विसरून कैलास मानसरोवर यात्रा करायची आहे ह्याने माझ्या ईवॉल्व्ह होण्यात काय फरक पडला?

ईवॉल्व्ह वगैरे होणे म्हणजे नक्की काय तुला सांगता येईल का? एखादा अ‍ॅवरेज बुद्धीमत्तेचा मुलगा प्रयत्नपूर्वक सर्जन झाला आणि ४० व्या वर्षी त्याला 'अरेरे मी इंजिनियर झालो असतो तर वेगळ्या प्रकारे ईवॉल्व्ह झालो असतो, मी ऊगीचच सर्जन होण्याचा गोल ठेवला' असे वाटले तर त्याने काय करावे असे तू विचारतेयेस का?
निअँडरथल पासून आपण आजपर्यंत प्रगती केली. नुसते शारिरिकच नाही तर मानसिक बदलही घडून आलेच ना. रानटीपणा कमी होत जाऊन आपण ईवॉल्व्ह होत गेलोच ना. त्यासाठी काही वेगळे प्रयत्न करावे लागले का? तर नाही? ज्या त्या पिढीतले लोक त्यांना नेमून दिलेली कामं धडपडत नवनवीन टारगेट ठेऊन करीत राहिले.

शैलजा , प्रत्येकाचा पिन्ड असतो , काही मनापासुन अणि आनन्दानी टू डू लिस्ट प्रमाणे काम करु शकतात. काहीना लिस्ट करुन सुद्धा त्याबाहेरच खुणावत असत. माझी आजी म्हणायची तस प्रत्येकाला आपल्या परसातल आळु किती खाजत त्याचा अन्दाज असतो. त्यामुळे आपण आपापल्या अळुची भाजी करावी. Happy न खाजणारी.;)

Pages