Submitted by हसरी on 3 February, 2010 - 23:00
उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?
जा'मोहन' प्यारेंचा 19 April,
जा'मोहन' प्यारेंचा 19 April, 2010 - 09:31 चा संदेश परत एकदा पाहू..
>>>
मीनः स्नानरतः फणी पवनभुक् मेषस्तु पर्णाशने नीराशी खलु चातकः प्रतिदिनं शेते बिले मूषकः ।
भस्मोद्धूलनतत्परो ननु खरो ध्यानाधिरूढो बकः सर्वे किं न हि यान्ति मोक्षपदवीं भक्तिप्रधानं तपः ॥
मासळी सतत पाण्यात स्नान करते, साप वायू भक्षण करून राहतो, बकरा पाने खाऊन राहतो, चातक तहानलेला राहतो, उंदिर बिळात राहतो, गाढव अंगाला राख फासतो, बगळा डोळे बंद करून बसतो म्हणजेच ध्यान करतो; परंतु ह्यांच्यातील कोणालाही 'तप' करूनही मोक्ष मिळत नाही. कारण तपात भक्ति प्रधान आहे.
हे नेटवर मिळाले.... अर्थात ते एक रुपकात्मक सुभाषित आहे.. पण सगळं जंगलबुक त्यात गोळा झालं आहे....
एकंदर, माणूस जे काही करतो, ते 'तप' आणि उरलेली सगळी करतात ते म्हणजे 'ताप' .. ही कल्पना काही मला पटत नाही... माशानं माशासारखं राहिलं तर त्याचं आयुष्य सफल झालं.. आंब्याच्या झाडानं आंब्याच्या झाडागत राहिलं की त्याचंही आयुष्य सफल झालं... प्रश्न फक्त माणसाचाच आहे.. माणूस माणसागत राहतो का???? अरे मानसा मानसा कधी व्हशील रे मानूस..? हाच तर प्रश्न आहे... सगळ्या निसर्गातलं माणूस हे एकमेव प्रॉब्लेम चाइल्ड आहे... ( आणि मायबोलीवरचं प्रॉब्लेम चाइल्ड म्हणजे मी.. कायम किरकिरत असतं.. )
हा संदेश आणि वरचा भरत मयेकर यांचा संदेश याचा एकत्रित विचार करायला हवा.
धन्यवाद!
अश्विनी, मग काय ठरले भक्ति
अश्विनी,
मग काय ठरले भक्ति साधन आहे की साध्य?
अश्विनी... पहील्यापासून भक्तिमार्ग सोपा असे सांगत आहात... आणि आता भक्तिला साधनापेक्षाही मोठा म्हणजे सरळ 'साध्याचा' दिलेला दर्जा ही अमान्य करता ... असे का?
धन्यवाद!
माधव, >>>तंत्रमार्गि गुरु
माधव,
>>>तंत्रमार्गि गुरु असलेल्या माउली मरहट्ट प्रांती वारकरी पंथाचा - जो भक्तिपंथ गणला जातो - पाया घालतात.
तंत्रमार्गाबद्द्ल अजून माहिती सांगाल काय?
धन्यवाद!
भक्तीमार्ग सोपा तर आहेच.
भक्तीमार्ग सोपा तर आहेच. कुठल्याही कवायती न करता यावरुन तो हात धरुन घेऊन जातो. श्रीसाईसच्चरिताचा ३२ वा अध्याय आणि त्यातली वणजार्याची गोष्ट पाहिली तर 'ते'चौघे आणि 'तो' वणजारी यांच्यातलं नातं, 'त्या' तिघांच्या आणि 'त्या' चौथ्याच्या आचरणातला फरक बरंच काही सांगून जातो (श्रीशिर्डीसंस्थानच्या साईटवर श्रीसाईसच्चरित मराठीतून उपलब्ध आहे).
आणि आता भक्तिला साधनापेक्षाही मोठा म्हणजे सरळ 'साध्याचा' दिलेला दर्जा ही अमान्य करता ... असे का?>>> पुर्ण अमान्य नाही. परंतु नुकतंच या मार्गावर बाळपाऊल टाकलेला भक्त जेव्हा पुढे पुढे जात राहतो तेव्हा अंतीम साध्यापासूनचे (श्रीगुरुचरणांपासूनचे) अंतर कमी कमी होत जाते, विभक्ती कमी होत जाते. हे पहिले पाऊलसुद्धा आपण साध्य म्हणून पाहू शकतो, प्रत्येक टप्पाही साध्य म्हणून पाहू शकतो आणि अंतिम सत्यही साध्य म्हणून पाहू शकतो. पहिलं पाऊल अशासाठी साध्य ठरु शकते कारण श्रीगुरुंच्या इच्छेशिवाय यावर एकही पाऊल पडू शकत नाही. हा मार्गच एवढा सुंदर आहे की वाटेत का थांबावे? वाटेतलं सौंदर्य अनुभवत, त्याचा आनंद घेत पुढे जातच रहायला पाहिजे. म्हणजे या मार्गावरचं प्रत्येक पाऊलही साध्य असू शकतं कारण प्रत्येक पावलाला काहीतरी मिळतच जातं., पदरात टाकलंच जातं. ज्याला हा आनंद लुटता येतो, श्रीगुरुंनाच लुटता येतं तो पुढे जातो अजून पुढचं साध्य मिळवण्यासाठी.
