Submitted by हसरी on 3 February, 2010 - 23:00
उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?
हसरी, एक गोष्ट तुमच्या लक्षात
हसरी,
एक गोष्ट तुमच्या लक्षात आलीच असेल की... 'वर्तन'(आपले स्वतःचे...समोरच्याचे नाही.) सुधारावे म्हणून आपण नामस्मरण करायचे. याचा अर्थ आपले 'वर्तन' दोषपुर्ण आहे, हे अगोदर मान्य झाले पाहीजे... तरच सुधारायची शक्यता आहे.
तसेच नामस्मरणाने जस जसा वर्तनात फरक पडायला लागेल... तसतसे नामस्मरण अखंड व्हायला लागेल. म्हणजेच अगोदर नाम हे 'साधना'सारखे कार्य करते... आणि त्यातूनच हळुहळू 'नाम' हेच 'साध्य' ही आहे, याचा आतून 'बोध' व्हायला लागतो. ही स्थिती कशी आहे.. हे जो 'नाम' घेईल त्यालाच कळेल. इतरांना संपुर्ण जन्म चर्चेत घालवला तर कळणार नाही.
श्रीभगवंताच्या नामावर श्रद्धा उत्पन्न होण्यासही श्रीभगवंताचीच कृपा लागते. अन्यथा हे बिन दामाचे, बिन कष्टाचे, इतरांची काडीचीही मदत न घेता होणारे... सहज नामस्मरण ही महादुर्लभ होते. यात सोंग आणता येत नाही... कारण प्रत्यक्ष अनुभवाशी गाठ आहे... मिथ्या कल्पनेचे काम नाही.
या नामस्मरणाचा अजून एक पैलू पाहूया. आपण बोलताना बर्याच वेळा सहज म्हणतो... दिवसभर काम केल्यावर रात्री झोपताना एक वेळ श्रीभगवंताचे नाम रुपी स्मरण केले तर चालून जाते... पण हे झाले आपले मत... पण श्रीसंताचे यावर काय मत आहे हे पहावे लागेल. आपले मत आणि श्रीसंताचे मत जुळते का? हे आपले आपल्यालाच प्रामाणिक विचाराने तपासता आले पाहीजे.
प.प.श्रीसद्गुरु टेंब्येस्वामी महाराज काय म्हणतात ते पाहू या.... श्री आपल्या एका स्तोत्रात म्हणतात...
।। अपराधक्षमापनस्तोत्रम्।।
रसज्ञा वशा तारकं स्वादु लभ्यं गृहीतं कदाचिन्न ते नाम दत्त ।
क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त ।।१।।
हे दयाळा श्रीदत्तप्रभो, माझी जीभ 'रस' ज्ञान देणारी आहे... ती माझ्या मनानुसार वागते. तिच्या या मनःपुत आचरणामुळे, आपले भवभय दूर करणारे सहज नाम(ब्रह्मरसानेयुक्त), तिने कधीच घेतले नाही. माझ्या या अक्षम्य अपराधाची त्रिवार क्षमा करावी. ( 'श्री'... नाम न घेणे, हा अक्षम्य अपराध आहे असे ठणकावून सांगत आहेत... म्हणूनच श्रीसंताचे आणि आपले मत जुळते का हे पहाणे जरुरी आहे. आपले मत हे आपल्याच 'अज्ञानी' मनाचे दर्शक असते... तर ज्ञात्यांचे मत ज्ञानमय असते.)
वियोन्यन्तरे दैवदार्ढ्याद्विभो प्राग्गृहीतं कदाचिन्न ते नाम दत्त ।
क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त ।।२।।
हे दत्तप्रभो, या आता मिळालेल्या, मनुष्यजन्माच्या अगोदरच्या.. इतर जन्मात नाम ग्रहणाची पात्रता नसल्यामुळे.. मी नाम कधीच घेऊ शकलो नाही...या माझ्या अपराधाची त्रिवार क्षमा करावी.
मया मातृगर्भस्थितिप्राप्तकष्टाद् गृहीतं कदाचिन्न ते नाम दत्त ।
क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त ।।३।।
पुढे मातेच्या गर्भात असताना होणार्या अनंत यातनामुळे मी आपले नाम घेऊ शकलो नाही,
हे दयाळा ...या अपराधाची, मला त्रिवार क्षमा करावी.
मया जातमात्रेण संमोहितेन गृहीतं कदाचिन्न ते नाम दत्त ।
क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त ।।४।।
नंतर जन्म झाल्याबरोबर.. विष्णुमायेने मोहित झाल्यामुळे, मला आपले नाम घेता आले नाही.. म्हणून हे दयासागरा मला क्षमा करावी.
मया क्रीडनासक्तचित्तेन बाल्ये गृहीतं कदाचिन्न ते नाम दत्त ।
क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त ।।५।।
लहानपणी खेळात मन गुंतल्यामुळे आपल्या नामाचे विस्मरण झाले... त्याबद्द्ल मला क्षमा करावी.
मया यौवनेSज्ञानतो भोगतोषातद् गृहीतं कदाचिन्न ते नाम दत्त ।
क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त ।।६।।
तरुणपणी प्रबळ अज्ञानामुळे विषयभोगात रमलो... नामाचे परत विस्मरण झाले याबद्द्ल पुन्हा पुन्हा क्षमा करावी.
मया स्थाविरेSनिघ्नसर्वेन्द्रियेण गृहीतं कदाचिन्न ते नाम दत्त ।
क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त ।।७।।
वार्धक्यात इंद्रियावर ताबा नसल्यामुळे नाम घेता आले नाही याबद्द्ल क्षमा असावी.
हृषीकेश मे वाङ्मनःकायजातं हरे ज्ञानतोSज्ञानतो विश्वसाक्षिन् ।
क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त ।।८।।
हे हृषीकेशा..अशा प्रकारे, जाणते-अजाणतेपणी माझ्या वाणी,मन, आणि शरीर यांच्या द्वारे जे जे अपराध घडले असतील, त्या सर्वांची.. क्षमा असावी.
स्मृतो ध्यात आवाहितोSस्यर्चितो वा न गीतः स्तुतो वन्दितो वा न जप्तः ।
क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त ।।९।।
हे महाराजा.. मी आपले स्मरण केले नाही, ध्यान केले नाही, आवाहन केले नाही, पूजन-अर्चन केले नाही,गायन केले नाही, स्तवन केले नाही, वंदन वा नामजप केला नाही.. या अनंत अपराधाबद्द्ल मला क्षमा करावी.
दयाब्धिर्भवादृङ्न सागाश्च मादृग्भवत्याप्तमन्तोर्भवान्मे शरण्यः।
यथालम्बनं भूर्हि भूनि:सृतांघ्रेरिति प्रार्थितं दत्तशिष्येण सारम्।।१०।।
हे स्वामीराजा आपण दयेचे सागर आहात आणि मी अपराधाचा सागर आहे.मज अपराध्याचे.. शरणागताचे केवळ आपणच आधार आहात. अज्ञानाने जमिनीवर पाय घसरून पडल्यावरही जसा जमिनीचाच आधार असतो.. तसाच भक्ताचे आणि माझ्यासारख्या अभक्ताचेही आपणच आधार आहात. अशी ही (वास्तवाचे दर्शन घडविणारी) साररूप प्रार्थना आपल्याला.. आपल्याच शिष्याने केली आहे.
इति श्री प. प. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं अपराधक्षमापनस्तोत्रं संपूर्णम् ।।
धन्यवाद!
सावट, छान सांगितलत.
सावट, छान सांगितलत.
धन्यवाद,माधवा ! संतश्रेष्ठ
धन्यवाद,माधवा !:)
संतश्रेष्ठ प.पू. सद्गुरु श्रीतुकाराम महाराजांचा एक अभंग पाहू....
