आय नीड अ चेंज.....

Submitted by षण्मुखानंद on 14 February, 2011 - 10:07

च्यायला ही नोकरी माझ्या आयुष्याची वाट लावणार. तीन वर्षे झाली नाईट शिफ्ट करतोय!

यार मला ग्राफिक्स डिझाईनमध्ये जायचं होतं सॉलीड आयडीयाज आहेत डोक्यात पण कोणते ग्रह फिरले आणि कायमचा टेस्टींगमध्ये अडकलो यार!

माझी ही फिरती कधी संपणार रे देवा? तीन वर्ष झाले लग्न होऊन सलग तीन दिवस सुद्धा घरी जेवायला
मिळत नाही. आज इंदुर, उद्या दिल्ली परवा जयपूर, पुढे कसं निभावणार?

विक्या साल्या सात वर्ष झाली तुला ह्या कंपनीत, टीम लीड होऊन दोन वर्षे झालीत येड्या आहेस कुठं?
तो दिल्लीवाला सुखबीर बघ दोन वर्ष ज्युनिअर आहे तुला आणि जर्मनीच्या प्रोजेक्टचा मॅनेजरपण झाला. का? तर आयआयएम लखनौचा शिक्का आहे त्याच्या कपाळावर. तू साल्या युनि टॉप फाईव्ह मध्ये होता ना आणि एवढी ब्राईट मेमरी आहे तुझी, तू करना कॅटचा अभ्यास आणि जा बी स्कूलला. लाईफ बनेल तुझी.

मुलगा हॉटेल मॅनेजमेंटला जायचं म्हणातोय, दोन वर्षांचा पाच लाख खर्च आहे, कसं जमवू. आडीपीएलवाले जॉब द्यायला तयार आहेत पण काम सध्या करतोय त्याच्याएवढं चांगलं नाही, पुन्हा हुद्दाही सध्यापेक्षा जरा कमीचाच मिळतोय, नुसत्या पैशांकडे बघून करू का शिफ्ट. मग इथे कमावलेल्या क्रेडीटचं काय?

काय वैताग नियम आहेत या देशाचे? आता माझ्याकडे भारतातली चांगली एमडी डीग्री असतांना, दोन वर्षांची प्रॅक्टीस असतांना इथे काम करण्यासाठी पुन्हा दोन वर्ष अभ्यास करा आणि परीक्षा द्या. छ्या नुसता टाईमपास. कशाला आलो ह्या देशात. ह्याच्या बदलीपायी माझ्या करीयरची वाट. पण मला कथ्थक फार छान येतं. पूर्ण पाच वर्ष महाराजांकडे प्रशिक्षण घेतलंय, रियाज चालूच आहे, स्टेज शोजचा अनुभव आहे मग मी इथे पण शोज करू का? प्रशिक्षण पण देऊ शकतेच की मी.

मला सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जायचंय, मी फॅक्टरीतून आल्यावर रोज किमान चार तास अभ्यास करतो.
दोन महिन्यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ फक्त अभ्यास करणार. परीक्षा सहा महिन्यांनी आहे.

मला सध्याची नोकरी सोडून माझं स्वतःचं हॉटेल उघडायचंय मी आणि माझा मित्र पार्टनर होणार आहोत. एक हॉटेल चालवायलाही घेणार आहोत. पैशांची जमवाजमव करतोय.

मी आजपर्यंत सहा वेगवेगळे व्यवसाय बदलले. फार नाही पण ठीकठाक पैसा कमावलाय पण बॉडीबिल्डींग कधी सोडली नाही. दरवर्षी मी लाखो रुपये खर्च करतो त्याच्यावर.

अरे तू कसला हजरजबाबी आहेस, तू आला की गृपला हसवून हसवून मारतोस, कुणी सुद्धा मी जातो असं म्हणत नाही. स्टँडअप कॉमेडीचा जरूर विचार कर.

अंगावर कामं घेऊन त्येच त्येच सुतारकाम करायचा लय कंटाळा आलाय. हे आजकालचे पोरं काय काय कोर्स करत्येत आणि आणि कायबी डोकं लढिवत्यात फर्निचर मध्ये. परवा एक असंच पोरगं आलं होतं कंपनीकडून कमिशनवर काम देतो बोलत होतं. त्याचं डोकं माझे हात. काय करावं?

अरे तो माझा मावस भाऊ आहे ना तो कसला चंपक आहे माहित्ये, थरमॅक्समधली पन्नासहजाराची एसीमध्येबसून कीबोर्ड बडवायची नोकरी सोडली आणि आता २० बाय २० च्या आणि पत्र्याच्या शेडमध्ये एक मशीन घेऊन वर्कशॉप काढणार आहे म्हणे.

अरे तो आपला १२ वीच्या वर्गातला तो होता ना बघ त्याचा ९८ चा गृप येऊन पण त्याने बाप बिल्डर म्हणून त्याच लाईनमध्ये जाण्यासाठी सिव्हिलला अ‍ॅडमिशन घेतली, अरे तो मर्चंट नेव्हीत गेलाय आता.

ह्या ना अश्या असंख्य घटना, असंख्य प्रसंग. एक विचार, मनाची एक उचल, वेडाची एक लहर, एक निर्णय आणि प्रयत्नांची पराकष्ठा पूर्ण आयुष्य बदलू शकते.

तुम्ही कधी असा विचार केलाय का? अशा पॅराडाईम शिफ्ट साठी प्रयत्न केलाय का?
पास या फेल मॅटर नही करता है बेटा बस जीजान से कोशिश करना जरूरी है. हे बाबावाक्य प्रमाण मानून कधी निर्णय घेतला आहे का? असे प्रसंग तुमच्या आसपास घडले असतील तर दुसर्‍यांसाठी प्रेरणा, सल्ला, मार्गदर्शन म्हणून ते इथे शेअर कराल का?
किंवा असं काहीतरी करायचं आहे पण प्रेरणेचा अभाव आहे, प्रयत्न चालू आहेत पण काही अडचणी येतायेत सल्ला हवाय, हो केलाय प्रयत्न, माझ्याकडे देण्यासाठी सल्ले आहेत......तरी इथे लिहा.

येस्स! आय कॅन विन, यू कॅन डू इट वगैरे सगळं ठीक आहे. पण ह्या धाग्याचा मुख्य ऊद्देश अॅस्पिरंट्सना व्यक्त होण्यासाठी असा काहीसा आहे.

मी का लिहितोय?
............मीही काहीतरी ठरवलंय, प्रयत्न करतोच आहे, कदाचित इथे लिहिणार्‍यांकडून मिळालेली प्रेरणा, सल्ला, मार्गदर्शनामुळे प्रयत्नांना गती मिळू शकेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नानबा >>> राग मानू नकोस. मला खरंच कळालं नाही तुला काय म्हणायचं आहे.
हे ईश्वरराव हे पुरुषोत्तमराव वाचत असल्यासारखं वाटायला लागलंय आता.
फॉरवर्ड चेंज/ बॅकवर्ड चेंजचा वाद राहूदेत पण पहिल्याने तुला हवा असलेला चेंज इथे 'एका वाक्यात' लिही पाहू. आजिबात अध्यात्मिक गोल-गोल न लिहिता सगळ्यांना कळेल असं लिही.

