बहर गुलमोहराचा

Submitted by टवणे सर on 10 November, 2008 - 12:40

गडावरील अजरामर कवींनी आज केलेल्या कविता पाहोनी आमचे डोळे तृप्त जाहले. पण त्यातील काही कविता आधीच वाहून गेल्या असे समजले. तरी उरलेल्या कविता वाहून जाउ नयेत म्हणुन हा प्रयास. तिथल्या कविता मी इथे छापतो आहे. मूळ कवींनी आपापली कविता मग इथेच खाली पेस्ट करावी. नंतर ही पोस्ट एडिट करेन म्हणजे मालकीहक्क कायद्याचा भंग होणार नाही. वाहून गेलेल्या कवितांच्या मालकांना जर त्या लक्षात असतील तर त्या इथे पोस्टून आमचे देखील प्रबोधन करावे..

तर आजच्या सर्वोत्कृष्ट कवितेने सुरुवात करुया:

*********************
अरभाटः
मागल्या दिवसाचा संताप अन दु:ख
अवहेलना, निराशा व नकार
यांचा बघत असता
जमिनीवर पसरलेला निचरा
आगामी विदग्धतेची चाहूल लागते
जेव्हा आसमंतात घुमते आवाहनात्मक हाक.......
"बाईsss, कचराsss"

*********************

मीनु:
दादा देतो दणका
दुखुन येतो मणका
दोघं मिळून खातो आम्ही
भाकरीबरोबर झुणका
दादा जातो कालेजात
पुस्तकं मात्र घरात
म्हणतो नको दिसायला
खोट मुळी तोर्‍यात
दादा चालवतो बाइक
वर म्हणतो माझं आइक
आपल्याला काय
लाच दिली की आपण त्याचे पाइक.

*********************

माता:

दीपिका पडुकोणच्या बहिणीने लिहिलेली कविता.

ताई माझी रुपवान,
जशी लावण्याची खाण.
उंची केवढी हो तिची,
पाहता दुखते मान.
ताई घालते ड्रेस,
फॅशनेबल अति अति.
कपाट तिचे उघडिता,
अबब! ड्रेस किती?
ताई घालते पायांत
बूट उंच टाचांचे.
तिला फारच शोभती
बूट नाजूक काचांचे.
ताई करते कॅटवॉक,
एक हात कमरेवर.
सर्व लोक गं म्हणती,
जशी परी धरेवर.
ताई गेली सिनेमात,
तिथे भेटे रणबीर.
ताईच्या नखाचीही,
त्याला मुळी नाही सर.

*********************

गजानन देसाई:

सोमवारचा शाप

लांबुडका गोल
एक डोंगर

छिद्र त्यास
एका सोंडेस

त्यातून गोवली
बलदंड शृंखला

खडखड .... .... (मंदशी)
जीव दडपून जाय

रवीच्या ढळत्या निशी
दिली पायात जोखडून

*********************

पुन्हःश्च मीनु:

ती पोळेवाली बी
माझ्या गुलाबाच्या
झाडाची पानं
खुशाल तोडून नेते
ती पोळेवाली बी
तीला एक छोटी सोंड
सोंड कसली कात्रीच ती
नीट लायनीत कापते.
ती पोळेवाली बी
मग कधी तरी
खाते फटका
जुन्या वर्तमानपत्राचा

*********************

वरील कवितेवर एकापाठोपाठ एक खालील दोन प्रतिक्रिया आल्या:

@मीनु...

छान कविता होती...:ड
**************

@मीनु...

छान कविता आहे...:-प
*********************

आणि मीनु यांना अजुन एक कविता स्फुरली:

एकदा भुतकाळ
एकदा वर्तमानकाळ
जीडीच्या कवितांना नाही चाल

एकदा ड
एकदा प
अंगावर पडते प्रतिक्रियेची पाल

एकदा बरं
एकदा वा!!
दिपीकाच्या गालाला रणबीरचा गाल

*********************

पुन्हा एकदा मीनु:

कवितेचं नाव आहे 'ओळखा पाहू'

काका माझा होतो भुवन
काका कधी असतो मंगल
काकाच्या बोलांनी
का होते मोठी दंगल?
काका आपल्याच नादात मग्न
काकाची होतात दोन्दोन लग्न
काका कापतो केस बारीक
काका खातो रोज खारीक
काका बोलतो विचार करुन
काका अस्सा माझा छान
काका कोण? मी कोण?

