उपासना

Submitted by हसरी on 3 February, 2010 - 23:00

उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद नानबा,
कशा आहात?तुम्हालाही अनेक शुभेच्छा !:)

धन्यवाद अश्विनी,माधव छान सांगितले आहे!

'श्री गजानन विजय' या प.पू सद्गुरु श्रीगजानन महाराज यांच्या चरित्र ग्रंथामध्ये, श्रीमहाराजांचा उपदेश जिज्ञासूना अतिशय उपयुक्त आहे. श्री म्हणतात...

तत्त्व जाणण्याकारण । मार्ग कथिले आहेत तीन ।
कर्म, भक्ति, योग म्हणून । शास्त्रकारांनीं शास्त्रांत ॥श्री ग.वि. ६.६३॥

आत्मतत्व,परमतत्व,परब्रह्म,परमेश्वर जाणण्यासाठी शास्त्रात कर्ममार्ग, भक्तिमार्ग, योगमार्ग असे
तीन मार्ग सांगितले आहेत.

फल या तिन्ही मार्गांचें । एकचि आहे अखेरीचें ।
परी बाह्य स्वरुप त्यांचें । भिन्न भिन्न असें कीं ॥६४॥

या तिन्ही मार्गाचे बाह्य स्वरुप भिन्न-भिन्न वाटले तरी या मार्गाचे अंतिम गंतव्य.. आत्मज्ञानाची प्राप्ती, म्हणजेच मी कोण आहे? माझे नीजस्वरुप काय आहे? हे जाणणे हेच आहे.

योगी योगक्रियेचा । जरी अभिमान वाही साचा ।
तरी तयासी तत्त्वाचा । खरा बोध ना होईल ॥६५॥
योगक्रियावरुन । अलिप्त रहावें तयापासून ।
कमलपत्रासमान । तरीच तत्त्व कळून ये ॥६६॥

योगमार्गाने ज्याची सुरुवात होते, अशा योग्याला जर तो करत असलेल्या योगक्रियेचा अभिमान, अर्थात क्रियेचा कर्तृत्वाभिमान झाला तर... त्याला आत्मतत्त्व जाणण्याचा.. आत्मबोध कधीही होणार नाही. म्हणूनच योग्याने योगक्रिया करताना..त्याला 'मी कर्ता' असा अभिमान न व्हावा या करिता तशी साधना योग क्रियेसोबतच करणे आवश्यक आहे. म्हणजे प्रत्यक्ष क्रिया करुनही.. घडूनही... कर्तृत्वाभिमान नसल्यामुळे.. असा योगी पाण्यातील कमलपत्रासमान कर्तृत्वाभिमानापासून अलिप्त रहातो.... त्यामूळे त्याला आत्मतत्त्व जाणता येते.

याचपरी प्रपंचाची । स्थिति नरसिंगा आहे साची ।
आसक्ति कन्यापुत्रांची । मुळींच राहतां कामा नये ॥६७॥
गार पाण्यांत राहते । परी न पाणी शिरुं देते ।
तैसेंच वागती साचें । या प्रपंचामाझारीं ॥६८॥
यापरी त्वां रहावें । अपेक्षारहित असावें ।
चित्तांतून ना ढळूं द्यावें । सच्चिदानंद ईशाला ॥६९॥

अशाचप्रकारे, जो गृहस्थाश्रमी असतो.. त्याची आत्मतत्त्व जाणण्याची सुरुवात अर्थात प्रपंचात असतानाच होत असते.अशी सुरुवात झाली तरी, जर त्याला प्रपंचात आसक्ती नसेल, म्हणजेच त्याची 'मी भोक्ता' अशी विपरित भावना नसेल तर त्यालाही आत्मतत्त्व जाणता येते.म्हणूनच त्याने प्रपंचात वावरताना.. जशी पाण्यात असणारी गार आपल्यात पाणी शिरून देत नाही, अगदी तसेच प्रपंचाची आसक्ती सोडून.. प्रपंचात वावरावे म्हणजे त्याला प्रंपच बाधणार नाही, उलट त्याचा प्रपंचच त्याला आत्मतत्त्वाकडे घेऊन जाईल. म्हणूनच प्रपंचात असणार्‍या साधकाने अपेक्षारहीत होण्याचा अभ्यास सतत करावा, त्याकरीताच 'सत्-चित-आनंद' स्वरुप सगुण ईश्वराला आपल्या चित्तातून ढळू देऊ नये.

म्हणजे कांहींच अशक्य नाहीं । तूं, मी आणि शेषशायी ।
एकरुप आहों पाही । जन जनार्दन भिन्न नसे ॥७०॥

असे जर झाले, तर मग खात्री बाळग काहीच अशक्य नाही. मग तुला अनुभव येईल की तू, मी आणि शेषशायी श्रीभगवंत एकरुपच आहोत. जीव,जगत आणि ईश्वर यांचे स्वरुप अभिन्न आहे... असा प्रत्यक्ष अनुभव तूला येइल.

प्रपंच मुळीं अशाश्वत । त्याची काय किंमत ।
दुपारच्या सावलीप्रत । कोण सांग खरे मानी ? ॥७२॥

प्रपंचाचे आपल्याला दिसणारे स्वरुपच मुळात अशाश्वत आहे. दुपार असल्यामुळे जशी आपली सावली पडते, ती सावली कायम कशी राहील बरे! ती जशी क्षणिक आहे, तसाच हा प्रपंचही अशाश्वत आहे. तो शाश्वत आहे असे मानून जो जो व्यवहार होईल, त्या व्यवहाराची पारमार्थिक किंमतही तशीच शून्य आहे.

देह-प्रारब्ध जयाचें । असेल ज्या जातीचें ।
तेंच आहे व्हावयाचें । लोकाचारी निःसंशय ॥७४॥

म्हणूनच ज्या प्रारब्धामुळे हा देह मिळाला, त्या देहाचा व्यवहार- लोकाचार ही तसाच होणार..रहाणार याबाबतीत तू अगदी नि:संशय रहा. आणि महत्त्वाचे म्हणजे असा व्यवहार होत असताना, तू 'कर्तृत्त्वाभिमान आणि भोक्तृत्त्वाभिमान' न व्हावा यासाठी सतत अभ्यासरत हो, म्हणजे तुलाही 'आत्मज्ञान' होईल.

श्रींच्या 'श्रीचरणी' अनंत साष्टांग प्रणाम! बोला 'गण गण गणात बोते'.

धन्यवाद!

अश्विनी,
>>>मायेच्या सागरावर तरंगणारा जीव, ज्याने षड्रिपूंवर बर्‍यापैकी मात केली आहे (भगवंताच्याच सहाय्याने) हा कर्माच्या अटळ सिद्धांतामुळे येणार्‍या प्रारब्धापासून अलिप्त होतो. प्रारब्ध निर्माण व्हायला कारणच उरत न गेल्यामुळे देहाची आवश्यकताही उरत नाही. म्हणजे जन्म्-मरण्-जन्म या चक्रातून मोकळीक व्हायला लागते.

