बहर गुलमोहराचा

Submitted by टवणे सर on 10 November, 2008 - 12:40

गडावरील अजरामर कवींनी आज केलेल्या कविता पाहोनी आमचे डोळे तृप्त जाहले. पण त्यातील काही कविता आधीच वाहून गेल्या असे समजले. तरी उरलेल्या कविता वाहून जाउ नयेत म्हणुन हा प्रयास. तिथल्या कविता मी इथे छापतो आहे. मूळ कवींनी आपापली कविता मग इथेच खाली पेस्ट करावी. नंतर ही पोस्ट एडिट करेन म्हणजे मालकीहक्क कायद्याचा भंग होणार नाही. वाहून गेलेल्या कवितांच्या मालकांना जर त्या लक्षात असतील तर त्या इथे पोस्टून आमचे देखील प्रबोधन करावे..

तर आजच्या सर्वोत्कृष्ट कवितेने सुरुवात करुया:

*********************
अरभाटः
मागल्या दिवसाचा संताप अन दु:ख
अवहेलना, निराशा व नकार
यांचा बघत असता
जमिनीवर पसरलेला निचरा
आगामी विदग्धतेची चाहूल लागते
जेव्हा आसमंतात घुमते आवाहनात्मक हाक.......
"बाईsss, कचराsss"

*********************

मीनु:
दादा देतो दणका
दुखुन येतो मणका
दोघं मिळून खातो आम्ही
भाकरीबरोबर झुणका
दादा जातो कालेजात
पुस्तकं मात्र घरात
म्हणतो नको दिसायला
खोट मुळी तोर्‍यात
दादा चालवतो बाइक
वर म्हणतो माझं आइक
आपल्याला काय
लाच दिली की आपण त्याचे पाइक.

*********************

माता:

दीपिका पडुकोणच्या बहिणीने लिहिलेली कविता.

ताई माझी रुपवान,
जशी लावण्याची खाण.
उंची केवढी हो तिची,
पाहता दुखते मान.
ताई घालते ड्रेस,
फॅशनेबल अति अति.
कपाट तिचे उघडिता,
अबब! ड्रेस किती?
ताई घालते पायांत
बूट उंच टाचांचे.
तिला फारच शोभती
बूट नाजूक काचांचे.
ताई करते कॅटवॉक,
एक हात कमरेवर.
सर्व लोक गं म्हणती,
जशी परी धरेवर.
ताई गेली सिनेमात,
तिथे भेटे रणबीर.
ताईच्या नखाचीही,
त्याला मुळी नाही सर.

*********************

गजानन देसाई:

सोमवारचा शाप

लांबुडका गोल
एक डोंगर

छिद्र त्यास
एका सोंडेस

त्यातून गोवली
बलदंड शृंखला

खडखड .... .... (मंदशी)
जीव दडपून जाय

रवीच्या ढळत्या निशी
दिली पायात जोखडून

*********************

पुन्हःश्च मीनु:

ती पोळेवाली बी
माझ्या गुलाबाच्या
झाडाची पानं
खुशाल तोडून नेते
ती पोळेवाली बी
तीला एक छोटी सोंड
सोंड कसली कात्रीच ती
नीट लायनीत कापते.
ती पोळेवाली बी
मग कधी तरी
खाते फटका
जुन्या वर्तमानपत्राचा

*********************

वरील कवितेवर एकापाठोपाठ एक खालील दोन प्रतिक्रिया आल्या:

@मीनु...

छान कविता होती...:ड
**************

@मीनु...

छान कविता आहे...:-प
*********************

आणि मीनु यांना अजुन एक कविता स्फुरली:

एकदा भुतकाळ
एकदा वर्तमानकाळ
जीडीच्या कवितांना नाही चाल

एकदा ड
एकदा प
अंगावर पडते प्रतिक्रियेची पाल

एकदा बरं
एकदा वा!!
दिपीकाच्या गालाला रणबीरचा गाल

*********************

पुन्हा एकदा मीनु:

कवितेचं नाव आहे 'ओळखा पाहू'

काका माझा होतो भुवन
काका कधी असतो मंगल
काकाच्या बोलांनी
का होते मोठी दंगल?
काका आपल्याच नादात मग्न
काकाची होतात दोन्दोन लग्न
काका कापतो केस बारीक
काका खातो रोज खारीक
काका बोलतो विचार करुन
काका अस्सा माझा छान
काका कोण? मी कोण?

