बहर गुलमोहराचा

Submitted by टवणे सर on 10 November, 2008 - 12:40

गडावरील अजरामर कवींनी आज केलेल्या कविता पाहोनी आमचे डोळे तृप्त जाहले. पण त्यातील काही कविता आधीच वाहून गेल्या असे समजले. तरी उरलेल्या कविता वाहून जाउ नयेत म्हणुन हा प्रयास. तिथल्या कविता मी इथे छापतो आहे. मूळ कवींनी आपापली कविता मग इथेच खाली पेस्ट करावी. नंतर ही पोस्ट एडिट करेन म्हणजे मालकीहक्क कायद्याचा भंग होणार नाही. वाहून गेलेल्या कवितांच्या मालकांना जर त्या लक्षात असतील तर त्या इथे पोस्टून आमचे देखील प्रबोधन करावे..

तर आजच्या सर्वोत्कृष्ट कवितेने सुरुवात करुया:

*********************
अरभाटः
मागल्या दिवसाचा संताप अन दु:ख
अवहेलना, निराशा व नकार
यांचा बघत असता
जमिनीवर पसरलेला निचरा
आगामी विदग्धतेची चाहूल लागते
जेव्हा आसमंतात घुमते आवाहनात्मक हाक.......
"बाईsss, कचराsss"

*********************

मीनु:
दादा देतो दणका
दुखुन येतो मणका
दोघं मिळून खातो आम्ही
भाकरीबरोबर झुणका
दादा जातो कालेजात
पुस्तकं मात्र घरात
म्हणतो नको दिसायला
खोट मुळी तोर्‍यात
दादा चालवतो बाइक
वर म्हणतो माझं आइक
आपल्याला काय
लाच दिली की आपण त्याचे पाइक.

*********************

माता:

दीपिका पडुकोणच्या बहिणीने लिहिलेली कविता.

ताई माझी रुपवान,
जशी लावण्याची खाण.
उंची केवढी हो तिची,
पाहता दुखते मान.
ताई घालते ड्रेस,
फॅशनेबल अति अति.
कपाट तिचे उघडिता,
अबब! ड्रेस किती?
ताई घालते पायांत
बूट उंच टाचांचे.
तिला फारच शोभती
बूट नाजूक काचांचे.
ताई करते कॅटवॉक,
एक हात कमरेवर.
सर्व लोक गं म्हणती,
जशी परी धरेवर.
ताई गेली सिनेमात,
तिथे भेटे रणबीर.
ताईच्या नखाचीही,
त्याला मुळी नाही सर.

*********************

गजानन देसाई:

सोमवारचा शाप

लांबुडका गोल
एक डोंगर

छिद्र त्यास
एका सोंडेस

त्यातून गोवली
बलदंड शृंखला

खडखड .... .... (मंदशी)
जीव दडपून जाय

रवीच्या ढळत्या निशी
दिली पायात जोखडून

*********************

पुन्हःश्च मीनु:

ती पोळेवाली बी
माझ्या गुलाबाच्या
झाडाची पानं
खुशाल तोडून नेते
ती पोळेवाली बी
तीला एक छोटी सोंड
सोंड कसली कात्रीच ती
नीट लायनीत कापते.
ती पोळेवाली बी
मग कधी तरी
खाते फटका
जुन्या वर्तमानपत्राचा

*********************

वरील कवितेवर एकापाठोपाठ एक खालील दोन प्रतिक्रिया आल्या:

@मीनु...

छान कविता होती...:ड
**************

@मीनु...

छान कविता आहे...:-प
*********************

आणि मीनु यांना अजुन एक कविता स्फुरली:

एकदा भुतकाळ
एकदा वर्तमानकाळ
जीडीच्या कवितांना नाही चाल

एकदा ड
एकदा प
अंगावर पडते प्रतिक्रियेची पाल

एकदा बरं
एकदा वा!!
दिपीकाच्या गालाला रणबीरचा गाल

*********************

पुन्हा एकदा मीनु:

कवितेचं नाव आहे 'ओळखा पाहू'

काका माझा होतो भुवन
काका कधी असतो मंगल
काकाच्या बोलांनी
का होते मोठी दंगल?
काका आपल्याच नादात मग्न
काकाची होतात दोन्दोन लग्न
काका कापतो केस बारीक
काका खातो रोज खारीक
काका बोलतो विचार करुन
काका अस्सा माझा छान
काका कोण? मी कोण?