*********************

हीच कवितेची बाधा आजुबाजुच्या बाफंना होउन, मृण्मयी ह्यांनी पाडलेली कविता:

इथे कुणालाही दुखवायचा हेतु नाही
आणि मनं जोडणारा कवितेसारखा सेतु नाही

काव्य स्फुरायला मदतीची अपेक्षा नाही
पण माझं गद्य वाचण्याखेरीज दुसरी कठोर शिक्षा नाही.

*********************

आणि सरते शेवटी, फूल ना फुलाची पाकळी म्हणुनः

जळे तयांची काया
ज्यांनी कविता केल्या
सृजनाच्या अमूर्ताला
शब्दांचा साज दिला

का जळजळते तुम्हाला
की वाचण्यास दाम मोजला?
आम्ही लिहितो, आम्ही वाचतो
कौतुक का बघवेना तुम्हाला

मनाच्या क्षतांतून
'मंद'सा तरंग पसरला
चक्षूच्या सीमा ओलांडून
रवीचा चंद्र झाला

असेल विषय तोच पुन्हा
पण रोज नवा साज दिला
कागद फुकट मिळाला
म्हणुन दिसामाजी रतीब घातला

*************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऐकाSSSSS होSSSSSS ऐकाSSSSSS
जेष्ठ आणि श्रेष्ठ असे विद्रोही कवि श्रीयुत स्लार्टी हे आपला पुढील जीटीजी त्यांच्या उपस्थितीने सुशोभित करणार आहेत हो. कविवर्य स्लार्टी यांच्या मुखातून त्यांच्याच नादखुळा आणि डार्लिंग या दोन नोबल पारीतोषिक विजेत्या कवितांचे वाचन ऐकायला मिळणार असल्याने हा @#$%^& योग कुणीही चुकवू नये हो SSSSSSSSSSS