*********************

हीच कवितेची बाधा आजुबाजुच्या बाफंना होउन, मृण्मयी ह्यांनी पाडलेली कविता:

इथे कुणालाही दुखवायचा हेतु नाही
आणि मनं जोडणारा कवितेसारखा सेतु नाही

काव्य स्फुरायला मदतीची अपेक्षा नाही
पण माझं गद्य वाचण्याखेरीज दुसरी कठोर शिक्षा नाही.

*********************

आणि सरते शेवटी, फूल ना फुलाची पाकळी म्हणुनः

जळे तयांची काया
ज्यांनी कविता केल्या
सृजनाच्या अमूर्ताला
शब्दांचा साज दिला

का जळजळते तुम्हाला
की वाचण्यास दाम मोजला?
आम्ही लिहितो, आम्ही वाचतो
कौतुक का बघवेना तुम्हाला

मनाच्या क्षतांतून
'मंद'सा तरंग पसरला
चक्षूच्या सीमा ओलांडून
रवीचा चंद्र झाला

असेल विषय तोच पुन्हा
पण रोज नवा साज दिला
कागद फुकट मिळाला
म्हणुन दिसामाजी रतीब घातला

*************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटत हे मार्च एन्डचा अहवाल आहे...:हाहा:

कोरड्या सरी ओल्या झाल्या, पाउस आला!
<तीच्या माझ्या प्रेमाला बहर आला...>
जणू ढगांचे माजलेले घन अक्ष सैल झाले!!
आज अचानक बारा वाटांनी फुटले.
काही तुझे झाले, काही माझे
तर काही गांधीजींच्या हळव्या आत्म्याचे!>>>
दोन नंबरला एक ओळ घातली बघा झक्की.. ती पण आहे आणि प्रेम पण.. बाकी स्वातीला तुम्ही मॅनेज करा म्हणजे बक्षीस नक्की.. मला तेवढं विसरु नका म्हणजे झालं (दोन नंबरच्या ओळीसाठी...) Lol

बाकी तुम्ही म्हणलात त्यामुळे मला जाम मोह होतोय इतर रंगांवर कविता करायचा. फक्त बेज, मॉव्ह, चटणी, पिच, व्हॉयोलेट यापैकी कोणता आधी घ्यावा ते ठरत नाहीये. चटणीवर प्रयत्न करु का....

चटणी..

हिरव्या गार चटणीसारखी
हिरवी झाली सृष्टी
चटणी रंगाचे चेटूक
अन चेटकीण सृष्टी
चटणीच्या रंगाची हिना थंड गार
चटणी सारखी वाटून घेता... हात...
लाल लाल लाल...
लाल रंग पाहून बापूंचा आत्मा झाला कष्टी