आणि आता भक्तिला साधनापेक्षाही
आणि आता भक्तिला साधनापेक्षाही मोठा म्हणजे सरळ 'साध्याचा' दिलेला दर्जा ही अमान्य करता ... असे का?>>> पुर्ण अमान्य नाही.
चला, साध्यात थोडा तरी बदल झाला तर!
हरकत नाही.
>>>परंतु नुकतंच या मार्गावर बाळपाऊल टाकलेला भक्त जेव्हा पुढे पुढे जात राहतो तेव्हा अंतीम साध्यापासूनचे (श्रीगुरुचरणांपासूनचे) अंतर कमी कमी होत जाते, विभक्ती कमी होत जाते. हे पहिले पाऊलसुद्धा आपण साध्य म्हणून पाहू शकतो, प्रत्येक टप्पाही साध्य म्हणून पाहू शकतो आणि अंतिम सत्यही साध्य म्हणून पाहू शकतो. पहिलं पाऊल अशासाठी साध्य ठरु शकते कारण श्रीगुरुंच्या इच्छेशिवाय यावर एकही पाऊल पडू शकत नाही. हा मार्गच एवढा सुंदर आहे की वाटेत का थांबावे? वाटेतलं सौंदर्य अनुभवत, त्याचा आनंद घेत पुढे जातच रहायला पाहिजे. म्हणजे या मार्गावरचं प्रत्येक पाऊलही साध्य असू शकतं कारण प्रत्येक पावलाला काहीतरी मिळतच जातं., पदरात टाकलंच जातं. ज्याला हा आनंद लुटता येतो, श्रीगुरुंनाच लुटता येतं तो पुढे जातो अजून पुढचं साध्य मिळवण्यासाठी.
ते शेवटचे सर्वात पुढचे साध्य काय आहे? असा प्रश्न आहे.
धन्यवाद!
साध्यात थोडा तरी बदल झाला तर!
साध्यात थोडा तरी बदल झाला तर! >>> अंतीम साध्य तेच राहिले आहे परंतु या मार्गात प्रत्येकाची रांगच वेगळी असल्याने प्रत्येकाच्या वाटचालीत (सुरुवात ते अंतीम साध्यापर्यंत असा स्पॅन) प्रत्येकाच्या प्रवासानुसार काही ना काही साध्य होत असल्याने अख्ख्या वाटेलाही साध्य म्हणू शकतो
पण या प्रवासात मध्येच मागे फिरणे झाले तर अंतीम साध्य कसे मिळणार? पुण्याला जायचं असेल तर वाटेतला खंडाळा घाट कितीही रम्य असला तरी तिथेच थांबले तर त्या ठिकाणचे साध्य पुर्ण झाले तरी जे फायनल डेस्टिनेशन आहे तिथे कसे पोहोचणार?
ते शेवटचे सर्वात पुढचे साध्य काय आहे? असा प्रश्न आहे. >>> अंतर कमी होत होत भगवंताशी, प्रेमस्वरुप परमात्म्याशी एकरुप होणे.
अश्विनी, >>>भक्ती देखिल मोक्ष
अश्विनी,
>>>भक्ती देखिल मोक्ष मागते पण सामिप्यमुक्तीच्या रुपात.
हे तुम्ही अगोदर सांगितलेले साध्य... अंतिम साध्य आहे का मधले साध्य आहे?
धन्यवाद!
तंत्र विद्येची ओळख-भाग २ या
तंत्र विद्येची ओळख-भाग २ या बाफ वरची अंबरीष फडणवीस यांची सगळ्यात पहिली पोस्ट आवश्य वाचा. साध्य काय हे अतिशय योग्य तर्हेने मांडले आहे त्यांनी.
त्या बाफवरचे इतर काहीच नाही वाचले तरी चालेल
>>अंतर कमी होत होत भगवंताशी,
>>अंतर कमी होत होत भगवंताशी, प्रेमस्वरुप परमात्म्याशी एकरुप होणे.
उपासनेची चांगली व्याख्या आहे ही. त्यामुळे गाडी परत मूळ विषयाकडे आली आहे. अशा उपासनेचे फल म्हणून ("तुझे रुप चित्ती राहो" हे सहज होण्यासाठी आवश्यक असलेले) शुद्ध चित्त मिळते असं वर एका प्रतिसादात आले आहे. वर थोडी सरमिसळ झाली आहे म्हणून परत स्पष्ट करणे जरुरी आहे की उपासना आणि भक्ती यांत शास्त्रकारांच्या व्याख्यांप्रमाणे सूक्ष्मसा फरक करता येईल. भक्तीचे शांडिल्यादी शास्त्रज्ञांनी दोन प्रकार सांगितले आहेत. गौणी आणि परा.
देव आणि मी, हे वेगवेगळे असून त्याची उपासना केल्याने मला अमुक एक असे फल प्राप्त होणार आहे अशा आशेने केलेली भक्ती ही गौणी भक्ती ठरते. यांत वावगे काहीही नाही. खुद्द भगवंतांनी त्याला आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी मधल्या अर्थार्थी भक्तांत ठेवले आहे (तशी नाथांनी "अर्थार्थी"ची खूप सुंदर व्याख्या केली आहे - जो मोक्ष या एका अर्थाच्या, म्हणजे पुरुषार्थाच्या, प्राप्तव्याच्या इच्छेने भक्ती करतो तो अर्थार्थी)
गौणीचेही काही वैधी (पूजन अर्चन असे विधीं असणारी उपासना) आणि गौणी (प्रेमयुक्त उपासना) असे उपप्रकार करतात. पण उपासना या शब्दांतच सूचित केल्याप्रमाणे हे उप आसन आहे.. देवापासून वेगळे आहे आणि त्यामुळेच त्याला साधनेचे रुप आहे.