कर्माचा अटळ सिद्धांत काय आहे? प्रारब्धाचा आणि या सिद्धांताचा काय संबंध आहे? प्रारब्ध निर्माण व्हायला कारण काय आहे?

धन्यवाद!

माधव,

>>>विटाळ शरीराला होऊ शकतो ('होतो' हे मला पटत नाही तरी) मनाला नाही.

याविषयी आपले आता काय मत आहे.:)

धन्यवाद!

>>>> >>>विटाळ शरीराला होऊ शकतो ('होतो' हे मला पटत नाही तरी) मनाला नाही. <<<<
समहाऊ, यावर बोलण्याइतपत माझा या विषयांशी तितकासा परियच/संबंध नाही पण.... जे उमगलय्/उमगतय, त्यावर आधारीत...
"विटाळाचा" चालू बोलि भाषेतील अर्थच केवळ नव्हे, तर कसलाही आगन्तुक/हानीकारक "(शरीराचे दृष्टीने) पन्चमहाभूतात्मक पदार्थ" वा "(मनाचे दृष्टीने) विचार" यांचा संसर्ग होणे, म्हणजे विटाळाची बाधा होणे, अन तस असेल, तर शरीर वा मन, "स्वतंत्रपणे" वा "दोन्हीस एकत्रीतपणे", बाधा/संसर्ग होऊ शकतो, जो निश्चयापासून ढळवू शकतो. असे माझे मत. कदाचित याच कारणान्मुळे सन्यस्त लोक वानप्रस्थाश्रमात, अर्थात व्यावहारिक जगाच्या मोहमायेपासून दूर एकान्तात जाऊन साधना/तपाचरण करण्यासाठी रहात असावेत.

'कर्माचा अटळ सिद्धांत' : जे जे कर्म हातून घडते (इथे फक्त मनुष्य योनीच गृहित धरली आहे, कारण इतर योनी कर्म करत नाहीत) त्या प्रमाणे त्याचे फलही मिळतेच मिळते. कधी आणि कसे हा ज्या त्या जिवाच्या ठायी असलेल्या त्रिगुणांवर ठरत असते. तो वेगळा विषय.

या घडलेल्या कर्मांना मिळणारं फळ म्हणजे चांगलं वाईट प्रारब्ध.
मानवाला मनही आहे आणि बुद्धीही. ज्याचं मन ज्या प्रमाणात बुद्धीच्या ताब्यात आहे त्याला त्या प्रमाणात चांगलं प्रारब्ध प्राप्त होते. सगळ्यात घात करणारी गोष्ट म्हणजे मन कारण या अकराव्या इंद्रियाची लोलूपता सोडवणं फार कठीण असतं. मिळालेल्या कर्मस्वातंत्र्याच्या देणगीचा चांगला उपयोग न होण्यामागेही खूप वेळा मनच कारणीभूत असतं. मनावर बुद्धीचा अंकूश ठेवून आणि त्याही पलिकडे जाऊन जर कर्मस्वातंत्र्य नाकारलं (कर्मस्वातंत्र्य प्राणी योनीला आणि ज्या मानवांनी आपलं सर्वस्व भगवंताचरणी अर्पण केलं आहे अशांना नसतं) म्हणजेच भगवंताला आवडेल असंच आचरण आपल्या हातून घडावे अशी प्रामाणिक इच्छा मनात धरली आणि माझी प्रत्येक हालचाल भगवंताच्याच इच्छेने व्हावी अशी तळमळ मनात उद्भवली तर आपलं काय उरतं? काहीच नाही ! सगळं त्याचंच ! मग माझ्या हातून जे काही घडेल ते त्याच्याच चरणी समर्पित. देह हा फक्त कर्म होण्यासाठीचं माध्यम उरतं, मी पणाचा देठ म्हणजेच मायेचा अदृश्य बंध नाहिसा होतो. मग प्रारब्ध निर्मितीचं कारणच उरत नाही. संतांचे गर्भवासही म्हणूनच प्रारब्धवश नव्हेत, तर केवळ भगवंताच्या इच्छेनेच होतात. म्हणूनच एखादे चोखोबा, काही स्क्वेअरफुटांच्या मंदिरा आत येऊ दिले गेले नाहीत तरी तो विश्वंभर त्यांना सोडून राहूच शकत नव्हता. त्यांचे सो कॉल्ड भोग त्यांच्या भौतिकापुरतेच सीमित राहिले. इथे मी 'सो कॉल्ड' म्हणते आहे कारण आज आपल्यासारख्या सामान्यांचं मन कळवळतं तेव्हाचे अत्याचार वाचून, ऐकून पण संत तर सुख दु:खाच्या पलिकडे गेलेले असतात म्हणून त्यांच्यासाठी हे फक्त दैहिक उपचार, बाकी सगळा पांडुरंग..

माझे तरी काय असे, सर्व तुझेचि रे देवा |
तुझे असो तुझ्यापाशी, मीच होय तुझा ||

किंवा

हा देहच जेथे नाही आपुला, एकदा जो साईचरणी वाहिला |
मग तयाच्या चलनवलनाला, काय आपुला अधिकार ||

एक सांगू, या संतवचनांचा आपण प्रयासपुर्वक आपल्या नेहमीच्या आयुष्यात उपयोग केला, आत्मसात करु पाहिलं तर दु:खाचे, संकटांचे मोठाले पहाड, खोल खाई आपण कधी पार करुन गेलो कळतच नाही. आपल्याला त्याची दाहकता जाणवतच नाही. प्रत्येक प्रसंगाला / घटनेला आपला रिस्पॉन्स काहितरी वेगळाच असतो. सुख आणि दु:ख पचवणं आपल्याला सोपं होऊन जातं. सगळी दाहकता त्याने आपल्या चरणांशी खेचून घेतलेली असते. आणि नश्वर असणार्‍या सुखांची लोलूपता निवळून टाकलेली असते. खरं सूख त्याच्या चरणांशीच आहे हे आपल्याला नेमकं कळलेलं असतं.

याविषयी आपले आता काय मत आहे >> सावट, अजूनही तेच मत आहे. Happy

या संतवचनांचा आपण प्रयासपुर्वक आपल्या नेहमीच्या आयुष्यात उपयोग केला, आत्मसात करु पाहिलं तर >> ज्ञानेश्वरीची (किंवा कुठल्याही संताची) एखादीच ओवी सारे जीवन खर्चून आत्मसात करता आली तरी भरून पावलो.

LT,
धन्यवाद!

