बहर गुलमोहराचा

Submitted by टवणे सर on 10 November, 2008 - 12:40

गडावरील अजरामर कवींनी आज केलेल्या कविता पाहोनी आमचे डोळे तृप्त जाहले. पण त्यातील काही कविता आधीच वाहून गेल्या असे समजले. तरी उरलेल्या कविता वाहून जाउ नयेत म्हणुन हा प्रयास. तिथल्या कविता मी इथे छापतो आहे. मूळ कवींनी आपापली कविता मग इथेच खाली पेस्ट करावी. नंतर ही पोस्ट एडिट करेन म्हणजे मालकीहक्क कायद्याचा भंग होणार नाही. वाहून गेलेल्या कवितांच्या मालकांना जर त्या लक्षात असतील तर त्या इथे पोस्टून आमचे देखील प्रबोधन करावे..

तर आजच्या सर्वोत्कृष्ट कवितेने सुरुवात करुया:

*********************
अरभाटः
मागल्या दिवसाचा संताप अन दु:ख
अवहेलना, निराशा व नकार
यांचा बघत असता
जमिनीवर पसरलेला निचरा
आगामी विदग्धतेची चाहूल लागते
जेव्हा आसमंतात घुमते आवाहनात्मक हाक.......
"बाईsss, कचराsss"

*********************

मीनु:
दादा देतो दणका
दुखुन येतो मणका
दोघं मिळून खातो आम्ही
भाकरीबरोबर झुणका
दादा जातो कालेजात
पुस्तकं मात्र घरात
म्हणतो नको दिसायला
खोट मुळी तोर्‍यात
दादा चालवतो बाइक
वर म्हणतो माझं आइक
आपल्याला काय
लाच दिली की आपण त्याचे पाइक.

*********************

माता:

दीपिका पडुकोणच्या बहिणीने लिहिलेली कविता.

ताई माझी रुपवान,
जशी लावण्याची खाण.
उंची केवढी हो तिची,
पाहता दुखते मान.
ताई घालते ड्रेस,
फॅशनेबल अति अति.
कपाट तिचे उघडिता,
अबब! ड्रेस किती?
ताई घालते पायांत
बूट उंच टाचांचे.
तिला फारच शोभती
बूट नाजूक काचांचे.
ताई करते कॅटवॉक,
एक हात कमरेवर.
सर्व लोक गं म्हणती,
जशी परी धरेवर.
ताई गेली सिनेमात,
तिथे भेटे रणबीर.
ताईच्या नखाचीही,
त्याला मुळी नाही सर.

*********************

गजानन देसाई:

सोमवारचा शाप

लांबुडका गोल
एक डोंगर

छिद्र त्यास
एका सोंडेस

त्यातून गोवली
बलदंड शृंखला

खडखड .... .... (मंदशी)
जीव दडपून जाय

रवीच्या ढळत्या निशी
दिली पायात जोखडून

*********************

पुन्हःश्च मीनु:

ती पोळेवाली बी
माझ्या गुलाबाच्या
झाडाची पानं
खुशाल तोडून नेते
ती पोळेवाली बी
तीला एक छोटी सोंड
सोंड कसली कात्रीच ती
नीट लायनीत कापते.
ती पोळेवाली बी
मग कधी तरी
खाते फटका
जुन्या वर्तमानपत्राचा

*********************

वरील कवितेवर एकापाठोपाठ एक खालील दोन प्रतिक्रिया आल्या:

@मीनु...

छान कविता होती...:ड
**************

@मीनु...

