अचानक भेटलेली कला, कल्पकता, सौंदर्यदृष्टी

Submitted by मामी on 17 February, 2012 - 08:28

आपला रोजचा घर तो ऑफिस आणि परत असा प्रवास असो वा देशापरदेशात नोकरीनिमित्त अथवा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून केलेली भटकंती असो, कधी कधी अचानक आपल्याला सुरेखशा जागा भेटतात. नेहमीचीच साधी भिंत कोणी आपल्या सुंदरशा चित्रकलेनं सजवलेली असते, तर कधी कोणाच्या मन लावून बनवलेल्या हस्तकलेनं एखाद्या छोट्याश्या रेस्टॉरंटचा कोपरा चमकून उठतो. आपला जीव हरखून जातो.

तुम्हाला अशी कला कधी भेटलेय? भेटली असेल आणि तुम्ही अशा जागा आपल्या कॅमेर्‍यात उतरवून घेतल्या असतील तर त्या इथे शेअर करा. नसतील तर यापुढे लक्ष ठेऊन असा कारण कल्पनाही नसेल अशा जागी एखादी कलाकृती तुम्हाला नक्की सापडेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनिमाऊ. क्लास आहेब एकदम.

मामी. चांगली कल्पना. टॉवेलचा बाप्पा फार आवडला. (बाप्पा किती वेगवेगळ्या स्वरूपात इथे तिथे भेटत राहतो ना)

मामी, मस्त आहे तो गणपती बाप्पा. माझ्या क्लब महिंद्रा-कुर्ग स्टेमधे पण असाच बाप्पा बनवुन ठेवला होता हाउस किपींगवाल्या मुलांनी. माझे सनग्लासेस पडले होते ड्रेसिंग टेबलवर ते लावुन ठेवले होते बाप्पाला. इतका गोड प्रकार होता ना. फारच क्युट ! Happy

इग्लु सही आहे. मुलांना मज्जा येत असणार.

घसरगुंडी काय मस्त आहे नेहमीच्या लोखंडी शिडीपेक्षा.

विशाल, तु पण गेला होतास? Happy तुझ्याकडे ती कलाकारांना वाहिलेली फुलांची 'श्रद्धांजली' आहे का? माझ्याकडचे फोटोज फार छान नाहीत. वेगळा धागा काढुन ते टाकु शकशील का? मला फार आवडली ती थीम.

धागा आवडेश, मामी धन्यवाद, आता बरेच काय काय मस्त मस्त बघायला मिळेल Happy

तुमच्या कल्पकतेचे कौतुक करावे तितके कमीच

जिप्सी, कोण आहे चित्रकार? तु काही चित्राची चौकशी केली होतीस का? फारच सुंदर काढलं आहे आणि मॉडेल पण सुरेख आहे.

तुझ्याकडे ती कलाकारांना वाहिलेली फुलांची 'श्रद्धांजली' आहे का?

सगळे फ़ोटो नाहीयेत माझ्याकडे ममा . पण त्यातले मी टिपलेले काही..

कै. देव आनंद यांना..

प्रख्यात व्यंगचित्रकार कै. मारियो मिरांडा यांना

कै. स्मिता पाटील यांना....
इथे स्मिताच्या नावाचा प्रत्यक्ष उल्लेख न करता फ़ोटोबरोबर त्यांनी दोन देखणी स्मितेच दिली होती, जी शेजारच्या फ़ोटोत दिसतील. ही कल्पना मला प्रचंड म्हणजे प्रचंडच आवडली होती.

वर्षु, शुक्रिया ! शुक्रिया ! Happy
मी तर बेहद फिदा होते त्या आर्टिस्टवर. काय कल्पकता असते ना लोकांच्यात. रोजच्या भाज्यांपासुन इतकी सुंदर मॉडेल्स सजवणं..... अ‍ॅमेझिंग !

अरे वा, सगळ्यांनी ही कल्पना आवडल्याचे आवर्जून सांगितल्याबद्दल धन्यवाद.

बेफिकीर, आधी धाग्याचं नाव 'मला भेटलेली कला' एवढंच होतं. त्यावेळी तुम्ही या शीर्षकावरून माझ्यावर कॉपीराईटचा गुन्हा दाखल कराल अशी भिती वाटत होती. Wink Proud Light 1

***************************************************

हा सेट (चार छोट्या खुर्च्या आणि एक गोल टेबल) मला एका एक्झिबिशनमध्ये दिसला. हँडमेड आहे. लेकीकरता घेतल्याशिवाय रहावलंच नाही. गेले ४-५ वर्षं ती आवडीनं वापरतेय आणि येणारी बच्चेकंपनीही खुष होते. Happy

विशाल, थँक्स !

अरे स्मिता पाटील & लताबाईंचा फोटो, ही गौतम राजाध्यक्षांना श्रद्धांजली होती. बरोबर ना? Happy मला फार आवडला होता हा फोटो, म्हणुन मी परत टाकते एकदा.

smita.JPG

मामी, काय क्युट आहे तो सेट. ४ पेक्षा जास्त टिनटिन आले एका वेळेस, तर त्यांची धावपळ होत असेल ना, आधी कोण बसणार तिथे? Happy

Pages