*********************

हीच कवितेची बाधा आजुबाजुच्या बाफंना होउन, मृण्मयी ह्यांनी पाडलेली कविता:

इथे कुणालाही दुखवायचा हेतु नाही
आणि मनं जोडणारा कवितेसारखा सेतु नाही

काव्य स्फुरायला मदतीची अपेक्षा नाही
पण माझं गद्य वाचण्याखेरीज दुसरी कठोर शिक्षा नाही.

*********************

आणि सरते शेवटी, फूल ना फुलाची पाकळी म्हणुनः

जळे तयांची काया
ज्यांनी कविता केल्या
सृजनाच्या अमूर्ताला
शब्दांचा साज दिला

का जळजळते तुम्हाला
की वाचण्यास दाम मोजला?
आम्ही लिहितो, आम्ही वाचतो
कौतुक का बघवेना तुम्हाला

मनाच्या क्षतांतून
'मंद'सा तरंग पसरला
चक्षूच्या सीमा ओलांडून
रवीचा चंद्र झाला

असेल विषय तोच पुन्हा
पण रोज नवा साज दिला
कागद फुकट मिळाला
म्हणुन दिसामाजी रतीब घातला

*************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नका वध करू माझा

नकाच वध करू माझा

नका वधच करू माझा

नका वध करूच माझा

नका वध करू माझाच.. बाकीची बरीच बिनकामी टाळकी आहेत ना!

Lol

पायी चालू देत नाही, नि गाढवावरही बसू देत नाही. >>>> Lol

अरे....हे तर मी आज पहिल्यांदाच पाहिले...
माझीही काव्यप्रतिभा आता उचंबळून येत आहे....
***
किती दिवस झाले कविता पाडली नाही...

किती दिवस झाले " निळ्या सावळ्या गाभ्यातल्या
सोनेरी कवडश्यांची नाजुकशी वीण उसवली नाही"

किती दिवस झाले "अत्त्रुप्त आत्म्यांचा संप्रुक्त अंधार
काळाच्या डोहात खोलखोल बुडवला नाही"

किती दिवस झाले "रुणझुणत्या नादाची कोवळी किणकिण
हळव्या शब्दात अलवारपणे घुमवली नाही"

किती दिवस झाले "समाजातल्या दांभिकतेला विद्रोहाच्या आसुडाने
फटकारत फटकारत जाळले" नाही

खूपच दिवस झाले .....
पाडलेल्या कवितेला "अंतरातून उमटलेला नादातीत झंकार" म्हणले नाही....
खूपच दिवस झाले .....
पाडलेल्या कवितेला "उसवलेल्या भावनांची लसलसती ज्वाला" म्हणले नाही....

*****************

पुणेकर झकास... Happy
पण मला वाटतं कवितेत गर्भ, चुंबन, प्रेम, बापुजी काहीच नाही मग त्याला कविता का म्हणावे..
कविता म्हणावे का? का म्हणावे कविता?

~~~~~~~~~

खरंच किती बरं झालं असतं जर..
माझ्या अतृप्त आत्म्याला त्यांनी
त्यांच्या कवितांचं पिंडदान केलं नसतं तर..
मुक्तीचा मार्ग,
माझ्यासाठी खुला झालाही असता कदाचित
पण आज या क्षणी,
नर्काच्या दाराशी उभ्या रखवालदाराला
देण्यासाठी माझ्याकडे फक्त काही कविता..
मला आत जायला परवानगी मिळेलही कदाचित
पण या कवितांच काय?
~~~~~~~~~

मीनु - तुमच्या सुचना शिरसावंद्य..(एक सोडून)
-------------------------------
कवितांचं काय हा प्रश्नच मुळी अति गहन...
आदिम शक्तिंपासून तद्दन अराजकतेपर्यंत
कुणाला उत्तर माहिती आहे याचं..
गर्भातला हुन्कार, चुंबनातला स्वीकार,
प्रेमातला आकार की जाणीवेतला नकार...
काय करणार आपण कवितांचं...
पाडणार्...मोडणार्....विरघळवणार...
स्वर्गाच्या दारापासून नरकाच्या भारापर्यंत...
कविता..कविता आणि फक्तं कविता....