मुळात गुगलमधे नोकरी, २ लाख पगार देणारी नोकरी ह्या गोल म्हणाव्यात इतक्या मोठ्या गोष्टी आहेत का? >>> मग आयटी मध्ये असणारा मला सर्जन व्हायचंय किंवा नासाच्या पुढच्या चांद्रमोहिमेवर जायचंय असं म्हणाला तर तो त्याचा गोल होऊ शकतो का? तो गोल अचिव करण्यासाठी त्याची काय योजना असावी असे तुला वाटते.
स्वतःच्या लाईफचा कंट्रोल घेऊन त्याला हवं तसं वळवण हे बेस्टच >>> ह्यासाठी नक्की करायचं?

तू तुझ्या पोष्टीत जे काय लिहिले आहे त्याला आपण 'सेटबॅक्स' असे म्हणालो तर नक्की काय मिळवतांना तुला ह्या सेटबॅक्सना तोंड द्यावं लागलंय? ह्याचं ऊत्तर पैसा आहे का? (जे काय ऊत्तर असेल ते सांग) मग किती पैसा मिळवला म्हणजे तुला समाधान मिळेल छंद जोपासता येतील? त्यासाठी सध्याच्यापेक्षा जास्त की कमी पैसा हवाय? मग जास्त किंवा कमी पैसा मिळवण्यासाठी तुझी काय योजना आहे. आता ही योजना अंमलात आणणे म्हणजे तुझा गोल झाला की नाही?
आयुष्यावर कंट्रोल मिळवणं हा गोल ठेवला तर त्यासाठी नक्की काय करायचंय?

रोज घरी जाण्यासाठी रात्रीचे नऊ वाजतात आज सहा वाजता घरी पोहोचणे हा गोल ठेवला तर त्यासाठी तुला दिवसभरात काय करावं लागणार आहे? ते लिहि.

I Don't care if it hurts, I want to have control
I want a perfect body, I want a perfect soul

स्कॅला आणि कोलॅक्नि ब्रदर्सच्या 'क्रीप' मधल्या ह्या दोन ओळी आहेत.
बाकीचे गाणे सोडून द्या पण ह्या दोन ऑली सांगतायेत की 'कितीही त्रास झाला तरी मला कंट्रोल मिळवायचा आहे आणि तो मिळवून मला अप्रतिम शरीर आणि आत्मा हवा आहे.'
तू म्हणतेस तसं अप्रतिम शरीर आणि आत्मा हा सगळ्यांनाच हवा असलेला अल्टिमेट गोल आहे पण नक्की त्या दोन ओळींच्यामध्ये काय केल्याने हेसाध्य होईल. ते आपल्याला बघायचे आहे.
ओळींचा शब्दशः अर्थ घेतला तर एखादा बेढब माणूस मनाशी काहीतरी ठरवल्याप्रमाणे म्हणतोय...कितीही त्रास झाला तरी मी व्यायाम करणार आणि चांगले आचरण करणार. माझ्या शरीराचा आणि मनाचा कंट्रोल मिळवणार आणि त्यात पर्फेक्शन मिळवत राहणार.
पण ह्या ओळी नुसत्या शरीर आणि मनाशी निगडीत न करता मतितार्थ बघितला तर .... आयुष्यात काहीनाकाही मिळवण्याचा प्रयत्न करणार्‍या आणि काहीतरी सारखे खुणावत असल्याने स्वस्थ न बसू शकणार्‍या माणसाने प्रचंड आत्मविश्वासाने लिहिल्या आहेत असे मला वाटते. त्या आत्मविश्वासाने भारलेल्या मायबोलीकराला सगळ्यांनी वाचावे असे मला वाटते.

रैना.. तुझा गैरसमज होतोय. कोणी इथे लिहू नये हा माझा ऊद्देश नाही ऊलट नक्की काय लिहायचे आहे हे समजून अजून लिहावे असे मला वाटतेय.

चिनूक्स, निवांत धन्यवाद!

चर्चा अजुनच रंगते आहे.

एक गोष्ट मला तरी विसरता येत नाहिये. "बदल हवा असे वाटणे व त्यानुसार विचार करुन ध्येय निश्चित करणे व त्यानुसार पावले टाकुन तिथे पोचणे" हा उत्तम मार्ग असला तरी, सर्वांची ते करण्याची कुवत असेलच असे नाही. वैचारीक, बौध्धीक, शारिरीक, मानसिक, आर्थिक... काहीही कुवत. त्यामुळे ते 'कंटाळा आलाय' असे म्हणतच ते काम वर्षानुवर्षे करत राहु शकतात व होत असणारा त्रास मनात दाबुन ठेवण्यापेक्षा. 'कंटाळा आलाय, बदल हवाय' असे नुसते बोलणे पण त्यांच्यासाठी होणार्‍या त्रासाचा थोडासा निचरा पण असु शकतो.
आपल्याला ते ऐकण्याचा कंटाळा येऊ शकतो पण त्याच्यासाठी ते बोलुन दाखवणे हाच कधीकधी बदल असु शकतो.

मी जे बदल केलेले व आनंदी झालेले पाहिले आहेत ते २ प्रकारे, १) त्यांनी आधी स्वतः आर्थिक गणित भक्कम केले व मगच बदल पत्करला. २) संसारातल्या एकाला बदल हवा होता किंवा पैसा नाही/कमी मिळाला तरी आवडीचे काम करण्याची आत्यंतीक इच्छा होती तेव्हा त्याने दुसर्‍याच्या मिळकतीत आर्थिक गणित कमी झाले तरी व्यवस्थीत भागेल इतपत नीट राहील हे पाहुन बदल पत्करला.

चमन , मस्तच पोस्ट्स.. खूप क्लीअर.
रैनाचा मुद्दा थोडा वेगळा आहे, तो पण लक्षात येतोय.
पण चमन ची एकूण थॉट प्रोसेस आवडली.

Chaman, masta posts. Tuzya saglya posts na + 1 . Nit samajatayt baryach goshti. Ithe lihilybaddal dhanywad. Happy

चमन + १०!