येऊनि नरदेहा विचारावे सार | धरावा पै धीर भजनमार्गी || १ ||
चंचळ चित्तासी ठेवुनियां ठायीं | संताचिये पायीं लीन व्हावे || २ ||
भावाच्या पैं हाते धरावा निश्चय | तेणें भवभय देशधडी || ३ ||
नामापरते जगी साधन सोपे नाहीं | आवडीनें गाई सर्वकाळ || ४ ||
तुका म्हणे वंश धन्य त्या नराचा | ऐशा निश्चयाचा मेरू झाला || श्री तु.गा. ३३४७.५ ||
नरदेह मिळाल्यावर... 'मागचे-आजचे-पुढचे' असा सारासार विचार करण्याची बुद्धी मिळते, त्याचा उपयोग झाल्यामुळे, ज्यावेळी या जन्माचे 'सार' काय? असा प्रश्न पडतो त्यावेळी धीराने,धैर्याने श्रीभगवंताच्या भजनमार्गाची कास धरावी. धैर्य कशासाठी? चित्त चंचळ असल्यामुळे, ते या श्रीभजनामुळे हळुहळू स्थिर होईल. ते तसे स्थिर होई पर्यत धैर्य म्हणजेच 'श्रद्धा आणि सबुरी' याची जरूरी लागतेच लागते.
या भजनमार्गाला लागल्यामुळे श्रीभगवंतांची कृपा होईल, त्यामुळे श्रीसंताची भेट होईल. आपल्या चंचळ चित्ताचा स्वभाव जाणून श्रद्धेने, ते चित्त स्थिर व्हावे म्हणून श्रीसंताना शरण जावे. केवळ श्रीसंताच्याकृपेनेच चित्ताला स्थैर्य लाभेल.. त्यामुळे आपले भवभय देशोधडीला लागेल, अशा श्रद्धेने...विचाराने या बुद्धीचा निश्चय करावा... !
श्रीसंताना शरणगेल्यामुळे... त्यांची कृपा होईल आणि ते परम पावन अशा श्रीनामाचा उपदेश करतील. या जगात हे कृपेने मिळालेले श्रीनामच आवडीने.. प्रेमाने 'सर्वकाळ' गाणे, हेच चित्त स्थैर्याचे सर्वात 'सहज' साधन आहे.
अशा प्रकारे ज्याला, धैर्याने... निश्चयाने, विचारांती आलेल्या श्रद्धेने.. श्रीभजनाच्या मार्गाला लागल्यामुळे ... श्रीनामरुपी साधनाची प्राप्ती झाली आणि जो साधनरत झाला, त्या नराचा वंश 'धन्य' होतो.. त्याच्याच नर जन्माचे सार्थक होते, त्यालाच नर देहाला आल्याचे 'सार' मिळते.
श्रीभगवंताची कृपा झाल्यामुळे आत्मज्ञानी संताची भेट होते. अशा श्रीसंताची भेट झाल्यामुळे त्यांच्या कृपेने चित्त स्थिर होते.. त्यामुळे 'ज्ञान' स्थिर होते आणि ज्ञान स्थिर झाल्यामुळे 'आत्मरुपी'... साररुपी श्रीभगवंताची भेट होते..... असा अमुल्य उपदेश श्रीमहाराज करत आहेत.
धन्यवाद!
सावट, स्तोत्र किंवा अभंग घेऊन
सावट, स्तोत्र किंवा अभंग घेऊन त्यातूनच भक्तीमार्गावर आधारीत पोस्ट्स लिहिणे आवडले
saavat, आपले संदेश प्रखर
saavat,
आपले संदेश प्रखर उन्हातल्या सावलीसारखे आहेत. उगीच सावट म्हणवता स्वत:ला!
आपण लिहिलेलं थेट भिडतं. किती आभार मानावेत आपले!
आ.न.,
-गा.पै.
Dr SriKrishna Deshmukh Online
Dr SriKrishna Deshmukh Online Pravachane
Dr SriKrishna Deshmukh (Dr Kaka) will be delivering Pravachans online from Seattle ( July 9 -13 and July 16 - 20 2012 from 6:00 - 7:00 pm PDT or 9:00 - 10:00 pm EST).
विषय - आनंदाचे तत्वज्ञान” (Philosophy of Bliss)
ह्या जगात सगळ्यांना हवी असलेली निर्विवाद गोष्ट म्हणजे 'आनंद'. पण आनंद म्हणजे नक्की काय ? आनंद आणि सुख ह्यात फरक काय ? विषयनिरपेक्ष सुख म्हणजे आनंद कसा मिळवायचा ? ह्या सगळ्या गोष्टींचा परमार्थ शास्त्राशी संबंध काय ? साधना शास्त्र ह्याला सुसंगत कसे ? परमार्थ कोणी, कुठे, कसा व केव्हा करायचा ? विविध संतांनी ह्या संबंधी कसे मार्गदर्शन केले आहे ?
जिज्ञासू व विचारवंत माणसाला पडणाऱ्या अश्या प्रश्नांची उत्तरे म्हणजे 'आनंदाचे तत्त्वज्ञान'.
Brief Intoduction about Dr Kaka -
Dr. Shrikrishna Deshmukh is an exponent of Advait philosophy, with profound study of Upanishads, Bhagwat-Geeta and Brahmasutras. With deep devotion to God and love for mankind, he has been giving lectures and discourses on various topics of Vedanta for last 25 years. He has been honored and has received numerous awards throughout his life – at ‘Akhil Bhartiya Kirtan Kul’, received ‘Dnyan-bhushan’, ‘Samaj-bhushan’ awards, chief guest of ‘Marathi Sant Sahitya Parishad’ at Ujjain – to name a few. For more information about his work, please check http://www.vedantbhaskar.org
There are no fees/charges to attend the lectures.
This Webinar is held every week on Monday, Tuesday, Wednesday, Thursday and Friday, from:
Jul 9, 2012 to Jul 20, 2012 6:00 PM - 7:00 PM PDT
Register Now at:
https://www1.gotomeeting.com/register/678785200
Once registered you will receive an email confirming your registration with information you need to join the Webinar.
System Requirements
PC-based attendees
Required: Windows® 7, Vista, XP or 2003 Server
Macintosh®-based attendees
Required: Mac OS® X 10.5 or newer
अश्विनी, धन्यवाद.... आता, कशा
अश्विनी, धन्यवाद.... आता, कशा आहात?
नमस्कार गामा, धन्यवाद!
आपला 'भाव' अगदी योग्य आहे.धन्य त्या भावाची... अनंत प्रणाम !
फक्त श्रीसंतवचनामधेच तहानलेल्याची, तहान भागवायची उपजत प्रवृत्ती असते... म्हणूनच सत्संगतीला.. श्रीसंतांच्या सत्विचाराने स्थिर झालेल्या बुद्धीला परमार्थात फार महत्त्व आहे.
...पडलेली,तुम्हाला जाणवलेली सावली श्रीसंतवचनांची आहे.. ! असो.
धन्यवाद!
क्ष... धन्यवाद! कसे आहात?
प.पू.श्रीकाकांच्या श्रीचरणी साष्टांग नमस्कार!
माधव,
>>>
१. शरीराने - यात पूजा, उपास, मौखीक जप, इतर व्रते ई. येतात.
२. मनाने - यात तुमचे साध्य नेहमी तुमच्या मनात असते. ह्यात मानस जप ई येतात.
३. बुध्दीने - यात तुमच्या बुध्दीने किंवा विवेकाने अयोग्य ते गाळत तुमच्या साध्यापर्यंत पोचायचे असते.