आत्मनिवेदनास, म्हणजे मोक्षास, म्हणजे एकरुपतेस, म्हणजे आत्मारामास पराभक्ती म्हणतात.
त्याबद्दल ज्ञानोबांची ही ओवी लक्षात ठेवायची.
ज्ञानी इयेते स्वसंवित्ती | शैव म्हणती शक्ती । आम्ही परा भक्ती । आपुली म्हणो।
ज्ञानी ज्याला स्वस्वंवेद्य आत्मा म्हणतात, शैव ज्याची शक्तीरुपाने पूजा करतात तीच आमची पराभक्ती आहे.
मग अशा ज्या पराभक्तीरुप साध्यामध्ये एकरुप व्हायचंय, त्याचं स्वरुप काय आहे याचं थोडं चिंतन करुया का? ज्या गावाला जायचं त्या गावाचा पत्ता तर माहिती हवा ना?
रच्याकने, जर त्यामध्ये एकरुप व्हायचं असेल तर त्याला साध्य म्हणता येईल का?
त्याचबरोबर मूळ प्रश्न आहे उपासना कशी करायची. तिकडे थोडं दुर्लक्ष झालंय. हसरी, तुमचे त्यावरचे विचारही ऐकायला मिळू दे आम्हांला.. एकदा या सगळ्या basic concepts clear झाल्या, की पुढे काय करायचंय यांत गोंधळ उडत नाही आणि मग तंत्र बरा की अष्टांग योगच बरा, या गुरुंकडे जाऊन आजार बरे करु, त्या गुरु़कडे जाऊन सोशलवर्क करु का त्या देवी किती सुंदर, सात्विक "दिसतात" म्हणून त्यांच्याकडे जाऊ असे "गंगा गये गंगादास, जमुना गये जमुनादास" उपद्व्याप होत नाहीत.
क्षा, छान पोस्ट हसरी, तुझेही
क्षा, छान पोस्ट
हसरी, तुझेही विचार लिही.
गुरु 'दिसायला' कसा / कशी आहे त्यावर काहीच ठरत नाही. त्या वरवरच्या गोष्टी आहेत. आपल्यातलाच एक होऊन राहात असेल तर ह्या बाबी आपल्या दृष्टीस पडणारच, पण तो आपल्या अध्यात्मिक उन्नतीसाठी किंवा नुसते साक्षात्कार न देता आपल्या अध्यात्मिक बैठकीला साक्षात आकार देत असेल तर त्याला त्याच्यापद्धतीने ते काम करु द्यावे. सद्गुरु जे आपल्यासाठी जे करतात ते उचितच असते असा ठाम विश्वास असावा.
क्ष! छान सांगितले आहे. >>>
क्ष! छान सांगितले आहे.
>>> त्यामुळे गाडी परत मूळ विषयाकडे आली आहे. अशा उपासनेचे फल म्हणून ("तुझे रुप चित्ती राहो" हे सहज होण्यासाठी आवश्यक असलेले) शुद्ध चित्त मिळते असं वर एका प्रतिसादात आले आहे.
तुमचे म्हणने योग्यच आहे. अजून 'विवेका' वरच गाडी अडून आहे... 'वैराग्या'कडे अजून जाणे बाकी आहे. पुढे शमादी षटक.. मुमुक्षत्व अशी साधनसंपत्ती इ. प्रवास व्हायचा आहे. पण मूळ 'विवेक' असणे जरूरी आहे. 'भक्ती' श्रेष्ठ आहे... कारण तीच साधनही आहे आणि तिच फलस्वरुपही आहे. हाच 'विवेक' सध्या सुरु आहे.
>>>वर थोडी सरमिसळ झाली आहे म्हणून परत स्पष्ट करणे जरुरी आहे की उपासना आणि भक्ती यांत शास्त्रकारांच्या व्याख्यांप्रमाणे सूक्ष्मसा फरक करता येईल. भक्तीचे शांडिल्यादी शास्त्रज्ञांनी दोन प्रकार सांगितले आहेत. गौणी आणि परा.
खरे आहे... ! अशी सरमिसळ असणे अपेक्षितच आहे. भक्ती करणे.. म्हणजेच उपासना... आणि भक्ती स्वभावातच असणे म्हणजे पराभक्ती. पण या दोहोंच्या मधे श्रीसद्गुरुप्राप्ति होणे आवश्यक आहे. ती कशी होईल... हे पहाणे आपले.. उपासनेचे 'साध्य' आहे.
धन्यवाद!
श्री एकनाथी भागवता मधे प.पू. सद्गुरु श्रीनाथहाराज म्हणतात...