-----------------------------------------

कविंनो ...
नका वध करू माझा
उत आला काव्यबुरशीचा
चुंबनाच्या हुंकाराचा
गर्भातल्या स्वीकाराचा
प्रेमातल्या नकाराचा
जाणीवेतल्या आकाराचा
विरघळलेल्या स्वर्गाचा

नका हो
नका हो
नका नका नका वध करू माझा
जाउदे...
आता मी घेते आपली रजा...

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

निधप,'दी' अगदी आर्त हाक घातलीस.. काळीज गलबललं गं

पुणेकर सुंदर अप्रतिम तोडलंस... कवितांचा सर्वत्र संचार असणारच. कविता हाच श्वास असणार्‍या आपल्यासारख्यांना कविता नसतील तर स्वर्गही तुच्छ भासेल हे अगदी पोचतंय कवितेतून.

Happy अय्या आईची माया आईचं प्रेम आईचं त्याग.. आईबद्दलचा आदर याबद्दल लिहायला विसरलोच आपण. हल्ली याची पण म्हणे फॅशन आहे. काय काय फॅशनी निघतील कवितेच्या क्षेत्रात सांगता येत नाही.
~~~~~~~~~

Rofl पुणेकर, मीनू ,नीधप.
अजून पृथ्वीतलावर काही विषय राहिलेत का कविता करायला?

ए दिप्या हसतो काय ? 'दा' असू शकतात तर 'दी' का नाही.. स्त्रियांवर अन्याव का म्हनुन
~~~~~~~~~

अजून पृथ्वीतलावर काही विषय राहिलेत का कविता करायला?<<<<<<<<<
रैना यांच्या या पेचात टाकणार्‍या प्रश्नामुळे सदरहू कवयित्री अंतराळात कवितेचा विषय शोधायला गेली. पण हाय..... ऑक्सिजन सिलेंडराचा साठा पुरेसा नसल्याचे तिला नेपच्युनापाशी पोचल्यावर लक्षात आले. तेव्हाची ही कविता.

ने मजसी ने परत पृथ्वीतलाला...
देवा रे, जीव घुसमटला.. घुसमटला... देवा...
(चाल बदलून. आता ती शेवटचे काही सिलेंडर मोजत असल्याने एकाच चालीत शब्द सुचणे केवळ अशक्य आहे. तेव्हा गोड मानून घ्या.)
रैनेला पडला प्रश्न भलताच मोठा.
पृथ्वीवर कवितेच्या विषयांना तोटा???????
घेतले मी कागद न पेन, घेतली काळी शाई.
पृथ्वीवरून निघायची मला भलतीच झाली घाई.
प्राणवायूचा साठा पुरेसाSSS बाई मी घेतलाच नाई.
श्वास कोंडला बाई माझा श्वास कोंडला बाई.
(चाल बदलून.)
फुलांवर केली, मी पानांवर केली.
झाडांवर केली मी, खोडावर केली.
कविता मी प्रत्येक वेलीवर केली.
(चाल बदलून. सिलेंडर संपत आलेत. आता चाल पटापट बदलेल.)
शोधल्या दिशाही दाही.
विषय आता राहिला नाही.
अंतराळात गेले विषय शोधायाSSSSSSS
प्रवास सारा गेला हो वाया.
कारण...
सिलेंडर संपला.. माझा...
सिलेंडर संपला.
(चाल बदलून.)
हे नेपच्युना,
दे मला थोडा प्राणवायू तुझ्या आभाळातला.
नसेल तुझे आभाळ माझ्या पृथ्वीच्या आभाळासारखे निळे.
ते करडे असेल तरी मला चालेल.
पण हाय, तुझ्याकडे तरी कुठे असणार प्राणवायू वेड्या?
तो असता तर जीवसृष्टी असती, पाणीवृष्टी असती.. (पावसाला कसा सुरेख शब्द वापरलाय पहा!)
ती नाही... म्हणजे...
'तो'ही नाही?
तो म्हणजे प्राणवायू रे...
लगेच डोळा नकोय मिचकवायला...
अशी गंमत सुचतेच कशी?
प्रसंग हा गंभीर रे...
सिलेंडर संपत येता,
सुटतोय माझा धीर रे...
(चाल बदलून)
कर चले हम फिदा सब सिलेंडर साथियों
अब तुम्हारे हवाले ये बहर साथियों

सिलेंडर संपता गया,
मेरा दम घुटता गया
लिखती लेखणीको मगर ना रुकने दिया.
पेश है ये आखरी कविता साथियों...
(चाल बदलून)
हे कविते.
आदिमाते.
आता येते.
अच्छा!