या तीन प्रकारावरून अनुक्रमे कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग हे तीन मार्ग आहेत. भक्तिमार्ग हा सगळ्यात श्रेष्ठ असे श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे. का? कारण त्याच्यापर्यंत पोहचण्याकरता जो ध्यास, जे प्रेम लागते ते फक्त मनातच उत्पन्न होते त्यालाच भक्ति म्हणतात. त्यामुळे इतर दोन्ही मार्गांवरून चालताना पण भक्ती असणे गरजेचे आहे.
माधव, याच्याविषयी थोडे बोलूयात. कारण परमार्थाची सुरुवात होणे म्हणजे काय आणि अखेर काय आहे याचे ज्ञान असणे जरूरी आहे. परोक्षज्ञानाने.. अप्रत्यक्ष ज्ञानाने... म्हणजेच ऐकीव माहितीने हळुहळू ध्येयाविषयी निश्चितपणा येत जातो. विचारात बदल झाला तर, नवीन विचारानुसार प्रत्यक्ष कृतीची शक्यता वाढते. म्हणूनच परमार्थाची सुरुवात 'श्रवण' या महत्त्वाच्या अंगापासून होते.जे श्रवण झाले... जी श्रीसंतवचने कानावर पडली त्यावर जर प्राथमिक विचार केला गेला तर 'मनन' हे पुढचे अंग पार पडते.
आता लक्षात येते 'मनना' मध्ये मुख्य भुमिका मनाची आहे. जसे एखादा प्रवचनाला बसला आहे आणि प्रवचनाचे शब्द कानावर पडत आहेत पण मनच जागेवर हजर नाही... ते आपल्या नेहमीच्या सवयी नुसार जगाचे कसे होणार? या विचारात गर्क असेल तर ना स्वतःचा उद्धार होणार.. ना कल्पनेतल्या जगाचा.
म्हणुनच पुढचे अंग आहे 'चिंतनाचे'. म्हणजेच श्रवणाने झालेल्या विचारावरही परत 'विचार' केला पाहीजे. हा विचाराचा विचार फार महत्त्वाचा आहे. कारण नंतरच मग प्रत्यक्ष कृतीकडे मोर्चा वळतो.
मग परत नवीन श्रवण..परत मनन.. चिंतन... कृती अशी साखळी तयार होते. त्यातूनच निदिध्यासन..ध्यान सुरू होते. हे पुढचे अंग आहे. ध्यानाचा शेवट... शेवटच्या अंगात म्हणजेच आत्मसाक्षात्कारात होतो... अर्थात 'मी' कोण आहे? याची अपरोक्ष.. प्रत्यक्ष जाणीव या साक्षात्कारात होते. या जाणीवेने तमाम दु:खांचा शेवट होतो. दु:खांची आत्यंतिक निवृत्ती... हेच आत्मक्षात्काराचे लक्षण आहे.
दु:खाचा शेवट, दु:खाचा अभाव म्हणजे 'आनंद' प्राप्ती नव्हे. मी 'देह' नाही... हे वळल्यामुळे देहाचे धर्म आणि दु:ख यांचा संबंध संपतो. अर्थात देहाचे धर्म संपत नाहीत, ते आहे तसेच असतात..राहतात, पण ते देहधर्म माझे नाहीत याचा प्रत्यक्ष अनुभव होतो... त्यामुळे संबंध संपतो.
या प्रवासाचा अंतिम टप्पा आहे 'आनंदाची प्राप्ती'. 'मी' आत्मरुप आहे, ही जाणीवही जिथे संपते तिथे आनंदाचे साम्राज्य, स्वानंदसाम्राज्य सुरु होते. म्हणजेच परमार्थाचा शेवट हा कधीही न संपणार्या आनंदा साठी आहे.... हे श्रवण केल्याने कळते.
मग प्रश्न असा पडतो .... श्रीसंत निस्वार्थपणे, एवढे आपल्या परमहिताचे सांगत असताना... आपले तिकडे दुर्लक्ष का होते? आपल्यालाच आपल्या उद्धाराची काळजी का बरे असू नये? 'दुर्लक्ष करणे', हा प्रयत्नवादावरचा विश्वास म्हणायचा का अविश्वास?
धन्यवाद!
सावट, धन्यवाद. मी बरी आहे.
सावट, धन्यवाद. मी बरी आहे. श्रीराम.
नेहमीप्रमाणेच उत्तम पोस्ट. एक एक शब्द चपखल वापरता आणि टू द पॉईंट लिहिता, त्यामुळे तुमच्या पोस्टमधलं नक्की काय घेऊ? असा विचार करायची वेळ कधीच येत नाही
श्रीसद्गुरु ज्ञानदेव
श्रीसद्गुरु ज्ञानदेव महाराजांचा उपदेश पाहुया....
मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात्तरिष्यसि |
अथ चेत्त्वमहंकारान्न श्रोष्यसि विनङ्क्ष्यसि ||श्री भ.गी. १८.५८||
मग अभिन्ना इया सेवा| चित्त मियांचि भरेल जेधवां|
माझा प्रसादु जाण तेधवां| संपूर्ण जाहला ||श्री ज्ञा.१८.१२६९||
तेथ सकळ दुःखधामें| भुंजीजती जियें मृत्युजन्में|
तियें दुर्गमेंचि सुगमें| होती तुज ||१२७०||
श्रीभगवंत, श्रीपार्थांना समजावत आहेत...
'अशा प्रकारे, ... अगोदर 'तू आणि मी' असा जो भेद, तुझ्या 'आत' आहे, त्या भेदानेरहित होऊन.. त्यानंतर(मग),अभिन्नपणे म्हणजेच 'भक्त' होऊन,ज्यावेळी तुझ्याकडून अशा अभेदभावाने, द्वैताशिवाय माझी सेवा होईल , त्यावेळी तुझ्या चित्त्तात फक्त मीच मी भरलेला असेन. माझ्याशिवाय दुसरे काहीच असणार नाही. अशी जर तुझी स्थिती झाली, तर त्यावेळी तू ...माझा प्रसाद संपुर्ण झाला, असे खुशाल समज.
असे जर झाले तरच.. सर्व दु:खांचे घर... अशी 'जन्म-मरणे भोगण्यापासून,तुझी सुटका अर्थातच होईल. ( या 'दुर्गम' अशा स्थिती पासून माझी सुटका होईल का नाही? अशी शंका मनात आणू नकोस.)
सूर्याचेनि सावायें| डोळा सावाइला होये|
तैं अंधाराचा आहे| पाडु तया ? ||१२७१||
तैसा माझेनि प्रसादें| जीवकणु जयाचा उपमर्दे|
तो संसराचेनी बाधे| बागुलें केवीं ? ||१२७२||
म्हणौनि धनंजया| तूं संसारदुर्गती यया|
तरसील माझिया| प्रसादास्तव ||१२७३||
अरे, धनंजया... सुर्याने आपणहून जर डोळ्याला सहाय्य केले तर, मग अंधार राहीलच कसा? डोळ्यांनी अंधाराला भिण्याचे कारण ते काय? तसेच जर माझ्या प्रसादाने ज्यावेळी तुझे 'मी-तू पण' सरेल त्याचवेळी पुनरपि संसाराचे भय... बागलबुवा भिती कसा दाखवेल?(कारण 'मी-तू' हा भेद म्हणजेच संसार.)
अथवा हन अहंभावें| माझें बोलणें हें आघवें|
कानामनाचिये शिंवे| नेदिसी टेंकों ||१२७४||
पण जर का असे झाले नाही, माझे हे 'सुरुवात आणि त्याचा शेवट' असे कारणासहीत असलेले संपुर्ण बोलणे जर तुझ्या अंगभूत असणार्या अहंकारामुळे तू ऐकले नाहीस, तुझ्या कानावर तुझ्याकरिता अतिमहत्त्वाच्या , तुझ्याच परमहिताच्या गोष्टि पडूनही, जर तुझ्या मनाची त्याच्याशी गाठ पडली नाही, त्याचे तू श्रवण केले नाहीस...तू दुर्लक्ष केलेस, तर मात्र माझाही नाईलाज आहे. एवढे स्पष्ट सांगुनही जर तुला कळत नसेल, तर मात्र पुढच्या घडणार्या, 'अटळ' गोष्टींची जबाबदारी माझी नाही....!