कोटिकोटि साधनें करितां | गुरुकृपेवीण सर्वथा |
हे न ये कोणाचे हाता | जाण तत्वतां उद्धवा || श्री ए. भा. २१.५३८ ||
श्रीगुरुकृपा संपादन न करता कोटि-कोटि साधने.. आपल्या मनाने केली तरी वेदार्थाचे सार प्राप्त होणे शक्य नाही.
पण म्हणून दिसेल त्या... शब्दज्ञान्याला गुरु करून घेतो म्हणून चालायचे नाही... अन्यथा श्रीभगवंतानीच अशा... घाईवाल्या साठी, असद्गुरुची योजना करून ठेवली आहे. म्हणून अगोदर स्वतः शिष्य बनावे हेच उत्तम.
याचा 'उपाय' सांगताना श्रीमहाराज पुढे म्हणतात..
ते गुरुकृपेलागीं जाण | आचरावे स्वधर्म पुर्ण |
करावें गा शास्त्र श्रवण | वेद पठण तदर्थ || श्री ए. भा. २१.५३९ ||
आपण आता कुठे 'स्वधर्मा' पाशी पोहेचलो आहोत. म्हणूनच 'भरत मयेकरांच्या' संदेशाचे महत्त्व अनन्य साधारण आहे.
या स्वधर्मा विषयी श्रीनाथ महाराज म्हणतात...
करितांही धर्माचरण | प्रवृत्तिधर्म तो अप्रमाण |
निवृत्तिधर्म तो अतिशुद्ध | हे दोषगुण स्वधर्मी || श्री ए. भा. २१.५३ ||
स्वधर्माचरणाचे गुण आणि दोष श्रीमहाराजांनी किती सहज सांगितले आहेत.
बरे यात अजून एक धोका आहे...
अत्यंत करितां कर्मादरू | तेणें कर्मठचि होय नरु |
तेथ परमार्थ नाहीं साचारू | विधिनिषेधीं थोरु पीडिजे || श्री ए. भा. २१.७१ ||
कर्मावरच भर दिला तर ... चांगले आणि वाईट याच्या जाळ्यात अडकते. आणि कर्मठपणा पदरी पडतो. सदाचाराचा पत्ताच चुकल्यामूळे 'परमार्थ' अति दूर रहातो.
केवळ स्वधर्मकर्म सांडितां | अंगीं आदळे पाषंडता |
तेणेंही मोक्ष न ये हाता | निजस्वार्था नागवले || श्री ए. भा. २१.७२ ||
बरे मग कर्मच नको म्हणून स्वधर्मकर्मच टाकून दिले तर अंगी पाषांडता वाढीला लागते... माणुस विचारू लागतो.. परमेश्वर खराच आहे का? तो शास्त्रावरच अविश्वास दाखवू लागतो. आमचा ईश्वर खरा का तुमचा खरा.. या केवळ चर्चेतच रस दाखवतो. अशाने 'मोक्ष' नावाचा निजस्वार्थ अतिदूर रहातो.
म्हणूनच श्री म्हणतात...
यालागीं स्वधर्म आचरतां | निजमोक्ष लाभे आइता |
हे वेदार्थाची योग्यता | जाणे तो ज्ञाता सज्ञान || श्री ए. भा. २१.७३ ||
स्वधर्माच्या आचरणाने... आपल्या जवळच असणारा.. पण स्वर्गसापेक्ष दूर भासणारा मोक्ष नावाचा 'अर्थ' आइताच लाभतो. असा जो 'वेदार्थ' आहे तो सज्ञान.. ज्ञाता, श्रीगुरुकृपेने अवश्य जाणतो.
धन्यवाद!
आमचा ईश्वर खरा का तुमचा खरा..
आमचा ईश्वर खरा का तुमचा खरा.. या केवळ चर्चेतच रस दाखवतो. >>> हे टाळणे अत्यंत महत्वाचे आहे.
सावट, पोस्ट नेहमीसारखीच उत्तम
वाह , मस्त धागा सगळ्या
वाह , मस्त धागा
सगळ्या ९१२पोस्टी वाचून काढतो हळू हळू.. मग रिप्लाय देतो
आराध्य दैवताचे (आपल्याला
आराध्य दैवताचे (आपल्याला आवडणाऱ्या देवाचे ) रोज नामस्मरण करावे .
प्रपंचात चोख राहावे .
इतर माणसांशी माणसांसारखेच वागावे .. जनावरासारखे नाही .
नाहीतर सकाळी देवाला एकदा हात जोडले , कि दिवसभर मनमुराद श्या घालायला मोकळे .
वृत्ती स्थिर असावी. कोणाबद्दल शक्यतो वाईट बोलू नये , राहणी साधी असावी , कितीही उच्च पदावर कार्यरत असलो तरी .
गुरु असल्यास त्याचा निर्णय हा अंतिम मानावा, कितीही कटू असला तरी , आपल नशीब एकदा त्याच्या हाती सोपवलं कि आपण जास्त डोक चालवायच नाही.. आपल्याला उत्तम असेच तो देणार हि खात्री बाळगावी (याचे बरेसचे अनुभव मला आलेले आहेत )
स्तोत्र, यज्ञ - याग, उपास -तापास . यंव नि त्यांव .. इत्यादींचे स्तोम माजवू नये ..
मोक्ष, मुक्ती,सगुण निर्गुण,पुराण, उपनिषद बापरे एवढे जड शब्द वापरून कशाला फुका शब्दांचा आणि विचारांचा भार व्हायचा? चर्चा करून त्यावर वाद विवाद झोडायचे ?
