बहर गुलमोहराचा

Submitted by टवणे सर on 10 November, 2008 - 12:40

गडावरील अजरामर कवींनी आज केलेल्या कविता पाहोनी आमचे डोळे तृप्त जाहले. पण त्यातील काही कविता आधीच वाहून गेल्या असे समजले. तरी उरलेल्या कविता वाहून जाउ नयेत म्हणुन हा प्रयास. तिथल्या कविता मी इथे छापतो आहे. मूळ कवींनी आपापली कविता मग इथेच खाली पेस्ट करावी. नंतर ही पोस्ट एडिट करेन म्हणजे मालकीहक्क कायद्याचा भंग होणार नाही. वाहून गेलेल्या कवितांच्या मालकांना जर त्या लक्षात असतील तर त्या इथे पोस्टून आमचे देखील प्रबोधन करावे..

तर आजच्या सर्वोत्कृष्ट कवितेने सुरुवात करुया:

*********************
अरभाटः
मागल्या दिवसाचा संताप अन दु:ख
अवहेलना, निराशा व नकार
यांचा बघत असता
जमिनीवर पसरलेला निचरा
आगामी विदग्धतेची चाहूल लागते
जेव्हा आसमंतात घुमते आवाहनात्मक हाक.......
"बाईsss, कचराsss"

*********************

मीनु:
दादा देतो दणका
दुखुन येतो मणका
दोघं मिळून खातो आम्ही
भाकरीबरोबर झुणका
दादा जातो कालेजात
पुस्तकं मात्र घरात
म्हणतो नको दिसायला
खोट मुळी तोर्‍यात
दादा चालवतो बाइक
वर म्हणतो माझं आइक
आपल्याला काय
लाच दिली की आपण त्याचे पाइक.

*********************

माता:

दीपिका पडुकोणच्या बहिणीने लिहिलेली कविता.

ताई माझी रुपवान,
जशी लावण्याची खाण.
उंची केवढी हो तिची,
पाहता दुखते मान.
ताई घालते ड्रेस,
फॅशनेबल अति अति.
कपाट तिचे उघडिता,
अबब! ड्रेस किती?
ताई घालते पायांत
बूट उंच टाचांचे.
तिला फारच शोभती
बूट नाजूक काचांचे.
ताई करते कॅटवॉक,
एक हात कमरेवर.
सर्व लोक गं म्हणती,
जशी परी धरेवर.
ताई गेली सिनेमात,
तिथे भेटे रणबीर.
ताईच्या नखाचीही,
त्याला मुळी नाही सर.

*********************

गजानन देसाई:

सोमवारचा शाप

लांबुडका गोल
एक डोंगर

छिद्र त्यास
एका सोंडेस

त्यातून गोवली
बलदंड शृंखला

खडखड .... .... (मंदशी)
जीव दडपून जाय

रवीच्या ढळत्या निशी
दिली पायात जोखडून

*********************

पुन्हःश्च मीनु:

ती पोळेवाली बी
माझ्या गुलाबाच्या
झाडाची पानं
खुशाल तोडून नेते
ती पोळेवाली बी
तीला एक छोटी सोंड
सोंड कसली कात्रीच ती
नीट लायनीत कापते.
ती पोळेवाली बी
मग कधी तरी
खाते फटका
जुन्या वर्तमानपत्राचा

*********************

वरील कवितेवर एकापाठोपाठ एक खालील दोन प्रतिक्रिया आल्या:

@मीनु...

छान कविता होती...:ड
**************

@मीनु...

छान कविता आहे...:-प
*********************

आणि मीनु यांना अजुन एक कविता स्फुरली:

एकदा भुतकाळ
एकदा वर्तमानकाळ
जीडीच्या कवितांना नाही चाल

एकदा ड
एकदा प
अंगावर पडते प्रतिक्रियेची पाल

एकदा बरं
एकदा वा!!
दिपीकाच्या गालाला रणबीरचा गाल

*********************

पुन्हा एकदा मीनु:

कवितेचं नाव आहे 'ओळखा पाहू'

काका माझा होतो भुवन
काका कधी असतो मंगल
काकाच्या बोलांनी
का होते मोठी दंगल?
काका आपल्याच नादात मग्न
काकाची होतात दोन्दोन लग्न
काका कापतो केस बारीक
काका खातो रोज खारीक
काका बोलतो विचार करुन
काका अस्सा माझा छान
काका कोण? मी कोण?