कोणती 'अटळ' गोष्ट? ... ज्याची जबाबदारी सर्वस्वी अहंकाराने धुसफुसणार्या जीवाची आहे, सावध करणार्या श्रीभगवंताची नाही !
तरी नित्य मुक्त अव्ययो| तूं आहासि तें होऊनि वावो| देहसंबंधाचा घावो| वाजेल आंगीं ||१२७५||
जया देहसंबंधा आंतु| प्रतिपदीं आत्मघातु|
भुंजतां उसंतु| कहींचि नाहीं ||१२७६||
येवढेनि दारुणें| निमणेनवीण निमणें|
पडेल जरी बोलणें| नेघसी माझें ||१२७७||
तू जरी स्वरुपाने नित्यमुक्त, अवयव रहित असलास तरी... तुझ्याच अहंकारामुळे तुझा देहाशी परत संबंध येईल. नित्यमुक्त असा तू देहात 'बंदी' होशील. आणि मग तुझ्या अजून.. पावलोपावली होणार्या अधःपतनाला उसंत मिळणार नाही. माझे बोलणे जर मनावर घेणार नाहीस तर तुझा सारख्या अमर्त्याला, परत परत मरणाचे... अनंत वेळा जन्म घेऊन.. परत परत मरण्याचे दारुण दु:ख अनंत काल भोगावे लागेल.
पथ्यद्वेषिया पोषी ज्वरु| कां दीपद्वेषिया अंधकारु|
विवेकद्वेषें अहंकारु| पोषूनि तैसा ||१२७८||
तुझा देह हा जन्मजातच रोगांचे, विकारांचे भांडार आहे.(किंबहुना दु:ख भोगण्यासाठीच तुला देह मिळाला आहे... असे असताना ) अशा देहाच्या जोरावर, तो देह मीच आहे, अशा अहंकाराच्या बळावर, जर माझ्या उपदेशाचे,... विवेकाने, आदराने 'श्रवण' करायचे सोडून, देहालाच 'सत्य' मानून ...त्या सांगण्याचा द्वेष करशील तर अंगात 'ताप' असलेल्याने पथ्यपाण्याचा द्वेष केल्यासारखे होईल... अंधकाराने दिव्याचा द्वेष केल्यासारखे होईल. असे करण्याने तुझा जन्मजात असणारा 'ताप'.. दु:ख कमी न होता अजून दारुण रुप धारण करेल.
म्हणून हे धनंजया, तुझ्या... देह म्हणजेच मी, अशा पक्क्या समजूतीने असणार्या, पाप-पुण्याचे कल्पना बाजूला ठेव आणि... मी... स्वतः .... देहातित असणारा (श्रीभगवंत) काय सांगतोय, त्याचे नम्रतेने(अहंकाररहित) होऊन अवश्य 'श्रवण' कर... कारण तुझ्या तमाम दु:खांचे हरण करण्याची शक्ती, केवळ तुझ्या श्रवणात आहे, हे पक्के लक्षात ठेव!
धन्यवाद!
माधव, थोडे अजून पाहुयात...
माधव,
थोडे अजून पाहुयात... हे जरुरी आहे.. कृपया राग मानु नये ही नम्र विनंती.
>>>
१. शरीराने - यात पूजा, उपास, मौखीक जप, इतर व्रते ई. येतात.
२. मनाने - यात तुमचे साध्य नेहमी तुमच्या मनात असते. ह्यात मानस जप ई येतात.
३. बुध्दीने - यात तुमच्या बुध्दीने किंवा विवेकाने अयोग्य ते गाळत तुमच्या साध्यापर्यंत पोचायचे असते.
या तीन प्रकारावरून अनुक्रमे कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग हे तीन मार्ग आहेत. भक्तिमार्ग हा सगळ्यात श्रेष्ठ असे श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे. का? कारण त्याच्यापर्यंत पोहचण्याकरता जो ध्यास, जे प्रेम लागते ते फक्त मनातच उत्पन्न होते त्यालाच भक्ति म्हणतात. त्यामुळे इतर दोन्ही मार्गांवरून चालताना पण भक्ती असणे गरजेचे आहे.
तुम्ही सांगितल्यानुसार मनाने करायच्या भक्तीमार्गात साध्य मनात असते... ते मनातले 'साध्य' काय आहे? तसेच बुद्धीने अयोग्य ते गाळल्यावर कोणत्या साध्यापर्यंत पोहचते. हे साध्य आणि अगोदरचे भक्तिमार्गातले..मनातले साध्य यांचा परस्पर संबंध कसा लावायचा? आणि महत्त्वाचे म्हणजे शरीराने.. कर्ममार्गाने कोठे जाऊन पोहचते?
धन्यवाद!
एक व्यक्ती उत्तम भक्त आहे.
एक व्यक्ती उत्तम भक्त आहे. कितीही मोठे संकट आले तरी तिची भक्ती डळमळत नाही. तिच्याच शब्दात सांगायचे तर "वाट्टेल ते झाले तरी मी त्याचा धावा करणे सोडत नाही. जे काही होइल ती तुझीच इच्छा असे म्हणून पुढे जायचे" हा खरा भक्तीमार्ग - भक्ती मनातच उमलते. बुद्धीच्या कह्यात न येता.
दुसर्या एका व्यक्तीची पण तिच्या तत्वांवर श्रद्धा आहे. पण तिने ती तत्वे आपल्या त्या वेळच्या सारासार विवेकाच्या पातळीनुसार अंगिकारली आहेत. जेंव्हा संकट येते तेंव्हा बुद्धीला ग्लानीशी येते. मग आपल्याच तत्वांवरची श्रद्धा डळमळीत होते. पण संकटातून थोडे बाहेर आल्यावर बुद्धी त्या अनुभवाचा आढावा घेते. कधी काही तत्वे हलवून बळकट होतात तर कधी काही नवीन अंकुरतात. सारासार विवेकाच्या पातळीत वाढ होते.
दोन्ही बाबतीत बर्याचदा मोजता येण्यासारखे काही नसते. पण कर्ममार्गात बर्याचदा मोजता येण्यासारखे साध्य असते उदा. 'परांकारणे दुरुत्तरी कदा त्याने ताडू नये' हे एक ध्येय ठेऊन होणारी मार्गक्रमणा मोजता येण्यासारखी असते. आपल्याच तोंडाने आपण लोकांना किती दूषणे दिली याची मोजदाद ठेवता येते. पण हाच कर्ममार्ग पुढेपुढे मोजदाद करण्याच्या पलीकडे जातो. वरचेच ध्येय मग मनात दुसर्याविषयी जराही वाईट विचार येऊ देऊ नये असे बदलते.
शेवटी ध्येय एकच उरते - 'मी'ची खरी ओळख! त्या 'मी'चे अव्याहत असणे, त्याचे ठायी असलेले चैतन्य आणि त्याचे सदैव आनंदात निमग्न असणे याची प्रचिती येणे.
माधव, धन्यवाद छान सांगितले
माधव, धन्यवाद छान सांगितले आहे.
>>>जे काही होइल ती तुझीच इच्छा असे म्हणून पुढे जायचे" हा खरा भक्तीमार्ग - भक्ती मनातच उमलते. बुद्धीच्या कह्यात न येता.
असे असेल तर मग भक्तिमार्गात बुद्धिचे महत्त्च नाही असे म्हणावे काय?
धन्यवाद!
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक करण्यासाठी बुद्धी लागतेच.