>>>"विटाळाचा" चालू बोलि भाषेतील अर्थच केवळ नव्हे, तर कसलाही आगन्तुक/हानीकारक "(शरीराचे दृष्टीने) पन्चमहाभूतात्मक पदार्थ" वा "(मनाचे दृष्टीने) विचार" यांचा संसर्ग होणे, म्हणजे विटाळाची बाधा होणे, अन तस असेल, तर शरीर वा मन, "स्वतंत्रपणे" वा "दोन्हीस एकत्रीतपणे", बाधा/संसर्ग होऊ शकतो, जो निश्चयापासून ढळवू शकतो. असे माझे मत. कदाचित याच कारणान्मुळे सन्यस्त लोक वानप्रस्थाश्रमात, अर्थात व्यावहारिक जगाच्या मोहमायेपासून दूर एकान्तात जाऊन साधना/तपाचरण करण्यासाठी रहात असावेत.

अगदी खरे आहे. इथे एक गोष्ट फार महत्त्वाची आहे.. ज्या निश्चयापासून ढळण्याची भिती आहे, तो निश्चय मूळात कशाचा आहे? तेच जर लक्षात नाही घेतले तर विचारांचा गुंता होतो.

ब्रह्मचर्याश्रम,गृहस्थाश्रम,वानप्रस्थाश्रम आणि शेवटी संन्यासाश्रम हे सगळे कशासाठी?

मनुष्य बालभावातून... कर्त्याभावाचा स्पर्श होणार्‍या वयात येताच, विधीवत अर्थात योग्य रितीने ब्रह्मचर्याश्रमात प्रवेश करतो आणि शेवटी विधीवत संन्याश्रमात प्रवेश करून सर्व गत धर्माचा त्याग करतो. 'कर्ताभाव' ही सुरुवात आहे, आणि कर्त्याभावातून सुटका हा शेवट आहे. 'शेवट' योग्य झाला नाही, तर परत 'सुरुवात' अटळ आहे.

बालभावातून, ब्रह्मचर्याश्रमात... कोवळ्या कर्त्याभावात आल्यावर... त्या कोवळ्या, नुकत्याच अंकुरलेल्या कर्त्याभावाचा उपयोग, "मनुष्य जन्माचे अंतिम ध्येय केवळ आणि केवळच 'मोक्ष' प्राप्ती आहे, तो आपण .. मिळालेल्या, उत्पन्न झालेल्या कर्त्याभावाने स्वप्रयत्नाने मिळविला पाहीजे", हे कळण्यासाठी आहे.

'प्रारब्ध' म्हणजे जुने संस्कार, आणि ज्याअर्थी परत मनुष्य जन्म मिळाला आहे, त्याअर्थी आपला मागचा शेवट 'त्यागा'मध्ये झाला नाही, म्हणजेच 'भोगा'मध्ये झाला आहे हे अधोरेखित होते. आताही परत शेवट भोगामध्येच होऊ नये, म्हणून 'पुढच्यास ठेच, मागचा शहाणा' या न्यायाने.. सुरुवातीपासूनच काळजी घ्यावी, हा मुख्य उद्देश. अर्थात "'भोगाचे' अंतिम फळ हे कायम दु:खदायकच असते'' हा लाखमोलाचा संदेश आहे.

मागचे संस्कार-प्रारब्ध अर्थातच योग्य नाहीत ही खात्री... आणि त्या खात्रीतून, ते जुने-संस्कार आपले खरे रुप प्रकट करायच्या अगोदरच... त्याला योग्य वळण लावणे आवश्यक असते... म्हणून शास्त्रांचे(योग्य काय अयोग्य काय हे कळण्यासाठी) अध्ययन करणे आले. त्यामुळे आपल्या कर्त्याभावाचा उपयोग स्वत:च्या स्वार्थी उपभोगापेक्षा, आपल्या दुर्मिळ मनुष्य जन्मास जे जे कारणीभूत आहेत त्या त्या सर्वांचे, कृतज्ञतापूर्वक स्मरण ठेऊन, केवळ कर्तव्य भावनेतून कार्य करण्याची शिकवण याच योग्य वयात शिकविली जाते.

आता, काळाच्या ओघात एकच आश्रम राहीला आहे तो म्हणजे गृहस्थाश्रम. बाकी आश्रमाचा इश्वरी संकल्पानुसार लोप झाला आहे. अर्थात 'भोगाचे' महत्त्व वाढले आहे, 'त्यागाची' कल्पना हळूहळू संकुचीत होत चालली आहे... मनुष्य दिवसेंदिवस स्वकेंद्रित होत चालला आहे.

असो, म्हणूनच या भोगमय, अवघड परिस्थितीत 'परमेश्वरप्राप्ती' पहील्यापेक्षा जास्त सहज झाली आहे. थोड्याशा प्रयत्नाने परमेश्वरप्राप्ती होणे, हे या काळाचे 'वैशिष्ठ' आहे.

( ब्रह्मचर्याश्रमात 'अध्ययनाने' शास्त्राचे-ऋषींचे ऋण, गृहस्थाश्रमात 'दानाने' पितरांचे ॠण आणि वानप्रस्थाश्रमात 'तपाने' देवतांचे ऋण फेडने आणि नंतर सर्व विषयांचा त्याग करुन मनुष्य जन्माच्या सर्व ऋणातून, कर्त्याभावातून मुक्त होणे... हा साधा.. सोपा सहज विचार आहे. जर ॠणच मान्य नसतील तर स्वकेंद्रित आश्रम निसर्गतः पसरतो... त्या करिता विशेष प्रयत्नांची जरुरत पडत नाही... असे 'शास्त्र' आहे. Happy )

धन्यवाद!

अश्विनी, धन्यवाद!

कृपया खालील प्रश्नही पहा..!

>>>या घडलेल्या कर्मांना मिळणारं फळ म्हणजे चांगलं वाईट प्रारब्ध.

मग आता घडणारे (कालचे प्रारब्ध भोगत असताना) नवीन कर्म कसे करायला हवे?चांगले प्रारब्ध आणि वाईट प्रारब्ध यांच्यात काय फरक आहे?

>>>मानवाला मनही आहे आणि बुद्धीही. ज्याचं मन ज्या प्रमाणात बुद्धीच्या ताब्यात आहे त्याला त्या प्रमाणात चांगलं प्रारब्ध प्राप्त होते.

मग 'बुद्धी सुद्धा आपल्याच गत कर्मानुसार(प्रारब्धानुसार) चालते ',.. या श्रीसंतवचनाचा आणि वरच्या वाक्याचा समन्वय कसा करायचा?

>>>मिळालेल्या कर्मस्वातंत्र्याच्या देणगीचा चांगला उपयोग न होण्यामागेही खूप वेळा मनच कारणीभूत असतं.

