Submitted by मामी on 17 February, 2012 - 08:28
आपला रोजचा घर तो ऑफिस आणि परत असा प्रवास असो वा देशापरदेशात नोकरीनिमित्त अथवा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून केलेली भटकंती असो, कधी कधी अचानक आपल्याला सुरेखशा जागा भेटतात. नेहमीचीच साधी भिंत कोणी आपल्या सुंदरशा चित्रकलेनं सजवलेली असते, तर कधी कोणाच्या मन लावून बनवलेल्या हस्तकलेनं एखाद्या छोट्याश्या रेस्टॉरंटचा कोपरा चमकून उठतो. आपला जीव हरखून जातो.
तुम्हाला अशी कला कधी भेटलेय? भेटली असेल आणि तुम्ही अशा जागा आपल्या कॅमेर्यात उतरवून घेतल्या असतील तर त्या इथे शेअर करा. नसतील तर यापुढे लक्ष ठेऊन असा कारण कल्पनाही नसेल अशा जागी एखादी कलाकृती तुम्हाला नक्की सापडेल.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मामी, लेकीची कला मस्तच
मामी, लेकीची कला मस्तच
आर्टअटॅकचे हे 'आफ्टर-अटॅक' आमच्या घरीही चालू असतात.
डॅफोडिल्स लेकाची नजर एकदम भारी आहे. कलाकाराचं लक्षण आहे हे.
डॅफो, अग लालबागला इतकी मोकळी
डॅफो, अग लालबागला इतकी मोकळी जागा कुठे आहे? हे शुगर कँडिवाले मस्त कायकाय बनवतात. अगदी लहानपणी घाटकोपरला आजीकडे रहायला गेलो की तिथल्या 'जय जवान' बागेत खेळायला जायचो. त्या बागेबाहेर एकजण असंच काहीकाही बनवून द्यायचा.
आर्टअटॅकचे हे 'आफ्टर-अटॅक' .......
मामी अगं मी बंगळूरू च्या
मामी अगं मी बंगळूरू च्या लालबागेचं बोलतेय
मामी मामी, राँग नंबर...
मामी मामी, राँग नंबर...
बंगळुरूला 'लाल बाग' नावाची प्रचंड मोठी आणि सुंदर अशी बोटॅनिकल गार्डन आहे. डॅफो त्याबद्दल बोलतेय
मामी, भारी केलंय हां
मामी, भारी केलंय हां आर्टवर्क!
आणि बाकीचेही फोटोज भारी आहेत!
राँग नंबर की खरंच! मी तेच
राँग नंबर की खरंच! मी तेच म्हटलं. लालबागला इतकी मोकळी जागा कोणी सोडू दिली, एव्हाना शंभरेक बिल्डिंगा झाल्या असत्या तिथं.
धन्स गो प्रज्ञे.
मामी, आता तिला केकवरचे आयसिंग
मामी, आता तिला केकवरचे आयसिंग करायला दे. चांगलेच करेल.
डॅफो, नाकवाले मस्तच. भाजीवाले अशा भाज्या मुद्दाम वेगळ्या काढून ठेवतात, मुंबईत.
आफ्टर अॅटॅक
आफ्टर अॅटॅक
अग लालबागला इतकी मोकळी जागा
अग लालबागला इतकी मोकळी जागा कुठे आहे?
मीही तोच विचार करत होतो
मामी... तो खुर्ची सेट खूपच
मामी... तो खुर्ची सेट खूपच आवडला.
उदयपुर - सिटि पॅलेस
हल्दीघाटी - महाराणा प्रताप संग्राहल मधिल कुंभलगडची प्रतिकृती
धन्स इंद्रधनुष्य.
धन्स इंद्रधनुष्य.
हत्तीचं चित्र छान आहे
हत्तीचं चित्र छान आहे
इंद्रा ती प्रतिकृती फारच
इंद्रा ती प्रतिकृती फारच सुरेख आहे.
(No subject)
हा एक सुरेखसा बाक :
हा एक सुरेखसा बाक :
ही हॉटेलाच्या लॉबीतली देखणी
ही हॉटेलाच्या लॉबीतली देखणी सरस्वती प्रतिमा :
मस्त फोटोज डॅफो, त्या
मस्त फोटोज
डॅफो, त्या नाकाड्या भाज्या सहीच आहेत....
सुरेख आहे सरस्वती.
सुरेख आहे सरस्वती.
मामी ......लेकीची दृष्ट काढा
मामी ......लेकीची दृष्ट काढा
डॅफो...... सही यार .... !!
जयवी-जयश्री धन्यवाद.
जयवी-जयश्री धन्यवाद.
मामी, ते गुलाबाचं फुल किती
मामी, ते गुलाबाचं फुल किती सुंदर केलय लेकीने! काटे तर फारच मस्त!
रायगड ...
रायगड ...
मामी, लेक कलाकार आहे तुझी
मामी, लेक कलाकार आहे तुझी
ईंद्रा, कुंभालगडाची प्रतिकॄती मस्त!!!
डॅफो, लेकाने नेमक्या भाज्या शोधल्यात
मामी, डॅफो मस्त कला आहे
मामी, डॅफो मस्त कला आहे पोरांमधे.
आपल्या गणपतीची हल्ली अनेक
आपल्या गणपतीची हल्ली अनेक रूपं दुकानात बघायला मिळतात. खूप मजेशीर असतात ती - उंदराबरोबर बुद्धीबळ खेळणारा, काँप्युवर काम करणारा, झोपाळ्यावर बसलेला, चोपडी लिहिणारा इ. तसं मला वाटतं बुध्दाला सुध्दा अनेक रूपांत सजवलं आहे. हा एक असाच वेगळा बुद्ध पुतळा, हातात फुलांची कुंडी घेऊन उभा असलेला :
हे २ फोटो गेल्यावेळी घरी
हे २ फोटो गेल्यावेळी घरी येताना काढले होते.
हा जोहान्सबर्ग विमानतळावर... आफ्रिकन प्राणी दाखवणारा पिलर.
आणि हा दुबई मधला.. ग्लास पेंटिंग.
वा, मस्त आहेत हे फोटो
वा, मस्त आहेत हे फोटो सेनापती. ग्लासवरच्या डिझाईनचा अजून स्पष्ट असता तर जास्त छान दिसला असता.
भरताचं वांगं गॅसवर भाजत
भरताचं वांगं गॅसवर भाजत असताना मधेच असं एकदम नक्षीदार दिसत होतं.
काय सही आहे हे वांगं. गॅस
काय सही आहे हे वांगं. गॅस नक्षीदार दिसतोय तुझा!
मामी मला एकही फोटो दिसत
मामी मला एकही फोटो दिसत नाहीये... तुम्ही टाकलेला... बाकीच्यांचे दिसताहेत... काय कारण असेल??? :प्रचंडच निराश झालेली बाहुली:
Pages