छान कविता आहे...:-प
*********************

आणि मीनु यांना अजुन एक कविता स्फुरली:

एकदा भुतकाळ
एकदा वर्तमानकाळ
जीडीच्या कवितांना नाही चाल

एकदा ड
एकदा प
अंगावर पडते प्रतिक्रियेची पाल

एकदा बरं
एकदा वा!!
दिपीकाच्या गालाला रणबीरचा गाल

*********************

पुन्हा एकदा मीनु:

कवितेचं नाव आहे 'ओळखा पाहू'

काका माझा होतो भुवन
काका कधी असतो मंगल
काकाच्या बोलांनी
का होते मोठी दंगल?
काका आपल्याच नादात मग्न
काकाची होतात दोन्दोन लग्न
काका कापतो केस बारीक
काका खातो रोज खारीक
काका बोलतो विचार करुन
काका अस्सा माझा छान
काका कोण? मी कोण?

*********************

हीच कवितेची बाधा आजुबाजुच्या बाफंना होउन, मृण्मयी ह्यांनी पाडलेली कविता:

इथे कुणालाही दुखवायचा हेतु नाही
आणि मनं जोडणारा कवितेसारखा सेतु नाही

काव्य स्फुरायला मदतीची अपेक्षा नाही
पण माझं गद्य वाचण्याखेरीज दुसरी कठोर शिक्षा नाही.

*********************

आणि सरते शेवटी, फूल ना फुलाची पाकळी म्हणुनः

जळे तयांची काया
ज्यांनी कविता केल्या
सृजनाच्या अमूर्ताला
शब्दांचा साज दिला

का जळजळते तुम्हाला
की वाचण्यास दाम मोजला?
आम्ही लिहितो, आम्ही वाचतो
कौतुक का बघवेना तुम्हाला

मनाच्या क्षतांतून
'मंद'सा तरंग पसरला
चक्षूच्या सीमा ओलांडून
रवीचा चंद्र झाला

असेल विषय तोच पुन्हा
पण रोज नवा साज दिला
कागद फुकट मिळाला
म्हणुन दिसामाजी रतीब घातला

*************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवा... SDM साठी २ वेगळे बीबी आहेत रे.. तिकडे टाक हे पोस्ट... शोनूने फक्त वाहून जाऊ नये म्हणून स्लार्टीचं पोस्ट इथे चिकटवलय... त्यावरची चर्चा तिकडेच करा... Happy

ह्याची सुरुवात चिनू(क्स) ह्याने टाकलेल्या जीटीजी च्या पोस्टमुळे झाली..

himscool | 4 मार्च, 2009 - 14:34
बाकी त्या हॉटेलच नाव वाडेश्वर का??>>>
हॉटेलच नाय रे चिन्या.. त्या फूटपाथचे नाव वाडेश्वर आहे.. आणि एकूण दोन ठिकाणी आहे तो फूटपाथ..
आता रशियन मध्ये फूटपाथला हॉटेल म्हणत असतील तर माहिती नाही बरं का..

chinya1985 | 4 मार्च, 2009 - 14:40
त्या फूटपाथचे नाव वाडेश्वर आहे..
आं??????????अरे डेक्कनच्या वाडेश्वराबद्दलच बोलताय ना तुम्ही???

SAJIRA | 4 मार्च, 2009 - 14:45
डेक्कनच्या वाडेश्वराबद्दलच बोलताय ना तुम्ही??? >>>

नाही, नाही. फुटपाथबद्दलच बोलतोय. तू कोणत्या हॉटेलाबद्दल बोलतोयस?
आणि माबोकरांचा गोंधळ बघून हॉटेलात कोणीच घेत नाही त्यांना. फुटपाथवरनंच कटा म्हणत्यात.

chinya1985 | 4 मार्च, 2009 - 14:47
फुटपाथबद्दलच बोलतोय.
हा फुटपाथ कुठे आहे??

kuldeep1312 | 4 मार्च, 2009 - 14:48
माबोकरांचा गोंधळ बघून हॉटेलात कोणीच घेत नाही >>> असय का? मग एक्झ्याक पैकी हॉटेलच काढूया काय?