मी स्वतः खुप क्लेश, यातना करुन घेतल्या आहेत माझ्या आहे त्या रुटिन ला कंटाळून, काहीतरी चेंज पाहिजे ह्या "खयाल"लाला जागं ठेवून. मला चेंज का हवा होता हा मुद्दा जरा विचित्र आहे आणि तो ह्या बाफं चा विषय नाही म्हणून त्या विषयी इथे नाही लिहीणार. तू दिलेला हा "अल्गोरिदम" खुप उपयोगाचा आहे. माझा बराच वेळ फक्त चेंज हवा ह्या वैतागवाडीतच गेला, खुपच तापदायक अनुभव होता, माझ्याकरता आणि बायको करता सुद्धा. त्या विचारापायी रोजचे आयुष्य नीट जगणे मुश्किल झाले होते.
माझ्या स्वत:चे मी केलेल्या निरिक्षणावरुन मला तर वाटतं की तो जो काही "गोल" आपल्या डोक्यात आहे तो पुर्ण होईल की नाही माहित नसल्यामुळे आणि तो पुर्ण करण्याकरता लागणार्‍या वेळाला, कष्टाला घाबरुन/वैतागून म्हणा मी तो पुर्ण व्हायच्या दृष्टिनी काहीच पावलं उचलत नव्हतो. पावलं न उचलल्यामुळे आपला गोल कधी पुर्ण होणारच नाही हे मला अर्थातच माहित होतं आणि ती भावना मला आणखिन खड्ड्यात खोलवर ढकलत होती.
चेंजची (किंवा गोलची) ठोस व्याख्या, तो मिळवण्यासाठी योजना आणि सगळ्यात शेवटी पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे गोल (तो कितीही लहान अथवा मोठा असला तरी) मिळवण्याच्या दृष्टिनी पावलं उचलणे हे अत्यंत महत्वाचे आहे नाहीतर आयुष्य संपून जाईल पण चेंज आणि त्यातून मिळणारे समाधान मिळणार नाही. Happy

मृदुला, काही इंडस्ट्रीज अशाच असतात जिथे आयटी/टेक कंपन्यांसारखं ओपन वर्किंग कल्चर नसतं. तुम्ही कितीही नियोजन केलंत तरी शेवटी बॉस्/क्लायंट म्हणाला म्हणून भलत्या वेळेला आणि तेही "रोज" काम करावंच लागतं. यात विकेंड्स ही आले आणि नॅशनल हॉलिडेज ही. शिवाय माझ्याकडे सुट्ट्या आहेत म्हणून घेतली , असंही चालत नाही. उदा. बँकिंग.
बँकिंग मध्ये इतक्या अमानुष प्रॅक्टिसेस आहेत की खरंच न बोललेलंच बरं. नवरा त्यात असल्याने मला अगदी नीट माहीत आहे. कितीही इच्छा असली तरी रोज जीमला काणे, किंवा एखाद्या दिवशी गाडी सर्विसिंगला टाकणे एवढी साधी गोष्ट अशक्य आहे त्याच्यासाठी.
आपल्याला किती जरी आवडत असले तरी प्रत्येक वेळी भुक लागली म्हणून आपण गुलाबजाम खाऊ शकत नाही. तसंच कुठलेही काम किती जरी आवडले तरी वर्षानुवर्षं रोज १२ तासाच्यावर, वेळीअवेळी करणं अशक्य आहे, नव्हे नानबा म्हणते तसे अमानुष आहे. त्यामुळे "तुम्हाला पॅशन असेल तर कंटाळा येत नाही" हे सुद्धा काही खरं नाही. उलट आपल्या आवडत्या कामाचा त्यामुळे तिट्कारा उत्पन्न होऊ शकतो. मग सुरु होतो शोध आपल्याला खरंच काय हवेय याचा. अन त्याचं उत्तर कधीच "मला २लाख महिना हवा" किंवा "मला रोज सहा वाजता घरी यायचेय" असं साधं सरळ येत नाही. Happy

मग माझ्यासारख्या पहिल्याच नोकरीत स्थिर राहणारीला काय म्हणाल? Uhoh प्रत्येक लेव्हलला वेगवेगळी प्रेशर्स अनुभवली आहेत (अकाऊंट्स किंवा सेल्स मध्ये नसल्याने इयरएंडींगचं प्रेशन नाही अनुभवलं). पण तरी निवांत आयुष्य आहे कारण फंडाज क्लिअर आहेत.

१) सकाळी उठून आवरुन बस / रिक्षा मिळवून पुढे ट्रेन गाठून वन पीस ट्रेनमधून उतरुन ऑफिसची बस गाठणे आणि पुन्हा परतीचा तसाच प्रवास - नो रिग्रेट्स. कारण ऑफिसच्या जवळ घर परवडणार नाही, रस्त्याने गेलं तर ट्रॅफिकजॅममुळे ऑफिसला उशीर झालेला मला स्वतःला आवडणार नाही. काही दिवसांतच हे उड्या मारत ऑफिस गाठणं आणि परतणं हे कित्येकांच्या अंगवळणी पडतं आणि त्याबद्दल किरकिर खरंच मनापासून उरत नाही.

२) काही वर्षांपुर्वी फास्ट ट्रॅक मध्ये मिळालेलं प्रमोशन (ज्यामुळे मी रिटायर होईपर्यंत ED ही झाले असते) नाकारलं व आता पुढचं प्रमोशन घ्यायचे चान्सेस नाहीत कारण सतत ट्रान्स्फरवर रहावं लागेल. - नो रिग्रेट्स. कारण घरच्या जबाबदार्‍या करियरपेक्षाही महत्वाच्या वाटतात. घरचे लोक माझ्यावर पूर्णपणे अवलंबून असताना त्यांना तसंच वार्‍यावर टाकून किंवा पुर्णपणे कामवाल्यांच्या हवाली सोडून महिनोन्महिने बाहेर राहून मी काय मिळवलं असतं? चांगल्या कंपनीत मोठा हुद्दा? गलेलठ्ठ सॅलरी? खात्यावर बर्‍याच अचिव्हमेंट्स? पण कुठेतरी माझे काळजाचे तुकडे मीच माझ्यापासून निष्ठूरपणे दूर केले असते आणि कधीतरी यशाची मजा चाखून झाल्यावर मागे वळून बघताना मी स्वतःला माफ केलं नसतं. आज माझ्या निर्णयावर मी खुश आहे आणि रॅटरेसमध्ये न उतरल्याने वाचलेली एनर्जी, वेळ अजून चांगल्या कामांना देते आहे. त्या कामांमध्ये एकही पैसा नाही पण पैशांमध्ये मोजता येणार नाही असं समाधान मिळतं आहे.

३) पहिल्यापासूनच माझ्या कामामध्ये इनोव्हेटिव्ह गोष्टी आणत गेले पण कधीच त्याबद्दलच्या कौतुकाची, रिवॉर्डची अपेक्षा ठेवली नव्हती कारण माझं माझ्या कंपनीवर खूप प्रेम आहे आणि त्यामुळे मोबदला, रिकग्निशन मिळावं असं मनातही आलं नाही (जसं आपल्या माणसांकडून आपण अपेक्षा करत नसतो). काही वर्षांपुर्वी जेव्हा सुपर स्टार स्टेटस मिळालं तेव्हाही गव्हर्नमेंट पॉलिसीज वाचून काढून, डाटाचा अक्षरशः कीस पाडून, सगळ्या संबंधीत व्यक्ती / विभागांकडे वणवण करुन ते मिळवलं होतं. जेव्हा ती फायनल केलेली फाईल आवश्यक सर्टिफिकेशन्ससहित मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सकडे पाठवली गेली आणि तो स्टेटस मिळाला तेव्हा हा स्टेटस मिळू शकतो हे ही माहित नसलेले दिल्लीतले बिग बॉसेस स्पेशल नोट सर्क्युलेट करुन स्वतःची पाठ थोपटून घेत होते. मग कोण अश्विनी आणि कोण काय? मी आणि माझ्या बॉसने आणि माझी वणवण पाहिलेल्या माझ्या कलीग्जनी एकमेकांचं अभिनंदन केलं आणि पुढे आपलं काम चालू ठेवलं. अपेक्षाच नसल्याने अपेक्षाभंगाचं दु:ख झालंच नाही. ज्यासाठी अट्टाहास केला होता ती गोष्ट कंपनीला मिळाल्याचा आनंद जराही कमी झाला नाही आणि तो कुणीही हिरावून घेऊ शकलं नाही.