याने तसं काहीही साध्य होणार नाही
हे म्हणजे पहिलीतल्या मुलाला PHD चा अभ्यास शिकवण्यासारख आहे
make it simple
नामस्मरणासारखी साधी सोपी उपासना नाही. कधीही कुठेही केंव्हाही करता येते.
माझ्यासाठी उपासना आणि अध्यात्म म्हणजे हेच ..
वृत्ती स्थिर करणे अजूनही जमलेले नाही.. बाकीच्या पायऱ्या तर दूरच.. पहिलाच धडा अजून गिरवतोय
असो गुरु आहेत पाठीशी .. पाहून घेतीलच
प्रसन्न, छान सांगितले आहे...
प्रसन्न, छान सांगितले आहे... धन्यवाद!
एक गोष्ट प्रामाणिक पणे आपण सगळ्यांनी लक्षात घेणे जरूरी आहे.
मोक्ष, मुक्ती,सगुण निर्गुण,पुराण, उपनिषद इ. सर्व श्रीसद्गुरुतत्वांनीच उपदेशीले आहे...! श्रीवेद हे प्रत्यक्ष श्रीभगवंतांच्या निश्वासातून उत्पन्न झाले आहेत... तर उपनिषदांचे सार श्रीमद् भगवतगीता आणि श्रीमद् भागवत श्रीभगवंतानी स्वतःच्या मुखाने सांगितली आहे. म्हणजेच..अर्थातच त्याचे प्रयोजन असणार... त्याची गरज अवश्य लागत असणार.
तसेच... स्तोत्र, यज्ञ - याग, उपास -तापास इत्यादिंचे रचनाकर्ते ही सर्व आत्मज्ञानीच होते. या सगळ्यांना, स्वतःला आत्मज्ञान असल्यामुळे, गरज संपल्यामुळे.. परत हे सगळे शब्दबद्ध करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. असे असतानाही त्यांनी हे सगळे सांगितले.. म्हणजेच त्याची उपयुक्तता ही असलीच पाहीजे.
आपल्याला आता.. आज गरज वाटत नसल्यास... पुढे गरज लागणार नाही असे म्हणणे म्हणजे .. श्रीभगवंतावरच, पर्यायाने श्रीसद्गुरुतत्वावरच अविश्वास दाखविल्यासारखे होते... असो.
असे असे करा म्हणून सांगितले आणि समोरच्याने तस तसे केले ... असे सहज झाले असते तर सर्व चर्चेची गरजच नाही... ना सद्गुरुंची... ना शास्त्राची.. ना पुराणांची! पण तसे होत नाही हा आपलाच अनुभव आहे. आपल्याच काया,वाचा, मनात कमालीची तफावत असते. आपल्या मनात एक असते, आपण बोलतो दुसरेच आणि करतो तिसरेच. वरुन पहाताना सर्व आलबेल दिसते, पण प्रसंग आला की त्रेधातिरपिट उडते.
कृतयुग,त्रेतायुग,द्वापारयुग आणि आताचे कलीयुग अशी गुणपरत्वे काळाची विभागणी आहे. कृतयुगात.. परमेश्वर खरच आहे का? असा प्रश्नच पडायचा नाही. जन्मतःच सगळ्याची मने स्थिर असायची, बुद्धी निर्मल आणि शांत असायची. त्यामुळे त्यावेळेला गुणपरत्वे भेदच नसायचे. वेदांताचे ज्ञान अशा मन आणि बुद्धीत सहज ग्रहण व्हायचे. शरीर असतानाच 'आत्मज्ञान' मिळाल्यामुळे सर्वच जिवनमुक्त दशेत असायचे. त्यावेळी चार वर्ण, चार आश्रम असा भेदच आस्तित्वात नव्हता.
अमुक शरीर, अमुक मन, राहीलेले जग...बाकी आत्मा, आणि तो 'आत्मा' तू आहेस,
तू द्रष्टा आहेस, तू चेतन आहेस, तूला जन्म-मरण नाही,
तू आत्मस्वरूप आहेस, तुला उदय-अस्त नाही,
तुला सुख-दु:ख नाही, तू स्वतः आनंद आहेस, तूच सुखस्वरुप आहेस, तूच प्रेमस्वरुप आहेस,
तू भाव-अभाव रहित आहेस,
तू आकार-निराकार, सगुण-निर्गुण, जाणिव-नेणिव याच्या पलीकडचा आहेस,
तू स्वसंवेद्य आहेस, बुद्ध्यादि कोणत्याही वृत्तींनी तुझे ज्ञान होणे शक्य नाही, तू स्वतःच स्वतःला जाणू शकतोस,
तू सत्-असत् दोन्हींही नाहीस, तू अनादि आहेस.. तूला आदि-अंत नाही,
तूला वृद्धी वा क्षय नाही, तुला पाप-पुण्य नाही, तू सदा एकसमान आहेस,
तू अपरिवर्तनशील आहेस, तूच नित्य आहेस,तूच सर्व साक्षी आहेस,
तू स्वयंप्रकाश आहेस, तुझ्या प्रकाशामुळेच दृश्यरुपी जग भासते,
केवळ तूच एक चेतन आहेस..तूझ्या मुळेच जड बुद्धी चेतन भासते.. तुझ्यामुळेच जड मन चेतनासारखा व्यवहार करते... तुझ्यामुळेच जड शरीर चेतन भासते,
तूच शक्ती आहेस, तूच भक्ती आहेस, तूच ब्रह्म आहेस, तूच आत्मा आहेस.. बाकी सर्व अनात्मा आहे.