माधव, मग, बुद्धीच्या कह्यात न
माधव,
मग, बुद्धीच्या कह्यात न येता... म्हणजे कसे?
धन्यवाद!
त्यांना कदाचित "विकल्पाचा
त्यांना कदाचित "विकल्पाचा आहारी न जाता" असं म्हणायचं असेल.
माधव, अश्विनी, बुद्धी आणि मन
माधव, अश्विनी,
बुद्धी आणि मन (संकल्प किंवा विकल्प करणारे ते मन), अशा दोन्हीही बाजूने विचार केला तरी हे सुसंगत नाही. मग,
अर्जुना समत्त्व चित्ताचे | तेचि सार जाण योगाचे |
जेथ मन आणि बुद्धीचे | ऐक्य आथी ||
या ज्ञानोक्तीची व्यवस्था काय? मन जसं भरकटतंय तशी बुद्धी भरकटायला लागली तर योग साध्य होतो असे ज्ञानेश्वर महाराज नक्कीच म्हणत नाहीयेत
संकल्प किंवा विकल्प करणारे ते
संकल्प किंवा विकल्प करणारे ते मन),>>> म्हणजेच मनाच्या आहारी न जाता.
माधव यांनी वर दिलेल्या उदाहरणात मनाचा आहारी न जाता (मनाविरुद्ध झाल्यावर भगवंताला दोष न देता किंवा तत्सम प्रकारे मन विचलित न होता) बुद्धीच्या अंकुशाखाली मन स्थिर ठेवून वागणं होत आहे असे वाटते. त्यांनी बुद्धी शब्द चुकून वापरला असावा कारण कित्येक वेळा विकल्प मनात उठणे यालाच बुद्धी वापरुन विविध प्रश्न उत्पन्न करणे असा समज केला जातो. चौकस बुद्धी असणं वेगळं आणि विकल्पांमुळे उलट सुलट हेलकावे खात राहणं वेगळं. दोन्हींमध्ये फरक करता आला नाही की श्रद्धेला अंधश्रद्धेचा स्टँप लावला जातो. एखादी अप्रिय घटना घडल्यास देव नाहीच म्हणणं किंवा देव खरंच असता तर असं घडलंच नसतं म्हणणं या गोष्टी आपण बघत असतो. चांगल्या वाईट घटना तर घडतच राहणार आहेत पण आपल्याच हृदयात राहात असलेला तो भगवंत त्यातही अविचलित राहायचे सामर्थ्य देतो. आणि तो प्रेम रुपी परमात्मा त्याच्या भक्तीरुपिणी राधेसोबतच नांदत असतो.
माहित नाही नीट सांगता येतंय की नाही ते
क्ष, तू इथे नेहमी लिहित जा. अपेक्षा आहेत तुझ्याकडून
सावट, क्ष, 'फुलणे' हा कदाचीत
सावट, क्ष,
'फुलणे' हा कदाचीत चुकीचा शब्द असावा माझ्या आधीच्या पोस्टमध्ये. तिथे उगवते हा शब्द हवा होता.
मन हे पावसाळ्यापूर्वीच्या माळरानासारखे असते. त्यात अनेक वृत्तींच्या बीया पेरलेल्या असतात. त्यातलीच एक बी भक्तीची असते. ज्याचे जसे प्रारब्ध तसा 'त्या'चा कृपाघन बरसतो. वृत्तीचे बीज अंकुरते. प्रारब्धी असेल तर भक्तीचे बीजही अंकुरते. बुद्धी ही शेतकर्याप्रमाणे असते. बीज अंकुरणे तिच्या हातात नसते. भक्ती कर असे मनाला बजावून भक्ती घडत नसते.
पण भक्तीमार्गात बुद्धी काहीच काम करत नाही का? तर नक्की करते. वर म्हटल्याप्रमाणे ती शेतकरी आहे. मनाची मशागत करते ती. तिचे सगळ्यात महत्वाचे काम म्हणजे मनात उगवणारे विचारांचे (संकल्प, विकल्प इ.) तण सतत उपटत रहाणे. भक्तीचे रोप मग मनात जोमाने वाढते. तिला आवश्यक असे दया, प्रेम इ. विचार मनातच निर्माण होतात.
त्यामुळे भक्ती मनातच उगवते आणि तिथेच वाढते, फुलते. पण बुद्धीने विचारांचे तण नाही काढले तर मन इतर विचारातच गुंतून राहील आणि त्यातच हा जन्म संपून जाईल. भक्तीची वाढ फारच थोडी होइल. मग परत मानवाचा जन्म मिळेपर्यंत वाट पहाणे आले. म्हणून याच जन्मी बुद्धीचा योग्य तो वापर करून भक्ती जोमाने वाढू देणे हे उत्तम.
माधव, अश्विनी
माधव, अश्विनी धन्यवाद!
माधवा... मग परत प्रश्न उठतो... ज्ञानमार्गात काय होत असेल? मन आणि बुद्धीचे गुणधर्म बदलतात काय?
आणि राहीलेला तिसरा शरीराने करावयाचा कर्ममार्ग... त्याच्याबद्द्ल काय? यात मन आणि बुद्धीची गरज लागते का नाही?
क्ष... धन्यवाद!
माधव, तत्त्व जाणण्याकारण ।
माधव,
तत्त्व जाणण्याकारण । मार्ग कथिले आहेत तीन ।
कर्म, भक्ति, योग म्हणून । शास्त्रकारांनीं शास्त्रांत ॥श्री ग.वि. ६.६३॥
श्रीगजानन विजय मध्ये श्रीमहाराजांनी सांगितलेल्या मार्गात... कर्म,भक्ति आणि योग अशी तीन नावे आहेत... 'ज्ञानमार्ग' कुठे आहे?
धन्यवाद!
सावट, त्याच ग्रंथात महाराज मी
सावट,
त्याच ग्रंथात महाराज मी भक्तीपंथ धरला आहे असे एके ठिकाणी म्हणतात आणि दुसर्या ठिकाणी मी योगमार्गी आहे असेही म्हणतात. पण सगळ्यात महत्वाचे वाक्य म्हणजे 'मार्ग चालण्या प्रारंभ झाला परि मुक्कामास नाही गेला अशांचाच होतो भला तंटा पंथाभिमानाने'.
तीनच काय मार्ग अगणित आहेत. तंत्रमार्गि गुरु असलेल्या माउली मरहट्ट प्रांती वारकरी पंथाचा - जो भक्तिपंथ गणला जातो - पाया घालतात. तेंव्हा हे असे केले म्हणजे अमुक मार्ग असे म्हणण्यात फारसा अर्थ नाही.
'धर्म बापा ज्याचा त्यानी प्रिय मानावा प्राणाहुनी परी विधर्म्याच्या ठिकाणी अलोट प्रेम धरावे' यात धर्माच्या जागी पंथ हा शब्द वापरून तो लक्षात ठेवावा. शेवटी साध्य महत्वाचे, मार्ग नाही.
धन्यवाद माधवा! >>>त्याच
धन्यवाद माधवा!
>>>त्याच ग्रंथात महाराज मी भक्तीपंथ धरला आहे असे एके ठिकाणी म्हणतात आणि दुसर्या ठिकाणी मी योगमार्गी आहे असेही म्हणतात. पण सगळ्यात महत्वाचे वाक्य म्हणजे 'मार्ग चालण्या प्रारंभ झाला परि मुक्कामास नाही गेला अशांचाच होतो भला तंटा पंथाभिमानाने'.