असे का? कारण बुद्धी ही 'निश्चयात्मिका' म्हणून प्रसिद्ध आहे... अर्थात निर्णय घेण्याचे काम बुद्धीचेच आहे, मनाचे नाही.

>>>म्हणजेच भगवंताला आवडेल असंच आचरण आपल्या हातून घडावे अशी प्रामाणिक इच्छा मनात धरली आणि माझी प्रत्येक हालचाल भगवंताच्याच इच्छेने व्हावी अशी तळमळ मनात उद्भवली तर आपलं काय उरतं? काहीच नाही ! सगळं त्याचंच !

जर आपल काहीच उरत नाही... तर मग चांगले-वाईट प्रारब्ध घडविणार्‍या मनाचे आणि त्यावर अंकुश ठेवणार्‍या बुद्धीचे काय होते?

>>>
हा देहच जेथे नाही आपुला, एकदा जो साईचरणी वाहिला |
मग तयाच्या चलनवलनाला, काय आपुला अधिकार ||

या संतवचनांचा आपण प्रयासपुर्वक आपल्या नेहमीच्या आयुष्यात उपयोग केला, आत्मसात करु पाहिलं तर दु:खाचे, संकटांचे मोठाले पहाड, खोल खाई आपण कधी पार करुन गेलो कळतच नाही.

या श्रीसंतवचनाचा आयुष्यात कसा उपयोग करायचा?

>>>सुख आणि दु:ख पचवणं आपल्याला सोपं होऊन जातं.

'आपल्याला' म्हणजे कोंणाला? सुख आणि दु:ख पचवायचे म्हणजे काय करायचे?

धन्यवाद!:)

महेश, मी विक्रम आणि सावट वेताळ काय !! Lol सावटांनी चांगलीच पिंजून काढलीय पोस्ट. पण त्यांच्या ह्या पिंजण्यामागे आपल्याच विचारांवर अजून सखोल विचार केला जावा हा त्यांचा शुद्ध हेतु स्पष्ट दिसून येतो. ती फुकाची चिरफाड वाटत नाही म्हणून अजून जास्त विचार करुन उत्तरंही द्यावीशी वाटतात Happy
-----
>>>या घडलेल्या कर्मांना मिळणारं फळ म्हणजे चांगलं वाईट प्रारब्ध.

मग आता घडणारे (कालचे प्रारब्ध भोगत असताना) नवीन कर्म कसे करायला हवे?चांगले प्रारब्ध आणि वाईट प्रारब्ध यांच्यात काय फरक आहे? >>>> नविन कर्म बुद्धीचा मनावर अंकूश ठेवून करायला हवे. कर्मस्वातंत्र्य देऊन भगवंताने आपल्याला खेळायला सोडले आहे. आपण बॉल कसा टोलवायचा किंवा कसा टाकायचा हे आपण ठरवायचं पण त्याला रुल्स मात्र त्याचेच लागू होतात आणि आऊट, नॉटऑट, सिक्सर वगैरे दिले जातात. हे न विसरता, चुका टाळून अगदी मॅन ऑफ दी मॅच नाही मिळवता आलं तरी स्वतःचा खेळ सुधारता आला तरी चांगलंच.

प्रज्ञापराधांमुळे जे निर्माण ते वाईट प्रारब्ध आणि प्रज्ञापराध टाळून, सत्कर्मं करुन, कर्तव्य राजमार्गाने जाऊन पार पाडून (परमार्थ आणि प्रपंचाचं गाईड म्हणजे संतसाहित्य) जे निर्माण होतं ते चांगलं प्रारब्ध. म्हणजेच जसं कर्म त॑सं फळ.
------

>>>मानवाला मनही आहे आणि बुद्धीही. ज्याचं मन ज्या प्रमाणात बुद्धीच्या ताब्यात आहे त्याला त्या प्रमाणात चांगलं प्रारब्ध प्राप्त होते.

मग 'बुद्धी सुद्धा आपल्याच गत कर्मानुसार(प्रारब्धानुसार) चालते ',.. या श्रीसंतवचनाचा आणि वरच्या वाक्याचा समन्वय कसा करायचा? >>>>> हो. बाय डिफॉल्ट ती गतजन्मानुसार चालते पण आयुष्याचं सुकाणू जेव्हा चांगल्या हातात दिलं जातं तेव्हा या बुद्धीलाही चांगले पैलू पडतात. वाईट हातात पडलं तर सगळी बुद्धी डिस्ट्रक्शनची कर्ती करवती ठरते. म्हणूनच "सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो | कलंक मतिचा झडो, ........" ही प्रार्थना भगवंताला आणि स्वतःलाही Proud करायची. म्हणजेच आपणही आपल्या आचार विचारांवर, श्रेयस प्रेयसाच्या निवडीवर बुद्धीचा वापर करायचा. आपल्या प्रयासांना तो भगवंत फळ देणारच.

------

>>>मिळालेल्या कर्मस्वातंत्र्याच्या देणगीचा चांगला उपयोग न होण्यामागेही खूप वेळा मनच कारणीभूत असतं.

असे का? कारण बुद्धी ही 'निश्चयात्मिका' म्हणून प्रसिद्ध आहे... अर्थात निर्णय घेण्याचे काम बुद्धीचेच आहे, मनाचे नाही. >>>>> ऊसापासून साखर, गूळ बनवला आणि तो योग्य त्या प्रमाणात सेवन केला तर काहीच अपाय नाही. पण जेव्हा मन त्याच ऊसापासून बनवलेली दारु प्रिफर करतं, की जी कितीही प्रमाणात सेवन केली तरी मज्जासंस्थेवर थोडातरी विपरित परिणाम करणारच आहे, भले तो लगेच जाणवो वा न जाणवो, तेव्हा हा निर्णय निश्चयात्मिका बुद्धीने घेतलेला नाही कारण त्या बुद्धीवर संकल्पविकल्पात्मक मनाची कुरघोडी होते व दारुचे वाईट परिणाम माहित असूनही मन ते घडवते. जेव्हा त्याची बुद्धी हे मान्य करते आणि त्याप्रमाणे त्याचं आचरण बदलवते तेव्हा तिने मनाची गुलामगिरी झुगारण्याचा प्रयत्न केला आहे असे दिसून येते. मी हे केवळ एक उदाहरण दिले आहे. प्रत्येक जण चुका करतच असतो पण चुका जगाजवळ मान्य नाही केल्या तरी स्वत:जवळ मान्य करुन त्या सुधारण्याचा प्रयास केला तरी त्या व्यक्तीची आत्मिक ताकद वाढीस लागते.
-------

>>>म्हणजेच भगवंताला आवडेल असंच आचरण आपल्या हातून घडावे अशी प्रामाणिक इच्छा मनात धरली आणि माझी प्रत्येक हालचाल भगवंताच्याच इच्छेने व्हावी अशी तळमळ मनात उद्भवली तर आपलं काय उरतं? काहीच नाही ! सगळं त्याचंच !