काही वर्षांपुर्वी रोटेशनमध्ये माझं काम बदललं पण माझा स्वभाव तोच राहिला (चांगला की वाईट ते मलाच कळत नाहिये Sad ) आणि अचानक या वर्षी माझ्या सद्ध्याच्या बॉसने परस्पर प्रॉडक्टिव्हिटी वीकमध्ये माझ्या कामाच्या ओरिजिनल असलेल्या पद्धतीचं नरेशन MS ला पाठवलं आणि पुढे जबरदस्तीने मला प्रेझेंटेशनसाठी नेण्यात आलं, कमिटीपुढे माझी शेंडी पकडून प्रेझेंटेशन द्यायला लावलं गेलं आणि त्यात अ‍ॅप्रिसिएशन लेटरसाठी सिलेक्शन, फोटोसेशन वगैरे सोपस्कार पार पडले गेले. आता ते लेटर गेलं माझ्या घरच्या कपाटाच्या खणात.. माझं काम पुढे सुरु. अर्थात असं अचानक कामाला रिकग्निशन मिळाल्याने आनंद झालाच पण एवढं काय कौतुक करुन घ्यायचं म्हणून कसंतरीचसुद्धा वाटलं.

वरचे दोन अनुभव परस्पर विरोधी आहेत पण दोन्ही वेळा मी शांतच राहू शकले आणि अशीच शांतता माझ्या मनाला पुढच्या आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत कायम राहू दे अशीच देवाजवळ प्रार्थना.

४) काँप्रमाईझ तर कुठल्याही नोकरीत / व्यवसायात करावंच लागतं. थोड्या दिवसांनी आधीची नोकरी कंटाळवाणी झाली तर पुढची हवी तशीच निघेल आणि सुरुवातीला असली तरी काही दिवसांनी परत कंटाळवाणी नाही वाटणार कशावरुन? हे चक्र थांबावं असं वाटत असेल तर शांतपणे मला नक्की काय हवंय आणि त्यासाठी मी नक्की कशाचा त्याग करु शकते, कुठे जुळवून घेऊ शक॑त नाही याचे फंडा स्वतःपाशी क्लिअर हवेत. इंडस्ट्रीमध्ये खूप उलथापालथ झाली तरी या गोष्टींचा थोडातरी उपयोग होतोच होतो मार्ग काढण्यासाठी. ट्वेंटीज मध्ये असताना ही वादळं येत असत मनात पण हळूहळू परिपक्व होतच जातो आपण. आवडीचं क्षेत्र मिळालं तर उत्तमच असतं पण जे आपल्या वाट्याला आलं त्यात देखिल जे चांगलं आहे ते पाहून आपण कमी त्रास करुन घेऊ शकतो, जे मी नेहमीच केलंय. कितीही काहीही मिळालं तरी सतत रडणारे लोक्स आपण बघतोच त्यामुळे अशांच्या समस्यांना अंत नाही.

खरोखरच व्यवस्थित शिक्षण होऊनही नोकरी न मिळालेल्या किंवा अचानक वयाच्या चाळीशीत नोकरी गेलेल्या लोकांनी काय करावं मग????

शक्य असेल तर जरुर चेंज घ्यावा, तो एन्जॉयही करावा, वेगवेगळी क्षितीजे स्पर्श करायला जावं पण ते आणि तेवढंच म्हणजे आयुष्याची इतिकर्तव्यता असं मानून स्वतःला त्रास करुन घेऊ नये. तेवढी सहनशक्ती आपल्यात हवी. नशिबाने मला वर्क कल्चर उत्तम मिळालं आहे (अर्थात तरीही रडणारे कलिग्ज अपवाद म्हणून आहेतच) त्यामुळे ज्यांना रात्रंदिवस नोकरी व्यवसायात खपावं लागतंय आणि घरावर, स्वतःवर अन्याय होतोय अशांना पुर्ण सहानुभुती आहे. किती स्ट्रेस असेल ते समजू शकते.

या बाफवर ही पोस्ट ऑड वाटेल किंवा अज्जिबात अ‍ॅम्बिशन्स नसलेली वाटेल पण जे मनापासून वाटलं ते लिहिलं. कदाचित मी अतीसामान्य स्त्री आहे Happy

नाही अश्विनी, हे असं जमणं सामन्य नसतं! खरंच. हेच अवघड आहे. मला तरी वाटते ती शांतता मिळवणे सगळ्यात अवघड काम आहे.
अर्थात, असं म्हणून वेगळं काही करूच नये असं नाहीये, पण तुझ्यासारखा अ‍ॅटीट्युड बर्‍याचदा जरूरी असतो हे मात्र नक्की.

नताशा, माझा नवरा बँकिंगमध्ये नाहीये, पण सेम सिचुएशन. कशासाठी एव्हढी मरमर करायची जर स्वतःला धड श्वास घ्यायलाही वेळ मिळत नाहीये तर.. केवळ काम आवडते म्हणून निभावून जाते तसेच ती मरमर करायची इच्छा टिकून राहते. गेली २-२.५ वर्षं अशी परिस्थिती आहे. अश्विनीसारखे शांत राहायला शिकतोय तो आता. Happy

गेली ५ वर्षे सतत आणि सतत केवळ मरमर , अतिप्रचंड काम, सतत टेंशन, जबाबदारी हे सगळे एकही दिवस मानसिक फुरसतीचा न मिळता माझ्या नवर्‍याने व पर्यायाने आम्ही सर्वांनी सहन केले आहे. त्याचे डीटेल्स देण्यात अर्थच नाही.
त्यातून आम्ही जो पर्याय स्वीकारला / मार्ग काढला तो नक्कीच करीयर, पोझिशन, जबाबदार्‍या या दृष्टीने बॅकवर्ड प्रोग्रेशन म्हणावा असाच आहे, पण त्यामुळे जीवन सुसह्य झाले आहे. घरातील लोक एकमेकांना निदान दिसत / बोलत आहेत, जे आधी होतच नव्हते.

त्यामुळे प्रत्येक वेळी चेंज हा फॉरवर्ड असावाच यावर माझा विश्वास नाही. पण बाकी गोल्स ठरवणे आणि त्याची योजना आखणे याबद्दल चमन ला अनुमोदन.