*********************

हीच कवितेची बाधा आजुबाजुच्या बाफंना होउन, मृण्मयी ह्यांनी पाडलेली कविता:

इथे कुणालाही दुखवायचा हेतु नाही
आणि मनं जोडणारा कवितेसारखा सेतु नाही

काव्य स्फुरायला मदतीची अपेक्षा नाही
पण माझं गद्य वाचण्याखेरीज दुसरी कठोर शिक्षा नाही.

*********************

आणि सरते शेवटी, फूल ना फुलाची पाकळी म्हणुनः

जळे तयांची काया
ज्यांनी कविता केल्या
सृजनाच्या अमूर्ताला
शब्दांचा साज दिला

का जळजळते तुम्हाला
की वाचण्यास दाम मोजला?
आम्ही लिहितो, आम्ही वाचतो
कौतुक का बघवेना तुम्हाला

मनाच्या क्षतांतून
'मंद'सा तरंग पसरला
चक्षूच्या सीमा ओलांडून
रवीचा चंद्र झाला

असेल विषय तोच पुन्हा
पण रोज नवा साज दिला
कागद फुकट मिळाला
म्हणुन दिसामाजी रतीब घातला

*************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खा खा..... Rofl

माझी "टण्या नावाच आल पाखरु" हि गझल वहिनीच्या पाककृतीच्या बीबी वर करपली Sad पाकिस्तान मुर्दाबाद!!!

Tyu :
अगं अर्धच कर अभिनंदन अजून (गांधर्व का काय म्हणतात तसा विवाह केलाय सध्या टाईमशॉर्टेजमुळे )

swaatii :

गंधर्वविवाह मीमांसा :
गंधर्व हे पूर्वापार गाणीबजावणी करणारे लोक. ते उदाहरणार्थ नागर जनतेचे नियम पाळत नसत. ते जवळपास आल्याचं त्यांच्या पदरवाआधी गंधावरून कळे, म्हणून त्यांना गंधर्व असे नाव मिळाले. (आधी गंध, नंतर रव - इति गंधर्व - पहा : वा.या.फुटकळ यांचे समग्र मराठी व्याकरण.) अर्थातच यांच्या चालीरीतींना बाकीची नागर जनताही हिंग लावून विचारत नसे. (हो, तेव्हा हिंग वापरात होता. पहा श्री. चिनूक्स यांच्या ऋग्वेदकालीन पाककृती.) शिवाय ते आधीच गळ्यात माळा घालून हिंडत असल्यामुळे विवाहमाला निराळी ओळखणं (त्यांचं त्यांनाही) अवघड जात असावं. किंवा विवाह नाकारायचा झाल्यास सोपं जात असावं. तेव्हा अशा प्रकारे नक्की लागला की न लागला - असा संभ्रम उत्पन्न करणार्‍या विवाहांना गांधर्वविवाह असे म्हटले जाऊ लागले. नागर जनतेचे विवाहकर्म हे देवाब्राह्मणांच्या साक्षीने व आप्तेष्टांना (हिंगयुक्त) इच्छाभोजन देऊन संपन्न होत असे. गंधर्वविवाहाच्या प्रसंगीच्या भोजनाची माहिती ही विवाहाइतकीच गुप्त ठेवण्यात येई.

मॄ
ट्युच्या गांधर्व विवाहानिमित्त :

वनीच्या देवतांनो गुंफा गं कळ्या कळ्या
दवाचे थेंब जोडा, जोडा गं मुंडावळ्या
लाव गं उषामाई कुंकुम भालावरी
वसंत आला वनी, वसंत घरीदारी..

