अचानक भेटलेली कला, कल्पकता, सौंदर्यदृष्टी

Submitted by मामी on 17 February, 2012 - 08:28

आपला रोजचा घर तो ऑफिस आणि परत असा प्रवास असो वा देशापरदेशात नोकरीनिमित्त अथवा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून केलेली भटकंती असो, कधी कधी अचानक आपल्याला सुरेखशा जागा भेटतात. नेहमीचीच साधी भिंत कोणी आपल्या सुंदरशा चित्रकलेनं सजवलेली असते, तर कधी कोणाच्या मन लावून बनवलेल्या हस्तकलेनं एखाद्या छोट्याश्या रेस्टॉरंटचा कोपरा चमकून उठतो. आपला जीव हरखून जातो.

तुम्हाला अशी कला कधी भेटलेय? भेटली असेल आणि तुम्ही अशा जागा आपल्या कॅमेर्‍यात उतरवून घेतल्या असतील तर त्या इथे शेअर करा. नसतील तर यापुढे लक्ष ठेऊन असा कारण कल्पनाही नसेल अशा जागी एखादी कलाकृती तुम्हाला नक्की सापडेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी, लेकीची कला मस्तच Happy
आर्टअटॅकचे हे 'आफ्टर-अटॅक' आमच्या घरीही चालू असतात.
डॅफोडिल्स लेकाची नजर एकदम भारी आहे. कलाकाराचं लक्षण आहे हे.

डॅफो, अग लालबागला इतकी मोकळी जागा कुठे आहे? हे शुगर कँडिवाले मस्त कायकाय बनवतात. अगदी लहानपणी घाटकोपरला आजीकडे रहायला गेलो की तिथल्या 'जय जवान' बागेत खेळायला जायचो. त्या बागेबाहेर एकजण असंच काहीकाही बनवून द्यायचा.

आर्टअटॅकचे हे 'आफ्टर-अटॅक' ....... Rofl

मामी मामी, राँग नंबर... Wink
बंगळुरूला 'लाल बाग' नावाची प्रचंड मोठी आणि सुंदर अशी बोटॅनिकल गार्डन आहे. डॅफो त्याबद्दल बोलतेय Happy

Lol राँग नंबर की खरंच! मी तेच म्हटलं. लालबागला इतकी मोकळी जागा कोणी सोडू दिली, एव्हाना शंभरेक बिल्डिंगा झाल्या असत्या तिथं.

धन्स गो प्रज्ञे. Happy

मामी, आता तिला केकवरचे आयसिंग करायला दे. चांगलेच करेल.
डॅफो, नाकवाले मस्तच. भाजीवाले अशा भाज्या मुद्दाम वेगळ्या काढून ठेवतात, मुंबईत.

मामी... तो खुर्ची सेट खूपच आवडला.

उदयपुर - सिटि पॅलेस

हल्दीघाटी - महाराणा प्रताप संग्राहल मधिल कुंभलगडची प्रतिकृती

मामी, लेक कलाकार आहे तुझी Happy
ईंद्रा, कुंभालगडाची प्रतिकॄती मस्त!!!
डॅफो, लेकाने नेमक्या भाज्या शोधल्यात Happy

आपल्या गणपतीची हल्ली अनेक रूपं दुकानात बघायला मिळतात. खूप मजेशीर असतात ती - उंदराबरोबर बुद्धीबळ खेळणारा, काँप्युवर काम करणारा, झोपाळ्यावर बसलेला, चोपडी लिहिणारा इ. तसं मला वाटतं बुध्दाला सुध्दा अनेक रूपांत सजवलं आहे. हा एक असाच वेगळा बुद्ध पुतळा, हातात फुलांची कुंडी घेऊन उभा असलेला :

हे २ फोटो गेल्यावेळी घरी येताना काढले होते.

हा जोहान्सबर्ग विमानतळावर... आफ्रिकन प्राणी दाखवणारा पिलर.

आणि हा दुबई मधला.. ग्लास पेंटिंग.

वा, मस्त आहेत हे फोटो सेनापती. ग्लासवरच्या डिझाईनचा अजून स्पष्ट असता तर जास्त छान दिसला असता. Happy

मामी मला एकही फोटो दिसत नाहीये... तुम्ही टाकलेला... बाकीच्यांचे दिसताहेत... काय कारण असेल??? :प्रचंडच निराश झालेली बाहुली: Sad

Pages