त. टी. @#$%^& या विशेषणाचे वाचनही श्रीयुत स्लार्टी करुन दाखवतील. Lol
~~~~~~~~~

अहो रैना, नीधप, तुम्हाला इथे माझी आठवण यायचे काय कारण? हा काय अतृप्य्त आत्म्यांचा टवाळक्या लिहीण्यासाठी उघडलेला बा. फ. आहे का? आता खरेच जर प्रूथ्वीवर कविता करायला विषय राहिले नसतील (मला तसेच वाटते) तर कवितांच्या विषयांवर कविता करायला सुरुवात करू. (म्हणजे तुम्ही करा). एक अट, फक्त शीर्षक वापरायचे.

नाहीतर 'एकदा ड, एकदा प' अश्या अर्थगर्भ ओळीं किंवा 'प्रतिक्रियेची पाल' असले संकेत चोरतील लोक.

झक्की,
आता तुमच्यावरच कविता करावी लागेल.. हा पृथ्वीतलावरचा विषय राह्यलाच होता कवितेसाठी...
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

करा, करा. झक्कीवर करा! तुमच्यासारख्यांनी माझ्यावर कविता करावी हा मी माझा अत्यंत मोठा गौरव समजतो. पण तुमची उत्तुंग प्रतिभा अश्या नगण्य विषयावर का वाया घालवता?
त्यासाठी मीच आहे की.

तुमच्यासारख्यांनी माझ्यावर कविता करावी हा मी माझा अत्यंत मोठा गौरव समजतो. >> मला हे वाचुन झक्की हे "धुमधडाका मधील शरद तळवळकर " असेच डोळ्यासमोर येत आहेत.. Happy

उत्तुंग प्रतिभावाले आम्ही नाही काही..
आम्ही आपले काव्यउबळ वाले.
ते सगळे दा असतात ना ते उत्तुंग प्रतिभावाले!
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

श्रद्धा, धन्य आहेस ग बाई !!!

मीनु, नीधपदी ... खिखिखि

मजा आली वाचुन.
...तु सब्र तो कर मेरे यार....
-प्रिन्सेस...

थांबवा रे थांबवा
ही टवाळकी थांबवा
कविता म्हणजे मूल माझे
वेलीवरचे फूल माझे
नका करू निंदा त्याची
रूप तुमचे ना तुमच्या हाती
देवेच्छा जशी ते चेहरे घडती
करतो आपण चेष्टा कधी का
रूपरंगावरून त्याच्या?

का बरे मग करता निंदा
कवितेची माझ्या
नसेल यमक, नसेल गेयता
तरीही असते अलवार भावना
अनावर भावना
असतो विषय नवीनतम
अन अगदी ताजा
(आम्ही पेपर वाचतो
अगदी रोजचा!)

कवितेला निबंध म्हणता
राजहंसाला कावळा म्हणता?
निबंधात वाक्ये सलग लिहितात.
इथे ती तोडावी लागतात.
अशी तोड महानच खरी
तुम्हास काय त्याची मातब्बरी

असो शेवटी इतकेच उरते
टिकेची झोड अशीच सरते
टवाळा आवडे विनोद
म्हणून गेले कुणी संत
तसेच तुम्ही आत्मे महंत...
म्हणून कुणी संत गेले...
आत्मे ते अतृप्त झाले...
(संत ला अतृप्त हे यमक जुळतंय ना हो दा?)

(वरील कविता मनात कारूण्य एकवटून शक्य तितक्या करूण पद्धतीने वाचावी म्हणजे यातली सानुली, हळवी भावना तुमच्यापर्यंत पोचेल..)

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

निघपदी... परत एकदा तोडलत.. !!

हा बदल कसा वाटतोय बघा बरं?

म्हणून गेले कुणी संत
तसेच तुम्ही आत्मे महंत...

किंवा हे कसं वाटयत??

म्हणून कुणी संत गेले...
आत्मे ते अतृप्त झाले...

अर्थातच हा बदल तुमची माफी मागूनच सुचवतोय... जर ह्यातून तुमचा उपमर्द झाला असेल तर मोठ्या मनानी माफ करा...

अडमदा,
आपण सुचवलेला बदल अतिशय योग्य आहे. आणि तो मी लगेच करत आहे.
तुमच्यासारखे जागरूक रसिक वाचक असल्यावर अजून काय पाह्यजे!!

Wink
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

अडमदा >>> Rofl

टण्यादा दिसत नाहीत हल्ली कुठे??? Proud

निधपदी डोळे पाण्याने आणि मन करुणेनं भरुन गेलंय आता या अशा हळव्या अवस्थेत जगाची रुक्ष कामे कशी करावीत दिवसभर...
काळजावर दगड ठेवून कामाला लागते बरं... (मूसमूसणारी मी..)
~~~~~~~~~

काय कविता आहेत??
मायबोलीवर येऊन सकाळ सकाळ धन्य झाले मी. तुमच्यासारखे अनंत प्रतिभावान लोक असताना मराठी साहित्याचे भविष्य उज्ज्वल आहे. तुम्ही एक् कविता संग्रह का काढत नाही? काढला तर मी सर्वात आधी विकत घेइन.

--------------
नंदिनी
--------------

मीनूदी तूच गं तूच...
अश्या कारूण्यमय आणि हळव्या भावना समजायला तसं हृदयही लागतं.
यांच्याकडे नसतंच ना ते त्यामुळे ते अश्या टिका करतात.. जाउदेत आपण काय करणार त्याला..
तू दुख्खी नको होऊ..
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

मीनू,

तुमच्या "meenu | 8 एप्रिल, 2009 - 19:40 " ह्या पोस्टच्या संदर्भात....

हा जीटीजी सार्वजनिक आहे की केवळ खाजगी वर्तुळासाठी मर्यादित आहे? तो सार्वजनिक असेल तर कृपया 'माझ्या शहरात' च्या सर्व बीबींवर जाऊन ह्याची घोषणा करावी आणि तो खाजगी वर्तुळासाठी मर्यादित असेल तर कृपया सर्वांना खलिते धाडावेत ही नम्र विनंती Wink

नीधपदी मी झक्कींवर कविता करायला घातलीये... लवकरच टाकते. तुझी सजेशन आधीच लिही गं Happy
मा. मंजू, तुम्हाला कुठे कोणता प्रश्न विचारावं याचं भान उरलं नाही. तुम्ही खाजगीत हा प्रश्न विचारावात आणि मी 'खाजगी' असं उत्तरही देईन न घाबरता.. Wink
असो सध्या मा. कवि स्लार्टी हे ह्या कवितेचं वाचन करण्याची तयारी करत आहेत. नुकतंच त्यांनी काही नादोच्चारण तज्ञांशी सल्ला मसलत सुरु केली असल्याचे कळते. कोणत्या नादावर किती आघात करावा असे काही महत्त्वाचे मुद्दे चर्चेत आहेत. नादोच्चारणाचा पेच संपताच ह्या जीटीजीची योग्य दवंडी योग्य पद्धतीने पिटण्याचा मानस आहे. Happy
~~~~~~~~~

निधप (दी म्हणू का इथे?) सांग गं सांग... Wink वाट पहाते.