जर आपल काहीच उरत नाही... तर मग चांगले-वाईट प्रारब्ध घडविणार्‍या मनाचे आणि त्यावर अंकुश ठेवणार्‍या बुद्धीचे काय होते? >>>>>> काय होणार? ज्याला हे जमेल त्याचा जन्म मरणाचा फेरा चुकेल आणि त्याचा जन्म केवळ भगवंताच्या इच्छेनेच होईल. बुद्धीही सद्गुरुचरणी अर्पण असल्यामुळे बुद्धीचा अहंकारदेखिल सद्गुरु उतरवूनच त्या भक्ताच्या अध्यात्मिक प्रगतीला अजून वेग देतील. श्री साईसच्चरितातील नानासाहेब चांदोरकरांची गीतेतल्या संस्कृत श्लोकाच्या निरुपणाची कथा आणि मशिदीच्या जीर्णोद्धाराच्या वेळी एका भक्ताचा फेटा बाबा धुळीत टाकतात ती कथा यातून सद्गुरुतत्वं भक्तांना शुद्ध करण्यासाठी किती आटापिटा करत असते ते दिसून येते.
-------

>>>
हा देहच जेथे नाही आपुला, एकदा जो साईचरणी वाहिला |
मग तयाच्या चलनवलनाला, काय आपुला अधिकार ||

या संतवचनांचा आपण प्रयासपुर्वक आपल्या नेहमीच्या आयुष्यात उपयोग केला, आत्मसात करु पाहिलं तर दु:खाचे, संकटांचे मोठाले पहाड, खोल खाई आपण कधी पार करुन गेलो कळतच नाही.

या श्रीसंतवचनाचा आयुष्यात कसा उपयोग करायचा? >>>>> आज्ञापालन आणि माझा जन्मोजन्मीचा मायबाप जे माझ्या आयुष्यात घडवेल ते माझ्या हिताचेच असेल हा दृढविश्वास.

---------

>>>सुख आणि दु:ख पचवणं आपल्याला सोपं होऊन जातं.

'आपल्याला' म्हणजे कोंणाला? सुख आणि दु:ख पचवायचे म्हणजे काय करायचे?
>>>>>
आपण म्हणजे देहधारी 'मी'. ढोबळ अर्थाने, सुख आणि दु:ख हे देहामुळे भोगता येणारे प्रारब्ध आहे.

सुख पचवणे म्हणजे जे सुख मला मिळतं आहे त्यावर आपल्या पुर्ण अधिकारच आहे व ते मीच मिळवलं आहे असं मानण्यापेक्षा, जे सुख मला मिळतं आहे ते भगवंताच्या अकारण कारुण्यामुळे मिळतं आहे व मी जी सत्कर्मं केली असतील त्या मानाने कितीतरी नक्कीच जास्त माझ्या पदरात टाकलं गेलं आहे याची जाणीव असणं. हे सुख भौतिक असेल तर ते नश्वरच असणार आहे हे समजून घेऊन त्याच्यात पुर्णपणे गुंतून न जाणे. त्याचा उपभोग घेतानाच ते आज आहे पण उद्या नसणार आहे याची जाणीव असणे (यामुळे उद्या ते सुख नाहिसे झाले तरी त्याचा अभाव आपण सहज झेलू शकतो. आज आपण श्वास घेतो आहोत, जिवंत आहोत पण कुठल्या तरी एका क्षणी हे संपणार आहे याची जाणीव ठेवून मिळणार्‍या प्रत्येक क्षणाचं चांगलं चीज करणे).

दु:ख पचवणे म्हणजे जे वाट्याला आले ते आता भोगून झाले, त्यामुळे माझे प्रारब्ध आता भोगून हलके झाले हे जाणवणे. त्या दु:खात होरपळत, कुढत, बुडत न राहता ती भगवंताचीच इच्छा हा विश्वास राखून भगवंताचेच बोट घट्ट धरुन पुढे सन्मार्गानेच चालत राहणे. ती फेमस गोष्ट आहे ना, वाळवंटात एकाच व्यक्तीच्या पाऊलखुणा दिसतात आणि त्या भगवंताच्या असतात आणि भगवंताने त्या मनुष्यास अलगद उचलून पार केलेले असते ! त्या गोष्टीचा मतितार्थ लक्षात ठेवायचा.
-----

जे जाणवतंय ते नीट मांडता येत नाही मला. लईच गडबडगुंडा होतो पोस्टचा.

प्रज्ञापराधांमुळे जे निर्माण ते वाईट प्रारब्ध आणि प्रज्ञापराध टाळून, सत्कर्मं करुन, कर्तव्य राजमार्गाने जाऊन पार पाडून जे निर्माण होतं ते चांगलं प्रारब्ध >> प्रारब्ध - मग ते चांगल्या कर्मातून निर्माण होणारे असो वा वाईट कर्मांतून - हे मुक्तीच्या वाटेतला अडसर असते. अगदी खूप चांगले प्रारब्ध निर्माण केले तरी ते भोगायला परत जन्म घेणे आलेच. मग त्या जन्मात परत कमे करणे आले आणि त्या कर्मांमुळे नविन प्रारब्ध पण आले. त्यामुळे नविन प्रारब्ध निर्माण होऊ न देणं म्हणजेच मुक्तीकडे वाटचाल. हेच ते काकडीचे सुकणे Happy

कर्मस्वातंत्र्य आहे असे वाटणे म्हणजेच मायेच्या जंजाळात अडकणे. कर्मस्वातंत्र्य म्हणजे मला कर्म करायचा अधिकार आहे असे वाटणे. मग सहाजीकच 'कर्म मी केले' ही भावना होते आणि तोच तर मायेचा सापळा आहे. Happy

कर्मस्वातंत्र्य मानले पण बुध्दी भगवंताच्या ठिकाणी स्थीर राहिली तरी मुक्ती मिळते. याची दोन उदाहरणे म्हणजे कंस आणि शिशुपाल.

काय होणार? ज्याला हे जमेल त्याचा जन्म मरणाचा फेरा चुकेल आणि त्याचा जन्म केवळ भगवंताच्या इच्छेनेच होईल. >> म्हणजे तो भगवंताहून वेगळाच उरला. मग सावट यांचाच प्रश्न पुन्हा विचारतो - मग चांगले-वाईट प्रारब्ध घडविणार्‍या मनाचे आणि त्यावर अंकुश ठेवणार्‍या बुद्धीचे काय होते?

वेगळा उरला तरी त्याच्याजवळ त्याचं असं काही नाही. प्रत्येक गोष्ट, कृती भगवंताचीच.