SAJIRA | 4 मार्च, 2009 - 14:52
तो फुटपाथ ना, हनूमान टेकडी, वेताळ टेकडी अन तळजाई टेकडी यांच्या बरोबर मध्ये एक कृष्णविवर आहे. तर, त्या विवराच्या भोवती गोलाकार ट्रॅक केला आहे, तोच हा फुटपाथ. तिथे सगळी रिकामटेकडी मंडळी, पक्षी माबोकर जमतात अन आफ्रिकन गोंधळ घालतात.

इथे एक उत्खननतज्ञ-कम-कुडमूडे शास्त्रज्ञ आहेत, ते अधिक माहिती सांगू शकतील.

chinya1985 | 4 मार्च, 2009 - 14:55
च्यायला,तुम्ही हॉटेलबद्दलच बोलताय्.मागच्या गेटुगे च्या माहिती अहवालात हॉटेलबद्दल्,वेटरबद्दल माहीती होती.

SAJIRA | 4 मार्च, 2009 - 14:59
चिन्या, तुझा गैरसमज झालाय. जीटीजी न करताही रिपोर्ट टाकणारे समंध लोक आहेत इथे, माहितीये ना?

अन त्या वेटरबद्दल म्हणशील, तर मागे त्या कृष्णविवराभोवती मागच्या अमावस्येला आम्ही हुलाला नाच करून एका पुजार्‍याला नैवेद्य म्हणून भाजलेली कोंबडी आणायला सांगितली होती, त्याला हे लोकं 'वेटर' म्हणताहेत.

chinya1985 | 4 मार्च, 2009 - 15:03
हम्म्म्म........
आम्ही काय खडकी-दापोडीवरुन आलेलो नाहिये!!
बाकी मुळ प्रश्न हा आहे की त्याला वाडेश्वर का म्हणतात???

himscool | 4 मार्च, 2009 - 15:19
चिन्या, तुला हे माहित नाही काय की सध्या पुण्यात फूटपाथवरच बरीच हॉटेले चालतात. आणि ते फूटपाथ त्याच नावानी ओळखले जातात...
हा जो वाडेश्वरचा फूटपाथ आहे ना.. त्याच्यावरुन सरळ चालत पुढे गेलास ना की रुपाली नावाचा एक फूटपाथ लागतो.. तिथे म्हणे उत्तप्पा आणि डोसा फार्च चांगला मिळतो.. आणि समोरच्याच गल्लीतील असलेल्या.. महान विद्यालयातील विद्यार्थी ह्या फूटपाथवर संदिप असतात...

तसाच पुढे गेलास की पाच पावलावरच आम्रपाली नावाचा अजून एक फूटपाथ लागतो तो पण एकदम भारी आहे.. तिथे पंजाबी लोकांच्या आवडीचे जेवण फारच चांगले मिळते. आणि ते महाग पण चांगलेच असते..

तिथेच पुढे दोन पावलावर एक बाकडे आहे स्नोबॉल नावाचे... सॉफ्टी फार्च उहच्च... पण बाकडे असल्यामुळे फार अडचण होते तिथे.. त्याच्या बरोबर समोर अजून एक असेच बाकडे आहे.. तिथे पण खूप गर्दी असते... समोरच्याच बाजूलाच शेजारीच.. एक जरा चांगले नॅचरल्स बाकडे पण आहे.. तिथे आइसकँडी खातना एकदम निसर्गात गेल्या सारखे वाटते..

ह्या नॅचरल्सच्या बाकड्याच्या शेजारी.. एक अमेरिकेतले स्टूलपण आहे. सब वे म्हणतात त्याला.. सगळे रस्ते त्या एकाच स्टूलवरुन कसे काय पार होतात देवालाच ठावूक. त्याच्या शेजारीच.. एक पेशल बरिस्ता कोच आहे.. काफी काय म्हणतात ते प्यायला त्या कोचवर जातात.. आणि कोचाची किम्मत एकदम छप्पर्फाड आहे... त्याच्याच शेजारी एक भारतीय कोच सीसीडी पण आहे.. तिथे तर कोचावर कोण बसणार ह्यावरुन प्रचंड मारामारी असते.. ती गर्दी पार रस्त्यावर येते आणि सारखा जाम खायला लागतो..