माधवा, महात्म्यांची वचने जशी आहे तशीच अभ्यासावीत म्हणजे संशय दूर होण्यास मदत होते. अन्यथा 'संशय' आहे तसाच रहातो. साधे उदाहरण पहायचे झाल्यास.... ज्यावेळी श्रीसंत म्हणतात... श्रीभगवंतापर्यंत जाण्याचा सुगम मार्ग म्हणजे 'नामस्मरण' .... असे सांगताना, त्याचा.. त्याचवेळी दुसरा अर्थ असा होतो की याच्या पेक्षा अजून सोपा मार्ग.. अजून दुसरा नाही, हा शेवट(ऐलतीरावर) आहे... एवढे तरी करावेच लागेल... हे न करता मार्ग प्रारंभच होणार नाही. ज्याला वाटते 'देव' भेटावा त्याने किमान एवढे तरी केलेच पाहीजे.
श्रीमहाराज एकदा म्हणतात मी 'भक्तीपंथ' धरला.. तर एकदा म्हणतात मी 'योगमार्गी' आहे. अर्थात संशयातीत असे श्रीमहाराज म्हणतात ते 'सत्य' च आहे. संशय आपल्याला आहे म्हणून विचारही आपल्यालाच करावा लागेल.
>>>तीनच काय मार्ग अगणित आहेत. तंत्रमार्गि गुरु असलेल्या माउली मरहट्ट प्रांती वारकरी पंथाचा - जो भक्तिपंथ गणला जातो - पाया घालतात. तेंव्हा हे असे केले म्हणजे अमुक मार्ग असे म्हणण्यात फारसा अर्थ नाही.
खरे आहे! मार्ग अनेक आहेत हे खरे आहे. पण 'मार्ग' म्हणजे काय हे समजावून घेतानाच जर 'समजूत' चूकीची असेल तर अवश्य तंटा होतो. प्रत्यक्ष भगवान शिवांनी मनोलयाचे सव्वालक्ष मार्ग सांगितले आहेत.. पण मार्ग अनेक असले तरी 'मन' तेच आहे... त्याला 'बायपास' करता येत नाही. जसे खाण्याचे पदार्थ अनेक आहेत पण शेवटी 'तोंडाच्या' मार्गानेच खावयास हवेत. 'तोंड' गाळून चालत नाही तसे.....!( हे आपल्या वरच्या कर्म,भक्ती,योग, ज्ञान इ. मार्गा संदर्भात परत तपासून पहावे म्हणजे लगेच लक्षात येईल... म्हणूनच संशय रहित होणे महत्त्वाचे आहे.)
>>>'धर्म बापा ज्याचा त्यानी प्रिय मानावा प्राणाहुनी परी विधर्म्याच्या ठिकाणी अलोट प्रेम धरावे' यात धर्माच्या जागी पंथ हा शब्द वापरून तो लक्षात ठेवावा.
धर्माच्या जागी 'पंथ' असा शब्द न वापरता.. ज्याचा त्याचा धर्म म्हणजे... 'स्वधर्म' हाच अर्थ बरोबर आहे.
>>>शेवटी साध्य महत्वाचे, मार्ग नाही.
म्हणूनच साध्यात एकवाक्यता(शास्त्राशी) हवी. ती नसेल तर मार्ग हमखास चुकणारच! कारण जशी 'समज'.. भाव तसा देव' या न्यायानेच सर्व पारलौकिक व्यवहार चालतो. जसे 'मी देह आहे' असा भाव(समज) असेल तर 'साध्य' म्हणून देहच मिळणार हे नक्की आहे. 'मी देह नाही' असे म्हंटले, पण मी म्हणजे नक्की कोण, याची समज नसेल तरिही अर्थात देहच मिळणार.
सर्व संतानी देहात असतानाच देहातीत अवस्था प्राप्त करून घेतली. म्हणून आपलेही तेच 'साध्य' आहे.
( माधवा... याच्यावरही अवश्य विचार करावा... ही विनंती.)
धन्यवाद!
सावट ____/\______ धन्यवाद.
सावट ____/\______ धन्यवाद.
माधव, >>प्रारब्धी असेल तर
माधव,
>>प्रारब्धी असेल तर भक्तीचे बीजही अंकुरते
मग तुकाराम महाराज
भक्ती तो कठीण सुळावरील पोळी
निवडी तो बळी विरळा शूर ||
इथे "निवडी" का म्हणतायत? मिळे ज्याला का म्हणत नाहीत?
ज्ञानेश्वर महाराज
तरी झडझडोनि वहिला निघ | इये भक्तीचिया वाटा लाग |
जिया पावसी अव्यंग | निजधाम माझे ||
असे का म्हणतात? इथे भक्ती आपसूक नि प्रारब्धांत असेल तरच होईल असे सूचित मुळीच नाही.
>>याच जन्मी बुद्धीचा योग्य तो वापर करून भक्ती जोमाने वाढू देणे हे उत्तम
म्हणजे काय? भक्ती जोमाने कशी वाढवावी? मुळांत भक्ती म्हणजे नक्की काय?
अश्विनी - म्हण माहितीये ना? भरवशाच्या म्हशीला .. ?
>>तो प्रेम रुपी परमात्मा त्याच्या भक्तीरुपिणी राधेसोबतच नांदत असतो
नारदभक्तीसूत्रांत भक्तीचे स्वरुप "सा त्वस्मिन परमप्रेमरुपा" असे सांगितले आहे. जर प्रेम परमात्म्यावर करायचे असेल तर परमात्मा प्रेमरुपी कसा? भक्तीचे स्वरुपच परमप्रेम असेल तर भक्ती आणि प्रेम "सोबत" कसे नांदतील?
सावट, काही पिकतंय का नुसतीच नांगरणी चालली आहे?
>>श्रीभगवंतापर्यंत जाण्याचा सुगम मार्ग म्हणजे 'नामस्मरण' ..
हे थोडं स्पष्ट करा. नामस्मरण सुलभ का?
ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ | सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ||
माऊली हरिपाठात असं का म्हणतायंत?
अरे वा.. वा .. वा! हसरी,
अरे वा.. वा .. वा!
हसरी, अश्विनी, माधव... आपल्या 'उपासनेची' गाडी अखेर, श्रीमाउली कृपेने.... श्रीहरिपाठाच्या दाराशी येऊन थडकली. असे वाटते आहे... सर्व साधने बाजूला टाकून अलगत इथेच श्रीमाउलीचरणी अखंड विश्राम पावावे. आपल्या सर्वांनाही नम्र विनंती आहे.. आपणही या प्रगाढ शांततेचा अनुभव अवश्य घ्यावा आणि हे अनुभवाचे सुख 'मनाला' परत-परत दाखवावे. मनाला एकदा का या सुखाची चटक लागली की आपोआपच सुखरुप.. आनंदरुप.. ज्ञानरुप.. प्रेमरुप...भक्तीरुप अशा श्रीमाऊलीचरणी अवश्य स्थिरावेल.
'क्ष' सांगत आहेत ते खरेच आहे. 'करणे आणि होणे' यात गल्लत करता कामा नये. 'प्रपंच' हा प्रारब्धानुसार होतो..तर 'परमार्थ' हा करावा लागतो. पण आपण स्व प्रयत्नाने प्रपंच करावयास जातो आणि परमार्थ प्रारब्धाच्या स्वाधीन करून टाकतो. हे आपले चुकते.
आपले कालचे (गतजन्मीचे) प्रयत्न म्हणजे आजचे प्रारब्ध.. आणि आजचे प्रयत्न म्हणजे उद्याचे प्रारब्ध.. हे लक्षात आले की दिशा मिळते. म्हणूनच 'धर्म,अर्थ,काम आणि मोक्ष' यांना पुरुषार्थ म्हणजेच प्रयत्नाने साध्य होणारा, असे म्हंटले जाते.