मग सहाजीकच 'कर्म मी केले' ही भावना होते आणि तोच तर मायेचा सापळा आहे.>>> भगवंतापासून वेगळं असूनही (त्याच्या इच्छेने आलेला गर्भवास भोगण्यासाठी) 'कर्म मी केलं' ही भावना नाहिशी होणं म्हणजे बुद्धी त्याला समर्पित करणं आणि मायेच्या सापळ्यातून निसटणं.

अश्विनी, माधव धन्यवाद!
अतिशय छान सांगितले आहे.

माधव, अजून एक प्रश्न आहे.... अर्थात त्यामागे मनन आणि चिंतनच अपेक्षित आहे.

>>>विटाळ शरीराला होऊ शकतो ('होतो' हे मला पटत नाही तरी) मनाला नाही.

शरीराला आणि मनाला विटाळ नाही असे जर मानले.. तर... मग कांदा न खाण्याचे(किंवा खाण्याचे) प्रयोजन काय? Happy

धन्यवाद!

सावट, तुमचा प्रश्न निटसा कळला नाहीये मला. विटाळ हा सोवळे-ओवळे, कर्मकांड यांच्याशी संबंधीत विषय आहे. पहिले विधान मी मानसपूजेच्या संदर्भात केले होते. कोणत्याही प्रसंगात / परीस्थीतीत / अवस्थेत भगवंताच्या ओढीने त्याची पूजा बांधणे हे गैर होत नाही.

कांदा खाणे / न खाणे हे आपल्या मनावर असते. मी सवयीनुसार सणाला कांदा खात नाही. त्यातला मुख्य उद्देश घरातल्या वडिलधार्‍यांच्या समजूतींना मान देणे हाच आहे. पण उद्या कोणी सणाला कांद्याचे जेवण बनवले तरी मी ते नि:शंक मनाने खाईनच.

सनातनच्या पेप्रात त्यांच्या साधकांची ६० % पातळी झाली, अशा बातम्या असतात.. हे कसे मोजतात? माझी पातळी कुठे मोजून मिळेल का? ती वाढवायची कशी?

सॉरी ..जरा फोन्ट प्रोब्लेम होता
सर्व चर्चा-विमर्ष वरून एवढेच निष्कर्ष निघू शकतात कि,
पुण्य पर-उपकार, पापं ते पर-पीडा
माझा स्वार्थ हा कुटुंब/ जाती /समाज/ देश /विश्व अश्या विविध स्वार्थ –वर्तुळा तून विस्तारीत करत जाणे हाच परम-अर्थ [परमार्थ] आहे.
धन्यव्वाद

मस्त कलंदर,
धन्यवाद.

आपले म्हणणे अगदी खरे आहे.आपल्याला पडणारे विविध प्रश्न आपल्या अगोदरही बर्‍याच जणांना पडले असणार हे नक्कीच आहे. बस्स गरज आहे ती आपले प्रश्न आणि ती अगोदरची उत्तरे जुळतात का ते प्रामाणिकपणे, विचाराने तपासून पाहण्याची.विचारामधे प्रचंड शक्ती आहे. पण एखादे वाईट कार्य पार पारपाडण्यासाठी जी विचार-शक्ती वापरली जाते ती खर्ची पडते... आणि बरोबर अनेकांचे नुकसान करते. तर सद्-विचारामध्ये मानवाला आत्यंतिक सुख प्राप्त करून देण्याची शक्ती उपजत असते. म्हणूनच श्रीसंतांनी कल्पनेपेक्षा, विचाराने स्थिर होणार्‍या वास्तवाला अत्यंत महत्त्व दिले आहे.

जोपर्यंत वास्तव काय आहे हे न पाहता, आपल्या भलत्याच कल्पनेत रमणे होते त्यावेळी... सुखाची प्रत्यक्ष प्राप्ती न होता, कल्पनेतच सुख वाटू लागते... आणि असे सुख आपल्या क्षणीक कल्पनेप्रमाणेच क्षणीक असते.

म्हणूनच एखादा माणूस विचार करतो आहे का नाही हे त्याला पडणार्‍या प्रश्नावरुनच कळू शकते. अर्थात प्रश्नाचे स्वरुपच 'संशय' हेच आहे आणि संशयनिवृत्ति होणे अतिमहत्त्वाचे आहे. अविचाराने मौन बाळगणे आणि विचाराने निर्विचारता प्राप्त करणे.. स्वाभाविक मौनात जाणे, एक नव्हे. असो...

धन्यवाद!

जा'मोहन'प्या,

>>>माझी पातळी कुठे मोजून मिळेल का? ती वाढवायची कशी?

मनात मासा पकडण्याचा स्वार्थी हेतूने,विचाराने केले जाणारे बकध्यान आणि मनातील सर्व संशय फिटल्यामुळे, विचाराने आलेल्या निर्विचारतेमुळे होणारे स्वाभाविक ध्यान यात टोकाचा फरक आहे.
वरून सारखेच दिसले म्हणून, बाह्य स्वरूप सारखेच आहे म्हणून दोघांना एकच समजण्याची गल्लत करता येत नाही. बस्स हीच ती पातळीची मोजपट्टी. पट्टीच्या एका टोकाला बक-ध्यान आहे तर दुसर्‍या टोकाला निर्विकल्प-समाधी आहे. आपले आपणच तपासून पहायचे आणि न थांबता, न थकता पुढे चालत रहायचे.. आपल्याच आत्यंतिक विचाराने... आपलेच विचार थांबे पर्यंत.

धन्यवाद!

मीरा,
नमस्कार!

>>>सर्व चर्चा-विमर्ष वरून एवढेच निष्कर्ष निघू शकतात कि,
पुण्य पर-उपकार, पापं ते पर-पीडा
माझा स्वार्थ हा कुटुंब/ जाती /समाज/ देश /विश्व अश्या विविध स्वार्थ –वर्तुळा तून विस्तारीत करत जाणे हाच परम-अर्थ [परमार्थ] आहे.

छान सांगितले आहे.
प्रश्न असा पडतो या विविध विस्तारातून विस्तारत शेवटी विश्वरुपाने विस्तारलेल्या या स्वार्थाच्या दशेत विश्वाची स्थिती काय आहे?

धन्यवाद!

माधव,

>>> प्रश्न निटसा कळला नाहीये मला. विटाळ हा सोवळे-ओवळे, कर्मकांड यांच्याशी संबंधीत विषय आहे. पहिले विधान मी मानसपूजेच्या संदर्भात केले होते. कोणत्याही प्रसंगात / परीस्थीतीत / अवस्थेत भगवंताच्या ओढीने त्याची पूजा बांधणे हे गैर होत नाही.