तिथेच पुढे पावभाजीचा कट्टा आहे.. तिथे पूर्वी काफी पण मिळायची पण आता बंद केली म्हणतात.. पण मसाला पाव मस्त लागतो कट्ट्यावर बसून खायला..

ह्या कट्ट्याच्या जरा अलिकडे गल्लीत अजून एक मोठा फूटपाथ आहे.. त्याला तर दोन बाजूंनी रस्ते आहेत... ह्या कट्ट्याच्या बरोबर समोर मात्र एक खूपच मोठा वैशाली फूटपाथ आहे.. तिथे सदासर्वकाळ गर्दीच असते... उभे रहायला पण जागा देत नाहीत.. पाय दुखायला लागतात बसायला जागा मिळेपर्यंत...

=========================
रस्त्याने जाताना वाटेत नाचत मासे पाहत थांबू नये...

आज "देवाने मुलींना असं का बनवलं?" या कवितेवर केदार१२३ ने केलेले विडंबन
kedar123 | 5 मार्च, 2009 - 16:33 नवीन
देवाने माश्यांना अस का बनवल?
की बघताच मन पत्येकीवर चिडायच
सगळ्याच मेल्या नकोनकोश्या वाटायच्या
मग कोणा एकीच्याच ताटात का पडायच?

कोणाचे पाय, तर कोणाचे पंख
प्रत्येकीची काहीतरी वेगळीच गुणगुण
दरीद्री मेली एका जागेवर बसत नाही
पाहताच वाजु लागते आजाराची धुन

कोणी गुणगुणून नकोस करत
कोणी लाजुन पांघरूणात शिरत
प्रत्येकीची खुबी निराळीच असते
मग आपली निद्रा कुठे आपल्याजवळ उरते

कोणी गूणगुणून गार करत
कोणी भुण्भूणून वार करत
किती अदा त्रासवण्याच्या असतात
मन हे वेडे प्रत्येक नखर्‍यात फसत

कचर्‍यातल्याही माशा कमाल करतात
नकोनको म्हणताना तोंडावर येऊन बसतात
कोणाकोणाला नजर द्यावी
एकसाथ सर्वच नाका तोंडाला घेरतात

(चु भू द्या घ्या ) Light 1
_______________________________
Rofl
----------------------
एवढंच ना!

दरीद्री मेली एका जागेवर बसत नाही
पाहताच वाजु लागते आजाराची धुन
कोणी गूणगुणून गार करत
कोणी भुण्भूणून वार करत
Lol सही आहे.

  ***
  Entropy : It isn't what it used to be.

  केदार, हसुन हसुन मरायची पाळी Lol

  आज मायबोलीवरील कविता वाचून मायबोलीवरील जुन्याजाणत्या मायबोलीकरीण ती.स्व. मीन्वाज्जींनी एक कविता पाडली. ती अशी:

  केदार एकीच्याच च्या ऐवजी एकीनेच असं लिहीलंस तर कवितेला एक खोली प्राप्त होईल. असो.

  एडमिननं मायबोलीला असं का बनवलं
  जॉइन होताच कविता पाडाव्याशा वाटतात
  गळणार्‍या नाकातून एकच थेंब का गाळायचा
  पाटच पाट वहावेसे वाटतात

  कशात इशारा तर कशात सल्ला
  प्रत्येकात कायतरी वेगळीच भुणभुण
  एक भावना मेली एक क्षणभर टिकत नाही
  आधी लांब रहायचा इशारा लगोलग बाळंतपणाची कुण्कुण

  कुणी तसा जादू करतो
  कुणी असा प्रश्न पाडतो
  प्रत्येक कविता वाचल्यावर
  मायबोलीकराला कुठे काळीज उरतो