मनाच्या मुहूर्तानं सोन्याची घडी येते
वसंत वासंतीचे फुलांनी जुळे नाते
कोवळ्या पानांची ही अक्षता अंगावरी
वसंत आला वनी, वसंत घरीदारी

(कवी कोण ते ठाऊक नाही)

स्वाती :
हिंग आणि गंधर्व यांच्या परस्परसंबंधाबाबत बर्‍याच दंतकथा प्रचलित आहेत. हा संबंध दोहोंच्या उग्र गंधाशी संबंधित असावा असं लालूप्रमाणेच अनेक अर्वाचीन अज्ञांचं मत आहे. इतिहासकार जा. उ. द्यानावाले यांच्या 'गंधर्वपर्व' या ग्रंथात याविषयी माहिती सापडते. त्यांच्या मते भोजनात हिंग वापरणार्‍या लोकांना त्या काळी 'हिंगू' म्हणत असत. पुढे याचाच अपभ्रंश होवून आजचा 'हिंदू' शब्द तयार झाला असावा. गांधर्वविवाहाच्या समयी (नागर जनतेच्या मंगलाष्टकांप्रमाणे) हिंगाष्टके म्हणण्याची प्रथा होती. वर मृण यांनी उधृत केलेली रचना हे याचेच उदाहरण. त्यात (परस्परांना हिंग लावून न विचारणार्‍या) आठ ओळी असल्याचं सूज्ञांच्या लक्षात आलंच असेल.

टण्या...

साजिर्‍या.... खासच कॉमेंट!

आयला.. हा टण्यात्कार कधी झाला? जबरी.. Happy
मी बहू मिसलो हे सगळं..:(

Lol सिंडे, उवांवर कविता करुन त्यांना न्याय देणारी तूच पहिली असावीस बहुधा. Proud

.

स्लार्टी, सापडले का? Happy
मी पुर्ण लिहितो. तुझे वरचे पोस्ट डिलीट केले तरी चालेल.

वाड्यावर एकेक जण आपल्या समस्या मांडत असताना,

साजिरा-
आयला, मला एक निराळीच समस्या सतावू लागली आहे. गेल्या २-३ दिवसांपासून मला एक आयडी 'मायबोलीवर कुणी काय करावे व करू नये त्याचे सल्ले देऊ नका, कळले काय?' असा प्रेमळ प्रश्न माझ्या विचारपूशीत टाकतो आहे. हात दाखवून अवलक्षण नको, म्हणून घाईघाईने डिलीटावे, तर पुन्हा तशीच प्रेमळ विचारपूस पुन्हा हजर!!
धारपांच्या कथानायकासारखा मी हवालदिल झालो आहे. सला द्यावा. कृपया.

'सला' म्हणल्यावर स्लार्टीराय थेट शिवरायकाळात गेले अन त्यांनी खालील 'राय' दिली.

स्लार्टी-
नविश्त ए स्लार्टीमुन्शी अज महाराज सिवाजी बनामे साजिरा फर्जंद,
रयतेस तखल्लुस देणार्‍या गनीमास योजावे ऐसी दो तजवीज. येक ज्ये टण्याशास्त्री बोलितात तैसे, मदिरेच्या नादाने भुलवावे. गनीमास मद्य हे तौबा, पण 'पिता मद्य, होते पद्य' ऐसे पुराणे होष्यमाण. ऐसे काव्याने मारावे*. तजवीज दो ही दरबस्त जोखमीची प्रंतु कायमचा आरामही असे. गनीमाचा यल्गार होणेआधी खुद्द त्यांज मुलुखी जावोन लूट माजवावी ऐसे. ते कारणे गनीम त्याचे प्रांती जेरबंद.
या उपरि कोणे बाबे शक अंदेशा न करून आपले वतनात येणे व आपले विचारपुशीचा इनाम व हक खाऊन खुशी हालीने राहाणे. इति लेखनसीमा.
.
* हे वाक्य वादग्रस्त आहे. फारसीमध्ये कावा या शब्दाचे बेरकीपणा, कॉफी व पद्य असे अर्थ होतात. त्यातील कुठला अर्थ घ्यावा यावर विविध इतिहासकारांत मतभिन्नता आहे. संपादकांना मतच नाही.
- संपादक.