माधवा, कर्मकांडातील 'कर्माचा' आणि मानसपूजेतील 'मनाचा' परस्परसंबंध तपासून पहावा लागेल. सुरुवात कोठून होते हे जाणावे लागेल. अज्ञानाने झालेले कार्य आणि त्यामागचे कारण या दोन्हींचा बंदोबस्त करावा लागेल. केवळ अज्ञानाने झालेले कार्य नष्ट करून काम भागणार नाही... कारण शोधून त्यावर.. मूळावरच घाव घालावा लागेल. नुसती वरवरची पालवी खुडून अज्ञानच नष्ट झाले अशा भ्रमात राहू तर थोड्याच कालावधीत अज्ञान परत अवश्य फोफावेल... 'फोफावणे' हा अज्ञानाचा नैसर्गिक स्वभाव आहे.

अज्ञानाचेच दुसरे नाव 'माया' आहे हे कदापि विसरता कामा नये. जे आहे ते नाही, आणि जे नाही ते आहे दाखविण्यात तरबेज असणारी 'माया' अनादि कालापासून प्रसिद्ध आहे. समष्टितील मायेचे व्यष्टीत दिसणारे स्वरुप म्हणजेच 'मन' असे ज्ञात्यांचे मत आहे आणि म्हणून तेच ग्राह्य आहे.

>>>कांदा खाणे / न खाणे हे आपल्या मनावर असते. मी सवयीनुसार सणाला कांदा खात नाही. त्यातला मुख्य उद्देश घरातल्या वडिलधार्‍यांच्या समजूतींना मान देणे हाच आहे. पण उद्या कोणी सणाला कांद्याचे जेवण बनवले तरी मी ते नि:शंक मनाने खाईनच.

'नि:शंक मन' हा व्यवहारातील शब्द प्रयोग झाला. परमार्थात नि:शंक होणे म्हणजे मनाचे स्वरुप बदलून 'अमन' होणे. 'अमनस्कयोग' हा परमार्थातील प्रसिद्ध योग आहे.

परमार्थात प्रत्येक गोष्टीतील कार्य-कारण भाव तपासून पाहणे जरूरी आहे. कारणाशिवाय असणारी वस्तू समजावून घेतली पाहीजे. 'आत्मा आणि अनात्मा' असा विवेक करणारी बुद्धी सूक्ष्म असली पाहीजे, असा दंडक आहे... आणि ती तशी व्हावी, यासाठी साधनेशिवाय दुसरा कोणताही अन्य पर्याय उपलब्ध नाही. Happy

धन्यवाद!

माधव,

वरच्या संदर्भासाठी तुमचीच या बीबी वरची 5 March, 2010 रोजची ही पोस्ट पहा..... Happy

>>>
हे 'मन' म्हणजे खरच खुप गुढ आहे. >> आता तरी लिहा त्या आदिमायेबदल.

आपण जेंव्हा साघना सुरु करतो तेंव्हा ती फक्त एक भौतीक क्रिया असते. म्हणजे शरीर साधना करत असते पण त्यात मन नसते. का? कारण आपला साधनेवर विश्वासच नसतो. साखरेच्या पाकात पडलेली मुंगी कशी त्यातच अडकून जाते. थोड्या वेळाने ती त्या पाकावरच खूश होते कारण तो गोड लागत असतो. आपण देखील पाकात पडलेलोच आहोत - त्याच पाकाचे नाव माया. त्या मायेचे गारुड मनावर आणि ५ ज्ञानेंद्रियांवर चालते. आपल्याला ती मायाच खरी वाटत असते कारण आपल्या आयुष्याच्या driving seat वर आपण मनाला बसवले असते. आणि त्यावर मायेचा अंमल असतो.

आपण सगळे जण शाळेत शिकतो की सर्व भाज्या व फळे खाव्यात. तसे करणे श्रेयस आहे. पण आपल्यापैकी कितीजण सगळ्या भाज्या खातात? खात नाहीत कारण त्यांची चव आपल्या जिभेला आवडत नाही. आपण फक्त त्याच भाज्या खातो ज्यांची चव आपल्या जिभेला रुचते - प्रिय वाटते. कोणी आपल्याला साम्गितले की तेवढ्या पुरती आपण न आवडणारी भाजी खातो मग परत ये रे माझ्या मागल्या. बुध्दीला पटते की भाज्या खाणे चांगले आहे पण तिचे मनापुढे काही चालत नाहि.

तसेच साधना केली पाहिजे हे बुध्दीला पटते पण मन मात्र मायेतच खोल रुतलेले असते. पण मग ती साधना बरोबर नाही का? तर हो कदाचीत ती पूर्ण बरोबर नसेल पण कणभर तरी बरोबर असेल. हीच साधना आपल्याला मायेतून वरती खेचू लागते. अगदी मान्य की वेग अगदी कमी असेल पण आपल्याला थोडेच सगळे अंतर या वेगाने कापायचे आहे? मायेच्या आतच आपल्या आत्ताच्या जागेपासून जवळच एक स्टेशन आहे. बास तिथपर्यंत पोहचलो की झाले. तिकडे सद्गुरु उभे आहेत आपल्याला घ्यायला. मग पुढचा बहुतेक प्रवास त्यांच्याकडे असलेल्या ultrasound submarine ने करायचा.

आता बोला..... हीच ती तुम्हाला पाहीजे असणारी 'माया'. Happy

धन्यवाद!

माधवा,
आपला प्रश्न अगदी योग्य आहे... फक्त गरज आहे ती अंतर्मुख होण्याची.

त्यासाठी बहिर्मुखता म्हणजे काय हे समजावून घ्यावे लागेल.बहिर्मुखता म्हणजे आपण स्वत: शुद्ध आहोत असे वाटणे... आणि आपण (म्हणजे आपली इन्द्रिये,मन,बुद्धी,चित्त, अहंकार) सोडून समोरचा दोषी आहे असे वाटणे. अंतर्मुखतेने विचार केला गेला म्हणजे आपोआप लक्षात येते की अवघ्या विटाळाचे..दोषांचे भांडार मी स्वतः च आहे. मग समोरच्याला दोषी पकडून अंतःकरणात उमटणार्‍या वृत्तीवर लक्ष केंद्रित करणे सोपे जाते. अंतःकरण शुद्धीचे लक्षण म्हणजे समोरचा दोषी आहे असे दिसणे हळूहळू कमी-कमी होणे. ज्यावेळी समोरचा दोषी आहे असे वाटते.. तेव्हा पक्के समजावे आपले अंतःकरण अशुद्ध आहे.. विटाळलेले आहे. जेवढे समोरच्याचे दोष जास्त दिसतात तेव्हढी आपल्या अंतःकरणाची मलीनता,विटाळलेपणा अधिक... असा हा साधा, सरळ हिशोब आहे. मग अंतर्मुख व्हायचे कसे?हे साधायचे कसे? हा कळीचा मुद्दा आहे. यासाठी ज्यांचे अंतःकरण अतिशुद्ध आहे त्या श्रीसंतानाच शरण जावे लागेल. प.पू.सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काय उपदेश करतात ते पाहू या....