'धर्म' चांगले करा.. वाईट सोडा असे सांगतो. यातील 'चांगले कर्म' म्हणजे इतरांना सुख देणारे आणि 'वाईट कर्म' म्हणजे इतरांना दु:ख देणारे एवढे कळाले तरी पुरते. इतरांना दु:ख न देता धन मिळवावे आणि आपल्या कामनांना नितीच्या सहाय्याने संयमित करावे. असे संयमित आयुष्य 'मोक्ष' या 'सुखरुप' परमपुरुषार्था साठीच वापरावे. सयंमित नसलेल्या कामना आपल्याहि नकळत स्वैराचाराकडे धावतात आणि शेवटी 'दु:खरुप' होतात.
जोपर्यत 'मी' करतो असा भाव आहे, तो पर्यंत प्रयत्न,पुरुषार्थ करणे भाग आहे... असो.
अश्विनी... मार्ग कोणताही असो 'भक्ती' हेच साध्य आहे.
क्ष,
श्रीभगवंताचे 'नाम' मुखी येणे हेच भाग्याचे लक्षण आहे. पण असे असले तरिही ज्या 'नामाने' भक्ती हे महादुर्लभ रत्न प्राप्त होते, ते नाम ही तेवढेच महादुर्लभ आहे. ते ज्याच्या कडून मिळते.. तो कृपाळू दाताच 'दुर्लभ' या नावाने जगप्रसिद्ध आहे. असा 'जाणकार' दाता अर्थातच 'विरळ' ही आहे. या दुर्लभ नामालाच... त्याच्या कार्यामुळे 'सुलभ'.. सुगम म्हणतात.
मी अमुक अमुक देवाचा.. श्रीगुरुंचा भक्त आहे असे जो म्हणतो.. तो शास्त्रदृष्ट्या 'भक्त' असत नाही... अर्थात त्याच्याकडून 'भजन' होणे ही शक्य नाही.
धन्यवाद!
भक्तीचे स्वरुपच परमप्रेम असेल
भक्तीचे स्वरुपच परमप्रेम असेल तर भक्ती आणि प्रेम "सोबत" कसे नांदतील? >>> राधा श्रीहरि जसे एकरुप आहेत तसेच भक्ती आणि प्रेम एकरुप आहेत. एकमेकांपासून कधीच वेगळे दाखवता येणार नाहीत. तरीपण असे वाटते की माणसाच्या हृदयात जे प्रेम भरलेले असते ते परमात्मस्वरुप असते म्हणूनच ते जिथे जिथे प्रवाहित होते तिथे आनंद पसरवते. हे परमात्मस्वरुप प्रेम मनुष्य द्वैतभावाने जेव्हा परमात्म्यावरच करु लागतो तेव्हा ती भक्ती होते.
पुष्प उमलले जे माझे वाहिले तुलाचि
तुझे तुला देतानाही भरुन मीच राही
पुष्प - परमात्मरुप प्रेम मनामध्ये वास्तव्याला येणे आणि तिथे आपोआप फुलणे
वाहिले तुलाचि / तुझे तुला देतानाही - त्या प्रेमस्वरुपावरच प्रेम करणे
भरुनि मीच राही - ही देवाण घेवाण कधीच थांबत नाही आणि ज्या हृदयात ही चालू आहे ते कधीच रिक्त होत नाही.
मार्ग कोणताही असो 'भक्ती' हेच साध्य आहे.>>> भक्ती की मोक्ष / मुक्ती?
आपणही या प्रगाढ शांततेचा अनुभव अवश्य घ्यावा आणि हे अनुभवाचे सुख 'मनाला' परत-परत दाखवावे. मनाला एकदा का या सुखाची चटक लागली की आपोआपच सुखरुप.. आनंदरुप.. ज्ञानरुप.. प्रेमरुप...भक्तीरुप अशा श्रीमाऊलीचरणी अवश्य स्थिरावेल. >>> नक्की काय हवं आहे हे शोधता शोधता शोध इथेच येऊन थांबतोय. अधुन मधुन अनुभवलं जातंयही पण प्रपंचापासून पुर्ण अलिप्त होणं कसं आणि कधी, ते माहित नाही. जी कर्तव्यं आहेत ती 'मी' पार पाडत नाहिये, तर 'तो'च करतोय, हे मात्र पक्कं जाणवतंय आणि खात्री आहे.
असे संयमित आयुष्य 'मोक्ष' या 'सुखरुप' परमपुरुषार्था साठीच वापरावे. सयंमित नसलेल्या कामना आपल्याहि नकळत स्वैराचाराकडे धावतात आणि शेवटी 'दु:खरुप' होतात. >>> परमात्म्यानेच पुरवलेल्या मनःसामर्थ्यामुळे संयमित आयुष्य जगायची सवय होते. एकदा का आपले सुकाणू त्याच्या हाती दिलं (संपुर्ण शारण्यभाव) की वेळोवेळी उत्पन्न होणार्या कामनांवर नियंत्रणही तोच ठेवतो किंवा स्वैराचाराकडे नेणार्या कामनाच उत्पन्न होऊ देत नाही. फक्त "एक विश्वास असावा पुरता, कर्ता हर्ता गुरु ऐसा".
अश्विनी, >>>मार्ग कोणताही असो
अश्विनी,
>>>मार्ग कोणताही असो 'भक्ती' हेच साध्य आहे.>>> भक्ती की मोक्ष / मुक्ती?
तुमचे काय मत आहे?
>>>हे परमात्मस्वरुप प्रेम मनुष्य द्वैतभावाने जेव्हा परमात्म्यावरच करु लागतो तेव्हा ती भक्ती होते.
तुम्ही म्हणत आहात की द्वैतभावाने.. म्हणजेच 'तो' समोरचा श्रीभगवंत आणि 'मी' त्याच्यावर प्रेम करणारा मनुष्य.. असे समजून जे मी करेन... तीच भक्ती.
तर महाविष्णु ..श्री माउली.. अर्थात प्रत्यक्ष श्रीभगवंत वचन आहे...
मग अभिन्ना इया सेवा| चित्त मियांचि भरेल जेधवां|
माझा प्रसादु जाण तेधवां| संपूर्ण जाहला ||श्री ज्ञा.१८.१२६९||
तू जे काय करशील.. ते जर माझ्याशी अभिन्न राहून होईल तर तीच 'सेवा'... बाकीचा 'व्यापार'.
मग कोणते मत 'ग्राह्य' मानायचे?
>>>नक्की काय हवं आहे हे शोधता शोधता शोध इथेच येऊन थांबतोय. अधुन मधुन अनुभवलं जातंयही पण प्रपंचापासून पुर्ण अलिप्त होणं कसं आणि कधी, ते माहित नाही.
ज्या प्रगाढ शांतते बद्द्ल आपण बोलत आहोत.. ती अधुन-मधुन अनुभवली जाती आहे.. असे तुम्ही म्हणता. मग शोध घ्या हे जे 'अधुन-मधुन' अनुभवल जातय.. ते सोडून इतर वेळी काय अनुभवल जातय आणि का? मग उत्तर तुमचे तुम्हालाच अवश्य मिळेल.
जी कर्तव्यं आहेत ती 'मी' पार पाडत नाहिये, तर 'तो'च करतोय, हे मात्र पक्कं जाणवतंय आणि खात्री आहे.
'कर्तव्य' याचाच अर्थ 'जे कर्म करायलाच पाहीजे असे'... यालाच शास्त्रात 'विहितकर्म' असे म्हणतात. श्री भगवंत म्हणतात.. ती पार पाडताना, असे करताना... अजून एक करावे लागेल.. त्या कर्मामुळे जे फळ मिळते आहे त्या फळाचा 'त्याग' करावा लागेल... आणि अतिमहत्त्वाचे म्हणजे, 'मी' त्याग केला आहे.. हे सुद्धा लक्षात येता कामा नये. या पात्रता पुर्ण करणारे कर्म म्हणजे ... कर्तव्य कर्म... अर्थात 'स्वधर्मरुपी कर्म.' असे झाले तर... अशा स्वधर्मरुपी कर्माचे महान फळ म्हणजे.. याने 'चित्त' अनायासे 'शुद्ध' होते.