मवा Happy
पैसे किंवा हुद्दा ह्याच्यात मोजलं तर बॅकवर्ड वाटेल पण "क्वॉलिटी ऑफ लाईफ" म्हणतात त्या अँगलनी बघितलं तर बॅकवर्ड आजिबात वाटणार नाही (त्यामुळेच तुमच्या सारखी लोकं तसा निर्णय घ्यायला धजावतात).
स्वतःच्या मर्जीने किंवा स्वखुषीने ठरवून घेतलेला निर्णय (पुर्ण केलेला गोल/घडवून आणलेला चेंज) असला की फॉर्वर्डच असतो.

स्वतःच्या मर्जीने किंवा स्वखुषीने ठरवून घेतलेला निर्णय (पुर्ण केलेला गोल/घडवून आणलेला चेंज) असला की फॉर्वर्डच असतो.>> एक्झॅक्टली. मग कशाला हे सगळी फॉर्वर्ड, बॅकवर्ड, लिनियर, अपवर्ड, डाउनवर्ड चर्चा? रेव्यू, मस्तुरे यांनी हेच तर केलं ना? मला इथे वाचवाचून गोंधळ कमी होण्या ऐवजी वाढल्यासारखाच वाटतो आहे. असो.

मला तरी रेव्यु, मास्तुरे, निवांत पाटील ह्यांची स्टोरी वाचून फायदा झालाय Happy
रैना, संपर्क करते..

एक्झॅक्टली. मग कशाला हे सगळी फॉर्वर्ड, बॅकवर्ड, लिनियर, अपवर्ड, डाउनवर्ड चर्चा? रेव्यू, मस्तुरे यांनी हेच तर केलं ना? >>> शूम्पी रेव्यु आणि मास्तुरेंची ऊदाहरणं तू वाचलीस. त्यांच्याकडे बदल घडवून आणते वेळी ऊपलब्ध रिसोर्सेस काय होते बघू...

कामाचा भरपूर तांत्रिक अनुभव - होता
देश्-विदेशात काम करण्याचा हवाहवासा अनुभव - होता
टीम मॅनेज करून आऊटपूट मिळवून दाखवल्याचे आंतरिक समाधान - होते
समाधान देणारा पगार - होता
थोडाफार बँकबॅलंस - होता
मुलं मोठी झाल्याने कौटुंबिक जबाबदार्‍या - कमी
गाडी, स्वत:चे घर असे स्थैर्य - बहूतेक होते
आणि सर्वात महत्वाचे थोडे थांबण्याची मानसिक तयारी होती

आता त्यांच्या करिअरच्या ह्या स्टेजवर त्यांनी त्यांच्या गाडीला थोडा ब्रेक लावून मनाजोगत्या पण कमी मोबदला देणार्‍या कामाकडे नियोजनपूर्वक गाडी वळवण्यासाठी जे प्रयत्न केले तर ते किती सोपे ते अवघड असे तू १-१० च्या स्केलवर सांग.

आता ५-७ वर्षे अनुभव घेतलेला मुलगा/मुलगी

कामाचा भरपूर तांत्रिक अनुभव - नाही -- सर्टीफिकेशन, प्रमोशन वगैरे मिळवावे लागणार.
देश्-विदेशात काम करण्याचा हवाहवासा अनुभव - अजून नाही , कंपनीत ऊपयुक्त्ता सिद्ध करावी लागेल.
टीम मॅनेज करून आऊटपूट मिळवून दाखवल्याचे आंतरिक समाधान - अजून नाही -- कंपनीत जबाबदार्‍या घेऊन सिद्ध करून दाखवावं लागेल. प्रसंगी नोकरी सोडून मॅनेजमेंट कोर्स साठी जावं लागेल. त्याचा प्रचंड खर्च सहन करावा लागेल.
समाधान देणारा पगार - अजून नाही, किती असावा हे जबाबदार्‍या ठरल्याशिवाय सांगता येणार नाही?
थोडाफार बँकबॅलंस - अजून नाही, किती असावा हे जबाबदार्‍या ठरल्याशिवाय सांगता येणार नाही
मुलं मोठी झाल्याने कौटुंबिक जबाबदार्‍या - मूलं लहान असल्याने जबाबदार्‍या भरपूर.
गाडी, स्वत:चे घर असे स्थैर्य - असेल किंवा बहूतेक कर्ज काढूनचेही असेल.

ह्यात अजून ईतर पर्सनल गोल्सची भर आहेच. कुणाला छंद जोपासायचे आहेत, कुणाला स्टॉक्स खेळायचे आहेत कुणाला चांगल्या शरीरासाठी, तब्येतीसाठी खर्च करायचे आहेत, ऊच्चशिक्षण, देशाटन करायचे आहेत. कुणाला भाऊ, बहीण, बायको, मित्र नातेवाईक अश्यांना भरभरून आर्थिक आणि वैयक्तिक मदत करायची आहे. समाजसेवा करायची आहे.
आणि ह्या सगळ्यांच्या वरताण महागाई आणि प्रचंड स्पर्धा ह्यांच्याशी दोन हात करत आहे ते स्थैर्य टिकवून ह्या सगळ्या गरजा (क्षणभर ह्या सगळ्या विसरूनही जा पण) आणि त्यांची मायबाप जिला मोजण्यासाठी कुठलेही परिमाण नाही ती, म्हणजे काहीतरी घडवून दाखवण्याची, स्वप्न प्रत्यक्षात ऊतरवून दाखवण्याची आजिबात स्वस्थ न बसू देणारी 'आंतरिक ऊर्मी' तिला हार जाऊन अश्या मुलाने किंवा मुलीने वरचा प्रत्येक 'नाही' 'हो' मध्ये बदलण्यासाठी (चेंज) जोरदार मुसंडी मारत प्रयत्न करायचा म्हंटला तर त्या प्रयत्नांची तीव्रता १-१० स्केलवर किती असणार तू सांग. मग आपण फॉरवर्ड, बॅकवर्ड बद्द्ल बोलू.

आता मला सांग तुझ्या मते ह्या दोन्ही प्रयत्नांसाठीची तीव्रता सारख्याच असतील?

अन त्याचं उत्तर कधीच "मला २लाख महिना हवा" किंवा "मला रोज सहा वाजता घरी यायचेय" असं साधं सरळ येत नाही. >>> मला सध्याच्याच कामात आणि सध्याच्याच पगारात .. फॅमिली टाईम आणि प्लेझर टाईम, मन:शांती आणि फायनान्शिअल सिक्युरिटी असे सगळे पाहिजे आहे. असं ऊत्तर येतंय का?

आणि तुम्ही जर तिशी-पस्तीशीतंच रिटायर्मेंटच्या अध्यात्मिक गप्पा मारण्यास ईच्छूक असाल तर त्यासाठी हा धागा योग्य नाही हे पुन्हा एकदा ओघाने पण नम्रपणे......