(माझ्या कवितेत पण बापूजी..स्वातीताई या कवितेचा होईल का विचार मर्सिडीजसाठी....? )
~~~~~~~~~

नमस्कार ...
इथे अश्या अतृप्त आत्म्या सारख्या टवाळक्या करण्या एवजी खरोखर सुंदर काव्य लिहा...काव्य कोणाला सुखावण्या साठी किंवा दुखावण्यासाठी नसते... वाचायचा कंटाळा येत असेल तर वाचु नका पण हे प्रकार कशाकरता? विकृत आनंदा पेक्षा निखळ आनंद महत्वाचा..अर्थात काही लो़कांना अश्या गोष्टीत आनंद मिळतो म्हणा पण त्या विकृतीच अस प्रदर्शन नको..आणि हो हे सहज माझ्या ओली सर या कवितेवर आलं म्हणुन लिखाणाचा प्रपंच अन्यथा अश्या कुचाळक्यात सामिल होण माझ्या सुसंस्कृत मनाला
ओंगळवाण वाटत.

लिहिताना जरा विचार करत जा, कोणी दुखावतेही अश्या प्रकारांमुळे याच भान ठेवा.आपण पब्लिक फोरम वर लिहितोय याचाही विचार करा .काय तुमच्या प्रतिभेचे रंग उधळायचे असतील ते तुमच्या वैयक्तीक संभाषणात, वैयक्तिक चाटींग वर उधळा .निदान तितक तारतम्य प्रत्येक माणुस म्हणवणार्‍या व्यक्तीकडे असावे हीच माफक अपेक्षा.

किवा विडंबन पण खुप छान करता येते हे मायबोली वरच्याच मिल्या कडुन शिका. कोणाला दुखावत नाही तर ज्या व्यक्तीवर ज्यांच्या विचारांवर विडंबन करायचे ते त्यांना सुध्दा खदखदून हसवेल असे असावे.
असे जिव्हारी आणि काटेरी नको.

आता यावर कुठलाही वाद घालायची माझी ईच्छा नाही. वाद कायम दोन तुल्यबळ व्यक्तींमधे होतात, वाद घालायला समोरचा ही तितक्या ताकदीचा लागतो.

मला ह्या प्रकारांबद्दल जे मला वाटलं त्याबद्दल मी माझ मत मांडल. जे आवडल नाही ते सांगीतलं

बासुरी

माझा मौलीक सल्ला इथे टवाळांना देवून वेस्ट कशाला करा? ते नाही का , गाढवापुढे वाचली गीता... कालचा गोंधळ बरा होता. तेव्हा करा टवाळी..

सार्वेजनिक कार्यक्रम वा लिखाणावर आपण लिहितोच की आपल्याला जे वाटेल ते, पण मायबोली वेगळी आहे >>>>> LOL.. ! हे म्हणजे आपला तो "पोटचा गोळा आणि दुसर्‍याचा तो ट्यूमर" असंच झालं की.. Proud
असो... बाकी चालू दे..

>>एखाद्या विषायावर आपले मत मांडणं वा प्रतिसाद गमतीशिर असणं/देणं,झालेच तर एखादा गमतीने टोमणा ह्यात नी दिवसभर दुसर्‍याची खिल्ली उडवणं आणि खिल्लीकरता बीबी वहावणं ह्यात फरक असतो.<<

लिहिणार न्हवतेच पण वरचा मुद्दा नीट वाचला असतास तर असे दात नसते काढलेस. आपली मतं तशीही आपण मांडतोच सार्वजनीक विषयावर पण मायबोलीवर अगदी अक्खा एक बीबीच उघडून किंवा कुठल्याही बीबीवर 'सतत' म्हणून दुसर्‍याची चेष्टा करणे ह्यावर आहे आणि तोच हेतू ठेवून लिहिणं हेच दिसते इथे. आता ह्याच्या पुढे कोणाला चेष्टाच करायची असेल तर करा. तेच काम आणि उद्देश आहे ह्या बीबीचा आणि काही लोकांचे. तेव्हा ह्यापुढे दुर्लक्ष केलेलेच बरे. म्हटलेच ना आधीच की टवाळानां विषय आहे हा फक्त.

आयला माझ्याच कवितेची (लाल हि कविता मीच लिहिली आहे.) मीच वाट लावली तर तुम्हाला फारच दु:ख झालंय वाटतं ... असो माझ्या कवितेवर तुम्ही इतकं प्रेम करता हे माहित नव्हतं. अहो नका इतकं मनाला लावून घेऊ. आपल्याला गम्मत सहन होत नसेल तर या बीबी वर न आलेलंच बरं... इथे टवाळक्या चालल्या आहेत. त्यात आपपर भाव आम्ही आणत नाही. असो....
अहो ! झक्की काका माझ्या कवितेबद्दल बोलले तर मला नाही ब्वॉ राग आला.... त्या दृष्टीकोनातून कविता पाहिली तर सगळ्या कवितांची टिगल उडवता येते.
मिल्याइतकं चांगलं विडंबन नाही जमत प्रत्येकाला म्हणून आम्ही आमचीही विडंबनं लिहूच नयेत की काय?
असो या बीबीवर टवाळ्या केल्या काय, मेलमधे केल्या काय, चॅटमधे केल्या काय, विपूमधे लावालावी केली काय... काय फरक पडतो... ज्याचा त्याचा दृष्टीकोन. हे टण्याच रंगीबेरंगी पान आहे त्याने खास टवाळक्या करायला बहाल केलेलं... त्याने माझ्या लिखाणावर objection घेतलं नाहीये अजून तरी. उद्या म्हणला इकडे नको लिहू नाय लिहणार त्यात इतकं वाईट बिईट काय वाटायचंय...
~~~~~~~~~