एकाने श्रींना विचारले,"प्रपंच चांगला असला, मुलेबाळे गुणवान असली तरी माणूस प्रपंचात गुंतून राहतो आणि प्रपंचात दु:खे,अडचणी असल्या तरी तो प्रपंचात गुंततो. ही प्रपंचाची आसक्ती सोडावीशी वाटते,पण त्या प्रमाणे आचरण होत नाही याला काय करावे?"

यावर श्रीमहाराज म्हणाले, " कळणे आणि समजणे यात फरक आहे. समजणे हे केवळ बुद्धिच्या पातळीवरच राहते. प्रपंचाची आसक्ती सुटली पाहिजे हे समजते, पण आचरणात येत नाही म्हणजे वळत नाही. बुद्धिच्या पातळीवर समजले तरी अविद्येचा जोर इतका विलक्षण असतो की तसे वागावे असे वाटूनही प्रत्यक्षात तसे वागणे होत नाही. जो अज्ञानात आहे त्याला आपल्या प्रयत्नाने त्या अज्ञानाच्या बाहेर कसे पडता येईल?त्याला जे उपाय सुचतात ते ही अज्ञानातूनच आलेले असतात.म्हणून ज्ञानी मनुष्यच त्याला बाहेर काढू शकतो.

प्रपंच्याच्या आसक्तीतून बाहेर पडायला दोन मार्ग आहेत. आसक्ती सोडावीशी वाटते पण मन तसे करू देत नाही. म्हणून पहिला मार्ग आहे म्हणजे मनच नाहीसे करणे. पण मन मोठे लबाड आहे, ते स्वतःचा नाश होऊ देत नाही. म्हणून त्या मनाच्या मागे असणारा 'मी'... कर्ता नाही, माझे गुरु किंवा भगवंत कर्ता आहे हे मनावर ठसवावे. कर्तेपणा गुरुवर सोपविता आला की जीवनात जे जे घडते ते त्यांच्या सत्तेने घडते माझे कर्तृत्व काही नाही हे कळेल आणि मग 'मी' नाहीसा होईल... आणि त्याबरोबर माझेही नाहीसे होईल.
प्रपंच माझा नाही हे कळले की आसक्ती आपोआप नाहीशी होईल. सद्गुरुंची सत्ता एकसारखी ठेवायचा उपाय म्हणजे एकसारखे नामस्मरण करावे.

प्रपंचाची आसक्ती सुटायचा दुसरा मार्ग म्हणजे शरणागती; पण ती सोपी नाही. कारण त्यातही 'मी' शरण जाणार आहे हा भाव राहतो. तथापि प्रपंचातील आघातामुळे किंवा सत्पुरुषांच्या अनुग्रहामुळे ज्याला शरणागती येईल त्याचा प्रपंच त्याचा असा राहणार नाही."


प.पू. महाराजांचे अनंत उपकार आहेत... असे वाटते श्री महाराज बोलत रहावेत आपण जिवाचे कान करून ऐकत रहावे. बोला 'श्रीराम जयराम जय जय राम.' हे महाराजा कृपा करा, आपल्या उपदेशाचे अमुल्यपण माझ्या ध्यानी यावे अशी सदबुद्धी द्या... आपणच असे विन्मुख झालात तर म्या पामराने अन्य कोठे जावे........! आपणाशिवाय, मला आपले म्हणणारे मला अन्य कोणी दिसत नाही.. कृपा करून मला पदरात घ्या.....! हे दयाघना,निर्मळा,अतिशुद्धा,निर्द्वंद्वा मला या द्वंद्वातून बाहेर काढा....! माऊलीच असे तोंड फिरवून बसली तर मी कोणाला शरण जावू. हे शरणागताला अभय देणार्‍या... सत्वर धाव.....!

धन्यवाद!

सावट नमस्कार.

मि पणा सोडण्यासाठी आणि कर्त्तेपण भगवंताकडे देण्यासाठी नक्की कसे वर्तण करणे अपेक्षीत आहे. मनातून मि पुर्णपणे घालवण्यासाठी काय करावे?

>>> प.पू. महाराजांचे अनंत उपकार आहेत... असे वाटते श्री महाराज बोलत रहावेत आपण जिवाचे कान करून ऐकत रहावे.

+१

श्री महाराजांची प्रवचने वाचताना प्रत्यक्ष श्रीमहाराज आपल्यासमोर बसून आपल्याला समजावून सांगत आहेत असेच वाटत राहते.

हसरी, नमस्कार!
कशा आहात?

>>>मि पणा सोडण्यासाठी आणि कर्त्तेपण भगवंताकडे देण्यासाठी नक्की कसे वर्तण करणे अपेक्षीत आहे. मनातून मि पुर्णपणे घालवण्यासाठी काय करावे?

हसरी, श्रीमहाराज म्हणतात त्या प्रमाणे....

सद्गुरुंची, श्रीभगवंतांची 'सत्ता' एकसारखी ठेवायचा उपाय म्हणजे एकसारखे नामस्मरण करावे.

श्रीभगवंताच्या विस्मरणातूनच हे आपले नसलेले कर्तेपण फुकटच जन्मले आहे.. म्हणूनच विस्मरणाच्या विरुद्ध.. त्यांचे सतत 'नाम'स्मरण करणे हाच सहज उपाय आहे.

'मी' पणा चे जेवढे 'स्मरण' जास्त, तेवढेच श्रीभगवंताचे स्मरण कमी... असा सरळ साधा हिशोब आहे. मग समजा सुरुवातीला २४ तासातले १ तासच भगवंताचे स्मरण रहात असेल तर राहीलेले २३ तास 'मी' चे(आपल्या कर्तेपणाचे) स्मरण आहे हे नक्कीच. हे ज्यावेळी उलट होईल म्हणजे १ तासच 'मी' आठवतोय आणि २३ तास 'श्री' आठवत आहेत.. तर समजावे... 'मी' पणा तेवढ्याच प्रमाणातच शिल्लक आहे.

हळुहळू जसजसे नामस्मरण वाढत जाईल... तस तसे वर्तन ही आपोआप सुधारत जाईल..किंबहुना वर्तनात सुधारणा झाल्याशिवाय अखंड नामस्मरण होणारच नाही... हे पक्के!:)

धन्यवाद!

सावट मि बरी आहे. तुम्ही कसे आहात? हा बीबी तुम्ही नाही आला तर बंद असतो.
तुमच्या मुळे ज्ञानात खुप मोठी मोलाची भर पडते शिवाय तुम्ही खुप छान समजवून सांगता.त्यासाठी खुप खुप धन्यवाद. येत जा इथे वेळ मिळाल्यावर. Happy

Pages