  कोणी विषयातून गार करत
  कोणी व्याकरणातून वार करत
  किती तर्‍हा छळण्याच्या असतात
  मायबोलीकर वेडा वाचून फसतो

  कवितेतही कवि कमाल करतात
  शब्द शब्द जमवून जंजाळ करतात
  कोणाकोणाला नजर द्यावी (वाचायला)
  एकजात सर्वच डोक्यात शिरतात

  प्रतिक्रीयातही त्यांच्या बात असते
  त्याच वाचण्यात खरी मजा असते
  भेजा आमचा भंजाळून टाकतात
  त्या वाचण्यासारखी दुसरी सजा नसते

  खरच! एडमिननं मायबोलीला अस का बनवल?
  की जॉइन होताच नव्कवीनं घडायच
  मनात येईल ते का नाही लिहायचं?
  मग मायबोलीकरानं गप्प का रहायचं?

  (माझा हा पहिलाच प्रयत्न आहे कृपया सांभाळून घ्या)

  केदार, मिनु धम्माल लिहिलय Rofl

  मायबोलीच्या पहिल्या होलिकोत्सवाची घोषणा !
  टण्याशास्त्री पुणेकर

  होळीच्या अपेयपानाची सोय कोण करतय?
  नदीच्या दोन्ही बाजुच्या गावातली लोकं जसे एकमेकांना शिव्या देतात काठावर उभे राहुन तसे माबोवर होळीच्या शिव्या द्यायला कुठले कुठले गट करता येतील?
  भारतातले - भारताबाहेरचे
  जुने माबोकर - नवीन माबोकर
  जुने कवी - नव कवी
  ओरिजिनल आयडी - ड्यु आयडी
  नविन आयडी - जुना आयडी
  पार्ले (सा) - पार्ले (इ)
  झक्की - हूडा
  आणि संगीतखुर्ची शिवीगाळ - टोणगा, हुडा, नाना, झक्की, वाकड्या , महिन, शोनू, नाव माहित नसलेले, वावा तोडलत, तात्या, मापावरुन चड्डी आणणारे, अर्धवट कथा सोडणारे, आयडी - बाइ की बुवा हाच मुळात वाद असलेले.. रेफरी बी (ज्याला एकपण शिवी कळणार नाही)

  टण्या घोषणा एकदम जबरी Rofl

  मीनू, तोडलंस! जिंकलंस! खल्लास!

  टण्या, Lol
  (ड्यु-आयडी : 'संध्ये'पूर्वी - 'संध्ये'नंतर असा उपगट असावा!)

  चिन्मय बाळा अजून मी आहे.... (म्हणजे ऑनलाइन.)

  आम्हीच का म्हनून विचार करुन लिहायचं
  सुचलं नायतर हात बांधून गप्प का बसायचं
  व्याकरण तरी आम्ही का पाळायचं
  दिर्घ र्‍हस्व पहात आम्हीच डोकं जाळायचं
  मुक्त लिखान करण्यावर का नाही भाळायचं
  आम्हीच का म्हणुन वीचार करुन पोळायचं
  आला ढेकर दिला
  आली उचकी दिली
  आली भावना छापली
  इक्त सोपं हाय पन आम्हाला कधी कळायचं?
  आम्हीच का म्हनून विचार करुन लिहायचं
  सुचलं नायतर हात बांधून गप्प का बसायचं