~~~~~~~~~

आज मायबोलीच्या पान क्र. २ वरची लिस्ट चाळताना एका मागो माग एक दिसलेल्या एन्ट्र्या...कसा विसरू...बसतेस पाहात जेव्हा..निवांत मोर्...प्रेमात पडावे पण... अंतर राखून Happy

प्रेमात पडावे पण... अंतर राखून >>>
ट्रकच्या मागे पण शोभेल. Proud

आज पुपुवर केपीकाकांनी विचारलेल्या फरक स्पष्ट करा ह्या प्रश्नाचे मी दिलेले उत्तर..

खरबुज (पिवळे व आतुन लाल किंवा हीरवे विंग्रजीत मेलन) व टरबुज (आपले कलिंगड हो विंग्रजीत वॉटरमेलन)

'रबुज' हा शब्द दोन्ही कडे सारखाच असल्याने दोन्ही गोष्टी फोडण्याची पद्धत एकच आहे... पण ख अक्षर हे पोटात सुरी खुपसल्यासारखे असल्याने सुरी वापरतात तर ट अक्षर विळ्यासारखे दिसत असल्याने विळा वापरतात..

टरबुज.. आणि विळा ह्यांची घष्टन असल्याने ते साम्यवादी पक्षांमध्ये अत्यंत प्रिय आहे.. आणि त्यांच्या सगळ्या किटी पार्टीज् मध्ये ते हमखास मिळते तर खरबुज हे विविध रंगी असल्याने बाकीच्या पार्ट्यांमध्ये त्याचा वावर असतो..

तसेच मराठीत जसा ख च्या ऐवजी ट आला आहे. तो तसाच रहावा म्हणून विंग्रजीत वाटर हा शब्द जोडला आहे..

लोकांची बुज राखणारी फळे म्हणून त्यांच्या शेवटी बुज जोडले आहे.. पण 'खरबुज' लोकांची खरी खुरी बुज राखतो तर 'टरबुज' लोकांची टर उडवत बुज राखतो.

खरबुजाचा आकार टरबुजाच्या मानाने लहान असतो त्यामुळे ते गोर गरिबांचे फळ आहे तर टरबुज हे अतिश्रीमंतांचे फळ आहे..

खरबुज आतून पोकळ असल्याने 'बडा घर पोकळ वासा' असलेल्या लोकांना त्याचा काहीच उपयोग होत नाही.. तर टरबुज कधीच आंबट नसल्याने कोल्ह्याला ते कधीच आवडत नाही.

त.टी. ह्या उत्तराला ५ पैकी ३ च मार्क मिळणार असल्याची खात्री असल्याने एवढेच फरक लिहिले आहेत..
=========================
नूतन वर्षाभिनंदन..

slarti | 15 एप्रिल, 2009 - 17:42
टरबूज हा शब्द ट पासून सुरू होतो. टरबुजातून कधीकधी जटायु बाहेर येतो असे कुलकर्णी गुर्जींनी आम्हाला शिकवले आहे. आमच्या टरबुजातून बिया बाहेर येतात, त्या खाल्या तरी त्या बाहेर येतातच. बिया किडक्या असल्या की आम्ही आमच्या अंगणात पेरत नाही, कारण त्या पेरल्या की त्यातून गझलेला वरुक्ष बाहेर येतो असे आमच्या वैनी सांगतात. किडक्या बिया आम्ही आमच्या शेजारी राहणार्‍या दा-दादाला देऊन टाकतो.
.
खरबूज हा शब्द ख पासून सुरू होतो. ख हे व्यंजनांमधले दुसरे अक्षर आहे. व्यंजने आणि स्वरे हे मिळून वर्णमाला तयार होते, असेसुद्धा आम्हाला कुलकर्णी गुर्जींनी शिकवले. पण मी सलागरे गुर्जींना म्हणालो की तुमचे आडनाव स-वर्णापासून सुरू होते तर सलागरे गुर्जींनी मला फोडून काढले. सर्व गुर्जी गंडलेले आहेत.
.
टरबूज एक्साजेबल कमोडिटी नाही. पण खूप खाल्ले तर एक्साईटेबल कमोड होते असे आम्हाला मासे आणून देणारा तान्याकोळी म्हणतो. म्हणजे काय ते कळत नाही. तान्याकोळीला जटायु मुळीच आवडत नाही. त्याला खरबूज मात्र आवडते. कधी कधी तो खाजवून खरबूज काढतो, मग आम्हाला मजा येते.
.
मला खरबूज आणि टरबूज दोन्ही आवडतात.