--
संपलाच नाही, भाकरीचा मार्ग;
ग्रंथातले स्वर्ग, कशापायी?

आजचे स्लार्टी दादाचे आकडे

>>> तुम्हाला कोणी सारख टारगेट केल असत तर चालले असते का?
तात्या, तुम्ही लिहिलेलं असल्याने चुकून टारगट असं वाचलं
बरं, आजचा आकडा दर असा - टण्या, सिंडी, लालू, हह, शोनू, स्वाती यांच्यासाठी मी १:१.५ देईन, ट्युलिपसाठी १:५ (तिला सध्या फार वेळ नसावा असा अंदाज ), बी साठी १:२०, तात्या हेच मेट्रन आहेत यासाठी १:७, मेट्रन याच महिन आहेत यासाठी १:१०, महिन याच तात्या आहेत यासाठी १:३... तात्या, महिन आणि मेट्रन हे एकच आहेत - ३:१३

***
जय हो !

(बी ची माफी मागून)

बी ने आज पार्ल्यात 'बोलघेवडा' आणि घेवड्याचा संबंध काय असा प्रश्न विचारला. हाच प्रश्न त्याने जुन्या मायबोलीवरही विचारला होता पण त्यावेळी शंकेचं मनासारखं समाधान झालं नसावं. ह्यावर ‍असामीने दिलेल्या उत्तराने हा प्रश्न त्याला पुन्हा कधी सतावणार नाही याची खात्री आहे.

asami | 25 फेब्रुवारी, 2009 - 11:24

बोलघेवडा आणि घेवड्याच्या शेंगांचा काही संबंध असावा का... >> (HG च्या टवाळ परंपरेला स्मरून) घेवड्याच्या शेंगा वातूळ असतात (तशा सर्वच शेंगा वातूळ असतात, वातीमधे तेल चढते म्हणून त्या तेलासाठी पण वापरतात), त्या खाऊन वात होतो. वात हा solids पेक्षा हलका असतो म्हणून तो तोंडाद्वारे बाहेर यायचा प्रयत्न करतो. सभ्य माणसे सर्वांसमोर तोंड कसे उघडणार म्हणून ते सारखे काहितरी बोलून वात बाहेर जाऊ देतात. अशा तर्‍हेने घेवडा माणसाला बोलते करतो म्हणून त्याला बोलघेवडा आणि पर्यायाने घेवडा खाऊन बोलणार्‍या माणसाला बोलघेवडा म्हणतात.

असामी .. एक्दम भन्नाट.. Rofl

अ‍ॅडम ह्यांनी विचारलेला प्रश्नः
---
किती ते confusion..
आजचा प्रश्ण..
जर F1 = help.. आणि F1 = student visa पण..
तर F10 = ?
सगळ्यात उत्तम फा.उत्तराला केपी कडून करंडक..
--------------------------------------------------

त्यावर स्लार्टी ह्यांनी दिलेले (मी पाहिलेले आजवरचे सगळ्यात जबरी पोस्ट.. अर्थात बी च्या पोस्ट्स सोडून Wink )
---
फा. उत्तरा १) help 0 आणि student visa 0 असे झाले की घ्यावी लागणारी help F10
फा. उत्तरा २) F10 हे नवरेसिंग (शब्द योग्य जागी तोडावा. आशु, रस्त्याच्या बाजूने, ते F1 रेसिंग आहे )
फा. उत्तरा ३) F10 हा फ चा दहावा मायबोलीवतार (जेव्हा जेव्हा या बोलीवर अशुद्ध भाषा, व्याकरण माजतात, जेव्हा जेव्हा मी सुंदर चित्रे काढतो, तेव्हा तेव्हा भाषेचे रक्षण करण्यासाठी व चित्रांचे दर्शन देण्यासाठी मी अवतार घेतो - फगवद्गीता, श्रद्धावा अध्याय)
----------------------------------------------------------