अश्विनी छान लिहिलंय... त्यात कमीपणा किंवा कमी महत्त्वाकांक्षा असे वाटून घेण्याची आजिबात गरज नाही. जोपर्यंत कामातून मिळणारी ऊर्जा, समाधान आणि मोबदला मनाजोगता आहे तोपर्यंत हातचं सोडून पळत्याच्या पाठी करण्यात नक्कीच अर्थ नाहीये. ज्यादिवशी ह्यातल्या एकाचीही कमतरता बोचू लागेल त्यादिवशी ईथे नक्की लिहि.

मला बदल हवाय असे जेंव्हा म्हणतो तेंव्हा कसला बदल हवाय? हे तपासून पहायला हवे असे वाटते.

१) मिळताहेत त्या पेक्षा पैसे जास्त हवेत, कामाच स्वरूप वेगळ हव, कामाच सभोवताल तुमच्य स्वभावास पुरक हव, कामाच ओझ कमि करावस वाटतय, का वेगळ्याच क्षेत्रात जावस वाटतय? हे भौतीक (टँजीबल) ह्या अर्थी बदल झाले.

२) का चेंज हा असलेल्या विचारसरणीत, दॄष्टीकोनात, सेल्फ इमेज व वैयक्तीक भावना अशा अभौतीक गोष्टित हवाय?

३) भौतिक बदल हे गोल आणि टार्गेट स्वरूपात योजना आखून मिळवता येतात. पण अभौतिक बदल हे गोल किंवा टार्गेट स्वरूपात योजनाबद्ध तर्हेने मिळावता येतातच असे नाही.

४) आपल्या विचार भावनांचा (अभौतिकतेचा) आपल्या असलेल्या भौकतिकतेशी जवळाचा संबध असतोच. जर अभौतिक आणि भौतिक ह्यांचा पायमेळ साधला असेल तर तुम्ही आयुश्यात्/कामात सुखी समाधनि आहात असे चित्र दिसते. जर तो पायमेळ बसला नसेल तर तो घालताना हे बदलांचे चक्र भोगावे लागते. असे वाटते.

५) माझ्या मते बर्‍याचवेळा भौतिकबदल केले तर मानसिक बदल अपोआप होतिल अशी (भाबडी) आशा असते. म्हणजे मी अमुक एक केले की यशस्वी होइन किंवा अमुक एक बदलाने मला स्थैर्य येइल. तर या उलट आयुश्यात परिस्थीतिने अभौतिक जसे की विचार, भावना व दृष्टिकोन हे सतत बदलत असतात. त्याच गतीने भौतिकात बदल करणॅ शक्य नसते. ज्यामुळेही कुत्तरओढ प्रत्येकालाच कमी अधिक भोगावी लागते.

६) अशावेळेस जेंव्हा मला बदल हवा असेल तेंव्हा तो फक्त भौतिक आहे की मानसिक (अभौतिक) आहे हे आधी मी तपासायचा प्रय्त्न करेन.

जर भौतिक असेल तर योजना आखुन त्या मागे लागेन त्याचवेळी जो भौतिक बदल आपेक्षित आहे तो माझ्या अभौतिकाशी कितपत संयुक्तिक आहे हे जाणुन घ्यायचा प्रय्त्न करेन म्हणजे मला लाख माझा स्वतःचा उद्योग सुरू करायचाय पण माझ्या अभौतिकात रिक्स टेकींग नसेल किंवा ढिगाने प्रोक्रस्टिनेशन असेल तर ह्या बदलातही माझ्या अभौतिकाचा आणि भौतिकाचा पायमेळ बसणार नाही.

जर अपेक्षीत बदल अभौतिक असेल तर काउंसेलरची मदत घेणे इष्ट Happy

चमन : मध्ये बदलण्यासाठी (चेंज) जोरदार मुसंडी मारत प्रयत्न करायचा म्हंटला तर त्या प्रयत्नांची तीव्रता १-१० स्केलवर किती असणार तू सांग. मग आपण फॉरवर्ड, बॅकवर्ड बद्द्ल बोलू. >> ईट डिपेंड्स ! ज्याच्याकडे गमवण्यासारख भरपुर आहे व ज्याच्या कडे गमवण्यासारख काही नाही ह्यातला कोण चटकन बदल करू शकेल? ह्या दोघात बदल करताना कोणाची रिस्क जास्त असेल?

तुमच्या म्हणण्याप्रमाणे ज्यांनी "न गमावता" येण्यासारख (घर, अनुभव, यश) आधीच मिळवुन ठेवलय त्यांनी घेतलेली रिस्क 'बॅकवर्ड' आहे व ज्यांच्या कडे "न गमवता" येण्यासारखे काहीच नाही (फ्रेश स्टार्टर्स) त्यंची रिस्क 'फोर्वर्ड' आहे.

पण ह्या दोन्ही लोकांची असणारी रिस्क सारखीच नाही त्यांचे होणारे नुकसान सारखे नाही व असे असताना एक गृपचे होऊ शकणारे नुकसान अनवधानाने तुम्ही 'बॅकवर्ड' लेबल करत आहेस असे वाटले.

पण ह्या दोन्ही लोकांची असणारी रिस्क सारखीच नाही त्यांचे होणारे नुकसान सारखे नाही व असे असताना एक गृपचे होऊ शकणारे नुकसान अनवधानाने तुम्ही 'बॅकवर्ड' लेबल करत आहेस असे वाटले.
>> दोन्ही लोकांना रिस्क आहे पण सारखी नाही... Direct नुकसान दोघांचे आहे पण Indirect नुकसान दुसर्याचे (फ्रेश स्टार्टर्स) जास्त आहे. पैसा हि अशी चीज आहे.. की त्याची छापील किंमत काहीही असो, गरजवंताला तो बहुमूल्य असतो आणि गरज नसलेल्यांना त्याची कागदाएवढी किंमत नसते...

मला तरी चमन जे बोलतो आहे ते बरोबर वाटतं आहे... कदाचित त्याची शब्दरचना (फॉरवर्ड, बॅकवर्ड )इतरांना Confusing करत असेल... मी पहिल्या फेजमधून (नोकरीची पहिली ३ ते ५ वर्षे) गेलो आहे आणि आता दुसर्या फेजमध्ये जाणार आहे (नोकरी १४ वर्षे)... आता मला जे वाटतं आहे (नॉन्-मेनस्ट्रिम करियर) ते तेव्हाही वाटायचं पण Stability नव्हती... मग ठरवले की पहिलं व्यवहारिक जीवन जगायचं, करत असलेल्या फिल्डमध्ये Achieve करायचं, कौटुंबिक जबाबदार्या पार पाडायच्या आणि मग नॉन्-मेनस्ट्रिम करियर करायचं... कदाचित ती नवीन इंनिग असेल पण रुंटिग लाइफपेक्षा वेगळ असेल...

पेशवा...
लेबल लावण्याचे दु:साहस मी करू ईच्छित नाही...थोडा अर्थाचा अनर्थ होतोय किंवा मी आधी म्हंटलेल्या 'स्टेप बॅक' चेंज चा अर्थ प्रत्येक पानागणिक वेगळा आणि डार्क होत चालला आहे.
जसे रिस्कचा ऊल्लेख आता तुम्ही पहिल्यानेच केला आणि त्याला फॉरवर्ड / बॅकवर्ड असा प्रेफिक्स जोडून त्याचा संबंध माझ्या आधीच्या पोष्टीशी लावलात.