टण्याच्या खाजगी जागेत होळीची बोम्ब मारायची फुल्ल परमिशन हे त्याच्याकडून...
हेन्च्या पोटात का खुडबुड राव?
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

बग ना आता येखाद्याला भिती वाटती हारर मुवीची तर तेनं कशाला बगायचं त्ये..?
हा पन मंजी हारर मुवी काढाचीच नाय हे बराबर हुईल का..
आपलं रीदय वीक असेल तर आपन नाय जायच असल्या शिनुमाला..
~~~~~~~~~

आता ह्याच्या पुढे कोणाला चेष्टाच करायची असेल तर करा. >>>>> आता रोजच काही बाही नविन प्रकार पाहिले तर किती ही नाही म्हंटल तरी लोकांचा बांध (की बांधा??????) फुटतोच.. नाही का??? Lol

तेच काम आणि उद्देश आहे ह्या बीबीचा >>>>>> अगदी बरोबर.. ! त्यामूळे तुझ्या ता.क. नुसार तू ह्या बीबी कडे आणि माझ्या ह्या पोस्टांकडे दुर्लक्षच कर.. Happy

ए आदमा, का उगी लोकान्ला छळून रायलाय.
~~~~~~~~~

हे फाजील टवाळखोर...
अतृप्त आत्मे
टण्याच्या इवलाल्या
सोनेरी पंखांवर स्वार होऊन..
भयाण रंग उधळतात
उतु जाणार्‍या प्रतिभेचे...
पिंपळपारावर झोके घेत
एकेमेकांशी चाटींग करायचं सोडून....
फवारे मारत फिरतात
मत पिंकांचे....
आता एक मांत्रिक बोलवून
केलाच पाहीजे बंदोबस्त
काव्यपिंडाच्या गोळ्यांनी नाही भागायचे....
कुलुप-किल्लीचा पिंपच हवा
बाटलीत बंदिस्त करून
नाही भागायचे...
ह्या हडळी, हे मुंजे
ह्यांना पिंपस्थ करून
गुलमोहराला
मी एकटीनच झपाटायचे
एकटीनच झपाटायचे
झपाटायचे......

का उगी लोकान्ला छळून रायलाय. >>> स्वारी स्वारी मिन्वाज्जी.. आता नाही छळणार... Happy

मीनू तुम्ही माझ्या प्रतिसादमधे मधे लिहीलेले अगदी खरे आहे. अहो बहर फक्त 'चांगल्या' कवितांसाठी. नि माझी 'कविता(?!)' नक्कीच त्या लायकीची नाही असे बर्‍याच जणांचे मत आहे.

पण एकदा मी असे वाचले होते की "काव्य म्हणजे तीव्र भावनांचा अचानक झालेला उद्रेक" (Poetry is a spontaneous outburst of powerful feelings हे मूळ इंग्रजीतले आहे. इंग्रजीतले असल्याने सर्व मराठी लोकांना ते शिरोधार्य असणारच, असा माझा समज आहे.)

तर जर का माझ्या 'वैत्ताग' भावनेची तीव्रता मला जाणवली तर मी काही लिहीलेले आपोअपच काव्य होईल ना? अहो, संदीप खरे का सलील कुलकर्णी कुणितरी 'कंटाळा' या विषयावरच कविता लिहीली नि ती अत्यंत कंटाळवाण्या आवाजात म्हणतात असे मी ऐकले.

कदाचित् शोनू यांना हे समजले असावे, म्हणूनच त्यांनी ते सर्व चर्‍हाट इथे टाकले.

खरे तर त्यात काही अर्थ नसता तर लोकांनी त्याला 'अनुल्लेखाने मारले' नसते का? त्यावर एव्हढे उलट सुलट का? अहो, नुसता उल्लेख जरी केला की हे इथे शोभत नाही तरी विशिष्ठ गावचे अनेक लोक इथे येत असल्याने त्यांनी यावर 'का?, तत्वाचा प्रश्न, तुम्ही कोण मोठे शहाणे' असे बोलून वादंग माजवलाच असता, हे का कुणाला माहित नाही?