असे उपदेश श्रीगुरुमुखातून होताक्षणी तसा प्रत्यक्ष अनुभव यायचा.
पण आता.. कलीयुगात परमेश्वर आहे का नाही यावरच कोरडी चर्चा होते. श्रीसद्गुरुवर विश्वास आहे असे म्हणणारे ढिगभर सापडतात, श्रीसद्गुरु सर्वावर समान, निरपेक्ष कृपा करतात असेही कबुल करतात. पण आपल्यात दोष आहे हे कबुल करणारा एकही प्रामाणिक पट्ठा छातिठोकपणे पुढे येत नाही. मी आहे तसाच राहीन, तरीही, तशाच अवस्थेत श्रीसद्गुरुंनी आपल्यावर कृपा करावी अशा भलत्याच कल्पनेत दंग असतात. .. काहीजण तर माझ्यावर श्रीसद्गुरुंची कृपा आहेच असे सांगायलाही कमी करत नाहीत. श्रीसद्गुरुतत्वाला समजावून घेण्याची माझी मानसिक तयारीच नाही.
असो.... श्री अवधूतचिंतन गुरुदेव दत्त ! हे महाराजा माझ्या अपराधाची त्रिवार क्षमा कर !! 'आगा जे झालेचि नाही' या विवेकाचा मला परत एकदा विसर पडला.
शेवटी..श्रीकबीरदास म्हणतात तेच खरे..." माया महा ठगिनी मैं जानी".
धन्यवाद... महाराजा!
पहिलीतल्या मुलाला PHD चा
पहिलीतल्या मुलाला PHD चा अभ्यास शिकवण्यासारख आहे
सावट म्हणून मी हे वाक्य लिहील होतं
गरज तर आहे.. पण ती योग्य वेळी
प्रसन्न, >>> पहिलीतल्या
प्रसन्न,
>>> पहिलीतल्या मुलाला PHD चा अभ्यास शिकवण्यासारख आहे.

तुम्ही बरोबरच लिहले आहे,.... ज्याला 'नाम' कळाले त्याला 'सर्व' कळाले.
पहितला असूदे, वा PHD वाला असूदे... दोघांनाही 'भूक' लागते.
पंचपक्वान्न तयार आहे म्हणून तान्ह्या बाळाला त्याचा काय उपयोग, त्याची भूक केवळ आईच्या दूधानेच भागू शकते. प्रश्न आहे तो 'तान्हेपणाचा'! आई शिवाय त्याला काही कळतच नाही.
धन्यवाद! असाच लोभ असावा.
महेश, कोठे आहात? >>>हतो वा
महेश,
कोठे आहात?
>>>हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम, जित्वा वा भोक्ष्यसे महिम |
तस्मात उत्तिष्ठ कौन्तेय, युद्धाय कृतनिश्चयः |
काय ठरले मग... 'पृथ्वीचे राज्य' की 'स्वर्गभोग' ?
धन्यवाद!
कृतयुग,त्रेतायुग,द्वापारयुग
कृतयुग,त्रेतायुग,द्वापारयुग आणि आताचे कलीयुग अशी गुणपरत्वे काळाची विभागणी आहे. कृतयुगात.. परमेश्वर खरच आहे का? असा प्रश्नच पडायचा नाही. जन्मतःच सगळ्याची मने स्थिर असायची, बुद्धी निर्मल आणि शांत असायची. त्यामुळे त्यावेळेला गुणपरत्वे भेदच नसायचे. वेदांताचे ज्ञान अशा मन आणि बुद्धीत सहज ग्रहण व्हायचे. >>> सावट, चार युगे म्हणजेच कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुगातील मानवाची अध्यात्मिक जडण घडण कशी बदलत गेली याबद्दल सांगाल का?
भक्ती देखिल मोक्ष मागते पण सामिप्यमुक्तीच्या रुपात.
पण भक्ती ही या वाटेवरचं पहिलं तसेच मधली तसेच शेवटचे (रेमस्वरुप परमात्म्याशी एकरुप होणे) पाऊलही आहे. या अख्ख्या वाटेवर भक्ती आवश्यक आहे.
हे तुम्ही अगोदर सांगितलेले साध्य... अंतिम साध्य आहे का मधले साध्य आहे? >>>> माझा गोंधळ उडतोय खरंतर
>>>चार युगे म्हणजेच कृतयुग,
>>>चार युगे म्हणजेच कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुगातील मानवाची अध्यात्मिक जडण घडण कशी बदलत गेली याबद्दल सांगाल का?
कृतयुगात, स्वस्वरुपाचे अनुसंधान सहज रहायचे... आता 'स्वस्वरुप' म्हणजे काय? असाच बेसिक प्रश्न समोर आहे. आणि 'मी म्हणजे देह', आणि असे देह 'अनेक' आहेत त्यामुळे.. या कल्पनेने भला मोठा फौजफाटा तयार झाला आहे. आता प्रश्नाचे स्वरुपच बदलले आहे... प्रश्न आहे... शरीरात खरेच 'आत्मा' असतो का? असो... काहीच हरकत नाही, प्रश्न पडणे महत्त्वाचे आहे.