फगवद्गीता, श्रद्धावा अध्याय Rofl

F10 हे नवरेसिंग, फगवद्गीता, श्रद्धावा अध्याय >>> ए वन!!! Rofl Rofl

ह्म ही आहे माझी नवी गझल. वृत्त: खाखाखा तसुटा. आपल्याला आवडेल अशी खात्री आहे.
जेवणाचा बेत आहे

आज माझा जेवणाचा (मोठ्ठा) बेत आहे..
पारल्यात मेनु पोस्टणे हेच माझे व्रत आहे!

उकडला रटरट अंजिर आज ज्यांनी,
रंग बर्फीचा तयांच्या किरमीजी आहे!

मेनु मी माझे तुम्हाला काय वर्णावे?
सुगरणी फसव्या, चीड त्यांची येत आहे!

कोण खातो का कुणाच्या संगतीने?
डबा रोज माझा बरोबर नेत आहे!

बोलणे काढू नये दूसरे दूपारी,
'खात रहावे' हा इथे संकेत आहे!

सांग वाटे तुज 'खाण्याची' ही खंत कसली?
आकार गोलाकार हा तुज समवेत आहे!!

म्हणजे, काय खाल्लंस आज? मेनू काय होता म्हणे?

सिंडे Lol
-----------------------------------------
सह्हीच !

पोस्टल्या मेनुची शपथ, खास आहे गझल!!!!! खाल्लंस!

उकडला रटरट अंजिर आज ज्यांनी,
रंग बर्फीचा तयांच्या किरमीजी आहे!
कित्ती बाफंच्या आठवणींची 'झुरड' आहे ह्या ओळींना. (झालर आणि मुरड मिळून).