की माझे नाव पुढे करून अतृप्त आत्म्यांना स्वतः चीच टवाळक्या करण्याची हौस भागवून घ्यायची आहे? घ्या, घ्या. तेव्हढाच माझा समाजाला उपयोग. बाकी तर काही नाहीच आहे.

मृण्मयी, Lol महान आहे !!

  ***
  Real stupidity beats artificial intelligence.

  मृण्मयी आता कसं...? हे झकास..
  बघताय काय सामील व्हा असं पाहिजे... टवाळ गल्लीत आलं की टवाळक्या करायच्या... हे टवाळक्या म्हणुन नसतं तर तिथे कवितेतंच लिहीलं असतं की.. Lol
  ~~~~~~~~~

  मृ, Rofl

  टवाळ गल्लीवरून माझी काव्यप्रतिभा फुरफुरू लागलीये पण आत्ता राहूदेत.. पळायचंय एका मिटींगसाठी. रात्री टाकते...
  -नी
  http://saaneedhapa.googlepages.com/home

  मृण्मयी! Lol पिंपस्थ>> कैच्या कैच! Biggrin

  मृण्मयी.. Lol

  इथे अश्या अतृप्त आत्म्या सारख्या टवाळक्या करण्या एवजी खरोखर सुंदर काव्य लिहा>>>

  आयला, कमाल आहे. ही आम्ही लिहिलेली काव्ये आम्हाला तर 'सुंदरच' वाटताहेत. तुम्हाला वाटत नाहीत तिथे आम्ही काय करणार? पण खरं तर तुम्हाला सुंदर वाटणार नाहीत या संशयापोटीच त्या आम्ही 'तिथं' न टाकता 'इथं' टाकत आहोत, अन आमचे आत्मे तृप्त करून घेत आहोत. आता इथं आम्ही तुमची सोयच नाही का बघितली?

  आणि मिल्या 'चांगल्या' कवितांची विडंबने करतो. आता आमच्यासारख्या एखाद्याला चांगले काही नाही सापडत तर काय करणार? मग आम्ही आमच्याच कवितांची विडंबने करतो, किंवा जमेल तशी बडबड करतो. पण इतरांना त्रास होऊ नये म्हणून इथं- म्हणजे तुम्ही बहिष्कृत केलेल्या जागेत करतो. तर इथं आमचे आम्हाला सुखी राहू द्यावे की नाही? पण नाही. इथंही आलातच तुम्ही आम्हाला शिकवायला..!

  काय पब्लिक हाय राव. पायी चालू देत नाही, नि गाढवावरही बसू देत नाही.

  --
  कवितांनो, ललितांनो, आता बस! एक या दो, बस्स बस्स!!

  मृ बेश्ट काव्य.. Proud

  पायी चालू देत नाही, नि गाढवावरही बसू देत नाही. >>>> Lol

  >>> पायी चालू देत नाही, नि गाढवावरही बसू देत नाही. << Lol

   ***
   Real stupidity beats artificial intelligence.

   हसून हसून खल्लास. झक्की,मृ,मीनू,मंदार. Wink

   आयला???? हे टणटण्याच्या रन्गिबेरन्गी मधल पान आहे होय?????
   इतके दिवस मला माहितच नव्हत हे!
   (तरीच, मागे एकदा मी इथे पोस्टल्यावर दस्तुरखुद्द टण्याने माझ्या विपु मधे येऊन "चौकशी" केली होती Proud )

   ...

   आयला???? हे टणटण्याच्या रन्गिबेरन्गी मधल पान आहे होय????? >>> लिंबू Lol

   चुकलं...
   टण्याचं पान नाही पण त्याच्या गुलमोहर पोस्टचं पान आहे ना? आणि त्यानेच इथे येऊन बोम्ब ठोका म्हणून सांगितलंय. तर बाकीच्यांच्या पोटात का खडबडावं?
   -नी
   http://saaneedhapa.googlepages.com/home

   Pages