आपण सगळेच धावतो आहोत नाही? कोणी पुढे आहे तर कोणी मागे...जर धावतांना कोणी काही कारणास्तव थोडे थांबण्याचा किंवा स्पीड कमी करत खालचा गिअर टाकण्याचा निर्णय घेतला तर तसे करणं धावतांना वरचा आणि अजून वरचा गिअर टाकत धावण्यापेक्षा सोपं आहे असं मला वाटतं. आणि आज वरचा गिअर टाकणारा ऊद्या त्याच कारणांनी खालचा गिअर टाकणार आहेच हेही तितकंच खरं आहे.
तर अश्या वरचा गिअर टाकण्याचा प्रयत्न करणार्‍यांनीही लिहा अश्या अर्थाचे मी आधी लिहिले होते.
थोडं थांबून खालचा गिअर टाकण्यात (स्टेप बॅक चेंज) काही वाईट किंवा त्यात हार वगैरे नाही असही मी लिहिलं होतं. तुम्ही पुन्हा वाचलत तर फॉरवर्ड/ बॅकवर्ड असे शब्द न वापरता मी स्टेप अप / स्टेप बॅक चेंज असे म्हणालो.
ईथे कोणी धावायला ऊलटा प्रवास केला नाही की करणार नाही. वेळ्/काळ पुढे चालला आहे तर सगळे पुढेच धावणार. आणि ही कुणाची कुणाशी लागलेली रेस नसून, प्रत्येकाची स्वतःशीच लागलेली रेस आहे. त्यामुळे कुठे गिअर अप व्हायचं आणि कुठे डाऊन गिअर टाकायचा हे प्रत्येकजणच आपापलं ठरवतोय नाही का? त्यात चांगलं वाईट असं काही नाही.

मला वाटतं आपण सगळ्यांनी ह्या चेंज च्या डिरेक्शन्सच्या नादी न लागता 'मला हा चेंज हवा' आहे असे म्हणत पुढे (आलीच परत डिरेक्शन) बोलुयात. 'स्टेप बॅक चेंज' शब्द आवडला नसेल तर मी तो बिनशर्त मागे घेतो. आता पुन्हा त्याबद्दल वाद घालत मूळ मुद्दा भिजत ठेवण्यात अर्थ नाही.
कुणाला दुखावण्याचा किंवा माझेच बरोबर असे शाबित करण्याचा आजिबात हेतू नाही. मला फक्त आणि फक्त 'हा सूर्य आणि हा जयद्रथ'.....' हा बदल आणि ही योजना' असे लिहिलेले वाचण्यातंच आनंद आहे. पण म्हणून मी कुणाला लिहू नका वगैरे आजिबात म्हणू शकत नाही आणि म्हणणारही नाही.

राजू,
बरे झाले तुम्ही इथे पुन्हा लिहिलेत. तुम्ही आधी लिहिलेल्या पोस्टनंतरही 'अजून सविस्तर लिहा' असे मी लिहिले होते. तुम्ही ते वाचले नसल्यास पुन्हा 'सविस्तर लिहा' अशी विनंती करतो.

चमन,

माझी ती छोटी उडी होती... मी १९९८ मध्ये बी ई केलं, घरच्यांना वाटलं आता मला मोठमोठ्या कंपनीचे कॉल येतील... ते Y2K चे शेवटचे दिवस होते... Y2K नंतर काय (नवीन Business) ? हा प्रश्न मोठ्या कंपनींना पडला होता. डॉट कॉम बूम अजून सुरु झाली नव्ह्ती.. त्यामुळे कॅम्पसमध्ये जी कंपनी पहिली आली तीच joined केली... Hardware/ Networking फिल्ड मध्ये... या ग्रुपमध्ये लोक कमी असतात आणि सुट्टीत काम (maintenance) कराव लागतं... Networking मध्ये interest होता मग डॉट कॉमची बूम आली... मग एक Correspondance कोर्स (Java/ Networking) केला... Java/ वेब पेजस आवडयाला लागलं... मग अनायसे एक परदेशवारी झाली (Product Training) .. तोपर्यत एसीमध्ये बसून काम करायच हाच गोल होता... मग बघितल Software मध्ये Hardware पेक्षा जास्त Onsites आहे... मग सेकंड शिफ्ट मध्ये राहून एक सहा महिन्याचा कोर्स (Java/ J2EE) केला... मग software च्या नवीन नोकर्या बघणं सुरू केलं... छोट्या कंपन्या Salary जास्त म्हणून आणि मोठ्या कंपनी कमी experience म्हणून घ्यायच्या नाही ... नंतर आमच्या कंपनीची अ‍ॅड आली पण Division बदलू दिलं नाही... खूप राग आला आणि राजीनामा दिला... नशिबाने पहिली नोकरीच्या शेवटच्या दिवसाच्या अगोदर दुसरी कंपनी लागली, पण कमी Salary. पण Bad Luck, Domestic project मिळालं... नंतर पुन्हा Back end की front end यामध्ये अडकलो... नंतर दोन वर्षानी Onsite मिळाली... या १४ वर्षात technical (Prodcut/ technologies/ open sources) आणि functional (BFSI/ Retail/ Manufacturing/ Travel/ ERU) खूप नॉलेज घेतलं... आता हे सगळ Saturated आणि Repeated वाटतं...

म्हणून येत्या चार वर्षात चाळिशीनंतरची आखणी करायची आहे... सध्यातरी आर्थिक गरजेचे नियोजन आणि वेगवेगळे नॉन्-मेनस्ट्रिम करियरस बघत आहे...

अनुभवाचे बोल -
निराश होउन व्यवसाय/ नोकरी बदलू नका. काहीतरी ध्येय ठेवा, ते साध्य करा आणि मग व्यवसाय/ नोकरी बदला. त्यानी आत्मविश्वास वाढतो.
Savings/ Investment लवकरात लवकर करायला सुरुवात करा, त्यानी निर्णय घेणे सोपे पडते (आर्थिक कारण नसल्यामुळे)
रॅटरेसमध्ये शिरा पण त्यात अडकू नसा...

आजकाल माबोवर लॉग-इन केलं, की आधी हाच बाफ बघते. Happy

अश्विनी, माझ्यातर्फे तुला एक मँगो आईसक्रीम. Happy प्रत्येक मुद्दा माझ्या मनातला लिहिला आहेस !!! (खासकरून - अपेक्षाच नाही, त्यामुळे अपेक्षाभंगाचं दु:ख नाही - हा मुद्दा!)