कृतयुगात, काया-वाचा-मन यात नैसर्गिक एकता होती. जे मनात असेल तेच बोलले जायचे, जे बोलले तेच केले जायचे. आता काया-वाचा-मन यात पुर्णपणे फारकत आहे. त्यावेळी बाहेर.. शरीरात भेद होते, पण मनात नव्हते. आता मनात भेदाचे थैमान आहे आणि बाहेर सगळे 'सम' आहे असे दाखविण्याचा आटपिटा चालला आहे. तोंड शांती बद्द्ल बोलते आहे, आत मधे शस्त्रसाठा वाढतो आहे. परिणामी अशांती, स्पर्धा वाढत चालली आहे. असो.. सगळ्यांना शांती,सुख,समाधान मिळावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना.
>>>भक्ती देखिल मोक्ष मागते पण सामिप्यमुक्तीच्या रुपात.
हे तुम्ही अगोदर सांगितलेले साध्य... अंतिम साध्य आहे का मधले साध्य आहे? >>>> माझा गोंधळ उडतोय खरंतर पण भक्ती ही या वाटेवरचं पहिलं तसेच मधली तसेच शेवटचे (प्रेमस्वरुप परमात्म्याशी एकरुप होणे) पाऊलही आहे. या अख्ख्या वाटेवर भक्ती आवश्यक आहे.
काही हरकत नाही. आपण आपल्या मताशी प्रामाणिक रहायचे (काय-वाचा-मनाने) म्हणजे झाले. 'योग आणि बोध'.. म्हणजेच 'श्रीसद्गुरुप्रदत्त साधना आणि सद्विवेक', एकमेकाच्या बरोबरच जायला हवेत. विचारातील बदल हाच खरा बदल.
श्रीनाथमहाराज म्हणतात त्याप्रमाणे...
ते गुरुकृपेलागीं जाण | आचरावे स्वधर्म पुर्ण |
करावें गा शास्त्र श्रवण | वेद पठण तदर्थ || श्री ए. भा. २१.५३९ ||
धन्यवाद!
अश्विनी, संतश्रेष्ठ
अश्विनी,
संतश्रेष्ठ श्रीतुकाराम महाराजांचा एक अभंग पाहू..
काय मागावे कवणासी | ज्यासी मागो तो मजपाशी || १ ||
जरी मागों पद इंद्राचे | तरी शाश्वत नाही त्याचे || २ ||
जरी मागो ध्रुव पद | तरी त्यांसी येथील छंद || ३ ||
स्वर्गभोग मागों पूर्ण | पुण्य सरल्या मागुती येणें || ४ ||
जरी मागो पद वैकुंठ | ते तव येकदेशी करंटे || ५ ||
आयुष्य मागों चिरंजीव | जीवा मरण नाही स्वभावे || ६ ||
तुका म्हणे एक मागें | एकपण नाही भंग || श्री तु.गा.३२९७ ||
साधकाला श्रीसंतसंगतीची, त्यांच्या उपदेशाची नितांत जरूरी का असते ते या प्रसंगात ठळकपणे कळते. श्री भगवंत समोर उभे राहून काय पाहीजे? असे विचारतील तर नुसताच 'विवेक' कामाला येत नाही, बरोबर 'वैराग्य' असेल तरच काय मागायचे ते कळते. विवेकाशिवाय कोरडे वैराग्य आंधळे आहे, तर वैराग्याशिवाय सडा विवेक हा पांगळा आहे. मुळातच 'वैराग्य' नसेल तर शास्त्र कळतच नाही.
श्रीमहाराज म्हणतात...
आता आणखी दुसर्या कोणाला काय मागू... ज्याला मागायचे ते श्रीभगवंतच आता माझ्यापाशी आहेत...
जर 'इंद्रपद' मागावे तर.. ते ही शाश्वत नाही...
अढळ असे 'ध्रुवपद' मागावे तर.. स्वतः ध्रुव ऐहीक छंदात आहेत..
स्वतःच्या पुण्याच्या भरोशावर विसंबुन, 'स्वर्गाचे सुख' मागावे तर पुण्य संपताच परत जन्म-मरण पाठीला लागेल...
जर श्रीहरीचे 'वैकुंठपद' मागावे तर... तर तेही एकदेशीय आहे.. म्हणे श्रीहरी केवळ इथेच आहेत असे समजून ते पद मागणेही करंटेपणाचे आहे....
जर 'चिरंजीवपद' मागावे तर जीवाला.. मला, आता स्वाभाविकपणे मरण नाही, हे कळले आहे.
म्हणूनच हे सगळे न मागता आता मी श्रीहरीशी 'एकपणच' मागतो.. कारण हे एकचपद असे आहे जे स्वभावत: कधीही न भंगणारे, म्हणजेच 'अभंग' आहे.
धन्यवाद!
म्हणूनच हे सगळे न मागता आता
म्हणूनच हे सगळे न मागता आता मी श्रीहरीशी 'एकपणच' मागतो.. >>> एवढं आणि फक्त एवढंच मनापासून हवंय. पण एकीकडे वाटतं लायकी तरी आहे का आपली हे मागायची?