>>>एकदा का आपले सुकाणू त्याच्या हाती दिलं (संपुर्ण शारण्यभाव) की वेळोवेळी उत्पन्न होणार्या कामनांवर नियंत्रणही तोच ठेवतो किंवा स्वैराचाराकडे नेणार्या कामनाच उत्पन्न होऊ देत नाही.
'संपुर्ण शारण्यभाव' ही सगळ्यात शेवटची स्थिती आहे... अगोदरची नाही!
>>>फक्त "एक विश्वास असावा पुरता, कर्ता हर्ता गुरु ऐसा".
आपला श्रीगुरुवर असा विश्वास आहे... हे बरोबर आहे. पण श्रीगुरुनाही आपल्याबद्द्लही असाच 'विश्वास' वाटतो का? वाटत असेल का? याचा 'विचार' करणे महत्त्वाचे. दोन्ही बाजूनी 'खात्री' पटायला पाहीजे की नाही ! जर 'नाही 'तर का नाही?
एकतर्फी 'प्रेम' श्रीभगवंतानाच मान्य नाही... मग अशा प्रेमाला .. ते 'भक्ति' म्हणतील का?
धन्यवाद!
--- भक्ती हा मार्ग आहे.
--- भक्ती हा मार्ग आहे. बाकीचे ज्ञान, कर्म आणि योग मार्गही एकाचा ठिकाणी जातात "मोक्षाच्या". भक्ती देखिल मोक्ष मागते पण सामिप्यमुक्तीच्या रुपात.
---- द्वैत आणि अद्वैत दोन्ही भाव ग्राह्य. द्वैत नसेल तर "तू देव मी दास ऐसे करी" हे शक्य होणार नाही. त्याच्या चरणांशी राहणे होणार नाही. नवविधा भक्तींचा आस्वाद घेणे आणि तोच आनंद भगवंताला देणे होणार नाही. इथला 'मी' हा अहंभावातला मी नसून भगवंताच्या सानिद्ध्यात आनंद अनुभवणारा 'मी' आहे. "घेई कान्होपात्रेस हृदयात"
अद्वैत नसेल तर उत्कटतेमुळे किंवा पराकोटीच्या भक्तीमुळे आलेली भगवंताशी समरसता, एकरुपता, मिसळून जाणे होणार नाही.
----असे तुम्ही म्हणता. मग शोध घ्या हे 'अधुन-मधुन' हे अनुभवल जातय.. ते सोडून इतर वेळी काय अनुभवल जातय आणि का? मग उत्तर तुमचे तुम्हालाच अवश्य मिळेल.>>>> इतरवेळीही स्मृती कायमच असते पण पुरुषार्थ करता करता ते पुरुषार्थ नीट पार पाडण्यासाठी प्रयास करणे चालू असते. त्यात देखिल आनंदच असतो तो म्हणजे या नरजन्मामुळे 'त्या'नेच नेमून दिलेल्या गोष्टींसाठी त्याच्याच सहाय्याने प्रयास करण्याचा.
----त्या कर्मामुळे जे फळ मिळते आहे त्या फळाचा 'त्याग' करावा लागेल... आणि अतिमहत्त्वाचे म्हणजे, 'मी' त्याग केला आहे.. हे सुद्धा लक्षात येता कामा नये. या पात्रता पुर्ण करणारे कर्म म्हणजे ... कर्तव्य कर्म... अर्थात 'स्वधर्मरुपी कर्म.' असे झाले तर... अशा स्वधर्मरुपी कर्माचे महान फळ म्हणजे.. याने 'चित्त' अनायासे 'शुद्ध' होते. >>> अगदी
एकदा का आपले सुकाणू त्याच्या हाती दिलं (संपुर्ण शारण्यभाव) की वेळोवेळी उत्पन्न होणार्या कामनांवर नियंत्रणही तोच ठेवतो किंवा स्वैराचाराकडे नेणार्या कामनाच उत्पन्न होऊ देत नाही. >>> संपुर्ण शारण्यभाव नसेलही पण हे जाणवतं नेहमीच. अर्थात जोपर्यंत तू करशील तेच आणि तेच हा भाव असेतोवरच हे जाणवत असावं. ज्याक्षणी एखाद्या गोष्टीत माझं मी बघून घेईन तुझी कशाला ज्यात त्याल लुडबुड? असा भाव येईल त्याक्षणी तो चटकन "थँक्यू" म्हणून टाकेल
फक्त आपला श्रीगुरुवर असा विश्वास असून चालत नाही. कारण आपण बोलताना हे नेहमीच बोलतो. पण श्रीगुरुनाही आपल्याबद्द्ल सारखेच वाटते का? वाटत असेल का? याचा 'विचार' करणे महत्त्वाचे. >>> त्यांना आवडेल असेच वागणे, त्याचा संकल्प आणि आपली इच्छा एकच करणे.
सावट, माझं वाचन जास्त नसल्याने तुम्ही ज्या ओव्या लिहाल त्यावर चिंतन, मनन आणि श्रीगुरु नेति नेति असले तरी त्यांच्याबद्दल कायम स्मृती ठेवणे अशा चाचपडणीतून लिहिताना घाम फुटतो
अर्थात घाम फुटत असला तरी शेवटी कसला तरी आनंदच मिळतो.
वरचे 'भक्ती की मोक्ष' हे
वरचे 'भक्ती की मोक्ष' हे वाचून अलीकडेच वाचलेला हा लेख आठवला.
त्यातल्या काही ओळी- शैवागमानुसार संपूर्ण जग म्हणजे शिवचैतन्याचे विलसन होय. त्यामुळे, या विश्वातील एकही जीवमात्र मुळात त्या शिवतत्त्वापासून विभक्त नाहीच. त्यामुळे यच्चयावत जीव स्वरूपत: (वि-भक्त नसलेले) ‘भक्त’च आहेत! म्हणजेच, शैवागमाच्या प्रतिपादनानुसार भक्ती हे साध्य नाही आणि साधनही नाही. भक्ती म्हणजे ऐक्याची अवस्था!
योगायोगाने याच लेखात वर चर्चिलेल्या तुकोबांच्या सुळावरील पोळीचाही उल्लेख आहे.
नमस्कार भरत, धन्यवाद!
नमस्कार भरत, धन्यवाद!
>>>त्यातल्या काही ओळी- शैवागमानुसार संपूर्ण जग म्हणजे शिवचैतन्याचे विलसन होय. त्यामुळे, या विश्वातील एकही जीवमात्र मुळात त्या शिवतत्त्वापासून विभक्त नाहीच. त्यामुळे यच्चयावत जीव स्वरूपत: (वि-भक्त नसलेले) ‘भक्त’च आहेत! म्हणजेच, शैवागमाच्या प्रतिपादनानुसार भक्ती हे साध्य नाही आणि साधनही नाही. भक्ती म्हणजे ऐक्याची अवस्था!
अगदी खरे आहे. फक्त एक लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. हे विधान ज्याचे 'ऐक्य' झाले आहे त्यांच्याबद्द्ल आहे. 'ऐक्यात' साध्य, साधन, साधक ही त्रिपुटीच संभवत नाही.
... आणि ज्याअर्थी माझे अजून ऐक्य झाले नाही.. त्या अर्थी मी अजूनही 'साधकच' आहे... म्हणूनच अर्थातच माझ्याकरीता 'साध्य' ही असलेच पाहीजे... जेणेकरून ऐक्यासाठीच माझ्याकडूनच 'साधनही' होईल.
म्हणूनच ते 'साधन' काय असावे या करीताच अजून चर्चा चालू आहे.
धन्यवाद!
Pages