  ते काही नाही मी पण रोज कविता लिहीणार आजपासून (चिनॉक्सला माझ्या असण्याचा पुरावा दिलाच पायजे मेल्यान ती. स्व लावलंन नावामागे. जळ्ळ मेलं लक्षण ते.)
  ~~~~~~~~~

  Rofl

  आज्जे,
  ती.स्व. म्हणजे तीर्थस्वरूप.. तीर्थरूप स्वर्गीय नव्हे..

  शोनूनी इथे स्लार्टीचे ऑस्करवरचे पोष्ट आणले त्याबद्दल धन्यवाद. नाहीतर मला ते इथे कुठे आढळले नसते. इतके गहीवरुन आले ना वाचून. धन्यवाद दोघांचे!!!!! खर्‍या अर्थाने बहर तो हाच! आणि असाच अपेक्षितही!

  बी, पुढे ओम शान्ती शान्ती म्हणायचं राहिलं ना...

  आई ग! किती हसवायचं मेलं ते? मीने, केदार१२३,टण्याशास्त्री!
  माझी कवळी निघाली ना हसता हसता!

  मीनू, टण्या Rofl
  बी ला अनुमोदन. Happy
  ----------------------
  एवढंच ना!

  आला ढेकर दिला
  आली उचकी दिली

  >>>

  आता देउ करपट ढेकरच्या वेळचा महान वाद माबोवर उपटायला योग्य वेळ आणि अनुकूल हवामान तयार झालेले आहे. कुणी आहे का अत्रे इथे? (मर्ढेकर म्हणुन आम्ही कित्येकांना उभे करु)

  :d
  वेड आहे हे..:)
  मीनु, 'आली भावना छापली'
  यावर माझा मी तीव्र निषेध नोंदवतो आहे..:)

  आज्जी , केदार Lol
  -----------------------------------------
  सह्हीच !

  चला आजची कविता घ्या..
  ---
  कवितेचं नाव आहे 'लूटूपूटू'

  एक कविता पाडू बाई दोन कविता पाडू
  दोन कविता पाडू बाई तीन कविता पाडू
  तीन कविता पाडू बाई चार कविता पाडू
  चार कविता पाडू बाई पाच कविता पाडू
  पाचा कवितांचा बॉम्बगोळा, मायबोलीकर करील गोळा
  आपला बुवा प्रतिक्रीयांवर डोळा
  याला 'छान' म्हणू बाई त्याला 'वा' म्हणू
  त्याला 'तोडलं' म्हणू बाई याला 'जिंकलं' म्हणू
  नाही काही सुचलं तर 'आलं रडू म्हणू'
  येऊ दे पाण्याच्या या लाटा
  एक लाट आली बाई दोन लाटा आल्या
  दोन लाटा आल्या बाई तीन लाटा आल्या
  याची ओळ लाटू बाई त्याचा अर्थ लाटू
  त्याची कविता लूटू बाई याचे शब्द लूटू
  छान छान म्हणायचा खेळ लूटूपूटू
  मोठ्या मोठ्या कवींची आपण कविता वाटू
  तू घे शब्द मी घेतो अर्थ
  नको वेड्या दवडू वेळ उगा व्यर्थ
  ~~~~~~~~~

  वा..:) छान आहे गझल..:)
  -------------------------------
  काव्यांस तुटवडा नाही
  हे माबोवरचे देणॅ

  व्वा!....सुरेख!.. केवळ अप्रतिम...
  पाचा कवितांचा बॉम्बगोळा, मायबोलीकर करील गोळा
  आपला बुवा प्रतिक्रीयांवर डोळा
  >> क्या बात है!
  जियो!...
  ...डोळ्यासमोर उभा राहिलं...!!
  तोडलंस मैतरिणी!
  ..पाणीच आलं डोळ्यातून...!

  अहाहा!!मस्त कविता
  मीनूताई आता कसं...बदल फारच सुखद.
  Proud
  ----------------------
  इतनी शक्ती हमे दे ना दाता मन का विश्वास कमजोर हो ना..

  मीनू Lol
  .
  ह्या कवितेची अनुभिती घ्या बर जरा ? http://www.maayboli.com/node/6207#comment-162847
  मज्जा माडी Rofl
  ------------------------
  देवा तुझे किती सुंदर आकाश
  सुंदर प्रकाश सूर्य देतो

  Pages