मृ दीं ची बहराला आजची ओंजळ
>>ढेमसांबद्दल एव्हढी चर्चा वाचून अजून एक वैदर्भीय अक्का कशा आल्या नाहीत ???
वाटलं होतं वैदर्भीय सुना हुश्शार असतील. ढेमस महात्म्य सांगतील. पण कसलं काय!
बरं ढेमस म्हणजे ढेणुस असं वाटतं. खिमा भरून केलेली आईच्या हातची ढेणसं फ्येमस हाएत..

अडकीत जाऊ खिडकीत जाऊ
खिडकीत होतं ढेमस
खिमा भरून भाजी केली
झाली लई फ्येमस.

तर आज अडकीत जाऊ मूडमधे आणखी काही पार्लेबाफकरांना समर्पित:

अडकीत जाऊ खिडकीत जाऊ
खिडकीबाहेर गुलमोहर
मायबोलीला कवी झाला
नाव ठेवा 'कहर'...

अडकीत जाऊ खिडकीत जाऊ
खिडकीत होतं काटोळं* (?)
आले आले कंपु आले
जी टी जीचं वाटोळं....

अडकीत जाऊ खिडकीत जाऊ
खिडकीत पेरले मूग
सुगरणींनी सल्ले दिले
नाही दुसरे उद्योग....

अडकीत जाऊ खिडकीत जाऊ
खिडकीतून डोकावतो डु आय
पोस्टी टाकता बिंग फुटले
बाई का बाप्या कळले काय?

अडकीत जाऊ खिडकीत जाऊ
खिडकी करा बंद
रिकामटेकड्या पार्लेकरांनो
बाळगा दुसरे छंद..

*कर्टुल्याला काटोळं म्हणतात असं मायबोलीवरच वाचलंय!

धन्यवाद शोनू. किती पटकन सापडलं तुला हे पान. (होमपेज आहे का? Proud )

अ‍ॅडमिनने खर तर माबोवरचे हवे ते पान आपल्या खात्यात बुकमार्क करायची सोय करायला हवी. म्हणजे मग पटकन सापडेल हवे ते पान.:हो की नाही मृ. Happy

tanyabedekar | 20 एप्रिल, 2009 - 14:53
बालसाहित्य असा विषय आहे, पण टण्या, क्ष, श्रद्धा हे त्यातून प्रौढसाहित्य काढत आहेत
>>>
बालसाहित्याचा मुख्य उद्देश हा प्रौढशिक्षण असाच असतो. फक्त तो मधाच्या आवरणाने भरवला जातो (सं: केप्याला आठवलेले भाजलेले करडु व मधाच्या वड्या). शालेय शिक्षणाचा देखील असाच हेतु असतो. ह्याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे ट्रिग्नॉमेट्री. आता काही थोडे लोक सोडले तर ट्रिग्नॉमेट्रीचा उपयोग सामान्य माणुस आपल्या आयुष्यात कधीच करत नाही. पण तरीही ९-१०वी मध्येच ट्रिग्नॉमेट्री सगळ्यांना (मुले-मुली सर्वांनाच) का शिकविली जाते ह्यामागे फार मोठा उदात्त हेतु आहे. आठवा ट्रिग्नॉमेट्री शिकवताना वापरले जाणारे कोन.
३० - स्मॉल
६० - लार्ज
९० - पतियाला
१८० - क्वार्टर
३६० - अध्धा
७२० - खंबा

मेरा भारत महान.

Pages