सिलेंडरात शेवटची पावकिलो हवा शिल्लक असताना भारताने पाठवलेल्या सुपरफास्ट यानाने कवयित्रीची सुटका केल्याची बातमी आत्ताच हाती आली आहे. मात्र तिला यानात चढण्याआधी सर्व पाने तिथेच फेकून द्यावी लागली. (मेले दुष्ट अंतराळवीर! जळतात तिच्या कवितांवर!) तरीही ही वरची कविता तिने आपल्या स्मरणशक्तीच्या साह्याने पुन्हा लिहून काढली आहे.

(आता यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
There is no charge for awesomeness.... or attractiveness.

खरोखर टाळ्या! Rofl
मी अक्षरशः दरवेळी चाल बदलून वाचली.. त्यामुळे
सिलेंडर संपता गया,
मेरा दम घुटता गया
लिखती लेखणीको मगर ना रुकने दिया.
>> या ठिकाणी कहर झाला.. मला दृश्यही दिसू लागले.. Lol

सिमाते, प्रचंड हंशा आणि प्रचंड टाळ्या... Rofl
मीनू, नीधप, पुणेकर... Lol
=========================
नूतन वर्षाभिनंदन..

सिलेंडर संपता गया.. ही वाक्ये तर मला अल्ताफ राजाच्या आवाजात ऐकू आली..

Lol आता कसं म्हंजी अंतराळातून इंपोर्टेड विषय आले म्हणायचे पृथ्वीवर..
लवकर लवकर कवयित्रीला ते विषय इथे लिहायला सांगा मग बघा कसा कवितांचा पाऊस पडतोय तो..
~~~~~~~~~

श्रद्धे- धन्य आहेस. ह . ह . लोळण घेतली. Rofl
पण सिलेंडर हा शब्द आम्हांस तितकासा रुचला नाही. आपल्या अलवार भावना (शी: " हळव्या" राहिलेच बाई. आता झक्की काय म्हणतील ?) मातृभाषेतच व्यक्त करण्याची प्रतिभा तो नेप्च्यूनवासी देवाधिदेव आपणांस देवो ही सदिच्छा.
पण प्राण (वायू) जातोय की राहतोय ह्या स्थितीतही आपण सुचतील त्या अंतराळातील कल्पनांना हाताशी घेऊन कविता पाडलीत या बद्दल आपले अभिनंदन. पूर्वी संतकवी इहलोकी कविता/आर्या व. लिहून मग परलोकी जायचे. पण आपण इहपरलोक हा भेदभाव न बाळगता लगेच कल्पनांच्या शोधात अंतराळी गेलात. वा! वा !! वा !!!!

हे देवा... माझ्या सकाळच्या काव्यउबळीनी इतका पेट घेतला... हर हर...(हे झक्कींच्या हटकेश्वर चं सानुलं आणि हळवं रूप असेल का?)

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

बस रे बस, बस्स. लई झालं अन रडू आलं. Lol
काय करू आता या कविताबाज लोकांना??
सुधाकराची दारू सोडवणं यापेक्षा सोपं होतं देवा..!!

--
कवितांनो, ललितांनो, आता बस! एक या दो, बस्स बस्स!!

पुणेकर, नी, मीनू, श्र कहर ! Rofl या कविता आणि मृण्मयीची ती कविता खरेतर 'काहीच्या काही' मध्ये टाकायला हरकत नाही. भन्नाट !!

    ***
    Real stupidity beats artificial intelligence.

    पुणेकर, नी, मीनू, श्र Rofl

    निधप,'दी'>>>> हे महान होतं.. Proud

    जय सीनियर मातादी!!!! :P,
    नीधपदी, थोर आहात! (हे कायतरी सप्तपदी - अष्टपदी च्या चालीवर वाट्टंय का? :P)
    मीनू, पुणेकरा.. धन्य आहात! Lol
    --
    अंशुमान.

    पाणीवृष्टी असती.. (पावसाला कसा सुरेख शब्द वापरलाय पहा!) >> Rofl काय ती प्रतिभा वाह चाली बदलुन बदलुन वाचलं Lol ... पुणेकर, मीनू वाह बोले तो.. हम्म्म... Lol

    Pages