विवेकपुर्ण वैराग्याबद्दलच्या श्रीसाईसच्चरितातल्या काही कथा आठवल्या. साईंच्या भक्तांच्या (उदा. नानासाहेब चांदोरकर) आचरितातून घ्यायच्या बोधांपैकी हा पण महत्वाचा बोध.
अश्विनी, ती लायकी असते, का
अश्विनी,
ती लायकी असते, का मिळवावी लागते?
तेच ते रे! काय म्हणायचंय ते
तेच ते रे! काय म्हणायचंय ते समजून घे. शब्दांत पकडू नकोस. आधीच इथे फेफे उडतेय. ती लायकी देखिल मिळाली तर मिळणार त्याच्या अकारण कारुण्यामुळेच.
'मी' भक्ती केली, 'मी' उपासना केली, 'मी' त्याच्यावर प्रेम केलं, 'मी' त्याला मागून घेतलं... आणि त्याला मिळवण्याची लायकी मला मिळाली.... असं होत नसतं. सगळ्यांनी त्याला लुटूनही परत पुर्णत्वानेच उरणार्या त्याला मिळवण्यासाठी आपलं इतकुस्सं प्रेम कारणीभूत नसतं. त्याचं अमर्याद प्रेमच कारणीभूत असतं.
सावट ____/\____ विवेक आणि
सावट ____/\____
विवेक आणि वैराग्या बाबत अजुन लिहा ना? उदा. देउन अजुन स्पष्टीकरणासह सांगा. मला ते निट समजलं नाही आहे.
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी |
तुळसीहार गळां कासे पीतांबर | आवडे निरंतर हेंचि ध्यान || २ ||
मकरकुंडले तळपति श्रवणी | कंठी कौस्तुभमणि विराजित || ३ ||
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख | पाहीन श्रीमुख आवडीने || श्री तु.गा. १४ ||
धन्यवाद!
सावट, डोळे निवले
सावट, डोळे निवले
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती | रखुमाईच्या पती सोयरिया || १ ||
गोड तुझें रूप गोड तुझें नाम | देईं मज प्रेम सर्व काळ || २ ||
विठो माउलिये हाचि वर देईं | संचरोनि राहीं हृदयामाजी || ३ ||
तुका म्हणे कांहीं न मागे आणिक | तुझे पायीं सुख सर्व आहे || ४ ||
हाचि नेम आतां न फिरें माघारी | बैसलें शेजारीं गोविंदाचे || १ ||
घररिघी जालें पट्टराणी बळें | वरिलें सांवळें परब्रह्म || २ ||
बळियाचा अंगसंग झाला आतां | नाहीं भय चिंता तुका म्हणे || ३ ||
आपुलिया हिता जो असे जागता | धन्य मातापिता तयाचिया || १ ||
कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक | तयाचा हरिख वाटे देवा || २ ||
गीता भागवत करिती श्रवण | अखंड चिंतन विठोबाचें || ३ ||
तुका म्हणे मज घडो त्याची सेवा | तरी माझ्या दैवा पार नाहीं || ४ ||
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म | भेदाभेद भ्रम अमंगळ || १ ||
आइका जी तुम्ही भक्त भागवत | कराल ते हित सत्य करा || २ ||
कोणाही जीवाचा न घडावा मत्सर | वर्म सर्वेश्वरपूजनाचे || ३ ||
तुका म्हणे एका देहाचे अवयव | सुखदु:ख जीव भोग पावे || ४ ||
धन्यवाद!
संतश्रेष्ठ श्री तुकाराममहाराज
संतश्रेष्ठ श्री तुकाराममहाराज आपल्या अमुल्य उपदेशात म्हणतात....
युक्ताहार न लगे आणिक साधने | अल्प नारायणें दाखविले || १ ||
कलियुगामाजी करावे कीर्तन | तेणे नारायण देईल भेटी || २ ||
न लगे लौकिक सांडावा वेव्हार | घ्यावे वनांतर भस्म दंड || ३ ||
तुका म्हणे मज आणिक उपाव | दिसती ते वाव नामेंविण || सा.तु.गा. ७१||
काय खाऊ, कसे खाऊ, काय करू, कसे करू इ.व्यर्थ चिंतेत विनाकारण वेळ न घालवता, स्वत: श्रीनारायणाने जे साधे साधन दाखविले आहे त्याचा लाभ घ्या. या घोर कलियुगात केवळ नामसंकीर्तनानेच श्रीहरी संतुष्ट होतो. त्यासाठी... श्रीनामघेण्यासाठी.. आपला लौकिकातला रोजचा व्यवहार बाजूला ठेवायला लागत नाही की.. भस्म, दंड इ. घेऊन वनात जायची गरज पडत नाही.
श्रीमहाराज म्हणतात... श्रीनामाशिवाय अन्य उपाय वाया जातील.
धन्यवाद!
थोड विशयान्तर आहे ,, मला
थोड विशयान्तर आहे ,,
मला विचारयचे आहे कि गुरुचरित्राचे पारायण कशा प्रकरे करावे.. म्हनजे .. सात दिवसाचे पारायण करताना उपास कस करावा.. काय खावे काय नाही... कसे आचरण असावे? नोकरि करनर्यनि सर्व नियम कसे पाळावे?
तसेच गुरुचरित्राचा महीमा विशद करावा..क्रुपया..
Pages