>>मेनू काय होता म्हणे?
'इशानने टाकलेला' Proud

पोस्टल्या मेनुची शपथ, खास आहे गझल!!!!! खाल्लंस! >>

खाल्लंस.... Lol

हे स्लार्टीचं स्लम डॉग अन ऑस्करच्या संदर्भातलं विवेचन :
विकृत चित्रण आणि विकृतीचे चित्रण यात गल्लत होते आहे का ? विकृतीचे चित्रण हे विकृत असेलच असे नाही.
रहमान आणि गुलझार यांना गोर्‍यांनी नावाजले असा हपापलेला आनंद मला झालेला नाही. मग मला आनंद का झाला ? त्याची दोन कारणे मला देता येतात -
१. एखादा पुरस्कार कोणालातरी मिळाल्याचा आनंद होतो कारण त्या पुरस्काराचा इतिहास. ऑस्कर पुरस्कार मिळालेले आतापर्यंतचे कलाकार पाहिले तर असे दिसते की बहुतांशी नक्कीच उच्च योग्यतेचे होते. यावरून त्या पुरस्काराची उंची ठरते. अशा योग्यतेच्या कलाकारांमध्ये एक भारतीय गणला जातो याचा मला आनंद होतो. मग तो ऑस्कर असेल तरच होतो का ? नाही. अगदी हाच आनंद मला विंदांना ज्ञानपीठ मिळाले, रविंद्रनाथांना नोबेल मिळाले की होतो. ज्ञानपीठ मिळाले म्हणून विंदा मोठे झाले नाहीत, विंदा हे तो न मिळताही माझ्यासाठी मोठेच असतात. पण याआधी ज्यांना तो पुरस्कार प्राप्त झाला त्या मांदियाळीत माझ्या विंदांची गणना माझ्याखेरीज इतरही करतात याचा मला आनंद होतोच.
२. ऑस्करसारखे पुरस्कार वैश्विक परिमाण असल्याशिवाय मिळत नाहीत. अमेरिका म्हणजे विश्व आहे का ? मुळीच नाही. पण संस्कृती संस्कृती म्हणतात ती बघितली तर ती आणि भारतीय प्रचंड भिन्न आहेत... अशा वेळी ही प्रचंड सांस्कृतिक दरी ओलांडून काहीतरी तिकडेही पोहोचत आहे हे फार मोठे यश आहे. संगीताला एकच भाषा असते असे जे आपण म्हणतो ते याहून काय वेगळे आहे ? असाच आनंद मला झाकीर हुसेनना ग्रॅमी मिळाला म्हणूनही होतो. विंदांना ज्ञानपीठ मिळते त्याचा अर्थ असा होतो कि या देशात असलेल्या भाषा व संस्कृतीच्या सीमा या माणसाने ओलांडल्या आहेत... माणूस म्हणून आपल्यात जे काही सामायिक आहे त्याच्याशी त्याच्या कलाकृतीने नाते जोडले आहे... मग देशभाषा इ.इ. मानवनिर्मित सीमा भेदणारे असे वैश्विक परिमाण एखाद्या कलाकृतीला आहे याची पोचपावती मला कधी मिळेल ? तर 'सीमे'पलिकडील लोकांनी त्याला नावाजल्यावर. म्हणून मला आनंद होतो. बरे, खुद्द ती कलाकृती मला फारशी उच्च वाटणारही नाही अन् त्यात आश्चर्य काय ? माझी आणि विभिन्न संस्कृतीतल्या माणसाची सांगितिक जाणीव प्रचंड वेगळीच असणार... त्याला जे आवडेल तेच मला कसे आवडेल ?
एका समाजातील माणूस त्याच्या लोकांना उच्च वाटते अशी निर्मिती करतोच, शिवाय दुसर्‍या समाजातील लोकांनाही आवडते अशीही निर्मिती करतो... या २ समाजांना जोडणारा हा पूल आहे, तो पूल बांधला गेला याचाही हा आनंद आहे.
.
यातले पहिला मुद्दा फिल्मफेअरच्या बाबत गैरलागू होतो रस्त्याच्या बाजूने, रहमानला पुरस्कार जाहीर करताना त्या निवेदिकेने त्याच्या नावाचा काय अफलातून उच्चार केलाय ! मझा आला.
.
योगायोगाच्या गोष्टी मूर्खपणाच्या कशा होतात ? हे आयुष्य जिथे सणसणीत योगायोगांनी ओतप्रोत भरले आहे तिथे आपण असे विधान करू शकतो याची गंमत वाटते. दुसरे म्हणजे असे खच्चून योगायोग भरले आहेत म्हणूनच ती 'सांगण्यासारखी गोष्ट' होते... 'सकाळी १० ते ५ जॉब केला' ही सांगण्याची गोष्ट होत नाही, त्यात काही योगायोग नसतात, काही घडतही नाही. घरी गेल्यावर मी तरी उत्साहाने काय सांगतो, तर आज योगायोगाने काय घडले... घरचेही उत्साहाने ऐकतात... म्हणजे आयुष्यातले योगायोगाचे स्थान, त्यातून जाणवणारी आपली हतबलता इ. बाबी महत्त्वाच्या वाटत नाहीत का ?