कामाच्या वेळा जास्त असल्यामुळे घरच्यांसाठी, स्वतःसाठी (व्यायाम, छंद वगैरे) वेळ देता येत नाही - हा एक सर्वमान्य मुद्दा आहेच. पण नुकतंच कुठेतरी वाचनात आलं होतं, की - समजा सध्याचं तुमचं कामाचं ठिकाण घरापासून लांब आहे, ऑफिसमधे पोचायला २ तास लागतात. पुढच्या वर्षी ऑफिस शिफ्ट झालं आणि आता तिथे पोचायला तुम्हाला दोन ऐवजी अडीच तास लागणार आहेत, तर ती जास्तीची ३०+३० मिनिटं तुम्ही मॅनेज कराल, की त्या कारणासाठी नोकरी सोडाल? मग ती ३०+३० मिनिटं आताही मॅनेज करा, आणि नियमित व्यायामाला वेळ द्या, छंद जोपासा, मुलांशी १५-२० मिनिटं का होईना, खेळा, दंगा-मस्ती करा, त्यांना तेवढं पुरतं. Happy

अश्विनी, पोस्ट मस्त. तुझ्या विचारांची स्पष्टता फार आवडली. मुळातच आपण जे करतो ते का करतो हा विचार, तर्कपरंपरा स्पष्ट असेल तर मानसिक त्रास एकदम कमीच होतो असा अनुभव/ वैयक्तिक मत आहे Happy

मुळातच आपण जे करतो ते का करतो हा विचार, तर्कपरंपरा स्पष्ट असेल तर मानसिक त्रास एकदम कमीच होतो >> मान्य, हे स्पष्ट नव्हते तेंव्हाचा त्रास आणि स्पष्ट झाल्यानंतरचा निवांतपणा दोन्ही अनुभवला आहे.
भौतिक बदल हे गोल आणि टार्गेट स्वरूपात योजना आखून मिळवता येतात. पण अभौतिक बदल हे गोल किंवा टार्गेट स्वरूपात योजनाबद्ध तर्हेने मिळावता येतातच असे नाही.>>> आणि भौतिक बदल जास्त महत्वाचे की अभौतिक हे प्रचंड वैयक्तिक आहे.

ह्या सर्वात तुम्ही एजिंग व तब्येतीची झीज ह्या फॅक्टर ला काही वेटेज दिले आहे का?
वयानुरूप येणारा थकवा, तब्येतीच्या तक्रारी ह्यामुळेही अनेक गोल्स डिरेल होऊ शकतात. माझ्या चेंज प्रोसेस मधे गुढघा इतका दुखू लागला कि काय सांगू, शिवाय झोप न येणे, हाय बीपी अश्या तक्रारी ही होउ शकतात. मानसिक दृष्टया आपण प्रगल्भ होत असलो तरी शारीरिक बाबींमुळे कधी कर्तुत्वाचा ग्राफ खाली येऊ शकतो. आरोग्य तारुण्य ह्या गोष्टी हातात असताना खूप कायकाय करून बघावे.

इथल्या सर्वच पोस्टी आवडल्या... चर्चा चांगली चालू आहे.

माझ्या मते हा धागा फक्त ग्रुप सभासदांसाठी न ठेवता, सार्वजनिक, इन फॅक्ट मुखपृष्ठावर असावा असा आहे जेणेकरून जे मायबोलीचे सदस्य नाहीत अशांना पण या चर्चेतून काही प्रेरणादायी मिळू शकेल. Happy

मी हा निर्णय घेतला तेंव्हा ची माझी मनःस्थिती (माफ करा इंग्रजीत आहे!!!)
या वरून काही अर्थबोध करू शकेन अशी अपेक्षा आहे.
अ‍ॅड्यु
Here I am ,calling it a day before time,
The world ridicules me for I quit before the final chime,

To me its been a long haul ,
The glory,the agony,the elation and celebration -I have seen it all,

They say you could have waited lil longer ,
It would have made you financially stronger ,

It was all readily laid out for you on a platter
Poor them,they know not -to me it does not matter,

More than you , I owe it to myself,my sweet better half and to all
those who stood by me,
In your need of the hour,they did not hinder me,

I ignored the little ones when they wanted me most
For-I thought,I owed it to you and you would raise a toast

Yes! Indeed you did it occasionally albeit annually,
By segmenting my existence ,year by year ,

I am not complaining,
Thats the way world thinks,
Now I want to break it cos I am not a cat with nine lives,

After a long time I want to write with a pen and not the keyboard,
Pour my heart out touching the inner chords of souls travelling on
a lonely road ,

Correlating and feeling one with their pains and travails ,
Singing to them songs that inspire and in their praise,

I would watch the sunset and sunrise every day
Feeling the soothing breeze wafting over a moonlit bay

Or just sit by the side of my dear one
Remembering every moment of our life which till now belonged to strange someone

I would spend time watching my granddaughter play,
Bringing back tenderness,innocence and youth inadvertantly flung far away,

I pray God to help me keep my smile and youthful disposition intact,
So when He knocks at my door,I open it with courage ,anticipation and
as a matter of fact

काय सुरेख कविता आहे रेव्ह्यु. थँक्यु. Happy

मामी,
यात बर्‍याच घटकांना वेटेजच दिलेले नाही. कारण complexities algorhitms मध्ये बसत असत्या तर अजून काय हवे होते? Happy

इथे सुलभीकरण होत नाहीये का काहीसे. 'कोठा साफ राहिला की सगळे सोपे होते' असे आईचे एक मामाआजोबा म्हणायचे ते आठवले. Proud सकाळी उठा, व्यायाम करा, मीताहारी असा, काम करा, पहा झोप येते की नाही.

नताशा +१.
काल एक पोस्ट टाकणार होते. ध्येय/गोल्स इथे लिहीले तेवढे खरंच रोमँटिक असते? त्यात तडजोडी कराव्या लागल्या तर माणसं मोडुन पडतात पार कारण the stakes are much higher. म्हणून ध्येय नसावीत असे काही नाही. जरुर असावीत. त्याने मार्ग सुकर होतो असे वाटते जरुर. झापडेही बसतात पण त्याबरोबरच. That's fine too. Comes with the territory. But not acknowledging this is not fine. Happy

ही अजून एक.

Slow down, you crazy child
you're so ambitious for a juvenile
But then if you're so smart, tell me
Why are you still so afraid?

Where's the fire, what's the hurry about?
You'd better cool it off before you burn it out
You've got so much to do and
Only so many hours in a day

But you know that when the truth is told..
That you can get what you want or you get old
You're gonna kick off before you even
Get halfway through
When will you realize, Vienna waits for you?

Slow down, you're doing fine
You can't be everything you want to be
Before your time
Although it's so romantic on the borderline tonight
Tonight,...
Too bad but it's the life you lead
you're so ahead of yourself that you forgot what you need
Though you can see when you're wrong, you know
You can't always see when you're right. you're right

You've got your passion, you've got your pride
but don't you know that only fools are satisfied?
Dream on, but don't imagine they'll all come true
When will you realize, Vienna waits for you?

Slow down, you crazy child
and take the phone off the hook and disappear for awhile
it's all right, you can afford to lose a day or two
When will you realize,..Vienna waits for you?
And you know that when the truth is told
that you can get what you want or you can just get old
You're gonna kick off before you even get half through
Why don't you realize,. Vienna waits for you

Pages