असले योगायोग वगैरे अतीच झाले असा समज असेल तर मग 'थोड्या वास्तवावर आधारित अद्भुतपट' म्हणून का बघितला जात नाही हेही कळत नाही.
.
गेस हु इज कमिंग टु डिनर, अमेरिकन हिस्टरी एक्स, अमिस्टाड, ड्रायव्हिंग मिस डेझी, टु किल अ मॉकिंग बर्ड, चॅरिअट्स ऑफ फायर, ओ ब्रदर व्हेअर आर्ट दाउ, क्रॅश, डान्सेस विथ वुल्व्ह्ज, लास्ट ऑफ द मोहिकन्स यांसारख्या चित्रपटांतून वर्णद्वेष, धर्मद्वेष इ.इ. विषयांना इतक्या विविध पद्धतीने व विविध दृष्टीकोनांतून हाताळले आहे की ते वैविध्य पाहूनच भरून येते. या सर्व चित्रपटांना नामांकने होती, त्यातील बहुतेकांना पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांना स्वतःचे दोष जाहीर करायला लाज वाटत नाही, त्यांना 'स्वतःच्या घरातल्या भानगडी जाहीर करा बघू' असे आव्हान देण्याचाही प्रश्न येत नाही, कारण त्यांनी तर ते शब्दशःसुद्धा केले आहे. अमेरिकन ब्युटी, रिक्वाएम फॉर अ ड्रीम, लिटल मिस सनशाईन यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी त्यांच्या समाजातील dysfunctional कुटुंबव्यवस्थेचे, नातेसंबंधांचे अतिशय टोकदार चित्रण केले आहे. अ टाइम टु किल सारखा गल्लाभरू चित्रपटही त्यांनी केला आहे. (हे सर्व चित्रपट मी पाहिले आहेत, मी न पाहिलेले तर अगणितच.)
.
एवढेच नव्हे, तर अमेरिकन नेटिव्ह्जवर अन्याय होतो म्हणून पुरस्कार नाकारणारा गॉडफादर इथे असतो... सिडने पॉइटिएला ऑस्कर देणार्‍या अ‍ॅन बॅन्क्रॉफ्टने त्याचे भर व्यासपीठावर चुंबन घेतले, त्याच्याबरोबर हातात हात गुंफून व्यासपीठावरून निघून जातानाचा तिचा अस्सल आनंद बघा... मॅकार्थीच्या ससेमिर्‍यात त्याला साथ देणार्‍या एलिया कझानला जेव्हा 'लाईफटाईम' ऑस्कर मिळाले, तेव्हा टॉम हॅन्क्ससकट अनेक जण जागेवर एकही टाळी न वाजवता बसून होते... व्हनेसा रेडग्रेव्हचे ऑस्कर स्वीकृतीचे भाषण म्हणजे केवळ जाळ होता, त्यात 'लोक मला नंतर काय म्हणतील' याची तमा नव्हती, तीच गोष्ट टिम रॉबिन्सची... शाँ पेन त्याच्या भाषणात 'आपल्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे' असे म्हणतो, का वाटली पाहिजे तेही सांगतो... 'I can't imagine a world where I have an Oscar but Denzel doesn't' असे उद्गार ज्युलिया रॉबर्ट्स काढते... चार्ली चॅप्लिनला देश सोडायला भाग पाडल्यावर २० वर्षांनी ते परत त्याला सन्मानाने बोलावतात, लाईफटाईम ऑस्कर देतात आणि ते देताना न भूतो न भविष्यति असा जो टाळ्यांचा खडा गजर करतात, तो पाहून डोळ्यांत पाणी येते... हा ऑस्करचा जागता इतिहास आहे.
हे आख्यान लावण्याचे कारण हे की मला सांगायचे आहे, स्वतःचे दोष स्वतःच उघड करायची त्यांची ही प्रवृत्ती आहे ती onstage आणि offstage सुद्धा आहे. त्यातून दुसर्‍याचे दोष उघड करण्याची प्रवृत्ती निर्माण होते, कारण कालांतराने असे जाणवते की, अरेच्चा ! त्याचे आणि माझे दोष फार वेगळे नाहीत, दोषांच्या बाबतीत आम्ही दोघे सारखेच आहोत. मग साहजिकच दुसर्‍याचे दोष उघड करणारे चित्रपटसुद्धा निर्माण होतात.
हे एकदा लक्षात घेतले की मग 'त्यांना भारतीय गरिबीचे चित्रण फार आवडते, त्यात त्यांना आनंद होतो, म्हणूनच त्यांनी या चित्रपटाला पुरस्कार दिला आहे' ही शक्यता मला ठार नगण्य वाटते आणि 'भारताचा मानभंग झालाय' असा विचार सहजगत्या मनात येत नाही.

***
Entropy : It isn't what it used to be.

स्लार्टी, एकदम पटलं आणि सहमत.

Pages